कमलताई परदेशी यांचा थक्क करणारा प्रवास |kamaltai pardeshi motivation story |Ambika masale | अंबिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2021
  • कसायला जमीन नाही. कुटुंबाचे पोट भरायचे तर रोज उठून मोल मजुरीने दुसऱ्याच्या शेतात राबायचे. मरमर कष्ट करायचे आणि जगायचे. भविष्यात काय वाढले आहे काय नाही? याची सदोदित चिंता असायची. घरात अठरा विश्व दारिद्र. अशातच बालपणी त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी कधीच अट्टाहास केलेला नव्हता. तरीही एक असामान्य जिद्द धरित त्यांनी दारिद्रय रेषे खालील कुटुंबातील महिलांना एकत्र करीत "अंबिका महिला बचत गट" निर्माण करण्याची एक योजना आखली आणि यशस्वी केलीही.
    कधीच हाती पाटी-पेन्सिल हाती न घेतलेली 'ती' अशिक्षित महिला आज सुशिक्षित महिलांना रोजगाराची गुरुकिल्ली देत आहे. आत्मसंन्मान प्राप्त करुन देणाऱ्या या देशपातळी वरील कदाचित पहिल्या सबला महिला असाव्यात.या सबलेचे नाव आहे कमलताई शंकर परदेशी. मु. पो. खुटबाव ता. दौंड, जि. पुणे हा त्यांचा रहिवाशी पत्ता. त्यांनी आपल्यातील नेतृत्व गुण आधीच ओळखले आणि आपण जरी सुशिक्षित नसलो तरी अन्य महिला भगिनींना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करुन द्यावा असा मनोनिश्चय करीत अंबिका महीला बचत गटाची स्थापना 3 नोव्हेंबर 2004 साली केली. याच माध्यमातुन महीलांना आत्मसन्मान मिळवुन देणारा मसाला उद्योग उभा करुन बचत गटाचा वेलु कारखाना उभा करुन दाखविला.
    कमलताई परदेशी यांनी शिक्षणाचा गंध नसतानाही महीलांना एकत्र करुन बचत गटाच्या माध्यमातून एक वेगळे विश्व निर्माण केले.या विश्वाची व्याप्ती आणि तीचा पसारा आज वाढत चालला आहे.कमलताई परदेशी यांना आजपर्यंत जवळ जवळ ५६ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. माजी राष्ट्रपती मा.प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आहे.
    अंबिका मसाला भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील प्रसिध्द झाला आहे. भारताबाहेरच्या लोकांना या मसाल्याची आवड निर्माण झाली आहे. यशस्विनी अभियान आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून अंबिका बचत गट भरारी घेत आहे. हा उद्याेग दिवसेंदिवस वाढत आहे या महीला बचत गटाचा हा उद्योग मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध झाले तर अजुन वाढेल यात शंका नाही.
    आज मुंबईतील बिगबाझार आणि इतर अनेक मोठ्या स्टोअर्स मध्ये या मसाला उत्पादनास मोठी मागणी आहे.32 प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन हा महीला कारखाना निर्माण करत आहे. कमल तांईनी आपल्या गटातील महिलांच्या कर्तुत्वाच्या जोरावर एक नवा अध्याय बचत गटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरानी लिहिला आहे.
    The story of a 55-year-old Kamaltai Pardeshi from Daund is enough to inspire a movie on her. This lady from a village of Kutbao rose from being a farm labourer to establish a Rs7-crore factory funded by NABARD. If not laying foundation for her business ventures, then Pardeshi is busy helping women and farmers become self-dependent. Her latest act being helping farmers' wives from Pune to set-up a food stall in an ongoing exhibition in Thane.
    Born in 1961 in a poor family, Pardeshi is the youngest of her four siblings. Since her parents were poor, she, along with her three brothers, received no education. "I started working with my mother on our farm at 12 and after I got married, I worked on my husband's farm," said Pardeshi, who is in Thane with her masala (spice) stalls at the Maharashtra Bazarpeth exhibition held at Gaodevi ground in Thane west, which will go on till April 24.
    Since her husband's farm was a barren land, they took to tilling on other farms to make ends meet. But her calling to work for the society from her childhood days made her inquisitive and explore the world of business that could also empower others. "I learnt about mahila bachat gat (women savings group) and for the first time stepped into a bank to open an account," she added.
    Though sceptical about opening the bank as she was not sure if she would be considered worthy to open one, she was taken by surprise when the bank staff replied in the affirmative. "It was me and nine other women and we received a loan of Rs10 lakh from Maharashtra bank to start our business," she said.
    With just Rs 300 in her pocket and the will to improve her family's condition, which includes her three daughters, she opened asmall masala manufacturing unit in 2000. Almost close to two decades, today she runs a factory with 200 women and is in talks with National Bank for Agriculture and Rural Development (Nabard) to start her masala factory.
    "My dream is to export organic masalas abroad, where raw materials will be sourced from farmers," she explained
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - sandy_n_yadav?i...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #मसाला _यशोगाथा
    #मसाला बिजनेस _कैसे शुर_ करें
    #मसाला बिजनेस आइडिया
    #मसाला बिजनेस कैसे करें
    #मसाले बिजनेस
    #मसाला_ बिज़नेस
    #masala udyog marathi
    #masala business success story
    #masala udyog success story
    #chawadi udyog
    #masala udyog
    #masala udyog training
    #masala udyog kaise kare in hindi
    #masala udyog machine
    #masala udyog licence
    #masala udyog marathi
    #masala udyog ki puri jankari
    #masala udyog business
    #masala udyog kaise shuru karen
    #masala udyog machine price
    #masala udyog success story
    #masala udyog ki jankari
    #masala udyog ke liye machine
    #masala udyog marketing
  • บันเทิง

