संध्याकाळचे श्लोक | Sandhyakalche Shlok | Evening Prayers | Shubhank Karoti | Ganpati Stotra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2024
  • Title - Sandhyakalche Shlok
    Singer - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    00:00 - Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम )
    01:27 - Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra
    05:19 - Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam
    07:00 - Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक )
    11:32 - Pasayadaan ( पसायदान )
    01. Shubhankaroti Kalyanam
    शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
    शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
    दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
    दिव्यला देखून नमस्कार || १ ||
    तिळाचे तेल कापसाची वात |
    दिवा जळो मध्यान्हरात |
    दिवा लावला देवांपाशी |
    उजेड पडला तुळशीपाशीं |
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
    ऐक लक्ष्मि बैस बाजे |
    माझे घर तुला साजे |
    घरातली पीडा बाहेर जावो |
    बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
    घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
    02. Maruti Stotra
    भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
    महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
    दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
    लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
    ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
    ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
    पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
    ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
    कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
    आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
    अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
    ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
    आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
    धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
    भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
    हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
    रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
    ॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
    03. Ganapti Stotra
    Pranamya shirasa devam gauri-putram vinayakam |
    Bhaktavasam smarennityam ayuh-kamartha-siddhaye || 1 ||
    Prathamam vakra-tundam cha eka-dantam dvitiyakam |
    Tritiyam krishna-pingaksham, gaja-vaktram chaturthakam || 2 ||
    Lambodaram panchamam cha shashtham vikatameva cha |
    Saptamam vighna-rajendram dhumra-varnam tathashtamam || 3 ||
    Navamam bhala-chandram cha dashamam tu vinayakam |
    Ekadashamam gana-patim dvadasham tu gajananam || 4 ||
    Dvadashaitani namani trisandhyam yah pathen_narah |
    Na cha vighna-bhayam tasya sarva-siddhi-karah prabhuh || 5 ||
    Vidyarthi labhate vidyam dhanarthi labhate dhanam |
    Putrarthi labhate putranmoksharthi labhate gatim || 6 ||
    Japedganapati-stotram shadbhirmasaih phalam labhet |
    Samvatsarena siddhim cha labhate natra samshayah || 7 ||
    Ashtebhyo brahmanebhyashcha likhitva yah samarpayet |
    Tasya vidya bhavetsarva ganeshasya prasadatah || 8 ||
    04. Manache Shlok
    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
    नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
    गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
    मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
    तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
    जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
    जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
    प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
    पुढे वैखरी राम आधी वदावा॥
    सदाचार हा थोर सांडूं नये तो।
    जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
    मना वासना दुष्ट कामा न ये रे।
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
    मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
    मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
    मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
    मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
    मना कल्पना ते नको वीषयांची।
    विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
    नको रे मना क्रोध हा खेदकारी।
    नको रे मना काम नाना विकारी॥
    नको रे मना सर्वदा अंगिकारू।
    नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
    मना बोलणे नीच सोशीत जावें॥
    स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
    मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
    देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
    परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
    05.Pasayadaan -
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
  • เพลง

ความคิดเห็น • 8K

  • @BhaktiMarathi
    @BhaktiMarathi  3 ปีที่แล้ว +2211

    th-cam.com/video/RGh7QHmap70/w-d-xo.html
    Shlok, Stotra/श्लोक /स्तोत्र - नित्य पठण | नित्य नियमाने म्हणावयाची स्तोत्रं व श्लोक..

  • @jayashreeshinde269
    @jayashreeshinde269 ปีที่แล้ว +22

    आजही रोज ऐकते मी.. धन्यवाद 🙏

  • @ushakumbhar7569
    @ushakumbhar7569 10 หลายเดือนก่อน +18

    वातावरण प्रसन्न झाले खुप छान वाटले

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 4 หลายเดือนก่อน +7

    🙏 खुप छान आवाज आहे.. ऐकुन मन प्रसन्न होते..ॐ नमो श्री महालक्ष्मी माता नमो नमः..!! श्री राम कृष्ण हरी माऊली..🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 10 หลายเดือนก่อน +25

