Yajurvendra Mahajan Majha Maha Katta : अनाथ, दिव्यांगांना IAS-IRS बनवणारा अवलिया 'माझा महाकट्ट्या'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #YajurvendraMahajan #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या
    Yajuvendra Mahajan ABP Majha Maha katta : शिक्षणाने माणसाचे जीवन बदलून जाते. त्यामुळं मी यामध्येच काम करण्याचे ठरल्याचे मत दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांसाठी काम करणारे दिपस्तंभचे यजुवेंद्र महाजन (Yajuvendra Mahajan) यांनी व्यक्त केलं. हे काम करत असताना दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी फक्त मार्गदर्शन महत्वाचे नाही तर त्यांच्या निवासाची देखील गरज आहे. अनेक मुलांना चांगली मार्क असतानाही परिस्थितीमुळं शिक्षण घेता येत नव्हते, त्यांना आधार देण्याचे काम केल्याचे महाजन म्हणाले. यजुवेंद्र महाजन यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
    एका ठिकाणी व्याखानाच्या ठिकाणी दोन दिव्यांग मुलं मला भेटायला आली. ती मुलं म्हणाली सर आम्ही काय करु शकतो का? दिव्यांग व्यक्ती देशात एखाद्या उच्च पदावर का नाही? असे महाजन म्हणाले. मग मी दिव्यांग आणि अनाथ मुलांना देखील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच निवासाची व्यवस्था करुन, त्यांना शिक्षण देण्याचे काम सुरु केल्याचे महाजन म्हणाले.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

ความคิดเห็น • 287

  • @yajurvendra2020
    @yajurvendra2020 หลายเดือนก่อน +87

    सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आपले शुभेच्छा व आशीर्वाद खूप अनमोल आहेत.
    अनेक लोकांच्या सहकार्याने हे काम विस्तारत आहे.
    त्या सर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
    राजीवजी खांडेकर ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांनी मला एकेरी संबोधले आणि आमचा अनेक वर्ष परिचय आहे. कृपया याबाबत खरं तर त्यांचे आपण आभार मानूया. त्यांच्यामुळे व एबीपी माझा मुळे हे कार्य अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे.
    पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.
    आपला ,
    यजुर्वेंद्र

    • @AmazeVibes360
      @AmazeVibes360 หลายเดือนก่อน

      I truly Salute you Sir🫡

    • @sunilgawade4036
      @sunilgawade4036 หลายเดือนก่อน

      Sir
      Please give me your contact number

    • @SG.vlogs..
      @SG.vlogs.. หลายเดือนก่อน

      Proud of you sir❣️💐💐🎊✨️

    • @bapunawale2185
      @bapunawale2185 หลายเดือนก่อน

      सर खुप मोठं कार्य आहे तुमचं, कार्यसिद्धी फाउंडेशन पुणे येथे गिरिराज सावंत साहेब यांनी निमंत्रित केलेल्या कार्यक्रम मी स्वतः समक्ष आपणास पाहिले व ऐकले आहे खूप great work ❤

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334 หลายเดือนก่อน +37

    abp maza ने त्यांचा गुगल पे, फोन पे, पेटीएम नंबर शेअर केला पाहिजे जेणेकरुन आमच्यासारखे लोक आणि ज्यांना त्याच्या मेहनती आणि महान कार्याला मदत करायची आहे त्यांना त्यांच्या कामात मदत करता येईल. यजुर्वेंद्र महाजन यांचे उत्कृष्ट कार्य .

  • @goannashik
    @goannashik หลายเดือนก่อน +41

    राजकीय नेते , अधिकारी , विश्वास नांगरे , आयएएस आयपीएस, यांचा आदर्श घेण्यापेक्षा महाजन साहेब यांचा आदर्श घ्यावा...

