रंगपंढरी Face-to-Face: Mangesh Kadam - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2021
  • "तालमीत विचारपूर्वक, मेहनतीने बसवलेली प्रत्येक हालचाल, संवादाची लकब, संगीत वाजण्याची जागा ह्यांपैकी एक जरी गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगात ठरल्यासारखी झाली नाही तर मी अत्यंत अस्वस्थ होतो. कलाकारांनी बनचुके होणं आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या जादुई क्षणांना मुकणं ही मला नाटकाशी केलेली प्रतारणा वाटते."
    - मंगेश कदम
    स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन, तन्मयतेने आणि आनंदाने प्रत्येक कलाकृती सादर करणाऱ्या मंगेश सरांना एक ज्येष्ठ व्यावसायिक दिग्दर्शक म्हणावं की नाटकाच्या मंतरलेल्या जगात स्वेच्छेने हरवलेला छोटा मुलगा असा प्रश्न पडतो!
    गेल्या २५ वर्षांत त्यांनी 'अधांतर', 'एका लग्नाची गोष्ट', 'अशी पाखरे येती', 'तू तू मी मी', 'कबड्डी कबड्डी', 'जादू तेरी नजर', 'बेईमान', 'वैशाली कॉटेज', 'गोष्ट तशी गमतीची', 'के दिल अभी भरा नही' यांसारखी बहुविध, दर्जेदार आणि लोकप्रिय नाटकं मराठी रसिकांसमोर सादर केली आहेत.
    नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत इत्यादी सर्व अंगांबद्दलच्या सूचना प्रत्यक्ष लिहिलेल्या नसल्या तरी संहितेत कशा लपलेल्या असतात; आणि त्यांचा शोध घेतल्याने दिग्दर्शकाला आशयाशी सुसंगत आणि प्रभावी सादरीकरण कसं करता येतं हे अनेक उदाहरणांसहित मंगेश सरांनी त्यांच्या मुलाखतीत उलगडून सांगितलं आहे.
    ह्याशिवाय आपल्याला हव्या असलेल्या नटांची निवड काही कारणांनी करता आली नाही तरी आहेत त्या नटांना अपेक्षित व्यक्तिरेखेपर्यंत कसं पोचवावं, प्रकाश योजनेचा सिनेमातील 'क्लोज-अप' तंत्रासारखा वापर कसा करावा, दिग्दर्शकाने 'सहिष्णु' का असायला पाहिजे इत्यादी अंगांबद्दल पण आजच्या भागात मंगेश सर विस्तृतपणे बोलले आहेत.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 25

  • @pamakulkarni
    @pamakulkarni 2 ปีที่แล้ว +38

    रंगपंढरीच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझ्या सख्ख्या मित्राला त्याच्या कामाबद्दल इतकं बोलताना ऐकलं. मनापासून सांगते की खूप शिकायला मिळालं. थँक्स रंगपंढरी- थँक्स मंगेश. A special word for Madhurani. You are super.समोर तू असतेस म्हणून इतकं बोलता येतं.

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 ปีที่แล้ว +2

    मुलाखत खूपच आवडली. मंगेश कदमांनी मराठी भाषेचा अतिशय समृध्द वापर केला. अतुल परचुरेंसारखी त्यांनी खूप उदाहरणे नाही दिली पण एखादा मुद्दा सांगताना शब्दांचा अगदी नेमका वापर केला. मधुराणींनी मुलाखत फारच उत्तम घेतली. आपण कमीतकमी बोलतात पण ऐकणाऱ्याला वाटत असतं की आता हा प्रश्न विचारायला हवा, तोच प्रश्न तिथे विचारण्याची किमया त्यांना साधली आहे. Hats off to both of you!

