Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 227

  • @PrakashPatil-hj9tu
    @PrakashPatil-hj9tu ปีที่แล้ว +2

    Last "kavita" on "shetkari atmahatya" Sonali presented, had brought tears to my eyes. Sonali has powerful expressions, heart over presenting and taking "kavita " straight to the heart of audience. She has clear and perfect voice. Madhurani is host par excellence.I am not connoisseur of art and accidentally came across "Kaviteche Pan" . Really love it. Thank you Sonali and Madhurani for this wonderful experience. Prakash Patil.

  • @asmitajagtap5410
    @asmitajagtap5410 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद मधुराणीजी आणि सोनालीजी यांच खुप भावनेने भरलेले हे कवितेच पान सोनालीजी खुप वेगळेच रुप पाहिले तुमचे खुप धन्यवाद खुप छान

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 ปีที่แล้ว +1

    I am not a Maharashtrian. I was lucky to have been in Pune and Amalner during graduation and work - for the sole reason that I could know Marathi. There are many like me but I have read Marathi poetry and songs and I have fallen in love with the Language. Whenever I get time I watch your channel Madhurima ji. Thank you so much for Kavitecha Paan.

  • @stalemateraja
    @stalemateraja ปีที่แล้ว +1

    खूपच छान सोनाली ❤ तुझ्या साडी या कवितेने पाणी आणले बघ..….

  • @priyankagangan2924
    @priyankagangan2924 4 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर पान
    सोनाली ताईच्या कवितेने अक्षरशः तिचा तो पाऊस डोळ्यांतून ढसाढसा बरसू लागला
    अप्रतिम
    Thank you Madhurani Tai

  • @Lifeisbeautiful-kg5in
    @Lifeisbeautiful-kg5in 6 ปีที่แล้ว +23

    तुम्ही दोघीही किती गोड आहात गं! अगदी भावलात !!
    सुंदर इपिसोड 👌🌹😊
    सोनाली, तुझी कविता तुझ्यासारखीच... निर्मळ आणि आरस्पानी !

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 11 หลายเดือนก่อน

    Khupach Sunder Kavita Aahet Saglya Madhurani Tai Ani Sonali Tai.khup khup chaan Kavita.God Bless u Guys.

  • @avinashtambe7596
    @avinashtambe7596 ปีที่แล้ว

    खरंच खूप खूप छान कविता आहे 🌹🙏🙏🙏🌹

  • @manojmore7778
    @manojmore7778 4 ปีที่แล้ว +1

    Kupach chhan Madhurani, thanks

  • @prashantghodke9847
    @prashantghodke9847 5 ปีที่แล้ว +6

    सोनाली अगदी रङवलस. सोनाली मला खूप खूप आवङते. विशेष म्हणजे तुझा गळा आणि बोलणे.
    दिसायला जशी सुंदर तशा तुझ्या कविता सुंदर असतात.
    खूप खूप धन्यवाद मधुराणीजी !!

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 4 ปีที่แล้ว +8

    Sonali is one of the most multifarious and brilliant actress .
    Made proud for Maharashtrian Actress in bollywood .

  • @jayshreenikam5420
    @jayshreenikam5420 6 ปีที่แล้ว +4

    सुंदर ! कर्ण- नेत्र तृप्तता मधुराणी! मनःपूर्वक धन्यवाद!

  • @vidyachaudhari7047
    @vidyachaudhari7047 3 ปีที่แล้ว +2

    Amazing !!! Talented Beautiful Humble Sonali as an Outstanding combination of all.

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 3 ปีที่แล้ว

    Sonali Taichi paus Kavita kharach manat bhavnancha paus padun geli. Lots of love and respect tuzyatil sunder abhinetrila aani kavayitrila. Kai bolu nishabdh zale👌

  • @samidhav.5039
    @samidhav.5039 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम एपिसोड.... सोनालीचे मराठी ऐकत रहावं असं..... आणि साडी कविता .....एक पाऊस शोधत होता.....! खरं तर प्रत्येकाच्याच डोळ्यातून पाऊस वहात होता..... गं ! As usual love u so much मधुराणी...

  • @yogineejoshi5020
    @yogineejoshi5020 6 ปีที่แล้ว +21

    आज खूप घनदाट झाडा-झुडपांमधे दडलेला "सोनाली" नावाचा डोह सापडला !! त्या डोहापाशी अजुन बसावंसं वाटतंय.....
    खुप धन्यवाद मधुराणी !!