  • @gajananlonbale8731
    @gajananlonbale8731 หลายเดือนก่อน +16

    पृथ्वीवरील परमेश्वर 👏👏👏 ईश्वराने आपणा सर्वाना निर्माण केलं.परंतू काही निर्मिती अपूर्ण राहिली ती अपूर्णतः या ईश्वराने पूर्ण केली. सर, आपण आमच्या आयुष्यात आहात हे आमचं भाग्य 🙏

  • @narendrapatil6679
    @narendrapatil6679 หลายเดือนก่อน +56

    प्रा.यजूर्वेंद्र महाजन... युवकांचे खरे प्रेरणास्थान, दीपस्तंभ.... जय हो 🙏🚩

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद...💞

    • @Shriramdhut
      @Shriramdhut หลายเดือนก่อน

      S​@@DeepstambhFoundationsir मी पन दिव्यांग आहे visually impaired मला कॉम्पुटर च चांगल knowledge आहे आणि ब्लाइंड दीव्यांग मुलांना ट्रेनिंग देऊ शकतो तर मला आपल्या कडे काही काम भेटू शकतं का

  • @dudhalepramod1197
    @dudhalepramod1197 หลายเดือนก่อน +20

    या कामासाठी शब्दच नाहीत. खूप मोठे काम महाजन सरांनी उभे केले आहे.

  • @SOCIALFORUM
    @SOCIALFORUM หลายเดือนก่อน +11

    महाजन सर...ग्रेट वर्क... जळगाव जिल्ह्याचा अभिमान... आता महाराष्ट्राची शान झालात....दिव्यांग, अनाथांचे नाथ झालात... अविश्वसनीय कार्य....शतकातून अशी माणसं जन्माला येतात.

  • @ashokacharya7575
    @ashokacharya7575 หลายเดือนก่อน +13

    लवकरच महाजन सर आणि लक्ष्मण सपकाळे सर महाराष्ट्र भूषण पुरस्कार चे मानकरी ठरतील अशी आशा आहे... दीपस्तंभ चे काम खूप ग्रेट आहे...

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334 หลายเดือนก่อน +21

    'माझी लाडकी बहिन योजना भाऊ योजना' या फालतू गोष्टींऐवजी यजुर्वेंद्र महाजन यांच्यासारख्या महान व्यक्तींना सरकारने मदत करावी. 👍🏻

    • @idontcarei
      @idontcarei หลายเดือนก่อน

      YAAT FALTU KAY AAHE??? GARIB LADIES LA MADAD KELI TAR TUMHALA FALTU KA VATATA??

    • @lito-zq6rf
      @lito-zq6rf หลายเดือนก่อน

      ​@@idontcarei ladies nahi new gernation mulana job pahije. Company baher chalalet😢

  • @user-hy1oy2cs4m
    @user-hy1oy2cs4m หลายเดือนก่อน +19

    राजीवजी आमच्या महाजन सरांना आरे - तुरे ने बोलण्यापेक्षा थोडा आदर ठेवला असता तर बर वाटलं असत आमच्या सरांच कार्य खूप महान आणि मोठं आहे

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 หลายเดือนก่อน

      Saheb, tumchi aamchi bhet zali nah,, he aanche durdaiv mhanave lagel. Aata kahich shakyatach nhi.. aamhi aata ahe nahich. Dhanyawad jay Bharat

    • @macchindrachandanshiv5471
      @macchindrachandanshiv5471 29 วันที่ผ่านมา

      अरे तुरे बोलणे नको होते

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 หลายเดือนก่อน +5

    अशाअनमोलकामाबदल.खुपखुपधंन्यवादसर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 หลายเดือนก่อน +4

    महान विचार आणि आचरण . गरीब व गरजूसाठी महान कार्य केले . शुभेच्छा !

  • @marutikambale5298
    @marutikambale5298 29 วันที่ผ่านมา +2

    अनमोल कार्य आहे आपल सर ,ऐकताना डोळे भरून येत होते

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 หลายเดือนก่อน +18

    चांगला व्यक्ती माझा कट्ट्यावर.thank you

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +23

    महाजन सरांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद...💞

    • @vaibhavaher4448
      @vaibhavaher4448 หลายเดือนก่อน +1

      अपंग आणि अंध अंध विद्यार्थ्यांच्या नावाखाली समाजातून खूप डोनेशन मिळवता आणि ते स्वतःच्या घशात घालता असे हे महाजन सर😢

  • @atulsonar578
    @atulsonar578 หลายเดือนก่อน +8

    आमच्या जळगाव जिल्ह्याची शान आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर माणसातील देव माणूस.
    मानवसेवा हीच इशसेवा🙏🙏

  • @prof.sanjaysawant9608
    @prof.sanjaysawant9608 หลายเดือนก่อน +9

    यजूर्वेंद्रजी, आपण जे काही करत आहात याला या जगात तोड नाही. आपल्या कार्यात माझा खारीचा वाटा मी यथावकाश देईन. आपले खूप खूप अभिनंदन व आभार.

