ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

माजी सनदी अधिकारी सुनिल केंद्रेकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | स्वराज्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
  • स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पुणे येथे पार पडले. यावेळी माजी सनदी अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी 'शेतीच्या प्रश्नांकडे बघताना प्रशासन आणि राज्यकर्त्यांची भूमिका कशी असावी?' या विषयावर मार्गदर्शन केले.
    #स्वराज्य #Swarajya #कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबीर #पुणे #सुनिल_केंद्रेकर #शेती #शेतकरी
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

ความคิดเห็น • 377

  • @tangadeh4563
    @tangadeh4563 หลายเดือนก่อน +32

    एक असे जिल्हाधिकारी ज्यांची बदली झाली म्हणून नागरिकांनी जिल्हा (बीड) दोन बंद ठेवला असे एकमेव अधिकारी माननीय सुनील केद्रेकर साहेब

  • @sadashivbahir777
    @sadashivbahir777 หลายเดือนก่อน +78

    शिस्त प्रिय अधिकारी. महाराष्ट्राचे दुर्दैव अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृती घ्यावी लागते.

    • @moryatech4
      @moryatech4 25 วันที่ผ่านมา +1

      त्यांनी कारण सांगितलं ते ऐकल नाही का

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 26 วันที่ผ่านมา +12

    केंद्रेकर साहेबांचे हाताखाली सोलापूर येथे काम केले आहे. ग्रेट अधिकारी.
    स्वराज्य पक्ष. शुभेच्छा.

  • @abhishekthorat462
    @abhishekthorat462 หลายเดือนก่อน +86

    केंद्रेकर साहेब यांच्या सारखे अधिकारी यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागते,हेच ह्या देशाचे दुर्दैव आहे.

    • @2024gcj
      @2024gcj หลายเดือนก่อน +1

      याचे कारण त्यांनी इथे स्पष्ट केले आहे. पूर्ण ऐकल्यास समजेल.

  • @user-zq5py9lm9t
    @user-zq5py9lm9t หลายเดือนก่อน +39

    केंदरेकर साहेब हे ऋषींतुल्य व्यक्तिमत्व आहे ते कृषी ऋषीं म्हणण्याचे पात्र आहेंत त्याचा अनुभव हा प्रत्यक्ष घाम गाळून मिळालेल्या परिपकाचा नवनीत आहे त्यांचे व्यक्तिमत्वला सलाम

    • @jaikisanshinde8438
      @jaikisanshinde8438 หลายเดือนก่อน

      कर्तुत्ववान अधिकारी होते साहेब तुमच्या सारखे अधिकारी शोधुन सापडत नाही
      तुमच्या कार्याला सलाम

  • @user-jc3ng7mu9y
    @user-jc3ng7mu9y หลายเดือนก่อน +90

    केंद्रकर साहेब ग्रेट ऑफिसर होते बीड जिल्हा लां शिस्त लावली

    • @kedar3099
      @kedar3099 หลายเดือนก่อน +1

      खरच शिस्त लागली?

    • @mie717
      @mie717 หลายเดือนก่อน +3

      Beed Ani Bihar Shist visrun ja

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 หลายเดือนก่อน

      😂😂​@@mie717

  • @vijaymajage4206
    @vijaymajage4206 3 วันที่ผ่านมา

    एक प्रामाणिक सनदी अधिकारी. योग्य व वास्तववादी विवेचन. स्वराज्य संघटनेचे आभार

  • @rahuljaybhaye-xk6ne
    @rahuljaybhaye-xk6ne 27 วันที่ผ่านมา +5

    आदरणीय सुनिल केंद्रेकर साहेब, आपण शेतीच्या प्रश्नांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले होते.निवृत्तीनंतर आपण शेती करत आहात हे ऐकून आनंद झाला.मी सुध्दा शेती केलेली आहे. आपला विश्वासू राहुल जायभाये, पाटोदा,बीड.

