Kavitecha Paan | Episode 14 | Guru Thakur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 407

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 ปีที่แล้ว +5

    कवितेचं पान...माझा खूप आवडीचा कार्यक्रम .गुरु ठाकूर यांची प्रतिभा अलौकिक आहे. ते एक उत्तम कवी,गीतकार,संवाद पटकथा लेखकतर आहेतच पण त्यांनु कलेची सुरवात एक व्यंगचित्राकार म्हणून केली.

  • @sugandhamarathichavicha1517
    @sugandhamarathichavicha1517 ปีที่แล้ว +8

    परमेश्वराने विनामुल्य दिलेली
    सरस्वती ची देणगी गुरु सरांना मिळालीय मनापासून धन्यवाद शुभेच्छा

  • @diptijadhav1645
    @diptijadhav1645 3 ปีที่แล้ว +5

    माणुसकीने आपलं मूळ जपण्याची प्रगल्भता आणि आपल्यातलं विनम्र मुल जपण्याची निरागसता दोहोंना सलाम..

  • @avimango46
    @avimango46 5 ปีที่แล้ว +38

    “कानाला पापण्या असत्या तर “ ही कल्पना आवडली !

  • @pratik3302
    @pratik3302 6 ปีที่แล้ว +41

    "कवितेचं पान" हा अप्रतिम उपक्रम हाती घेतल्याबद्दल मधुराणी तुमचं कौतुक आणि आभार...
    गुरू तुम्ही नावाप्रमाणे गुरू आहात, तुमच्या लेखणीतून मातीचा सुगंध येतो...तुमच्यातल्या माणसाने तुमच्यातल्या कलाकाराला सर्वार्थाने समृद्ध केलंय.

  • @vaidehipurohit2932
    @vaidehipurohit2932 2 ปีที่แล้ว +7

    पुन्हा एकदा गुरु ठाकूर... प्रतिभासंपन्न कलाकार, सर्वार्थाने समृद्ध माणूस... शतशः नमन... मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची हातोटी अप्रतिम. समोरच्या व्यक्तीला छान बोलतं करता. तुमचं व्यक्तिमत्व आल्हाददायी आहे. ❤️

  • @212mayur
    @212mayur 4 ปีที่แล้ว +19

    असे जगावे आव्हानाचे लावून अत्तर... ही माझी सर्वात आवडती कविता गुर ठाकुरांची आहे हे मला या episode निमित्ताने कळले. मी आत्तापर्यंत ती विंदा ची आहे असं समजत होतो.. thanks to।thisepisode& हे ऐकल्यावर तर गुरू आणखीनच माझा fav. झालाय

  • @amitap78
    @amitap78 6 ปีที่แล้ว +67

    खूप सुंदर अनुभव....या एपिसोड ची खूप वाट पाहत होतो.. गदिमा, खेबुडकर अशा प्रचंड ताकदीच्या गीतकारांची आठवण करून देणारी गुरु ठाकूर यांची प्रतिभा म्हणजे या काळातलं सोनेरी पानच आहे! तरीही व्यक्तिमत्व इतकं साधं आणि नेटकं! प्रतिभा विनयेन झळाळते !

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 4 ปีที่แล้ว +5

    मधुरा जी तुमचा हा उपक्रम आम्हा रसिकांसाठी मेजवानीच, तुमचं सहजसुंदर निवेदन, ठरवून नाही पण एखाद्या आवडलेल्या शब्दाला वा वाक्याला दाद देण्याची पद्धत खूपच छान. 'कवितेचं पान' ह्या कार्यक्रमाचे बरेच भाग पाहीले पण हा गुरू सरांसोबतचा हा भाग कायम स्मरणात राहणारा. कितीदा ऐकला पाहीला तरी पण मनाचं समाधान होत नाही. खूप सुंदर!!

