हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती | Harappan Civilization In Marathi | Historic India Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • हडप्पा संस्कृती ( Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.
    उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला
    नगररचना -
    हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.
    आर्थिक व्यवस्था -
    व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - उदाहरणार्थ,सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग .अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.
    हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहरचा लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.
    घरे -
    हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या व प्रवेशद्वारे नाहीत. रस्त्यावरील धुळीपासून व चोराचिलटांपासून बचाव व्हावा, हा हेतू त्यामागे दिसतो. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग असे. रस्त्याच्या बाजूला मोरी व तिला लागून स्नानगृह बांधीत. मोरी व स्नानगृहात कोठे पाणी मुरणार नाही याची काळजी घेत. आणि पाणी बदलण्याची सोय केेलेेली होती
    Your Queries -
    #HistoricIndiaMarathi
    #HarappanCivilization
    Music - TH-cam Library
    Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

ความคิดเห็น • 92

  • @pratibhavishe2798
    @pratibhavishe2798 3 ปีที่แล้ว +18

    हडप्पा संस्कृती विषयी अतिशय सखोल माहिती पुरविल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @gurupritsingh5540
    @gurupritsingh5540 3 ปีที่แล้ว +8

    Very detailed and informative information about Harappan civilization.. thank u brother

  • @graminvlogkatta4657
    @graminvlogkatta4657 10 หลายเดือนก่อน +2

    हडप्पा संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती.
    भारत देशात मुळमालक म्हणजे आदिवासी.
    हडप्पा संस्कृती,आणि आदिवासी संस्कृती मिळती जुळती आहे.

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg 26 วันที่ผ่านมา

      आदिवासी संस्कृती तर निसर्गपुजक हिंदू संस्कृती आहे.

  • @nayanfarde8459
    @nayanfarde8459 3 ปีที่แล้ว +3

    Nayan

  • @khandeshkattavlogsrecipes4615
    @khandeshkattavlogsrecipes4615 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan Mahitipurn video dada itk sunder present karun eitihasik sakhol mahiti dilit tumhi.

  • @bncmcschool684
    @bncmcschool684 3 ปีที่แล้ว +4

    Pure educational contain.. very very informative

  • @kashinathbhore7385
    @kashinathbhore7385 ปีที่แล้ว +1

    Hii

  • @minalbagmare2117
    @minalbagmare2117 4 หลายเดือนก่อน

    सुरुवातिला तुम्ही एक वाक्य बोल्ला जगतिल चार संस्कृति ,,,,,,,,,,सांगा

  • @SMG_CUBER
    @SMG_CUBER 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही हडप्पा संस्कृती या विषयावर खूप सारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @surajkatech4417
    @surajkatech4417 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडियो

  • @kunalhd6671
    @kunalhd6671 ปีที่แล้ว +2

    या तुझ्या मेहनतीला सलाम भय्या तुझं channel मी सगळीकडे पसरवणार 😍

  • @LataPMadhukar
    @LataPMadhukar 25 วันที่ผ่านมา

    हडप्पा संस्कृती बद्दल भारतातील इंग्रज अधिकारी जेम्स लुईस यांनी दोन वर्षे अभ्यास केला. म्हणजे 200 वर्षांपूर्वी आपल्याला सिंधु सभ्यता असे म्हणतात. चार्ल्स मेसण नसून जेम्स लुईस असे आहे.

  • @sanchitafarde3851
    @sanchitafarde3851 3 ปีที่แล้ว +2

    अंत्यत सुंदर माहिती👍👍👍👌👌💯💯💯🎊🎉

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว

    या शोधामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याचा ,अभ्यास पूर्ण विचार होणे आवश्यक आहे.
    १)ज्या वैदिक संस्कृती चे आतापर्यंत खूप चर्चा झाली ,त्या वेद,पुराण इत्यादी साहित्यात या संस्कृती चा उल्लेख ,निदान ओझरता,तरी झाला आहे का?
    २)रामायण व महाभारत हे ही संस्कृती लोप पावल्यावर ,घडले का?त्या काळच्या लोकांचा हाडप्पा चे लोकांशी संबंध आला का ?हे ही शोधणे आवश्यक आहे.
    ३)वेदांची रचना या संस्कृतीचे पूर्वी झाली असल्यास,त्याचा प्रभाव जाणवतो का?
    ४)ज्या आर्याना इतके वर्षे केंद्र स्थानी ठेवून आमचे संशोधक धडपडत होते ,ते वेद,पुराण,यांचा अजिबात गंध ,हाडपप्पा संस्कृतीचे लोकांना नसावा ,हे आश्चर्य नाही का?
    ५) वेद,पुराण ,रामायण ,महाभारत काळ यांचा परत प्रामाणिक पणें अभ्यास करण्याची पाळी या हडप्पा संस्कृती ने आणली आहे!

