Donhi mula kamal ahet. They are so sensitive and sensible ...Gaav ahe tyanchya kavitet...shet ahe.. aai ahe.. tyamule janmojanmichya dukha chi ek wegalich sawali ahe..manacha mothepana...Stri kade manus mhanun pahanyachi pramanik drushti ahe....warwarcha dikhau ani उसणे शब्द आणि जखमा नाहीत आणि अनुभव ही नाहीत. अवडंबर नाही. साधेपणा आहे . माती चा वास आहे. खूप शुभेच्छा तुला मधुराणी ।।तुझ खूप कौतुल आहे आणि हे काम चालू ठेव.
खूप छान झाले मला नेगमी सेलिब्रितीन पेक्षा स्वप्नील आणि नितीन जाधव यांच्या सारखाकविची कविता ऐकला आवडते आणि त्यांनाच कवितेचे पान अशा लोकप्रिय माध्यमाने प्लॅटफॉर्म दिल्यामुळे धन्यवाद सेलिब्रेटींची कविता आम्हला भरपूर माध्यमातून एकता येते आणि ती आम्ही एकतोच पण नवोधीत कवी समोर ऐकण्याची संधी आम्हला दिली त्याबद्दल "कवितेचे पान" खरच खूप खूप आभार आणि धन्यवाद.....
सुंदर. काय लिहितात ही पोरं. मजा आली. जवळपास सगळ्याच कविता भन्नाट होत्या. नितीनची खाऊन भाकर ऋचाचा श्रावण गातो सारंगच्या पावसात चिंब स्वप्नीलचा गण्या न्हातो आभार गुणिले चार ह्या चौकडीसाठी. धन्यवाद मधुराणी!
सर्व कविता आशयघन आहेत.....हृदय हेलावून टाकले काही कवितांनी.....मला खूप भावला हा एपिसोड....thanks all of you. नवोदित कवींचा अजून एक एपिसोड व्हावा ही अपेक्षा मधुराणी .😊
कवितेचे पान चा हा episode फारच भावस्पर्शी.... काही लोकांना वाटतं कविता ना सुचते सहज.... सहज सुचलं म्हणुन, सहज ? सहज असं काहीच नसत सहज जावं लागत उद्वेगी भावनांच्या अग्निदिव्यातून सहज उतरावं लागत आत्मावलोकनातून स्वतःच पहावं लागत स्वतःला तासून तेंव्हा दिसत आलेलं सहज.. अवहेलना, अव्हेर , अगतिकता पचवाव लागतं सहज.... झेलावं लागत स्वतःला हलकेच भावनेच्या डोहात वाहताना सारखेच मग जे येतं ..ते सहज.. सहज म्हणजे सतत जपलेला हळवेपणा...
खूप च छान....आनंद झाला तरूण कवि आणि नवीन पिढीला ऐकून.... तसे पाहता प्रत्येक जण आपल्या आतल्या आत कवि असतो फक्त सगळ्यांना च तो सफेद कागद पावत नाही आणि ती काळी शाही प्रसन्न होत नाही....... छान वाटला आजचा तरुण एपिसोड.....
अप्रतिम अप्रतिम. अभिमान वाटतो आमच्या पिढीत इतके छान कवी आहेत. नितीन ची बाई माणूस खूप छान. बाई च भविष्य थोडं आशादायी वाटलं. भाकर सुंदर. डॉक्टरांच्या पण सगळ्या कविता छान. Thank you मधुराणी 🙏
कवितेला उज्वल भविष्य आहे...! मधूराणी खुप खुप धन्यवाद ! तुला एकदा प्रत्यक्ष भेटून तुझ्यावरून मायेने बाेटं मोडावीशी वाटतात...दृष्ट लागू नये म्हणून ! एवढ्या सुंदर कार्यक्रमाची तू निर्मीती केली आहेस. love u...!