  • @vaishalilulay7274
    @vaishalilulay7274 2 ปีที่แล้ว +2

    वाळूत चांदण चुरा हे खूप आवडलं। चमकत असलेली वाळू अनेकदा पाहिली पण चांदणचुरा अप्रतिम

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 ปีที่แล้ว +1

    कवितेच पान, ही खूपच संवेदनशील आणि आनंददायक मालिका आहे. आम्हा साळख्य काव्याप्रेमीसाठी तर ही सुवर्ण अशी अविस्मरणीय पर्वणीच आहे.
    कवी, गीतकार गुरु ठाकूर यांच्या बरोबरचा हा भाग दर्जेदार प्रतिभासंपन्न झाला.
    गुरु ठाकूर हे गीतकार म्हणून अलौकिक आहेत, पण त्यांच्या मधला प्रतिभासंपन्न संवेदनशील कवीचे दर्शन आज पहिल्यांदा घडले.🌹🌹🌹
    कवितेच पान हा मधुराणी गोखले-प्रभुलकर याची खूपच आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना, कवितेचे पान हा अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव होत आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार.🙏

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 ปีที่แล้ว +3

    सुरेल एपिसोड...कोकणावरची कविता मस्तच...👏👏एपिसोड संपवताना वाचलेली कविता फार सुंदर..प्रेरणादायी 👏❤👏

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 2 ปีที่แล้ว +2

    नाते माझे मातीशी
    खुणगाठ मनाशी
    नाती जपा स्वतःसाठी
    समाधान सर्वासाठी

  • @manishajoshi7693
    @manishajoshi7693 4 ปีที่แล้ว +2

    मधुराणी ताई हा उपक्रम खूप खूप सुरेख आहे .इतक्या उत्कृष्ट मेजवानीच तू आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashwinijahagirdar730
    @ashwinijahagirdar730 3 ปีที่แล้ว +4

    गुरू ठाकूर हे माझे सध्याच्या काळातले आवडते कवी आहेत ...मनस्वी धन्यवाद मधुराणी जी हा एपिसोड केल्याबद्दल.
    👍👍👍👍👍

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 4 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर ....गुरू तुला खूप खूप आशिर्वाद. अश्याच सुंदर भावपूर्ण अर्थपूर्ण, आशयाच्या कविता तुला सुचूदे आणि आम्हाला मनमुराद आनंद तुटण्याची संधी दे.

  • @dale617
    @dale617 3 ปีที่แล้ว +2

    ताई कवितेचे पान. एक उत्कृष्ट उपक्रम. मनाला भुरळ घालणारा.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 ปีที่แล้ว +1

    Awesome tu Guru ahes kavitechya vishwatala...
    Madhurani tuzha sandeep khare barobarchya short film madhala belgavi tone khup awadala.

  • @DrParagPathrudkar
    @DrParagPathrudkar 6 ปีที่แล้ว +67

    कवी , गीतकार म्हणून गुरु ठाकूर परिचित होते परंतु माणूस म्हणून सुद्धा त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत हे जाणवले. आपले बहुतेक सगळे एपिसोड मी पहिले .. आवडले . समोरच्या कवीला मुलाखत घेतांना कसे खुलवत जावे हे आपल्याला छान जमते .

    • @pravinkulkarni1327
      @pravinkulkarni1327 6 ปีที่แล้ว +3

      Manjiri10 Guru Thakur great ani such has kavi aahe are Malala vatatey. Khoop chhan episode. Madhuraniche nether anchoring bhavaley. Pudheel pravasasathi bharpoor shubheccha.