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 ปีที่แล้ว +1

    आश्चर्य कारक माहिती दिली.आतापर्यंत ज्ञात नसलेली माहिती मिळाली.व आपला देश सांस्कृतिक दृष्टया किती समृद्ध होता याबद्दल स्वाभिमान वाटला.ॐ

  • @SantoshThakur-ui3jg
    @SantoshThakur-ui3jg ปีที่แล้ว +1

    छान सरळ व मुद्देसूद नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @santoshdiva6996
    @santoshdiva6996 3 ปีที่แล้ว +2

    हडप्पा संस्कृती ची खूप छान माहिती मिळाली

  • @dhruvpalekar
    @dhruvpalekar ปีที่แล้ว +1

    Excellent information with informative pictures/images.

  • @ShardaAutade
    @ShardaAutade 3 หลายเดือนก่อน

    Nice vedio... Great animation.. Keep it up..

  • @kalpanadudhal6966
    @kalpanadudhal6966 2 หลายเดือนก่อน

    Ti fakt Sindhu ghati sabhyata ahe, sindhu-sarswati nahi

  • @milindwankhede6233
    @milindwankhede6233 ปีที่แล้ว +2

    Jabardast 🎉

  • @jagannathgaikwad9348
    @jagannathgaikwad9348 หลายเดือนก่อน

    Thank you very much for the great information

  • @nayanfarde8459
    @nayanfarde8459 3 ปีที่แล้ว +2

    Bahut acchi video hai aise hai aur bhi videos late rehna I am very exited for it

  • @sharinkali
    @sharinkali ปีที่แล้ว

    Hindi mai bataoooo
    Aap achha batate ho

  • @Smile_With_Akki
    @Smile_With_Akki 5 หลายเดือนก่อน

    nice information... keep it up...

  • @pankajpardeshi5142
    @pankajpardeshi5142 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video sir

  • @ayushd121
    @ayushd121 ปีที่แล้ว

    आजच्या पिढीला हे काहीच माहिती नाही 😢

  • @the_painic_boy45
    @the_painic_boy45 10 หลายเดือนก่อน

    Purn mahiti bhetli bhava

  • @anildoke6757
    @anildoke6757 ปีที่แล้ว +1

    Very precious information in lucid language.
    Wel done
    👍👍🌷🌺

  • @saritafarde3076
    @saritafarde3076 3 ปีที่แล้ว +2

    Very deep information about our ancient civilization

  • @manojchitnis8363
    @manojchitnis8363 8 หลายเดือนก่อน

    Sir ankhi kai mahiti milte ka te bagha jamle tar.

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari1396 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @NitinSakaria-s3w
    @NitinSakaria-s3w หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @bhalchandrabhatwadekar211
    @bhalchandrabhatwadekar211 หลายเดือนก่อน

    झ😅

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 หลายเดือนก่อน

    माहिती छान सांगितली पण हडप्पा संस्कृति फारतर ५००० वर्षांपूर्वीची आहे आणि वैदिक काल त्याही खूप आधीचा आहे, संपूर्ण युरोप खंड रानटी, भटक्या अवस्थेत होता त्याकाळी आपले ऋषी मुनींनी ग्रह तारेंचा शोध लावला होता

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 27 วันที่ผ่านมา

      हे what's app university ज्ञान आहे

  • @stritaraut9020
    @stritaraut9020 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @kishorgawade1329
    @kishorgawade1329 หลายเดือนก่อน

    इतिसाचे वस्तूनिष्ठ सादरीकरण केलेबददल आपले मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @shradhadahale
    @shradhadahale ปีที่แล้ว

    सर खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 3 หลายเดือนก่อน

    फार सविस्तर आणि मोजक्या शब्दांत भरपूर माहिती दिली असून आपले आभार,,,, 🙏

  • @truptishelavale8758
    @truptishelavale8758 3 ปีที่แล้ว +1

    Very very informative video mama👌👌

  • @nitinbhere8564
    @nitinbhere8564 3 ปีที่แล้ว +1

    Very very informative video.. 👌👌👌

  • @nayangames1663
    @nayangames1663 3 ปีที่แล้ว +1

    Very very Impressive video...

  • @subhashpatil6753
    @subhashpatil6753 3 ปีที่แล้ว +1

    Sir, khup chhan mahiti dilit tumhi

  • @shradhadahale
    @shradhadahale ปีที่แล้ว

    नर्तिका ब्रांच मूर्ती याबद्दल काही माहिती मिळेल का सर

  • @haridasshelavale3964
    @haridasshelavale3964 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video

  • @vaibhavrao6146
    @vaibhavrao6146 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video...