  • @sanjayboine6736
    @sanjayboine6736 หลายเดือนก่อน +6

    तरुणाचा आदर्श...
    महाजन मास्तरच...
    सलाम यांच्या कार्याला,जिद्दीला,संवेदनशील मनाच्या व्यक्तिमत्त्वाला..

  • @vinayamathews4512
    @vinayamathews4512 หลายเดือนก่อน +7

    श्री यजुवेंद्र महाजन यांच्यासारख्या समाजासाठी जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याची मुलाखत एबीपी माझाने ठेवल्याबद्दल एबीपी माझाचे शतःशा धन्यवाद!

  • @siddheshwardeshmukh9539
    @siddheshwardeshmukh9539 หลายเดือนก่อน +13

    आधुनिक युगाचे कर्मवीर यजुवेंद्र महाजन सर...ग्रेट work sir

  • @AmolBurange-j4h
    @AmolBurange-j4h หลายเดือนก่อน +6

    उच्च विचारसरणी उच्च देह श्री येजुयेद्र महाजन सर तुमच्या कार्याला सलाम तुमच्या कार्यालादेव पाठबळ देवो हीच... श्री सद्गुरू स्वामी चरणी प्रार्थना😊🙏🏻✅👏🙇

  • @RajendraWadal
    @RajendraWadal 15 วันที่ผ่านมา +1

    सर आपण खुपच चांगले कार्य करत आहात. आपणास खुप खुप शुभेच्छा व आपले मनापासून अभिनंदन.

  • @savitawathodkar4391
    @savitawathodkar4391 21 วันที่ผ่านมา +1

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती .🙏🙏🙏🙏

  • @kalindientertainment8756
    @kalindientertainment8756 หลายเดือนก่อน +9

    4 वर्षांपूर्वी तुम्हाला महाबलेश्वर येथे लाइव एकले, तुमच्या कार्याला खुप खुप सलाम,नक्कीच ख़रीचा वाटा उचलनार 🙏🙏

  • @saraswati.877
    @saraswati.877 หลายเดือนก่อน +16

    मला वाटते की निवेदकाने समोर च्या व्यक्तीला औपचारिकपणे बोलावे

  • @sadhanadhas1556
    @sadhanadhas1556 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्या कार्याला सलाम अनेक उत्तम शुभाशिर्वाद गॉड ब्लेस यु

  • @EnglishLearner-ho1jm
    @EnglishLearner-ho1jm หลายเดือนก่อน +5

    खरोखरी प्रेरणादायी. महाजन सर आपण आमच्या वस्तीगृहात रात्री सव्वा दहा ते सव्वा बारा असं दोन तास केलेला भाषण आजही लख्ख आठवतं. सर आपल्या भाषणाच्या प्रेरणेतूनच आज बँक अधिकारी झालो आहे. आपण आमच्या सारख्या डीव्यांग लोकांकरता खूप मोठे दीपस्तंभ आहात. दीपस्तंभा च्या प्रवासात पूर्ण फुलाची पाकळी कसा सहभाग घेता येईल याची माहिती मिळावी?

  • @chetankakde342
    @chetankakde342 5 วันที่ผ่านมา

    माणूस दया मज माणूस दया भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू ( यजुवेंद्र महाजन सर ) दिसला, खूप छान वाटले सर आजही ह्या समाजात तुमच्यासारखी लोकं आहेत एक चांगले काम करताहेत यात तुमचे सुद्धा कार्य अतुलनीय आहे, नक्कीच प्रेरणा मिळाली आहे मला सुद्धा ❤️❤️👌💫🎉🎊🔥🔥🔥🔥🔥

  • @dattatrayalandge395
    @dattatrayalandge395 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्हाला देवाने फारच मोठा मान दिला आहे.आणी त्यासाठी तुम्ही अगदी परी पुर्ण, तंतोतंत उतरले आहेत.फार फार , मनःपूर्वक नमस्कार.

