३५० घरांवर कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच श्री. कुणालजी सरमळकर यांनी तातडीने ते कारवाई थांबवले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • सोमवार, दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी सांताक्रुज पूर्व, येथील झाकूक्लब परिसरातील ३५० घरे निष्कासित करण्यासाठीचे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विकासकांच्या मागणीवरून, निष्कासन कारवाई करण्याकरिता बुलडोजर, जेसीबी, आणि तत्सम उपकरणांच्या सहाय्याने झाकूक्लब परिसरात शिरकाव केला.
    या स्थानिक ३५० घरांवर कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच येथील स्थानिक रहिवाश्यांनी शिवसेना स्थानिक पदाधिकारी उपविभाग प्रमुख सौ. कल्पनाताई वदेल व विधानसभा समन्वयक सौ. साक्षीताई काळे यांच्याकडे धाव घेतली.
    उपविभाग प्रमुख सौ. कल्पनाताई वदेल यांनी विभाग प्रमुख मा. श्री. कुणालजी सरमळकर यांचेशी मोबाईलवर तातडीचा संपर्क साधून ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात यावी यासाठी स्थानिकांच्या वतीने विनंती केली.
    सदर विषय आणि त्याचे गांभीर्य ओळखून कुणाल सरमळकर यांनी त्वरित ही कारवाई थांबवावी यासाठी एस आर ए प्राधिकरणाकडे संपर्क साधून सदर कारवाई तात्काळ थांबविण्यासाठीची तजवीज केली.
    तात्काळ घेतलेल्या या ॲक्शन ने सांताक्रुज झाकूक्लब येथील रहिवाश्यांना तात्पुरता स्वरूपाचा दिलासा मिळाला त्याबद्द्ल स्थानिकांनी मा. श्री. कुणालजी सरमळकर यांच्यावर खुश होत त्यांचे आभार मानले.

ความคิดเห็น •