माझ्या निसर्गवेड्या मित्रा... आज तुला उभा राहून सॅल्युट... 🙏 कोकणातील निसर्गाचा ठेवा वाचविण्यासाठी तू घरादारा कडे पाठ फिरवून पायाला चक्र लावल्यागत रानावनात भटकंती करतोस... लोकांना सतत विनवणी करतोस. वेळप्रसंगी निसर्ग वाचविण्यासाठी दोन हात करण्याची तुझी तयारी असते. तुझी ही तळमळ आणि तडफड पाहून तुझा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो.. आज तुझ्या आवाजातील कंप आणि बोलताना तुला लागलेली धाप पाहून कंठ दाटून आला. (आता माझ्या उतार वयात हे असं अनेकवेळा घडतं) .. तू सुचविलेला सिनेमा आम्ही सर्व कुटुंबीय नक्कीच पाहू.. 🙏🚩❤️👍😊
अगदीखरे आहे .अंगावर काटा येत होता प्रसाद तुझे बोलणे ऐकताना . आपण प्रगती करतो आहोत की अधोगती तेच कळेनासे झाले आहे . प्रसाद तुला खूप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद
हा चित्रपट नाही हा एक विचार आहे आणि आपल्या प्रत्येकाला भेडसावू जातो, जेंव्हा शिवा चे वडील त्याला सांगतात की ज्या वेळेस माणसाला ह्याची प्रचिती होईल, की हे जे काही निर्माण केला आहे ते दैव ने निर्माण केला आहे आणि ते त्याचाच आहे आपण फक्त सेवेकरी आहोत. हा विषय महत्त्वाचा आहे. Dhanywad 🙏
@Vaibhav Gotal माझे सुद्धा तेच बोलणे आहे,जसे मन, आत्मविश्वास, इच्छा, बुध्दी दिसत नाही तसेच देवांचे त्यांच्यावरील श्रध्देचे आहे ..आपण कोणाला force नाही करू कोणाचे व्हिडिओ बघून विचार करायला सांगण्याचा...पटले तर पहावे किंवा सोडून द्यावे..आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण शहरात राहतो म्हणजे आपल्यालाच जास्त कळते असे वाटते... गावातली माणसं अडाणी, निर्बुद्ध....हे माझे वैयक्तिक मत आहे...
@Vaibhav Gotal साहेब तुम्हाला तेच सांगणे आहे, कोणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही force नाही करू शकत...आणि Dr. दाभोळ करांनी अंधश्रद्धा निर्मुलनचे काम केले... आणि या प्रसादच्या व्हिडिओ मध्ये अंधश्रद्धा,ढोंग, बुवाबाजी नाही आहे....
प्रसाद, तुझ्या या निसर्ग प्रेमाबद्दल आणि निसर्ग वाचवण्याच्या तळमळीबद्दल तुला खुप खुप धन्यवाद. तुझा प्रत्येक विडीओ तुझ्या आवाजामुळे अजुन उलगडत जातो. धन्यवाद.
हा माणूस खूप Genuine आहे ...फक्त खोटे अवसान आणून बोलण्यापेक्षा खरेच काही आपल्या कोकणासाठी खूप काही करण्याची तळमळ आहे ती यातून दिसते ...अमक्याच्या घरातला अमक्या या सारखे video बघण्यापेक्षा मी मालवणी life आणि कोकणी रानमाणूस हे चॅनेल जास्तीत जास्त बघतो...कारण तेच जीवन आम्ही घरी जगत असतो आपल्या आवडीचे आपल्याला पटणारे विचार हे दोघे जण मोठ्या व्यासपीठावर मांडत असतात...दादा काळजी करू नको आमच्या सारखी पोरं इथेच राहणार आणि आपलं कोकण राखणार
प्रसाद तुला अनेक आशिर्वाद, तुझी कोकणातील अद्भुत शक्तीं बाबत असलेली तळमळ बघून मन भरून आले. आई जगदंबा तुला भरभरून यश देवो अशी प्रार्थना. 🙏🚩जय माता भवानी🙏🚩
हा देशाच्या अस्तित्वाची सुरवातच मुळी , दक्षिणेतून झाली आहे....!!!...अत्यंत समृध्द...माननीय,...समाधानी....आनंदि आणि आत्मविभोर.....!!!....आपण आपली मूळं विसरताच कामा नये.....!!!...
