रंगपंढरी Face-to-Face: Vikram Gokhle - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या दैदिप्यमान अभिनयाने केवळ मराठी रंगभूमीवरच नव्हे तर अखिल भारतीय कलाविश्वात अढळपद प्राप्त केलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठच.
    अभिनयाबद्दल स्वतंत्र विचार, देश-विदेशातील कलाशास्त्राचा गाढा अभ्यास, दुर्दम्य आत्मविश्वास, आणि अमर्याद ऊर्जा ह्या गुणांच्या बळावर नाटक आणि चित्रपट ह्या क्षेत्रांत अनेक विक्रमी आविष्कार त्यांनी केले. 'बॅरिस्टर', 'कमला', 'आणि मकरंद राजाध्यक्ष', 'नकळत सारे घडले', 'आप्पा आणि बाप्पा', 'कथा' सारखी गाजलेली नाटकं; आणि 'अनुमती', 'आघात', 'नटसम्राट', 'कळत नकळत', 'खरं सांगायचं तर', 'हम दिल दे चुके सनम', 'अग्निपथ' असे असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपट ह्यातील दर्जेदार अभिनयाने विक्रम सर जगभरातील रसिकांच्या मनातील ताईत आणि होतकरू कलाकारांचे आदर्श बनले आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार, झी जीवन गौरव असे अगणित मानसन्मान त्यांना आजवर मिळालेले आहेत.
    ह्या प्रदीर्घ प्रवासात आलेले अनुभव आणि ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावं म्हणून सतत प्रयत्नशील असलेले विक्रम सर पुणे विद्यापीठात '"Science of dramaturgy" ह्या विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून शिकवतात. याशिवाय स्वतःचे अभिनय आणि दिग्दर्शन वर्ग सुद्धा नेमाने चालवतात.
    मराठी रंगभूमीवरचा हा महान नट आज उलगडतोय त्याचा नाट्यप्रवास, नाट्यप्रक्रिया आणि नाट्यविचार.

ความคิดเห็น • 189

  • @sanj303
    @sanj303 4 ปีที่แล้ว +22

    चांगल्या मुलाखतकाराचे एक लक्षण म्हणजे उत्तम श्रोता असणे आणि हे वैशिष्ट्य मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्याकडे असल्यामुळे मुलाखतीचा प्रभाव जास्त पडतो. त्यामुळेच ही मुलाखत फार अप्रतिम झाली.

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार मधुराणी अप्रतिम मुलाखत..💐💐
    श्री. विक्रम गोखले यांना त्रिवार वंदन ...🙏🙏🙏

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +8

    गोखले सरांनी आपल्या शिकत राहण्याच्या अनुभवांचा हा अमूल्य ठेवा पुस्तक रूपाने लवकर आम्हा सगळ्यांच्या स्वाधीन करावा , ही मनापासून विनंती !

  • @atuld
    @atuld 4 ปีที่แล้ว +5

    Two highlights for me amongst so many gems here were -
    “ ईतकच खोटं करावं की ते खरं वााटलं पाहीजे!”
    “I teach to learn, not to earn!”
    विक्रम सर किती मनसोक्त मुलाखत दिलीत 🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 4 ปีที่แล้ว +4

    दुसर्यांना आपल्यातील देण्याची तळमळ फारच भावली असे उत्तुंग कलाकार जेव्हां बोलायला सुरुवात करतात तेव्हा जी काय लिंक लागते वा वा मस्तच याचे श्रेय मधूराणी तुम्हासच 👍

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख मुलाखत सर्वांगाने विचार करून केलेला अभ्यासपूर्ण नट व त्याचा सम्राट श्री विक्रम गोखले यांना नमस्कार
    मराठी रंगभूमीवरचे बच्चन
    खुप छान
    जय हो

  • @amitavartak1553
    @amitavartak1553 2 ปีที่แล้ว +2

    What a balanced, intelligent, perfectionist, a well poised and above all a very dignified personality ....a lot of respect for you Sir

  • @shreeramtilak9269
    @shreeramtilak9269 4 ปีที่แล้ว +5

    प्रचंड छान आणि माहितीपूर्ण आणि प्रबोधन करणारी मुलाखत.

