पुण्यात का फेमस होतेय ही 'चहा चपाती'? Chaha Chapati Hotel | Fc Road | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2021
  • फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी चक्क चहा चपातीचे हॉटेल सुरु सुरु केले आहे. तुपाची, तेलाची कडक चपातीसह साखर चपाती, जाम चपाती आदी चपातीचे भन्नाट प्रकार आणि घरासारखा आस्वाद देणार हॉटेल नक्की कसं आहे. लोकल कल्पनेला ग्लोबल रुपडं देणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हॉटेलची ही भन्नाट सफर....
    #lokmat #Chahachapati #Pune #Fcroad
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 2K

  • @babadesai5879
    @babadesai5879 3 ปีที่แล้ว +1047

    लोकांना दुसर्‍या चे गोड लागत पंजाबी पराठा साऊथ ईडलीडोसा विदेशी बर्गर पिझ्झा महाराष्ट्रात सकाळी सकाळी चहा चपातीचाच नाष्टा आहे खरच सुंदर कल्पना आहे स्वामी तुम्हाला यश देवो

    • @vandanaatre7146
      @vandanaatre7146 3 ปีที่แล้ว +9

      बरोबर..संजोर्या, तेलची,धपाटे सुद्धा चांगले option असू शकतील,चहा बरोबर serve करायला ..

    • @aniketkeni1477
      @aniketkeni1477 3 ปีที่แล้ว +2

      👍🏼👍🏼👍🏼❤️❤️❤️

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 ปีที่แล้ว +13

      चहा चपाती चांगले नाही ।

    • @thebagvadgita4239
      @thebagvadgita4239 3 ปีที่แล้ว

      साहेब बरोबर बोलला

    • @extremekurt
      @extremekurt 3 ปีที่แล้ว +2

      Khoop chaan aahe startup idea...all the best and God bless you all.

  • @shrikrishnadixit8676
    @shrikrishnadixit8676 3 ปีที่แล้ว +481

    अतिशय चांगली संकल्पना ! भविष्यात चहा-चपातीची अशी ठिकाणे पुण्यात गल्लोगल्ली नक्कीच दिसणार ! व्हीडीओ आवडला.

    • @gayathri3821
      @gayathri3821 3 ปีที่แล้ว +8

      Meeth, Masala, Tel Bhakari pan chhan ahhe.
      Mazi mammi dyayachi mala lahanpani.

    • @hamidshaikh1370
      @hamidshaikh1370 3 ปีที่แล้ว +3

      अतिशय सुंदर बालपणीचे दिवस आठवतात

    • @vasantipatil6056
      @vasantipatil6056 3 ปีที่แล้ว +3

      चहा चपाती चांगली कामगिरी केली आहे परंतु चहा चपाती चा रेट‌ कींमत काय आहे ‌‌ते फेसबुक वर व व्हाॅटसपवर प्रसारित ‌जाहीर करावे हींदूराव पाटील

    • @devendrahaldankar8535
      @devendrahaldankar8535 3 ปีที่แล้ว

      फक्त पुण्यातच नाही तर मुंबई मध्ये पण हवीत 🤞🏼

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @rajanimisal9931
    @rajanimisal9931 2 ปีที่แล้ว +46

    खरच असा विचाररही केला नव्हता की चहा चपाती स्टॉल वर मिळेल.. खूप छान कल्पना आहे... मुलांनो तुम्हाला यात भरपूर यश लाभो..
    *All the best*

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @pradiptamhane4643
    @pradiptamhane4643 3 ปีที่แล้ว +26

    लई भारी. महाराष्ट्रीयन मुलांनी असा प्रयोग केला आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. 🎉🎉

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @darshankworld
    @darshankworld 3 ปีที่แล้ว +466

    ज्यांच्या डोशक्यात ही आयडिया आली त्यांचं होलसेलमधे अभिनंदन !

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 ปีที่แล้ว +24

    आज माझं वय ६५ वर्षे आहे, मी मुंबईत आल्यापासून गेली ४८ वर्षे सकाळचा नाश्ता चहासोबत चपाती असाच आहे, तुम्ही खूप मोठं काम केलेत,जे घरचे चहा चपाती पहिल्यांदाच उपलब्ध करून नवीन कन्सेप्ट आणलात. धन्यवाद, माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या या प्रोजेक्टला.

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 3 ปีที่แล้ว +95

    मिडियावाले गरीब होतकरू मराठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. बसायची जागा होईल ना हळूहळ. प्रामाणिक कष्टाला नक्कीच फळ मिळते

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @sanjaymestri9873
      @sanjaymestri9873 2 ปีที่แล้ว

      छान संकल्पना, आणि नवीन पिढीला योग्य पर्याय उपलब्ध.👍हार्दिक शुभेच्छा

  • @rupalikshatriya3930
    @rupalikshatriya3930 3 ปีที่แล้ว +18

    सुंदर कल्पना . मैदचाच्या पदार्थापेक्षा चहा चपाती खुपच पैष्ठिक आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर लहानपणच्या चहा चपातीची आठवण आली.

