Kalamohor 2022 with Ashwin Srinivasan @ Farm of Happiness ('आनंदाचं शेत' अश्विन श्रीनिवासन कलामोहोर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • @FarmofHappiness
    नमस्कार मंडळी,
    'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे.
    "कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे.
    'आनंदाचं शेत' म्हणजेच पर्यटकांचं आवडतं 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे कोकणातलं निसर्गसिद्ध आणि अत्यंत दर्जेदार कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण.
    वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंब्या काजूच्या बागेत "कलांचा मोहोर"ही फ़ुलावा हा "कलामोहोर" या संकल्पनेचा हेतू.
    २०२२ मधल्या पहिल्याच 'कलामोहोर'च्या निमित्ताने इथे रहायला आम्ही आमंत्रित केलं होतं, गुणी आणि नामवंत बासरी वादक श्री अश्विन श्रीनिवासन यांना. आणि त्यांच्याबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवायला सहभागी झाले होते काही मोजके रसिक पर्यटक पाहुणे.
    दोन दिवस अश्विनजींसारख्या कलाकाराच्या सान्निध्यात राहून, म्हणजे एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात त्याच्या बरोबर जो अनुभव या पाहुण्यांना मिळाला... तो व्हिडिओतून मांडणं केवळ अशक्य! पण तरीही हा छोटासा व्हिडिओ, या पाहुण्यांच्याच शब्दांतून त्या जादुई अनुभवाची अनुभूती देण्याचा प्रयत्न म्हणून!
    Hello all!“Kalamohor” at “Farm of Happiness” is purely an experience of..
    ‘In the company of the artist and the art’. This line itself, describes the uniqueness of the concept. Farm of Happiness is a very well appreciated “Agro Tourism Homestay” in Konkan, Maharashtra.
    In "Kalamohor", we invite renowned artists for a stay at Farm of Happiness. Traveler guests, get an opportunity to stay at Farm of Happiness along with these artists and get an up-close experience of their arts.
    The very first artist invited to Kalamohor was flutist Ashwin Shrinivasan ji.
    And the participant travellers who joined us for the experience enjoyed his company for two days at the Home/Farm stay here.
    It is just not possible to recreate the experience here through this video. Yet it is just an effort to give you a glimpse and taste of the experience, in the words of the participants!

ความคิดเห็น • 9

  • @anikhadke
    @anikhadke ปีที่แล้ว +2

    अश्विन सारख्या प्रथितयश कलाकाराची कला इतक्या जवळून अनुभवायला मिळणं ही कल्पनाच माझ्यासाठी खूप exciting होती. त्यामुळे जेव्हा कलामोहोर बद्दल माहिती मिळाली तेव्हा ही दुर्मिळ संधी आम्ही सोडणं शक्य नव्हतं, आणि प्रत्यक्ष अनुभव माझ्या अपेक्षेहून नक्कीच जास्त समृद्ध करणारा होता.
    अश्विनच्या कलेला अतिशय पूरक असं वातावरण राहूल दादा आणि संपदा ताई यांनी त्यांच्या आनंदाचे शेत या सुंदर वास्तूत निर्माण केलंय. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत त्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येते. त्या दोघांचाही प्रेमळ स्वभाव, आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे genuineness खूप भावला. आपल्याला गवसलेला आनंद इतरांबरोबर share करण्याची त्यांची वृत्ती आणि ते execute करण्यासाठीची त्यांची प्रामाणिक तळमळ कलामोहोर च्या निमित्ताने पदोपदी दिसून येत होती.
    अश्विन बद्दल काय बोलू! त्याची बासरी आधी थोडी ऐकली होती, पण आपल्या आवडीचं संगीत इतक्या मोठ्या कलाकाराकडून समोर बसून जवळून ऐकणं, बघणं हे भारावून टाकणारं होतं.
    माझ्या मते, अतिशय मनापासून सादर केलेल्या कलेचं ऐकणाऱ्यावर एक ऋण बनतं. त्याचं मोल कशानीही होऊ शकत नाही. असे अनुभव आयुष्यात खूप कमी वेळा वाट्याला येतात, तसा हा एक अनुभव. अश्विन चे हे ऋण आम्ही आयुष्यभर आनंदानी जपू. We are truly indebted to him.

  • @swatipisal9015
    @swatipisal9015 ปีที่แล้ว +1

    Aanandache shet khupch chhan aahe daily video pathava

  • @suchitakulkarni6467
    @suchitakulkarni6467 ปีที่แล้ว

    अतिशय चांगला उपक्रम🎉❤

  • @shrikantsawant1164
    @shrikantsawant1164 ปีที่แล้ว

    Simply superb

  • @mandars_education07
    @mandars_education07 ปีที่แล้ว

    Awsome

  • @amodmodak
    @amodmodak ปีที่แล้ว

    mast !

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 ปีที่แล้ว

    Super❤

  • @saritamarathe3167
    @saritamarathe3167 ปีที่แล้ว

    संभाषणात मराठी हरवलेलं दिसलं.पण वातावरण तिथली जादू दाखवणारं..