मधुराणीजी आपल्या कार्याला सलाम👍💐 आदरणीय कविवर्य यांचे सर्वच एपिसोड उत्तम नवकवींची कविता सर्वोत्तम मराठी साहित्याला "कवितेचं पान" या निमित्ताने सर्वोत्कृष्ट व्यासपीठ मिळतंय👍 अभिनंदन आणि शुभेच्छा कवितेचं पान चा कोपरा व्हायला मला नक्की आवडेल💐
डॉक्टर च्या ही कविता अप्रतिम आहे अंगावर शहारे येण्यासारख्या कान तृप्त झाले आज कविता वाचुन आणि मला ही पुन्हा लेखनी हतात घ्यावी वाटली कविता करण्यासाठी खुप खुप खुप सदिच्छा सर्व कवींना 💐💐💐💐💐💐🌷🌷🌷
खूपच सुंदर एपिसोड. सगळ्या कवींना काव्यांगण स्पर्धेत ऐकलं होतंच, आज त्यांच्या इतर कविताही तितक्याच भावल्या आणि तितकाच आनंद देवून गेल्या. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. मधुराणीजी तुमचं या उपक्रमाबद्दल खूप कौतुक आणि आभार
नितीन दादा काव्य क्षेत्रातील ध्रुवतारा आहात तुम्ही ... तुम्ही कविता बनवतं नाहीत तर जगत असता ते पाहतो आम्ही तुम्हाला जवळून...दादा अप्रतिम.. स्वप्नील दादा खूप मस्त
हा एपिसोड पाहून नक्कीच प्रश्न पडतो "कुठल्या मातीचे बनले आहेत हे कवी?". केवळ अप्रतिम... निशब्द केले... उदयोन्मुखांना शुभेच्छा अणि हा एपिसोड आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल मधुराणी जी अणि टीम चे आभार 😊
कवितेचं अस्तित्व टिकवणं, तिचं पुनरुज्जीवन करणं इथपासूनचा ते आजच्या एपिसोड चा कवितेच्या आश्वासक भविष्या पर्यंतचा हा तुमचा प्रवास फारच हृदयस्पर्शी आहे, खूप शुभेच्छा
नवकवींना कार्यक्रमातून दिलेली संधी, त्यांच्या आयुष्यात कवितेतला स्थान भक्कम आणि समृद्ध करणारी आहे. ह्या मोलाचा सहभाग दिल्याबद्दल team चे आभार आणि आणखीन नवकवींना promote करावे, ही विनंती.💐
नितीन, स्वप्नील, सारंग, ऋचा निव्वळ अप्रतिम.. तुम्हाला अजून ऐकायला आवडेल... तुमच्या पुस्तकांची वाट बघु... खरंच खूप मस्त वाटतंय कविता ऐकून... उद्या माझा वाढदिवस.. मी हा भाग स्वता:च स्वता: साठी एक भेट मानतो😊.... मधुराणी कविता ऐकण्याशिवाय दुसरा आनंद नाही... धन्यवाद हा आनंद आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल....😊🙏 भाकर, दंगल, भोर गावावरील कविता, शेंगदाणा ...सगळ्याच कविता खूप छान
धन्यवाद, शुभेच्छांबद्दल... मधुराणी आणि स्वप्नील... मधुराणी mam आणि कवितेचे पान team ... एक सुचवायचे होते..जर शक्य असेल तर, नवकवींचें social media handle किंवा page जिथे ते त्यांच्या कविता share करतात ते जर त्यांची इच्छा असेल तर भागाच्या शेवटी किंवा discription मध्ये share केलंत तर खूप आवडेल... कारण नावाजलेल्या कवींनां तर आम्ही आधीच follow करतो social media platforms वर... ह्यांना ही लोकं अजून वाचतील, ओळखतील.. अर्थात त्यांची परवानगी असेल तरच.. पुन्हा खुप धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल😊🙏
आहाचं. ..मस्तच नवोदित कविंच्या कविता.. सारंग मी पण मुखेड..p.f.c..feeling proud..👌👌👍👍 मी नेहमीचं ऐकते कवितेची सगळी पाने.. अप्रतिम सर्वोत्कृष्ट कार्यक्रम.. मधुराणी ताईंचा सहिचं..खूप खूप शुभेच्छा या सुंदर ,सुरेख कवितेंच्या पानांसाठी..💐💐
मधुराणी तुला खूप धन्यवाद असे हिरे शोधून आम्हाला आजचा तरुण ही संवेदशिल आहे हे आशादायी चित्र उभे केले मराठवाड्याचे आहेत त्याबद्दल खूप अभिमान ,कधी भेटीचा योग येईल माहीत नाही
Also, tears rolled down my eyes when I listened to the poem of Swapnil about the emotions Ganya goes through when he witnesses a suicide of a farmer in his own village. Also, I deeply acknowledge his awareness that changes don't happen through poems but it's definitely a way to bring warmth to the numb hearts.
मला अजूनही चांगलं आठवतंय कि मी, पहिला एपिसोड हा "संदीप खरे" आणि "वैभव जोशी" यांचा पाहिला होता. आणि त्यानंतर मग त्या आधीचे आणि त्यानंतर मग जितके पण एपिसोडस आले, ते फक्त पाहिले नाही तर अगदी त्यात वाहतच गेलो. मला सर्वांत भारी या गोष्टीच वाटतं कि, जेव्हा मी तुमचं हे कवितेचं पान, लोकांबरोबर share करतो, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया खूपच मस्त आणि सुखावणाऱ्या असतात. मीही कविता करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी जमतात, तर काही फसतातहि. मिथिला पालकर (माझं प्रेम किंवा आपण crush म्हणूया), तिच्या एका नाटकाला मी गेलो होतो, तेव्हा नाटक संपल्यावर, तिच्यासाठी केलेल्या कवितेवर, ती सही करत असताना, मी मनोमन कवितेचं पान ला धन्यवाद दिले होते. कारण मला कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे. (मिथिला साठी केलेली कविता ) बदामाचं पान आयुष्यात ना एक तरी crush असावं जिला पाहून आतमधून काहीतरी सुचावं सुचलेलं मग उतरवावं कागदावर तेव्हा त्या कोऱ्या कागदाचं फक्त बदामाचं पान व्हावं
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, आणि प्रतिभासंपन्न, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय अशीच सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.🌹🌹🌹 आमच्या पिढीच्या नवं कवींचे काव्य ऐकून, ऊर अभिमानाने भरून आला, काय दर्जेदार, प्रतिभासंपन्न, अर्थपूर्ण, आशयघाण काव्य आहे हे. आम्ही ही काव्य चळवळ पेटवत ठेऊ.🙏🙏🙏 कवितेचं पान, हा आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे. गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार.🙏🙏🙏
अरे वाह...खूप सुंदर नितीन...तुला पाहून थक्कच झालो. आजवर अनेक दिग्गज मंडळींच्या कविता या माध्यमातून पाहत आलो. आज तुला पाहून खूप आनंद झाला. असाच प्रगती करत राहा. भविष्यासाठी शुभेच्छा.