ही आदिवासी संस्कृती ची ओळख आहे कारण सगळ्या ठिकाणी संस्कृती मध्ये थोडा फार बदल असतो पण सगळे आदिवासी समाज हा एकच आहे निसर्ग हाच आपला खरा देव आहे जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🙏 जय निसर्ग देवता🙏🙏🙏🙏🙏🙏
कांतारा....👌🏻.....खरंच खूप काही सांगून जातो हा चित्रपट..... भावा तुझ्या बोलणयातून तुला असणार निसर्ग प्रेम...आपली संस्कृती..याबद्दलची ओढ दिसून येते...❤️
तुमचे विचार ऐकून अक्षरशः डोळयात पाणी आलं, दादा. कांतारा ची अनुभूती जीवाला अशी लागते की त्या अनुभवातून सावरण अशक्य आहे. आणि ही वैश्विक अनुभूती आहे. वैश्विक आहे. ही संपूर्ण भारताची गोष्ट आहे, आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे, आपली संस्कृती आहे. मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्या बद्दल
प्रसाद दादा, तुझ्या या निसर्ग प्रेमाबद्दल आणि निसर्ग वाचविण्याचा तळमळीबद्दल तुझे खूप खूप आभार..🙏 आमच्या नंदुरबारच्या सातपुडा परिसरात सुद्धा आम्हा भिल्लाची राखणदार वाघदेव,गावदेव, डोंगरऱ्यादेव, हिरवादेव आणि भात काढण्याच्या आधी पुजल जाणार खोलो पूजन आश्या आणेक परंपरा आहेत. आमच्या सातपुड्यात जंगल तोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मग ते सरदार सरोवर ड्याम असो किंवा केवडिया कॉलनी प्रोजेक्ट असो आमच्या आदिवस्यांची जमिनी गेल्या, त्यांचं विस्थापण झालं, मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली. आमच्या सातपुड्याला सुद्धा तुझ्या सारखा लढावू निसर्गप्रेमीची गरज आहे. Salute आहे तुझ्या कामाला..👍 जय जंगल जमीन🙏
देवा, मी घाटावर राहतो, पश्चिम महाराष्ट्रात.. गेल्या 30 वर्षात कोंकण पाहतो आहे आणी कोकण मला खूप प्रिय आहे. पण जसे तुम्ही विडियो मध्ये सांगितले, गेल्या काही वर्षामध्ये धनदांडगे, लोभी, ज्याना निसर्गाची चाड नाही अशा लोकांमुळे हळूहळू निसर्गाचा सत्यानाश होताना दिसत आहे. कोकणचे वैशिष्टय असणारी लाल कौले असलेली लाकडी देवळे जाऊन तिथे सीमेंटची चकाचक देवळे आली पण जुन्या देवळामध्ये जाणवणारे पावित्र्य आता जाणवत नाही. देव करो आणी आपल्यासारख्या लोकांमुळे कोकणाचे मूळ वैभव जतन होवो हीच प्रार्थना !
भावा बरोबर बोललास एकदम 🙏 तुझ्या सारखी माणसे देवानेच पाठवले आहे असे मला वाटते आपले कोकण वाचल पाहिजे म्हणून तु आलास... #रानमाणूस. (लवकरच भेटायला येईन भावा तुला)
हा सिनेमा पाहत असताना माझ्या मनात देखील तुम्ही मांडलेले सर्व विचार येत होते परंतु ते फक्त मनातच राहिले पण आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर हे विचार तुमच्या मुखातून ऐकताना फारच ऊर्जा मिळाली.
महाराष्ट्राचा दागिना म्हणजे आपल कोकण जीवन आहे ....हे वेगळच जीवन आहे मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात खूप बिझी असतो पण आपल्याला जीवनात जर समाधान हवं असेल तर कोकणचं राहणीमान जगा ❤
प्रसाद बाळा क्षणभर असं वाटलं की तू बोलत नाहीस तर तुझ्या रूपाने निसर्गच सर्व काही सांगत आहे खूप मनाला भावलं खूप मन भरून आलं ऐकावसं वाटत होतं असं वाटलं की तू निसर्गामध्येच मिक्स होऊन गेलेला आहेस किती कौतुक करू तुझं असाच राहा निर्मळ झऱ्यासारखा प्रेमळ निसर्गाशी एकरूप झालेला तो माझा नातू प्रसाद
तुमच्या आवाजातून तुमची निसर्गाबद्दलची तळमळ जाणवतेय...आणि तुमच्यासारखी तरुण मुलं जर अशा ध्येयाने जर झपाटली तर हे अशक्य नाही ....आणि खरेच निसर्ग हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे,🙏
शेवटी भूत कोला फ़ॉरेस्ट ऑफिसर आणि गावकरांना हाक देऊन सर्वांचे हात हातात घेतो आणि सर्व जण एका मुठीत रहा असे सांगतो हो क्षण ग्रेटच.. मला माझ्या राठीतील वारे सूत्रांची आठवण होते.
