Ti geli tewha rimjhim - Rahul Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2020
  • Original singer and composer Pandit Hridaynath Mangeshkar
    Kavi Grace
  • เพลง

ความคิดเห็น • 814

  • @nilaxividwans5667
    @nilaxividwans5667 2 หลายเดือนก่อน +6

    ती गेली तेव्हां ,ऐकले तेव्हां ,डोळ्यांतुन घळाघळा अश्रू वाहु लागले.कारण ती माझी सखी,सोबती,सांगाती आणि गुरु होती.ग्रेसांचे काव्य आणि राहुलचे गाणे ह्रुदयस्पर्शी झाले आहे.जीओ राहुल हजारों साल,हा आशीर्वाद देते.
    सौ.निलाक्षीमावशी,अथश्री .बाणेर

  • @abhijeetjoshi5058
    @abhijeetjoshi5058 5 หลายเดือนก่อน +7

    'अंगणात गमजले मजला, संपले बालपण माझे' ही ओळ ज्यांनी ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच या दुःखाची कल्पना आहे. आई जेव्हा अचानक काही न सांगता सोडून जाते तेव्हा मुलांचं भावविश्व उद्ध्वस्त होते.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +78

    ग्रेस यांच्या बऱ्याच कवितांमध्ये आई भेटते. या कवितेतील वर्णन मनाला चटका लावून जाते.... पंडित हृदयनाथ यांना काहीतरी दैवी देणगी आहे. ते कवितेला अशी सहज सुरावट देतात की ती जिवंत होते.. तुम्ही अतिशय छान गायलंय, आवाज इतका छान चिंब लागलेला😊 तुम्हाला भावलेले गाणे फार आवडते. तुम्ही गाण्याविषयी जे बोलता कुठेतरी लिहून ठेवायला हवं...
    On your birthday I wish you a very meaningful, fruitful and self rewarding musical journey.. On this path of exploration, may your journey be enlightening 👍💐🎂

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +6

      Thank you 😊

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 2 ปีที่แล้ว +1

      Rahul खूप मोठा हो मला खुप खुप आनंद झाला तुझें हे गाणे ऐकून माझी पण प्रतिक्रिया same Meghe सारखी आहे 🙏🙏

  • @vandanabandivadekar9583
    @vandanabandivadekar9583 ปีที่แล้ว +4

    कवी ग्रेस यांचे मनाला चटका लावणारं गीत व काळीज चिरत जाणारं दुःख
    बाळासाहेब मंगेशकर यांनी दिलेल्या संगीतात जाणवत.
    राहूल, तू खूप सुंदर गायलस.

  • @prakashhartalkar5315
    @prakashhartalkar5315 หลายเดือนก่อน

    ग्रेस उत्तुंग प्रतिभेचा कवी,
    हे काव्य मराठी मनात, आईसाठी कायम राहील, पं. हृदयनाथजी यांनी स्वरबद्ध केलेले हे काव्य भावविवश करते.
    राहुलजी तुम्हीपण भावपुर्ण गायिले आहे.

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 7 วันที่ผ่านมา +2

    राहुल जी काय गाताय? डोळे पाणावले 😢

  • @peednas007
    @peednas007 ปีที่แล้ว +3

    ती गेली...
    आता परत कधीच येणार नाहि..
    आणि परत कधीच येणार नाहि.. तिचे ते शब्द..
    तिची ती कुशी...
    आता परत नाहि..
    आता फक्त सताड आभाळ... वर..
    चांदण्याची चादर घालणारी ती geli

  • @anandgovilkar1660
    @anandgovilkar1660 3 ปีที่แล้ว +5

    मुळातच सुंदर शब्द आणि त्यात अतिशय सुंदर आवाज. डोळे बंद करून, 40 वर्षे आयुष्य मागे सरकले असे वाटले आणि अनेक आठवणी समोर उभ्या राहिल्या. धन्यवाद.