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत, निःशब्द झाले बघून. खूप ऐकलं होतं विक्रमजींबद्दल, तेच विचार प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकून भारावून गेल्यासारखं झालंय. त्यांनी दिलेली उदाहरणं अंगावर काटा आणणारी होती. खूप वाट बघत होते या एपिसोडची. खूप खूप धन्यवाद🙏

  • @sheelakulkarni7431
    @sheelakulkarni7431 2 ปีที่แล้ว

    खूपच भारावून गेले मी. विक्रमजी गोखले ह्यांचे विचार, सखोल अभ्यास, सांगण्याची हातोटी, मानसशास्त्राचा गहन,सखोल अभ्यास.त्यांनी काय काय Assimilate केलय.शब्द नाहीत
    मधुराणी तुमची प्रश्नावली तोडच नाही. अप्रतिम.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      शीला जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      रंगपंढरीच्या प्रश्नावली बद्दल माहिती देणारा हा लेख कदाचित तुम्हाला आवडेल:
      tinyurl.com/4rm6su95

  • @snehakalsekar2405
    @snehakalsekar2405 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत
    रंगपंढरीचे खुप खुप आभार
    विक्रमसरांचे पण खुप मनापासुन आभार ' खुप छान प्रकारे व्यक्त झालात .
    विक्रमसरांना मनापासून अभिवादन
    खुपच सुंदर अप्रतिम आणि
    विक्रमसरांना खुप खुप शुभेच्छा

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +3

    नाटककार मंडळीच्या अशा अभ्यासपूर्ण आणि दीर्घ मुलाखती संग्रहित झाल्यात तर रंगभूमीचा तसेच नाटक घडण्याच्या क्रिएटिव्ह प्रोसेसचा आणखी एक अदृश्य कोपरा उजळत जाईल ! महेश एलकुंचवार यांची मुलाखत व्हायला हवी ह्या निमित्ताने !

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ....सुसंवाद ......रंगभूमीचा बादशहा....भाषाप्रभू......दिग्गज अभिनय सम्राट .....सलाम.......मधुराणीने म्हंटल्याप्रमाणे....खरंच शब्द नाहीत ......

    • @sumanjoshi9609
      @sumanjoshi9609 6 หลายเดือนก่อน

      Meenal l 2:04 😊

  • @dhanashrigiranje3959
    @dhanashrigiranje3959 4 ปีที่แล้ว +3

    छान झाली मुलाखत सगळेच भाग मस्त झाले मधुराणी आणि टीमचे आभार आम्हाला तुमच्या मुळे एवढी माहिती मिळते अभिनेत्याची मनापासून धन्यवाद असेच छान छान मुलाखती पुढे दाखवा

  • @aparna3018
    @aparna3018 2 ปีที่แล้ว

    श्री. विक्रम गोखले सर, खूप अभ्यासपूर्ण मुलाखत, त्रिवार वंदन. मधुराणी गोखले छान घेतलीत मुलाखत. दोघांचेही अभिनंदन.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      अपर्णा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @manjirimankar1848
    @manjirimankar1848 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर, अतिशय माहितीपूर्ण, तसेच मधुराणी तुमची स्वतःची ऐकण्याची आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची शैली मला खूपच भावते. 👌👌👌👌

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว

    या ऊपक्रमाबद्दल आत्ता कळलेय. खुपच छान!!

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 ปีที่แล้ว +1

    खूप मनापासून आभार मानले पाहिजेत...अतिशय सुरेख कार्यक्रम....मधुराणीचं विशेष कौतुक...

  • @saigraphics6578
    @saigraphics6578 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत. धन्यवाद रंगपंढरी टीम...

  • @GG-vr1wn
    @GG-vr1wn 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.. हा interview म्हणजे भारावरून टाकणारा अनुभवच !! धन्यवाद रंगपंढरी ❤️🙏

  • @surekhaursal6736
    @surekhaursal6736 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम क्लासिक कलाकारांच्या अनुभवांचा खजिना प्रकट मुलाखत स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत साभार पोहोचतोय. सर्व मान्यवर क्लाकारांना धन्यवाद आपली अनुभवांची शिदोरी ही नक्कीच नव
    कलाकारांना सर्वगुण संपन्नअभिनय कसा करावा याच नेहमी भान देईल. रंग पंढरी टीम मेंबर्सचे आभार.... Hats off...👍

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सुरेखा जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @swapnakadam768
    @swapnakadam768 4 ปีที่แล้ว +2

    Mi natakacha abhyas karat nahi tarihi rangpandharicha pratyek episode pahate karan he nat evadhe great aahet ki jivanbaddal pn khup kahi shikayala milat:-) Khup khup aabhar:-)