My heart melted with the sensitivity Nitin carries in his heart. Lots of heartfelt wishes for him and all the poets to nurture and spread this sensitivity towards others wherever they go.
खर सागांयच तर खुप दीवस अस वाटायच की आधीच्या पीढीच्या कवीतानीच कीती दीवस भारावुन जायच पण आज तासभर एका कवीतेत त्याने सर्व.तीचे अस माडंले होते पण आज मात्र त्यांच्या कवीता ऐकताना सर्व भानच त्यानी व्यापुन घेतले होते .. खुप आशादायक आहे नाही का....? 👍👌 उदय निकुडे .
खूपच प्रेरणादायी असा episode झाला. मधुराणी मॅडमना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏...कविता थेट मनाला स्पर्शून गेल्या आणि नकळत डोळ्यांतून पाणी आलं. खूपच छान वाटलं 👌👌👌
कर्जबाजारीपणाची कविता......👍👍शेतकरिना कुटूंबनी परिस्थिती काय ऱ्हास यानं एकदम खरं वर्णन शे. एकदम भारी भाऊ ...आशा कितला गण्या शेत याना कोणी इचार करत नही.(अहिराणी)
अप्रतिम,,,ग्रेट,,,,भन्नाट,,, यावेळेस खुप वाट पहावी लागली असं वाटून गेलं. मागचा एपिसोड बघितल्यावर पहिले महानोर सरांचं एक पुस्तक बुक केलं,,,,आणि आता प्रत्येक पगारीला एक पुस्तक असं ठरवलंय,,,,यावेळी कोणत घेऊ? Glamour असल्या शिवाय एखाद्या गोष्टीचा आजकाल स्विकार होतांना दिसत नाही,,,,,या एपिसोड मुळे नव कवींच्या संवेदनांना तो नक्कीच मिळाला म्हणुन या भागाचं कौतुक,,, सर्वच कवी आणि त्यांच्या कविता आवडल्या. चल दंगल समजुन घेऊ, श्रावण ek no.1 ,,,,,अनिल साबळे या आदिवासी आश्रम शाळेतील कवीच्या कविता नक्की वाचा.
मधुराणी ताई तुमचा हा एपिसोड मला खूप आवडला सगळ्याच कविता खूपच छान आहेत,आपल्याशा आहेत 👉👌👌👌👌 ताई तुमच्या मुळे कधी न वाचलेल्या, ऐकलेल्या कविता ऐकायला भेटतात.कवितेच्या पानांत फिरायला भेटते.त्यांचे गंध ल्यायला भेटतात Thank you tai
मधुराणीजी दिवसाची फार सुंदर सुरवात केली आपण आपल्या गाण्यांनी. कवी सुधीर मोघे बद्दल मला जागरूक केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. कविता वाचन फार अप्रतिम आहे आपले. बॅकग्राऊंड मध्ये कोकिळा च्ये सुंदर आवाज म्हणजे "सोने पे सुहागा" आहे. मला भेटलेली कोकिळाची सुंदर कविता खास आपल्यासाठी. 🙏☘️🙏☘️🙏 कोकिळा तू शांत का..? वातावरणात हा गंध बहरला.. आम्रातरूचा गंध दरवळला.. वसंत ऋतू हि आज असा बहरला.. पण कोकिळा तू शांत का..? होते कुहू कुहुने तुझ्या संध्याकाळ.. आवाजाने त्या वातावरणात हि येई बहार.. वातावरणालाही आज तुझ्या आवाजाची आतुरता.. पण कोकिळा तू शांत का..? मला हि वाटे तुझा आवाज ऐकावासा.. सखीला माझ्या खुश करायचा.. पाहतो वाट तुझ्या मधुर स्वराची.. पण कोकिळा तू शांत का..? मधुर स्वराने तुझ्या मन हि खिले.. आवाजाने त्या नैराश्य दूर हटे... मंजुळ स्वराची त्या आम्हास आतुरता.. पण कोकिळा तू शांत का..? नको राहूस शांत आता.. तुझे हि दुख सांगून टाक.. ऐकावूनी दे जगाला सार्या.. कि आज तू शांत का..?कि आज तू शांत का..?
Hi मधुराणी मॅडम, तुमचा प्रत्येक एपिसोड हा नवकवींना आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला एक धडाच असतो आणि ही प्रतिक्रिया आधीही दिली आहे. मी कविता करतो आणि तुमच्याप्रमाणेच कवितेवर खूप प्रेम करतो त्यामुळे प्रत्येक एपिसोडची वाट मी वाट बघतो आणि त्यातून नवीन काहीतरी शिकत असतो. हा एपिसोड रडवणारा, हसवणारा, जाणीव करून देणारा असाच होता. चौघांचही सादरीकरण आणि कवितांचे आशय खुपच छान होते. हा नवीन यशस्वी प्रयोग केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मलाही खूप काव्य स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालेले आहे तसेच मी कविता लिहायला कसा लागलो ह्याची देखील माझी एक वेगळी गोष्ट आहे. मला कवितेचं पान मधे एक पान व्हायची संधी दिलीत तर नक्की आवडेल. कवी - सिद्धेश संतोष लखमदे मोबाईल - 9823133924 गाव - मुरुड जंजिरा , रायगड
MadhuRani, I am speechless! You have presented True gems!!!! I cried with first two poets, so happy to see young generations with talent! Hats of to you finding and presenting them. Btw I was born in small village in Jalgaon district, I can relate very well with how girls are treated in India. Love from USA. 🙏😍
What a thought Nitin and Swapnil !! Hats Off to both of you!! Sarang also Amazing, Thanks to Miracles Saraswati and Madhurani to bring such talent on IOT platform!!
