Verul caves| Jain caves | Ellora caves | World heritage site | SNT vlog | वेरूळ लेणी। जैन लेणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Apratim. Khoop. Sundar..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 ปีที่แล้ว

      वेरूळ लेणी समूहातील ही जैन लेणी अगदी टोकाला असल्यामुळे फारच कमी लोक ती पहायला जातात पण ही लेणी देखील अतिशय सुंदर कलात्मक आहेत. वेरूळच्या लेण्याचे दर्शन ह्यांच्या शिवाय अपूर्ण आहे म्हणून ह्या लेण्या देखील दाखवायचा छोटासा प्रयत्न केला.

  • @dhotregirish
    @dhotregirish 2 ปีที่แล้ว +1

    The best ever seen sach documentary , Thanks lot

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 ปีที่แล้ว

      Thank you for your Appreciation Sir !!
      We have covered almost 30-35 forts in Maharashtra.
      Our main aim is to present proof based history and architectural beauty of all the forts , Caves and Temples. Request you to please subscribe our channel for more and more historical information.

  • @Vishwajeetlove
    @Vishwajeetlove 4 ปีที่แล้ว

    खुप छान सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @dipakpatel5524
    @dipakpatel5524 3 ปีที่แล้ว +1

    Year 2009 me collage se ellora Pravas Aya the tab 30 se 34 cave dekh nahi paye lekin aja mene apake sabhi vlog me sare gufa ke darshan kiye isake liye me apaka bahut abhari hun.
    And apane sabhi vlog very good information given.
    from. Dipak Patel
    vangan waterfall vangan vansda gujarat 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      Sir bas yehi karan se hum logo ne puri 34 gufaye 5 episode me hamare channel pe update ki he kyu ki kai sare logon ko pura time nahi hota, kai logon ko information nahi hoti aise sab logon ko puri jankari mile yehi hamari iccha hoti he.

  • @Nikhil_Nerlekar
    @Nikhil_Nerlekar 4 ปีที่แล้ว

    मस्त झालाय video. Waiting for the next part.

  • @vighneshshinde5593
    @vighneshshinde5593 4 ปีที่แล้ว +1

    dada daulatabad killyacha vlog pan banvayla pahije hota khup mast killa aahe to pan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      दौलताबाद किल्ल्यावर देखील आम्ही जरूर व्हीलॉग तयार करणार आहोत. महाराष्ट्रातील तो एक महत्वाचा किल्ला आहे.

    • @vighneshshinde5593
      @vighneshshinde5593 4 ปีที่แล้ว +1

      @@sahyadrinaturetrails dhanyavad dada tumhi khup mast vlog banavta

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      @@vighneshshinde5593 आपल्या छान प्रतिक्रियेसाठी खूप आभारी आहोत 😊!!

  • @Rahuljewalaya
    @Rahuljewalaya 3 ปีที่แล้ว

    सर दौलताबाद किल्ल्यावर व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ बापाहुन प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत दादा😊!!
      आम्ही नक्कीच दौलताबाद किल्ल्याचा व्हिडीओ तयार करणार आहोत. दौलताबाद महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे.

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti thanks for sharing

  • @pinkeshbajaria4768
    @pinkeshbajaria4768 4 ปีที่แล้ว

    Being a Jain, it was very fascinating to see these caves. Thanks for information...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for appreciating our work 😊!!

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails
      Sarv Buddhist Caves Dakhwa Starting From Verul Buddhist Caves 🗣️📢

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 ปีที่แล้ว

    मस्त दादा फार बारकाईने अभ्यास करून तुम्ही आम्हाला ही माहिती देत असतात त्याबद्दल तुमचे आभार फार सुंदर आणि पुरेपूर माहिती मिळत असते तुमच्या विडिओ मार्फत खूप छान विडिओ 👍🏼

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे म्हणून सतत प्रयत्न सुरू असतो. तुमच्या सारख्या अभ्यासू इतिहासप्रेमींच्या पाठिंब्यामुळे अजून नवीन ठेवे दाखवत राहायची ताकत मिळते😊!!

