पिकाला बेसळ डोस देण्याचा फॉर्म्युला ! basal fertilizer dose

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    आजचा विषय - 🌱पिकाला बेसळ डोस देण्याचा फॉर्म्युला ! basal fertilizer dose #fertilizer😍💪
    लागवडीच्या अगोदर किंवा लागवडीबरोबर बेसल डोस टाकला गेला गेलाच पाहिजे. याचे कारण असे की नत्र वगळता स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांना पिकाला उपलब्ध होण्याचा कालावधी ही खते जमिनीवर टाकल्या पासून ती पिकास लागू होण्यास काही दिवस जातात आणि हे प्रमाण सुध्दा जमिनीच्या गुणवत्तेवर,सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. त्यामुळे बेसल डोस लागवडी अगोदर किंवा त्या बरोबर देणे अत्यावश्यकच आहे. बेसल डोस दिल्यामूळे आपण दिलेली अन्नद्रव्ये पिकाला त्याचे गरजेच्या वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे पिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येते व कमी रासायनिक खतांमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येते.
    मुख्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खते बेसल डोस मधून देताना नेहमी शेण खताची किवा गांडूळ खताची भट्टी लावून खते द्यावीत. भट्टी लावताना चांगल्या प्रकारे सुकलेले व कुजलेले शेणखत किवा गांडूळ खत वापरावे. कृपया ही काळजी घ्यावी.
    👉सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी लावणे -
    चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत किवा गांडूळ खत एकरी 200 ते 300 किलो चाळुन घ्यावे त्यानंतर शेणखतचा थोडा थर देऊन फेरस सल्फेट 10 किलो चा थर द्यावा व पुन्हा शेणखतचा थोडा थर द्यावा व यावर झिंक सल्फेटचा 10 किलो थर द्यावा व पुन्हा शेणखत चा थर द्यावा अशा प्रकारे बोरॉन 2 किलो, सिलिकॉन 10 किलो गंधक 5 किलो ग्रॅन्युअलचा थर द्यावा व पुन्हा शेणखत चा थर द्यावा व अशा प्रकारे सगळे सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य टाकावे व शेवटी पुन्हा शेणखत चा थर द्यावा व फावड्याच्या सहाय्याने पलटी द्यावी .हे मिश्रण अगदी मोकळे होईल असे करावे. हे मिश्रण मोकळे झाल्यावर ते खताच्या पोत्यामध्ये भरून तोंड बांधून दमट वातावरण मध्ये आठ दिवस ठेवावे. उन्हात किंवा हवेच्या ठिकाणी ठेवु नये. उन्हात व हवेच्या व पाण्याच्या ठिकाणी ठेवल्यावर पाणी सुटते. अशा प्रकारे हे मिश्रण चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य सारखे काम करते.
    👉सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी लावल्याने होनार फायदा -
    सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी लावल्यावर NPK सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची रासायनिक अभीक्रीया होत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी लावल्यावर सेंद्रिय खाताची सूक्ष्म अन्नद्रव्यांना कोटींग होते. दुय्यम अन्न द्रव्ये ( गंधक, मॅग्नेशियम) यांची कार्यशक्ती भरपूर प्रमाणात वाढते.
    👉मुख्य अन्नद्रव्याची भट्टी लावणे -
    NPK सारख्या मुख्य अन्नद्रव्याची भट्टी लावताना आपण जशी सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी लावली तशीच लावावी फक्त त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो किंवा डीएपी ५० किलो + १०:२६:२६ - ५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो हि खते मिक्स करावीत.
    (टीप - पिकाच्या शिफारसीत खताच्या मात्रे नुसार खताचे प्रमाण घ्यावे.)
    👉खतांची भट्टी लावताना घेण्याची काळजी -
    रासायनिक खतांची व सूक्ष्म अन्न घटकांची भट्टी एकत्र लावू नये. भट्टी लावून पूर्ण झाल्यानंतर ही खते एकत्रितपणे वापरता येवू शकतात.
    युरीया, अमोनियम सल्फेट अथवा मॅगनेशियम सल्फेट ही खते भट्टी लावून देण्याची गरज नाही. यांची भट्टी लावल्यास पाणी सुटून चिखल होवू शकतो.
    👉खते कशी द्यावीत -
    बेसल डोस खते देताना ऊस तसेच फळ पिकामध्ये एका बाजुने चळ घेऊन ते शेणखतात मुरलेले अन्नद्रव्य सरी मध्ये टाकुन मातीआड करून घ्यावे आणि भाजीपाला पिकासाठी लागवडी आधी बेड भरून खते माती आड करावीत.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम मराठी - bit.ly/3B9Ny8G
    👉इंस्टाग्राम हिन्दी - bit.ly/45XAj88
    👉वेबसाइट - krushidukan.bharatagri.com/
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 18