    👌🙏🌹🌺जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️❤️🙏👌🙏

  • @sakshis4295
    @sakshis4295 ปีที่แล้ว +18

    Hey shlok aikun khupach chhan vatatey aani ghari positivity aalya sarkhi vatatey 🙏🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 2 หลายเดือนก่อน +17

    Evening prayers खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहे. खूप सुंदर प्रस्तुती करण केले आहे. very nice. जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 13 วันที่ผ่านมา +4

    श्लोकांचे मधूर स्वर हृदय स्पर्शी आहेत.🎉🎉🎉

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 11 หลายเดือนก่อน +16

    जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️🌼🙏👌

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 2 ปีที่แล้ว +18

    श्री गणपति बप्पा नमो नम

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 10 หลายเดือนก่อน +13

    🙏👌❤️🌺🌷🌷मी रोज ऐकते खूप छान वाटते🙏👌❤️🌺

  • @ravindraganurkar
    @ravindraganurkar ปีที่แล้ว +28

    जिवनाचा आधार असनारी ही श्लोक कधीही विसरता नको अति सस्कारीत मार्मिक हृदय स्पषि

  • @reshpalshinde1978
    @reshpalshinde1978 10 หลายเดือนก่อน +12

    खूपच छान आवाज आहे मन प्रसन्न होते ऊर्जा मिळते

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 3 ปีที่แล้ว +26

    🕉️नमो भगवते वासुदेवाय
    अति सुंदर भजन।

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 2 ปีที่แล้ว +51

    🙏🌺🙏खुपच छान आवाज आहे 🙏🌺🙏
    🙏🌺🙏ॐ महालक्ष्मी प्रसन्न 🙏🌺🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 6 หลายเดือนก่อน +12

    Very nice singing. melodious voice and Very good presentation. हरि ओम. राधे राधे राधे श्याम राधे श्याम 🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 6 หลายเดือนก่อน +21

    आध्यातमिक मानसिक सर्वांगीण विकास करणारे श्लोक खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहेत. अस वाटत ऐकतच राहावे. हरि ओम. राधे राधे राधे राधे राधे राधे.🎉🎉🎉

  • @namdeovirnak8993
    @namdeovirnak8993 2 ปีที่แล้ว +101

    खूप खूप खूपच छान स्पस्ट उच्चार आणि तुमचा गोड आवाज यामुळे परत परत ऐकीले तरी परत परत ऐकावेसे वाटते. देवाचे भक्तीत लिन होऊन जाता येते.

  • @sunilchaudhari7440
    @sunilchaudhari7440 2 ปีที่แล้ว +33

    खूपच छान आवाज रोज संध्याकाळी घरी दिवा लावला जातो तेव्हा आम्ही सर्व ऐकतो व प्रसन्न वाटतं

  • @chintamanishirke2498
    @chintamanishirke2498 ปีที่แล้ว +6

    🌹🙏🌹🙏. रोज. एकतो. मन. प्रसन्न. होतो.

  • @vandanakumbhar8316
    @vandanakumbhar8316 หลายเดือนก่อน +4

    जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 3 ปีที่แล้ว +63

    मी पण रोज संध्याकाळी श्लोक ऐकते...
    मी फक्त रोज पुजा करते....त्या वेळेस नामस्मरण करत असते...🌹👏🌹संध्याकाळी सुन दिवा लावते...आणि रामरक्षा म्हणते..🌷☘🌷👏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 9 หลายเดือนก่อน +9

    अद्भुत अप्रतिम melodious voice and very good presentation very nice singing 🎉🎉🎉❤❤❤

  • @minalpitale6743
    @minalpitale6743 17 วันที่ผ่านมา +1

    Khup sunder gayle aahet sagle shlok 🙏🏻🙏🏻🙏🏻 khup prasanna vatate 🙏🏻

  • @SwapnilKhandale-zo7fq
    @SwapnilKhandale-zo7fq 11 วันที่ผ่านมา +5

    खूपच छान अर्जुन खंडाळे

  • @gayatrimandlik4443
    @gayatrimandlik4443 2 ปีที่แล้ว +66

    ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏 मनशांती व समाधान मिळते

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 11 หลายเดือนก่อน +16

    Very nice voice 👌👌mi dararoj sandhyakali lavate manala prasnn vatate Thank you so much 🙏👌👍