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 ปีที่แล้ว +1

    मधुराणी धन्यवाद गुरू thakuryala कवितेचे पा न मधे आणल्याबद्दल .एक संवेदनशील कोकणी माणूस ऐकता आला.शेवटची कविता फारच छान

  • @dipalidabhade7722
    @dipalidabhade7722 2 ปีที่แล้ว +2

    कौतुकास्पद उपक्रम .... कविताप्रेमिंसाठी मेजवानी.....धन्यवाद मधुराणी जी

  • @gsthakur1210
    @gsthakur1210 6 ปีที่แล้ว +15

    गुरू आणि श्रीमती मधुराणी प्रभुलकर, एकदम मस्त मुलाखत झाली. यशस्वी काम विसरून नवीन-नवीन गोष्टी करणं नाहीतर यश तुम्हाला फरफटत घेऊन जातं..... पु.लं. ची आठवण झाली. बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात, वटवट...... प्रयोगांची ठरावीक संख्या झाली की प्रयोग मुद्दाम ह्याच कारणासाठी थांबत असत. त्यांच्या प्रत्येक नाटकात, लिखाणा मध्ये जशी नाविन्यपूर्णता आहे तशी गुरूच्या कविता-गाण्यांमध्ये आहे.

  • @medhajogdeo8975
    @medhajogdeo8975 4 ปีที่แล้ว +1

    मधुराणी,तुमचे खूप खूप कौतुक,अभिनंदन आणि या उपक्रमास मनापासून शुभेच्छा. तुमचा हा उपक्रम माहीत होता पण ऐकायचा योग आला नाही.पण आता वाटलं की इतके दिवस योग आला नाही ते चांगले झाले.kovid19 चा धुमाकूळ चालू असताना मी प्रवास करून आले सुखरूप,पण 14 दिवस होम quarantine होते.नेमकं याकाळात मी तुमचा चॅनेल subscribe केला आणि माझ्या सारख्या कविता प्रेमीला खजिनाच मिळाला.आणि हे 14 दिवस अगदी मेजवानी मिळाली मला.एपिसोड पहातानाचा वेळ कसा गेला ते कळले नाही आणि मग दिवसभर त्या कवितांची आणि तुमच्या बोलण्याची धून मनात वाजत राहायची,आणि त्या नादात साऱ्या दिवसाचे सोने झाले.तुम्ही कार्यक्रम conduct पण अतिशय दिमाखदार पणे करतात. खूप सांगायाचे आहे अजून ....पण काय आणि कसे सांगू ,ते सारे फिकेच आहे या लखलखीत कवितांपुढे.

  • @tusharingole7
    @tusharingole7 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान, बोरिंग tv चॅनेल पेक्षा हे अस्सल जीवनाचं वर्णन वृत्त

  • @ExploreLife360
    @ExploreLife360 4 ปีที่แล้ว +10

    Madhu tai...अप्रतिम अावाज...Tai tumhi aflatun ahat!
    Tumcha avaj aikun stress dur zala!
    Lots of love!

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele5888 4 ปีที่แล้ว +2

    फार मोकळेपणाने काव्य प्रवास ,कला प्रवास उलगडून दाखविला आहे। मधुराणी ताई तुझ्यामुळें हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचल आहे ।।।किती किती आभार मानू ।।।पुन्हा केव्हा येणार यांना भेटीस घेवून।

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal4506 5 ปีที่แล้ว +7

    जाणिवांच्या एका वेगळ्या पातळीवर गेलो ।।।
    आनंद आणि शुद्ध सुखाचा स्पर्श झाला ।।।।
    खूप सुंदर ।।।।।।।।