हा चित्रपट पाहिला तेव्हाच मनात आलेले.. आज मी जे कनेक्शन जुळवतोय तेच तुझ्या मनातही असणार.. तू व्हिडिओ बनवलास खूप सुंदर केलेस . जो कोकणातल्या मातीशी, निसर्गाशी आपली नाळ जोडून ठेवतो तो प्रत्येक जण ह्या movie शी रीलेट करेल
हे,,,,कोकण काय संपूर्ण भारतातील रान व जंगल वाचविण्यासाठी तुझ्यासारख्यां तरूणांची गरज आहे,,,अतिशय लयबध्द बोलतोस मित्रा ,,,निर्सगाबद्दलची तळमळ बोलण्यातुनच व्यक्त होते God bless you,,
दादा खरंच तुला बोलताना लागलेली धाप बरंच काहीं सांगून जाते आणि ती सगळी शक्ती तुझ्यात संचरलेय, तुझ्यावर प्रसन्न झालेय. या शक्तींनी जागृत होऊन सगळं सुरळीत होओ हिच प्रार्थना🙏🏻🙏🏻 तुझा आजचा आवाज पुन्हा बरंच काही जागृत करून गेला धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
बोलताना धाप लागणे, हे वाईट आरोग्याचे लक्षण आहे. 😀 मला पण हा त्रास व्हायचा ३ वर्ष आधी. पण त्यावर काम केले, आता असा त्रास टेकडी चढते वेळी बोलताना पण होत नाही. 😀
भाऊ तू तुझ्या नेतृत्वाखाली अखिल भारतातील वनराई व पर्यावरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात करून भारतातील वन्यजीवांचा राखणदार हो. व सर्व भारतातील वन्य व रानवासींना एकत्र कर.
प्रसाद , तू केलेल्या कौतुकामुळे मी हा सिनेमा आज पाहिला आणि खरंच एक जबरदस्त अनुभूती आहे सिनेमा चा शेवटचा सीन खूपच भावला जो ती जंगलाची देवता सगळ्यांचा हात हातात घेते तो संदेश तू तुझ्या व्हिडीओ मधून नेहमी देत असतोच
ज्या प्रकारे इतर भाषिक आणि राज्य आपली संस्कृती जपतात व त्याला डोक्यावर मिरवतात त्याचा जय जयकार करतात. तसेच अपन ही अपली परंपरेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपल्याला आपल्या कोकणची आपल्या भूमीची गाथा अशीच अभिमानाने जगाला सांगता आली पाहिजे... मला रांमनुस या संकल्पाने च्या माध्यमातून खूप ऊब मिळते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा.. आई भवानी तुला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना....🙏 🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
As you correctly said whole Konkan region including Maharashtra, Coastal Karnataka nd Kerala where we worship Bhootha in different names but it is same tradition nd spirit of Daivva all of us wirship since 1000 years. I am originally from Mangalore. We in South Kanara district Udipi nd Mangalore come from different parts of India nd abroad for Kola rituals every year nd Bhootha Kola gives us special spirit of Bhakti and all people from all casts take part in this rituals. Thank you for giving very good reaction in Marathi. And hope Marathi film directors will also make film like this inMarathi.
प्रसाद खरोखरच तु खूप छान बोलतोस मला तूझे व्हिडिओ खूप आवडतात पण या अगोदर एक मराठी चित्रपट शिमगा हा आपल्या कोकणि माणसाने काढला होता.तो कदाचित तूम्हापरेत पोचला नसेल .तर तू तो एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं असं खूप काही तरी नवीन लेखन या माणसाने शिमगा चित्रपटात सांगितले आहे त्याच्यावर तू काही तरी बोलावे असे मला वाटते
प्रसाद, आज मी कांतारा पहिला, आणि त्यावेळी सर्वात आधी तुझी आणि तुझ्या कामाची आठवण झाली.... आणि आता तुझा हा व्हिडिओ पहिला... खूप छान ... तुझ्या या पवित्र कामाला खूप साऱ्या शुभेच्छा.....
आपले पूर्वज निसर्गाला देव मानतात हे उगीच नाही .जिवनाचे सार ( अर्थ ) हाच निसर्ग आपणास आनंद देतो हेच सत्य आहे . पून्हा धन्यवाद आपणास .नवीन विषय निवड केली .जी माहिती पाहिजे तीच दिली आहे. खरच फार आभारी आहोत .
विनाशकारी रिफायनरी आणि प्रकल्प कोकणात आणणाऱ्या लोकप्रतिनिधी नेते प्रशासन आणि दलालनचो काटो साफ मोडू देते ही कोकणातील सर्व देवस्थानाकडे कळकळीची विनंती. 🙏💐 एकच जिद्द रिफायनरी रद्द 💐🙏
हे विवेचन ऐकल्यानंतर चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि, ह्या सर्व शक्ती आमच्या कोकणात वास्तव रुपात आजही शाबूत आहेत आणि राहतील. देवचार आणि जागेवाला यांचे अनेक अनुभव एकले आहेत.
This is a wakeup call. A lot has already been lost in the name of "development". However it is destruction. Remember that nature does not need us. It is us humans who need nature. Kudos to the makers of Kantara. Brilliant movie.
प्रसाद भाऊ मी पण हा चित्रपट बघितला आणि ज्या तळमळीने तू बोलतोयस अगदी तंतोतंत तीच तळमळ मला सुद्धा जाणवते असं वाटतं माझ्या भावना तुझ्या शब्दातून व्यक्त होत आहेत
As u said there is similarity of nature protecting daivas in konkan till kasargod mangalore . Being from udupi village , but konkani mother tongue, revered both family gods as well these daivas ,nagas . Seen kharvy and tribal marathi celebrating holi dancing praising these daivas aa well as locals conducting bhoota kolas. There is a need for dubbing this film into konkani or malwani to prepare konkanies to understand urgency of nature preservation.