  • @nanduyerande9035
    @nanduyerande9035 29 วันที่ผ่านมา +7

    " जैसा बोले,तैसा चालें !
    त्याची वंदावी पाऊले!
    खरंच आपले वर्तन या मनी प्रमाणे आहे, खुप कमी वेळेत आपण शेतीच्या प्रमुख समस्या ओळखून वस्तुनिष्ठ खरोखर माहिती समाजासमोर मांडली,शेती या विषयावर समाजप्रबोधन होणं हि काळाची अत्यावश्यक गरज !!
    धन्यवाद शेतकरी केंद्रेकर साहेब.🙏🙏

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 หลายเดือนก่อน +41

    केंद्रेकर साहेब,विश्वांभर चौधरी, तुकाराम मुंढे साहेब अशा प्रामाणिक व्यक्तींनी एकत्र येऊन सध्याच्या बरबटलेल्या राजकारण्यांना सक्षम पर्याय तयार करणे आवश्यक आहे.

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 หลายเดือนก่อน +85

    सुनील केंद्रेकर सारखे अधिकारी होणे नाही वस्तुस्थिति आहे साहेब

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo หลายเดือนก่อน +20

    केंद्रेकर साहेब.परभणीची शान!

    • @InfoBol_Gopal
      @InfoBol_Gopal 17 วันที่ผ่านมา

      ते हिंगोलीचे आहेत केंद्रा या गावचे

  • @anjalishinde164
    @anjalishinde164 26 วันที่ผ่านมา +5

    स्वराज्य संघटना कार्यक्रमातून मागदर्शन केल्याबद्दल अभिनंदन साहेब अशेच मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज आहे

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 15 วันที่ผ่านมา +2

    शब्द न शब्द एकदम खरा अगदी बरोबर 👍 ❤❤❤

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv หลายเดือนก่อน +31

    कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करणारा सक्षम अधिकारी प्रशासनाचा शंकर महादेव म्हणजेच सुनील केंद्रेकर

  • @sachin_shimple
    @sachin_shimple 25 วันที่ผ่านมา +7

    केंद्रेकर साहेब फॅन फॉर्म बीड 👍🏻

  • @vijayji3008
    @vijayji3008 หลายเดือนก่อน +28

    अगदी खरंय सर, श्रमजीवी वर्ग संपत चाललाय

  • @pratapwalke4182
    @pratapwalke4182 หลายเดือนก่อน +14

    एक खमक्या अधिकारी, आदर्श अधिकारी.

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 หลายเดือนก่อน +4

    मी केंद्रेकर सर यांना 2012 साली नायगाव ( मयुर आभरण्य ) बीड या ठिकाणी रात्री 7 वाजता भेटलो होतो. खरचं केंद्रेकर सर सच्चा प्रामाणिक आहेत.

  • @deewanjipawar6749
    @deewanjipawar6749 28 วันที่ผ่านมา +3

    साहेब,अत्यंत प्राक्टीकल स्पष्ट व सत्य मार्गदर्शन ,आपण आपल्या नोकरीच्या कार्यकाळात ही सत्याची कास सोडली नाही.सिडकोमध्ये‌ आपलं काम पहाण्याचा योग आला होता.खुप धन्यवाद.

  • @girishdalvi2934
    @girishdalvi2934 หลายเดือนก่อน +17

    बीड पासून १००कि.मी छोट्या खेडेगांवातुन आम्ही ग्रामस्थ गांवाच्या समस्या घेऊन मा.जिल्हाधिकारी श्री. केंद्रेकर साहेबांच्या भेटण्यासाठी गेलो लोक दरबारात लगेच प्रश्न निकली लगेच मा.तहसीलदार फोन लावला.
    आयडॉल व्यक्तिमत्त्व !

  • @nageshgirwalkar448
    @nageshgirwalkar448 26 วันที่ผ่านมา +4

    जय हो सर्जी,"अनातं अडचणीचा विषय म्हणजे शेती "

  • @jyotibapawar2512
    @jyotibapawar2512 หลายเดือนก่อน +10

    सर.....आज आपण शेतकरी म्हणून प्रॅक्टिकल काम करत असताना जे शेती विषयी व शेतकरी, मजूरदार यांचे खरे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडले आहेत. व खरंच आज सर्व समाजातील लोक हे आपले काम माणुसकीच्या विचारातून केले तरच समाजाचा विकास होण्यास मदत होईल. हे परखड पणे आपण आपले मत मांडलात. त्यासाठी सलाम.

