गिरनार परिक्रमा 2023 | girnar parikrama | girnar parikrama 2023 | girnar parikrama live | marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2023
  • परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटर वर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे.
    परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. एकूण ३८ किमी अंतर आहे परिक्रमेचे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण करतात, आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते.

ความคิดเห็น • 15

  • @sachintupe7574
    @sachintupe7574 7 หลายเดือนก่อน

    जय गिरणार

  • @balwantrajgor1630
    @balwantrajgor1630 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @mohiniborole8207
    @mohiniborole8207 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @arunanbhawane1291
    @arunanbhawane1291 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती व दर्शन मिळाले धन्यवाद जय गिरनारी🚩🪔🌹😇🤝✌️

  • @user-yf6sg7sw7w
    @user-yf6sg7sw7w 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती ,हे असे दगड रचलेले मी मांधाता परिक्रमेवेळी पाहिले, ते रचलेले दगड म्हणजे शिवलिंग, जे आपली मनोकामना पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे ,जय गुरुमाऊली

  • @mayaalsundekar1165
    @mayaalsundekar1165 4 หลายเดือนก่อน

    कोणत्या महिन्यात असते ही.

  • @mangalapawnaskar5859
    @mangalapawnaskar5859 2 หลายเดือนก่อน

    यावर्षी परिक्रमा करण्यासाठी कोणाला संपर्क साधावा

    • @mangeshmanevlog
      @mangeshmanevlog  2 หลายเดือนก่อน

      Amhi personally gelo hoto group sobat nahi

  • @nayanak9
    @nayanak9 8 หลายเดือนก่อน

    Speed kiti hota tumcha?

    • @mangeshmanevlog
      @mangeshmanevlog  8 หลายเดือนก่อน

      8 tas lagle mala personal baki member 10,12, tas normal speed madhe 6/7 khup hotat

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 8 หลายเดือนก่อน

    संपूर्ण परिक्रमा साठी किती तास
    लागतात

  • @nainabibwe2085
    @nainabibwe2085 27 วันที่ผ่านมา

    Plz girnaar parikramela jaychy contact number