माझ्या निसर्गवेड्या मित्रा... आज तुला उभा राहून सॅल्युट... 🙏 कोकणातील निसर्गाचा ठेवा वाचविण्यासाठी तू घरादारा कडे पाठ फिरवून पायाला चक्र लावल्यागत रानावनात भटकंती करतोस... लोकांना सतत विनवणी करतोस. वेळप्रसंगी निसर्ग वाचविण्यासाठी दोन हात करण्याची तुझी तयारी असते. तुझी ही तळमळ आणि तडफड पाहून तुझा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो.. आज तुझ्या आवाजातील कंप आणि बोलताना तुला लागलेली धाप पाहून कंठ दाटून आला. (आता माझ्या उतार वयात हे असं अनेकवेळा घडतं) .. तू सुचविलेला सिनेमा आम्ही सर्व कुटुंबीय नक्कीच पाहू.. 🙏🚩❤️👍😊
एकदम खरे।
महाराष्ट्राने प्रसाद दादचा सत्कार करायलाच पाहीजे , निर्सगाविषयी जनजाग्रुती करणारा, निसर्गाचे महत्व लोकांना तळमळुन सांगतो
PRASAD DADA, SALUTE TO YOU. 🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदीखरे आहे .अंगावर काटा येत होता प्रसाद तुझे बोलणे ऐकताना . आपण प्रगती करतो आहोत की अधोगती तेच कळेनासे झाले आहे . प्रसाद तुला खूप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद
हा चित्रपट नाही हा एक विचार आहे आणि आपल्या प्रत्येकाला भेडसावू जातो, जेंव्हा शिवा चे वडील त्याला सांगतात की ज्या वेळेस माणसाला ह्याची प्रचिती होईल, की हे जे काही निर्माण केला आहे ते दैव ने निर्माण केला आहे आणि ते त्याचाच आहे आपण फक्त सेवेकरी आहोत. हा विषय महत्त्वाचा आहे. Dhanywad 🙏
खर आहे
Very true
@Vaibhav Gotal मनाचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे...???
@Vaibhav Gotal माझे सुद्धा तेच बोलणे आहे,जसे मन, आत्मविश्वास, इच्छा, बुध्दी दिसत नाही तसेच देवांचे त्यांच्यावरील श्रध्देचे आहे ..आपण कोणाला force नाही करू कोणाचे व्हिडिओ बघून विचार करायला सांगण्याचा...पटले तर पहावे किंवा सोडून द्यावे..आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण शहरात राहतो म्हणजे आपल्यालाच जास्त कळते असे वाटते... गावातली माणसं अडाणी, निर्बुद्ध....हे माझे वैयक्तिक मत आहे...
@Vaibhav Gotal साहेब तुम्हाला तेच सांगणे आहे, कोणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही force नाही करू शकत...आणि Dr. दाभोळ करांनी अंधश्रद्धा निर्मुलनचे काम केले... आणि या प्रसादच्या व्हिडिओ मध्ये अंधश्रद्धा,ढोंग, बुवाबाजी नाही आहे....
काळीज भारून गेलय तुमच्या आवाजाने ! कालच हा चित्रपट पाहून आलोय ! त्यातले मर्म खोल पर्यंत भिनलय ! तुमच्या आवाजातली खोली कांतारातील शिवाची मनस्थीती व्यक्त करतेय. खर तर तुमचे भुत कोला दैवच सकल मानवजातीचे आदिपुरूष आहेत...!
प्रसाद, तुझ्या या निसर्ग प्रेमाबद्दल आणि निसर्ग वाचवण्याच्या तळमळीबद्दल तुला खुप खुप धन्यवाद. तुझा प्रत्येक विडीओ तुझ्या आवाजामुळे अजुन उलगडत जातो. धन्यवाद.
हा माणूस खूप Genuine आहे ...फक्त खोटे अवसान आणून बोलण्यापेक्षा खरेच काही आपल्या कोकणासाठी खूप काही करण्याची तळमळ आहे ती यातून दिसते ...अमक्याच्या घरातला अमक्या या सारखे video बघण्यापेक्षा मी मालवणी life आणि कोकणी रानमाणूस हे चॅनेल जास्तीत जास्त बघतो...कारण तेच जीवन आम्ही घरी जगत असतो आपल्या आवडीचे आपल्याला पटणारे विचार हे दोघे जण मोठ्या व्यासपीठावर मांडत असतात...दादा काळजी करू नको आमच्या सारखी पोरं इथेच राहणार आणि आपलं कोकण राखणार
प्रसाद तुला अनेक आशिर्वाद, तुझी कोकणातील अद्भुत शक्तीं बाबत असलेली तळमळ बघून मन भरून आले. आई जगदंबा तुला भरभरून यश देवो अशी प्रार्थना. 🙏🚩जय माता भवानी🙏🚩
हा देशाच्या अस्तित्वाची सुरवातच मुळी , दक्षिणेतून झाली आहे....!!!...अत्यंत समृध्द...माननीय,...समाधानी....आनंदि आणि आत्मविभोर.....!!!....आपण आपली मूळं विसरताच कामा नये.....!!!...