    • @ashokbband6473
      @ashokbband6473 หลายเดือนก่อน +2

      अशोक कुमार भगवंतराव ‌बंड रोहित बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 28 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर मानुस आहेत सर तुम्ही

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 27 วันที่ผ่านมา +4

    जबरदस्त अधिकारी मेहनती कस्टाळू केंद्रेकर साहेब

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 หลายเดือนก่อน +9

    शंखियगोगलगाय चा अतिशय मोठा उद्रेक आमच्याकडे झाला होता त्यावर आम्ही फक्त मीठाच्या वापराने शंखियगोगलगायींचा संपूर्ण नायनाट केला.
    मला तुमचे विचार खूप आवडले आणि पटले सुध्दा.

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 หลายเดือนก่อน +14

    केद्रेंकर साहेब एकच नंबर नियमबध्द अधिकारी पण आजच्या घडीला चागंले कामं करणारा अधिकारी भष्ट्राचार लोकांना चालत नाही. शेतीविषयी खुपच चांगली जान असणारे अधिकारी. जयसियाराम

  • @anil05041973
    @anil05041973 หลายเดือนก่อน +6

    अतिशय उद्बोधक विवेचन केले आहे साहेबांनी आजच्या परिस्थितीची. शेती कडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे.प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

  • @shivamsingyadav3295
    @shivamsingyadav3295 หลายเดือนก่อน +3

    एक उत्तम प्रशासक, कार्यक्षम नेतृत्व व शेतकऱ्यांसाठी कायम प्रयत्नवादी असलेलेअसे आदरणीय श्री. सुनील केंद्रेकर साहेब. तुमच्या कामाचा आम्हा महाराष्ट्र व बीडकरांना सार्थ अभिमान आहे. आम्ही आपल्या भावी दीर्घ व आनंददायी आयुष्यासाठी प्रार्थना करतो🙏🙏

  • @ashoksawant3988
    @ashoksawant3988 13 วันที่ผ่านมา +1

    साहेब,तुम्ही व तुकारामजी मुंढे साहेब यांनी उच प्रशासकीय सेवा ही आदर्श घेण्या सारखी केली आहे,तुम्ही दोघनि आत्ता राजकारणात येऊन ऐखाद्या राजकीय पक्षात येऊन उच्चं पदावर जाऊन राजकारणात आदर्श राजकारणाचा पक्ष व नेते निर्माण करन्याचे कार्य करावे ही विनंती आहे,कारण सर्व गोष्टीचा विकास फक्त राजकारणातूनच होतो म्हणून आदर्श पक्ष व नेता कार्यकर्ता निर्माण करणे गरजेचे आहे.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 หลายเดือนก่อน +9

    शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली केंद्रेकर साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @mkpeducation9943
    @mkpeducation9943 11 วันที่ผ่านมา

    कामाची माणसं कोणत्याही क्षेत्रात आदर्श काम करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहात आपण साहेब, अगदी वस्तुस्थितीवर आधारित विवेचन.

  • @educationalfacts8976
    @educationalfacts8976 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान साहेब........ शिवरायांच्या विचारांचे पाईक आपल्या सह सर्व अधिकारी यांनी शिव विचारांचा जागर घालू या.......🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 หลายเดือนก่อน +15

    मुलखावेगली मानस,असा कष्ट उपसणारा एवढा मोठा अधिकाती .

  • @swatihambarde27
    @swatihambarde27 หลายเดือนก่อน +4

    जगातील सर्वात सुंदर शेतीचे वास्तववादी विश्लेषण

  • @rishikeshawatade96
    @rishikeshawatade96 29 วันที่ผ่านมา +2

    शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी संबंधी योग्य महिती दिली... सरांचे शेतीसंबंधी ज्ञान फार अगाध आहे

  • @ajienta23
    @ajienta23 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर साहेब, आपल्या विचारमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 หลายเดือนก่อน +8

    'श्रम' यावर लोकांचा विश्वास उद्वस्त होत आहे

  • @vishvanathkunte1480
    @vishvanathkunte1480 หลายเดือนก่อน +9

    सरांना पाच वर्षे कृषी आयुक्त पदावर ठेवले असते तर आज कृषी क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण झाली असती.