  • @sudhapatwardhan6556
    @sudhapatwardhan6556 3 ปีที่แล้ว

    फार सुरेख अनुभव. श्रवणानंद आणि परिपक्व,प्रगल्भ होत जाण्याची प्रक्रिया! खूप खूप आभार आदरणीय गोखले यांचे.फार ज्ञानी नटाला भेटल्याचे समाधान. मुलाखत घेणे ही एक कला आहे हे मधुराणीने सिद्ध केले.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว

    रामराम
    अतुल्य ज्ञान मिळाले
    आभार धन्यवाद

  • @rajeshbhosale09
    @rajeshbhosale09 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपक्रम आहे...... प्रत्येकाने रंग पंढरी बघितली पाहिजे ....... सुंदर

  • @BsmLifestyle007
    @BsmLifestyle007 7 หลายเดือนก่อน

    Thank you 🙏 for such great interview 👏

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni9737 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलखत घेतली , झाली .👌👌👍👍

  • @seemashende7866
    @seemashende7866 4 ปีที่แล้ว +1

    मुलाखत घेणं एक कला आहे...त्याचा पत्यय येतो....What & how an actor prepares ....विक्रम गोखले म्हणजे मूर्तीमंत उदाहरण...आणि किती उदाहरणं देऊन त्यांनी ते दाखवलं.....खरोखरचा अभ्यासू नट ! ...

  • @yogeshwarpatil447
    @yogeshwarpatil447 4 ปีที่แล้ว +2

    Namaskar Vikramji
    Tumchi hi mulakhat pratyek skhetratil vatsaroonna margadarshak tharel.... Ashi aahe

  • @jayshreejoshi3992
    @jayshreejoshi3992 4 ปีที่แล้ว +2

    Namaste!! khoop chhan upakram.mi kahi theaterfield madhil kuni nahi...pan tarihi pratyek episode mi avarjun pahate..Aajchi Vikram Gokhale yanchi mulakhat faar apratim...tyanche abhyaspoorna bolane farach prabhavi hote..Tyani sangitlelya kityek goshti uttam kalakarala jasha upyogi tasech uttam vyakti honyasathi sudha titkyach upyogi...Shree Vikramjinche ani tumha sarvanche manapasun abhar!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद जयश्री जी!
      - योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 4 ปีที่แล้ว +7

    I love you Madhurani. 🥰🥰🥰🥰Such a lovely host.

  • @nutansalvi1965
    @nutansalvi1965 4 ปีที่แล้ว

    शब्दच नाहीत व्यक्त व्हायला. खूपच सुंदर उपक्रम. मुलाखत घेण्याची पध्दत अप्रतिम. विक्रम गोखलें बद्दल काय बोलणार? इतक्या महान कलाकाराला ऐकायला मिळणे हेच आमचे भाग्य. इतका हुशार आणि विचारी नट कधी पाहिला नव्हता. अभिनया बद्दल प्रचंड knowledge असणारा नट. त्रिवार नमस्कार त्यांना

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan..... Vikram sirani shevati itka chhan message dilay... dhanyawad....

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 4 ปีที่แล้ว +6

    Absolutely delightful and beautiful an interview..exceedingly well worth every second invested in seeing it.
    Madhurani is an awesome interviewer and her ability to questions asked are intelligent and well phrased even to the creme de la creme!,
    Hats off!..!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सुनीती जी!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत. विक्रम गोखले हे माझे अतिशय आवडते नट. मधुराणी मुलाखत खूपच छान घेते. अतिशय छान प्रश्न असतात. This interview really was enriching

  • @swatiphatak6764
    @swatiphatak6764 4 ปีที่แล้ว +1

    रंगपंचमी, पुन्हा एकदा तुमच्या या उपक्रमाबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. विक्रम गोखले यांनी काही वेचक ठिकाणी जिवनाचे सारं सांगितले आहे. नटच नव्हे, माणसांनी डोळसपणे आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या पाहिजेत, अभ्यासू वृत्तीने जगले पाहिजे आणि समाजाकडून जे जे घेऊन मोठे झालात ते पुढच्या पिढीला देत उतराई झाले पाहिजे.