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @vickybheke4336
    @vickybheke4336 3 ปีที่แล้ว +291

    सर्व सामान्य माणसाला परवडेल असा उपक्रम आहे अतिशय सुंदर

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @madhurijadhav8305
    @madhurijadhav8305 3 ปีที่แล้ว +129

    माझा आवडता नाश्ता म्हणजे चहा आणि तूप लावलेली चपाती 👌👌तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा 👍👍💐💐

    • @avinashmaske6355
      @avinashmaske6355 3 ปีที่แล้ว

      Nice 🎉🎉🎉👍👍

    • @mera_bharat_mahan5171
      @mera_bharat_mahan5171 3 ปีที่แล้ว +1

      Ditto.

    • @gvr3060
      @gvr3060 3 ปีที่แล้ว +1

      Same here 😀

    • @68pramod
      @68pramod 3 ปีที่แล้ว +1

      मलाही चहा आणि तुप लावलेली चपाती खूप आवडते, जोडीला थोडी एखादी सुकी चटणी, विशेषत ः शेंगदाणा असेल तर अजून छान

    • @dipalivispute2508
      @dipalivispute2508 3 ปีที่แล้ว

      माझा पण आवडतीचा नाष्टा

  • @sagarbinnar7333
    @sagarbinnar7333 3 ปีที่แล้ว +35

    खूप छान मित्रांनो पिझ्झा ,बर्गर,यापेक्षा नक्कीच चांगले अन् गरिबांची भाकरी कल्पना खूप भारी अन् to be continued

  • @yogeshshinde79
    @yogeshshinde79 3 ปีที่แล้ว +28

    सुंदर कल्पना,जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ, तुमच्या पाठीशी नेहमी महाराजांचा आशिर्वाद राहील

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 3 ปีที่แล้ว +270

    पाव खाण्यापेक्षा चपाती कधीही चांगली, उत्तम👍👍खूप शुभेच्छा

    • @poojabulbule9728
      @poojabulbule9728 2 ปีที่แล้ว +2

      Ho na barobar ahe

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 2 ปีที่แล้ว +1

      Bhangar kahi pan

    • @devendra-2095
      @devendra-2095 2 ปีที่แล้ว +1

      चहा सोबत चपाती 😱 पांढरा कोड फुटतो त्याने..विरुद्ध आहार आहे.

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 2 ปีที่แล้ว

      @@devendra-2095 thu ulti yeti rao mla.. Te adani lok khayeche
      . Ekdam ghan ha

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 ปีที่แล้ว +169

    तरुण मुलं चांगल्या कल्पना राबवू शकतात. असं काहीतरी हटके केलं तर कशाला राजकारण्यांच्या तोंडाकडे बघत बसायला लागेल. अनेक शुभेच्छा.

    • @AnkitKumar-dm5rz
      @AnkitKumar-dm5rz 3 ปีที่แล้ว +1

      Ecosystem politician ch tayar karu shaktat mitra

    • @sagardhawan670
      @sagardhawan670 3 ปีที่แล้ว

      आजकाल तरुणांकडे नवीन संकल्पना फार कमी आहे,म्हणून ते राजकारण्यांच्या तोंडाकडे पाहत राहतात. Good luck !

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆

  • @IndianFarmer
    @IndianFarmer 3 ปีที่แล้ว +34

    bhari👌👌

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 3 ปีที่แล้ว +23

    खूप छान संकल्पना. घराची आठवण करुन देणारी चहा चपाती. सुंदर, लय भारी.

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 3 ปีที่แล้ว +122

    या तिघांना एकच विनंती की --- एकदा का क्वालिटी फिक्स झाली की, तीच कायम टिकवा. Quality is better than quantity!

    • @sureshpethe
      @sureshpethe 3 ปีที่แล้ว +2

      Quality and quantity is more important than the price !

