रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2022
  • 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही.
    आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गांधी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'यळकोट', 'ध्यानीमनी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'चाहूल', 'आषाढ बार', 'हॅम्लेट' या आणि अशा अनेकोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
    संहितेचा एकंदर आशयच नव्हे तर त्यातला शब्दनशब्द आपलासा करुन अत्यंत चोख तयारीने चंदू सर नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जातात. मात्र हे काटेकोर नियोजन, नाट्यशास्त्राचा केलेला रीतसर अभ्यास, अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा अनुभव ह्यांपैकी कशाचंही ओझं मात्र ते होऊ देत नाहीत. अतिशय तन्मयतेने, उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने सादरीकरणाच्या विविध शक्यता ते नटांबरोबर आणि तंत्रज्ञांबरोबर पडताळून पाहतात; आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक रसरशीत, नावीन्यपूर्ण रंगानुभव देण्याचा प्रयत्न करतात.
    संहितेचं पुनर्लेखन ही दिग्दर्शकाने नाटककाराला स्वतःच्याच विचारांशी करून दिलेली पुनर्भेट कशी असते, प्रत्यक्ष उभं राहण्यापूर्वी नटाने संवादांवर काय काम करावं, नाटकातील हालचाली आणि आकृतीबंध हे मुद्दामहून ठरवण्याऐवजी आपोआप उमलू कसे द्यावेत, नेपथ्य आणि संगीताचा वापर द्विमितीतील रंगमंचीय अवकाश त्रिमितीत परिवर्तित करण्यासाठी कसा करावा, प्रयोग हलू नये म्हणून काय काळजी घ्यावी, काही सुचत नसेल अशा वेळी दिग्दर्शकाने काय करावे अशा अनेक रोचक विषयांवर चंदू सर आज बोलणार आहेत.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 79

  • @priyakulkarni5373
    @priyakulkarni5373 ปีที่แล้ว +11

    ह्या मुलाखतीसाठी रंग पंढरीचे अभिनंदन! अनेक दिवसांनी नाट्य दिग्दर्शनाबद्दल भरभरून बोलताना चंद्रकांत कुलकर्णी .. अनंत दिवसांनी इतकी सुंदर आणि शुद्ध मराठी ऐकते आहे, मनापासुन धन्यवाद !! मस्त ..

  • @asmita0671
    @asmita0671 ปีที่แล้ว +10

    स्पष्ट विचार, स्वच्छ वाणी आणि बुद्धिमान दिग्दर्शक.......... खूप छान मुलाखत, धन्यवाद रंगपंढरी 🙏🏼

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 ปีที่แล้ว +2

    चंदू सरांची ही मुलाखत नवीन कलाकारांसाठी विद्यापीठ प्रमाणे काम करेल.....खूप बुद्धिमान व्यक्ती आपल्या मराठी रंगमंच्याला मिळालेला आहे.

  • @arjundeshmukh6839
    @arjundeshmukh6839 2 หลายเดือนก่อน

    चंदू सरांशी तुमच्या क्रिएटिव्हीटीवर रंगलेली चर्चा म्हणजे, जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग वाटतो अतिशय अनमोल..अमूल्य असं !! मधुरा रंगपंढरी करीता खूप खूप शुभेच्छा!!

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 ปีที่แล้ว +4

    अनपेक्षित असा अलभ्य लाभ झाला ! चंदू सरांचे विचार हे अभ्यासातून आलेले, स्पष्ट , आणि विचार करायला लावणारे असतात.. मुलाखतीला सुरुवात झाल्यावर काही मिनटात, वाहनाने 3 रा गियर टाकून अतिशय सफाईने प्रवास सुरू केल्यासारखे वाटले.. फार शिकायला मिळते अशा मुलाखती मधून..!!

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 ปีที่แล้ว +3

    खूप दिवसांपासून उत्सुकतेने वाट पाहत होते. मी औरंगाबादकर असल्यामुळे सरांना ऐकणे ही माझ्यासाठी कायमच मोठी पर्वणी असते आणि अभिमानाची बाब आहे. खूप छान. अभिनंदन.

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 ปีที่แล้ว +5

    मधुराणी ताई खूप दिवसांनी, Please आता खंड नको खूप छान कार्यक्रम होतो आहे.
    सरांचे मार्गदर्शन म्हणजे मेजवानीच, धन्यवाद!!🙏

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 ปีที่แล้ว +2

    चंदू शी खास जवळचं मैत्र.
    खूप मोठा आवाका , अभ्यास, मेहनत, आत्मविश्वास, वैचारिक बैठक.
    खूप सुंदर भेट

  • @jyotimalandkar1253
    @jyotimalandkar1253 ปีที่แล้ว +2

    बऱ्याच दिवसांनी खूप छान खाद्य मिळालं. मधुराणी धन्यवाद.
    @ चंद्रकांत सर त्रिनाट्यधारेचा आनंद परत कधी अनुभवता येणार आहे आम्हाला? लवकरच यावा ही विनंती. जसा चारचौघी येऊ घातलाय तसा .......