  • @VinodKShah
    @VinodKShah ปีที่แล้ว +4

    मनाला खूपच भावलं...खरंच हे सारं काही शब्दातीत, वर्णनातीत असं आहे. पण ऐकताना डोळ्यात पाणी आलं.. 🙏

  • @swaraj1116
    @swaraj1116 3 ปีที่แล้ว +26

    राहुल दादा सॉरी... मी अंगणात पासून पुढे ऐकू नाही शकली.... माझ्या अश्रूंचा बांध फुटला... आईच्या आठवणीने अस्वस्थ झाले😢
    माफ करा

    • @jyotikshatriya3202
      @jyotikshatriya3202 3 ปีที่แล้ว

      सुंदर गायलास, मला फरक वाटत होता तो म्हणजे भोळ्या भाबड्या मोठ्या भावा ची भावनिक आवाहन आणि धाकट्या लाडाच्या भावाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक डोळ्यात भरून आले आहे,
      ज्योती क्षत्रिय सोलापूर

  • @shubhaiyer1093
    @shubhaiyer1093 2 ปีที่แล้ว +1

    राहुल तू मला माझ्या कोकणातलया घरात नेऊन ठेवलस कारण कंदिल आंगण. आणी पावसाच नीनाद हे फक्त तीथेच अनुभवता येत खुप खूप धन्यवाद

  • @apj5544
    @apj5544 2 ปีที่แล้ว +1

    या चंचल मनाला एका जागी स्थिर करणारा तुमचा आवाज आणि ग्रेसांच्या कवितेचा रसग्रहण करण्याचा निरुपाधिक प्रयत्न.

  • @ashasawant8988
    @ashasawant8988 3 ปีที่แล้ว +10

    राहुल, नेहीप्रमाणेच अप्रतिम..
    मला तुझी गाणी ऐकताना बऱ्याचदा असे वाटते की जसा बाळासाहेबांचा भावसरगम कार्यक्रम होता तसाच तुही असा या pandamics नंतर live program करावास.

  • @prapacific
    @prapacific 3 ปีที่แล้ว +4

    कवी ग्रेस यांचे शब्द आणि तुमचा सुमधुर आवाज, पंडितजीनी बांधलेली सुंदर चाल आणि मागे फक्त keyboard.... सार काही अप्रतीम.

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 ปีที่แล้ว +2

    किती किती सुंदर राहुलजी ! तुमच्या गाण्याबद्दल काय बोलावं आम्ही पामरांनी! हे गाणं भारल्या पहाटे ऐकलं, आत्ता ऐकलं... आणि वाटलं खरंच कुठेतरी पाचोळा उडतोय, रिमझिम पाऊस बरसतोय आणि... आणि तिच्या जाण्याची आर्तता... 👌🙏

  • @sudhirnaik2124
    @sudhirnaik2124 ปีที่แล้ว +1

    Boltoy tasach ga. Kay sundar aani soppa kelay aayushy tumhi Rahul

  • @professork.5895
    @professork.5895 3 ปีที่แล้ว +41

    व्वा:!! आजची सकाळ तू रसाळ केलीस, गंधर्वा. आज तुझा वाढदिवस नि त्यात पुन्हा निव्वळ एका आढवड्यात माझ्यासारख्या सामान्याच्या विनंतीस मान देऊन तू हे सुंदर गीत गायलास; हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योगंच म्हणावा!
    खूप खूप आभार नि शुभेच्छा!🙏
    तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार 🤓 गात रहा...सुरावटिंचं नंदनवन असंच फुलवित रहा...

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 ปีที่แล้ว +2

    राहुल जी तुम्ही गात असता तेंव्हा फक्त ऐकतच राहवेसे वाटते.तुमच्यासोबत गावेसे नाही वाटत इतकं रममाण होतो.तुमच्या मुळेlockdown सुसह्य झालाय.धन्यवाद

  • @nil735a
    @nil735a 23 วันที่ผ่านมา +1

    Fantastic rendition of
    Vaaraaaa saavadh pachola udavit hovtaaa....

  • @chetanbhagat1671
    @chetanbhagat1671 3 ปีที่แล้ว +44

    forefathers created a path & a child gleefully roam on it . . . your rendition made me think so . . . 👍👍👍

  • @kaushikkulkarni4138
    @kaushikkulkarni4138 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम....नितांतसुंदर...❤️
    Would like to hear another Masterpiece ' तू तेव्हा तशी..तू तेव्हा अशी '
    Penned by आरती प्रभू
    Composed and sung by बाळासाहेब मंगेशकर
    आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

  • @tanmaydigraskar7156
    @tanmaydigraskar7156 3 ปีที่แล้ว +3

    ४१वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शास्त्रीय संगीताच्या सेवेकऱ्यांना मिळालेला अनमोल असा दागिना😊🙏 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा राहुल दादा❤️🙏