    • @smita8150
      @smita8150 3 ปีที่แล้ว +1

      Wa दोन्ही sir नी काय उत्तम मत दिले👍👏👏

    • @raghunathpasale8363
      @raghunathpasale8363 3 ปีที่แล้ว +1

      @@smita8150 🙏

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 3 ปีที่แล้ว +107

    प्रयत्न करत रहा ..यशवंत नक्की मिळणार. .गरीबा घरचे खाणे
    चहा = चपाती 👍👍👍

    • @vishwasyewale3416
      @vishwasyewale3416 3 ปีที่แล้ว +9

      चांगले प्रयत्न करा ...मागे हटू नका ...सकाळी सकाळी ..चहा = चपाती मस्त. ..............मी गेले पन्नास वर्षे सकाळी दररोज चहा = चपाती ..वभाजी पूर्ण जेवणच करतो आजपर्यंत कसलेही औषध घ्यावे लागले नाही आता माझे वय 66 आहे तरी सुध्दा परवाच पंढरपूर वारी 44 वी एक दिवसात करून आलो

    • @santoshghoderao7083
      @santoshghoderao7083 3 ปีที่แล้ว +2

      Garm Chapatila Tup lavlyavar khupch chan lagte chaha sobat

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆

  • @sunandabaviskar2190
    @sunandabaviskar2190 2 ปีที่แล้ว +14

    खुप छान कल्पना आहे, चटणी पोळीचा पर्याय पण करा..तो पण एक पोटभरीचा नाश्ता आहे..

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @ishvarpawar8077
    @ishvarpawar8077 3 ปีที่แล้ว +15

    चपाती पासून चपाती मलिदा व चहा मस्तच गावची चव. भाकरी तुकडेहि छानच होतील.

  • @rohitbagwe1276
    @rohitbagwe1276 3 ปีที่แล้ว +86

    अतिशय सुंदर कल्पना आहे, मराठी माणूस slowly but surely पुढे जात आहे, माझ्याकडून शुभेच्छा😊

  • @satishshinde1085
    @satishshinde1085 3 ปีที่แล้ว +128

    UPSC... MPSC... पेक्षा चहा चपाती विकलेली बरी... Good Luck... छान संकल्पना आहे

    • @vikram940
      @vikram940 3 ปีที่แล้ว +6

      Nko deu bhava tu Tya peksha gharich bss... Koni force ny kela tula

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 3 ปีที่แล้ว +10

      बरोबर आहे भावा, upsc, mpsc करून अर्धवट बुद्धीच्या नेत्यांची हमाली करण्यापेक्षा ह्या चहा चपातीच्या धंद्यात मालक होऊन स्वभिमानाने जगणे केव्हाही चांगले👍👍👍

    • @vikram940
      @vikram940 3 ปีที่แล้ว +2

      @@rupalikadam3551 lat chapatya mg jaun

    • @satishshinde1085
      @satishshinde1085 3 ปีที่แล้ว +6

      @@vikram940 खर बोललो तर त्रास होतो का...? भावा तुला UPSC, MPSC साठी खूप खूप शुभेच्छा... प्लॅन B तयार करून ठेव...

    • @PA_BHC
      @PA_BHC 3 ปีที่แล้ว +1

      @@satishshinde1085 कटू पण सत्य...

  • @pushpsmane2984
    @pushpsmane2984 3 ปีที่แล้ว +10

    खूप खूप शुभेच्छा. नवीन कल्पना साकारायला पण गट्स लागतात. पुढे खूप मोठे व्हावे ही सद्ईच्छा

  • @kalyanchakravarty5753
    @kalyanchakravarty5753 2 ปีที่แล้ว +23

    This idea of Chaha-Chapati is great and innovative providing a more homely atmosphere extending the idea of remaining closure to natural & simple eating habit.
    Best wishes to the youngsters mooting the idea !!!

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @nitapatel2367
    @nitapatel2367 3 ปีที่แล้ว +156

    या गुणी मुलांचे मनापासून अभिनंदन।

  • @maheshthigale4506
    @maheshthigale4506 3 ปีที่แล้ว +59

    फोडणीचा भात , पोळीचा कुस्कराही छान चालेल , त्याबरोबर ताकाची मजा काही अौरच!

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 2 ปีที่แล้ว +8

    लय भारी
    आता सगळी कडे हे लोण पसरणार
    तुम्ही प्रणेते असणार याचे
    Best of luck 🎉

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @ritvizrvi
    @ritvizrvi 3 ปีที่แล้ว +2

    मराठी माणूस व्यवसायत पुढे गेला पाहिजे. खूप छान संकल्पना आहे. हार्दिक शुभेच्छा 💐

  • @shivajibadhe8223
    @shivajibadhe8223 3 ปีที่แล้ว +132

    खुप छान संकल्पना.
    जग फूड पेक्षा अधिक चांगले.
    अभिनंदन
    लोकमतचे आभार

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 3 ปีที่แล้ว +293

    चहा बरोबर मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा चहा चपाती चांगली आरोग्याला

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर 🙏

    • @meenamasalkhamb9588
      @meenamasalkhamb9588 3 ปีที่แล้ว

      Khupchan bhauaje fevratajr

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว +8

      @@mahipatil2129
      आज‌ पन्नाशी ला आलोय आणि रोज सकाळी रविवार ‌आणी सुट्टीचा दिवस सोडला तर रोजच चहा चपाती खातोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग पण नाहीये.

