रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • "संहितेतील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांच्या व्याकरणापलीकडे जाऊन नटांना व्यक्तीरेखेचं व्याकरण समजून घ्यायला मदत करणं हे दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे असं मी मानतो ".
    विजय केंकरे
    १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेल्या ऑथेल्लो ह्या नाट्यकृतीपासून आजतागायतच्या प्रदीर्घ दिग्दर्शकीय प्रवासात विजय सरांनी 'ससा आणि कासव', 'ढोलताशे', 'सुंदर मी होणार', 'श्रीमंत', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'लेकुरे उदंड झाली', 'संगीत पूर्णावतार' , 'नकळत सारे घडले', 'जावई माझा भला', 'हा शेखर खोसला कोण आहे', 'तीन पायांची शर्यत' यांसारखी ९० हून अधिक बहुढंगी नाटकं सादर केली आहेत.
    संहितेतील शब्दांपलीकडे जाऊन दृश्यात्मक मार्गाने नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोचावा यावर विजय सरांचा भर असतो. त्यासाठी ते सूचक नेपथ्य, नटांचे अर्थपूर्ण आकृतिबंध, नेमक्या हालचाली आणि कथानक उलगडण्याची लय ह्या सर्व बाबींचा कसा वापर करतात ह्याबद्दल आजच्या भागात समजून घेता येईल. त्याचबरोबर नव्या-जुन्या लेखकांबरोबर आणि नटांबरोबर काम करताना अत्यंत खेळीमेळीचं आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्यामागची त्यांची भूमिकाही जाणून घेता येईल.
    अनेक वर्षं पाश्चात्य रंगभूमीवरील विविध नाट्यप्रयोग साक्षेपीपणे पाहून "त्यांची नाटकं: वेस्ट एन्ड व्ह्याया ब्रॉडवे' हे पुस्तक विजय सरांनी लिहिलं आहे. एक मराठी रंगकर्मीं म्हणून पाश्चात्य नाट्यव्यवहार आणि सादरीकरणापैकी विजय सरांना काय भावले आणि शिकायला मिळाले तेही ऐकूया आजच्या भागात.

ความคิดเห็น • 64

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 2 ปีที่แล้ว +6

    इतकी प्रदीर्घ मुलाखत ऐकताना क्षणभर ही कंटाळा आला नाही.त्यांच्या सहज सोप्या पद्धतीने उदाहरणे देऊन सांगण्याने खूप इंटरेस्टिंग वाटत होते. इतक्या बहु आयामी व्यक्तीचे विचार घर बसल्या ऐकायला मिळाले, हे नव्या टेक्नॉलॉजी चे आणि तुमचे आभार मानावे तितके कमीच. विजय सरांना परमेश्वर दीर्घायू करो आणि तरुण पिढीला प्रेरणादायी अनुभव मिळावा अशी इच्छा. धन्यवाद.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว +8

    मी भाषाशिक्षिका आहे. व्याकरण शिकवताना नियमाकडून उदाहरणांकडे किंवा उदाहरणांकडून नियमाकडे अशा पद्धतीने शिकवायला येतं. केंकरेंनी बरोब्बर उदाहरणांतून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोपं केलं नियम सांगितला

  • @jayashrigite4726
    @jayashrigite4726 2 ปีที่แล้ว

    Vijay Kenkre सरांचा ha गप्पांमधून खुपच छान माहिती व खरच सरांच्या स्मरण शक्ती सलाम!छनच श्रवणीय मुलाखत...!

  • @ADIT00005
    @ADIT00005 2 ปีที่แล้ว

    Excellent. Out of the world

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 2 ปีที่แล้ว +4

    सरांची मुलाखत ही चहुअंगानी व्याप्त अशी होती. मधुराणी तुझं विशेष कौतुक की तू अशा मान्यवरांच्या मुलाखती अतिशय उत्तम पद्धतीने आमच्यासमोर आणतेस .धन्यवाद .

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      अर्चना जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
      आम्ही सादर केलेलं तुम्हाला आवडतंय ह्याचा आनंद आहे.
      अर्थात, खरं श्रेय सगळं मोठ्या मनाने सहभागी होऊन आपलं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणार्‍या मान्यवरांचंच!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @archanamuley5399
      @archanamuley5399 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhari नक्कीच !...मी प्रत्येक मुलाखत अगदी तन्मयतेने बघते व येणार्या मुलाखतीची उत्सुकता मनात ठेवून असते. आपणास मनःपूर्वक धन्यवाद.

  • @cadhanashreeratnalikar2285
    @cadhanashreeratnalikar2285 2 ปีที่แล้ว

    एखादी मुलाखत संपूच नये असं वाटतं, तशी आहे ही मुलाखत. संग्रही ठेवावी अशी. मुलाखत काशी द्यावी हा सुद्धा परिपाठ असू शकतो हा... निव्वळ अप्रतिम

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत!
    धन्यवाद रंगपंढरी!!