  • @user-nc9ii1iv9h
    @user-nc9ii1iv9h 4 หลายเดือนก่อน +7

    मी रोज माझ्या मुलांना संध्याकाळी बसवते. खूप छान मंत्र

  • @rupalilathkar7031
    @rupalilathkar7031 2 หลายเดือนก่อน +6

    मी रोज संध्याकाळी ऐकत असते,खुप छान वाटते

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 2 ปีที่แล้ว +52

    मन प्रसन्न झाले .जय माता देवी. 🚩

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar ปีที่แล้ว +1

      मन प्रसन्न झाले जय देवी माता

    • @sulochanajadhav4936
      @sulochanajadhav4936 6 หลายเดือนก่อน

      ​@@vivekdilpkhedekarwith 8

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 ปีที่แล้ว +23

    खूप छान सुंदर अप्रतिम संपुर्ण धार्मिक वातावरण झाले,हे ऐकल्यांनंतर 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @dattatrayaute6434
    @dattatrayaute6434 5 หลายเดือนก่อน +6

    खुपचं सुंदर मन प्रसन्न होऊन जाते

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 9 วันที่ผ่านมา +1

    श्लोक खूप मधूर स्वरात गायले आहेत. मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात.very nice singing. melodious voice and very good presentation.

  • @girishdeokumar9275
    @girishdeokumar9275 3 ปีที่แล้ว +12

    बहुत-बहुत अच्छा। मधुर गीत मधुर स्वर में।

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 2 ปีที่แล้ว +36

    अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🙏

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 11 หลายเดือนก่อน +1

    Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 ปีที่แล้ว +12

    खूप सुंदर आवाज आहे आणि उच्चारही अतिशय स्पष्ट.
    रोज देवाला दिवा लावताना मी हे श्लोक लावून ठेवते खूप प्रसन्न आणि छान वाटते. खूप खूप धन्यवाद!

  • @shubhangitai1259
    @shubhangitai1259 ปีที่แล้ว +55

    खुप सुंदर आवाज ,मी रोज सांजवेळी ऐकते .घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटतं 🙏🙏

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान.....!!!

  • @k.k7881
    @k.k7881 10 หลายเดือนก่อน +5

    मी कधी आठवण आल्यानंतर अगदी प्रसन्न होऊन टीव्ही वर लावून ऐकतो मस्त वाटत.🙏🙏🙏💐💐🌹

  • @rekhapawar3617
    @rekhapawar3617 3 หลายเดือนก่อน +8

    ऐकून खूप प्रसन्न वाटते व घरातले वातावरणही शांत राहते मी रोज संध्याकाळी संध्याकाळचे श्लोक नियमित ऐकते.ध

  • @mahendranmali9337
    @mahendranmali9337 ปีที่แล้ว +11

    तुमचा आवाज व श्लोकाचे शब्दरचना अतिशय सुंदर आहे त्यामुळे संध्याकाळच वातावरण अतिशय प्रसन्न वाटते ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @ramwajpe8169
    @ramwajpe8169 3 ปีที่แล้ว +18

    ।।जय श्री राम।। सर्वच श्लोक खुपच छान छान आहेत।आपला हा उपक्रम खुपच सुंदर आहे।

  • @gurunathgawas7112
    @gurunathgawas7112 2 ปีที่แล้ว +35

    मन प्रसन्न होते वशान्तीमीळते नित्यनेमाने श्रवण करावे
    .

  • @shaileshnikam2238
    @shaileshnikam2238 ปีที่แล้ว +37

    आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक म्हणतो. खुप छान आहे.🙏

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 ปีที่แล้ว +33

    फार सुंदर शुभंकरोती कल्याणम आहे संध्याकाळची बोध आहेत संध्याकाळचे श्लोक हे हे आवडले म्हणून मी नित्य नेहमी संध्याकाळी ऐकतो 💐🙏

  • @sampatdhaygude9321
    @sampatdhaygude9321 ปีที่แล้ว +66

    रोज ऐकून खूप प्रसन्न वाटत 🙏🏻🌹

  • @nitinpatil2367
    @nitinpatil2367 2 ปีที่แล้ว +30

    खुप ऊर्जा येते हे श्लोक ऐकले की👌👌 खुप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ गुरुमाउली 🌺🌺🌺🌺🌺