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 3 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर 👍👍

    • @greenleafayurveda3125
      @greenleafayurveda3125 3 ปีที่แล้ว

      R8

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 3 ปีที่แล้ว +4

    आवडीची डिश परंतु बाहेर मागायला संकोच वाटायला लावणारी आता बिनधास्त पणे मिळणार याचा खूपच आनंद झाला , अभिनंदन .💐👍

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @santoshkamble8580
    @santoshkamble8580 3 ปีที่แล้ว +16

    सर्वा ला आवडेल अशी कल्पना खरच जातोय ट्राय करायला तुमी पण या आणि या विध्यार्थ्यांना स्पॉट करा मराठी मनूस पुढे गेला पाहिजेल

    • @vidyanavelker2429
      @vidyanavelker2429 2 ปีที่แล้ว +1

      Good idea.chahachapti pot bharicha nasta konalahi parewdnara aahe

    • @santoshkamble8580
      @santoshkamble8580 2 ปีที่แล้ว +1

      @@vidyanavelker2429 thanks for comments

  • @user-zn2tm4st5h
    @user-zn2tm4st5h 3 ปีที่แล้ว +51

    खुप छान,मराठी माणुस व्यवसाय कडे वळतोय,आम्ही पण मुंबई मध्ये चहा चपाती व्यवसाय चालु करण्याचा पर्यन्त करू

  • @sagardhawan7733
    @sagardhawan7733 3 ปีที่แล้ว +174

    उरलेल्या चापत्याना फोडणी देऊन चूरमा पण ठेवा.. म्हणजे एकदम घरचाच फिल..

    • @user-tk3zn9rf4j
      @user-tk3zn9rf4j 3 ปีที่แล้ว +4

      🙆👍😅 चुरमा मस्त

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 3 ปีที่แล้ว +2

      🤣😂😁

    • @ganeshsuroshe444
      @ganeshsuroshe444 3 ปีที่แล้ว +2

      Lay bhari

    • @drvnehe
      @drvnehe 3 ปีที่แล้ว +5

      Sakali chaha chapati ani evening la chaha churma

    • @diptifadke9659
      @diptifadke9659 3 ปีที่แล้ว +1

      Good idea

  • @vaishaliargade7891
    @vaishaliargade7891 3 ปีที่แล้ว +11

    खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐 पुण्यात आल्यावर नक्की भेट देइन.

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 ปีที่แล้ว +5

    आम्ही तर सकाळचा नाष्टा चहा चपाती असतो खुप छान आहे आयडीया यश मिळो तुम्हाला .👍👌

  • @nirmalalaghate8430
    @nirmalalaghate8430 3 ปีที่แล้ว +33

    तीनही युवक आणि युवती यांचे खूप कौतुक आणि एक चांगला उपक्रम सुरू केला आहे म्हणून अभिनंदन 👍 आणि शुभेच्छा 🙏🙏

  • @hemantkalelatur5919
    @hemantkalelatur5919 3 ปีที่แล้ว +87

    आयुष्य भेटलेच आहे तर काहीतरी करून दाखवा....😊
    आज वेळ खराब आहे म्हणून काय झालं एक दिवस वाईट वेळेलाही बदलून दाखवा..⏰✌️ अभिनंदन 💐

  • @ramranade5934
    @ramranade5934 3 ปีที่แล้ว +27

    चपाती ताजी का शिळी ? पोळीचा कुस्करा ही आवडती डिश आहे. आगे बढो, हम तुम्हारे साथ है.👍

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @rushikeshgovekar29
    @rushikeshgovekar29 3 ปีที่แล้ว +6

    चहा चपाती बरोबर तुमचे गाणे ही ऐकायला मिळाले तर अधिक चवदार होईल ❤️

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 ปีที่แล้ว +187

    न शरमता एखाद मॉडेल प्रत्यक्षात आणण हीपण यशाची गुरुकिल्ली होवू शकते🙏आपण तर शिक्षित तरुण आहात.लगे रहो👍

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 ปีที่แล้ว

      डॉ. स्वागत तोडकर म्हणतात ,चहा चपाती खाऊ नये. ते विष आहे.

    • @jayvantkalyankar2289
      @jayvantkalyankar2289 3 ปีที่แล้ว +1

      @@meenagokhale8619 आज हजारो ,यावर जगतायात 🙏

    • @user-gc9tf9kn1d
      @user-gc9tf9kn1d 3 ปีที่แล้ว

      वा वा तुमची भाषा वाचून डोळ्यात पाणी आलं....
      अशाचप्रकारे ह्यापुढेही अगदी न शरमता प्रतिक्रिया देण्यास शुभेच्छा!