  • @ravsahebkuwar6608
    @ravsahebkuwar6608 หลายเดือนก่อน +2

    एवढं भव्यदिव्य काम करून सर म्हणतात की ही कृतज्ञता व्यक्त करणं आहे. ग्रेट सर. सलाम आपल्याला. साक्रीच्या वाचनालयात आपल्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला आहे. ❤

  • @mahendramore593
    @mahendramore593 หลายเดือนก่อน +3

    सलाम तुमच्या कार्याला सर, तुमचं नाव अनंत काळ या विश्वात लोकांच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही.मनापासून वंदन महाजन सर ❤

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 หลายเดือนก่อน +3

    धर्म मानुसकिसी म्हणती । मानुसकी न्यायावर सोधती ।
    न्याय कोनाच्याही प्रती ।
    एकच राहातो सर्वदा॥ ग्राम गीता ॥
    आसे सरांचे काम देवमाणूस महाजनसर
    कार्य ऐकून डोळ्यात आश्रू आले

  • @ChetanPatil-z3f
    @ChetanPatil-z3f หลายเดือนก่อน +18

    आयुष्यात लाभलेले आम्हाला देव माणूस❤

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 หลายเดือนก่อน +2

    जळगाव जिल्ह्य़ातील हिरा आहे. Yjuvendre Sir.

  • @alkalokagariwar1232
    @alkalokagariwar1232 29 วันที่ผ่านมา

    महाजन सरांना प्रणाम आणि खूप शुभेच्छा , . अनमोल आणि अवघड कार्य करत आहात आपण.🎉

  • @shivshankarnarode3511
    @shivshankarnarode3511 หลายเดือนก่อน +8

    मी मुंबई पोलीस
    शिवशंकर नरोडे
    माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान आहेत आपण...🙏
    सतत आपल्या कार्याने प्रेरित होऊन... काम करत असतो...🙏
    आपले कार्य मी स्वतः जळगांवला येऊन बगितले आहे.... राज सरांशी संवाद ही केला आहे....
    परंतु दुःख येवढे च होते की प्रत्यक्ष आपली भेट झाली नाही त्या दिवशी....
    माणसातील देवमाणूस आहात आपण...❤❤

  • @Shrikantlasurkar100
    @Shrikantlasurkar100 หลายเดือนก่อน

    सरांचा सहवास लाभला दोन वर्ष आणि आयुष्यात धन्य झालो ❤...

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 28 วันที่ผ่านมา

    अभिनदन महाजन सर कोटी कोटी नमन धन्यवाद छान काम करत आहेत सर मानले तुम्हाला सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद

  • @prakashadkur6306
    @prakashadkur6306 หลายเดือนก่อน +1

    राजूजी खांडेकर सर आपल्या मुळेच abp maza महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय चॅनल आहे.

  • @PRALHADDSONAR
    @PRALHADDSONAR หลายเดือนก่อน +5

    मा. यजुर्वेंद्र महाजन सर, आपण युवकांसाठी खरे दीपस्तंभ आहात. आपल्या कार्यास सलाम! 🎉🎉🎉

  • @RD.tripleSgyan
    @RD.tripleSgyan หลายเดือนก่อน

    हे खरी संत महात्मा आणि दैवीय शक्ति प्राप्त मनुष्य आहेत। जय हो।

  • @asawarikhopkar5899
    @asawarikhopkar5899 หลายเดือนก่อน +8

    खरा देव माणूस 🙏👏🤗

  • @shan-k4y
    @shan-k4y หลายเดือนก่อน

    प्रचंड मोठी इच्छा शक्ती ...हा माणूस कराच खूप वेगळा विचार करतो

  • @sahebraokshirsagar
    @sahebraokshirsagar 25 วันที่ผ่านมา

    आदरणीय खांडेकर सर, मुलाखतीत कृपया एकेरी संबोधन टाळा.

  • @PandurangJadhav-r2b
    @PandurangJadhav-r2b หลายเดือนก่อน

    माणसातला देव माणूस आहात सर तुम्ही तुमच्या कामाला सलाम

  • @ashasawant948
    @ashasawant948 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद, सुंदर मार्गदर्शक कार्यकाळात साठी.