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails एक प्रश्न विचारायचा होता two wheeler नी पाहू शकतो का या लेण्या म्हणजे जवळपास जातात का वाहने असे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      @@ameyjoshi903 हो ह्या लेण्या world heritage site असल्यामुळे archeology department area च्याआत खाजगी गाड्या आणता येत नाही पण औरंगाबाद पासून वेरूळ पर्यंत नक्कीच दुचाकी आणू शकता. लेणी समूहाच्या बाहेर मोठा पार्किंग लॉट आहे. आत मात्र लेणी क्रमांक 1 ते 27 हा विशालकाय लेणी समूह एकत्रच आहे
      लेणी क्रमांक 28 व 29 बरेच कोपऱ्यात रस्ता सोडून आडबाजूला आहेत आणि जैन लेणीमात्र वेरूळ लेणी समूहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून साधारण दीड दोन किमी दूर असल्याने प्रवेशद्वार जे 16 क्रमांकाच्या कैलास लेण्यासमोर आहे तेथून दर पंधरा मिनिटांनी एसटी बसची सुविधा आहे.
      ह्या सर्व 1 ते 34 लेणी भोवतीची जमीन archeological department कडे आहे व नशिबाने ह्यांचे नीट संवर्धन सुरू असते.

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 4 ปีที่แล้ว +1

      @@sahyadrinaturetrails धन्यवाद दादा माहिती दिल्या बाबत☺️🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      @@ameyjoshi903 ह्यात धन्यवाद कसले, उलट ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी जाऊन ही लेणी जरूर बघावी. प्राचीन मराठी बांधवांनी दगडात कोरलेले हे आश्चर्य अगदी वेड लावणारे आहे.

  • @shivajijamdar6673
    @shivajijamdar6673 4 ปีที่แล้ว

    दादा अप्रतिम माहिती 🙏🙏❤❤

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @shraddhameshram5640
    @shraddhameshram5640 4 ปีที่แล้ว

    घाईत असल्या मुळे मला जैन लेणी बघता आली नाही त्या वेळी पण ही लेणी खरच बघण्या सारखी आहे. खांबाची रचना असो का मूर्ती असो खूप सुशोभित केलेली आहे त्याच बरोबर चित्राची रंग नैसर्गिक असल्या मुळे आत्ता ही सुंदरतेचे दर्शन देत आहेत. छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहे दादा 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      तुमच्या मनःपूर्वक केलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      वेरूळच्या सर्वच लेणी ह्या अतिशय सुंदर आहेत. त्यात डावे उजवे करताच येत नाही.आम्ही सुद्धा सकाळी 7.45 ते संध्याकाळी 6 पर्यंत केवळ आणि केवळ ह्या 1 ते 34 लेणी पहाण्यात हरवून गेलेलो.फक्त ह्या लेणी बघायच्या एव्हढेच उद्दिष्ट ठेवून त्यादिवशी येथे आलेलो.
      बहुतेक पर्यटक देवगिरीचा किल्ला, वेरूळची लेणी व बीबी का मकबरा असा भरगच्च कार्यक्रम एका दिवसात आटपायचा बेत आखून येथे येतात आणि साच्यात फिरल्या सारखे कैलासलेणे व आजूबाजूची चार पाच लेणी पाहून निघून जातात. ना त्यांना त्या शिल्पांच्या गोष्टी ठाऊक असतात ना उत्सुकता असते गाईड दाखवेल ते दीड दोन तासात बघायचे फोटो काढायचे व पुढच्या स्थळी जायचे ह्यामुळे ह्या दगडी आश्चर्याचा आस्वाद घेणे राहून जाते. म्हणून वेरूळ लेण्यांची ही मालिका आम्ही तयार केली की घर बसल्या लोकांना सर्व वेरूळ फिरण्याचा आनंद मिळाला पाहिजे.