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 3 ปีที่แล้ว +1

    आज अचानक वादळात सापडले हे नाजूक कवितेचे पान
    खूप खूप छान कार्यक्रम

  • @desaisc
    @desaisc 2 ปีที่แล้ว +1

    Apratim mulakhat sunder kavitancha theva aikayla milala khoop dhanyawad

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 3 ปีที่แล้ว +1

    हॕलो मधूराणीजी, तुमचे खूपखूप आभार गुरू ठाकूर या आनमोल रत्नला आमच्या समोर,आणल्याबद्दल !!
    आणि गुरूदादा तुम्हाला,साक्षात दंडवत...खरतर मला ईथे नमस्काराची इमोजी ठेवायाची आहै ,.पण मला What's अॕप शिवाय दुसरीकडे ती चित्र वापरताच येत नाहीत,.,
    गुरूदा , तुमचूया कवितिंचा एक फोल्डरच केलाय मी सेलाफोन मधै!! अप्रतिम लीहीता तुम्ही..
    आणि मधुराणी ,तुम्ही "आई कुठे काय करते" मधै खूपच छान अभिनय केला आहे,, नचुकता मी ही मालिका lokdwn मधे बघतेच.,.आत्ताच्या समाजात या सरख्या विषयाची खरच फारच गरज होती...खूपच छान विषय लिना गांगुलीने मांडलाय,,,त्याहीपेक्षा तुम्ही आणि सर्वच सहकलाकारांनी अप्रतिम अचूक पणे आम्हा प्रैक्षकाःसमोर आणला आहात,,त्यासाठी खूप खूप धन्यवाद !!

  • @priyanshkharote611
    @priyanshkharote611 3 ปีที่แล้ว +2

    मला शेवटची कविता विंदांची वाटायची... गुगल images मधे तसच दिसतं. खुप चकीत झालो मी. वा गुरू. धन्यवाद मधुराणी.

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +16

    "कवितेचं पान"अप्रतिमच!
    एकाहून एक सरस मुलाखती...
    मधुराणी ग्रेट.... !

  • @deepapujari112
    @deepapujari112 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर. मी आधीपासून कविता करत होते. ह्या कार्यक्रमामुळे ऐकून पारायण करून inspiration घेऊन जास्त कविता करू लागले .गुरु ठाकूर ह्याच्या कवीता वाचून, ऐकून, काही शब्द, अर्थ, विषयामुळे प्रेरणा घेऊन मी माझ्या अजून कविता केल्या thanks.

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 4 ปีที่แล้ว +4

    एका साध्या सरळ तरल माणसा ला भेटून कविता ऐकून खूप आनंद झाला

  • @Radhika_70
    @Radhika_70 ปีที่แล้ว +1

    चांदणचुरा या शब्दाबद्दल जे काही सांगितलं ते मुळीच पटलं नाही. हा शब्द शांताबाई शेळकेंनी फार पूर्वी एका गाण्यात वापरलेला आहे.ते गाणं आहे,
    पुनवेचा चंद्रमा आला घरी
    चांदाची किरणं दर्यावरी
    चांदण्याच्या चुऱ्यात
    खाऱ्याखाऱ्या वाऱ्यात
    तुझा माझा एकांत रे साजणा
    प्रत्येकाच श्रेय त्याला द्यायला हवं.हा शब्द शांताबाईंचा आहे.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 ปีที่แล้ว +3

    मधुराणी, 'कवितेचे पान' पुन्हा सुरू करावंस असं मनापासून वाटतं.

  • @krantijyotiedutech
    @krantijyotiedutech 3 ปีที่แล้ว +6

    मनातल्या जाणिवांना परिस्तिथीचे डंख झाले की शब्द जन्म घेतात आणि कवितेचा जन्म होतो.कवितेच्या पानावर मन झुलत आणि उंच प्रतिभेच्या नभाळी घेऊन जात .🌹🌹अप्रतिम मुलाखत अंजली गोडसे मर्ढेकरांच्या गावातून सातारा🌷🌷

    • @narendravispute8567
      @narendravispute8567 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सुद्दा प्रयत्न करा, छान लिहाल तुम्ही...