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว +5

    Excellent interview. Pratima Kulkarni’s comment about Madhurani is apt. She is too good as an anchor

  • @shekharpade3453
    @shekharpade3453 2 ปีที่แล้ว +2

    अगदी सविस्तर व मनमोकळी मुलाखत 👌🏾👌🏾🌷🌷
    " रंगपंढरी " अत्यंत सुत्य उपक्रम. धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @suhaaskarnekar1591
    @suhaaskarnekar1591 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान झाली आहे मुलाखत...
    म्हणजे कल्पनेत असणारं नाटक हळूहळू कसं आकाराला येतं .... अस्तित्वात येतं.... संहिते पासून वास्तवातल्या नाटकाचा प्रवास , खूप छान पध्दतीने उलगडून सांगितले आहे... Thank you very much Mangesh...👌👍🌷🌹💐

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 ปีที่แล้ว +1

    नेहमप्रमाणेच मधुराणी ने छान संयुक्तिक प्रश्न विचारून बोलतं केलं..खूप छान वाटलं मधुराणी....
    मंगेशजीनी त्यांचा हा नाट्याविषयीचा प्रवास अतिशय सोप्या पद्धतीने उलगडला.. त्याबद्दल ची त्यांची आत्मीयता, यात झोकून देण्याची तयारी, जिद्द,आवश्यक असणारी निर्णयक्षमता, अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत करत नाटकासाठी जीव लावून कामं करणे,नाटक जास्तीत जास्त realistic कसे होईल, सामान्य प्रेक्षकांना कसे भावेल, आणि त्यातून आलेल्या अनुभवातून शिकत खचून न जाता पुढे जाणे....
    असे कितीतरी विशेष गुण आहेत मंगेशजी यांच्यामध्ये...
    ते परिपूर्ण दिग्दर्शक आहेत..
    हॅट्स ऑफ टू मंगेशजी...
    🙏🙏

    • @utkarshapatil482
      @utkarshapatil482 2 ปีที่แล้ว

      Agdi kharay 👏👏🙏🙏👌👌

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रामाणिक मुलाखत.
    एक प्रेक्षक म्हणून एक जाणून घ्यावंसं वाटतं, चांगलं चालणारं नाटक अचानक बंद का होतं ?

  • @utkarshapatil482
    @utkarshapatil482 2 ปีที่แล้ว

    Shwas rokhun thevun aikla mi interview...ek veglch samadhan...shabd apure padtil varnan karayla ...asach aikt rahavas vatnar bolan..khup motha pravas krun aalyasarkh vatal...pn tarihi n thambava vatnara to pravas hota...Apratim👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर मुलाखत .
    नाटक बणताना , नाटक रंगतानाची ही सर्व प्रक्रिया ऐकताना खूपच मजा आली .
    🙏🙏🙏

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 2 ปีที่แล้ว +1

    मुलाखत खूपच रंगतदार झाली. सरांनी नाटकाच्या सगळ्या प्रक्रियेचे एक सुंदर स्केच रेखाटले. किती आनंदाने त्यांनी नाटकाविषयी त्यांची आवड अधोरेखित केली आहे. मला खूप आवडले. सरांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रतिमाताई म्हणतात त्या प्रमाणे मधुराणी तू सुपर आहेसच तुझे खूप अभिनंदन 💐💐

  • @anilkamat5530
    @anilkamat5530 2 ปีที่แล้ว

    वा वा मंगेश खूपच छान मुलाखत. विचारलेलं नेमक्या प्रश्नांमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली.

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 2 ปีที่แล้ว

    अगदी सविस्तर व मनमोकळी मुलाखत .

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว

    ❤❤❤😊

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 2 ปีที่แล้ว

    Khup shikayla milale. Khupch chan..

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत.

  • @DSamdnyakumthekar
    @DSamdnyakumthekar 2 ปีที่แล้ว

    Khup chan👍👍

  • @cadiwan
    @cadiwan 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, प्रामाणिक!

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 2 ปีที่แล้ว

    Brilliant 👏 👏 👏

  • @vasuraj
    @vasuraj 2 ปีที่แล้ว

    ह्या सगळ्या मुलाखती म्हणजे माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी Theatre Appreciation Program आहे.... लेखक येणार आहेत ? असतील तर कधी?