  • @arankeam
    @arankeam 3 ปีที่แล้ว +2

    पंडित हृदयनाथ मंगेशकर नंतर भिमराव पांचाळे आणि आता राहुल देशपांडे.. प्रत्येक वेळेस नवीन वाटते ही गझल.. अप्रतिम शब्द.. अप्रतिम चाल.. राहुलजी उत्कृष्ठ गायन.. 🙏

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 3 ปีที่แล้ว +2

    नेहमीप्रमाणेच हृदयस्पर्शी... वाह वाह वाह. काही काही जागा इतक्या लोभस होत्या की काय सांगू. आज शब्दात ना गुंतता नुसते सुर ऐकायचे प्रयत्न केला.
    स्वरांचा महाराजा राहुलचे वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप अभिनंदन. अशीच सुरांची वर्षा होत राहो.सरस्वतीचा वरदहस्त सतत असाच डोक्यावर राहो..

  • @sumeghaashutosh2790
    @sumeghaashutosh2790 3 ปีที่แล้ว +4

    आज वेगळंच मार्दव आहे आवाजात. आता हे गाणं,तुमचा स्वर मनात निनादत राहणार.
    वाढत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @nehagugale
    @nehagugale 3 ปีที่แล้ว +8

    This song has such fabulous lyrics!! Thanks to you, our generation is getting exposure to such classic songs which we would have otherwise not heard... Your high notes are classic...

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 3 ปีที่แล้ว +3

    मोहम्मद रफी ची रोमँटिक गाणी , ज्यांचा फील अगदी वेगळा असेल अशी गाणी खूप छान वाटतील तुमच्या आवाजात. Dastak 1975 मधले तुम से कहूं एक बात परों सी .. इतकं तलम आणि सॉफ्ट गाणे आहे. एक एक शब्द त्यांनी अलगद ठेवला आहे.

  • @rajmatipilankar9441
    @rajmatipilankar9441 3 ปีที่แล้ว +2

    भावनांना शब्दांच्या कोंदणात बंद करता येत असतं तर गाणं ऐकल्यावर काय वाटलं ते लिहिता आलं असतं... सहज, सुंदर..शब्दांच्या पलिकडे..

  • @supriyamendki
    @supriyamendki 3 ปีที่แล้ว +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल जी. आमच्या आवडत्या गायकाला मनापासून सदिच्छा. खूप दुर्मिळ असा आवाज आहे तुमचा.

  • @spspp9862
    @spspp9862 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचं गाणं छान झाल पण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्याला तोड नाही.... आणि त्यांच्या आवाजातील गाणं सह्याद्री वरच पाहिलं आहे.. सर्वोत्तम...

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 3 ปีที่แล้ว +1

    राहुल जी,
    काय म्हणू तुमची गायकी, तुमचा आवाज, तुमची अदायगी,
    गीता च्या अनुषंगाने शब्दांचे रागां चे
    भाव भावनां चे विश्लेषण व सिमिलर
    गझलां ची गुण गुण एका वेगळ्याच
    मैफिलीत घेऊन जाते.
    माझ्या भावना फक्त थोडक्यात-
    आप खूब जीये और खूब गायें

  • @abhaymohod1845
    @abhaymohod1845 3 ปีที่แล้ว +2

    माझं सगळ्यात हृदयाच्या जवळचं गाणं सर
    You don't know what I am feeling right now...
    तुम्ही नक्कीच आम्हा लोकांची नस नस ओळखता ...
    आणि तुमच्या कडे फर्माहिष करायची गरजच नाही ...
    आम्हाला फक्त मनात विचार करायला हवा बस...
    आणि लगेच ते ऐकायला मिळतं ..
    बास अजून काय पाहिजे ...
    Thank you...

  • @CR_1609
    @CR_1609 3 ปีที่แล้ว +2

    राहुलजी,
    आधी धन्यवाद देऊ की या दिवसाच्या शुभेच्छा. आज हे गाणं सादर करून तुम्हीच आम्हाला ‘भेट’ दिलीत. माझ्यासारख्या कानसेनांसाठी तुमच्या या विशेष दिनाची खास आठवण...... अजुन काय हवं!
    ही आपल्या आवाजातील कमीतकमी साज सोबत असलेली मैफिल अशीच सदैव फुलत रहावी हीच प्रार्थना आणि आपणांस वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा. 🙏🌹🙏

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 ปีที่แล้ว +4

    शतशः नमन त्या उच्चभ्रूंकरिता ज्यांनी ही रचना रचली 🙏🏻💝🏆🍁

  • @sakharamdeshpande2571
    @sakharamdeshpande2571 3 ปีที่แล้ว +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...मनास खुपच भावले....माझे आवडते गाणे ऐकायला मिळाले.....आनंद होतोय..तुमचे गाणे ऐकणे म्हणजे एक वेगळाच संगितानंदानुभव.....