  • @archanarawal3777
    @archanarawal3777 4 ปีที่แล้ว

    विक्रम गोखले सरांचे मुलाखतीचे दोन्ही भाग अप्रतिम होते. कलाकारांनी किती विचार करावा हे माहिती होतं पण तो कसा विचार करावा...कोणत्या पद्धतीने करावा... हे अप्रतिम रित्या सरांनी सांगितले. 🙏🙏 🙏💐💐💐

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 ปีที่แล้ว

    Really disciplined Actor ! खरं तर ही मुलाखत परत एकदा संपूर्ण ऐकणार आहे पहिल्यांदा संपूर्ण ऐकूनही समाधान झाले नाही ! विक्रम जी गोखले-- हा महान नट समजण्यासाठी ते आवश्यकच वाटतंय ! माणूस म्हणून ही अत्यंत आदर आहे च !आम्हाला त्यांचा अभिमान आहे !🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalishastri4624
    @anjalishastri4624 3 ปีที่แล้ว

    कलाकारांसाठी खुप माहिती पूर्ण आहेच ,पण सामान्य प्रेक्षकासाठी पण एक सुंदर कार्यशाळा आहे हा episode. काय बघावं, कसं बघावं याची समज आली. दोन्ही गोखल्यांना ( विक्रम आणि मधुराणी ) धन्यवाद.🙏

  • @dhirajmohite932
    @dhirajmohite932 4 ปีที่แล้ว +1

    थँक्यू सो मच रंगकर्मी धन्यवाद आभारी आहोत

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว +1

    🌹आदरणीय श्री विक्रम काका गोखले यांना सादर विशेष नमस्कार 🙏🌹मधुराणी जीं ही प्रत्येक विडीओला सुंदर दिसतात.🌹 आपले या विडोओतील सर्व काही प्रामाणिकपणे सांगणे मनाला भावले.
    🌼अन्नदानं महादानं विद्यादानमतः परम् ।
    अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवञ्च विद्यया!🌼
    या प्रमाणे..च...बर्याच वेळेला आपण नकळत आपल्याला येत असलेली एखादी कला/ अनुभव दुसर्याला सांगतो.. तेव्हा..पुढची व्यक्ती ही आपल्या प्रती .. गैर अर्थ काढून ' प्रौढी' या 'लेबल' खाली दाबून टाकते.. पण तरीही आपण आपला प्रामाणिक प्रयत्न कधीच सोडायचा नाही .. हे मात्र पक्के असावे. कारण ज्ञान दिल्याने वाढते. आणि ते दरवेळी परीपक्वतेकडे नेणारे असाते.
    न जाणो आपला कुठला अनुभव इतरांच्या जीवनातील कठीण काम चुटकीसरशी सोप्पी करून जाईल... असो.
    आज छान ज्ञान वर्धन झाले. 🌹
    🙏श्री गुरवे नम:!🌹अनेकानेक शुभेच्छा दोघांनाही भावी उपक्रमांसाठी!!🌹
    🌹शुभम् भवतु! 🙏नमस्कार 🌹

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      ह्या नितांत सुंदर प्रतिक्रियेला उत्तर द्यायला खूप उशीर झाला. दिलगीर आहे.
      खूप खूप धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया प्रत्यक्ष विक्रम सरांपर्यंत पोचवली आहे. 🙏🙏
      - योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @vai.vi.akantcreations
      @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว

      @@RangPandhari धन्यवाद:! 🙏विक्रमकाका गोखले काय म्हणाले असतील बरं🤔??☝️
      विक्रम काकांना आणि आपण सर्व
      रंगपंढरी मंडळींना अनेक शुभकामना! 🌹
      उत्तम आरोग्याने सदैव क्रियाशील असोत.🌹

  • @radhikajoshi7013
    @radhikajoshi7013 4 ปีที่แล้ว +2

    Part 3 and 4 pan aavadle asate sir n che. Very interesting and intellectual 👌🏻

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 4 ปีที่แล้ว +1

    विक्रम काकांची मुलाखत खूप आवडली
    ते खरोखरच अभिनयाची युनिव्हर्सिटी आहेत
    मी विक्रम सर असं मुद्दाम म्हटलं नाही
    सर, मॅडम पेक्षा काका, ताई, दादा या शब्दात आपुलकी आहे
    विक्रमकाकांसारखा, देखणा, रंगभूमीशी अत्यंत प्रामाणिक असलेला, अभ्यासू, इतरांना आनंद आणि अनुभव देणारा कलाकार तसेच तत्वनिष्ठ, सामाजिक भान असणारा, स्वतःचे विचार असणारा आणि ते स्वतंत्र आणि निर्भीडपणे मांडणारा माणूस आम्हाला अनुभवायला मिळाला, खूप आनंद झाला, मजा आली. विक्रमकाकांना खूप धन्यवाद
    मधुराणी तू खूप कमी बोलून चेहऱ्याने खूप बोलतेस
    खूप छान मुलाखत घेतेस
    तुझे आणि योगेशचे या उपक्रमासाठी खूप खूप कौतुक

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks स्वरदा जी!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी.