    • @akshu.editor3760
      @akshu.editor3760 3 ปีที่แล้ว

      @@meenagokhale8619 मानसिकता तपासा स्वतःची मग बोला

    • @prashantkawle8733
      @prashantkawle8733 2 ปีที่แล้ว

      @@meenagokhale8619 tumhi cream rolls kha mang

  • @ganeshnarayanlalge2202
    @ganeshnarayanlalge2202 3 ปีที่แล้ว +83

    खरच तुमचं सर्वांचं कौतुक करावे तेवढे कमिच असेल, अगदी मनापासून धन्यवाद आभार.. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला पण सध्याच्या काळात घर सोडून बाहेर चहा चपाती खायला भेटेल, ह्याची कल्पना करणे सुध्दा व्यर्थ आहे.. अगदी मनापासून धन्यवाद

    • @dineshkumthekar3135
      @dineshkumthekar3135 3 ปีที่แล้ว

      चहा चपाती खायला भेटेल..
      चपाती अशी "भेटत" नसते.. मी "मिळत" असते.. निर्जीव वस्तू "मिळतात", सजीव (म्हणजे माणसे) भेटतात.. या गावाकडील अडाणी लोकांनी मराठी बिघडवून टाकली आहे..

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆

  • @phcreation4562
    @phcreation4562 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर संकल्पना आहे मित्रा मराठी माणसाचं असल मराठी नाह्यारी.. मनाला आनंद झाला मराठी माणूस पण उद्योजगा कडे वळत आहे... तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐 आणि भावानो हे dislike करणारे कुठून येतात यांना दुसऱ्याचा काही चांगलाच नहीं दिसणार म्हणून त्यांना दुर्लक्ष करा.आणि फ्रेंचैसी देणे चालू करा.

  • @diptidolas9393
    @diptidolas9393 2 ปีที่แล้ว +17

    चपाती श्रेष्ठ आहे, माझ्या चार पिढीला चहा चपाती खाउन बाहेर पडण्याची सवय आहे

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 3 ปีที่แล้ว +26

    "आत्तापर्यंत पुण्यामध्ये कोणालाही न सुचलेली चहा चपाती बिझनेस ची आयडिया" एकदम भन्नाटच आहे! छोट्या उडीवरून मोठी उडी घेणे हा एक सक्सेस होण्याचा मार्ग आहे" आणि पुण्यासारख्या ठिकाणी हा उपक्रम एकदम नवीन आहे तुम्हाला यश हे येणारच. हार्दिक शुभेच्छा भावांनो!

    • @SRL2856
      @SRL2856 3 ปีที่แล้ว

      Shankar Paali pn thewa

  • @marutiyadav234
    @marutiyadav234 3 ปีที่แล้ว +18

    खूप छान उपक्रम आहे, गोरगरीबांना परवडनारा आहे.
    हे नवीन पदार्थ देवावे - वांग्याचे भरीत ,कोल्हापुरी चटणी तेल भाकरी, भाकरी फ्राय केलेला चिवडा , चण्याचा पोळा चपाती,
    नाचन्याची भाकरी तूप चटणी.

  • @deepakahir6812
    @deepakahir6812 2 ปีที่แล้ว +4

    So sweet it reminds me my childhood morning my mother use to give me in breakfast.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 ปีที่แล้ว +3

    Chahaa-poli shivay divsaachi suruvaat hoat nahi...it's just awesome 😊🙏👌

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 3 ปีที่แล้ว +86

    आम्ही लहानपणापासून घरी खातोय, मार्केटींगचे स्वरूप दिल्याबद्दल अभिनंदन 💐💐 यशस्वी भव!

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 3 ปีที่แล้ว +105

    अरे ! वरणफळ किंवा चकुल्या चालू करा, काय मस्त लागतात ! पारंपारीक मराठी पदार्थ आहे .

  • @sunilpshete9177
    @sunilpshete9177 3 ปีที่แล้ว

    खूपच छान.मी आजही रोज सकाळी चहा चपातीच खातो पण बाहेरगावी गेले की अडचण व्हायची आता आपण सुरुवात केल्यामुळे ठीकठीकानी चहा चपाती मिळेल आपले खास अभिनंदन.

  • @manishasulay4286
    @manishasulay4286 3 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन. भन्नाट कल्पना. मलासुद्धा चपाती ला तूप थोडस मीठ आणि लाल तिखट लाऊन पण खूप आवडतं चहा बरोबर खायला. करून बघा खूप चालेल.

  • @praneshjoshi7786
    @praneshjoshi7786 3 ปีที่แล้ว +13

    तुमच्या पुढील वाटचालीस All the best भावा आणि बहिणी❤️💯 अशीच प्रगती करा. मराठी माणूस प्रगती करतोय 💫 हे पाहून proud Feel झालं.

  • @academiczero
    @academiczero 3 ปีที่แล้ว +46

    हा कॉन्सेप्ट च भारी आहे
    छान
    त्यांनी जाम चपाती पण विकली
    😂
    माफक दरात चहा चपाती खूप छान 🙏

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 3 ปีที่แล้ว +5

    Congratulation bhawa, tai, pure Maharashtrarian dish abhiman marathi ha...all the best.

