#Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- काही सिलेक्टेड आंबे एकत्र घेऊन त्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचा, त्याच्या नंतर त्यांचा रस काढून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडसं वेलची टाकायची ,साखर टाकायची, थोडीशी तुम्हाला जे आवडेल ते पदार्थ लिक्विड टाईप मिक्स करायचे, तर त्याला थोडं मिक्सरला लावून घ्यायचं थोडं पातळ झाल्यानंतर मिक्सर मधून काढून घ्यायचं. त्याच्या नंतर पत्रावळ्या किंवा ताट असतील ,त्यांना तेल लावायचा व आंब्याचा रस पसरवायचं दोन दिवस उन्हामध्ये ती ताट किंवा पत्रावळ्या सुकट ठेवायच्या. दोन ते तीन दिवसांमध्ये ते साठे सुकले जातात व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही ते साठे फ्रीजमध्ये ठेवू शकता एक ते दोन महिने तीन महिने खाण्यासाठी किंवा ते वापरण्यास सुरू करू शकता . अशाप्रकारे आंब्याचा साठा तयार होतो. त्याला मी खूप आवडीने मँगो पोळी पण म्हणतो.