Abhang Kanhoba Tuzi Ghongadi BJ

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 12

  • @wvrujendra
    @wvrujendra 5 ปีที่แล้ว +11

    भारुड
    घोंगडी
    कान्होबा तुझी घोंगडी चांगली! आम्हांसी का दिली वांगुली रे!!१!!
    स्वगत सच्चिदानंदे मिळोनि शुद्धसत्वगुणे विणली रे!
    षडगुण गोंडे रत्नजडित तुज शामसुंदरा शोभिली रे!!२!!
    काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे!
    रक्त रेत दुर्गंधी जंतछ नरक मुताने भरली रे!३!
    षड्विकार षड्वैरी मिळोनि तापत्रयाने विणली रे!
    नवा ठायी फाटुनी ती त्वां आम्हांसी दिधली रे!४!
    ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गातासंदेह वृत्ती विरली रे!
    बापरखुमादेवीवरू विठ्ठले तत्पदी मुरली रे!!५!!
    या अभंगातील घोंगडी म्हणजे शरीर.घोंगडी या रुपकातून श्री ज्ञानेश्वर महाराज जीवाची बाजू देवापुढे प्रेमाने भांडून मांडतात.पंचमहाभूतांची नाशवंत शरीररुपी घोंगडी धारण केलेल्या जीवांची वकीली करताना ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात,हे कृष्णा!तुझी अविद्योपाधिरहित शुद्ध चैतन्यरुप शरीर असलेली घोंगडी किती चांगली आहे.स्वत: स चांगली घोंगडी घेतली आणि आम्हांस मात्र ही पंचमहाभूतांची ओंगळ घोंगडी का दिलीस रे?
    तुझी शुद्ध सत्वप्रधान घोंगडी सच्चिदानंदाशी मिळून सत्वगुणप्रधान मायेच्या योगाने विणली आहे.तुझ्या या घोंगडीला यश, श्री, औदार्य,ज्ञान, वैराग्य, ऐश्र्वर्य हे सहा सद्गुणांचे रत्नखचित गोंडे लावलेले आहेत.त्यामुळे कान्होबा तुझी घोंगडी तुला चांगली शोभून दिसत आहे की रे!
    परंतु आमची घोंगडी मात्र काम,कर्म,अविद्या,तसेच रज,तम,सत्व या त्रिगुणांनी तसेच पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश ही पंचमहाभूते यांनी विणलेली आहे.आणखी काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर इत्यादी सहा शत्रू व आध्यात्मिक_ आधिभौतिक आणि आधिदैविक या त्रिविध तापांनी देखिल विणलेली आहे.
    अशी ही आमची घोंगडी रक्त,रेत, दुर्गंधी,जंतू,नरक,मूत यांनी भरलेली आहे व ती नऊ इंद्रियांचे ठिकाणी फाटून गेली आहे.आमची घोंगडी मात्र ओंगळ व तुझी मात्र चांगली असे का बरे?
    देवाशी वाद घालता घालता ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आले की ऋषीमुनींनी देवाच्या ध्यान चिंतनाने स्वत:ची घोंगडी शुद्ध करुन घेतली आहे.आणि हे सर्वांना करता येते.त्याबाबत संशय दूर झाल्यावर ते देवाशी वाद न घालता देवास म्हणतात की, ऋषीमुनींनी तुझे ध्यान करुन व नाम गाऊन वृत्ती तुझ्या चरणी लीन केल्यामुळे ते ही तुझ्याप्रमाणे शुद्ध बनले.मी देखील त्यांनाच अनुसरेन व ब्रम्हरुप बनेन.आणि मग माझी अशुद्ध घोंगडी तुझ्या ध्यान व नाम चिंतनाने तुझ्या घोंगडी सारखी शुद्ध होईल.
    विठ्ठल विठ्ठल जय हरी!! सौ.हेमा पाटील.

    • @bagulm123
      @bagulm123 2 ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @vtgokhale
      @vtgokhale 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद... सोप्या शब्दात अर्थ सांगितलात

  • @santoshsakpal1976
    @santoshsakpal1976 6 ปีที่แล้ว

    सुंदर..सुंदर...सुंदर....आणि फक्त सुंदर......

