रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2022
  • 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही.
    आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गांधी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'यळकोट', 'ध्यानीमनी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'चाहूल', 'आषाढ बार', 'हॅम्लेट' या आणि अशा अनेकोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
    संहितेचा एकंदर आशयच नव्हे तर त्यातला शब्दनशब्द आपलासा करुन अत्यंत चोख तयारीने चंदू सर नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जातात. मात्र हे काटेकोर नियोजन, नाट्यशास्त्राचा केलेला रीतसर अभ्यास, अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा अनुभव ह्यांपैकी कशाचंही ओझं मात्र ते होऊ देत नाहीत. अतिशय तन्मयतेने, उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने सादरीकरणाच्या विविध शक्यता ते नटांबरोबर आणि तंत्रज्ञांबरोबर पडताळून पाहतात; आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक रसरशीत, नावीन्यपूर्ण रंगानुभव देण्याचा प्रयत्न करतात.
    संहितेचं पुनर्लेखन ही दिग्दर्शकाने नाटककाराला स्वतःच्याच विचारांशी करून दिलेली पुनर्भेट कशी असते, प्रत्यक्ष उभं राहण्यापूर्वी नटाने संवादांवर काय काम करावं, नाटकातील हालचाली आणि आकृतीबंध हे मुद्दामहून ठरवण्याऐवजी आपोआप उमलू कसे द्यावेत, नेपथ्य आणि संगीताचा वापर द्विमितीतील रंगमंचीय अवकाश त्रिमितीत परिवर्तित करण्यासाठी कसा करावा, प्रयोग हलू नये म्हणून काय काळजी घ्यावी, काही सुचत नसेल अशा वेळी दिग्दर्शकाने काय करावे अशा अनेक रोचक विषयांवर चंदू सर आज बोलणार आहेत.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 47

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 ปีที่แล้ว +4

    काय काय विचार येतात नाटक बसवताना याची ही कार्यशाळा जणू! अविस्मरणीय अनुभव. खरंच तुमची नाटकं पाह्यला आवडतील. मधुराणी नेही उत्तम च भूमिका वटवली आहे.दोघांचे ही खूप खूप आभार, अभिनंदन, सुभेच्छा..

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 ปีที่แล้ว +3

    केवळ अप्रतिम !!! काय बोलु? अभ्यासू, स्पष्टवक्ता, मेहनती आणि प्रचंड आवाका असलेला दिग्दर्शक !!! मधुराणी आणि योगेश खूप खूप आभार! मुलाखत अतिशय उत्तम रंगली!!!

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว +6

    अतिशय बुद्धिमान दिग्दर्शक ! ही मुलाखत हा एक ऐवज आहे.

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 ปีที่แล้ว +2

    चंदू सरांची ही मुलाखत नवीन कलाकारांसाठी विद्यापीठ प्रमाणे काम करेल.....खूप बुद्धिमान व्यक्ती आपल्या मराठी रंगमंच्याला मिळालेला आहे.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว

    Hech adhyatma ahe chandrakant sir.je tumhi roj jagtay ani sarv natannna jagayla shikavtay.khup dhanyawad ani shubhechhya.🙏🙏🙏😊🌷

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mulakhat. Chandu sir mhange Natya shastra vidyapith aahet🙏🙏

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 ปีที่แล้ว +3

    Fantastic. हि मुलाखत बघितली नसती तर मी खूप काही गमावलं असतं. फार दिवसांनी काहीतरी अप्रतिम ऐकायला मिळाले. धन्यवाद.

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 ปีที่แล้ว

    Kaay apratim mulakhat jhaliye ......evdhi detailed process etakya chhan soppya padhhatine samjavun sangitali aahe.....khup chhan khup dhanyavad

  • @vikasmohrir6768
    @vikasmohrir6768 ปีที่แล้ว

    नाटक पाहणे आणि ते बसविणे यातील फरक थोड्या वेळात सांगने किती अवघड आहे, याचा प्रत्यय ह्या मुलाखतीत आला. आवडले. धन्यवाद.

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 ปีที่แล้ว

    Khup chhaan interview, chadrakant sir ekhadi marathi serial direct kara please, tumchi pimpalpan malika aajhi lakshat aahe

  • @kamleshvichare6628
    @kamleshvichare6628 ปีที่แล้ว +1

    Thanks a ton for this. As I have already said, each episode is a workshop.

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 ปีที่แล้ว +1

    दोन्ही भाग खूप मस्त आहेत.श्री चंद्रकांत कुलकर्णी यांची बोलण्याची पद्धती खूप छान आहे

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      तिसरा भाग पण नक्की पहा.

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 ปีที่แล้ว

    नाटकाविषयी बोलताना वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणांसहित खूप छान समजेल अशा शब्दांत संभाषण पुढे नेण्याच्या सरांच्या कलेला माझा मानाचा मुजरा.

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane ปีที่แล้ว

    बऱ्याच दिवसांनी नवीन एपिसोड बघितला, सगळे पार्ट्स खूप छान आहेत....
    नेहमीच वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांकडुन खूप काही नवीन ऐकायला आणि शिकायला मिळते रंगपंढरी मध्ये....
    धन्यवाद !