  • @jaishreepande5520
    @jaishreepande5520 หลายเดือนก่อน +1

    अंधांना आधार देणारे प्रती बाबा आमटे म्हणले तर वावगे ठरणार नाही तुमच्या पूर्ण कुटुंबास सलाम अनंत अडचणी येतात मी चाळीस vrsh काम केले माझ्या कडे खूप विद्यार्थी येतात मी आपल्या संस्थेत जाण्याचा मार्ग सांगितला

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 หลายเดือนก่อน +3

    विलक्षण!श्री यर्जुवेंद्र महाजन यांचे कार्याला सलाम.

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद...स्मिता व्यवहारे ताई

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 หลายเดือนก่อน +2

    दिव्यांगाच्या सवलती पूजा खेडकर सारख्या आधिकाऱ्यांच्या अपत्यानी लबाडीने घेतली . खऱ्या दिव्यांगाना संधी कशी मिळणार ?

  • @nehaarwade3823
    @nehaarwade3823 29 วันที่ผ่านมา +1

    तमसो मा ज्योतिर्गमय....

  • @sharadsohoni
    @sharadsohoni หลายเดือนก่อน +1

    प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि सर्वांग सुंदर कार्यक्रम ऐ. बि. बि. माझा चॅनेल ने सादर केला आहे. चॅनेलचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. 💐💐💐💐💐

  • @chandrakantpatil2269
    @chandrakantpatil2269 หลายเดือนก่อน +2

    सर, आपले कार्य खूप मोठे आणि महान आहे, तरुणांचे खरे दीपस्तंभ व प्रेरणास्थान आपण आहात, आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे!

  • @BhagyashriWagh-rn1ms
    @BhagyashriWagh-rn1ms หลายเดือนก่อน +2

    प्रा . यजुवेंद महाजन सरांचे खत्प खूप अभिनंदन सर🎉🎉

  • @purushottampanchwagh4524
    @purushottampanchwagh4524 หลายเดือนก่อน +3

    सत्ताधारी ,मोठमोठे व्यावसायिक, धनाढ्य
    अशा विविध स्तरातील व्यक्तींनी अशा कर्तबगार लोकांना स्वतः सर्वतोपरी
    सहकार्य करावे.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 หลายเดือนก่อน

    आपले विचारच अनमोल आहेत.
    दिव्यांग व्यक्ती अधिकारी, उच्च पदावर का नाही. हा विचार मनात येतो हेच महान आहे. साहेब आपल्या कार्यास सलाम .

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 หลายเดือนก่อน +9

    राजीव खांडेकर अतिशय उद्धट व्यक्ती आहे.. इतक्या मोठ्या माणसाला अरे कारे बोलता आहात लाज वाटली पाहिजे

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 หลายเดือนก่อน +2

      कुणाला ही अरे तुरे करतो राजीव

    • @jyotigavali9862
      @jyotigavali9862 หลายเดือนก่อน

      मागे R माधवन आले होते तेव्हा सुद्धा असेच बोलले.. काही समजत नाहिये त्याना आपण किती मोठ्या माणसांशी बोलतोय

  • @sagarbinnar7333
    @sagarbinnar7333 หลายเดือนก่อน +5

    यांचे पुस्तक खूप छान राहतात एमपीएससी चे

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 หลายเดือนก่อน +6

    सर तुम्ही आधूनिक युगातील विवेकानंद आहे.

  • @ssg7685
    @ssg7685 หลายเดือนก่อน +1

    समाजात असे थोर पुरुष आहेत म्हणून जगात समतोल राखला आहे नाही खूप दुफळी निर्माण झाली असती.. धन्यवाद महाजन सर..

