चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2021
  • चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan) आज मी तुम्हाला माझं कोकणातलं गाव बघायला नेणार आहे. माझं गाव कसं आहे हे तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही प्रमाणात बघितलं असेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं संपूर्ण गाव दाखवणार आहे. पावसाळ्यात माझं गाव खूप सुंदर दिसतं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आंबवली हे माझं गाव आहे. माझ्या गावात दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत. ही घरे कोकणी पद्धतीची कौलारू घरे. उतरत्या कौलारी घरांची शोभा खूप छान असते. आता नवीन घरे सिमेंट चिऱ्याची बनतात पण पूर्वी मातीची कशी घरे होती हे बघायला मिळेल. त्यापूर्वी घरे आणखी वेगळी होती. काळ वेळ जसा बदलतो तसा कोकणातील, माझ्या गावातील घरांचे रुपडे सुद्धा बदलले आहे. गावाकडील खेडेगावातील घरे कसे असतात आजूबाजूचा परिसर कसा असतो हे बघायला मिळेल. पावसाळ्यात कोकणातील गावाच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडे हिरवागार झालेला असतो. पावसाळ्यात नदी नाले सुरू होतात. सर्व परिसर डोळ्यांना सुखावत असतो. आमच्या गावाच्या शेजारून भारजा नदी वाहते. आमच्या गावचे सौंदर्य आमच्या भारजा नदीच्या खाडीजवळून बघण्यासारखे असते. मी तुम्हाला एक दिवस नक्की माझ्या गावी नेणार आहे. बऱ्याच जणांना माझ्या गावाला भेट द्यायची आहे. तुम्ही माझ्या गावाला जरूर भेट द्या. खास करून माझ्या गावाला भेट द्याल तर तुम्हाला खूप सुंदर नजारे बघायला मिळतील. आमचं गावचं घर कसं आहे हे दाखवलं आहे. आमच्या गावात वाड्या किती आहेत, गावातील गल्ल्या कशा आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. तुम्हाला माझ्या गावाचा हा व्हिडीओ कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaMazaGavBaghyala #MazaKoknatlaGav #KonkanVillageInMonsoon #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 481

  • @preranakotwal3979
    @preranakotwal3979 2 ปีที่แล้ว +12

    तुमचे गाव आणि आजुबाजुचा परिसर खुप खुप सुंदर आहे. ह्या लॅाकडावुन मध्ये असे दृष्य बघुन मन प्रसन्न करते 🙏🏻धन्यवाद

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว +4

    आमच कोकण म्हणजे स्वर्ग च पावसाळ्यात तर अजूनच छान दिसते सगळीकडे हिरवळ वहाळ नदी परे तूंडूंब वाहतात

  • @shyampatil5796
    @shyampatil5796 2 ปีที่แล้ว +1

    सतीशदा तुम्ही भर पावसात फिरुन सुंदर व्हिडिओ बनविला आहे. तुमच्या बोलण्यात साधेपणा आणि आपलेपणा आहे. म्हणूनच तुमचे व्हिडिओ पाहताना एक वेगळेच समाधान मिळते. आणि कोकण म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले निसर्गाचे सुंदर लेणे आहे.👌👍

  • @amindaasji3024
    @amindaasji3024 2 ปีที่แล้ว +4

    The future of India lies in its villages.

  • @gaurizargad1413
    @gaurizargad1413 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या मुळे घरी बसून कोकण चा आनंद घेता येतो. खूप मनापासून सगळी माहिती सांगता तुम्ही.thank you

  • @maltisingh6484
    @maltisingh6484 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan devi aai la namashkar 🙏🙏🙏🙏🙏

  • @senarebelo8666
    @senarebelo8666 2 ปีที่แล้ว +1

    Very calm and peaceful beautiful houses and fields

  • @saurabhpatilofficial4633
    @saurabhpatilofficial4633 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुझ्या व्हिडिओ बघून गावची आठवण येते ❤️

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान गाव आहे तुझं... मस्त पावसामुळे सुंदरता खूपच वाढली आहे.. ♥♥♥♥

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว +21

    गाव खुप सुंदर आहे तुमचं,मला केळशी हून येताना प्रश्न पडायचा आंबवली गांव कुठे आहे ॽ तुमच्यामुळे गाव पाहिल

  • @udaykadam9111
    @udaykadam9111 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे तुमचा गाव निसर्ग बघण्यासारखा आहे कोकणा सारखी हिरवळ शोधून सापडणार नाही आणि तुमचे व्हिडिओ बघण्यासारखे असतात आणि तुम्ही गावची माहिती खूप मस्त छान सांगितली असेच व्हिडिओ छान छान व्हिडिओ करत राहा आणि आमच्याकडे पोचवत रहा ऑल द बेस्ट

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup ..khup. masst gaon aahe dada..parisar..nisargane bhar bharun dilay ...pavasat mandirahun gavacha nazara nayanaramya disato....khup nashibvan aahe dada tu....

  • @balukalokhe8900
    @balukalokhe8900 2 ปีที่แล้ว +1

    खुपचसुँदर आहे येकदम नक्की येऊ

  • @factse511
    @factse511 2 ปีที่แล้ว +2

    Mast chan vatl gaon🙏

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ मन प्रसन्न झाले गाव बघुन तुम्ही खूप कष्ट घेतले भर पावसात विडिओ बनवायला धन्यवाद 🙏

  • @k10edits24
    @k10edits24 2 ปีที่แล้ว +5

    Kokantili sagli gav ashi bharich distat ❤️

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 ปีที่แล้ว +1

    खुप भारी आणि सुदंर निसर्गमय गाव आहे दादा तुमचे लाखात एक अत्यंत गोड फॅमिली आहे तुमचा 👌👌👌👌👌👍👍👍❤️❤️❤️❤️🤗🥰

  • @deepakrewale6522
    @deepakrewale6522 2 ปีที่แล้ว

    खुपच छान आणि सुंदर निसर्गरम्य गाव.. तुमच्या गावचे काही लोकं आहेत ओळखीचे पण तुमच्या गावी कधी अजूनही जाणे झाले नाही.

  • @samartha279
    @samartha279 2 ปีที่แล้ว +2

    Ek number 👍👍👍👍👍

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar gav aahe mandir apratim ani mala varsha khupch aavdtey sukhi raha