  • @DnyaneshWakudkar
    @DnyaneshWakudkar 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.. केवळ अप्रतिम!

  • @pareshpawar7100
    @pareshpawar7100 6 ปีที่แล้ว +5

    ..त्या दरवाज्याच्या लाकडी चौकटीतून मला ती साडी दिसत होती. म्हणजे कदाचित ते दुःख तितकं कळणारही नाही कधी पण डोळे नकळतच भरून आले... सगळं खूप विलक्षण.. मधुराणी आणि सोनाली.. तुम्हा दोघींचे आभार.. आणि कवितेचं पानबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे सादरीकरणातला साधेपणा.. तो कायम असाच राहूदेत.. खूप खूप शुभेच्छा.. ❤❤❤❤❤

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 ปีที่แล้ว

    Kupch sunder kavitech pan manala kup bavuk Kel tumhi dogi kup chan ahat 👌👌🙏👍

  • @rekhawalimbe3886
    @rekhawalimbe3886 3 ปีที่แล้ว

    कित्ती छान. दोघेही गुणी कलाकार. खूप खूप आभार.धन्यवाद.

  • @sanghaingaletayade2570
    @sanghaingaletayade2570 4 ปีที่แล้ว +15

    I just observed Sonali's expression, a way of uttering n how she converses the sacrifice of "Aai Ramai"🙏🙏🙏. JayBhim JayRamai🙏🙏🙏

  • @jyotinirhali950
    @jyotinirhali950 2 ปีที่แล้ว

    मधुराणी, खूप खूप धन्यवाद. खूप छान कार्यक्रम आहे हा. सोनाली कुलकर्णी आणि तुझं काव्य वाचन अप्रतिम आहे. तुम्ही दोघी माझ्या खूप आवडत्या आहात.
    तुमच्या या कार्यक्रमामुळे मी कवितेच्या आणि तुमच्या प्रेमात पडले.
    तुम्हाला दोघीना खूप शुभेच्छा.

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 3 ปีที่แล้ว

    Apratim episode ha episode sampu ch naye ase vatat hote

  • @nandinibarve9271
    @nandinibarve9271 ปีที่แล้ว

    मधुराणी, तुमचं' कवितेचं पान' हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. कविता प्रेमींना खास मेजवानी देणारा.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 ปีที่แล้ว

    कवितेचं पान, हा मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार आणि संवेदनशील, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. कवितेच पान आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच आहे.
    सोनाली कुळकर्णी यांच्या सहभगाची ही काव्य मैफिल भावपुर्ण झाली, शेवटच्या साडी ने नेत्र पाणावले.🙏🏻
    🙏🏻
    कवितेचं पान आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🌹🌹🌹

  • @sunandagogate8447
    @sunandagogate8447 4 ปีที่แล้ว

    Kupech Chan kavitech Pa an madhurani sukanya

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 5 ปีที่แล้ว +1

    ती कविता खरच खूप वास्तवादी होती,डोळ्यात पाणी आलं शेवटी..सोनालीची ही एक नवीनच बाजू कळली.. thank you so much..

  • @himanikolhatkar
    @himanikolhatkar 6 ปีที่แล้ว +23

    मी कवितेचं पान अत्यंत निष्ठेने बघत आले आहे
    खरं तर अभ्यासत आले आहे असे म्हणायला हरकत नाही
    खूप एपिसोडेस ना वाटलं हा सगळ्यात उत्तम आणि प्रत्येक नवीन एपिसोड ला विचार बदलला पण आज मी जेव्हा सोनाली चा भाग बघितला तर नव्हे अनुभवला तेंव्हा खात्री झाली की आजपर्यंत चा सर्वोत्कृष्ट हाच
    मृणाल कुलकर्णी चा ही मला भावला होता
    पण आजचा विश्लेषण पूर्ण आणि विलक्षण होता
    ही मुलगी हो मुलगीच मला अतिशय प्रिय आहे अभिनेत्री म्हणून पण आज मला वाटतं की एक माणूस म्हणून ही ती प्रिय आहे
    अत्यंत अभ्यासू आणि जमिनीवर पाय असलेली ही अभिनेत्री हिच्या बद्दल आज आदर वाढला
    तिला ऐकतच राहावे असे वाटले
    कधी जर मला संधी मिळाली आणि सोनाली भेटली तर गदगदून मिठी मारिन मी तिला तिच्या साडी कविते साठी
    Love you Sonali
    Love you Madhurani and thanks so much
    Himani Pandit