  • @deepakbagul7818
    @deepakbagul7818 3 ปีที่แล้ว +2

    फार छान उपक्रम ,सुंदर कल्पना,👌👌 त्या सोबत तुम्ही मसाला चपाती चुरा हा पदार्थ ठेवून पाहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल 🙏

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 3 ปีที่แล้ว +33

    Mastach, चहा आणि तव्यावर हलकी दाबुन भाजलेली खुसखुशीत, थोडी कुरकुरीत चपाती आणी घरचं साजुक तूप लावलेली गरम गरम चपाती. Good idea guys, all the best.

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 ปีที่แล้ว +27

    छानच नविन कल्पना आहे... आणखी चवदार आकर्षण करण्यासारखे आहे....उदा.चपातीचे प्रकार, तुपाचा वापर...

  • @jamir.mulani
    @jamir.mulani 3 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर काम केल आहे.
    चहा चपाती नाष्टा ही संकल्पना 1 नंबर आहे 😊😋☕

  • @sunitasonawane9746
    @sunitasonawane9746 2 ปีที่แล้ว

    खूप छान...!! माझी मुले आजही चहा चपाती खातात पण त्यांना शिळी पोळी तुप टाकून खाकऱ्या प्रमाणे तव्यावर कडक केलेली आवडते. तुम्ही चहा सोबत खाकऱ्याचे वेगवेगळे प्रकार ठेऊ शकता. 👍

  • @CommonGaming
    @CommonGaming 3 ปีที่แล้ว +74

    जर आपल्या मराठी मुलांनी काही चांगली सुरवात केली तर त्यांना सहकार्य करणे आपले काम आहे. त्याभगतील लोकांनी आवरजून भेट द्यायला हवी... 👍👍👍👍👍❤️

    • @vilasgaikwad4522
      @vilasgaikwad4522 3 ปีที่แล้ว

      Sand wich chya chutnya chapatila lavun Role kela tar ? Burger premi aavdine khatil

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆

  • @sanjaykulkarni2945
    @sanjaykulkarni2945 3 ปีที่แล้ว +37

    थालीपीठ लोणी चालू करा. खायला मस्त वाटेल. चहा चपाती उपक्रम राबविला जात आहे ते खूप छान आहे.
    गावाकडच्या खाण्याची इच्छा चांगली पूर्ण होत आहे. धन्यवाद.
    बेस्ट ऑफ लक.

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 3 ปีที่แล้ว

      👍 खास मराठी खाद्यपदार्थ

  • @shreevalvi8509
    @shreevalvi8509 2 ปีที่แล้ว

    खुप छान संकल्पना आहे. अगदी घरची आठवण यावी अशी साधी आणी युनिक आहे.
    तुम्हा तिघांनाही पुढील वाटचाली साठी खुप खुप शूभेच्छा 💐💐

  • @sudhirchachar
    @sudhirchachar 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर केलंय... माझ सुध्दा हेच मत आहे.... आपल्या मराठी नाष्ट्याला ग्लोबल स्वरूप द्यायचं.....

  • @vishaldongare8490
    @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว +176

    हिरव्या मिरच्या चा ठेचा अन् बाजरीची भाकरी पण ठेवा खुप प्रतिसाद मिळेल

    • @MrRocky793
      @MrRocky793 3 ปีที่แล้ว +11

      Bhajarichi bhakari dahi ani thecha.

    • @vishaldongare8490
      @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว +1

      @@MrRocky793 ha 👌👌👌

    • @vishaldongare8490
      @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว

      @JAVED ATTAR हॉटेल म्हणल्यावर सगळच आल जेवण नाष्टा

    • @shailajavalsange1899
      @shailajavalsange1899 3 ปีที่แล้ว +5

      @@MrRocky793 ho kherch yala pizza hun pn jast pratisad milel😋

    • @Vishaljadhao.
      @Vishaljadhao. 3 ปีที่แล้ว +2

      Full... Confidential.. Comment...Bhava😎😎😎😎

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 3 ปีที่แล้ว +14

    खूप छान कल्पना आहे. या मराठी तरुणांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा आणि त्यांनी केलेल्या या प्रयत्नांना भरपूर यश मिळावे ही सदिच्छा.👌👌👍

    • @sangeetajoshi9462
      @sangeetajoshi9462 3 ปีที่แล้ว

      खरच खूप छान वाटत तुम्ही हि कल्पना पुढे आणली.