  • @cmacsadv.jagannathmane8056
    @cmacsadv.jagannathmane8056 หลายเดือนก่อน +5

    सर्वांचे अनुदान रद्द करून शेतकऱ्यांना फ्री आणि चांगली आरोग्य सेवा, शेतकऱ्यांच्या मुलांना फ्री आणि दर्जेदार शिक्षण आणि रस्ते,वीज आणि पाणी सुविधा द्या. अनुदान हे मोठे शेतकरी उचलतात गरीब शेतकऱ्याच्या घरी काही येत नाही.

  • @baluwaghamare8716
    @baluwaghamare8716 29 วันที่ผ่านมา +7

    माझ्या झरी गावची ओळख असलेले,शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे च नव्हे तर अनुभवणारे अधिकारी.
    आपल्या कार्याला सलाम साहेब.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 28 วันที่ผ่านมา

      Kendrekar saheb brahman samajatun yetat kay

  • @kunthalupadhye7232
    @kunthalupadhye7232 29 วันที่ผ่านมา +2

    सर,
    खुरपणी बाबत सांगितले ले अनुभव एकदम खरोखर, . 🙏

  • @umeshchinchane172
    @umeshchinchane172 หลายเดือนก่อน +3

    प्रिय श्री केंद्रेकर सर नमस्कार मी आपल्या मताशी पूर्णतः सहमत आहे. आपण खरच सत्य परिस्थिती सांगितली .❤

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 29 วันที่ผ่านมา +3

    अनुभवाचे बोल.💐🌺🌹👍

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq หลายเดือนก่อน +40

    प्रामाणिक कुशल असे अधिकारी केंद्रेकर साहेब....साहेबांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.

    • @diptivaidya9586
      @diptivaidya9586 หลายเดือนก่อน

      शेतकऱ्यांनी केंद्रेकर साहेबांकडे जाऊन त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा, शेती हा आजकाल नुसता राजकारण्यांच्या फायद्या तोट्याचा विषय झाला आहे,

    • @vijaysuryawanshi2476
      @vijaysuryawanshi2476 29 วันที่ผ่านมา

      साहेब चे गांव कोणते आहे

    • @ishwarbhawar6855
      @ishwarbhawar6855 29 วันที่ผ่านมา

      मुळ गाव केंद्रा ता. सेनगाव जि हिंगोली ​@@vijaysuryawanshi2476

    • @ishwarbhawar6855
      @ishwarbhawar6855 29 วันที่ผ่านมา +1

      ​@@vijaysuryawanshi2476ह.मु. परभणी बहुतेक

  • @kishordolas7497
    @kishordolas7497 หลายเดือนก่อน +8

    अगदी बरोबर आहे सर.....

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu 29 วันที่ผ่านมา +2

    साहेब आपन युटुब वर वारंवार शेती व तरुण वर्ग बाबत कायमस्वरूपी चर्चा सत्र करावी ही विनंती
    छान माहिती व अनुभव सागीतला बर होहील🎉🎉🎉❤❤❤

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मांडणी केली सत्य वास्तव मांडले धन्यवाद

  • @user-yg8vr1qy8l
    @user-yg8vr1qy8l หลายเดือนก่อน +22

    सुनीलजी केंद्रेकर साहेब बीड ची जनता तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमच्यासारखा इंमादार अधिकारी कोणीच होवूच शकनार नाही.
    महाराष्ट्रात दोनच इंमादार मानसे आहेत.
    1,एक.सुनील केंद्रेकर.
    2,दोन.मनोज जरांगे.

    • @vitthaltidke1928
      @vitthaltidke1928 26 วันที่ผ่านมา

      3)तुकाराम मुंढे

    • @BsfManoj
      @BsfManoj 25 วันที่ผ่านมา

      जरांगे???

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi 19 วันที่ผ่านมา

      Jarange 😂

  • @raghunathdagale206
    @raghunathdagale206 วันที่ผ่านมา

    काय हितकारक विचार आहेत.व्वा.