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 ปีที่แล้ว

    हृदयस्पर्शी, सोनाली आरपार नितळता आहे तुझ्यात..मधुराणी, फारच गोड हे कवितेचं पान❤

  • @anandkulkarni9710
    @anandkulkarni9710 5 ปีที่แล้ว +8

    मी पंनाशीचा कविता कधी मनापासून समजुन घेतली नही पण मधुराणी चे आभार तीने कविता जगायची कशी ते शिकवले.

  • @readervivek2059
    @readervivek2059 3 ปีที่แล้ว

    शेवटची कविता, खरच मनाला भिडते. शेतकर्‍याची. खुप छान.....

  • @surekhajadhav9000
    @surekhajadhav9000 3 ปีที่แล้ว

    खूप छान, अप्रतिम.

  • @apurvabhadke7925
    @apurvabhadke7925 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटलं तुम्हा दोघींना एकत्र पाहून आणि आता आम्ही पण हळूहळू तुमच्या आणि कवितांच्या प्रेमात आहो.... ❤️❤️❤️

  • @apg8308
    @apg8308 6 ปีที่แล้ว +1

    मधुताई, नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटा नंतर आता तू ह्या कवितेचे पान, खुप्प छान वाटलं....
    आणि त्यातल्या त्यात तू माझ्या सगळ्यात आवडीच्या अभिनेत्री सोनाली ताई सोबत, अप्रतिम.... आणि आई रमाई ची भूमिका अप्रतिम नेहमी आठवणीतील
    खुप्प खुप्प आभार... अगदी मनापासून

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 6 ปีที่แล้ว +4

    सोनाली मला खूप खूप आवडते. कवितेचं पान ह्या कारेक्रमा मुळे कवियत्री सोनाली ऐकायला मिळाली.दिवाळीची खूप छान भेट मधुराणी तू दिली आहेस. ह्या बद्दल तुझे खूप खूप आभार... तुला आणि सोनाली ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..😊

    • @jayshreedani9914
      @jayshreedani9914 5 ปีที่แล้ว

      सोनाली यु आर ग्रेट एक माणूस म्हणून

  • @jitendrapawar1366
    @jitendrapawar1366 4 ปีที่แล้ว +1

    वाह अप्रतिम आवाज सोनाली ताई ....मस्तच

  • @aratikhopkar
    @aratikhopkar 6 ปีที่แล้ว +12

    सोनाली अगदी रडवलस. खुप सुंदर, तुझ्यातली कलावंत नेहमीच भावलीय, आज कवयित्रीही भावली ___/\__
    मधुराणी खुप धन्यवाद आणि शुभेच्छा!

  • @drpallavikasande7837
    @drpallavikasande7837 6 ปีที่แล้ว +5

    केवळ अप्रतिम... am speechless

  • @nitashende4715
    @nitashende4715 2 ปีที่แล้ว

    मधुराणी फुलविते
    म्हणूनच आकळतो
    असा कवितेचा भावार्थ
    रसिकांना आवडतो
    सोनाली तुमची कविता खुप सुंदर
    खुप आवडली

  • @kets7
    @kets7 11 หลายเดือนก่อน

    Khup sunder...parat parat aikle...aaj comment keli...

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 ปีที่แล้ว +14

    सोनालीचं कधीही माहीत नसलेलं हे रूप बघायला दिल्याबद्दल मधुराणीचे आभार! काय सुंदर, एकाहून एक कविता... टीआरपीच्या जंजाळातून सुटलेलं एवढं छान ऐकवल्याबद्दल आभार तरी कसे मानावेत, खूप छान.

    • @aartishevde283
      @aartishevde283 3 ปีที่แล้ว

      फारच छान मधुराणी.सोनाली कवयित्री पण फारच सुंदर.अभिनेत्री म्हणून सुंदर आहेच पण कवयित्री म्हणूनही छानच

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 4 ปีที่แล้ว

    EXCELLENT. Mardhekar and Arati Prabhu
    very good.