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रचा मराठमोळा नास्ता (चहा चपाती) ...हा सकाळी शरीरासाठी अगदी उत्तम आहार आहे... चहा चपाती...ही तुमची प्रथम शाखा असं म्हणता येईल.... अश्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रत.. होवो.. अपेक्षा.... अभिनंदन 🙏

  • @saiconstruction9739
    @saiconstruction9739 3 ปีที่แล้ว +2

    कर्जतकर,खूप खूप अभिनंदन.
    चहा चपाती तर माझा आवडता नास्टा.
    कमी वेळात आणि सहज सोपा स्वस्त नाष्टा.
    खू हटके कल्पना.
    नक्की मुद्दाम भेट देणार.
    खूप शुभेच्छा ❤️

  • @ganeshg4133
    @ganeshg4133 3 ปีที่แล้ว +10

    नवीन कल्पना, अप्रतिम !व्यवसायात सुध्दा तरूण पिढी आली तर ही एका नव्या पर्वाची सुरुवातच म्हणावी लागेल.तुमच्या व्यवसायाला भरपूर यश येवो.😊

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 3 ปีที่แล้ว +13

    चहा चपाती भाकरी हा महाराष्ट्र मधील सकाळ चा नास्ता आहे ही संकल्पना खूप छान आहे तेलकट कळकट खाण्यापेक्षा चहा चपाती उत्तम नास्ता

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 ปีที่แล้ว +2

    मी जवळ जवळ सहासष्ट वर्षें रोज सकाळी चहा चपाती खात आहे.अगदिच‌ कंटाळा आला तर कमी गुळाचा चपातीचा लाडू फार आवडीने़ खात असतों. चहा बरोबर टोस्ट बिस्किटे नेहमी खाल्ल्यास मधुमेह लवकर होण्याची शक्यता फार वाढतेय.

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन..... लय भारी संकल्पना....
    म-हाठमोळा, घराची आठवण येईल असा सात्विक नाष्ता ..... चपातिचे साजुक तुपात बनविलेले लाडु ठेवण्यास हरकत नाही .... कायम एकत्र रहा.... महाराष्ट्रभर खूप आऊटलेट्स होण्यासाठी शुभेच्छा......

  • @pravinbharekar8469
    @pravinbharekar8469 3 ปีที่แล้ว +12

    खूप छान , नक्कीच तुमचं यशस्वी होईल हा नवीन चहा चपातीचा प्रयोग,

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 ปีที่แล้ว +11

    खुप खुप छान, खुप कौतुक तुम्हा मुलांचं👌👌🌹
    आमचा रोजचा नाष्टा आहे हा👏👏👏

  • @kalyanidalvi5736
    @kalyanidalvi5736 3 ปีที่แล้ว +3

    Best of luck guys,... you have done great job...swami tumala khup yash devo 🙏

  • @sudhakarpyarlewar6006
    @sudhakarpyarlewar6006 3 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली कल्पना आहे लहान पणी घरी खायचो आता बाहेर खायला मिळणार . नक्कीच हा मेनु आगळा वेगळा आहे . आणि ज्याच्या सुपीक डोक्यातुन ही आयडीया निघाली त्यांना सलाम🍮🍮🍪🍪

  • @manasimkotwal5218
    @manasimkotwal5218 3 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर कल्पना ,चहा चपाती खायला ही छान तुम्हाला शुभेच्छा 👍

  • @hemangichaudhari8233
    @hemangichaudhari8233 3 ปีที่แล้ว +47

    छान उपक्रम !! खूप शुभेच्छा !!
    पोळी भाजीचा रोल ठेऊ शकता.
    चांगला प्रतिसाद मिळेल.

  • @nehawagh417
    @nehawagh417 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान कल्पना आहे, मला स्वत:ला घडीची पोळी व चहा, गूळ तूप / साखर तूप चपाती खूप आवडते. पोळीचा लाडू, फोडणीची पोळी, तिखट मिठाची चपाती व गरमा गरम पुरी हे पर्याय ही खूप छान आहेत , चालू करा खूप शुभेच्छा व अस्सल मराठी न्याहरी चालू केल्याबद्दल अभिनंदन

  • @geetanjalitandel682
    @geetanjalitandel682 2 ปีที่แล้ว

    1आठवडया पुर्वी माझ्या डोक्यात हा विचार आला होता की चहा चपाती चा
    धंदा चालू केला पाहिजे आणि खरेच तुमचा प्रयत्न पाहून मला खूप आनंद झाला. 👌👌

  • @MD-4031
    @MD-4031 3 ปีที่แล้ว +3

    आमचा ग्रामीण भागातील सकाळचा नाष्टा हा अजूनही चहा-चपाती आहे.
    आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.
    भाऊ तुमच्या मेनुकार्ड मध्ये ग्रामीण चहा-चपाती हा मेनू असला पाहिजे.
    ( भावा अभिमान आहे तुझा आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा )

