ताडासन : फक्त मनुष्याला मिळालेलं वरदान! गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पायांवर स्थिर उभे रहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • फायदे:
    गुरुत्वाकर्षणाची ओढ सतत आपल्या शरीरावर असते. ताडासनाच्या अभ्यासामुळे शरीराचा तोल सांभाळणारे स्नायू बळकट रहायला मदत होते.
    लांब रांगेत उभे राहायला लागले, तरी थकणे जाणवत नाही.
    एकाग्रता वाढते.
    शरीरशास्त्र बिघडत नाही. आपल्या शरीरात ८० हाडांच्या जोड्या आहेत. त्या सुस्थितीत रहातात.
    श्वासोच्छवास हळुवारपणे होऊ लागतो आणि संपूर्ण शरीरात एक शांततेची जाणीव होते.
    पायातील मुख्य तीन सांधे मजबूत होतात.
    अशी ही उभे राहण्याची कला शिकून तुम्ही अजून डौलदार दिसता.
    आसनांसाठी सूचना:
    हे आसन आपल्याला सुदृढ ठेवण्यासाठी मदत करणार आहे.
    आसनाचा सराव करण्यापूर्वी आपणास काही व्याधी असेल तर आमच्या येथील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच यामधील आसनांचा सराव करावा.
    मॅट, ब्लॅँकेट (सतरंजी) सोबत ठेवावे.
    आसन श्वासावर लक्ष देत करावे. आसनातील स्थिरता टिकवण्यासाठी श्वासावर लक्ष केन्द्रित करून प्रत्येक आकड्यावर श्वास घ्यावा आणि सोडावा.
    आसन करताना जर अडचण येत असेल तर ते आसन शुभ योगाकेंद्राच्या शिक्षकांना विचारून मगच करावे.
    योगासनांचा सराव करताना जर आपल्याला दमायला झालं तर विडियो थांबवून एखादं विश्रांतीदायक आसन करावे.
    योगाचा फायदा अनुभवण्यासाठी योगासनांचा सराव नित्यनियमाने दररोज करावा.
    --------------------------------------
    --------------------------------------
    शुभ योगाकेंद्राबद्दल माहिती:
    शरीरस्वास्थ्य, मनस्वास्थ्य, आध्यात्मिक उन्नती - योगशास्त्राने हे सर्व साधता येते. यासाठी शुभदा लेले यांनी ‘शुभ योगा केंद्र’ हे योगोपचार केंद्र १९९५ मध्ये स्थापन केलं.
    श्री बीकेएस अय्यंगार गुरुजींचे शिष्य असलेल्या डॉ. श्रीकांत करंदीकर यांच्याकडून शुभदा योगशास्त्र शिकल्या. डॉ. करंदीकर यांच्या पुण्यातील कार्यशाळा वेगवेगळ्या आजारांसाठीच्या योगा थेरपीच्या आसनांबद्दल आणि त्यांचा मानवी शरीरशास्त्रावर कसा प्रभाव पडतो याविषयी तिच्या सखोल आकलनाचा प्रारंभ बिंदू होता. कार्यशाळांमुळे मानवी शरीरातील विविध स्नायू आणि सांधे तसेच त्यांचे कार्य स्पष्ट करण्यात मदत झाली. गेल्या काही वर्षांत शुभदा यांनी कबीरबाग (पुणे), कैवल्यधाम (लोणावळा), योग विद्या धाम (नाशिक) आणि बिहार स्कूल ऑफ योग (मुंगेर) येथे योगावरील अनेक कार्यशाळा आणि परिषदांमध्ये भाग घेतला आहे. कठोर योग सरावाद्वारे योगशास्त्रातील सिद्धांतांबद्दल आपले ज्ञान बळकट केले, जे आता तिच्या वर्गांद्वारे विद्यार्थ्यांना तिने उपलब्ध करून दिले आहे.
    केंद्रामध्ये मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हृदयविकार, दमा, मधुमेह, मानसिक अस्थैर्य अशा प्रकारच्या विविध आजारांवर खुर्ची, रोप (दोरी), पट्टे, बाक, लाकडी विटा अशा नेहमीच्या वापरातल्या साधंनांच्या सहाय्याने योगोपचार केले जातात.
    इथे व्याधींनी घेरलेल्या साधकांसाठी नियमित योगोपचार वर्ग असतात. त्याचबरोबर योगशास्त्रं शिकायची इच्छा असलेल्या साधकांसाठीदेखील नियमित योगवर्ग असतात.
    योगाभ्यास घरी करू इच्छिणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके आणि डीव्हीडी, पेन ड्राइववर विडियो देखील आहेत.
    अधिक महितीसाठी शुभ योगाकेंद्राचे संकेतस्थळ पहा.
    www.shubhyogak...
    संपर्क:
    shubhyogakendra@gmail.com
    #ताडासन माहिती
    #tadasana

ความคิดเห็น •