  • @yogeshdixit1748
    @yogeshdixit1748 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम, एक खजाना उघडून दिलात. धन्यवाद

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 ปีที่แล้ว +1

    Too good... again I must say as always its a wonderful work going on.. Thank you, Rangapandhari team..

  • @AT-sb4dq
    @AT-sb4dq 3 ปีที่แล้ว

    गोखले सरांचे बोलणे ऐकत राहणे यासारखे सुख नाही. सुरवातीला मुलाखत कार खुपच मध्ये मध्ये बोलत होत्या, पण नंतर त्यांना त्यांची चूक कळली व नंतर त्या शांत राहून गोखले सरांना बोलू देऊ लागल्या या बद्दल त्यांचे आभार. रंग पंढरी ला विनंती की त्यांनी गोखले सरांचे असे अनेक सेशन्स करावेत की त्यातून त्यांच्या कडून खूप काही शिकता येईल. सगळ्यांनाच त्यांचे शिबीर attend करणे शक्य नसते, या माध्यमातून ते आपले विचार आम्हा लोकांना ऐकवू शकतील. तरी त्यांचे अभिनय शास्त्रा बद्दलचे विचार ते व्यक्त करू शकतील असे त्यांचे सेशन्स, मुलाखती जरूर जरूर घ्याव्यात ही विनंती. दुर्दैवाने त्यांची नाटके, सिनेमे आता येणे बंद झाले आहे. या मुलाखतींद्वारे ते आम्हाला भेटत राहोत.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      अनंत जी, तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमच्या सूचनांचा नक्की विचार करु.
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 4 ปีที่แล้ว

    छान खूप काही शिकायला मिळाले विक्रम गोखले सरांकडून धन्यवाद रंग पंढरी चे

  • @satejayerunkar224
    @satejayerunkar224 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत!

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      सतेजा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @pravinakulkarni3985
    @pravinakulkarni3985 3 ปีที่แล้ว

    Masterpiece ... anubhavancha khajina 👍

  • @sushamagramopadhye9808
    @sushamagramopadhye9808 6 หลายเดือนก่อน

    Great. Very nice

  • @Shailush
    @Shailush 4 ปีที่แล้ว +3

    विजयाबाईंची मुलाखत घेऊ शकाल का? त्यांना ऐकायची खूप इच्छा आहे. आजच्या आमच्या पिढीला त्या कळाव्यात अस वाटतं

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +2

      प्रयत्न चालू आहेत! :-)

    • @alakashikhare6495
      @alakashikhare6495 3 ปีที่แล้ว

      मुलाखती देणारे उत्तम व घेणारी ही उत्तम सर्वांना आवडेल असे व सर्वांग सुंदर स्तुत्य उपक्रम आभार बाई आल्या तर भरून पाऊ

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 ปีที่แล้ว

    Mi javal javal saglya mulakhati eiklya aahet
    Aprateem
    Pranshna khup chan astat
    Interview khup informative asto
    All the best
    Mala aatta paryant 3 mulakhati khupach aavadlya
    Mukta Barve
    Neena Kulkarni
    Vikram Gokhale

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว +1

      इतक्या आवर्जून मुलाखती पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, माधवी जी!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sureshdeo9163
    @sureshdeo9163 ปีที่แล้ว