  • @meenakshijadhav6544
    @meenakshijadhav6544 4 หลายเดือนก่อน +16

    आभार आणि शुभाशीर्वाद श्रीसमर्थ रामदास स्वामी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम..यांसारख्या दिव्य विभुतींमुळेच आज मराठी मधून भक्ती,उपासना करायला भेटते आहे!!जय सद्गुरु!!🙏😇🚩🧡

  • @sawitapawar2386
    @sawitapawar2386 ปีที่แล้ว +20

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 2 หลายเดือนก่อน +4

    Amhhi Nehmi Aikato Khup Sundar, Om Sai Ram, Shubh Ratri, 🙏🙏🙏🙏🙏.

  • @raninale9770
    @raninale9770 ปีที่แล้ว +40

    तुमचा आवाज खूपच छान आहे आणि स्पष्ट उच्चार करता हा श्लोक ऐकून दिवस भराच टेंशन जात माझं. खूपच छान आहे👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏

    • @shrikantbhavsar4487
      @shrikantbhavsar4487 10 หลายเดือนก่อน +2

      खूब छान , अनुभव आला शांतापूर्ण मन झाले .

  • @gokulamali9531
    @gokulamali9531 ปีที่แล้ว +28

    रोज ऐकुन खूप प्रसन्न वाटते 💐💐💐👏

  • @aartiparit0408
    @aartiparit0408 10 หลายเดือนก่อน +4

    शुभम् करोती 🙏🏻🌺

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 ปีที่แล้ว +2

    Amhi darroj aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri.🙏🙏🙏🙏🙏.

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 3 ปีที่แล้ว +51

    श्री गणपती बाप्पा मोरया. 👏🌹

  • @bhaveshjoshi8460
    @bhaveshjoshi8460 ปีที่แล้ว +18

    तुमचा खुप छान आवाज आहे मी रोज ऐकतो व रोज म्हणतो 🚩 जय श्रीराम 🙏🙏

  • @smartxerox1000
    @smartxerox1000 7 หลายเดือนก่อน +7

    फारच छान ......

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 ปีที่แล้ว +2

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @pallavimahekar1567
    @pallavimahekar1567 3 ปีที่แล้ว +36

    खूप छान 👌 आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक व स्तोत्र नक्की ऐकतो ,ह्याचे उच्चार खुप स्पष्ट आहेत . ऐकून प्रसन्न वाटत . धन्यवाद 🙏🙏

    • @shobhaiyer8437
      @shobhaiyer8437 ปีที่แล้ว

      खूप छान श्लोक आहेत मी आज येक ते आता मात्र रोज संध्याकाळी ऐकणार

  • @sunder9758
    @sunder9758 3 ปีที่แล้ว +18

    Jay shree ram

  • @user-iq8ue5qj8l
    @user-iq8ue5qj8l 11 วันที่ผ่านมา

    Khup bhaktipurna sunder❤🙏❤

  • @swatibhonge2611
    @swatibhonge2611 2 หลายเดือนก่อน +3

    श्लोक ऐकून मनाला खूप समाधान मिळाले अतिशय सुंदर आवाजात म्हटले आहे

  • @rajendratongare179
    @rajendratongare179 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान व आत्मिक शांतता निर्माण होते

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 3 หลายเดือนก่อน +28

    खुप स्पष्ट ऊच्चार व गोड आवाज..संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर रोज घरात ऐकल्यास घरात प्रसन्न वातावरण होते.

  • @prshantRaut
    @prshantRaut 12 วันที่ผ่านมา +1

    shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @poojakudav7129
    @poojakudav7129 16 วันที่ผ่านมา +1

    जय सद्गुरु 🙏

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 10 หลายเดือนก่อน +25

    👌🙏🌷❤️जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏👌🌹

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +291

    रोज नित्यनेमाने लहानपणापासून म्हणालाय खुप आवडते. परंतु नोकरी मुळे शक्य होत नाही. पण जेव्हा घरी लवकर असतो.त्यावेळी मात्र शुभं करोती मोठ्या आवाजात म्हणतो.आता सर्वांनी माता भगीनी लेकी सुना यांनी आपल्या मुलांना हे सक्तीने म्हणावयास लावावे. जीवनाला अति उत्तम सवय लागते.