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है ... गुरू ठाकूर व मधुराणी दोघांनाही सस्नेह नमस्कार ...💐🙏🙂

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale6593 5 ปีที่แล้ว +5

    मधुराणी तू आणि गुरुठाकुर च्या या गप्पा व कविता अन कवितेचं गाणं आणि चाली वरच्या कविता कधी संपूच नये हे जसं मला वाटतय न तसच तुमच्या मध्ये अधून मधून दिसणाऱ्या त्या पांडुरंगालाही वाटत असेल तो कंबरेवर हात ठेवून तुमच्या गप्पा ऐकण्यात रंगून गेलाय आणि माझ्या कडे पाहून मला तुमच्या गप्पां त त्याला होणारा आनंद सांगतोय आणि मीही. तुमचा दोघांचा संवाद चालू आहे आणि आम्हीदोघे एकरूप होऊन ऐकत आहोत
    त्याचे आशीर्वाद व माझी वाह वा तुमच्या बरोबर आहेत.

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटतं कवितेचं पान हा कार्यक्रम एकताना.

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 5 ปีที่แล้ว +1

    मोरनिंग वोक झाल्यानंतर बागेत मस्त बसून श्री गुरुं ना ऐकलं.....खूप छान....खूप मोठा माणूस पण तेवढाच नम्र......आनंद....आनंद.....

  • @radhikav2530
    @radhikav2530 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मैफिल होती..👌 गुरू ठाकूर यांच्याकडून त्यांच्या कवितेच्या प्रवासाबद्दल ऐकायला मिळाले छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या कवितेचे पान या उपक्रमात. दोघांचेही खूप आभार!🙏 👍

  • @veenasurve8243
    @veenasurve8243 2 ปีที่แล้ว +2

    Guru Tuze Dole... ek Sunder Kavita aahe.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 3 ปีที่แล้ว +2

    कवितेचे पान मध्ये आज खूप छान व्यक्तीमत्वाला आपण बोलवलंत धन्यवाद , खूप छान विचार; शब्दांवर प्रभूत्व असलेला एक सुंदर चित्रकार खूप खूप कौतुक 👍👍👍👍👍🌹🌹

  • @shubhadathaware3076
    @shubhadathaware3076 ปีที่แล้ว +1

    काय आणि किती लिहावे खुप सुंदर कविता एकदम मस्त मला पाय असावे जमीन वरती ही कविता फार आवडते

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +1

    अथांग शब्दसागरातील लाटा झेपावत,झेपावत काठावरती येतात, मनाची सोनेरी वाळू रसिकतेने चिंब भिजून जाते....ह्रदयातून उत्फूर्त दाद
    येते......वाह गुरू👌वाह ....मधुराणी 👌अप्रतिम💐

  • @prashcop
    @prashcop 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम
    आजचा भाग पाहून मला आलेला रायटिंग ब्लॉक नक्की जाणार

  • @asnikarsd
    @asnikarsd 7 หลายเดือนก่อน

    काय बोलू दोघे ही उत्कृष्ट भरपूर ज्ञान ,मनोरंजन आपली दोघांची चर्चा कधीच संपू नये असे वाटते. आभारी आहे. 🙏

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 4 ปีที่แล้ว +3

    कवितेचे पान हि मालिका खूपच सुंदर आहे

  • @sonalmayannache1282
    @sonalmayannache1282 5 ปีที่แล้ว +1

    वाह वा वा वाहहह.. काय लिहिलंय माणुसकी वर ... तोडच नाही.. जगातल्या सगळ्या अगदी सगळ्या प्रशनांची उत्तरं एका वाक्यात .. मानाचा मुजरा तुम्हाला गुरू सर..

  • @shubhangi1947
    @shubhangi1947 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम! मनाला भिडणारी कविता!

  • @deepapujari112
    @deepapujari112 4 ปีที่แล้ว +1

    मी आता आताच तुमचे काही एपिसोड पाहिलेत. खूप सुंदर, मी ही कविता लिहिते. खूप छान विचार मिळतात मनन करायला.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว +2

    हा episode मी अनेक वेळा पाहते, ऐकते. फारच सुंदर !!