  • @appamane987
    @appamane987 หลายเดือนก่อน +2

    अमोल खूप छान काम सुरू आहे तुझे.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...❤

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q หลายเดือนก่อน +3

    सलाम तुमच्या कार्याला. हे राजकारणी लोकांनी धडा घ्या ह्यांच्याकडून अक्कल आली तर आली. श्रीमंत अदानी अंबानी यांनी पण अशा मुलांना मदत केली तर पुण्य लागेल नको तिथे ही लोक खर्च करतात

  • @bonodpondurag7177
    @bonodpondurag7177 หลายเดือนก่อน +1

    Thanks to abp for introduce to the great person sree Yejuvendra Mahajan Sir,I proud of your great work for pwd, orphan, transgende all these people...!r

  • @komalmarathe2938
    @komalmarathe2938 หลายเดือนก่อน +2

    Great Work Sirji❤👍.....Proud Of You🙏🙏

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 หลายเดือนก่อน

    खुप चांगले काम करत आहात🙏🙏🙏🙏

  • @mahendrajunnarkar3123
    @mahendrajunnarkar3123 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 หลายเดือนก่อน

    आजही आपण ज्या देवाला प्रत्यक्ष पाहिले नाही त्या देवांचे मोठमोठे मंदिर बांधून पूजा करतो पण अशा कर्यकरिता स्वतः कुणी पुढे येत नाही. या युगात हे कार्य करणे, साहेब आपल्या कर्या करीता शब्दच नाहीत खुप महान योध्दा आहात आपण निसर्ग आपणास अमाप शक्ती देवो हीच सदिच्छा 🙏💐

  • @rajeshreelahor
    @rajeshreelahor หลายเดือนก่อน +1

    दीपस्तंभच... सॅल्युट 🙏🙏💐💐🎉🎉🎉

  • @motivationalfacts8670
    @motivationalfacts8670 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात लाभलेले देव माणूस❤

  • @chhayadeore3627
    @chhayadeore3627 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. หลายเดือนก่อน

    सरांना प्रत्यक्ष ऐकलं तरुणांईच्या वेगळ्या वाटा या कार्यक्रम मध्ये खुपच प्रेरणादायी आयुष्य आहे सरांचे 🙏🙏🙏

  • @saurabhjadhav5667
    @saurabhjadhav5667 หลายเดือนก่อน +2

    Yajuvendra महाजन sir यांच्यावर ak movie hoyla pahije ❤❤❤❤❤

  • @vikasjadhav7120
    @vikasjadhav7120 หลายเดือนก่อน +2

    Salute Mahajan Sir.....for this your great job and your dedication, motivation to our handicap brother & sisters...🙏🙏👍

  • @shreeswamisamarthayurved
    @shreeswamisamarthayurved หลายเดือนก่อน +2

    प्रेरणादायी 🙏

  • @smitashendkar5503
    @smitashendkar5503 หลายเดือนก่อน +1

    Superb

  • @ganeshdesale5464
    @ganeshdesale5464 หลายเดือนก่อน +1

    महाजन सरांचा काम हे खूप मोठे आहे ते समाजासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत परंतु एबीपी माझा शिक्षणासाठी घेतलेला हा कट्टा योग्य आहे परंतु त्यांनी जी एडवर्टाइजमेंट परद्यावरती करत आहेत रमी सर्कल एबीपी माझाला समजायला पाहिजे तुम्ही एकीकडे शिक्षणासाठी करतात आणि दुसरीकडे नवीन पिढीला रमी सर्कल सर्च गेम खेळायला लावतात मी एबीपी माझाचा जाहीर निषेध करतो काही चुकलं असेल तर माफी असावी 🙏

  • @PramodMasutage
    @PramodMasutage หลายเดือนก่อน +1

    भूतलावरील देवाला साष्टांग दंडवत परमेश्वराने सरांना उदंड आयुष्य देवो

  • @avinashyadav7715
    @avinashyadav7715 หลายเดือนก่อน +2

    खुप महत्वाचे कार्य 👌 We are proud of you Yajurvendra sir 😊👍🍁

  • @alkagaikwad-di3yt
    @alkagaikwad-di3yt หลายเดือนก่อน

    Salute Mahajan sir for great work

  • @anilsinghpatilofficial
    @anilsinghpatilofficial หลายเดือนก่อน +1

    खूप महान व्यक्तिमत्त्व आहे महाजन सर

  • @kisankhade2739
    @kisankhade2739 หลายเดือนก่อน +2

    सर मी पण आपला विद्यार्थी आहे nice

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 หลายเดือนก่อน

    Khupch Chan apratim Great Kary God bless you Dev tumche Bhal karo Dev tumche kalyan karo Dev tumcha Sansar Sukhacha karo Tumchi Bharbhray ho hich Eshwarcharni prathana