ही आदिवासी संस्कृती ची ओळख आहे कारण सगळ्या ठिकाणी संस्कृती मध्ये थोडा फार बदल असतो पण सगळे आदिवासी समाज हा एकच आहे
निसर्ग हाच आपला खरा देव आहे
जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🙏
जय निसर्ग देवता🙏🙏🙏🙏🙏🙏
कांतारा....👌🏻.....खरंच खूप काही सांगून जातो हा चित्रपट..... भावा तुझ्या बोलणयातून तुला असणार निसर्ग प्रेम...आपली संस्कृती..याबद्दलची ओढ दिसून येते...❤️
तुमचे विचार ऐकून अक्षरशः डोळयात पाणी आलं, दादा. कांतारा ची अनुभूती जीवाला अशी लागते की त्या अनुभवातून सावरण अशक्य आहे. आणि ही वैश्विक अनुभूती आहे. वैश्विक आहे. ही संपूर्ण भारताची गोष्ट आहे, आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे, आपली संस्कृती आहे. मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्या बद्दल
प्रसाद दादा, तुझ्या या निसर्ग प्रेमाबद्दल आणि निसर्ग वाचविण्याचा तळमळीबद्दल तुझे खूप खूप आभार..🙏 आमच्या नंदुरबारच्या सातपुडा परिसरात सुद्धा आम्हा भिल्लाची राखणदार वाघदेव,गावदेव, डोंगरऱ्यादेव, हिरवादेव आणि भात काढण्याच्या आधी पुजल जाणार खोलो पूजन आश्या आणेक परंपरा आहेत. आमच्या सातपुड्यात जंगल तोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मग ते सरदार सरोवर ड्याम असो किंवा केवडिया कॉलनी प्रोजेक्ट असो आमच्या आदिवस्यांची जमिनी गेल्या, त्यांचं विस्थापण झालं, मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली. आमच्या सातपुड्याला सुद्धा तुझ्या सारखा लढावू निसर्गप्रेमीची गरज आहे. Salute आहे तुझ्या कामाला..👍 जय जंगल जमीन🙏
देवा, मी घाटावर राहतो, पश्चिम महाराष्ट्रात.. गेल्या 30 वर्षात कोंकण पाहतो आहे आणी कोकण मला खूप प्रिय आहे. पण जसे तुम्ही विडियो मध्ये सांगितले, गेल्या काही वर्षामध्ये धनदांडगे, लोभी, ज्याना निसर्गाची चाड नाही अशा लोकांमुळे हळूहळू निसर्गाचा सत्यानाश होताना दिसत आहे. कोकणचे वैशिष्टय असणारी लाल कौले असलेली लाकडी देवळे जाऊन तिथे सीमेंटची चकाचक देवळे आली पण जुन्या देवळामध्ये जाणवणारे पावित्र्य आता जाणवत नाही. देव करो आणी आपल्यासारख्या लोकांमुळे कोकणाचे मूळ वैभव जतन होवो हीच प्रार्थना !
मी रहाते मुंबईत पण माझा वेतोबा वर पूर्ण विश्वास आहे. हि ताकतच आता आपल्या कोकणातील निसर्गाला वाचावेल. 🙏🙏
भावा बरोबर बोललास एकदम 🙏 तुझ्या सारखी माणसे देवानेच पाठवले आहे असे मला वाटते आपले कोकण वाचल पाहिजे म्हणून तु आलास... #रानमाणूस. (लवकरच भेटायला येईन भावा तुला)
Ha ha ha
हा सिनेमा पाहत असताना माझ्या मनात देखील तुम्ही मांडलेले सर्व विचार येत होते परंतु ते फक्त मनातच राहिले पण आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर हे विचार तुमच्या मुखातून ऐकताना फारच ऊर्जा मिळाली.
महाराष्ट्राचा दागिना म्हणजे आपल कोकण जीवन आहे ....हे वेगळच जीवन आहे मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात खूप बिझी असतो पण आपल्याला जीवनात जर समाधान हवं असेल तर कोकणचं राहणीमान जगा ❤
तुमच्या बोलण्यावरून जाणवतंय तुम्ही किती भारावला आहेत हा चित्रपट पाहून.निसर्गाविषयी,संस्कृतीविषयी प्रेम,आदर पाहून मी सुद्धा अक्षरशः भारावलोय.