  • @sagardeshmukhchannel0515
    @sagardeshmukhchannel0515 ปีที่แล้ว +1

    khup molach as chandu sirankadun sikayla milal thank you so much rang pandhari

  • @jsagar95
    @jsagar95 ปีที่แล้ว

    Thanks 🙏!

  • @ahallekatti
    @ahallekatti ปีที่แล้ว +1

    truly an inspiring 3 dimensional conversation....dynamic, profound !

  • @anildeshmukh5345
    @anildeshmukh5345 ปีที่แล้ว

    खूप छान नाटक सादर करण्यापूर्वी त्याची संपूर्ण चौकट मनात पूर्ण तयार करून मग नाटक बसवण्याची खूप काही सांगून जाते

  • @padmashriathalye6550
    @padmashriathalye6550 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत .सर्वार्थाने सुंदर .

  • @dhanashreedivekar8052
    @dhanashreedivekar8052 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत..... खूप शिकण्यासारखं आहे, आणि खूप सुंदर पद्धतीने, छान उदाहरणं देऊन सांगितलं आहे... अप्रतिम...

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 ปีที่แล้ว

    Nice

  • @sangeetakeluskar5988
    @sangeetakeluskar5988 ปีที่แล้ว +1

    Wa madhurani Tu khup chan bolte kartes tehi kami bolun aikne he uttam ritya nimbavtes really great.

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar ปีที่แล้ว

    तुमचे प्रश्न अतिशय उत्कृष्ट असतात. असेच आणखी इंटरव्यू बघायला आवडतील.

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว +1

    Bolava titaka kami ahe. Kiti apratim. Such a talented person.

  • @swatiphatak9128
    @swatiphatak9128 ปีที่แล้ว

    Just wonderful, superb, i am a huge huge fan of chandrakant Kulkarni

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 ปีที่แล้ว +2

    सगळ्यात जास्त आवडलेली मुलाखत...Sir कडून अजून खूप ऐकायला आवडेल 👍
    Thank you Rang Pandhari Team ...for this invaluable interaction, interview,Study Material
    From the bottom of my heart 👍👍👍

  • @mangeshbondre4304
    @mangeshbondre4304 ปีที่แล้ว

    फारादिवसांनी पुनरागमन झालं रंगपंढरीच…. खुपच छान झाली मुलाखत. कुलकर्णी सरांनी अगदी सहजी लिलया सगळी प्रोसेस उलगडून सांगितली… मधुराणीताई नेहमी प्रमाणे सुंदर मुलाखत घेतलीत… फक्त एक शंका की काही ठिकाणी प्रश्न विचारताना थोडा तणाव जाणवला तुमच्यावर… I thought it might be because of presence of Chandrakant sir…

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मंगेश जी! रंगपंढरी असेच पहात रहा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @ssk43000
    @ssk43000 ปีที่แล้ว

    Thank you so so much Rangapeeth! This one is undoubtedly the best !! Thank you chandrakant sir ! Learnt a lot.

  • @sheelakulkarni7431
    @sheelakulkarni7431 ปีที่แล้ว +1

    Very talented emotional yet sorted Director.Liked this interaction lively. Loved all dialogues. Thx for this apratim Interview

  • @salilgadgil
    @salilgadgil ปีที่แล้ว

    Superb... Really a legend.. Looking forward to your future work..

  • @yojnadighe4577
    @yojnadighe4577 ปีที่แล้ว

    🙌🏼💛

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 ปีที่แล้ว

    चंदू सर, आता ही सगळी नाटके पुन्हा बघण्याची इच्छा होत आहे. लवकर असा योग यावा..!!
    नाट्यकर्मी सर्व विद्यार्थ्यांना ही प्रदीर्घ मुलाखत ' मार्गदर्शक तत्वे ' म्हणून उपयोगी होतील. फार कळकळीचे आणि मोलाचे विचार व्यक्त केले आहेत

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 ปีที่แล้ว +1

      चारचौघी परत येतंय

  • @namitakoparkar5053
    @namitakoparkar5053 ปีที่แล้ว

    Some of the creations of these artists and creators need to be immortalized... has there been a thought of bringing some of the old creations to OTT so that they are preserved with the marvelous direction, writing and cast

  • @prakashshetty5189
    @prakashshetty5189 ปีที่แล้ว

    🙏💐💐💐🙏

  • @sheelakulkarni7431
    @sheelakulkarni7431 ปีที่แล้ว

    Thx Madhurani for the same

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, शीला जी! रंगपंढरी अशाच पहात रहा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vishwasjoshi5146
    @vishwasjoshi5146 ปีที่แล้ว

    Camera kuthe aahe te na samalyane look ve gali kade aahe ki shot chya velchya audience kade baghun bolat aahe ka Kulkarni . Mast mulakhat

  • @cadiwan
    @cadiwan ปีที่แล้ว

    दोनदा त्रिनाट्यधारा पाहिली आहे .
    योगेश, हे दस्तैवजीकरण अमूल्य आहे.