सागराच्या कुशीतील सुवर्णदुर्ग.....Suvarndurg | कनकदुर्ग | फतेगड ..महाराष्ट्रातील जलदुर्ग--भाग-२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • सागराच्या कुशीतील सुवर्णदुर्ग.....Suvarndurg | कनकदुर्ग | फतेगड | गोवाकिल्ला..महाराष्ट्रातील जलदुर्ग
    मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते. मुंबई एअरपोर्ट वरून २५० किलोमीटर अंतर हर्णे बंदर आहे मुंबईवरून रेल्वे येण्याची सोय आहे मुंबई ते खेड रेल्वे स्थानक येऊन नंतर बसने दापोली नंतर दापोली मधून बसने हर्णे बंदर जाता येते.बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.
    भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
    पालघर पासून मालवण पर्यंत जे जलदुर्ग आहेत, त्यातील महत्वाचा असा हा जलदुर्ग आहे. एका बेटावर या किल्ल्याचे बांधकाम केलेले असून किल्ला जवळपास 5 एकर भागात विस्तारलेला आहे. जलदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून त्याची उंची 1400 फुट आहे.
    इ.स. 1657 च्या सुमारास महाराज कोकणात उतरले, त्यावेळी त्यांनी समुद्र जवळून पाहिला. तेव्हा परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते.
    यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता. या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. त्यामुळे मराठ्यांना समुद्रमार्गे व्यापारात त्यांचा मोठा अडथळा निर्माण होत असे. या त्रासामुळेच शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला. सुरुवातीला खोल समुद्रातील दळणवळण पेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशाने त्यांना कामास सुरूवात केली. कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे. पूर्वीच्या काळी समुद्रकिनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले आंग्रे कुटुंबाच्याच देखरेखीखाली होते. सुवर्णदुर्ग किल्ल्याची जबाबदारीही आंग्रे कुटुंबाकडेच होती. 16 व्या शतकात हा किल्ला आदिलशहाकडे होता. 1660 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. मोहिमेची जबाबदारी मायनाक भंडारींवर दिली. महाराजांनी दिलेल्या आज्ञेवरून मायनाक भंडारी यांनी सैन्यासह सुवर्णदुर्ग वर हल्ला चढविला. त्यांनी सुवर्णदुर्ग स्वराज्यात दाखल केला.
    असा हा किल्ला तुमची पहात मोठ्या दिमाखात समुद्राच्या लाटांचे, वार्याचे धक्के झेलत उभा आहे. किल्ल्याचे बरेचसे बांधकाम आजही सुस्थितीत आहे. परंतु किल्ला पहायला जाताना त्यावर घडलेला इतिहास लक्षात घेतलात तर तुमची किल्ल्याची सफर यादगार ठरेल.
    वाटेतच कनकदुर्ग, फतेगड व गोवा किल्ला पाहता येतो. परंतु आता या गडावर काही अवशेष शिल्लक नाही आहेत.
    So stay connected with me for more information on my channel @paulechalti9626
    .
    If you want to participate in such treks, feel free to call on below no.:
    please contact: Sanjay Sawant (BIKES N" HIKES)- 9820479578
    .
    Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
    .
    If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
    If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
    ​⁠@paulechalti9626
    Thanks and regards viewers:
    Sanjay Sawant

ความคิดเห็น • 1

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 หลายเดือนก่อน +1

    .....Awesome.....💓