भाऊ तुमची तळमळ पाहीली आणि डोळ्यात अश्रू आले। परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो।
शक्ती देवो।
प्रसाद बाळा क्षणभर असं वाटलं की तू बोलत नाहीस तर तुझ्या रूपाने निसर्गच सर्व काही सांगत आहे खूप मनाला भावलं खूप मन भरून आलं ऐकावसं वाटत होतं असं वाटलं की तू निसर्गामध्येच मिक्स होऊन गेलेला आहेस किती कौतुक करू तुझं असाच राहा निर्मळ झऱ्यासारखा प्रेमळ निसर्गाशी एकरूप झालेला तो माझा नातू प्रसाद
तुमच्या आवाजातून तुमची निसर्गाबद्दलची तळमळ जाणवतेय...आणि तुमच्यासारखी तरुण मुलं जर अशा ध्येयाने जर झपाटली तर हे अशक्य नाही ....आणि खरेच निसर्ग हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे,🙏
Apratim vaktavya mitra ... Nisarga prem baghun aanandacha anubhuti jhali ... Dhanyawad
शेवटी भूत कोला फ़ॉरेस्ट ऑफिसर आणि गावकरांना हाक देऊन सर्वांचे हात हातात घेतो आणि सर्व जण एका मुठीत रहा असे सांगतो हो क्षण ग्रेटच.. मला माझ्या राठीतील वारे सूत्रांची आठवण होते.
निसर्गवेड्या मित्रा तुला मनापासून दंडवत
#मित्रा, तुझे शब्द आणि शब्द हृदयाला भिडले...
#मी पण रान-माणूस
हा चित्रपट पाहिला तेव्हाच मनात आलेले.. आज मी जे कनेक्शन जुळवतोय तेच तुझ्या मनातही असणार.. तू व्हिडिओ बनवलास खूप सुंदर केलेस . जो कोकणातल्या मातीशी, निसर्गाशी आपली नाळ जोडून ठेवतो तो प्रत्येक जण ह्या movie शी रीलेट करेल
हे,,,,कोकण काय संपूर्ण भारतातील रान व जंगल वाचविण्यासाठी तुझ्यासारख्यां तरूणांची गरज आहे,,,अतिशय लयबध्द बोलतोस मित्रा ,,,निर्सगाबद्दलची तळमळ बोलण्यातुनच व्यक्त होते God bless you,,
प्रसाद तू किती निसर्ग वाचवण्याचा तळमळीने प्रयत्न करतो आहेस.सलाम तुला.आणि तुला यश मिळो
दादा खरंच तुला बोलताना लागलेली धाप बरंच काहीं सांगून जाते
आणि ती सगळी शक्ती तुझ्यात संचरलेय, तुझ्यावर प्रसन्न झालेय. या शक्तींनी जागृत होऊन सगळं सुरळीत होओ हिच प्रार्थना🙏🏻🙏🏻
तुझा आजचा आवाज पुन्हा बरंच काही जागृत करून गेला
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
बोलताना धाप लागणे, हे वाईट आरोग्याचे लक्षण आहे. 😀
मला पण हा त्रास व्हायचा ३ वर्ष आधी. पण त्यावर काम केले, आता असा त्रास टेकडी चढते वेळी बोलताना पण होत नाही. 😀
हे खरंच आहे... मारुती चितमपल्ली साहेब यांचं लिखाण असलेली पुस्तकं - साहित्य नक्की सर्वांनी वाचावं असच आहे... ♥️♥️♥️
Kharach ahe tuja sarake lok pude yayachi aajachi garaj ahe kokan save karayala Prasad da
❤bhava sarke.... Amche lok visarpk lhglya pun tenka hai kalpk jay
T
भाऊ तू तुझ्या नेतृत्वाखाली अखिल भारतातील वनराई व पर्यावरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात करून भारतातील वन्यजीवांचा राखणदार हो. व सर्व भारतातील वन्य व रानवासींना एकत्र कर.
BIG LIKE
PRASAD BHAU
I❤️ NATURE
प्रसाद , तू केलेल्या कौतुकामुळे मी हा सिनेमा आज पाहिला आणि खरंच एक जबरदस्त अनुभूती आहे सिनेमा चा शेवटचा सीन खूपच भावला जो ती जंगलाची देवता सगळ्यांचा हात हातात घेते तो संदेश तू तुझ्या व्हिडीओ मधून नेहमी देत असतोच
तुझं निसर्गावरचं प्रेम खूप नैसर्गिक आहे.... तुझ्या तळमळतून जाणवतं ते... तुझ्या कार्याला शतशः प्रणाम मित्रा....!
ज्या प्रकारे इतर भाषिक आणि राज्य आपली संस्कृती जपतात व त्याला डोक्यावर मिरवतात त्याचा जय जयकार करतात. तसेच अपन ही अपली परंपरेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे.
आपल्याला आपल्या कोकणची आपल्या भूमीची गाथा अशीच अभिमानाने जगाला सांगता आली पाहिजे...
मला रांमनुस या संकल्पाने च्या माध्यमातून खूप ऊब मिळते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा.. आई भवानी तुला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना....🙏
🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
Houddho Huliyaa
🙏 खुप छान
कोंकणी रानमाणुस चा आता पर्यंतचा सर्वात छान विडीओ 👌🏻
प्रसाद नमस्कार , मि हा सिनेमा पाहिला आहे तसेच साल गावची कड्यांची जत्रा पाहिली आहे. अदभुत अनूभव आहे.