  • @rekhasuryawanshi1893
    @rekhasuryawanshi1893 2 ปีที่แล้ว +1

    अहाहा केवळ अप्रतीम 👌👏💟

  • @neelatare9755
    @neelatare9755 3 ปีที่แล้ว +2

    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तूं सुंदरच गातोस आणि असं मनमोकळेपणान बोललेले तर मला खूप आवडतं. तूं खूप जवळचा आणि ओळखीचा आहेस असं वाटतं. ती आपलेणाची भावना सुखावून जाते.

  • @vasudhamitragotri2771
    @vasudhamitragotri2771 3 ปีที่แล้ว +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. ह्रदयनाथजींच्या खजिन्यातल्या अनेक रत्नांपैकी एक. या रत्नांचे आम्हाला दर्शन घडवल्या बद्दल अनेक धन्यवाद. तुमचा शांत,तरल आणि ओघवता आवाज आमचा दिवस सुंदर आणि सुरेल करून जातो.

  • @sachinm1659
    @sachinm1659 3 ปีที่แล้ว +2

    प्रिय दादा,
    आज तू माझे सर्वात आवडते गाणे गायलास. त्यासाठी तुझे खूप धन्यवाद.
    मला वाटते हे सर्वचेच आवडते गाणे असावे.
    कवी ग्रीस आणि बाळासाहेब दोघेही खायली किंवा अगदी वेगळ्या विचारांची माणसे आहेत.
    कवी ग्रेसांचे अचूक शब्द आणि त्यावर बाळासाहेबांचे भावपूर्ण संगीत.
    तुझा आवाजात ही ओळ खरंच मनाला भिडते
    अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
    खूप depressing line आहे, पण खरी आहे.
    असाच गात रहा.
    this is kind of recording your life in time , in future i surely want future generation to know you through these videos and era we lived in.
    Thank you so much.

  • @gaitondedurgesh
    @gaitondedurgesh 3 ปีที่แล้ว +2

    राहुलजी , हा उपक्रम फार सुरेख . हि गाणी नेहमीच ऐकत आलोय , तुमच्याकडून त्यांचा विस्तार ऐकताना खूप शीमंत झालो. आपल्याला उदंड यश मिलो. आणि या उपक्रमासाठी वेळ देता येवो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @vaishalibhoite5449
    @vaishalibhoite5449 3 ปีที่แล้ว +2

    वा.... अतिशय निर्मळ... स्वच्छ..... अप्रतिम.....मनाला भावलेलं.... अतुलनीय सादरीकरण..... कृतज्ञता राहुलजी 🙏🙏🙏🙏

  • @rasikwarbhuvan5651
    @rasikwarbhuvan5651 2 ปีที่แล้ว +1

    व्वा ... कान आणि मन तृप्त झाले

  • @ajaymahajan82
    @ajaymahajan82 3 ปีที่แล้ว +2

    ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
    मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
    ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
    त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
    अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
    खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

  • @shantanunagras6440
    @shantanunagras6440 ปีที่แล้ว +3

    Dada, thank you so much! ❤This is so precious! Thank you so much for introducing these classics to us. My life would never be the same without them.

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 3 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!आपलं संगीत असंच फुलत, दरवळत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना!

  • @tusharladukar6493
    @tusharladukar6493 3 ปีที่แล้ว +3

    खूप संदर, या गाण्याकरिता शब्दच नाही आहे कौतुक करण्यासाठी इतकं हे सुरेख आहे. गाण्यातील शब्द जरी तेच असले तरी भावनोपरत्वे नवा अर्थ गवसतो. राहुल दादा तुम्ही खूप छान गाता आणि तुम्ही न ठरवता हे गाणं केलंय यातच वेगळेपण आहे यात मन ही रमत. Every song so sung by you is unplanned and that is what the uniqueness of your singing as it seems and feels to be very natural.
    👌👍👏🤗🙂