  • @Krishna_Shrikhande
    @Krishna_Shrikhande หลายเดือนก่อน +2

    Great Teacher 🙏

  • @ravikantmeher5402
    @ravikantmeher5402 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त मोटिवेशन ❤

  • @prabhakarbaviskar3613
    @prabhakarbaviskar3613 หลายเดือนก่อน +2

    खुपच अतिउत्तम कार्य ,तुमच्या कार्याला सलाम,

  • @ajamalrathod8277
    @ajamalrathod8277 หลายเดือนก่อน

    महाजन सर आपल्या या मी कोटी कोटी प्रणाम करतो.
    हेच आमच्या शासनाच्या लक्षात आले तर खूप अनाथांना, वंचितांना, आर्थिकदृष्ट्या ना न्याय मिळेल.
    परत आपल्या सर्व कुतटूबियांचे आभार मानतो. व आपल्या या व्यापक जनहिताच्या कार्यास शुभेछ्या देतो.

  • @AmazeVibes360
    @AmazeVibes360 หลายเดือนก่อน

    ABP माझा चे धन्यवाद, समाजासाठी जीवन जगणाऱ्या महान योध्दा ची मुलाखत घेतल्याबद्दल.

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 หลายเดือนก่อน +2

    Ptoud of of you Yajuvendraji🙏

  • @rpardeshi4230
    @rpardeshi4230 หลายเดือนก่อน +1

    आपलं जळगाव MH-19 💫🤍❤️💯✍️👑

  • @alkasane7117
    @alkasane7117 หลายเดือนก่อน +6

    सरांचा नंबर द्यावा म्हणजे ज्यांना मदत करायची ते करू शकतील.

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation หลายเดือนก่อน

      आपण सर्व एकत्र हे काम करीत आहोत .तन मन धनाने तुम्ही सर्व या कार्यात सहभागी आहात. यामुळेच हे कार्य विस्तारत आहे. आपण सर्व एकत्र येऊन लाखो करोडो व्यक्तींचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून टाकायचे आहे.
      या कार्यात ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांच्या साठी संस्थेची माहिती देत आहे.
      TH-cam channel - Deepstambh foundation
      FB / INSTA - Yajurvendra Mahajan
      Website - deepstambhfoundation org

  • @ashishnagane2039
    @ashishnagane2039 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻🙏🏻❤

  • @sujitwalke8508
    @sujitwalke8508 หลายเดือนก่อน +3

    Hats off sir!

  • @amolsundar6137
    @amolsundar6137 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गुरुजी❤❤❤❤❤

  • @nameofname8926
    @nameofname8926 6 วันที่ผ่านมา

    बाबासाहेब आंबेडकर एक नंबर

  • @sureshjadhav8367
    @sureshjadhav8367 หลายเดือนก่อน

    महाजन सर आपले कार्य सर्वोच्च दर्जाचे आहेच. सलाम तुमच्या कार्याला 🙏👏👏👏

  • @kalidasmahajan7121
    @kalidasmahajan7121 หลายเดือนก่อน

    अतुलनीय दिव्य कर्तव्य करणारे पवित्र आत्मा
    आपण आहात गुरुवर्य
    ❤ The Great

  • @user-ev2io2fx4h
    @user-ev2io2fx4h หลายเดือนก่อน

    Great work sir🎉🎉🎉🎉

  • @sontakkesomeshwar8551
    @sontakkesomeshwar8551 หลายเดือนก่อน

    Great work सर

  • @vikramgaikwad1257
    @vikramgaikwad1257 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @ManishaLanjulkar
    @ManishaLanjulkar หลายเดือนก่อน

    खरंच दिपस्तंभ फौंडेशन आणि महाजन sir great आहे. आमच्या nahata कॉलेज ला आल्यावर sir खूप प्रेरणादायी मार्गदर्शन करायचे आणि त्यातूनच मला free मध्ये sunday batch ला ऍडमिशन मिळाली होती.

  • @manishapatil9280
    @manishapatil9280 หลายเดือนก่อน +1

    Most inspirational