मित्रा मी कोकणातला नाही, पण तू जे बोललास ते खूप भावल. खरंच ही योग्य वेळ आहे पुन्हा एकदा आपल्या मूळ संस्कृतीचा अवलंब करण्याची ..
एक एक शब्द अंगावर शहारे आणणारा...!💗
As you correctly said whole Konkan region including Maharashtra, Coastal Karnataka nd Kerala where we worship Bhootha in different names but it is same tradition nd spirit of Daivva all of us wirship since 1000 years. I am originally from Mangalore. We in South Kanara district Udipi nd Mangalore come from different parts of India nd abroad for Kola rituals every year nd Bhootha Kola gives us special spirit of Bhakti and all people from all casts take part in this rituals.
Thank you for giving very good reaction in Marathi. And hope Marathi film directors will also make film like this inMarathi.
Goa also
तुम्ही सांगितलेलं शब्द नी शब्द हा खरा आहे.....
कांतारा, एक सत्य व अद्भूत
कोकण म्हणजेच स्वर्ग . जिकंलसाओ 🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌
फार उपयुक्त माहिती आहे दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌
प्रसाद खरोखरच तु खूप छान बोलतोस मला तूझे
व्हिडिओ खूप आवडतात पण या अगोदर एक मराठी चित्रपट शिमगा हा आपल्या कोकणि माणसाने काढला होता.तो कदाचित तूम्हापरेत पोचला नसेल .तर तू तो एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं असं खूप काही तरी नवीन लेखन या माणसाने शिमगा चित्रपटात सांगितले आहे त्याच्यावर तू काही तरी बोलावे असे मला वाटते
प्रसाद आपले संभाषण ऐकून अंग शहरले 🙏🚩आपल कोकण आज साबूत आहे ते या देवाचार आणि राखणदार आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या देवतांची शक्ती.
🙏🙏जगदंब 🙏🚩
Ek dum changale explanation good human being aawaj madhey bhakti aahe keep it up very nice
प्रसाद, आज मी कांतारा पहिला, आणि त्यावेळी सर्वात आधी तुझी आणि तुझ्या कामाची आठवण झाली.... आणि आता तुझा हा व्हिडिओ पहिला... खूप छान ... तुझ्या या पवित्र कामाला खूप साऱ्या शुभेच्छा.....
🚩❤️दुपारीच तुझा हा व्हिडिओ पहिला आणि आता संध्याकाळ चा " कांतारा " शो पाहून आलोय....👍🏻 शब्दच नाहीत.....🌴🏞️
खूप मनापासून तू तुझे विचार मांडलेस 👍🏻तुझ्या संपूर्ण कामासाठी खूप शुभेच्छा 😊ही देवराई सदैव पाठीशी अशीच असावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼
Khup chaan bhau nemke hech sangayache hote
आदिवासी आज पण निसर्गाला पुजात... निसर्गाला देव मानतात...
जल जंगल जमीन यही हमारी पहचान है इसलिए गर्व से कहते हैं हम आदिवासी हैं
Jabardast movie. Sarvani ha movie pahila pahije. Salute to whole team.
अरे भावा किती भावनिक होऊन बोललास रे! कडक! मी सुद्धा भाऊक झालो तुझे हे विचार ऐकून. लय भारी राव. खूप निसर्गावर प्रेम करतोस तू. ❤️❤️
मी शक्यतो चित्रपट बघत नाही.. पण हा नक्की बघणार. 👌👌💐💐🙏🙏
भावा तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे तुझ्या व्हिडिओ मी अगदी मनापासून बगतो.
Jai Tulunadu ❤️ Jai Chhatrapati Shivaji Maharaj ❤️🙏
Really Bro whole Konkan and coastal belt is beautiful, people are humble, cool, peaceful like our beautiful nature.
खूप मोठं काम करतोस तु ज्याला खरोखर तोड नाही. ज्या पोट तिडकीने तू सांगतोस तुझ्या हातून नक्कीच great मोठं कार्य होणार हे निश्चित
Prasad sir salute tumhala
सिंधुदुर्ग गोवा कर्नाटकामधे जवळजवळ एकच संस्कृती आहे...आपले देवचार राखणदार अवसार चव्हाटा...जय गिरोबा...जय आर्यादुर्गा...
Kokanat ahe as ajun hi....anubhav ahe bhava🏞🏝🏕💚
आपले पूर्वज निसर्गाला देव मानतात हे उगीच नाही .जिवनाचे सार ( अर्थ ) हाच निसर्ग आपणास आनंद देतो हेच सत्य आहे . पून्हा धन्यवाद आपणास .नवीन विषय निवड केली .जी माहिती पाहिजे तीच दिली आहे. खरच फार आभारी आहोत .