  • @anjalikulkarni6758
    @anjalikulkarni6758 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम. असेच आपले गायन दिघर्यकाळ ऐकायला मिळावे ही प्रार्थना.🙏🙏

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 ปีที่แล้ว +1

    तुझिया स्वरांचे चांदणे नित वर्षू दे आम्हावरी।। मनःपूर्वक शुभेच्छा।।

  • @Mithu14062
    @Mithu14062 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ganyache bol ahet ani khup ati sundar tumhi tyala gayle.. dolyatun pani aale aiktana... Mi lahan Astana aai warli mazi.... Tyamule he aikun khup radu aale... Tumcha awaj nehmi kaljala bhidato..mag te prem geet aso wa gazal wa abhang...
    Thank you... Tumhi amha rasikansobt he share karta...welat wel kadhun recordings karta ...tyabaddal khup dhanyawad....🙏

  • @kishorkasture3368
    @kishorkasture3368 3 ปีที่แล้ว +3

    माझी अत्यंत आवडती कविता ❤️❤️❤️
    थँक्स राहुलदा😊💐💐
    मस्त, मस्त आणि मस्त गायलास 😊😊💐

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 ปีที่แล้ว +6

    आईगं...हे गाणं अतिशय हृदयाच्या जवळ आहे...हे गाणं कधी पूर्ण म्हणताच येत नाही कारण कायमच उर दाटून येतो. वाह् सर...शब्दच नाहीत. अत्यंत आभारी आहोत तुमचे हे गाणं तुम्ही सादर केलत. खूप सुंदर आणि मनापासून खूप धन्यवाद. शतशः नमन सर्व मातांना🙏🏻💝🤐🍁

  • @rasikajoshi1514
    @rasikajoshi1514 3 ปีที่แล้ว +1

    Wa Sundar aai che gane

  • @shardaronghe6195
    @shardaronghe6195 5 หลายเดือนก่อน

    Thanks God ,God gave us such super super singer salute to Rahul

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 3 ปีที่แล้ว

    Aai athvan nehmich..khoop surekh gan.. Grace great also you great!!! Kiti bhavpurn gayan ahe tumch .. Dhanyvaad.Aplyala vadhdivsachya khooop shubhechcha.. Stay healthy always.....

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 3 ปีที่แล้ว +3

    Dear Rahul,
    by interpreting this अदभुद कविता & स्वरांकन today, you've once again touched innermost chords in many hearts. I could totally relate this to my mother's departure 52 years ago.
    Proving right what
    श्री साहिर लुधियानवी wrote
    हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उनको
    क्या हुआ आज, ये किस बात पे रोना आया
    कभी ख़ुद पे...
    कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त
    सबको अपनी ही किसी बात पे रोना आया
    कभी ख़ुद पे..
    Very grateful for that

    • @deepa7011
      @deepa7011 3 ปีที่แล้ว +2

      Beautiful.....Some instances of pain , own helplessness , our own reactions to life , not returnable bitter moments , some mistakes ,where time has stood still ....Rahul through his universal language of music takes you there ,back in time and like a good
      psychiatrist , leaves you there to revisit your own emotions ......while still holding your hand to pull you back to the present .Thank you for sharing this beautiful piece .🙏

  • @sumitvjtimahajan2209
    @sumitvjtimahajan2209 2 ปีที่แล้ว +1

    Rahul dada.. faar ch chaan jhalay gaana..
    एक फर्माईश.. संदीप खरेची कविता "नसतेस घरी तु जेव्हा" तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल..

  • @kavitamagdum3440
    @kavitamagdum3440 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, रसाळ गायन...खूप आवडल

  • @advharshaladongare
    @advharshaladongare 3 ปีที่แล้ว +1

    संचित युगायुगांचे एका क्षणी मिळाले!
    खुप मनापासून इच्छा होती ती गेली तेव्हा.. ऐकण्याची आज नकळत पूर्ण झाली वाढदिवस तुमचा आहे पण ही स्वरभेट आम्हाला मिळाली😊 आभार
    वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 3 ปีที่แล้ว +1

    खरं आहे बोलतोस तसा गा हा सल्ला खूप महत्वाचा आहे. असा अजून एक कलाकार पहिला किशोर दा , त्यांची सॅड सॉंग म्हणजे स्टोरी नरेशन " किसका रास्ता देखे.. ए दिल ए सौदाई" अहाहाहाहा