ความคิดเห็น • 320

  • @sharadachoudhary5500
    @sharadachoudhary5500 2 ปีที่แล้ว +5

    कमलताई अक्षराशी तोंडओळख नसतानाही , फक्त कष्ट , जिद्द व सचोटीच्या जोरावर जे कमवलंय त्याला तोड नाही , हे पदवीधर स्रियांनाही जमणे अवघड आहे , तुमचा आदर्श आम्हालाही प्रेरणादायी आहे 🙏👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @malharnavalkar5711
    @malharnavalkar5711 3 ปีที่แล้ว +9

    सलाम तुमच्या कर्तुत्वाला ,असेच पुढे यश लाभो . आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच माता अंबिका चरणी प्रार्थना

  • @babasahebaage4712
    @babasahebaage4712 3 ปีที่แล้ว +8

    यादव सर, तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडीओ बनवता त्यामुळे त्या त्या उद्योगांना प्रसिद्धी तर मिळतेच पण , आपल्या व्हिडीओ मधून नवोद्योजकांना प्रेरणा मिळते.
    आपल्या कामाला सलाम.

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 ปีที่แล้ว +18

    कमलताई यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.फार छान प्रगती केली. 🌹🌹🌹🙏

  • @truefriendganeshdeshmukh1823
    @truefriendganeshdeshmukh1823 3 ปีที่แล้ว +3

    प्रशंसनिय ताई....सलाम

  • @bharatikarandikar8028
    @bharatikarandikar8028 3 ปีที่แล้ว +6

    भाऊ,तुम्ही एक महान व्यक्तिमत्व समाजासमोर आणले. ताईंना शतशः नमन.

  • @JOB_MH20
    @JOB_MH20 ปีที่แล้ว +1

    कमलताई तुमच्या कार्यास सलाम शून्यातून जग निर्माण केलं आणि आम्हाला तुमच्या कार्यातून प्रेरणा मिळाली ,सर तुम्हाला मनापासून धन्यवाद असेच प्रेरणादायी विडिओ बनवत जा ❤❤❤❤

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 3 ปีที่แล้ว +10

    श्युन्यातुन विस्व निर्माण करने याला म्हणतात,ह्या तुमच्या आदी शक्तीला श्रीत्वाला मानाचा मुजरा,तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होओ हिच शुभेच्छा