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 ปีที่แล้ว +3

    Finally...
    Kiti divas vaat baghayla lagte next episode chi..

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत मेंदू सक्षम झाला धन्यवाद

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 ปีที่แล้ว

    44 मिनिटांवर विचार अप्रतिम.

  • @nehamalkhare9213
    @nehamalkhare9213 ปีที่แล้ว

    अस्खलित मराठी कशी बोलावी ह्याचा उत्तम परिपाठ!!
    खूप सुंदर विवेचन करणारी मुलाखत...त्यांची हुशारी आणि सखोल अभ्यास..!!
    धन्यवाद रंग पांढरी🙏

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 ปีที่แล้ว

    Awaited for long time

  • @prajktag7308
    @prajktag7308 ปีที่แล้ว +1

    Yes !! Finally!! Have been wait for this episode for ages....😄👍👏

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 ปีที่แล้ว

    30 मिनिटांवर सांगितलेला विचार अप्रतिम. एकंदरीत मुलाखत सुंदर प्रांजळ आणि भरीव

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 ปีที่แล้ว

    खुपच छान, खुप काहि शिकायला मीलाल, धन्यवाद

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 ปีที่แล้ว

    अप्रतिम रंगपंढरी! अप्रतिम मुलाखत! अचूक वेळी जन्मलेले दिग्दर्शक, सर्वांग अभ्यास करणारे चं कु जी म्हणजे अप्रतिम दिग्दर्शक. ऐकतच र हा वं असंच वाटत होतं.आणि काय लिहिलंय.धन्यवाद दोघांनाही.

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 ปีที่แล้ว +1

    आनंद.... मनापासून आभार टीम रंगपंढरी

  • @user-tp6ik4zi9i
    @user-tp6ik4zi9i ปีที่แล้ว +1

    निव्वळ अप्रतिम.
    खूप वाट पाहिली.
    तीनही भाग एकाच दिवशी प्रसारित केले
    असते तर अजुन छान वाटलं असतं.
    पण असो.
    मन: पूर्वक धन्यवाद.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 ปีที่แล้ว

    Most awaited Interview! Thank you very much. Clarity of Thoughts is amazing! So brilliant Director he is! Wonderful!

  • @manasit1491
    @manasit1491 ปีที่แล้ว +2

    Wow so good to see rangapandhari is back! Missed watching ...please continue to upload

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว

    Phar phar chhan. Apratim. Bolana, vichar, spashata. Can't thank enough. Ranga Pandhari. After a long time and such a treat!!!

  • @madhurkulkarni8864
    @madhurkulkarni8864 ปีที่แล้ว

    अप्रतिम🙏

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 ปีที่แล้ว

    फारच सुंदर मुलाखत!! अभ्यासपूर्ण......

  • @cadiwan
    @cadiwan ปีที่แล้ว

    कमाल !! खूप खूप धन्यवाद 🥰

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว

    प्रिय मधुराणी, रंगपंढरी साठी खूप खूप अभिनंदन व खूप शुभेच्छा. चंद्रकांत कुलकर्णी यांचा हा भाग १ खूप आवडला. तुमची स्टाइल नक्कीच वेगळी आहे

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 ปีที่แล้ว

    Namste, it's a Gr8 workshop on dramatics. Again 👒 off u Chandu Sir ! त्रिवार वंदन

  • @NileshMhaske
    @NileshMhaske ปีที่แล้ว

    अप्रतिम......

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 ปีที่แล้ว

    फारच छान

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 ปีที่แล้ว

    Thanx for the interview

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत 👏👏👏👏👏👏👏

  • @nehabhatkar3526
    @nehabhatkar3526 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत. दोघेही कमाल.

  • @nbsathe
    @nbsathe ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत.

  • @dilipgokhale1300
    @dilipgokhale1300 ปีที่แล้ว

    खूप सुंदर interview

  • @girishmecwan437
    @girishmecwan437 ปีที่แล้ว

    Khup khup Abhar...

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 ปีที่แล้ว

    @rangpandhari .... so happy to see u back

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 ปีที่แล้ว

    किती सुंदर बोललात श्री. चंद्रकांत कुळकर्णी.....अप्रतिमच

  • @SiddhiRahate
    @SiddhiRahate ปีที่แล้ว

    Thank you Rangapandhari team ❤️

  • @nsavadhani2126
    @nsavadhani2126 ปีที่แล้ว

    अप्रतीम !! 👍

  • @anantgokhale2884
    @anantgokhale2884 ปีที่แล้ว

    So Happy to see Rangapandhari back….

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 ปีที่แล้ว

    सर दिलखुलासपणे बोलले याचा फार आनंद झाला. खूप खूप आभार

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว

    After a very long time, good to see you n the interview...