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 4 ปีที่แล้ว

    SNT : वेरूळ चे लेणी, औरंगजेबाने १००० माणसे लाऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता असे ऐकिवात आहे. त्याचा काही ऐतिहासिक पुरावा आहे का? सुंदर व्हिडिओ. महाराष्ट्राच्या बाहेर राहत असलेल्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राची छान सफर घडवून आणता. धन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +3

      आपल्या मनःपूर्वक दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!
      खिलजी काळापासून ते बहमनी , निजामशाही व नंतर मुघल काळात वेरूळ लेणी लोकांना ज्ञात होती कारण वेरूळ गाव हे श्री शिव शंकराच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या लेणी प्रमाणे ही लेणी विस्मृतीत गेली नव्हती.त्यामुळे येथे मूर्ती फोडण्याचे बरेच प्रकार दिसतात पण लिखित ऐतिहासिक पुरावा वाचनात आला नाही.
      औरंगजेब च्या काळात मात्र ह्या लेणी फोडण्याचा प्रयत्न झाला ह्याबद्दल एक लोककथा हमखास सांगितली जाते. दख्खन मोहिमेत वर्षानुवर्षे खर्ची करुनही मराठे हरत नाहीत, नाना कॢप्त्या करुनही मराठे झुकत नाही या जाणीवेने औरंगजेब पिसाळला होता, औरंगजेबाचीही तब्येत खराब झाली होती आणि तो अत्यंत वैतागलेला होता. त्याला औषध लागु पडत नव्हते. मनःशांती मिळावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले, विशेष यश आले नाही. शेवटी कुठेतरी मन रमेल म्हणुन "गुंफा" दाखवायला त्याला घेउन गेले (बहुदा रबिया उर दुर्रानी या त्याच्या बायकोने). असे म्हणतात की तोपर्यंत लेणी अत्यंत सुस्थितित होती,रंगरंगोटी शाबुत होती आणी शिवलिंगाची पुजा देखिल चाले. लेण्याच्या मागच्या भागात एक कोरलेला पोपट होता म्हणे, त्याचे डोळे अत्यंत विलक्षण अश्या रत्नांचे होते. त्या डोळ्यात माणसाला त्याचा पुढला जन्म दिसायचा. आणि त्यात औरंगजेबाला डुक्कर दिसले. झालें .. औरंगजेब पुन्हा पिसाळला. काफिरांचे बुत तोडायला हजार पाथरवट बोलावले गेले. नंतर आख्ख्या लेण्यात भुस्सा, गोवर्‍या आणि गवत भरुन पेटवुन देण्यात आले. पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला. शतकांनी जपलेले वैभव हरामखोर औरंग्याने काही दिवसात होत्याचे नव्हते करुन टाकले.
      त्यांनतर अगदी थोड्या काळासाठी मराठेशाही येथे आली पण हा भाग निजामशहाच्याच ताब्यात राहिला पण मराठा राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने कदाचित औरंगजेबाच्या नंतर येथे मूर्ती फोडल्या गेल्या नाहीत.
      जगातील सगळ्यात टणक कठीण अश्या लाव्हा रसाच्या बसाल्ट दगडाच्या मूर्ती फोडणे पण अतिकष्ट दायक असल्याने केवळ नाक तोड, हात तोड, हत्तीच्या सोंडा तोड असले प्रकार करून लेणी विद्रुप करायचा प्रयत्न केला आहे.

    • @adwaitkarajagi1
      @adwaitkarajagi1 4 ปีที่แล้ว +1

      @@sahyadrinaturetrails खुळा आलमगीर. बहुदा त्या पोपटाचे म्हणणे खरेच ठरले असेल. छान मजेदार माहिती सांगितलीत . :)

  • @psvel1
    @psvel1 4 ปีที่แล้ว

    दादा नमस्कार. खूप छान माहिती मिळाली. तुमच्या कार्याचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा !!!आपल्याकडून आपल्या देशाच्या उज्वल भूतकाळाची माहिती अशीच मिळत राहो ही प्रार्थना.धन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा😊!! आपल्या मनःपूर्वक दिलेल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत!!

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 ปีที่แล้ว

    आपल्या भारतीय वैभव आणि कला ह्या समोर जागतिक सुंदर गणली जाणारी कला (ताजमहल) पण फिकी आहे.
    म्हणूनच तर ह्या समाज कंटकांनी हे सर्व उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असावा.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +3