    Simply Awesome interview

  • @freebk161
    @freebk161 4 ปีที่แล้ว +5

    विक्रम काका , तुमचा ना मला फार हेवा वाटतो कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही "जगलात". आम्ही एखाद्या मढ्यासारखं आयुष्य पुढे ढकलतोय. पैसे किंवा आज डॉलर च्या मृगजला मागे धावतोय. आयुष्यातले १०-१२ तास न आवडणारं काम करून स्वतःची पुंजी भरतोय पण हेही खरं आहे की तुम्ही सतत विद्यार्थी दशेत राहून वाचन, शिक्षण, चिंतन, मनन केलं. मी तर म्हणेन की तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये तुमचा ध्यास (पॅशन) आहे जिला तुम्ही तुम्हाला हवं तसं वाकवलं. बुद्धिमत्तेला कष्टाची जोड दिली. 'यश' समतोल बुद्धिमत्तेच्या शिरस्त्राणाने रोखून ठेवलं. आता दुसरा एक विषय म्हणजे तुम्ही लहानपणापासून देखणे, राजबिंडे आणि रुबाबदार, पण आजवर एकदाही तुमच्या अंगावर पत्रकारांनी, लोकांनी किळसवाणे शब्द फेकले नाहीत. याचं मनापासून कौतुक आणि एक मराठी माणूस म्हणून अभिमानही वाटतो. तुमच्या सामाजिक कार्याबद्दल एक दोन प्रश्न विचारले असते तर तुमची तीही बाजू लोकांना कळली असती. तुम्हाला एकदा भेटायला येईन आणि विचारेंन , 'तुमचे पाय कुठे आहेत? '
    मधुराणी, तुझ्याकडे पण एक कला आहे, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात हात घालून त्याला सतत (दारू प्यालेल्या माणसासारखं) बोलतं ठेवायचं !!!

  • @manasikulkarni7637
    @manasikulkarni7637 3 ปีที่แล้ว

    Thanks Rangpandhari for such excellent interviews

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 3 ปีที่แล้ว

    फारच छान !! मुलाखतीचे निमित्ताने
    श्री विक्रम गोखले नट म्हणून प्रत्यक्ष
    अभिनया पलीकडे एक नट व व्यक्ती किती ऊंच आहे ते कळले.
    पुढच्या पिढीला कर्तव्य भावनेने देण्याची त्यांची भूमिका फारच ऊत्कट तर आहेच पण प्रामाणिकपणाची आहे हे सारे ऐकून फार ऊदात्त वाटले.
    नट म्हणून कसे कसे तयार ह्वावयाचे याचा चौफेर आढावा त्यांनी सांगत रंग पंढरीला ऐक अविस्मरणीय वस्तुपाठच दिला आहे.
    असेच उत्तम ऊत्तम कार्यक्रम
    देत रहावे याबद्दल आपणा सर्वांचे
    मनापासून हार्दीक आभार :!!
    आपल्या या व भविष्यातील सर्व ऊपक्रमांना हार्दिक शुभेच्छा !!
    व आशिर्वाद :!!
    एक रसिक प्रेक्षक :!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      अशोक जी, तुमच्या विस्तृत आणि दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे! 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 4 ปีที่แล้ว

    अप्रतीम मुलाखत.. समृद्ध करणारा अनुभव

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 4 ปีที่แล้ว +10

    सॉलिड जब्राट अफलातून उपक्रम सुरू केला आहे रंग पंढरी

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 4 ปีที่แล้ว

    Madhurani Prabhulkar yanche uttam sardarikaran aani Pratibhavan Vikram Gokhale yanche vividh anubhavanche Bandar yani ha video khup Apratim zala. 👍👍

  • @ranjanamishra318
    @ranjanamishra318 3 ปีที่แล้ว

    खुपच छान मुलाखत आहे विक्रमजींनी नटानी कस असाव हे फार छान सांगितल

  • @harshachavan4424
    @harshachavan4424 4 ปีที่แล้ว

    Atishay Stutya upakram...Mulakhat kashi ghyavi ani kashi dyavi yacha best example..Madhurani chi mojkyach shabdat Manyavarana bharbharun bolta karnyachi paddhat ,atishay apratim!!!
    VG ni Natyashastracha kelela sangopang khulasa man thakka karto...He RangaPandhariche Sant Kalechya bhaktirasat aplyala akhand bhijavun taktat!!!

  • @sdpanditPanditShubhangi
    @sdpanditPanditShubhangi 2 ปีที่แล้ว

    खूब छान कार्यक्रम आहे।अशीच मुलाखत नाना पाटेकर यांची घ्या।

  • @ulhasgaikwad7955
    @ulhasgaikwad7955 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत.