निशब्द होतो तुझे निसर्ग प्रेम पाहून आणि ते वाचावे यासाठी असणारी तळमळ पाहून
🙂👌Superlike nice video bhava 🌸🌺🙏🌺🌸
🙏खरा रे बाबा आणि तुझी कोकण निसर्गा बद्दल तळमळ 🙏निःशब्द 🙏
आजच हा मुव्ही पहिला ...अंगावर काटा आणणारा मूवी ...🙌🙌
विनाशकारी रिफायनरी आणि प्रकल्प कोकणात आणणाऱ्या लोकप्रतिनिधी नेते प्रशासन आणि दलालनचो काटो साफ मोडू देते ही कोकणातील सर्व देवस्थानाकडे कळकळीची विनंती.
🙏💐 एकच जिद्द रिफायनरी रद्द 💐🙏
प्रसाद ,
तु निसर्गमय झाला आहेस हे शब्दा शब्दातुन जाणवते .
देव बरें करो.
Best youtuber in kokan malwani life nd kokani ranmanus .
Pani aal dolyat mittra. Tuja kharepna khupch bhavla. 🙏🙏
खूपच मनाला भावणारं 🙏🙏 विचार करायला लावणारं 🙏🙏
👍 Best explanation of our "KONKANI" traditions.(Parampara /Manyata) beings konkani proud of you. 🙏
Khup chan vishay mandla....vichar karayla lavnya sarkha
जय कोकण
Very nice 👍
Bhav nisarga 100% vachvnrch khup avad ya mansala sanskruti japat ❤
अगदी मनातलं बोललात...
आपल्या भागातील रीतीरिवाज चांगल्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद.
Love from Kanur khurd
हे विवेचन ऐकल्यानंतर चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आणि, ह्या सर्व शक्ती आमच्या कोकणात वास्तव रुपात आजही शाबूत आहेत आणि राहतील.
देवचार आणि जागेवाला यांचे अनेक अनुभव एकले आहेत.
सुंदर सिनेमा .जरुर बघा
तुझ वाक्यन वाक्य सत्य आहे देव तुझा भला करो आणी हा चित्रपट तळ कोकणात घेवून जातो
मित्रा,प्रसाद तुझ्या पोटतिडकीने सांगण्याच्या विचारांनी ,तुझं निसर्गा विषयीचं प्रेम जाणवत खूपच छान आम्ही तुझ्या सोबत आहोत
माझ्या भावा कोकण आणि त्याच्या निसर्गाची तळमळ मांडतोस तेव्हा उर भरून येतो.
अगदी बरोबर्... शब्द नहित.. 🙏
Prasad sir nice video
thanks
व्हीडिओ बनवतांना बहुतेक ती spritual शक्ती तुझात संचारली आहे असं वाटतं। रानमाणुस
Love you कोकण.... 💋💋💋हिरवा syadyari...
जल जंगल जमीन येही हमारी पहचान है .. एसलिये हाम गर्वसे कहते हाम आदिवासी है .... हाम जंगल को पुजते है ...
Me swata ha movie 3 vela bagitala just beacuse you recomended us hatsoff aplya kokanat pan ashe vishay ahet khup jyavar oscar milu shakat
This is a wakeup call. A lot has already been lost in the name of "development". However it is destruction.
Remember that nature does not need us. It is us humans who need nature.
Kudos to the makers of Kantara. Brilliant movie.
Yes Sir
Amchya Konkan Goa pann khup Ashe devule ahe, Amche rakhandaar, please 🙏come to Goa go share real history of Gomantak ❤️
प्रसाद आम्हाला तुझा अभिमान आहे
प्रसाद भाऊ मी पण हा चित्रपट बघितला आणि ज्या तळमळीने तू बोलतोयस अगदी तंतोतंत तीच तळमळ मला सुद्धा जाणवते असं वाटतं माझ्या भावना तुझ्या शब्दातून व्यक्त होत आहेत
Kharech khup sundar chitrapat aahe.. Aani ha baghtana aapalya kokanchi athvan yete 👍
Prasad we need more people like you to save our beautiful kokan. Please form a community where we can join n contribute in whichever way possible.
I think pratekane Prasad honyachi khari garaj aahe.ajunhi aaplyakade wel aahe.
modi ko bata bhai
Shri Dev Jaitir prasanna 🙏 #tulas gaav #vengurla
Hi I'm from Udupi, my ancestors were from Rajapur, Ratnagiri Belongs to Saraswat Brahman
What superb movie... Once should watch. Really worth watching
जंगल वाचवणं की येणाऱ्या काळाची गरज आहे..नाहीतर माणसा श्वास घेण्यासाठी तरसतील..
As u said there is similarity of nature protecting daivas in konkan till kasargod mangalore . Being from udupi village , but konkani mother tongue, revered both family gods as well these daivas ,nagas . Seen kharvy and tribal marathi celebrating holi dancing praising these daivas aa well as locals conducting bhoota kolas. There is a need for dubbing this film into konkani or malwani to prepare konkanies to understand urgency of nature preservation.
I can feel the raised heartbeats while you talk bro ,me pan baghitalay picture angat kahitari sancharlya sarkh vatat hota
Salute you............... रानमाणसा