      ताजमहाल सुंदर आहेच पण ताजमहालाची व ह्या लेण्याची तुलनाच होऊ शकत नाही. ह्या लेणी जवळजवळ दोन शतके खोदत होते. दगड काय प्रतीचा आहे आतल्या बाजुने ह्या खडकात चिरा तर नाही ना हे शोधणे. जगातील सर्वात कठीण अश्या बसाल्ट खडकातून हे विश्व निर्माण करणे ही कधीकधी खरच मानवी ताकतीच्या व कल्पनेच्या बाहेरचीच गोष्ट वाटते. कामगारांचे अखंड परिश्रम , राज्यकर्त्यांची जिद्द ,तंत्रज्ञानची मेहनत कल्पनाशक्ती व सर्वांचेच धर्माविषयी असलेले प्रेम ह्यातून ही शब्दात न सांगता येणारी कलाकृती निर्माण झाली. ह्याच्या एक दशांश सुद्धा ज्ञान नसलेल्या, कलेची आवड नसलेल्या, दुसऱ्या धर्माबद्दल सहीष्णूता नसलेल्या दंगलखोर रानटी वृत्तीच्या मूर्तीभनजकांनी केवळ त्यांच्या धर्माला मान्य नाही म्हणून हे उध्वस्त करण्याचा प्रयत्न 700, 800 वर्ष केला पण त्यांना हे पूर्ण नष्ट करणे काही हे जमले नाही. पण उगाच कोणाचे पाय तोड, हात तोड , चेहरा विद्रुप कर, हत्तीची सोंड तोड हे असले उपदव्याप खूप केले आहेत.

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 4 ปีที่แล้ว +2

      @@sahyadrinaturetrails
      खरे आहे सह्याद्रीतील आपले गडकिल्ले असो की अश्या लेण्या यांचा इतर कोणाशीही तोड होणे शक्यच नाही.
      म्हणूनच सह्याद्री हा सर्वांना केव्हाही भुरळ पाडत असतो त्याची भक्कमता गड किल्ल्यातून आणि मृदुता अश्या रीतीने कोरीव काम केलेल्या लेण्यांतून दिसून येते. हे वैभव जर आपले उध्वस्त झाले नसते तर आपण खूप संपन्न राहिलो असतो काही गोष्टी काळाच्या आड ही गेल्या असतील पण ज्या आहेत त्यातही त्याची भव्यता आणि सुबकता दिसून येते आता इतकीच खंत आहे की इथे येणारे पर्यटक सुद्धा त्याची नासधूस करू पहात आहेत ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे.
      असो मला आणि माझ्या मित्राना जितके शक्य होते तितके लोकांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो समजले तर ठीक निदान आपल्या सांगण्याने सह्याद्रीतला एखादा दगड वाचला तर आम्ही स्वतःला धन्य समजून घेतो. धन्यवाद
      हर हर महादेव
      जय महाराष्ट्र
      भारत माता की जय
      वंदे मातरम 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +2

      @@Sachin_Chavan अगदी योग्यच बोललात सर, सह्याद्रीमधला एक जरी दगड आपल्यामुळे वाचला तरी धन्य वाटले पाहिजे. सर्वांनीच जमेल तसे आपला हा अनमोल ठेवा वाचवायचे प्रयत्न करायला हवेत.

  • @khushboochaudhari3028
    @khushboochaudhari3028 4 ปีที่แล้ว

    Wow..thanx for this video SNT team😊😊😊

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank you for appreciating our work😊!! Your appreciation is our power which help us to create more and more videos.

  • @kunalbhatt4143
    @kunalbhatt4143 4 ปีที่แล้ว +1

    nice. liked efforts, just one thing shoes should be banned for all inside all caves just to respect gods.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      Thank you for watching our video on Verul caves.
      In few caves like bauddha chaitya gruha, someshwar leni, Kailas leni where statue of god is still worshipped, shoes are still not allowed.

  • @vinayakgangurde4586
    @vinayakgangurde4586 4 ปีที่แล้ว

    🧐🧐🧐
    नमस्कार तेजस सर
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    मि दोन वेळा कैलास मंदिर बघीतले
    परंतु बाकीच्या लेण्या एवढ्या सुरेख असतील
    हे फक्त तुमच्या मुळेच कळाले.....
    आता परत बघायला जावे लागेल...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    माहिती खुपच छान...
    🧒🧒🧒🧒🧒🧒

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      1 ते 34 सर्वच लेण्या आपापल्या परीने सुंदर आहेत. आपल्या पूर्वजांनी केवळ छिन्नी हतोडयांच्या सहाय्याने प्रतिसृष्टी निर्माण केली आहे त्याची तुलनाच नाही