  • @crazytime2285
    @crazytime2285 3 ปีที่แล้ว +7

    जिद्द व चिकाटी च्या जोरावर मोठमोठी शिखर गाठता येतात हे या सावित्रीबाई ने दाखवून दिल
    खूप छान संदीप भाऊ

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 3 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच कमल ताई परदेशी यांची जिद्द चिकाटी यांच्या जोरावर जे काही उद्योग व्यवसाय सुरू केले आहे ते खरोखर इतर महिलांना प्रेरणादायी ठरण्याचे आहे त्यांच्या या यशस्वी उद्योगाला नमस्कार

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 3 ปีที่แล้ว +14

    ग्रेट वर्क सर तुम्ही राव खूप प्रेरणादायी व्हिडिओ बनवता, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ❤️❤️

  • @SwapnilMachkar
    @SwapnilMachkar 2 วันที่ผ่านมา

    कमल ताईंनी खूप छानच कामगिरी केलेली आह कमल ताईंना माझा मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 ปีที่แล้ว +8

    Such masala business required only Purity for quality. Kamaltai is done honestly.👏👏Thanks to Supriya tai 👏

  • @ratannavale
    @ratannavale 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही यादव सर तुम्ही छान पद्धतीने घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देता... खुप छान..मी पण घरगुती व्यवसाय करते डाळीचे सांडगे आणि काळा मसाला बनवते❤❤

  • @SpecialDish
    @SpecialDish 3 ปีที่แล้ว +63

    खरच आदर्श घेण्यासारख आहे 🙏🙏🙏

  • @smarathi6740
    @smarathi6740 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान सर नक्कीच प्रेरणा मिळेल खुप खुप धन्यवाद . अजुन अशाच स्टोरीज दाखवा.

  • @sunilgawai5861
    @sunilgawai5861 4 หลายเดือนก่อน

    Kamal Tai यांना माझा मनापासून अभिनंदन 🎉💐

  • @RoHitSanapallregions
    @RoHitSanapallregions 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर खुप खुप खुप म्हणजे खूपच अभिमानस्पद ,
    तुमची ही कामगिरी आजच्या तरुण आणि युवा उद्योजकांच्या गालावर जोरदार चपराक आहे ज्यांना सर्व सर्व कही उपलब्ध असतांनाही नेहमी रडत असणारे, काही न काही कमतरता भासवून घेनारे,
    आणि तुम्ही शिक्षण नसताना, तुम्हाला कोणाचीही साथ नसताना , भांडवल नसताना, मार्गदर्शन नसताना, इतकी मोठी मजल मारलीत, खर तर शब्दच नाहीत तुमच्या कौतुकासाठी , फक्त मनापासून सैल्युट।।
    आई अंबिका तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर असाच वाढवत राहो आणि तिचा आशीर्वाद तुमच्या सोबत सदैव राहो हीच तिच्या चरनी प्रार्थना।।।।

  • @nitingodase5926
    @nitingodase5926 3 ปีที่แล้ว +3

    खुपच प्रेरणादायक प्रवास आहे...

  • @vaibhavdesai4922
    @vaibhavdesai4922 ปีที่แล้ว +2

    15:44 कमलताई यांची जिद्द, मेहनत व सुप्रियाताई सुळे यांचा मोलाचा वाटा खरचं कौतुक आहे.

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या अनिश्चित, निराशाजनक काळात आणि वातावरणात माझ्यासारख्या मुंबईतल्या गृहिणीला तुमचे व्हिडिओ बघून सकारात्मक वाटणं हेच या चॅनेलचं यश आहे. Keep it up!!

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว

      आजचा व्हिडिओ पाहिला का?

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 ปีที่แล้ว +3

    कमलताई सारख्या अनेक कमलताई महाराष्ट्र त घडल्या पाहिजे एक आदर्श आहे

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan kamal tai

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +7

    मित्रा काकींला मनापासून सलाम

  • @surekhakadam2701
    @surekhakadam2701 3 ปีที่แล้ว +5

    कमलताई तुमच्या जिद्यीला सलाम

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 3 ปีที่แล้ว +5

    कमलताई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @bandulokhande9669
    @bandulokhande9669 3 ปีที่แล้ว +1

    कमलताई पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @kalindigosavi992
    @kalindigosavi992 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान विचार करून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न छान आहे

  • @devidaskharat5416
    @devidaskharat5416 3 ปีที่แล้ว +3

    समाजासमोर हा फारमोठा आदर्श आहे.