Donhi mula kamal ahet. They are so sensitive and sensible ...Gaav ahe tyanchya kavitet...shet ahe.. aai ahe.. tyamule janmojanmichya dukha chi ek wegalich sawali ahe..manacha mothepana...Stri kade manus mhanun pahanyachi pramanik drushti ahe....warwarcha dikhau ani उसणे शब्द आणि जखमा नाहीत आणि अनुभव ही नाहीत. अवडंबर नाही. साधेपणा आहे . माती चा वास आहे. खूप शुभेच्छा तुला मधुराणी ।।तुझ खूप कौतुल आहे आणि हे काम चालू ठेव.
दादा
खुप खुप thank you
तुम्ही दिलेली ही प्रतिक्रिया खुप महत्वाची आणि बळ देणारी आहे आमच्यासाठी.....
अजुन लिहायला प्रेरणा आणि ताकद भेटली आज.
Ty😘
खूप छान झाले मला नेगमी सेलिब्रितीन पेक्षा स्वप्नील आणि नितीन जाधव यांच्या सारखाकविची कविता ऐकला आवडते आणि त्यांनाच कवितेचे पान अशा लोकप्रिय माध्यमाने प्लॅटफॉर्म दिल्यामुळे धन्यवाद सेलिब्रेटींची कविता आम्हला भरपूर माध्यमातून एकता येते आणि ती आम्ही एकतोच पण नवोधीत कवी समोर ऐकण्याची संधी आम्हला दिली त्याबद्दल "कवितेचे पान" खरच खूप खूप आभार आणि धन्यवाद.....
Thanks
सुंदर. काय लिहितात ही पोरं. मजा आली.
जवळपास सगळ्याच कविता भन्नाट होत्या.
नितीनची खाऊन भाकर
ऋचाचा श्रावण गातो
सारंगच्या पावसात चिंब
स्वप्नीलचा गण्या न्हातो
आभार गुणिले चार ह्या चौकडीसाठी.
धन्यवाद मधुराणी!
सर्व कविता आशयघन आहेत.....हृदय हेलावून टाकले काही कवितांनी.....मला खूप भावला हा एपिसोड....thanks all of you.
नवोदित कवींचा अजून एक एपिसोड व्हावा ही अपेक्षा मधुराणी .😊
कवितेचे पान चा हा episode फारच भावस्पर्शी....
काही लोकांना वाटतं कविता ना सुचते सहज....
सहज सुचलं म्हणुन, सहज ?
सहज असं काहीच नसत
सहज जावं लागत
उद्वेगी भावनांच्या अग्निदिव्यातून
सहज उतरावं लागत आत्मावलोकनातून
स्वतःच पहावं लागत स्वतःला तासून
तेंव्हा दिसत आलेलं सहज..
अवहेलना, अव्हेर , अगतिकता
पचवाव लागतं सहज....
झेलावं लागत स्वतःला हलकेच
भावनेच्या डोहात वाहताना सारखेच
मग जे येतं ..ते सहज..
सहज म्हणजे सतत जपलेला हळवेपणा...
खूप च छान....आनंद झाला तरूण कवि आणि नवीन पिढीला ऐकून....
तसे पाहता प्रत्येक जण
आपल्या आतल्या आत
कवि असतो
फक्त सगळ्यांना च तो
सफेद कागद पावत नाही
आणि
ती काळी शाही प्रसन्न
होत नाही.......
छान वाटला आजचा तरुण एपिसोड.....
अप्रतिम अप्रतिम. अभिमान वाटतो आमच्या पिढीत इतके छान कवी आहेत. नितीन ची बाई माणूस खूप छान. बाई च भविष्य थोडं आशादायी वाटलं. भाकर सुंदर. डॉक्टरांच्या पण सगळ्या कविता छान. Thank you मधुराणी 🙏
Koop chan
काय भन्नाट लिहिताहेत ही मुलं! भविष्यकाळ वाटतो तितका भीषण नाही याची खात्री होतेय. सलाम बाळांनो!!!
नव कविना भेटून खूप बरे वाटले. कविता खूप खूप आवडल्या. भन्नाट लिहितात ही सर्व मंडळी.
कवितेला उज्वल भविष्य आहे...! मधूराणी खुप खुप धन्यवाद ! तुला एकदा प्रत्यक्ष भेटून तुझ्यावरून मायेने बाेटं मोडावीशी वाटतात...दृष्ट लागू नये म्हणून ! एवढ्या सुंदर कार्यक्रमाची तू निर्मीती केली आहेस. love u...!