  • @shailatilak6046
    @shailatilak6046 6 หลายเดือนก่อน

    गुरु मी आज प्रथमच हा कार्यक्रम पाहिला. खरंच खूप छान. तुझ्या चेहर्यावरचे निरागस भाव ,सौम्य हसणं व सुंदर काव्य. छान मिलाप.खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद या आजीचे.

  • @aaravpadvi2660
    @aaravpadvi2660 6 ปีที่แล้ว +27

    you tube
    वर आतापर्यंत सर्वात उत्तम चॅनल
    कवितेचं पान

    • @vidyamore601
      @vidyamore601 3 ปีที่แล้ว +1

      प्रचंड प्रतिभाशाली कवी गुरु ठाकुर आणि कवीच्या प्रतिभेला सहजतेने व्यक्त करायला प्रोत्साहीत करणारी मधुराणी.
      दोघांना ही खुप खुप शुभेच्छा.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 6 ปีที่แล้ว +18

    कार्यक्रम खूपच छान झाला... तुमच्या लहान पणीच्या आठवणी माझ्या लहानपणाशी मिळत्याजुळत्या आहेत. तुमच्या पुढच्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघेन.👌 खूप मस्त

  • @manjiriendait9940
    @manjiriendait9940 6 ปีที่แล้ว +15

    मधुराणी तू विचारलेले प्नश्न खूपच आवङले. खूप सुंदर एपिसोङ!

  • @meerashinde9177
    @meerashinde9177 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर विवेचन, खूपच अर्थपूर्ण, कविता तर मस्तच.मनापासून आवडणारी कविता, धन्यवाद गुरू ठाकूर .

  • @Gmailpatil
    @Gmailpatil 6 ปีที่แล้ว +7

    TH-cam वर माझी पहिली कमेंट. इथे नाही तर कुठे केली असती.
    गुरु ठाकूर हा माणूस म्हणून उलघडलेला पाहायला मिळालं.... वा.. छान. खूप काही घेण्या सारखं आहे.. अवलंबवण्या सारखं आहे. धन्यवाद.
    Good work मधुराणी. Thank you for bringing this to us.

  • @smitakale3672
    @smitakale3672 4 ปีที่แล้ว +1

    कवितेच्या पानातुन उमगत गेल्या कविता आणि कवी ,कवीचे भावविश्व ,मन तृप्त झाले पण कानाला आस लागली असे काही सुंदर मनातले कवीच्या शब्दात आणि मधुराणीच्या सोबत कवितेचे पान ऐकावयाची.

  • @kiranshah9438
    @kiranshah9438 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कार्यक्रम ! गुरू ठाकूर यांच्या कविता खूप आवडल्या .त्याचा साधेपणा जाणवत होता . उपक्रम खूप छान . मला आत्ता याची माहिती झाली . मनावर मोहिनी झाली आहे

  • @ranjitkale4575
    @ranjitkale4575 6 หลายเดือนก่อน

    व्वाह....खूपच छान. गुरु ठाकुर एक प्रतिभावान कवी तर आहेच पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून खूप ग्रेट आहे. गुरुला खूप खूप शुभेच्छा ! आणि हा उपक्रमही खूप छान...

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 6 ปีที่แล้ว +2

    गुरू ठाकूरबरोबरचं कवितेचं पान छानच. तसंच सचिन खेडेकरबरोबरचं पानही खूप भिडणारं झालं आहे. स्वत: कवी असणारे आणि तसे नसणारे यांच्याबरोबर होणार्या चर्चांमध्ये वेगळी वेगळी मजा आहे. म्हणून ही विशिष्ट प्रतिक्रिया नोंदवत आहे.

  • @dnyaneshyedge3016
    @dnyaneshyedge3016 4 ปีที่แล้ว +1

    पाहिलेल्या काही एपिसोडपैकी मनाला पाझर फोडून गेलेला हा एपिसोड...
    गुरु ठाकूर सर मनात घर करून राहिलात..... धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it 6 ปีที่แล้ว +3

    गुरू ठाकुर यांच्या कवी गुणाला सलाम...
    Aaj 6 year nantrr prt haa episode baghitalaa aani titakaach to navinyapurn anubhavalaaa
    ..❤

  • @latabalwe2099
    @latabalwe2099 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान. ऐकत रहावे असे वाटते. शेवटची कविता तर अप्रतिम.