  • @gopalbhosale488
    @gopalbhosale488 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान!
    कमल ताईंचा यशस्वी होण्याचा प्रवास खरच सलाम करण्यासारखा आहे.
    आज मला कळले की जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शिक्षणाचीच गरज नसते. एकेकाळी शेतात आठ रुपये रोजाने काम करणारी महिला आज करोडोचा व्यवसाय चालविते, खरच ग्रेट कामगिरी आहे ही ...

  • @aartimancharkar8504
    @aartimancharkar8504 3 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांना प्रेरणादायी आहे ... सलाम तुमच्या कार्याला ....

  • @short7648
    @short7648 10 หลายเดือนก่อน +1

    Great aajii

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान चॅनल फार उशीरा बघायला मिळाले. असं चॅनल शहरातल्या मुलांनी सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. घरातले डेली व्लॉग बघण्यापेक्षा हे खूप स्फुर्तीदायक आहे.

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 2 ปีที่แล้ว +1

    Sir Mast mhayti ashech video banvat rha

  • @vinayakdhage3721
    @vinayakdhage3721 3 ปีที่แล้ว +4

    खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा

  • @dadajisonawane8399
    @dadajisonawane8399 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान काकुचया कर्तुतवाला सलांम🙏🙏👌👌💐🌹

  • @prabhakamble1567
    @prabhakamble1567 3 ปีที่แล้ว +2

    Salute aahe tumhala kamal Pardeshi madam,Kharach tumch English pronounsation aikun dolyat ashru aalet.Ek shetmajur Kay Kari shaktat..he prove kelay tumhala aani tumchya sampoorn Ambika team LA Manacha Mujra...

  • @vishalgadekar7312
    @vishalgadekar7312 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sadashivhade4179
    @sadashivhade4179 3 ปีที่แล้ว +6

    तुमच्या प्रत्येक विडिओ ने नवीन प्रेरणा मिळते .

  • @vikramjadhav1506
    @vikramjadhav1506 2 ปีที่แล้ว +2

    Suuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuper

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 3 ปีที่แล้ว +2

    छान सर फारच सुंदर आणि सुमधूर माहीती दिली.सर
    👌👌👌💐💐💐

  • @dipakdeshmukhdeshmukh1347
    @dipakdeshmukhdeshmukh1347 3 ปีที่แล้ว +2

    Mavshi tumache khup Abhinandan ani dada tumache manapasun aabhar.

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

  • @ujjwalasapkale162
    @ujjwalasapkale162 3 ปีที่แล้ว +4

    माझा निनाद मसाले म्हणून माझा व्यवसाय आहे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे....,

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 2 ปีที่แล้ว +1

    Very nice kamla mavshi...🙏🙏🙏
    Kharach tumcha aadarsh ghyalach hava🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sonakshidancer9876
    @Sonakshidancer9876 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @vardhanic8862
    @vardhanic8862 3 ปีที่แล้ว +5

    Nice to hear the successful story of Kamlatai Pardeshi,motivating,inspiring.Hard working,courage to move ahead.God bless her,good work.🙏

  • @abhawaghmare7189
    @abhawaghmare7189 3 ปีที่แล้ว +4

    So inspiring journey......Hats off to you Kamaltai...