  • @gajanan66
    @gajanan66 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत ,👌👌👍👍

  • @meenashere5502
    @meenashere5502 3 ปีที่แล้ว

    Excellent show, I watch first time Vikram sir interview, speechless each and every words he talks about made me feel like I was in a school for acting 👍

    • @suhasbubukwar826
      @suhasbubukwar826 3 ปีที่แล้ว

      रंग पंढरी हा कार्यक्रम खूप सुंदर आहे मला खूप आवडतो ह्या कार्यक्रमातून तुम्हालाही कही मदत होते का

  • @amitavartak1553
    @amitavartak1553 2 ปีที่แล้ว

    Madhurani prabhulkar is a very patient listener and does not interrupt the guest while he is sharing his experiences

  • @santoshmanjavkar9903
    @santoshmanjavkar9903 4 ปีที่แล้ว +1

    Great work Yogesh
    Santosh Manjavkar ex colleague
    Rhizic
    Once again great

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      अरे मित्रा किती वर्षं शोधतोय तुला!!! So happy to hear from you. Can you email your phone number on projectrangpandhari (at) Gmail (dot) com? We can talk thereafter.

  • @vinaythengdi2659
    @vinaythengdi2659 4 ปีที่แล้ว +2

    छान, उत्तम मुलाखत,👌 मकरंद देशपांडेंना कधी बोलवताय ?

  • @moonwalk3rr
    @moonwalk3rr 4 ปีที่แล้ว

    Prashna kiti chhan wicharta tumhi hya show madhe wah! ani saglyanna "ajun bola, ulgadun bola" asa sangta! kiti kamal! khup ch mast!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अनिश जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @saylihingurao8413
    @saylihingurao8413 3 ปีที่แล้ว

    Thanks a lot Sir for sharing your knowledge and experience. I watched both the part and even noted down the tips you mentioned How to become an actor and what we have to do for becoming actors

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 4 ปีที่แล้ว

    विक्रम गोखले या असामान्य व्यक्तीमत्वाला शतशहा प्रणाम 🙏

  • @adityasworld1583
    @adityasworld1583 ปีที่แล้ว

    Great episode

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 2 ปีที่แล้ว

    मधुराणी आपला कार्यक्रम हा मराठी भाषिक असावा असावा असावा असं वाटलं होतं हो! पण विक्रमजींची मुलाखत पाहून गैरसमज दूर झाला रंगपंढरी हा इंग्रजी भाषिक कार्यक्रम असल्याचं कळलं आता त्या ऐवजी दुसरा कार्यक्रम पाहू आम्हाला आपलं मराठीच चांगलं कळतं हो

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      वसुधा जी. सर्वप्रथम तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
      अनेक भाषिक व्यक्तींच्या सान्निध्यात येऊन आणि हल्लीच्या संमिश्र वातावरणात राहून भाषेवर थोडा इंग्रजीचा प्रभाव पडतो असं वाटतं का तुम्हाला? काही विशिष्ट संकल्पना समजावताना इंग्रजी आपसूक वापरली जाते असंही होतं कधीकधी. नाही का?
      तुमचं मत कळवा आणि कार्यक्रम असाच पहात रहा. 🙏
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 ปีที่แล้ว +2

    Love you Vikramji

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 3 ปีที่แล้ว

    Khupach chhaan aani paripoorn vaatata rangapandhari pahatana

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद संदीप जी! तुमची प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं खूप.

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 2 ปีที่แล้ว

    Great mulakhat "Hya Sam Hach"Atishay Dolas Abhyas Gayanatal Rasik Vikaram Goghalenchy Natakankade Sahaj prexak banana yetat V G nche khoop mothe yogdan aahe

  • @sunitapathade9007
    @sunitapathade9007 4 ปีที่แล้ว +1

    Very wonderful show👌👌

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सुनीता जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 ปีที่แล้ว +1

    It was great acting by Atul Kulkarni

  • @ameyanimkar8285
    @ameyanimkar8285 4 ปีที่แล้ว +6

    मधुराणी, तू मुलाखत घेताना नुसतंच "हम्म हम्म" करतेस ,त्यामुळे मुलाखतीतील मजा निघून जाते,तू जर समोरच्याला चांगला प्रतिसाद दिलास आणि प्रश्नावली न घेता एक सहजपणे अनौपचारिक गप्पा मारल्यास तर अजून जास्त मजा येईल कार्यक्रम बघायला असं मला वाटतं... बाकी खूप छान आहे तुझा कार्यक्रम पण ह्या गोष्टी सुधाराव्यास असं वाटत मला.....

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback अमेय. प्रत्येक रंगकर्मीची कलाप्रक्रिया document करण्यासाठी ह्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामुळे अनौपचारिक गप्पा हा रंगपंढरीचा फॉरमॅट नाही.
      -योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @ameyanimkar8285
      @ameyanimkar8285 4 ปีที่แล้ว

      @@RangPandhari ठीके , आपण आपल्या फॉरमॅटनुसारच कार्यक्रम करा, मी फक्त आपल्याला एक सजेशन दिलं.