  • @bibhishanbade8769
    @bibhishanbade8769 หลายเดือนก่อน +2

    प्रशासकीय सेवेमध्ये उत्तम काम करून. कृषिप्रधान असलेल्या भारत देशाचे आपण एक नागरिक आहोत. उत्तम शेती करून सखोल असं मार्गदर्शन केलं खरं तर आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आज शेती क्षेत्रासाठी आहे. धन्यवाद सर

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 หลายเดือนก่อน +7

    केंद्रेकर साहेब तुम्ही शेती या विषयावर मांडलेले विचार आजच्या शेतकरी पोरांनी अंमलात आणले तर नक्कीच शेती क्षेञ प्रगत दिशेकडे वाटचाल करेल

  • @akdraganfruitsfaram5471
    @akdraganfruitsfaram5471 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खरोखर हाडाचे शेतकरी बनलात आज मी शेती करतोय याच मला पण समाधान लाभलं❤

  • @maheshbhadange413
    @maheshbhadange413 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर मार्गदर्शन सरजी,
    आपले अनमोल अनुभव/मार्गदर्शन लिखित स्वरूपात मिळणेस विनंती आहे 💐🙏

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi หลายเดือนก่อน +6

    तुम्ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून आलेला नाही पण हे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण व्यक्त केलेल् मत अतिशय ग्रेटआणि योग्य आहे

  • @nageshgirwalkar448
    @nageshgirwalkar448 26 วันที่ผ่านมา +2

    शेती ही घरतील सर्वात सुशिक्षित मुलाने केली पाहिजे... खोल अभ्यास पाहिजे.... निश्चित उत्पन्न वाढत... जय हो

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 26 วันที่ผ่านมา +1

    सॅल्यूट साहेब तुमच्या कार्याला 👏🏻👏🏻

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 หลายเดือนก่อน +1

    खूप प्रेरणादायी सर सत्य परिस्थिती मांडली. आपल्या सारख्या व्यक्तीला सेवा निवृत्ती घ्यावी लागते हे देशाचे दुर्दैव आहे. सर्व राजकारणी लोकांचा जाहीर निषेध करतो.

  • @busy779
    @busy779 หลายเดือนก่อน +7

    कृषी आयुक्त होते सर पण तिथे हि साहेबांचा पुर्णपणे कार्यकाळ पूर्ण झाला नाही 😢

  • @SureshGhate-sl7hl
    @SureshGhate-sl7hl 25 วันที่ผ่านมา +1

    एक आदर्श व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व सर्वांनी आदर्श घ्यावा एवढ्या उच्चपदस्थ असतानाही किती साधी पणाचं जीवन जगत आहेत सलाम आशा कार्याला

  • @vijaymulekar6073
    @vijaymulekar6073 หลายเดือนก่อน +3

    फारच practical विचार तुम्ही मांडले.

  • @jagannathbhong2055
    @jagannathbhong2055 หลายเดือนก่อน +2

    वास्तव वादी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन.. साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @rajendraunde9590
    @rajendraunde9590 18 วันที่ผ่านมา

    Sir छान, मी 10 वर्षा पूर्वी कृषी अधिकारी साहेबाना भेटलो, त्यांना मी सांगितले मला फळ बाग करायची आहे, माझे सर्व ऐकून घेतले, आणि मला सल्ला दिला, तुम्हाला प्रथम शेत तळे बनवावे लागेल आणि तुमच्यात. जेवढा दम आहे तेवढेच करा ,आमचे कडून काही मदत मिळेल आणि मग तुम्ही काही कराल हि अपेक्षा ठेऊ नका. मी त्यांची आज्ञा मानून आज पावेतो वाटचाल करत आहे, दरवर्षी आठवण मानून त्यांचे आभार मानतो.

  • @shubhambilari104
    @shubhambilari104 หลายเดือนก่อน +3

    पूर्ण समजलं explanation.❤❤❤

  • @govardhanchate1239
    @govardhanchate1239 หลายเดือนก่อน +5

    फारच ऊत्तम माहिती सर.आपल्या सारखा आधिकारी होणे नांही.आपल्या मार्गदर्शना मुळे खरच शेती कडे व्यक्तीशः लक्ष देण्याची स्फूर्ती आली आपल्या सारखा आधिकारी ही शेती करतो यातच सर्व आलं .धन्यवाद सर.
    आपल्या भेटीची आपेक्षा आहे सर.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 หลายเดือนก่อน +2