  • @sang8090
    @sang8090 5 ปีที่แล้ว

    हा एपिसोड ऐकून आता मी सुरवात कशी करू हेच सुचत नाही. सोनाली तू तर... अक्षरशः मनात होते ते अश्रू होऊन बाहेर आणलेस. तुझ्या या 'साडी' या कविते मुळे मला जगण्यासाठी चा एक किरण मिळाला...का कुणास ठाऊक जगण्यास कारण मिळालं. तुझ्या या 'साडी' मधून मला एक ऊब मिळाली...
    फार फार धन्यवाद सोनाली चे आणि मधुराणी चे🙏

  • @archanabhide3841
    @archanabhide3841 6 ปีที่แล้ว +3

    Superb episode. Thank you Madhurani and Sonali

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 4 ปีที่แล้ว

    Wa khup chan, sonali kulkarniche bol aikayla milale tichya tondun tiche anubhav tichya athvani aikane lajawab, 👍

  • @poetpoojabhadange
    @poetpoojabhadange 6 ปีที่แล้ว +2

    काय बोलू, खूप खूप सुंदर

  • @kiranshah9438
    @kiranshah9438 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कार्यक्रम . मधुराणी हे कवितेच जग तू आम्हाला उलगडून दाखवलंस तुझे खूप आभार , सोनाली आणि तू दोघींनी अप्रतिम कार्यक्रम दिला आहे .

  • @kinhikar
    @kinhikar 6 ปีที่แล้ว +14

    प्रार्थनेने सुरु झालेला एपिसोड साडीच्या कवितेने संपतो,
    तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर पडलेले माझे अश्रू म्हणजे वंदन मानतो मी त्या संवेदनशील मनांना, जे दिवाळीच्या झगमगाटात पोशिंद्याच्या व्यथेने व्याकुळ होतात..
    🙏🙏
    सोनाली आणि मधुराणी तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. कृपया कमीत कमी १००० भाग झालेच पाहिजेत.
    मधुराणी, तुझ्या उपक्रमासाठी मन:पूर्वक धन्यवाद.

  • @anitafarakate993
    @anitafarakate993 6 ปีที่แล้ว +1

    खूप च सुंदर.

  • @vidyadeokar5524
    @vidyadeokar5524 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम एपिसोड......thankyou मधू दी आणि सोनू दि.

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 6 ปีที่แล้ว +2

    कवितेचे पान 31 ऐकताना कविता भाव डोळ्यात जिरतोय तोच सोनाली बोलतेय कवितेच्या वातावरणात शिरून. भूमिका रंगवणेपेक्षा तीत घुसुन ती ही राधाच गुलाबजाम मधली. मी84 पण गुंफलो कवितेच्या पानातुन. धन्य झालो

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 6 ปีที่แล้ว +2

    कवितेचे पान च्या सर्व टिमला आणी मधुराणी ताई आणी सोनाली ताई तुम्हालाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 6 ปีที่แล้ว +8

    सोनालीने सादर केलेली "भंगु दे काठिन्य माझे" ही कविता बाळ सीताराम मर्ढेकर यांची एक अतिशय अर्थपूर्ण कविता आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे. मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही असा ह्या कवितेचा आशय आहे.🌹🌹🌹

    • @ashleshagokhale5381
      @ashleshagokhale5381 6 ปีที่แล้ว

      ती कविता पूर्ण आहे का तुमच्याकडे ?

