रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2021
  • "मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं."
    - कुमार सोहोनी
    नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला, ४५ वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा १०० हून अधिक कलाकृती हाताळलेला, निरनिराळे प्रतिष्ठित पुरस्कार लाभलेला, अनेक नवे कलाकार घडवलेला आणि कलाक्षेत्रातील अनुभवांवर आधारित दोन अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलेला कुमार सोहोनींसारखा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक विरळाच.
    कुमार सरांनी दिग्दर्शित केलेल्या ७० हून अधिक नाटकांपैकी 'अथं मनुस जगन हं', 'रातराणी', 'वासूची सासू', 'अग्निपंख', 'सुखांशी भांडतो आम्ही', 'देहभान', 'कुणीतरी आहे तिथे', 'मी रेवती देशपांडे', 'अर्धसत्य', 'उलट सुलट', 'जन्मरहस्य', 'याच दिवशी याच वेळी' ह्या काही विशेष कलाकृती.
    नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने का लिहून काढावी, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे काय असतात, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन कसं करावं, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर आज कुमार सरांकडून ऐकायला मिळणार आहे. नाटकाच्या विविध अंगाबद्दलच्या शास्त्रीय ज्ञानाचा वापर करत असतानाच ह्या चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणात नावीन्यपूर्ण प्रयोग कसे करावेत हे सुद्धा कुमार सर सांगताहेत रंगपंढरीच्या ह्या भागात.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 10

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 2 ปีที่แล้ว

    मला नं काही बोलायला शब्दच नाहीत,
    इतक्या गोष्टींचा अभ्यास होतो आहे माझा की हाथच जोडते मी तुम्हाला आता 🙏
    आणि सोहनी सर तुम्हाला तर त्रिवार मुजराच
    🙏🙏🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว +1

    रंगपंढरी टीम तुम्ही चढत्या भाजणीप्रमाणे उत्तम, अधिक उत्तम, अत्त्युत्तम असे दिग्दर्शक आमच्यासमोर आणले. ‘Clarity’ या शब्दाची व्याख्या म्हणजे कुमार सोहोनींनी केलेलं विश्लेषण 🙏🏻 मनापासून त्रिवार नमस्कार
    परत एकदा म्हणावसं वाटतंय की मी तर एक नाटकाची प्रेक्षक आहे तर ऐकताना इतका आनंद मिळतोय तर संबंधितांसाठी तर अलिबाबाची गुहाच उघडली आहे तुम्ही 🙏🏻

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    व्वा व्वा, वेळ काढून लक्षपूर्वक बघण्याजोगा असणार! आभार.

  • @gaurisovani
    @gaurisovani 2 ปีที่แล้ว

    फारच छान माहितीपूर्ण 👌👌 धन्यवाद

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    तडवळकरसाहेब, या वेळेस वाट बघण्याची पराकाष्ठा झाली.
    नवीन भाग केव्हा येतोय? थोडा ब्रेक घेणार असलात तर ते ही सांगा.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      खरंय. काही कारणांनी बराच वेळ लागला आगामी एपिसोडची जुळवाजुळव करायला. पण पुढच्या दोन आठवड्यात एपिसोड प्रसारित होईल!

    • @dr.krupakulkarni1662
      @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhari Thanks

  • @anaghamarathe3405
    @anaghamarathe3405 2 ปีที่แล้ว +2

    3 रा part येणारे का कारण अर्धवट वाटते मुलाखत

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      भाग 3: th-cam.com/video/lIqEc5ssUtw/w-d-xo.html

    • @vidyadate
      @vidyadate 2 ปีที่แล้ว +1

      अफाट दिग्दर्शन विश्व उलगडलं. धन्यवाद !