  • @minalsatoskar
    @minalsatoskar 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder anubhav... Guru Thakur..Tuzya pratibhela salam🙏🙏❤

  • @vilasbaviskar5003
    @vilasbaviskar5003 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम शब्द आणि अप्रतिम शब्दांची मैफलीत बसल्यासारखं वाटलं मनाला ही भावल कवितेचे पान तुझे
    कवितेचे पान तुझे

  • @anandikerkar
    @anandikerkar 3 ปีที่แล้ว +1

    💖💖💖💖दोघेही खुप छान 👌👌👌👌💐🙏 तुमच्या कविता तर भारीच..... शब्दच नाहीत

  • @snehlekani2906
    @snehlekani2906 ปีที่แล้ว +2

    सर, धन्यवाद खूप छान माहिती दिली
    तूम्ही प्रेरणादायी आहात

  • @sushantj3285
    @sushantj3285 6 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंत फक्त एक गीतकार म्हणून गुरू ठाकूर यांच्या बद्दल ऐकून होतो पण हा एपिसोड पाहिल्यावर नव्याने त्यांची ओळख झाली. एक कलावंत आणि त्याचे विचार किती सोपे आणि साधे सरळ असतात. खुप छान वाटलं. मधुराणी जी आपणांस अनेक अनेक धन्यवाद.

  • @sanjayjadhav5884
    @sanjayjadhav5884 4 ปีที่แล้ว +2

    अतिमधुर कविता, सुंदर शब्दांची जोड. गुरू ठाकूर आपण छान कविता लिहीता..

  • @ashishkshirsagar6524
    @ashishkshirsagar6524 6 ปีที่แล้ว +10

    फारच सुंदर, आल्हाददायक अनुभव होता. अनेक शब्द पुन्हा ऐकण्याचा योग आला.

  • @nirajashwini
    @nirajashwini 6 ปีที่แล้ว +4

    कार्यक्रम खूपच छान झाला.
    मधुराणीचे प्रश्न खूप वेचक असतात जे कार्यक्रमाची रंगत वाढवतात.
    गुरू ठाकूर.... मनापासून धन्यवाद

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 3 ปีที่แล้ว +2

    शब्दच नाहीत सर तुम्हच्या कौतुकासाठी.
    मला खंत आहे की इतक्य ऊशीरा मी तुम्हाला ऐकले.

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कार्यक्रम Great गुरू ठाकूर...

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele5888 4 ปีที่แล้ว +1

    गीतकार याला सून म्हणूनच काम करावं लागतं
    । किती चपखल सांगितलं आहे। फारच प्रेरणादायक....

  • @adityiswalkar3909
    @adityiswalkar3909 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अविस्मरणीय आहे हे कवितेचे पान नुसत्याच कविताच नाही तर व्यक्ती देखील कळुन जाते ह्या पानातुन👏👏 गुरु ठाकुर दि ग्रेट👍👍

  • @dilipsapkal1256
    @dilipsapkal1256 6 ปีที่แล้ว +1

    गुरु ठाकुर मराठी वाङमयाचा माथा उन्नत करणारे बहुआयामी व्यक्तीमत्त्व .आजच्या युवकांचे प्रेरणास्थान . त्यांच्या कतृत्वाला सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा !

  • @veena197419
    @veena197419 2 ปีที่แล้ว +2

    दुसऱ्या भागाची खूप आतुरतेने वाट पाहतो आहोत.