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 3 ปีที่แล้ว +2

    Wad diwsache anek subbecchha Rahulji..🙏🙏...this is a masterpiece by shree Hridaynathjee...khoop iccha hoti tumchya awajat aiknyachi...Dhanyawad Rahulji..🙏🙏

  • @gash765
    @gash765 3 ปีที่แล้ว +1

    आज जरा जास्तच अप्रतिम, कधीची डिमांड होती आणि आज विशेष दिवशी पुरी केलीस, सर्वच भारी त्यात तुझा आवाज,

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, एका सुखद, श्रवणीय, अनपेक्षित धक्क्यासाठी....
    ये गाणं ऐकणं हा नेहमीच "अदभुत" अनुभव असतो. तसाच अनुभव तुमच्याकडून मिळाला. या गाण्यातला तो एक शब्द "होता" याची खूपच सुंदर "मांडणी" केलीत. हा शब्द मला वाटतं या अख्या गाण्याचा "प्राण" आहे. तुम्ही त्यातच अदभुत "चैतन्य" फुंकलं.
    तुम्ही आमचं जगणं "श्री मं त" करता आहात.
    फक्त एक नम्र विनंती की हा उपक्रम कायमच चालू रहावा.

  • @viddyagaonkar115
    @viddyagaonkar115 3 ปีที่แล้ว +3

    Superb Rahul.....eaikavatach rahavas vatat....keep it up dear....
    Waiting for many more...

  • @shrirangjoshi6200
    @shrirangjoshi6200 3 ปีที่แล้ว +1

    Babanchi athwan ali ani tyancha sparsh janawla aiktana.
    Shabd sur ani bhavna purna otlyat Rahul tumhi hyat
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 3 ปีที่แล้ว +1

    बेटा खूप खूप शुभेच्छा .

  • @milind4847
    @milind4847 3 ปีที่แล้ว +3

    Apratim rendition Rahulji! Balasaheb is a legend forever. I had the fortune of attending two of his concerts in the US several years back. One concert was a very small, private one in St Louis - being able to listen, see, and hear him speak about music from few feet away is an experience I will cherish forever. I love the fact that you truly respect these legends - let goddess Sarswati’s blessings be with you forever. Thank you for enriching our lives with your soulful singing!

  • @anandjamsandekar
    @anandjamsandekar 3 ปีที่แล้ว +3

    माझं ऑल टाइम् फेव्हरेट गाणं 👌👌

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 ปีที่แล้ว

    Rahul jee belated Happy birthday🎉🎉🎉🎁🎁🎁🎁, Shatsayu honge aap, Aashirwad hamara

  • @hulyalkar
    @hulyalkar 3 ปีที่แล้ว +1

    राहुल नेहमी प्रमाणे अप्रतिम.
    आज एक फरक जाणवला तो म्हणजे बॅकग्राउंड.
    बसण्याची जागा बदललेल्या मुळे पूर्ण फोकस चेहरा, इन्स्ट्रुमेंट्स यावर येतोय जो मला तरी जास्त आवडला.

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 3 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा राहुलजी💐💐 .....खूपच ह्रदयस्पर्शी झाल हे गाणं ....तुमच्या वाढदिवसाची छान भेट दिलीत तुम्ही आम्हाला🙏🙏

  • @warshamadan8184
    @warshamadan8184 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांची सर्वच गाणी केवळ अप्रतीम आहेत. हे गाणे ऐकताना एका लहान, आई विना मुलाचा, चेहरा डोळ्यासमोर येतो आणी गलबलून जायला होतंय आपल्याच पोराचा चेहरा दिसतो. खूप छान वाटलं हे गाणं ऐकून. धन्यवाद.

  • @sujatapatil8952
    @sujatapatil8952 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी, संगीतातील सुगंध नेहमी
    तुमच्या जीवनात दरवळावा....!!!!
    सुख तुम्हाला मिळावे, दुःख
    तुमच्यापासून कोसभर दूर जावे....!!!!
    सुख, समाधान आणि संगीतातील गोडवा तुमच्या
    जीवनात रहावा....!!!!
    प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
    आनंदाचा यावा....!!!!
    ह्याच वाढदिवसानिमित्त
    शुभेच्छा....!!!!
    गाणे नेहेमीप्रमाणे अप्रतिम झाले आहे 👌👌👌

  • @prabhakarkangutkar1619
    @prabhakarkangutkar1619 3 ปีที่แล้ว +3

    शब्दच नाहीत, अप्रतीम, खुपच छान

  • @sumitdhulap1400
    @sumitdhulap1400 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाणं आहे ग्रेट composition. तुम्ही अप्रतिम गायलं आहे।।