    सर तुमची बोलण्याची भाषा 100टक्के मराठवाड्यातीलआहे.....❤❤❤

  • @sandeshchavhan-lq4ui
    @sandeshchavhan-lq4ui หลายเดือนก่อน +3

    एकदम परफेक्ट अनुभव..❤

  • @navnathdeshmukh9077
    @navnathdeshmukh9077 28 วันที่ผ่านมา +2

    हे 100%खर आहे की कष्टाचे काम कोणालच नको आहे पण पैसे पहिजेत...पण जो कष्ट करतो त्याला रिकामटेकडे हसतात

  • @hitendraupadhyay2810
    @hitendraupadhyay2810 หลายเดือนก่อน +2

    अतिशय मार्मिक व practical विचार

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 หลายเดือนก่อน +4

    वास्तव साहेब.....
    आपल्यासारखा प्रामाणिक माणुस कृषी व्यवस्थेत हवा .
    आपण दिलेला शेतकरी बंधुसाठीचा अहवाल महत्वाचा होता.

  • @KundlikTaksal-pd2rt
    @KundlikTaksal-pd2rt 24 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर खूप छान माहिती आहे

  • @user-cu7vz3df9b
    @user-cu7vz3df9b หลายเดือนก่อน +1

    सर आपल मार्गदर्शन फारच महत्वाचे आहे. आपल्या असल्याची आंम्हाला फारच गरज आहे. आपण कायम शेतकऱ्यांना सल्ला देत राहावे ही विनंती

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.....

  • @user-fx5rt8xv3t
    @user-fx5rt8xv3t หลายเดือนก่อน +3

    खूप छान मार्गदर्शन मिळाल आज सर 🙏🏿

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 หลายเดือนก่อน +7

    साहेब मुजरा तुम्हांला

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 หลายเดือนก่อน +2

    आपले स्वतःचे अणूभवी शेती विषयक ज्ञान एकदम 👌👌

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 หลายเดือนก่อน +6

    सरांनी खरी प्रस्थितीती मांडलेली आहे

  • @sudhirdhole2106
    @sudhirdhole2106 หลายเดือนก่อน +5

    Thank u sir, asech margadarshan karat Raha aamha shetkaryanna

  • @dhananjayjamdar6595
    @dhananjayjamdar6595 หลายเดือนก่อน +1

    सर खरचं आपण ग्रेट कृषी आयुक्त होतात. सखोल शेतीचे अभ्यासक आणि तेही खरंच आपण अमलात आणता.

  • @sachinpanchal5539
    @sachinpanchal5539 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय केंद्रेकर सर आदर्शवत अधिकारी आहेत आणि आता ते आदर्शवत शेतकरी पण झाले आहेत...असा अधिकारी होणे नाही....

  • @NamdevWagmare-mz7rg
    @NamdevWagmare-mz7rg 19 วันที่ผ่านมา +1

    केंद्रेकर साहेब परभणी ची शान ❤

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 20 วันที่ผ่านมา

    हम तुम्हारे साथ है

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 หลายเดือนก่อน +4

    ग्रेट सर, खुप छान व सत्य माहीती

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 22 วันที่ผ่านมา

    मा.सुनिल केंद्रेकर यांच्या स्वराज्य मध्ये सामील असल्याचे पाहून आनंद वाटला. यापुर्वीच आम्ही आपल्या कडून सेवानिवृत्त पुर्वी बरेच काही मार्गदर्शन घेतले आहे.व स्वराज्य मध्ये मनापासून सामिल झालेलो आहे.आता तर मला स्वराज्य चे काम करायला उर्जा मिळाली आहे

  • @vasantgund3082
    @vasantgund3082 หลายเดือนก่อน +3

    श्रमाचे महत्त्व कृतीतून दाखविणारे.आज अश्या लोकांची व नागरिकांची जरुरी आह़े.केंद्रेकर सर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.तेंव्हा त्यांच्याबरोबर काम करतांना प्रत्यक्षात साइट वर सुद्धा भेटीत असेच चांगले शिकायला मिळाले.धन्यवाद साहेब.

  • @user-hy1oy2cs4m
    @user-hy1oy2cs4m หลายเดือนก่อน +1

    साहेबांनी सांगितलेली माहिती खूप महत्वाची आहे. आणि शेती ह्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी संकल्पना आहे. प्रत्येक तालुक्याच्या शेतकऱ्यांनी एकत्र येवून आपल्या -आपल्या तालुक्यात साहेबांचे शेतीविषयक कार्यशाळा आयोजित केली पाहिजे. जेणेकरून शेती चांगल्याप्रकारे होऊ शकते. आणि माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतात.