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 3 ปีที่แล้ว +70

    चपाती एक ब्रेडचा प्रकार आहे. आपण शिळे ब्रेड खातो त्या पेक्षा ताजी चपाती खलेली चांगली

  • @prashantsir2561
    @prashantsir2561 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर संकल्पना.... इतर पदार्थांपेक्षा नक्कीच हा पदार्थ पौष्टिक आहे. तसेच आपण यामुळे आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊ शकतो.आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @sayalimore8923
    @sayalimore8923 2 ปีที่แล้ว +3

    My favourite chay chapati😋😋😋🤭❤️❤️🤩I ate daily for my breakfast ❤️😘

  • @nainadalvi3907
    @nainadalvi3907 3 ปีที่แล้ว +20

    खूप छान! आगे बढो, हम भी कभी आयेंगे😀

  • @shubhadakhandekar8660
    @shubhadakhandekar8660 3 ปีที่แล้ว +66

    It is good. Never be ashamed of our childhood or our financial condition. Always be yours, means as you are. Be honest to yourself, the success is yours.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 ปีที่แล้ว

      What is being ashamed in eating "chaa-chapati"?My parents were doctors. we ate chaha-chapati on Saturday before leaving for morning school. Even gool-toop-poli,toop=sakhar-poli were our favourites for school dabba or as afternoon snacks. Potbhariche ani poushtik! It has nothing to do with socio=financial condition of anybody!
      Best of Luck for your venture!

    • @gaurimurthy9531
      @gaurimurthy9531 3 ปีที่แล้ว

      It is true but many people do feel ashamed because this is a simple way of living and society does condemn them on various occasions, so please take this comment positively

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @Askmepuzzles
    @Askmepuzzles 3 ปีที่แล้ว +5

    It's interprenuers things 🔥

  • @adv.anilshitole359
    @adv.anilshitole359 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर कल्पना आणि उपक्रम. तिघांचेही खुप खुप अनिरुध्द अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा.

  • @sachiningulakar4852
    @sachiningulakar4852 3 ปีที่แล้ว +24

    बातमी दिल्याबद्दल धन्यवाद। लोकमत

  • @amitatole6693
    @amitatole6693 3 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर संकल्पना आहे मी दररोज सकाळी गरमागरम चहा चपाती खातो

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर कल्पना आहे तुम्हाला ह्यात खूप यश मिळू देत👍👍

  • @anandraojadhav9144
    @anandraojadhav9144 3 ปีที่แล้ว

    ज्या व्यक्तीच्या डोक्यात असा विचार आला त्याचे आमच्याकडुन आभिनंदन सर्व स्थरातील लोकानसाठी ही एक चांगली भेट आहे.तुमची अशीच प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx 3 ปีที่แล้ว +41

    खुप छान मन:पुर्वक अभिनंदन.. पुणे येथे आल्यावर नक्की भेट देईल

    • @sulochanabhave6356
      @sulochanabhave6356 3 ปีที่แล้ว +1

      स्तुत्य उपक्रमाला शुभेचच्या

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 ปีที่แล้ว +23

    माझ्या लहान पनीचा नाश्ता ग्रेट आइडिया मित्रा 🙏🙏 All the best!!👍

  • @CalmReflectionsHarmony24
    @CalmReflectionsHarmony24 3 ปีที่แล้ว

    Very truly said I stayed out of country and travel max places In this world. But being maharashtrian I miss this chai chappati and vada pav .its like patriotic dish of every maharashtrian. It's a grt initiative by this young group of ppl.
    Jai Maharashtra.

  • @surajlakal675
    @surajlakal675 3 ปีที่แล้ว

    खूप छान संकल्पना राबवलीत 👌
    आता लोकांना पोस्टीक अन्न खायला मिळणार !
    आपला आदर्श घेऊन जर प्रत्येक शहरात अशा वेगवेगळ्या पोस्टीक पदार्थाची दुकाने झाली तर ,शहरातील बाहेरच खणाऱ्या लोकांच्या health sathi खूप फायद्याचा ठरेल !

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 3 ปีที่แล้ว +22

    शेंगदाणा चटणी, flax seed चटणी, खरडा, गुळ तुप, मसाला इ. बरोबर चपाती ठेवा 🤩

  • @sandipwagh6655
    @sandipwagh6655 3 ปีที่แล้ว +25

    लहान पनाच्या आठवणी जागवल्या 👌👌

  • @ashwinishinde1993
    @ashwinishinde1993 3 ปีที่แล้ว +2

    I really love this concept.. Keep it up.. God bless u..

    • @ChougulesKitchen
      @ChougulesKitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/g3Y3nmFQZ6c/w-d-xo.html
      चहा चपाती 👆👆

  • @rasikashahane4701
    @rasikashahane4701 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन आणि खूप शुभेच्छा , मसाला चपाती ही ठेवा ......☕सोबत अप्रतिम 👌