  • @ajaypawar741
    @ajaypawar741 4 ปีที่แล้ว

    Aata kasa gelas dada chalu Aahe ka

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो. पण आधी रायगड किल्ल्याचे भाग प्रदर्शित केले व आता वेरूळचे भाग दाखवत आहोत.
      अजूनही सर्व ऐतिहासिक व पर्यटन स्थळे बंदच आहेत. तुम्हीसुद्धा योग्य ती काळजी घ्या व कॉरोनाशी लढण्यासाठी सरकारने नेमून दिलेली मार्गदर्शक सूत्रे पाळा.
      आपण आशा करूया की लवकरच ही महामारी संपेल व आपली भटकंती पूर्ववत होईल.

    • @vinayakgangurde4586
      @vinayakgangurde4586 4 ปีที่แล้ว

      Lock down मध्ये काय नियोजन केले
      कोणती मोहीम पूढे....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      @@vinayakgangurde4586
      लॉकडाऊन मध्ये विविध किल्ल्यांचे वाचन सुरू आहे. ह्या नंतर मोहीमा तर खूप करायच्या आहेत पण ते परिस्थितीवर अवलंबून असेल.
      सरकारच्या निर्देशांचे पालन करून बेत ठरवू सध्यातरी काहीच सांगू शकत नाही.
      बघूया कसे काय जमते अगदी दूर नाही गेलो तरी किमान मुंबई व आजूबाजूचा प्रदेश तर नक्कीच दाखवू.

    • @vinayakgangurde4586
      @vinayakgangurde4586 4 ปีที่แล้ว

      OK सर मी एक सुचवीतो
      मांगितुंगी
      जैन तीर्थ क्षेत्र
      नाशिक जिल्हा
      सटाणा तालुका

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      @@vinayakgangurde4586
      नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू, त्या भागातील किल्ले मुल्हेर, हरगड ,चांदवड वगैरे किल्ले देखील भरपूर आहेत.

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 4 ปีที่แล้ว

    Nice , decent and honest information , sir ! Thanks ! Keep it up . Best of luck for your next project . 👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you so much for your kind words. As always, your support means a great deal to us🙏🙏

  • @tm9661
    @tm9661 4 ปีที่แล้ว

    Well done ! nice to see you back in action with regards Australia Mitra!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      Thank-you for your appreciation 😊!!
      We have visited to Ellora caves in the month of February, now during the lockdown period we are showing entire cave complex in parts.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 ปีที่แล้ว

    अरे रे हे पहायचे राहिले पण आता खंत नाही तुमच्या द्वारे छान माहिती मिळाली.
    इतकी बारीक माहिती तुम्ही आणता कुठून 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +2

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत सर. कुठलेही ऐतिहासिक स्थळ त्याच्या संपूर्ण ऐतिहासिक माहिती व शक्यतो पुराव्यानिशी असलेल्या खऱ्या माहितीसकट दाखवणे हेच ध्येय आम्ही कसोशीने पाळतो.
      त्यासाठी कधी ग्रंथालयातून पुस्तके शोधतो कधी गुगल बाबांना शरण जातो पण शक्यतो जितकी माहिती जमवता येईल तितकी जमवूनच एखादे स्थळ इतिहासप्रेमींसमोर आणतो.

  • @kishmanerkar3231
    @kishmanerkar3231 ปีที่แล้ว

    It was buddhist caves

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  ปีที่แล้ว +1

      Thank you for watching our video Sir
      We have shown Jain caves in this episode. which is cave number 30 to 34 in Ellora (Verul )cave complex.
      We request you to watch our episode 01 which is dedicated to lord Gautam Buddha in which we have shown cave number 01 to 12 which is dedicated to great religion of Buddhism.

  • @rushikeshgundap1206
    @rushikeshgundap1206 4 ปีที่แล้ว +1

    Faar chaan

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 4 ปีที่แล้ว

    सर मोबाइल नंबर दिया कि तुमचा

  • @dr.umeshfarate6311
    @dr.umeshfarate6311 4 ปีที่แล้ว

    Sir tumacha no bhetel ka