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 ปีที่แล้ว

    ज्यावेळेस ही संस्कृती नष्ट झाली त्यावेळेस त्यांच्यातील माणसे जिवंत राहिली असतील का...🙏

    • @RohitBadade-jr6jb
      @RohitBadade-jr6jb 2 หลายเดือนก่อน

      मोहनजोदो मूवी बग मित्रा लास्ट ला माणसं जिवंत राहतात 😊

  • @chanchalashelavale4491
    @chanchalashelavale4491 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti...

  • @shradhadahale
    @shradhadahale ปีที่แล้ว

    अजून काही हिस्टरी ऑफ आर्ट या विषयाबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज व्हिडिओ शेअर करा

  • @pankajfarde135
    @pankajfarde135 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍🎉🎉🎉

  • @vitthalbhere6973
    @vitthalbhere6973 3 ปีที่แล้ว +1

    Very good video

  • @ArjunHangirgekar-sh2mj
    @ArjunHangirgekar-sh2mj หลายเดือนก่อน

    KhoopDhanyavad
    NamasteSir

  • @shradhadahale
    @shradhadahale ปีที่แล้ว

    सर इथे ऐतिहासिक नर्तिकी याचे रसग्रहण कसे करावे

  • @dayashelavale311
    @dayashelavale311 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @Jassu66
    @Jassu66 ปีที่แล้ว

    Sir khup khup Aabhari aahe.
    Exam sati hi khup easy lakshat rahil

  • @mukeshmeshram6761
    @mukeshmeshram6761 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर संपूर्ण माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @pratibhaverulkar8859
    @pratibhaverulkar8859 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan prakare explain Kelel aahe thank you 🙏

  • @sohanmahadore3039
    @sohanmahadore3039 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @Santosh-gj2qn
    @Santosh-gj2qn 2 ปีที่แล้ว

    Very detail informative information of till today

  • @dasharathjadhav5394
    @dasharathjadhav5394 ปีที่แล้ว

    Excellent very informative video

  • @ankitborkute207
    @ankitborkute207 2 ปีที่แล้ว

    Sir tumhachya video mule amhala khup phayada hoto

  • @mahadevbhosale334
    @mahadevbhosale334 2 ปีที่แล้ว

    Sir haddapa sanskruti hi koni lihali ahe

  • @dashrathghodke2480
    @dashrathghodke2480 2 ปีที่แล้ว

    Ek number mahiti sangeet 💯👍

  • @ParamjeetKaur-je4dq
    @ParamjeetKaur-je4dq 2 ปีที่แล้ว

    Really interesting information and presentation

  • @rajeshkotadiya5266
    @rajeshkotadiya5266 2 ปีที่แล้ว

    Very good and effective information

  • @shradhadahale
    @shradhadahale ปีที่แล้ว

    Woow

  • @dhulendratanpure744
    @dhulendratanpure744 2 ปีที่แล้ว

    मला लिहून पाठवता का

  • @marutimahangade1619
    @marutimahangade1619 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @vijayrawate7809
    @vijayrawate7809 ปีที่แล้ว

    Great information

  • @Jackkasan
    @Jackkasan 2 ปีที่แล้ว

    khup chhan🥰 keep it bro

  • @atulpatil3843
    @atulpatil3843 2 ปีที่แล้ว

    Kya baat hai.. jabardast

  • @jayabalapure6860
    @jayabalapure6860 ปีที่แล้ว

    ❤❤❤ master

  • @ashishjadahv5597
    @ashishjadahv5597 9 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @dattatraynaik1327
    @dattatraynaik1327 ปีที่แล้ว

    Mast bhau

  • @anilldeshmukh12
    @anilldeshmukh12 2 ปีที่แล้ว

    पाच हजार वर्षापूर्वी सर

  • @madandixit6896
    @madandixit6896 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत...

  • @rameshgira943
    @rameshgira943 2 ปีที่แล้ว

    Chaaan mahiti

  • @nehashewale6444
    @nehashewale6444 ปีที่แล้ว

    Great 👍

  • @kalyanimahajan3897
    @kalyanimahajan3897 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @mahadevbhosale334
    @mahadevbhosale334 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @kundavishe513
    @kundavishe513 2 ปีที่แล้ว

    छान

  • @samswonderlust1347
    @samswonderlust1347 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @soniarane9068
    @soniarane9068 2 ปีที่แล้ว

    👌👍🙏

  • @adityarothe06gmailcom1
    @adityarothe06gmailcom1 8 หลายเดือนก่อน

    Sinauli ani keeladi varti pan vide aana

  • @anandmane2637
    @anandmane2637 10 หลายเดือนก่อน

    Ankhi video banava khupach abhyaspurn astat tumche video