  • @Nil_8
    @Nil_8 3 ปีที่แล้ว +2

    गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या हे संपूर्ण गीत आपल्या आवाजात ऐकण्याची फार इच्छा आहे

  • @MR-fd7px
    @MR-fd7px 3 ปีที่แล้ว +1

    🙏 sir, aplyakdun gayan shiknyachi echha ahe 🙏🙏🙏🙏

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अति सुंदर... तरंगत ठेवलत... ऐकताना कितीतरी वेळा डोळे केव्हा मिटत गेले कळलंच नाही. आपल्या variations ही सुंदर. त्याने मूळ गाण्याला थोडा देखील धक्का लागला नाही. हे गाणे असेच अर्ध्या एक तासाचे करून एक सुंदर मैफिल जमू शकते. शांततेची परिसीमा आहे या गाण्यात.

  • @shrutikaindulkarsyogionlin5035
    @shrutikaindulkarsyogionlin5035 3 ปีที่แล้ว +1

    हृदयाला भिडणारा तुमचा आवाज आणि कवी ग्रेस यांचे शब्द, ऐकताना डोळ्यातून जुन्या आठवणी वाहुलगल्या..... अप्रतिम.....

  • @Transmanialangs
    @Transmanialangs 3 ปีที่แล้ว +1

    व्वा !! राहुल दादा .. बहोत खूब !!!! ग्रेसांच्या कविता म्हणजे एक कोडं असतं, आपल्याला वाटतं उलगडले आहे पण अजिबात थांग लागत नाही; आणि एका क्षणी अवचितपणे कोडं उलगडते आणि आपण हतबुद्ध होतो; आणि अश्या शब्दांना चाल लावणे म्हणजे काय शिवधनुष्य महाराजा!!!! ते काम फक्त बाळासाहेब च करु जाणे. खूप सुंदर गायला आहेस आणि तू राहुल दादा. खूप खूप आभार आणि हो, वाढदिवसाच्या (belated) हार्दिक शुभेच्छा! - प्रसन्न हरणखेडकर

  • @nitinpamkar7888
    @nitinpamkar7888 3 ปีที่แล้ว +1

    Bahut badhiya Sir . . . . .

  • @ramapandit4488
    @ramapandit4488 3 ปีที่แล้ว +2

    राहुलजी, खूप छान.
    कृपया, सुधीर फडके यांचं "माना मानव वा परमेश्वर" हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटेल. खूप सुंदर गीतरचना आहे आणि बापुजींचा आवाज ही.

  • @tigervideo8869
    @tigervideo8869 ปีที่แล้ว +1

    Very nice rahulji

  • @nikhilpatil3590
    @nikhilpatil3590 3 ปีที่แล้ว +2

    राहुल दादा अप्रतिम❤️.....
    जय देव जय देव जय जय शिवराया- वीर सावरकर....
    खूप उपकार होतील ही आरती तुमच्या सुमधुर मुखातून ऐकायला.
    Pls..pls..pls🙏🙏🙏

  • @prashantamberkar2179
    @prashantamberkar2179 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो.थोडे उशीर झाला, आणि माझ्या आवडीचे गाणे आहे हे तुम्ही तुमच्या शैलीत खूप छान व्यक्त केलेत मुळ रचनेत बदल न करता. खुप छान....
    धन्यवाद.

  • @ssd266
    @ssd266 3 ปีที่แล้ว +2

    अंगणात गमले मजला बालपण संपले माझे ..!!!

  • @prasadpadhye1300
    @prasadpadhye1300 3 ปีที่แล้ว

    दैवी गायन....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv3808 3 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Rahul!!!🎉🎉
    किती छान आहे ही कविता आणि तुझ्या विश्लेषणानी तर अजूनच वेगळ्या पद्धतीने कळली..धन्यवाद माझी ही आवडती कविता सादर केलीस, जशी आहे तशीच 🙏🙏🙏😍
    अशीच उतुंग शिखरे पार करत जा , हीच तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना ❤❤

  • @vishalrathi2547
    @vishalrathi2547 ปีที่แล้ว

    Rahulji.... We are fortunate to get to listen to your singing n more importantly your explanation, information.... You know this is making us really rich as a music lover....