  • @romanove1
    @romanove1 ปีที่แล้ว

    Truly inspirational...!!!
    amazing

  • @rajumule3770
    @rajumule3770 3 ปีที่แล้ว +3

    खूप प्रेरणादायी प्रवास आहे,, तुमच्या सारख्या खूप कमलताई या महाराष्ट्रात निर्माण होवोत

    • @sanjanamulik4121
      @sanjanamulik4121 2 ปีที่แล้ว

      अशा स्टोरी ऐकून आम्हाला प्रेरणा मिळते. कमला ताईना सलाम 💐💐

  • @samulfpc.01
    @samulfpc.01 3 ปีที่แล้ว +1

    कमल ताई खूप खूप अभिनंदन तुमच्या आपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील विठ्ठल चरणी प्रार्थना बालाजी गाडेकर पंढरपूर

  • @anonymous-us5dz
    @anonymous-us5dz 3 ปีที่แล้ว +1

    Kiti mast mahiti sangitli kamla tai ni. KHUP KHUP AABHAR.

  • @rohini4299
    @rohini4299 3 ปีที่แล้ว +8

    Salute to such ladies who are doing such exceptional work ... Motivational to many educated ladies too ... If this uneducated lady can do this then other ladies can stand strong

  • @anushkasart8581
    @anushkasart8581 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान प्रेरणादायी मार्गदर्शक करा

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +2

    👍खूप छान आहे.अभिनंदन 🙏🙏

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 3 ปีที่แล้ว +22

    मला हेच कळत नाही १॰६ डिसलाईक करणारे कोण आहेत???आणि ह्या व्हिडिओ मधे डिसलाईक करण्यासारखं काय आहे???ऊलट हे सर्व प्रचंड प्रेरणादायीआहे!!!मला वाटतं,ह्या अनपढ,महिलेनी एवढी झेप घेतली हेच त्यांना रुचलेलं नसाव!!!

    • @shahus4822
      @shahus4822 3 ปีที่แล้ว +2

      ती बांडगुळ माणसे आपणच ओळखून घ्यावं...किती कीती प्रेरणादायी काम केले आहे या मावशीनं ,अतिशय तळागाळातील अशिक्षित महिलांनी व्यवसाय करणे म्हणजे खायचे काम नाही,

    • @kokanfunwithanil8520
      @kokanfunwithanil8520 3 ปีที่แล้ว

      ग्रेट मावशी

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 3 ปีที่แล้ว

      Right 👌👌👍👍

  • @vijayadeshmukh9143
    @vijayadeshmukh9143 3 ปีที่แล้ว +2

    Anubhav aani chikati
    Great mavshi aamchya shubhecha kayam tumchya sobat aahet

  • @bharatishelke3793
    @bharatishelke3793 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @yadhavdeshmukh5431
    @yadhavdeshmukh5431 4 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागातील होतकरू महिलांनी बचत गटामार्फत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी निश्चित कमलताई चे अनुभव व मोलाचे मार्गदर्शन ठरेल

  • @kartikwalukar655
    @kartikwalukar655 3 ปีที่แล้ว +1

    खुप प्रेरणादायी प्रवास ताई

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 3 ปีที่แล้ว +17

    ज्या तरुण शिक्षित पिढीला वाटत की buisness हा रिस्क आहे , त्यांच्या साठी कमल ताई खऱ्या rolemodel आहेत.

  • @priyankachougule4334
    @priyankachougule4334 3 ปีที่แล้ว +4

    खूप प्रेरणादायी! सगळ्या चुकीचे विचार खोडन काढले उद्योगा बाबतचे ...शिक्षण आणि लूक आणि posh राहण्याची नाही तर मनापासून काम करायची इच्छा पाहिजे👏...

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 3 ปีที่แล้ว +1

    अद्भुत अविश्वसनीय

  • @swatipawar1853
    @swatipawar1853 3 ปีที่แล้ว +1

    Aai khup chaan Hats ups🙏🙏🙏🙏🙏

  • @vanitasable1979
    @vanitasable1979 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान मावशी तुमच्या कामाला सलाम

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 3 ปีที่แล้ว +2

    फारच प्रेरणादायी कहाणी. सँडी असेच शून्यातून वर आलेल्या लोकांना प्रसिद्धी मिळवून दे . आणी इतरांना प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ बनव . शुभेच्छा

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว +14

    या व्हिडिओ तरुणी आणि महिलांपर्यंत पोचवा..
    कमलताई परदेशी यांचा भन्नाट प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरला का ?