    • @udaythakurdesai4212
      @udaythakurdesai4212 3 ปีที่แล้ว

      सुंदर मुलाखत!
      विक्रम गोखलेंना ऐकणं हा आनंद आहे.
      मधुराणीचं योगदानही महत्वाचं आहे.
      एकुणात सुंदर!!

  • @vidyadharrane2625
    @vidyadharrane2625 2 ปีที่แล้ว

    Very good

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 4 ปีที่แล้ว +2

    I am a die hard fan of Vikram Sir...and this one was unique...but with due respect, felt that he spoke what he wanted to and not answered what Madhurani asked.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback, Amol!

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 5 หลายเดือนก่อน

    Sagle bhag khup chan zale
    Vikram Gokhale yanna eikatach rahava
    Te gelya var far far vait vatla

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +2

    डॉ. श्रीराम लागू यांच्या शुभेच्छा तुमच्या या उपक्रमाला आहेत, हे ठाऊक आहे पण त्यांची मुलाखत घेतली आहे की नाही? If not, we are going to miss a lot!
    Please reply.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      रंगपंढरी उपक्रमात सर्वप्रथम मुलाखत डॉक्टरांचीच असावी असे आम्हाला वाटत होते. पण अनेकदा प्रयत्न करूनही ही मुलाखत घेणं त्यांच्या प्रकृतीमुळे शक्य झालं नाही. त्यांची अशी मुलाखत काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवी होती. खेद आहे.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 ปีที่แล้ว

    Khoopach chhan interview

  • @meghajoshi6442
    @meghajoshi6442 4 ปีที่แล้ว

    अप्रतीम, अप्रतीम, अप्रतीम। दुसरं काहीही सुचत नाहीये ह्या क्षणी।🙏🙏

  • @manasikulkarni7637
    @manasikulkarni7637 3 ปีที่แล้ว

    I teach not to earn ...I teach to learn ...how touching!

  • @sunandagogate8447
    @sunandagogate8447 3 ปีที่แล้ว

    Vikaramdada. Is. Very good brjilient actoer very nice guidence

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 ปีที่แล้ว

    खूप छान. त्यांनी काम केलेल्या इतर नाटकांबद्दल जास्त बोलायला पाहिजे होते. पण तरीही great experience.

  • @shashankvaishampayan6845
    @shashankvaishampayan6845 4 ปีที่แล้ว

    फारच छान उपक्रम आता मी ७० वर्षांचा आहे ह्या सगळ्या लोकांची जवळ जवळ सगळी नाटकं पाहिली आहेत म्हणून हे सगळं खूपच जवळच वाटत तुमचे शतशः आभार खप लिहायला आवडेल असतं पण नको

  • @teenakshirsagar3370
    @teenakshirsagar3370 4 ปีที่แล้ว

    My favourite actor. I really love u

  • @rohitjoshi6301
    @rohitjoshi6301 4 ปีที่แล้ว +1

    Would be intresting to listen abt take of this great actor on Heath Leadger's Joker...

  • @devilzown610
    @devilzown610 4 ปีที่แล้ว +1

    so many things to learn from this interview. It felt like valuable lecture which should have continued. Though interviewer please stop making these irritating noises with your mouth. I am sure you are knowledgeable lady who can reply with words rather than these creepy noises.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for your frank feedback.

  • @prasadphake4337
    @prasadphake4337 3 ปีที่แล้ว

    Khup abhyasu kalakar

  • @vinitaphatak3046
    @vinitaphatak3046 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम.....

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar ปีที่แล้ว

    ❤😊

  • @vinayadoiphode3706
    @vinayadoiphode3706 4 ปีที่แล้ว

    खुप अप्रतिम

  • @manishadhole9894
    @manishadhole9894 ปีที่แล้ว

    👌👍🙏

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 4 ปีที่แล้ว +1

    माहेरची साडी सिनेमातल्या शेवटच्या इमोशनल सीन किंवा त्या सिनेमा बद्दल एखादा प्रश्न विचारायला पाहिजे होता

  • @pareshmore7174
    @pareshmore7174 4 ปีที่แล้ว

    Khupach chan❤️

  • @nva3592
    @nva3592 3 ปีที่แล้ว

    Beautiful