  • @ranjitlatasunil1917
    @ranjitlatasunil1917 2 ปีที่แล้ว

    ज्यांना उत्तम दिग्दर्शक, उत्तम नाटककार व्हायचं आहे त्यांनी एखाद्या संस्थेत प्रशिक्षण घेण्यापूर्वी या मुलाखतीची पारायणं करणं अनिवार्य आहे....वा विजय सर...खूपच सोप्या भाषेत महत्वपूर्ण मार्गदर्शन आपण केलं आहे...👍

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      रणजीत जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! 🙏

  • @madhavikulkarni334
    @madhavikulkarni334 ปีที่แล้ว

    तीनही भाग अतिशय सुंदर.

  • @GargeeBhandareWadhwani
    @GargeeBhandareWadhwani ปีที่แล้ว

    Wah wah! 🙏🏼

  • @padmajaprabhu8026
    @padmajaprabhu8026 2 ปีที่แล้ว

    सर्वोत्कृष्ट मुलाखत! मी खूपच भारून जाऊन , पूर्ण एकचित्त करून , मनापासून रंगून जाऊन ही मुलाखत ऐकली. रंगपंढरीचे आणि त्याहूनही खूप जास्त विजय केंकरे यांचे मनापासून आभार 🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว +3

    समृद्ध सपृद्ध समृद्ध 🙏🏻
    ३ भागात मुलाखत केलीत ते फार बरं केलंत. अभिनंदन

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 ปีที่แล้ว +1

    इतकी उदाहरण दाखल मुलाखत पण worth listening.... अशीच संपूर्ण संपूर्ण मुलाखत मिळावी.

  • @rohinin2694
    @rohinin2694 2 ปีที่แล้ว +1

    You are great director, but great human being too. How one can be so grounded. Just great 🙏

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 ปีที่แล้ว

    Great 👌👍

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 ปีที่แล้ว

    विजय केंकरे सरांचे तीनही भाग पाहिले. भारावून गेले. स्तुत्य कार्यक्रम. अनेक अनेक शुभेच्छा

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी. 🙏

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ! एवढं चिंतन करून नाटक बसवणारे फार थोडे. शिवाय त्यांना तेवढेच चांगले संगीतकार , नेपथ्यकार मिळाले. या साऱ्यांमुळे मराठी रंगभूमी एक उत्कृष्ट रंगभूमी आहे.
    मधुराणीताई, आपण फार चांगलं काम करत आहात.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      कविता जी,
      प्रतिक्रियेबद्दल आभार! कार्यक्रम असाच पाहत रहा आणि इतरांनाही सांगा. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sheetal8140
    @sheetal8140 2 ปีที่แล้ว +1

    Such a wonderful experience.........great work....best wishes

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 2 ปีที่แล้ว

    तिन्ही भागांची अतिशय सुंदर अणि ओघवती मुलाखत! मधुराणी mam चे प्रश्न पण थोडेसे वेगळे अणि माहिती मिळेल असे होते. विजय सर प्रत्येक प्रश्नाला भरभरून उदाहरणं देऊन उत्तर देत होते त्यामुळे समजायला सोपे जात होते. फारच अप्रतिम!

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 ปีที่แล้ว

    Aprarima!!!! Dnyanacha athang Sagar! Aikat rahavese vatat hote... Manapasoon Dhanywaad, Team"Rang Pandhari"!🙏🏼🙏🏼

  • @rangler68
    @rangler68 2 ปีที่แล้ว

    आधी तीन भाग मिळून एकच कमेंट लिहिणार होतो, परंतु एकंदरीतच या मुलाखतीचा आवाका बघून तीन वेगवेगळ्या कमेन्ट्स लिहितोय.
    तुफान मुलाखत.....!! चाबूक....!! निर्विवादपणे...😃
    विलंबित ख्याल ऐकताना जसे आपण सवा- दिड तास मंत्रमुग्ध होऊन खिळून राहतो तसे ही मुलाखत ऐकताना झाले. प्रचंड माहितीने ठासून भरलेला हा संवाद, एकदाही विषय सोडून न भरकटता शेवटास पोचला !! रंगपंढरी टीमचे हार्दिक अभिनंदन आणि अगणित शुभेच्छा !!

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या तिन्ही कमेन्ट्स सुद्धा चाबूक 😊🙏💜! खूप खूप धन्यवाद.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว

    Wonderful wonderful wonderful example of his father सारी रात नाटकाच्या नेपथ्याची कहाणी
    शाकुंतलचं उदाहरण 👌🏻👌🏻

  • @leelahadap6680
    @leelahadap6680 2 ปีที่แล้ว

    विजय तुझी मुलाखत अतिशय अभ्यासपूर्वक झाली .म्हणजे ग्रेटः ग्रेट !ग्रेट शब्दही अपुरा वाटेल....