    • @pradnyakhare2453
      @pradnyakhare2453 11 หลายเดือนก่อน +13

      नोकरी chya ठिकाणी पण म्हणू शकता मनात् आणि गाडी लोकल बस... कुठे ही म्हणू शकता

    • @sunitapayer904
      @sunitapayer904 11 หลายเดือนก่อน +5

      😊

    • @honeey322
      @honeey322 11 หลายเดือนก่อน +7

      बाबा,काका, मामा, भाऊ यांनीही स्वतः म्हणावे.
      मुले अनुकरण प्रिय असतात. सक्तीची गरज भासु नये!!😊

    • @ganeshshete5935
      @ganeshshete5935 11 หลายเดือนก่อน +2

      माझं पण सेम आहे

    • @rahullavand947
      @rahullavand947 11 หลายเดือนก่อน +3

      Right❤

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami samarth 🙏 ❤️ jai jai swami samarth Koti koti pranam 🌹 🙏

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 5 หลายเดือนก่อน +6

    जयगणेशजयश्रीराम

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 3 ปีที่แล้ว +28

    वा खुपच छान आवाज आपला..💯👌👏🌹🌻👩🌻🌻🌻👩🌻पसायदान श्री स्वामी समर्थ..🌻🌻🌻🌻👩🌻👏🌹

  • @chetnaahire583
    @chetnaahire583 3 ปีที่แล้ว +20

    अगदी मन प्रसन्न झाले. 👍👍

  • @umadevijadhav4949
    @umadevijadhav4949 3 หลายเดือนก่อน +4

    हे ऐकायला खूप खूप खूपच छान वाटते👌👌

  • @sanjaychougule5694
    @sanjaychougule5694 11 วันที่ผ่านมา

    खूपच छान....घर प्रसन्न होऊन जाते

  • @UserAurKya
    @UserAurKya 3 ปีที่แล้ว +11

    Shree Swami Samarth
    Khup mast 👍🏻🎉🙏🏻😊

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 3 ปีที่แล้ว +16

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा...
    मला लवकरच नात,नातू येणार आहे...
    त्यासाठी मी रोज नियमाने ऐकते...
    प्रसन्न होते हे श्लोक ऐकून..🙏🌹👈

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 5 หลายเดือนก่อน +5

    ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤

  • @arunapatil8197
    @arunapatil8197 ปีที่แล้ว +17

    खूप छान आवाज आहे एकतच राहावे वाटते 👍🙏🏻💐🍫

  • @THENG444YT
    @THENG444YT 3 ปีที่แล้ว +17

    Khup chaan shlok aahe aamhi darroj nachukta he shlok sandhayaakaali 7pm vaajta mala je khup aavadale aahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vikramshinde-cd8nc
    @vikramshinde-cd8nc 8 วันที่ผ่านมา

    Khup sunder 👌👌

  • @sangitabhadane9211
    @sangitabhadane9211 10 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान सायंकाळी घरात ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @varshabadme356
    @varshabadme356 2 ปีที่แล้ว +76

    तुमचा आवाज खुप छान आहे . ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाल.
    ‌श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @yashpatil3699
      @yashpatil3699 2 ปีที่แล้ว

      श्लोक छान आहे 🙏🙏

    • @newworld8652
      @newworld8652 2 ปีที่แล้ว +1

      Madhukar Vanjare om . shree swami samarth

    • @abolideshpande9048
      @abolideshpande9048 ปีที่แล้ว

      @@newworld8652 d

  • @manjirijamunkar502
    @manjirijamunkar502 4 ปีที่แล้ว +31

    Khup prasannna wattt....positive energy yete...