  • @mahimasaraf6135
    @mahimasaraf6135 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर , काय शब्द , काय सुंदर गातोस , हृदय ला भिड़तो एक एक शब्द❤️💕
    आजोबा नी , सांगीतिल तसेच गातोस जस काही बोलतो आहे 😃💖
    वाढदिवसा च्य। अनेक अनेक शुभेच्छा, आनंदी रहा, सुखी रहा🎉

  • @sureshsonandkar5425
    @sureshsonandkar5425 3 ปีที่แล้ว +1

    Rahulji... Vaadhdivsache Haardik Abhishtachintan !
    Tumche gaane mhanjie keval swargasukh ! Anant shubhechha !

  • @ketansheth19
    @ketansheth19 3 ปีที่แล้ว +1

    आहाहा!! किती ओघवतं आणि सुंदर 👌👌 अप्रतिम!!!! It's nice to see that, you are feeling better. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂 Wish you a very happy birthday and Thanks for giving so many beautiful moments through your channel♥️♥️👍

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 3 ปีที่แล้ว +1

    वाहवा...क्या बात है.. राहुलजी..!!
    तुमचं असं खास.. सादरीकरण..तुमच्या प्रत्येक सुरांत जसं "भिजलेलं"आहे.. तसेच विचारही..!तुमच्या संगीतमय संवादाची विलक्षण अशी "खुमारी"दर्दी रसिकांनाही नक्कीच आवडतेय हेच सत्य आहे..!
    अशा अनेक सहजमैफलींसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा..!!

  • @meenalkulkarni5043
    @meenalkulkarni5043 3 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Rahulji..we are a great fan of yours...Thankyou very much for allowing us to remember all the melodious songs which you have sung till now...and refreshing us with the memories..Thank you once again..God bless you always 🙏

  • @TheRohya
    @TheRohya 3 ปีที่แล้ว +1

    ले चला जाना.. म्हण ना एकदा.. दोन ओळीच कसल्या म्हटल्या.. पूर्ण गाणं ऐकायची फार फार इच्छा आहे तुझ्या आवाजात..!!

  • @kedarpawar9885
    @kedarpawar9885 3 ปีที่แล้ว +1

    Thank you Rahulji. आमच खरंच भाग्य थोर की आम्हाला हे गाणं पंडितजींच्या आणि आपल्या आवजात ऐकायला मिळालं. अगदी शब्द आणि शब्द हृदयापर्यंत पोहचला. काय बोलू अजून.. हे गाणं ऐकल्यावर फक्त निशब्द झालो.
    खरच खूप खूप धन्यवाद आपण माझी फरमाईश सादर केल्याबद्दल

  • @madhuripatil6680
    @madhuripatil6680 3 ปีที่แล้ว +1

    राहुल
    वाढदिवसानिमित्त अगणित शुभेच्छा
    तव कीर्ती ने उजळल्या दशदिशा 🎂

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha 3 ปีที่แล้ว +1

    पूर्ण जग ठप्प झालं, सर्व सोशल नेटवर्क बंद झाले, दळणवळणाची साधने बंद झाली, संवाद करणे जरी बंद झाले तरी तुझ्यातला गंधर्व तुला स्वस्थ बसू देणार नाही...तू गात होतास, गातोस आणि गात राहशील... कारण तुझ्या शरीरात रक्ताच्या जागी सूर आहेत... अतिशय विनम्रता आहे तुझ्यात दादा... स्वामी तुला हजारो वर्षांचे आयुष्य देवोत... जय गिरनारी...

  • @sousaritabakshi5215
    @sousaritabakshi5215 2 ปีที่แล้ว

    मराठी सारखी छोट्यातले छोटे अनुभूती वेगवेगल्याशब्दात मान्डणारी लवचिकभाषा त्यात कलूपनाविलास त्यावर संगीतकारानेचढवलेला सुरेल साज
    समजून ऊमजून गायलेले गाणे सारेच अद्भूत समसमा संयोग कि जाहला 🙏🌷

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 3 ปีที่แล้ว

    राहूल , वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .......

  • @aparnapanse7394
    @aparnapanse7394 3 ปีที่แล้ว +1

    Kavi Grace hyanchi sunder kavita , tevadhech sunder Hridaynath mangeshkar hyanche music . tumache presentation apratim. tumhi avaghad gane suddha sope karun sangata. soft clarification. itake sunder. I'm speechless. khup khup dhanyavaad .