गौतमीच्या अदा आणि प्रेक्षक झाला फिदा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2024
  • गौतमीच्या अदा, प्रेक्षक फिदा
    आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राच्या तरुणांना घायाळ करणारी, सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना,लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे चर्चेचा विषय झालेल्या समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांच्या सौजन्याने काल पार पडलेल्या दिवंगत सौ नम्रता वागस्कर यांच्या स्मरणार्थ भव्य हळदीकुंकू समारंभाला महिलांचा जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आले. गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते.महिलांची गर्दी अधिक तरुणांची गर्दीने रस्ते फुलून गेले होते. गौतमीच्या अदा, प्रेक्षक फिदा झाल्याने कार्यक्रम स्थळ सेल्फी पॉइंट झाल्याने गर्दीला आवरणे मुश्किलीचे झाले. परंतु स्थानिक कार्यकर्त्यानी त्याला आवर घातल्याने मात्र गौतमीच्या नृत्याचा आनंद सर्वांना घेता आला.
    आज राणीबागच्या विश्वमंगल सोसायटीच्या बाहेर गौतमीच्या नृत्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई भव्य रंगमंच उभारला होता. राणीबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने खूप शिस्तबध्द नियोजन केल्याने कुणालाही त्रास न होईल याची व्यवस्था, त्यात भायखळा पोलिस ठाणे यांनी ठिकठिकाणी घेतलेली दक्षता घेतली होती. गौतमी पाटील यांच्या व्यतिरिक्त नृत्यांगना विजेता पाटील आणि सहकारी समूहाने सादर केलेल्या बहारदार, दिलखेचक अदानी रसिक प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवले होते. आमदार सौ यामिनीताई यशवंत जाधव यांच्या शुभहस्ते विश्वामंगल सोसायटीतल्या विश्वाचे मंगल करणार्‍या दक्षिणमुखी मारुती रायाला हळदीकुंकू वाण अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू वाण मिळेल याची व्यवस्था कुमारी साई आणि श्रध्दा वागस्कर आणि विश्वमंगल सोसायटी मधील महिलांनी काळजीपूर्वक घेतली होती.
    या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते श्री यशवंत जाधव, आमदार सौ यामिनीताई जाधव, भाजपचे श्री नितिन बनकर, सौ पल्लवी बनकर, सौ. समिता संजय नाईक, निखिल यशवंत जाधव, श्री विजय बुवा कुलकर्णी, श्री शिवाजी भिलारे, सौ वंदना गवळी आदि विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यकरांचे सूत्रसंचालन श्री सचिन श्रीधर, अवधूत आर्दळकर, शैलेश या मान्यवरांनी सुमधुर शब्दात केले तर आभार प्रकट श्री वागस्कर यांनी केले.
    या कार्यक्रमासाठी सहकार्य घोडपदेव समूह अशा विविध संस्थांनी केले तर श्री किशोर वायकर, नागेश नांदोस्कर अनेक मान्यवर मंडळींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करनारांचे आभार निमंत्रक श्री शुभम दिलीप वागस्कर यांनी व्यक्त केले.

ความคิดเห็น •