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 หลายเดือนก่อน +4

    सत्य परिस्थिती मांडली

  • @vishnukhodve4282
    @vishnukhodve4282 หลายเดือนก่อน +1

    सर, आपण जे चित्र समोर उभं केलंय त्याला तोड नाही.शेतकरी आणि त्यासंदर्भातील इकोसिस्टीम इतक्या सुंदरपणे मांडलीय कि अक्षरशः माझीच इतक्या दिवसाची कामे मला नव्याने समजली..आणि आपल्या या संदेशात एक गोष्ट मात्र निश्चित मिळाली कि इतरांकडे बोट दाखवून हतबलता व्यक्त होण्यापेक्षा स्वतःला परत लढण्यासाठी उद्युक्त होता येतं.
    धन्यवाद शेअर केल्याबद्दल....❤

  • @sambhajijedhe6596
    @sambhajijedhe6596 28 วันที่ผ่านมา +1

    साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @ManishaKhandebharad-ff2oz
    @ManishaKhandebharad-ff2oz 25 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन सर जी

  • @ansaramkale5169
    @ansaramkale5169 26 วันที่ผ่านมา +1

    I agree with you. May God give you long life.

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 หลายเดือนก่อน +1

    अतिशय हुशार अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे.
    जमिनीशी अत्यंत जवळचं नातं जपून शेतकरी आणि त्याची व्यथा जाणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे आदरणीय केंद्रेकर साहेब..!
    साहेब आपण शेती विषयी एवढी आपल्याला जाण आहे ही गोष्ट आम्हाला ऐकून विश्वास सुद्धा बसत नाही.. खूप ग्रेट आहात आपण साहेब.खूप छान मार्गदर्शन.आम्हाला आमची स्वतःची जाणीव यातून झाली आणि आम्हाला यातून आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
    ऐकून खूप टिप्स मिळाल्या.!

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.45 หลายเดือนก่อน +11

    राजे पुण्याचा office लां कदी येणार
    मला पण स्वराज्य चा सदस्य व्हायचे आहे

  • @nnnj4679
    @nnnj4679 25 วันที่ผ่านมา +3

    केंद्रेकर साहेबांनी प्रशासनास चांगल्या प्रकारे शिस्त लावणेचा प्रयत्न केला पण त्यांनी सेवा निवृती पर्यंत संघर्ष करायला पाहिजे होता

  • @satishjoshi6113
    @satishjoshi6113 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सरअनूभव घेऊन माहिती दिली धनवान नमस्कार

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 หลายเดือนก่อน +1

    सर.........अप्रतिम....... खुप दिवसांनी असे अधिकारी घडतात.....

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 29 วันที่ผ่านมา +1

    धुळ्याचे कृषि कुलगुरु, व केंद्रेकर यांची विचार सरणी, शेतीतील आधुनिक अनुभव एकाव्यास मिळाले.