मधुराणीजी आपल्या कार्याला सलाम👍💐
आदरणीय कविवर्य यांचे सर्वच एपिसोड उत्तम
नवकवींची कविता सर्वोत्तम
मराठी साहित्याला "कवितेचं पान"
या निमित्ताने सर्वोत्कृष्ट
व्यासपीठ मिळतंय👍
अभिनंदन आणि शुभेच्छा
कवितेचं पान चा कोपरा व्हायला मला नक्की आवडेल💐
डॉक्टर च्या ही कविता अप्रतिम आहे
अंगावर शहारे येण्यासारख्या
कान तृप्त झाले आज कविता वाचुन
आणि मला ही पुन्हा लेखनी हतात घ्यावी वाटली
कविता करण्यासाठी
खुप खुप खुप सदिच्छा सर्व कवींना 💐💐💐💐💐💐🌷🌷🌷
Ty
नितीन भाऊ अप्रतीम... आपल्या कविता मनाला स्पर्श करुन जातात... आणि समाजातील वास्तविकतचे दर्शन होते....
स्वप्निल दादा तुमचा गण्या भावला मनाला.....
Abhijeet pawar ty
Thank you Abhijit!
खूप सुंदर उपक्रम.दोन जोड्या.किती विरोधाभास.आजूबाजूचे जीवन कसं आहे त्यांचे याचाण आरसा.दोन्हींच दर्शन घडवल्या बद्दल खूप धन्यवाद.आजची तरुणाई समोर आली.
अप्रतिम एपिसोड झाला आहे ...सगळ्याच कविता हृद्यस्पर्शी आहेत ...उत्तम निरीक्षण आहे या नवोदित कवींचे 👍👍👍👍👍...धन्यवाद मधुराणी जी हा एपिसोड केल्याबद्दल ...
खूपच सुंदर एपिसोड. सगळ्या कवींना काव्यांगण स्पर्धेत ऐकलं होतंच, आज त्यांच्या इतर कविताही तितक्याच भावल्या आणि तितकाच आनंद देवून गेल्या. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. मधुराणीजी तुमचं या उपक्रमाबद्दल खूप कौतुक आणि आभार
नितीन दादा काव्य क्षेत्रातील ध्रुवतारा आहात तुम्ही ... तुम्ही कविता बनवतं नाहीत तर जगत असता ते पाहतो आम्ही तुम्हाला जवळून...दादा अप्रतिम..
स्वप्नील दादा खूप मस्त
अगदी बरोबर दिपक भाऊ...
दिपक thank you 🤗
Wow, wow, wow!!! खुपच छान!! भारतात जर अश्या उच्च विचारांचे युवा-युवती, गावा गावतुन असतील तर हा देश कुठच्या कुठे जाईल !! सलाम या युवा कवीनां !!🙏🏼🙏🏼
हा एपिसोड पाहून नक्कीच प्रश्न पडतो "कुठल्या मातीचे बनले आहेत हे कवी?". केवळ अप्रतिम... निशब्द केले... उदयोन्मुखांना शुभेच्छा अणि हा एपिसोड आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल मधुराणी जी अणि टीम चे आभार 😊
कवितेचं अस्तित्व टिकवणं, तिचं पुनरुज्जीवन करणं इथपासूनचा ते आजच्या एपिसोड चा कवितेच्या आश्वासक भविष्या पर्यंतचा हा तुमचा प्रवास फारच हृदयस्पर्शी आहे, खूप शुभेच्छा
*कवितेच्या पानातील*
*नवोदितांच्या कविता*
*झाल्या हृदयस्थ*
*एपिसोड पाहता पाहता*
*खूप खूप शुभेच्छा सर्वांना*
*या काव्यफुलांनिमित्त*
*तुमच्या प्रतिभेतून बरसावेत*
*सदैव कवितेचे झोत*
*नितांत सुंदर एपिसोड.नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी मधुराणी तुझे खूप कौतुक.*
नवकवींना कार्यक्रमातून दिलेली संधी, त्यांच्या आयुष्यात कवितेतला स्थान भक्कम आणि समृद्ध करणारी आहे. ह्या मोलाचा सहभाग दिल्याबद्दल team चे आभार आणि आणखीन नवकवींना promote करावे, ही विनंती.💐
ह्यांना प्रत्यक्ष ऐकलंय भेटलोय हेच खूप छान आहे माझ्यासाठी तर
दम है इन नये हिरोंमे.....भाकर आणि सारंगची पावसाची कविता लाजवाब, ऋचांच्या कवितेत गेयता चांगली आहे.
खूपच छान आहेत चौघाच्या कविता. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
नितीन, स्वप्नील, सारंग, ऋचा निव्वळ अप्रतिम.. तुम्हाला अजून ऐकायला आवडेल... तुमच्या पुस्तकांची वाट बघु... खरंच खूप मस्त वाटतंय कविता ऐकून... उद्या माझा वाढदिवस.. मी हा भाग स्वता:च स्वता: साठी एक भेट मानतो😊.... मधुराणी कविता ऐकण्याशिवाय दुसरा आनंद नाही... धन्यवाद हा आनंद आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल....😊🙏 भाकर, दंगल, भोर गावावरील कविता, शेंगदाणा ...सगळ्याच कविता खूप छान
Tula shubheccha
Happy bday
N thanq so much
धन्यवाद, शुभेच्छांबद्दल... मधुराणी आणि स्वप्नील... मधुराणी mam आणि कवितेचे पान team ... एक सुचवायचे होते..जर शक्य असेल तर, नवकवींचें social media handle किंवा page जिथे ते त्यांच्या कविता share करतात ते जर त्यांची इच्छा असेल तर भागाच्या शेवटी किंवा discription मध्ये share केलंत तर खूप आवडेल... कारण नावाजलेल्या कवींनां तर आम्ही आधीच follow करतो social media platforms वर... ह्यांना ही लोकं अजून वाचतील, ओळखतील.. अर्थात त्यांची परवानगी असेल तरच.. पुन्हा खुप धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल😊🙏
खूप छान, कवितांचा पाट किती विशाल आहे याची जाणीव या तरूण कवींनी करून दिली.