    • @seema5101
      @seema5101 3 ปีที่แล้ว +1

      U say right

  • @myworld45855
    @myworld45855 2 ปีที่แล้ว +19

    Wow 🙏🙏

    • @ushagaikar213
      @ushagaikar213 2 ปีที่แล้ว +2

      खूप छान आहे रोज ऐकल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही

  • @jiteshvarsale8118
    @jiteshvarsale8118 ปีที่แล้ว +19

    भक्तिमय वातावरणात खूप प्रसन्न वाटतं...
    जय गणेश

  • @kondibamandekar9261
    @kondibamandekar9261 ปีที่แล้ว +19

    मन. प्रसन्न. झाले स्वॉलक. ऐकून
    जय. जय. रघुवीर. समर्थ
    जय. जय. गणपती. बाप्पा मोरया
    जय जय. बजरंग बली की.जय
    जय. जय. माऊली.
    डानोबा. माऊली. तुकाराम......

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 3 ปีที่แล้ว +44

    🌹👌🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹

    • @rajendrapatekar8690
      @rajendrapatekar8690 2 ปีที่แล้ว

      🙏 जय सद्गुरु श्रवण झाले की उत्तम.

  • @chidambarjoshi3279
    @chidambarjoshi3279 3 ปีที่แล้ว +14

    PAWANPUTRA Shri Veerahanumanaki JAI

  • @user-cz9rw3sq2p
    @user-cz9rw3sq2p 3 ปีที่แล้ว +10

    Best video 🙏🏻

  • @rupalisankpal1987
    @rupalisankpal1987 3 ปีที่แล้ว +11

    जय सदगूरू

  • @dineshpawar4707
    @dineshpawar4707 3 ปีที่แล้ว +12

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @maheshbari6048
    @maheshbari6048 4 ปีที่แล้ว +38

    मनाला प्रसन्नता लाभली.सुंदर

  • @Siddhiiisutar
    @Siddhiiisutar 3 ปีที่แล้ว +48

    मस्त 👌👌🙏🙏👍👍👏👏🥰🥰 मला खुप छान प्रेमळ आहे

  • @seemaajari5688
    @seemaajari5688 2 ปีที่แล้ว +25

    Khupach chan , manala prasanna karate, great voice

  • @vaibhavisapate9782
    @vaibhavisapate9782 3 ปีที่แล้ว +17

    भक्ती मराठी खूपच छान. आजकालच्या मुलांसाठी ह खुप छान आहे. खुप शीकान्यसारखे आहे. हि कुठ एत आत्ताच्या मुलांना.
    तुम्ही खुप छान मार्गदर्शन करत आहात.🙏🙏👌
    🙏So veri veri tq marathi bhakti.🙏🙏

  • @ranjanapatilpatil801
    @ranjanapatilpatil801 2 ปีที่แล้ว +27

    Aapka voice mast he ❤❤🙏

  • @indianclassicalmusic1506
    @indianclassicalmusic1506 3 ปีที่แล้ว +131

    वाह!!!माझ्या मुलाने मला हे दाखवले आता आम्ही हे रोज ऐकतो प्रसन्न वाटते🙂टीव्ही बघण्यापेक्षा आम्ही रोज हे ऐकतो वाह!! बरं वाटतं
    🙏🙏 धन्यवाद🙏🙏
    👍👍👌👌

    • @vickysai9080
      @vickysai9080 3 ปีที่แล้ว +2

      Kharch prasanna vatta

    • @hemakedari553
      @hemakedari553 3 ปีที่แล้ว +1

      🦁🦓🐯🐺🦌🐈🐒🐈🦍🦍🐕🐵🐅🐩🦝🐩🐺🐩

    • @sonawnesantosh5956
      @sonawnesantosh5956 3 ปีที่แล้ว +1

      बास झाले उपकार 😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

    • @nanditabhoir1549
      @nanditabhoir1549 3 ปีที่แล้ว +1

      @@sonawnesantosh5956 HH Sri Krishna

    • @sanjayhemke6524
      @sanjayhemke6524 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान

  • @happyandbeautifulvideos7396
    @happyandbeautifulvideos7396 2 ปีที่แล้ว +80

    Mam you have a nice voice
    This is very peaceful and silent
    🙂🙂

  • @mangalguravffvnnkmbbh.ng4h427
    @mangalguravffvnnkmbbh.ng4h427 2 ปีที่แล้ว +11

    Very nice 🙏🏻🌷🌷