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, लीला ताई 🙏💜

  • @padmajakamat1355
    @padmajakamat1355 2 ปีที่แล้ว

    You are doing amazing work Madhurani. This interview particularly was most enlightening. Kudos. 🌷🌷🌷

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว

    Wonderful! Great interview! Mr. kenkare’s memory is amazing.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 2 ปีที่แล้ว

    मधुराणीजी, विजय केंकरेंची मुलाखत रंगपंढरीत घेऊन तुम्ही आम्हाला दिवाळीची ही मौल्यवान भेट दिली आहेत आणि तीही तीन भागात. खूप खूप आभारी आहे. तीन भाग होऊन सुद्धा केंकरे साहेबांची मुलाखत अर्धवट वाटते. आणखी खुप काही माहिती त्यांच्याकडून मिळाली असती. त्यांची समजवून सांगण्याची धाटणी सुंदरच आहे. खूप छान मुलाखत झाली. केंकरे साहेब एक अजब रसायन आहे. त्यांची दिग्दर्शनातील घोडदौड अशीच यशस्वी पणे पुढे पुढे होत राहो हीच सदिच्छा. तुम्हाला, केंकरेसाहेबांना व तुमच्या रंगपंढरीच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 👌👌🙏🙏🌹💐🎉🎊

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद संध्या जी!
      रंगपंढरी हे केवळ एक माध्यम किंवा व्यासपीठ आहे. ज्याद्वारे विजय सरांसारख्या दिग्गजांची कलाप्रक्रिया आणि नाट्यविचार आम्हाला आपल्यासारख्या रसिकांपर्यंत पोचवता येतात. तेव्हा उपक्रमाचं सर्व श्रेय खरं तर ह्याच थोर कलाकारांचं.
      असाच आपुलकीने कार्यक्रम पाहात रहा. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @tejaswinishrikhande8762
    @tejaswinishrikhande8762 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम interview!

  • @shriharikilledar3548
    @shriharikilledar3548 2 ปีที่แล้ว

    beyond the words experience ....Thank You

  • @pinakbhende5058
    @pinakbhende5058 2 ปีที่แล้ว

    Long after anyone of us are here on this Earth, this interview will continue to inspire those who happen to chance upon it.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      ही खास कमेन्ट आज विजय सरांपर्यंत पोचवली. त्यांचे धन्यवाद आता तुम्हाला पोचवतो आहे!

  • @vlogsbyshubhankar9367
    @vlogsbyshubhankar9367 2 ปีที่แล้ว

    What a fantastic interview! Thank you so much for archiving this.

  • @vasuraj
    @vasuraj 2 ปีที่แล้ว

    छान... छान... छान... अप्रतिम...

  • @neetaparameswaran7420
    @neetaparameswaran7420 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत !

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 2 ปีที่แล้ว

    One of the best so far.. I will be listening again with a pen and paper ..thank you for sharing

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      With a pen and paper 😊👌!

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 ปีที่แล้ว

    Wah kiti apratim mulakhat!! Teen bhag suddha kamich vatale. Anakhi ek bhag hava hota.

  • @sagarsahasrabudhe1093
    @sagarsahasrabudhe1093 2 ปีที่แล้ว

    Excellent loved it!!

  • @anushreekulkarni4581
    @anushreekulkarni4581 2 ปีที่แล้ว

    खूप खूप शिकायला मिळालं!

  • @mymindlifestyle
    @mymindlifestyle ปีที่แล้ว

    He is an encyclopaedia.

  • @anujashetty1738
    @anujashetty1738 2 ปีที่แล้ว

    Talented director!

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 2 ปีที่แล้ว

    बाप से बेटा सवाई...

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    प्रतिक्षेचे फळ गोड असते, हे पटले 😀. पुढला भाग कधी? 🤔

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 2 ปีที่แล้ว

    या तिन्ही भागांमध्ये ज्या नाटकांचे उल्लेख केले आहेत ते यूट्यूब वर आहेत का?

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      काही आहेत. बरीचशी नाहीत.

  • @deepakkulkarni1982
    @deepakkulkarni1982 2 ปีที่แล้ว

    तुम्ही विजयला त्याच्या अभिन्याबाबद्दल काहीच विचारलं नाही

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      खरंय. त्यावर एक वेगळा भाग होऊ शकेल. ह्या सीझन मध्ये आपला भर दिग्दर्शनावर होता.

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 2 ปีที่แล้ว

    40:55..... "Dinanath cha chhat pandhara aahe".....yacha arth Kay????

    • @vasuraj
      @vasuraj 2 ปีที่แล้ว +1

      पुढे 'ढोल ताशे' नाटकाबद्दल काय म्हणाले ते ऐकलं का? त्यावरून कळेल...

    • @kedarmahajan9098
      @kedarmahajan9098 2 ปีที่แล้ว

      @@vasuraj ho

    • @kedarmahajan9098
      @kedarmahajan9098 2 ปีที่แล้ว

      @@vasuraj Kay aahe artha sanga na plz

    • @vasuraj
      @vasuraj 2 ปีที่แล้ว

      @@kedarmahajan9098 अहो म्हणजे ते नाटक न बघता छत बघत होते.. शब्दशः नाही पण म्हणजे नाटक नाही आवडलं ..

    • @kedarmahajan9098
      @kedarmahajan9098 2 ปีที่แล้ว

      @@vasuraj hmmmm I see. Hey aala hota manaat but I wasn't sure...thank you sir/mam