मराठी भाषा जिवंत राहणार असा दिलासा मिळाला.
जिती रहो मधुराणी!
इतक्या सुंदर,आशयघन,मार्मिक,सुंदर,संवेदनशील... अजून किती उपमा देऊ..या कवींना.. त्यांच्या कवितांना..!खूप आवडला हा भाग!💕💕💕
नितीन भावा मला तू जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वाटतो... .. देव तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो... Gbu
आहाचं. ..मस्तच नवोदित कविंच्या कविता.. सारंग मी पण मुखेड..p.f.c..feeling proud..👌👌👍👍
मी नेहमीचं ऐकते कवितेची सगळी पाने.. अप्रतिम सर्वोत्कृष्ट कार्यक्रम..
मधुराणी ताईंचा सहिचं..खूप खूप शुभेच्छा या सुंदर ,सुरेख कवितेंच्या पानांसाठी..💐💐
Khupch chan...best platform for budding poets 😍😍
भाकर....सोनोग्राफी...अप्रतिम ....
Thanks
मधुराणी तुला खूप धन्यवाद असे हिरे शोधून आम्हाला आजचा तरुण ही संवेदशिल आहे हे आशादायी चित्र उभे केले मराठवाड्याचे आहेत त्याबद्दल खूप अभिमान ,कधी भेटीचा योग येईल माहीत नाही
सगळ्यांच्याच कविता खुप छान! मधुराणी तुम्ही कविता सादर केलीत की कविता अजुन एका वेगळ्याच उंचीवर जाते
Also, tears rolled down my eyes when I listened to the poem of Swapnil about the emotions Ganya goes through when he witnesses a suicide of a farmer in his own village. Also, I deeply acknowledge his awareness that changes don't happen through poems but it's definitely a way to bring warmth to the numb hearts.
मला अजूनही चांगलं आठवतंय कि मी, पहिला एपिसोड हा "संदीप खरे" आणि "वैभव जोशी" यांचा पाहिला होता. आणि त्यानंतर मग त्या आधीचे आणि त्यानंतर मग जितके पण एपिसोडस आले, ते फक्त पाहिले नाही तर अगदी त्यात वाहतच गेलो. मला सर्वांत भारी या गोष्टीच वाटतं कि, जेव्हा मी तुमचं हे कवितेचं पान, लोकांबरोबर share करतो, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया खूपच मस्त आणि सुखावणाऱ्या असतात. मीही कविता करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी जमतात, तर काही फसतातहि. मिथिला पालकर (माझं प्रेम किंवा आपण crush म्हणूया), तिच्या एका नाटकाला मी गेलो होतो, तेव्हा नाटक संपल्यावर, तिच्यासाठी केलेल्या कवितेवर, ती सही करत असताना,
मी मनोमन कवितेचं पान ला धन्यवाद दिले होते. कारण मला कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे.
(मिथिला साठी केलेली कविता )
बदामाचं पान
आयुष्यात ना एक तरी crush असावं
जिला पाहून आतमधून काहीतरी सुचावं
सुचलेलं मग उतरवावं कागदावर
तेव्हा त्या कोऱ्या कागदाचं
फक्त बदामाचं पान व्हावं
😊 thanks
खूपच छान एपिसोड. सर्व नवकवींच्या कविता अर्थाने, जाणिवांनी खूप समृद्ध झालेल्या जाणवल्या. सर्वांचे अभिनंदन !!
म्हणता म्हणता... क्या बात है 👌👌😍😍😍
Khupch chan.Navkavi ani tyanche drushtikon manala bhavle.Ya sarv ugvtya taryana manpurvak shubheccha.
Saglyach Kavita khupach sundar. Madhurani dhanyavad , phat sundar sadarikaran karata tumhi kavitech.
कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, आणि प्रतिभासंपन्न, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय अशीच सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.🌹🌹🌹
आमच्या पिढीच्या नवं कवींचे काव्य ऐकून, ऊर अभिमानाने भरून आला, काय दर्जेदार, प्रतिभासंपन्न, अर्थपूर्ण, आशयघाण काव्य आहे हे.
आम्ही ही काव्य चळवळ पेटवत ठेऊ.🙏🙏🙏
कवितेचं पान, हा आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे. गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार.🙏🙏🙏
अरे वाह...खूप सुंदर नितीन...तुला पाहून थक्कच झालो. आजवर अनेक दिग्गज मंडळींच्या कविता या माध्यमातून पाहत आलो. आज तुला पाहून खूप आनंद झाला. असाच प्रगती करत राहा. भविष्यासाठी शुभेच्छा.
Thank you यशवंत!
My heart melted with the sensitivity Nitin carries in his heart. Lots of heartfelt wishes for him and all the poets to nurture and spread this sensitivity towards others wherever they go.
खर सागांयच तर खुप दीवस अस वाटायच की
आधीच्या पीढीच्या कवीतानीच कीती दीवस भारावुन जायच पण आज तासभर एका कवीतेत त्याने सर्व.तीचे अस माडंले होते पण
आज मात्र त्यांच्या कवीता ऐकताना सर्व भानच
त्यानी व्यापुन घेतले होते ..
खुप आशादायक आहे नाही का....?