    • @nileshindulkar295
      @nileshindulkar295 6 ปีที่แล้ว

      @@ashleshagokhale5381 "भंगु दे काठिन्य माझे" ही कवि बाळ सीताराम मर्ढेकर यांची एक सुंदर कविता आहे. पूर्ण कविता पुढील प्रमाणे आहे.
      भंगु दे काठिन्य माझे
      भंगु दे काठिन्य माझे
      आम्ल जाऊं दे मनींचे;
      येऊ दे वाणीत माझ्या
      सूर तूझ्या आवडीचे.
      ज्ञात हेतूतील माझ्या
      दे गळू मालिन्य,आणि
      माझिया अज्ञात टाकी
      स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.
      राहु दे स्वातंत्र्य माझे
      फक्त उच्चारातले गा;
      अक्षरा आकार तूझ्या
      फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.
      लोभ जीभेचा जळू दे
      दे थिजु विद्वेष सारा
      द्रौपदीचे सत्व माझ्या
      लाभु दे भाषा शरीरा.
      जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
      दे धरू सर्वांस पोटी;
      भावनेला येऊ दे गा
      शास्त्रकाट्य़ाची कसोटी.
      खांब दे ईर्ष्येस माझ्या
      बाळगू तूझ्या तपाचे;
      नेउं दे तीतून माते
      शब्द तूझा स्पंदनाचे
      त्वसृतीचे ओळखू दे
      माझिया हाता सुकाणू;
      थोर यत्ना शांति दे गा
      माझिया वृत्तीत बाणू.
      आण तूझ्या लालसेची;
      आण लोकांची अभागी;
      आणि माझ्या डोळियांची
      पापणी ठेवीन जागी.
      धैर्य दे अन्‌ नम्रता दे
      पाहण्या जे जे पहाणे
      वाकुं दे बुद्धीस माझ्या
      तप्त पोलादाप्रमाणे;
      घेऊ दे आघात तीते
      इंद्रियद्वारा जगाचे;
      पोळू दे आतून तीते
      गा अतींद्रियार्थांचे
      आशयाचा तूच स्वामी
      शब्दवाही मी भिकारी;
      मागण्याला अंत नाही;
      आणि देणारा मुरारी.
      काय मागावे परी म्यां
      तूहि कैसे काय द्यावे;
      तूच देणारा जिथे अन्‌
      तूंच घेणारा स्वभावे!!
      🌹बा. सी. मर्ढेकर🌹

    • @ashleshagokhale5381
      @ashleshagokhale5381 6 ปีที่แล้ว

      @@nileshindulkar295 शतशः धन्यवाद!! खूप दिवसांपासून शोधत होते!!

  • @dattatraygaikwad939
    @dattatraygaikwad939 4 ปีที่แล้ว

    किती सुंदर काव्य वाचन

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर,अप्रतिम झाला हा भाग ! पहीलीच कविता ( मर्ढेकरांची ) अप्रतिम❤❤सोनाली कुलकर्णी खूप छान,मोकळेपणे बोलल्या ! 👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤

  • @ujwalakawyagandh1619
    @ujwalakawyagandh1619 4 ปีที่แล้ว

    सोनाली कुलकर्णी यांची साठी ही कविता सुंदर

  • @smt.ujjwalapatil7602
    @smt.ujjwalapatil7602 3 ปีที่แล้ว +1

    सोनाली ची साडी ही कविता, मधुराणीची साथ, आणी तुम्ही दोघीनी उभं केलेलं भावाविश्व...... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @7.arnavravirajkenjale527
    @7.arnavravirajkenjale527 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कार्यक्रम...

  • @vandanakolhatkar685
    @vandanakolhatkar685 3 ปีที่แล้ว

    Somali khup chan kavita dolyat asu pan tumcha doghanche bhet memorable Great Sonali

  • @asavaribhalerao3174
    @asavaribhalerao3174 6 ปีที่แล้ว +1

    Khup chan doghina thanks

  • @shobhalonkar7357
    @shobhalonkar7357 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर ,सोनाली आणी मधुरानी ची नव्याने ओळखा झाली

  • @sujatamekhale1810
    @sujatamekhale1810 6 ปีที่แล้ว +1

    Sonali tujhya dolyatun Kavita manaprayant pohchali..... Madhurani tu pan navapramane kavitache panchi Rani 👌👌

  • @kelkarnandita
    @kelkarnandita 6 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर! निवडक कविता, त्यांचा अर्थ, सगळंच! आणि साडी _/\_

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 ปีที่แล้ว

    दोन कविमनांचा संवाद एकत्र बघणं, अनुभवणं हा रसिकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. तुम्ही दोघीच खरं तर एक सुंदर कविता आहात.
    " एक पाऊस " खूपच हृदयस्पर्शी
    🌸🌸🌸🌸

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 4 ปีที่แล้ว

    खूप छान दिसत आहात दोघी.
    कार्यक्रम छान आहे. आजचा भाग मस्त होता. खूप माहिती कळली. प्रसिध्द कवींच्या कविता सुरेखच. पण सोनाली कुलकर्णी कविता करतात हे आजच कळले. त्यांच्या दोन्ही कविता मस्त होत्या.
    खूप शुभेच्छा तुम्हाला !!