    • @sharadjaybhaye1362
      @sharadjaybhaye1362 3 ปีที่แล้ว +1

      Dada supper bhai

    • @ashokbhansali7283
      @ashokbhansali7283 3 ปีที่แล้ว +1

      Very inspiring story. Please give contact number . I am a diamond merchant from Mumbai

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว

      Cal me 8652149898

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 3 ปีที่แล้ว

      Sandy Dada Gavala Rahun Konta Changla Udhyog Karu Shakto Ka Tya Badal Mahiti Havi Aahe ......

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 3 ปีที่แล้ว

      Tai Ni Khup Ch 0 Pasun Survat Keli Aahe

  • @munjajiwaghmare4246
    @munjajiwaghmare4246 2 ปีที่แล้ว

    Nice great कमलताई तुमचा बिझिनेस

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan tai

  • @ms21worldsknowledgevlogs87
    @ms21worldsknowledgevlogs87 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @nalinigayakawad4846
    @nalinigayakawad4846 3 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रात कोठेही आपन डिलरसिप देऊ शक्तो
    अंबिका मसाले

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन ताई

  • @vandanadeshmukh5121
    @vandanadeshmukh5121 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan aaji. Salam
    Maza hi masale and lobache udyog aahe

  • @idasakidas8168
    @idasakidas8168 3 ปีที่แล้ว +1

    Motivating and very inspiring video.

  • @gajanansdhone3213
    @gajanansdhone3213 3 ปีที่แล้ว +1

    Wonderful.....

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad7574 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan idea ahe pardeshi madam tumche khup abhinan

  • @amitvaidya1720
    @amitvaidya1720 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan Kamal Tai... Tumchya yashasvi watchalila shubhecha...😊❤️

  • @praveenst9535
    @praveenst9535 3 ปีที่แล้ว +2

    Hats up

  • @krishived
    @krishived 3 ปีที่แล้ว +2

    प्रेरणादायी प्रवास

  • @addhyaawghade6318
    @addhyaawghade6318 3 ปีที่แล้ว +1

    Jabrdasta kamal Tai 👍👏👏👏

  • @devidasshinde8959
    @devidasshinde8959 3 ปีที่แล้ว +1

    Abhinandan tai

  • @gauriesfoodcraft
    @gauriesfoodcraft 3 ปีที่แล้ว +1

    Inspired👍

  • @ujawalaralebhat6073
    @ujawalaralebhat6073 3 ปีที่แล้ว +1

    Khup chann watale ikun khup changlee

  • @somnathgangawane1580
    @somnathgangawane1580 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान .....👌

  • @rajeshgatkepod109
    @rajeshgatkepod109 3 ปีที่แล้ว +2

    Great work mi ek mahila business women aahe kamaltai jindabad

  • @prathameshparab9778
    @prathameshparab9778 3 ปีที่แล้ว +1

    great work kaki aani dada tuzi hi

  • @asmeesvlogs2894
    @asmeesvlogs2894 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder Namaskar hya bai na ...khup chan

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 3 ปีที่แล้ว +1

    salam tai

  • @kuldeepbhagat9724
    @kuldeepbhagat9724 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ कमल ताई

  • @ganeshmore8855
    @ganeshmore8855 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan ahe

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 3 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान

  • @moredipali22
    @moredipali22 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video....

  • @SantoshDKadam-ok7fj
    @SantoshDKadam-ok7fj 3 ปีที่แล้ว

    Great work

  • @rajashrichiniwala8184
    @rajashrichiniwala8184 3 ปีที่แล้ว +2

    Good job. Saluet to you.🙏

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 3 ปีที่แล้ว +1

    Good information .

  • @ABK9960
    @ABK9960 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे खुप छान

  • @aanantachintamani2496
    @aanantachintamani2496 3 ปีที่แล้ว +1

    Kharch khup chan

  • @miaaimotherandbabycare
    @miaaimotherandbabycare 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan salute

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 3 ปีที่แล้ว +3

    Great support for geart people from NCP

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 3 ปีที่แล้ว +3

    Salam tumchya jidila ani karyala 👍👍🙏🙏🙏