👍👌 उदय निकुडे .
खूप छान...आपल्या कवितेचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, याची खात्री पटली...निवेदन तर उत्तमच!
मस्त
मधुराणी जी धन्यवाद
नवकवींना ऐकून काव्य चांगल्या मनात फुलताय
हे पाहून अभिमान वाटला
हलवून गेला एपिसोड
सर्व कविता अर्थपूर्ण तरुणांच्या हृदय स्पंदन आशय मनाला भावला
खूपच प्रेरणादायी असा episode झाला. मधुराणी मॅडमना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏...कविता थेट मनाला स्पर्शून गेल्या आणि नकळत डोळ्यांतून पाणी आलं. खूपच छान वाटलं 👌👌👌
अप्रतिम!भन्नाट!सुंदर!❤️❤️❤️
My most favourite episode of Kavitecha Paan.Keep Going!☺️
Apratim.keval apratim...atishay arthpurn..
Kamali che expression Mam, Swapnil ani Nitin , tuma tighache, Gajab che expression and smile Dr Swapnil yancha👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान हा भाग, नवकवी पण सुंदर लिहित आहेत हे तूझ्या मुळे कळलं मधुराणी ..... खूप खूप आभार आणि धन्यवाद
Swapnil aaagdi apratim tuze vichar ani Kavita donihi ........ Sundar.....Chan
Ty
कर्जबाजारीपणाची कविता......👍👍शेतकरिना कुटूंबनी परिस्थिती काय ऱ्हास यानं एकदम खरं वर्णन शे. एकदम भारी भाऊ ...आशा कितला गण्या शेत याना कोणी इचार करत नही.(अहिराणी)
ARUN BAGUL ty bhau
Ahirani changli jamas tumle
खुपच छान कविता, खरंच दखल घ्यायला भाग पाडणारा अनुभव. धन्यवाद
अप्रतिम कवितेचं पान सुंदर कामगिरी
Aaj paryanta cha khupach sundar episode madhurani..... Kavita ani sahitya yanchya hathi ahe mhanje sukhurup kranti suru ahe...
Woow apratim. Navkavi ajibatch navte. Khoop parakhad Ani bhavnik donhi sadhale. All the best sagalyanna💐💐
सर्वप्रथम, मधुरानी याना मनापासून धन्यवाद! आगामी भागांमध्ये अधिक नवीन कवी ऐकू इच्छितो.
नितीन आणि स्वप्निल आपल्या कवितानी निशब्द केले.
Abhijeet Kanitkar ty
Thank you.
Great, superb...............Love you all.
अप्रतिम तू खरोखरच हिरे शोधून काढले खूप खूप आभार
दोन्ही मित्रांनला सॅल्युट ।
अप्रतिम ।
कविता ।
अप्रतिम,,,ग्रेट,,,,भन्नाट,,,
यावेळेस खुप वाट पहावी लागली असं वाटून गेलं. मागचा एपिसोड बघितल्यावर पहिले महानोर सरांचं एक पुस्तक बुक केलं,,,,आणि आता प्रत्येक पगारीला एक पुस्तक असं ठरवलंय,,,,यावेळी कोणत घेऊ?
Glamour असल्या शिवाय
एखाद्या गोष्टीचा आजकाल स्विकार होतांना दिसत नाही,,,,,या एपिसोड मुळे नव कवींच्या संवेदनांना तो नक्कीच मिळाला म्हणुन या भागाचं कौतुक,,, सर्वच कवी आणि त्यांच्या कविता आवडल्या.
चल दंगल समजुन घेऊ, श्रावण ek no.1
,,,,,अनिल साबळे या आदिवासी आश्रम शाळेतील कवीच्या कविता नक्की वाचा.
Sachin wagh ty
मधुराणी ताई तुमचा हा एपिसोड मला खूप आवडला सगळ्याच कविता खूपच छान आहेत,आपल्याशा आहेत 👉👌👌👌👌
ताई तुमच्या मुळे कधी न वाचलेल्या, ऐकलेल्या कविता ऐकायला भेटतात.कवितेच्या पानांत फिरायला भेटते.त्यांचे गंध ल्यायला भेटतात
Thank you tai
३१.५१जीवनाची खरी कविता .या कवितेच सर्वत्र प्रत्येक सभेपूर्वी वाचन झाले पाहिजे.
मधुराणीजी दिवसाची फार सुंदर सुरवात केली आपण आपल्या गाण्यांनी. कवी सुधीर मोघे बद्दल मला जागरूक केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. कविता वाचन फार अप्रतिम आहे आपले. बॅकग्राऊंड मध्ये कोकिळा च्ये सुंदर आवाज म्हणजे "सोने पे सुहागा" आहे. मला भेटलेली कोकिळाची सुंदर कविता खास आपल्यासाठी. 🙏☘️🙏☘️🙏
कोकिळा तू शांत का..?
वातावरणात हा गंध बहरला..
आम्रातरूचा गंध दरवळला..
वसंत ऋतू हि आज असा बहरला..
पण कोकिळा तू शांत का..?
होते कुहू कुहुने तुझ्या संध्याकाळ..
आवाजाने त्या वातावरणात हि येई बहार..
वातावरणालाही आज तुझ्या आवाजाची आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?
मला हि वाटे तुझा आवाज ऐकावासा..
सखीला माझ्या खुश करायचा..
पाहतो वाट तुझ्या मधुर स्वराची..
पण कोकिळा तू शांत का..?