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 16 วันที่ผ่านมา +1

    लेबर प्रॉब्लेम वर यांत्रिकीकरण महत्वाचे आहे त्यासाठी शासकीय अनुदानची गरज आहे

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, सत्य आणि अत्यंत उपयुक्त भाषण.धन्यवाद. सगळ्यांना अन्न, कपडा आणि पाणी सर्वांना हवं. पण त्याला त्याच्या शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही. कारण त्याच्या शेतमालाला खर्च अधिक प्रॉफिट हे तत्व न पाळता. व्यापारी मनमानीपणे भाव ठरवतात आणि शेतकऱ्याला ते मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. कारण माल कापून, transport करून बाजारात आणलेला असतो आणि तो वेळेत विकला नाही तर माल सुकतो खराब होतो, भाव कमी होतो वा माल सडला म्हणून पूर्ण नुकसान होते. त्यापेक्षा मिळेल तो भाव घ्या आणि नशिबाला दोष देत बसतात. बर तो माल पीकविताना त्याने बी, खत ठराविक भावाने घेतलेले असतात, मशागत करतात स्वतः फुकट राबलेला असतो, पाऊस वेळेवर पडणं, पीक तरारून येणं, वाळून जाण हे दैवाधीन तसेच ते जनावर, चोर ह्यापासून वाचलं तर हातात पीक पडत. सगळंच दैवाधीन. पण विक्रेता आणि नोकरीदार ह्यांना फिक्स उत्पन्न वा पगार ठराविक दिवशी मिळतो. तोही शेतकऱ्यापेक्षा किती तरी अधिक. त्याचे भाव वाढले सगळे गपचूप पैसे देतात माल, service घेतात. ते शेतकरी करू शकत नाही कारण माल सुकतो, सडतो त्यावर उपाय काढला तर.. माझ्या मते शेतकऱ्याने माल शेतात असताना विकावा, त्यासाठी व्यापारी बांधावर आला पाहिजे. माल विकला नाही पण काढणं आवश्यक तर तो गोडाउनला जावा तिथेही विकला नाही तर food processing इंडस्ट्रीला pulp paste बनविण्यासाठी गेला पाहिजे, त्याचे भाव विकणारा ठरवतो, शेतकऱ्याच् नुकसान नाही. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक वा अनेक गोडाउन आणि pulp sauce paste बनविणारे कारखाने खासगी क्षेत्रात वा सरकारने काढले पाहिजेत. तेथील नोकरांना नुकसान झालं तर जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे सरकारी नुकसान टळेल. तिसरं कारकून IT engineer ह्यांना लाखो रुपये पगार देण्याऐवजी कष्ट जास्त पगार जास्त असं तत्व हवं. तिसरं शिक्षण घ्या,ऑफिस मध्ये काम करा ही भावना बदलली पाहिजे. चौथ सरकारने योजना ठरवून पैसे वाटण्यापेक्षा जिल्हाधिकारी, तहसीलदार ह्यांना रक्कम द्यावी, त्यांनी आपल्या क्षेत्रात काय हवं हे बघून त्याप्रमाणे खर्च करावं. तेही बँकेत खात्यावर जमा व्हावं. आज मजूर मुजोर का झालेत तर मजूर कमी आहेत 1:18:41 आणि इतर लोक जास्त कमवत आहेत हे ते बघतात. सरकारी कर्मचारी येतात 10.30 ला जातात 5 वाजता, शनिवार रविवारी सुट्टी आणि 2 तास काम करून, तेही मूड असेल तर, पगार लाख रुपये. काढा दिवसाला किती पडतात. Clerk च काम कठीण का शेतकरी, रस्त्यावरचा वडार ह्याचे कष्ट जास्त? तेव्हा भारतात श्रम प्रतिष्ठा जागवली पाहिजे. राजकारण ह्यावर लक्ष ठेवून त्यातला भ्रष्टाचार सम्पवला पाहिजे. त्यासाठी सरकारी नोकराला असलेलं संरक्षण काढलं पाहिजे. तो चुकला द्या हाकलून तरच शिस्त लागेल. पण होतंय काय सामान्य माणूस मत देताना बिनदिक्कत पैसे घेतो, राजकारणी तो वसूल करतो योजना राबवताना आणि तेथे मदत घेतो सरकारी कर्मचाऱ्यांची. त्याने विरोध केला तर बदली. तुकाराम मुंढे च उदाहरण आहेच समोर. काँग्रेसने सगळ्यांना सवय लावली आहे, जियो और जिने दो. मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण ते सिस्टिम बदलू शकणार नाहीत. उलट त्यांनी सवय लावली रेशन फुकट, घर फुकट, गॅस फुकट. कोणी मागितलं नसताना. ते थांबलं पाहिजे. आपली कोर्ट पण अजब आज दावा लावा निकाल यायला लागतात 20 वर्ष तो पण बरोबर असेल असं नाही. केजरीवाल केस मात्र लगेच बोर्डावर लगेच निकाल. हेचं सत्यमेव जयते असावं. आपल्या बद्दल ऐकून होतो आज विचार ऐकले, पटले धन्यवाद आणि स्वतः शेती करताय ह्याबद्दल कौतुक आणि शुभेच्छा 🙏❤️🌹

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t หลายเดือนก่อน +6

    IAS असताना खूप छान काम सरांनी केले होते.