  • @vikramsonawane1741
    @vikramsonawane1741 6 ปีที่แล้ว +1

    खुप छान.....tai

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 6 ปีที่แล้ว +1

    उत्तम अभिनेत्री आणि तितकीच प्रतिभावंत कविता सादरीकरण

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 4 ปีที่แล้ว

    Wa kharach sonali kavitech pan ha bhag manala bhavun gela, kavita kaljat ghusli 🙏

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 4 ปีที่แล้ว

    Khup chan madhu Tai , I love you

  • @vaishnavikulkarni8859
    @vaishnavikulkarni8859 6 ปีที่แล้ว +1

    Kay kavhita hotya mam and so proud fill for sonali mam kiti Chan kavita kartat tya tayni kavitet tiplele pratek shabhdh anubhavhachi janivh karun det hote thanks madhurani mam and also miracles team😍😘😘🤩

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @atharvekande2485
    @atharvekande2485 6 ปีที่แล้ว +2

    Heart touching...Thank u madhurani and sonali..

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @rushikulkarni4604
    @rushikulkarni4604 6 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 ปีที่แล้ว

    Madhurani tuze abhinandan sonali sarkhya pratibha sampanna abhinetrila tu kavya vachan karavayas anales sonali ek mahan abhinetri kavitevar yevhade prem karte mhanun tichya baddal adar adhikach vadhala

  • @maninimahajan1610
    @maninimahajan1610 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर एपिसोड

  • @minddesign4164
    @minddesign4164 4 ปีที่แล้ว

    So Kul
    सरळ सोप्या शब्दात निर्जीव साडीत स्त्रीच चलत चित्र उभं केलंस. शेवटच्या कवितेत तुझा खरेपणा काळजाला भिडला.
    मधुराणी तुझंही खूप अभिनंदन अश्या दिगज व्यक्तींना बोलत करतेस.
    धन्यवाद,
    संदीप दरपेल

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 4 ปีที่แล้ว

    खरच छान

  • @aashnameteor2184
    @aashnameteor2184 3 ปีที่แล้ว

    Sunddar

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 6 ปีที่แล้ว +1

    मस्त... मधुराणी & सोनाली ताई....

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 2 ปีที่แล้ว

    अत्यंत भावस्पर्शी झाली ही मैफिल 👌🙏

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 6 ปีที่แล้ว +1

    👌👌👌sundar aprteem

  • @minalghamande5562
    @minalghamande5562 6 ปีที่แล้ว +1

    Madhurani thx for making episode with Sonali

  • @Pavanwankhade
    @Pavanwankhade 6 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर
    👌👌👌👌

  • @balasahebghawane1048
    @balasahebghawane1048 3 ปีที่แล้ว +1

    This episode just made my weekend. Madhurani and Sonalee you'll are just stunning :)

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว

    मधुराणी किती स्तुत्य. तू निवडलेली मणसं आणि विषय ...
    सोनाली पण अप्रतिम.

  • @sidramkore7676
    @sidramkore7676 6 ปีที่แล้ว +8

    दिवाळी अन कवितेचे पान..... खूपच छान मधुराणी ताई........
    मी आतुरतेने नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो

  • @varshabhosale144
    @varshabhosale144 4 ปีที่แล้ว +1

    सोनाली mam ...Why so Amazing ❤️

  • @niyatinaik1313
    @niyatinaik1313 6 ปีที่แล้ว

    Khup sunder.....

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 ปีที่แล้ว +1

    दिवाळी फराळ आणि आतिषबाजी एकत्रच मिळाली चाखायला, बघायला! सुंदर👌 मधुराणी, सोनाली 🙏🏼

  • @sumant1601
    @sumant1601 6 ปีที่แล้ว +2

    आजचं पान अनेक छटा दाखवणारं, कवितेचं विश्व साजरं करणारं, समृध्द करणारं आणि शेवटी अंतर्मुख करणारं होतं.
    सणासुदीला माहेरवाशीण आपल्या गावी येऊन आपल्या मैत्रिणीजवळ मन मोकळं करते, असं वाटलं.
    दोघींचे खूप खूप आभार!!!!!!