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 ปีที่แล้ว

    तुला बघुन खूपच आनंद झाला मधुराणी! उड्या मारते आहे आनंदाने.त्यातही दुग्धशर्करायोग म्हणजे चंदु कुळकर्णीसरांची मुलाखत.

  • @vijayghosalkar316
    @vijayghosalkar316 ปีที่แล้ว

    Massttch

  • @santoshghumare
    @santoshghumare ปีที่แล้ว

    आता पर्यंतच्या सर्व एपिसोड मधील सर्वात उत्तम एपिसोड पैकी एक!

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 ปีที่แล้ว

    एक विचाराचा ठसा आपल्या पद्धतीनं मांडण ह्यातच खरी बाब आहे ! नाटक ही सामुहिक कला आहे ह्याच भान असल्याने ते आणखी छान दिसतं !

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว

    ही मुलाखत म्हणजेच एक अनुभव आहे.

  • @yojnadighe4577
    @yojnadighe4577 ปีที่แล้ว

    🙌🏼💛

  • @umeshpalnitkar5128
    @umeshpalnitkar5128 ปีที่แล้ว +3

    Waa!, Khoop Sundar,
    Thank you very much,
    for the 1st part of Chandrant Kulkarni,
    It's always a great pleasure of watching and listening Chandrant Kulkarni.
    Eagerly waiting to watch the 'triology:
    this interview
    Thank you once again
    Umesh Palnitkar

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว

    No worrds to explain this stalwart director.❤❤❤wish you all the best for ever sir.🙏🙏🙏you related the theatre to meditation is the apex point of this interview n i think your life success ,to the best of my knowledge.

  • @sachinsargar1775
    @sachinsargar1775 8 หลายเดือนก่อน

  • @yogeshrameshjadhavdirector9959
    @yogeshrameshjadhavdirector9959 3 หลายเดือนก่อน

    मराठी रंगभूमी च अनमोल रत्न

  • @prachijoshi3820
    @prachijoshi3820 ปีที่แล้ว

    Khup chan mulakhat. Siranchya Aai na personally bheta alay ani tya khup chan person hotya.

  • @medhanyayadhish6213
    @medhanyayadhish6213 ปีที่แล้ว

    apratim director !

  • @radhakrishnamuli3356
    @radhakrishnamuli3356 ปีที่แล้ว

    उत्तम मुलाखत...

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      धन्यवाद राधाकृष्ण जी!

  • @vilasmore7743
    @vilasmore7743 ปีที่แล้ว

    धन्यवाद रंगपंढरी, खूप शिकलाय मिळतय आम्हाला,

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, विलास जी!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 ปีที่แล้ว

    A genius

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 ปีที่แล้ว +1

    मजा आली. किती वेळ लावलात तुम्ही. Can't wait for the next part.

    • @devidastuljapurkar6178
      @devidastuljapurkar6178 ปีที่แล้ว

      तुझ्यातील क्षमता लक्षात घेतली तर या पेक्षा अधिक चांगली नीर्मीती अपेक्षीत आहे. शक्य आहे.

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर..आज खूप वर्षांनी नाट्यशास्त्रचे लेक्चर ऐकलं पदवीधर होताना जीवाचा कान करून ऐकलं त्याचा पुन:प्रत्यय आला..,...

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      धन्यवाद सुहासिनी जी!

  • @ravindramundale6104
    @ravindramundale6104 ปีที่แล้ว +1

    जागून ज्याची वाट पाहिली.....

  • @seemachougule8296
    @seemachougule8296 ปีที่แล้ว

    खुप खुप वाट पाहत होते
    खुप छान वाटते

  • @rajiivkharkar6634
    @rajiivkharkar6634 ปีที่แล้ว

    Nivval apppppratiimm.. Paun taas kaasa gela bilkul samzla nahi.. Madhu tu kharach Rani sarkhi disteys ga.. I wish you all the very best for all your upcoming ventures.

  • @geetalibhat336
    @geetalibhat336 ปีที่แล้ว

    सरांनी फक्त बोलत रहावे ..आणि आपण ऐकत रहावे...

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 ปีที่แล้ว +1

    2nd PART KADHI YENAAR? YA INTERVIEW CHA

  • @sangeetakeluskar5988
    @sangeetakeluskar5988 ปีที่แล้ว

    Atishay surekh mulakhat.

  • @vaishalikelkar9970
    @vaishalikelkar9970 ปีที่แล้ว

    आविष्कार च्या सुलभा देशपांडे ची भेट ऐकायला आवडेल

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      She's no more unfortunately. आम्हालाही त्यांचं ऐकायला आवडलं असतं खूप.

  • @ASHOKBAPAT
    @ASHOKBAPAT ปีที่แล้ว

    अपेक्षेहून कमी रंगलेली मुलाखत.

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      Thanks for your honest feedback!