मधुर स्वराने तुझ्या मन हि खिले..
आवाजाने त्या नैराश्य दूर हटे...
मंजुळ स्वराची त्या आम्हास आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?
नको राहूस शांत आता..
तुझे हि दुख सांगून टाक..
ऐकावूनी दे जगाला सार्या..
कि आज तू शांत का..?कि आज तू शांत का..?
खूपच मार्मिक काव्यलेखनातले विचार.. नव्या पिढीचे बेधडक विचार. ऐकाल तर भविष्य सुंदर आहे रे.. समस्त पोरांनो!!💐💐
Sarang is incredible. I loved mhanata mhanata. So much delight
Khupch chhan ,,,,,केवढा पाऊस आला बघ.....वा!वा!वां!
स्वप्नील दादा काय लिहितोयस 👌👌👌👌
मस्तच... घरगुती कविता आवडली
अप्रतिम स्वप्नीलदादा आणि नितीनदादा......
Ganesha more ty bhau
All poems are awesome. Thank you very much for the episode. I loved the poem on Dangal by Swapnil.
अप्रतिम सारंग असाच खजिना उलगडत राहा. कविता खूपच सुंदर आहेत तुझ्या 👍👍💐💐
खूपचं सुंदर! तरुण मुलं इतकं छान लिहितात ते पाहून खूप समाधान वाटलं
काय बोलावं निशब्द 😘❤️ खूप खूप सुंदर आहे लिखाण सशक्त लेखक आणि आनंद वाटतो की कवितेचे भविष्य खूप उत्तुंग भरारी घेणार
Nitin and Swapnil Love u mitranno....
डॉ स्वप्निल खूप भावनावश कविता
Ty
आहा सारंग,पुन्हा सांगण्यास आवडेल की,
तू कवितेला 'जन्म' देतोस...
पण हल्ली,कविता तुला 'जन्म'द्यायला लागली आहे नव्याने....खूप छान...खूप छान..
Rushikesh Raut
😊😊
मस्त आहे ही कविता या कवितेतून खूप काही शिकता आले आणि चांगले विचार आहे
मला खुप च आवडतात हया सगळ्या कविता. मधुराणी ताई तुमच्या या कार्यक्रम ला खरच सलाम 🙏🙏🙏
खूप मजा आली, सगळेच अप्रतिम !
पूजा भडांगे hii
वास्तवातील विस्तव....खुपच अप्रतिम
अप्रतिम
हळवेपणा म्हणजेच संवेदनशीलता यांच्यातूनच दर्जेदार समाजपाेयाेगी साहित्य निर्मिती होते..
खरोखरच या नवकवींकडे पाहून असं वाटतं की हेही एक आश्वासक चित्र आहे भविष्याचे
Hi मधुराणी मॅडम,
तुमचा प्रत्येक एपिसोड हा नवकवींना आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला एक धडाच असतो आणि ही प्रतिक्रिया आधीही दिली आहे. मी कविता करतो आणि तुमच्याप्रमाणेच कवितेवर खूप प्रेम करतो त्यामुळे प्रत्येक एपिसोडची वाट मी वाट बघतो आणि त्यातून नवीन काहीतरी शिकत असतो.
हा एपिसोड रडवणारा, हसवणारा, जाणीव करून देणारा असाच होता. चौघांचही सादरीकरण आणि कवितांचे आशय खुपच छान होते. हा नवीन यशस्वी प्रयोग केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
मलाही खूप काव्य स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालेले आहे तसेच मी कविता लिहायला कसा लागलो ह्याची देखील माझी एक वेगळी गोष्ट आहे. मला कवितेचं पान मधे एक पान व्हायची संधी दिलीत तर नक्की आवडेल.
कवी - सिद्धेश संतोष लखमदे
मोबाईल - 9823133924
गाव - मुरुड जंजिरा , रायगड
शुभेच्छा ..... सारंगच्या पावसाच्या कवितेतली लय भन्नाट होती ....
छानच कार्यक्रम आयोजित केला होता..नवीन कवितांची सुरेख मैफिल...
MadhuRani, I am speechless! You have presented True gems!!!! I cried with first two poets, so happy to see young generations with talent! Hats of to you finding and presenting them. Btw I was born in small village in Jalgaon district, I can relate very well with how girls are treated in India. Love from USA. 🙏😍
alka deshmukh ty so much mam
Dr swapnil
खूप छान कविता आहे
व्वा !!! नवकवींच्या अप्रतिम कविता ...!!
क्या बात है नितीन! खूश केलेस आज मित्रा. धन्यवाद मधुराणी मॅडम
Sarang sir,..... Bhot hard bhot hard.
The Shrikant Chandan 😍
नितीन जाधव यांची 'बाईमाणूस'ही कविता कवयित्री नीरजा यांची आश्वासक चित्र या कवितेशी साधर्म्य असणारी वाटली....खूप छान
What a thought Nitin and Swapnil !! Hats Off to both of you!! Sarang also Amazing, Thanks to Miracles Saraswati and Madhurani to bring such talent on IOT platform!!
नितीन व स्वप्नील यांच्या कविता मनाला भिडतात कारण रोजच्या जगण्याशी संबंधित वाटतात
सर्वांग सुंदर कविता ...धन्यवाद
Madhurani... U. r the best anchor
छान एपिसोड ..
एक तास मंतरलेला.
खूपच सुंदर कविता आणि सादरीकरण.