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 ปีที่แล้ว +1

      माहेरवाशिणीची उपमा फार आवडली.....आभारी आहे

    • @suchitabapat7080
      @suchitabapat7080 4 ปีที่แล้ว

      खूपच छान

    • @manasimohansonawane491
      @manasimohansonawane491 3 ปีที่แล้ว

      शेवटची कविता अप्रतिम... नि:शब्द केलेत.....

  • @rahulkamble9715
    @rahulkamble9715 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपक्रम आहे😊😊🙏.

  • @saralakale1505
    @saralakale1505 6 ปีที่แล้ว +1

    Apratim...👌👌

  • @mukundtakate1284
    @mukundtakate1284 6 ปีที่แล้ว +1

    मला सर्वात आवडलेला एपोसोड...सोनाली तुम्ही ग्रेट च....

    • @sdemusic
      @sdemusic 6 ปีที่แล้ว

      I am devoted to every episode of Kavitecha paan. This one was at its emotive best, spell bound . Best wishes for many many more such poetic conversations. Tuned in from Gold Coast Australia.

  • @kishorweladi5566
    @kishorweladi5566 6 ปีที่แล้ว +4

    आभाराला शब्द अपूरे आहेत!

  • @volcanos4447
    @volcanos4447 3 ปีที่แล้ว +2

    For those who came here for
    Start from 16.11 min onward

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 3 ปีที่แล้ว

    Madhurani aani Sonali ❤️
    Tumcha ha episode awesome aahe.......mala kavitecha hey paan khoop aavadala VA last la Sonali ni "Gabhricha Paous" vishayi sangitale VA mobile madhun je aeikawale tyamule ha episode dhyanat rahanya sarakha zhala........Sonali la "Gulabjaam" mule paahilay VA Madhurani la "Arundhati" mule sadhya pahatye pan tumchya sashakta abhinaya mule tumhi doghi majhya khoop aavadatya aahat.......aashach raha 👍 doghinna Shubheccha 🌹🌹

  • @raghunathchitale4422
    @raghunathchitale4422 6 ปีที่แล้ว

    भयंकर आगाव आहे मधुराणी प्रभुलकर , एकदम शिष्ठ

  • @ntm35810
    @ntm35810 3 ปีที่แล้ว

    14/9 Mach!!!

  • @gauravbonde1044
    @gauravbonde1044 5 ปีที่แล้ว +7

    भंगु दे काठिन्य माझे
    भंगु दे काठिन्य माझे
    आम्ल जाऊं दे मनींचे;
    येऊ दे वाणीत माझ्या
    सूर तूझ्या आवडीचे.
    ज्ञात हेतूतील माझ्या
    दे गळू मालिन्य,आणि
    माझिया अज्ञात टाकी
    स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.
    राहु दे स्वातंत्र्य माझे
    फक्त उच्चारातले गा;
    अक्षरा आकार तूझ्या
    फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.
    लोभ जीभेचा जळू दे
    दे थिजु विद्वेष सारा
    द्रौपदीचे सत्व माझ्या
    लाभु दे भाषा शरीरा.
    जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
    दे धरू सर्वांस पोटी;
    भावनेला येऊ दे गा
    शास्त्रकाट्य़ाची कसोटी.
    खांब दे ईर्ष्येस माझ्या
    बाळगू तूझ्या तपाचे;
    नेउं दे तीतून माते
    शब्द तूझा स्पंदनाचे
    त्वसृतीचे ओळखू दे
    माझिया हाता सुकाणू;
    थोर यत्ना शांति दे गा
    माझिया वृत्तीत बाणू.
    आण तुझ्या लालसेची;
    आण लोकांची अभागी;
    आणि माझ्या डोळियांची
    पापणी ठेवीन जागी.
    धैर्य दे अन्‌ नम्रता दे
    पाहण्या जे जे पहाणे
    वाकुं दे बुद्धीस माझ्या
    तप्त पोलादाप्रमाणे;
    घेऊ दे आघात तीते
    इंद्रियद्वारा जगाचे;
    पोळू दे आतून तीते
    गा अतींद्रियार्थांचे
    आशयाचा तूच स्वामी
    शब्दवाही मी भिकारी;
    मागण्याला अंत नाही;
    आणि देणारा मुरारी.
    काय मागावे परी म्यां
    तूहि कैसे काय द्यावे;
    तूच देणारा जिथे अन्‌
    तूंच घेणारा स्वभावे!!
    - बा. सी. मर्ढेकर