  • @rohitpendse4606
    @rohitpendse4606 5 ปีที่แล้ว +1

    Ears have been satisfied

  • @sitarammhatre4043
    @sitarammhatre4043 5 ปีที่แล้ว

    फारच सुंदर अभंग

    • @shinde5128
      @shinde5128 5 ปีที่แล้ว

      अप्रतीम 👌

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 6 ปีที่แล้ว

    पंडित.... तानसेन...🙏🙏🙏

  • @babangaikwad118
    @babangaikwad118 6 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @rohitpendse4606
    @rohitpendse4606 5 ปีที่แล้ว +1

    Can anybody add lyrics?

    • @wvrujendra
      @wvrujendra 5 ปีที่แล้ว +1

      #भारुड
      घोंगडी
      कान्होबा तुझी घोंगडी चांगली! आम्हांसी का दिली वांगुली रे!!१!!
      स्वगत सच्चिदानंदे मिळोनि शुद्धसत्वगुणे विणली रे!
      षडगुण गोंडे रत्नजडित तुज शामसुंदरा शोभिली रे!!२!!
      काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे!
      रक्त रेत दुर्गंधी जंतछ नरक मुताने भरली रे!३!
      षड्विकार षड्वैरी मिळोनि तापत्रयाने विणली रे!
      नवा ठायी फाटुनी ती त्वां आम्हांसी दिधली रे!४!
      ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गातासंदेह वृत्ती विरली रे!
      बापरखुमादेवीवरू विठ्ठले तत्पदी मुरली रे!!५!!
      या अभंगातील घोंगडी म्हणजे शरीर.घोंगडी या रुपकातून श्री ज्ञानेश्वर महाराज जीवाची बाजू देवापुढे प्रेमाने भांडून मांडतात.पंचमहाभूतांची नाशवंत शरीररुपी घोंगडी धारण केलेल्या जीवांची वकीली करताना ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात,हे कृष्णा!तुझी अविद्योपाधिरहित शुद्ध चैतन्यरुप शरीर असलेली घोंगडी किती चांगली आहे.स्वत: स चांगली घोंगडी घेतली आणि आम्हांस मात्र ही पंचमहाभूतांची ओंगळ घोंगडी का दिलीस रे?
      तुझी शुद्ध सत्वप्रधान घोंगडी सच्चिदानंदाशी मिळून सत्वगुणप्रधान मायेच्या योगाने विणली आहे.तुझ्या या घोंगडीला यश, श्री, औदार्य,ज्ञान, वैराग्य, ऐश्र्वर्य हे सहा सद्गुणांचे रत्नखचित गोंडे लावलेले आहेत.त्यामुळे कान्होबा तुझी घोंगडी तुला चांगली शोभून दिसत आहे की रे!
      परंतु आमची घोंगडी मात्र काम,कर्म,अविद्या,तसेच रज,तम,सत्व या त्रिगुणांनी तसेच पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश ही पंचमहाभूते यांनी विणलेली आहे.आणखी काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर इत्यादी सहा शत्रू व आध्यात्मिक_ आधिभौतिक आणि आधिदैविक या त्रिविध तापांनी देखिल विणलेली आहे.
      अशी ही आमची घोंगडी रक्त,रेत, दुर्गंधी,जंतू,नरक,मूत यांनी भरलेली आहे व ती नऊ इंद्रियांचे ठिकाणी फाटून गेली आहे.आमची घोंगडी मात्र ओंगळ व तुझी मात्र चांगली असे का बरे?
      देवाशी वाद घालता घालता ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आले की ऋषीमुनींनी देवाच्या ध्यान चिंतनाने स्वत:ची घोंगडी शुद्ध करुन घेतली आहे.आणि हे सर्वांना करता येते.त्याबाबत संशय दूर झाल्यावर ते देवाशी वाद न घालता देवास म्हणतात की, ऋषीमुनींनी तुझे ध्यान करुन व नाम गाऊन वृत्ती तुझ्या चरणी लीन केल्यामुळे ते ही तुझ्याप्रमाणे शुद्ध बनले.मी देखील त्यांनाच अनुसरेन व ब्रम्हरुप बनेन.आणि मग माझी अशुद्ध घोंगडी तुझ्या ध्यान व नाम चिंतनाने तुझ्या घोंगडी सारखी शुद्ध होईल.
      विठ्ठल विठ्ठल जय हरी!!