  • @secondhandgaming7072
    @secondhandgaming7072 ปีที่แล้ว +2

    सर्वच कविता खूप छान आहेत

  • @nilimaingole757
    @nilimaingole757 3 ปีที่แล้ว

    मधुराणी.... खूपच सुंदर उपक्रम सुरू केलाय तु....तुझे प्रत्येक एपिसोड मी आवर्जून बघते... अगदी दिलखुलास पणे मुलाखत घेतेस तू.... तुमच्या गप्पा सुरू असतांनाच... ऐकताना मुड छान होतो....तु गायलेल्या कविता पण अप्रतिम असतात.... गुरु सर तुम्ही गाण्यांना लावलेल्या चाली अप्रतिम... नेहमी लक्षात राहण्यासारख्या आहेत....💐💐🙏

  • @vedantgemer7430
    @vedantgemer7430 2 ปีที่แล้ว +1

    गुरू ठाकूर .....प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व 🙏

  • @ujwalakawyagandh1619
    @ujwalakawyagandh1619 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गुरू सर सुंदर मधुराणी सुंदर

  • @dhananjaykothawale7949
    @dhananjaykothawale7949 5 ปีที่แล้ว +3

    मस्तच.... राणीताई तुमच्या आवाजातील पाचूच्या रानातं खुपच मस्त.

  • @khushaldesai501
    @khushaldesai501 4 ปีที่แล้ว +1

    फारंच छान, खूप मजा आली... नवोन्मेदित कवींसाठी 'ठाकूर' साहेब, 'खरे' 'गुरू' आहेत... 😍😍😍

  • @drswapnilghatge5043
    @drswapnilghatge5043 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम .....गुरु ठाकूर सर ....एक आनंद यात्री ! असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर ....नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर !!🙏😊👍💐

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कार्यक्रम आणि गुरू ठाकूर यांच्या कविता

  • @letslearntogether5433
    @letslearntogether5433 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शो मधुरानी,
    गुरू ठाकुर दि ग्रेट.

  • @dr.anupam_borade
    @dr.anupam_borade 3 ปีที่แล้ว +1

    पाचूच्या रानात ! , तसा मी ताकास तूर हि लागू दिला नव्हता ..! 👌👌👌

  • @pinalchaudhari15
    @pinalchaudhari15 6 ปีที่แล้ว +2

    Guru Thakur hynchya kavitetun tyncha swabhav Bolka zala.... Khup chaan episod...... Madhurani

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว

    वाह, क्या बात है. गूरू ठाकूर, मधुराणी फार छान कवतेचं पान.

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 6 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर उपक्रम.दोन भाग आतापर्यंत पाहिले.गुरू ठाकूर सोबतचे कवितेचे पान मनाला स्पर्शून गेले.गुरू ठाकूर यांच्या य्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळले.👌👌👍👍✌

  • @vandanaaher5865
    @vandanaaher5865 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कविता आणि अनुभव विचार

  • @nikhilpalande
    @nikhilpalande 3 ปีที่แล้ว +1

    हा एपिसोड अगणित वेळा पाहिला, ऐकला... तरी नवाच वाटतो! 💫

  • @minakshirahane6671
    @minakshirahane6671 2 ปีที่แล้ว +1

    Khuch sunder episode hota......

  • @saeebai
    @saeebai 4 ปีที่แล้ว +1

    वा...छान रंगली मुलाखत ..पाचुच्या रानात दंग झालो..

  • @gaurangnanivadekar7910
    @gaurangnanivadekar7910 6 ปีที่แล้ว +1

    Farach sunder anubhav.prasanna Ani samvedansheel Kavi guru Thakur.chhan upakram madhurani.👌👌

  • @vrushalioka1707
    @vrushalioka1707 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर कविता, मनाला भावणाऱ्या

  • @pandurangdombepatil9493
    @pandurangdombepatil9493 6 ปีที่แล้ว +3

    आणि मधुराणी मॅडम नी खूप छान उपक्रम सुरू केला आहे त्या बद्दल त्यांचे खूप मनापासून आभार मानतो