  • @akshaykarande6690
    @akshaykarande6690 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuberose 1 year complete ahe besal dose chi mahiti dya sir

  • @Pralhadjadhavofficial
    @Pralhadjadhavofficial 4 หลายเดือนก่อน

    Nice information

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद

  • @sadanadbadgha420
    @sadanadbadgha420 หลายเดือนก่อน

    Kakdisathi bhesal does sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      काकडी साठी आपण - 18:46:00 - 50 किलो + 15:15:15 - 50 किलो + निबोळी पेंड - 100 किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये- 5 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो @ एकर टाकू शकता.

  • @sufiyanpatel4385
    @sufiyanpatel4385 หลายเดือนก่อน

    Panawar baric baric tichrya kinwa baric baric whole padtat he kontya annadrvyachya kamtarteche laxman ahe.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपण पिकाचे स्पष्ट आणि जवळून ३ ते ४ फोटो पाठवून द्यावेत, म्हणजे त्यानुसार आपणास योग्य माहिती देता येईल. app.bharatagri.co/chat

  • @shankartarange
    @shankartarange 4 หลายเดือนก่อน

    Tomato lagan karayvhiy ata bhesal dos bddl mhiti pahije

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 23 วันที่ผ่านมา

    सर मातीच फार्मिगेसन करण्यासाठी h2o2 nano silvar किती प्रमाणात वापरावे....??तसेच बेसल् डोस टाकण्या आधी किती दिवस आधी टाकावे...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  23 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

    • @ravindradhore5172
      @ravindradhore5172 23 วันที่ผ่านมา

      @@bharatagrimarathi सर मला colour capcicum ची लागवड करायची आहे त्या पूर्वी जमिनीच निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे....त्या साठी haydrojan paraoxide व नॅनो सिलवर ची ट्रीटमेंट दयायची आहे...ही प्रकिया केल्यांनतर किती दिवसाच्या अंतराणे जमिनीत besal dose टाकून द्यावा मनजे बेसल dose व haydrojan paraoxide ची एकमेकांना अभिक्रिया होणार नाही...

  • @jagananathvirkar9683
    @jagananathvirkar9683 10 วันที่ผ่านมา

    सिताफळ कोणता बेसल डोस द्यावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 วันที่ผ่านมา

      झाडाला वयानुसार खत आहे 4 वर्ष झाडास - 25 किलो शेणखत + 125 ग्राम यूरिया + 75 ग्राम स्फुरद + 75 ग्राम पोटॅश दिले तरी चालेल.

  • @user-th5jh3rf8d
    @user-th5jh3rf8d 4 หลายเดือนก่อน

    सर माझी मोसंबीची बाग हार्वेस्टिंग झाली आहे,तर माझा प्रश्न असा आहे की, आता मला झाडांना स्टोरेज येण्यासाठी वॉटर सोलेबल खत देयच आहे तर कोणत खत देऊ कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.

    • @Sandipphad_
      @Sandipphad_ 4 หลายเดือนก่อน

      सर वॉटर सोल्युबल खताने झाडांमध्ये स्टोरेज निर्माण होत नसून झाडांमध्ये ताणतणाव निर्माण होतो,
      थोडा विचार करा आणि झाडाला प्राकृतिक पोषण देण्याचा प्रयत्न करा. आज मार्केटमध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक सारखे तंत्रज्ञान आहे याचा वापर.
      आपल्या बागेस वापर करा आणि शाश्वत उत्पन्न वाढवून घ्या ..
      स्वतः निरोगी खा आणि या जनतेला सुद्धा निरोगी विषमुक्त अन्न द्या आणि स्वतःची जमीन वाचवा🤔☝

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      आता बागेला रेस्ट द्या कोणतेही खत देण्याची गरज नाही आपण फवारणी करू शकता या संदर्भात व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

    • @user-gv8id6qk7x
      @user-gv8id6qk7x 4 หลายเดือนก่อน

      ऊस पिकावर कोणत्या वेळेस कोणकोणते खत टाकावे यावर व्हिडिओ तयार करा.