आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • निर्यातक्षम आंबे कसे तयार करावेत .

ความคิดเห็น • 9

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती सरजी. अशीच माहिती देत रहा.‌‌. धन्यवाद.

  • @vinodkumaragrawal6159
    @vinodkumaragrawal6159 6 หลายเดือนก่อน +3

    राहुल भाउ,
    तुमच्याकडे ही पेपर बॅग मिळेल का? असल्यास प्रती बॅग काय rate आहे.

  • @vijaybhandari1176
    @vijaybhandari1176 6 หลายเดือนก่อน +2

    6:21 Bag kuthe milel patta dhyava

  • @dineshpisal855
    @dineshpisal855 6 หลายเดือนก่อน +2

    Sir chote zhad asel tar chalel pan mothya zhadansathi kase use karnar

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน +1

      call me ..
      88 55 900 300 / 8888782253

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 หลายเดือนก่อน +1

      *आजचा विषय*
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
      *कसे करावे?*
      *व त्यापासुन मिळणारे*
      *उत्पादन कसे वाढवावे :*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *प्रस्तावना :*
      आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
      *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
      काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा झाडाचे*
      *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
      *काय करावे ?*
      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
      *उपाय :*
      १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
      (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
      अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
      २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
      फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
      ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
      ४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
      झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
      ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
      ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
      तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
      ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
      किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
      ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
      ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
      ८) प्रतीझाड द्या
      *वय २५ ते ३५ वर्ष*
      *शेणखत : २० /२५ घमेली*
      नत्र (युरिया): १० किलो .
      (दोन टप्प्यात ५+५ किलो)
      जुन व औगस्ट
      * सिंगल सुपर : ५ किलो Gr.
      औगस्ट
      * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
      औगस्ट
      व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
      (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
      *रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
      ९) सर्वात महत्वाचे :
      कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
      १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
      ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
      १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.