रुणझूनत्या पाखरा | Runzuntya Pakhara | Tila Lavite Mi Raktacha | Usha Mangeshkar | मराठी गाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 196

  • @d.m.7096
    @d.m.7096 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर गीत, शब्द, पंक्ति, संगीत, उषाताईंचा आवाज आणि भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य! विशेषतः "आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा" या पंक्ति सर्वोत्कृष्ट!

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 ปีที่แล้ว +46

    हा सुवर्णकाळ होता ....जो गेला तो गेलाच ......!! गीत , संगीत , गायक गायिका सारे उच्च दर्जाचे होते .....आजच्या या बाजारु वातावरणात हे खूप जाणवते...!!

    • @udaysawant5822
      @udaysawant5822 ปีที่แล้ว +1

      हो खर आहे
      हा चित्रपट फार सुरेख होता

    • @VinodYadav-bi1ux
      @VinodYadav-bi1ux 8 หลายเดือนก่อน

      तो काळ फार सुंदर

  • @shivajichavan7191
    @shivajichavan7191 3 ปีที่แล้ว +63

    खूप सुंदर गाणे!
    अशी गाणी आम्ही आकाशवाणी रेडिओ केंद्रावर ऐकत ऐकत मोठे झालो.
    बालपणाची आठवण झाली.

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 3 ปีที่แล้ว +61

    या गाण्याला जगात तोड नाही अप्रतिम अवर्णनीय सलाम त्या गायकांना व रचनाकार आला

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 ปีที่แล้ว +18

    टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट अण्णा भाऊ साठे यांच्या 'आवडी' या कादंबरीवर आधारित होता .

  • @ramkumarraiwadikar5770
    @ramkumarraiwadikar5770 3 ปีที่แล้ว +79

    हे गीत खूपच अस्वस्थ करते ! मन अगदी सैराभर होते. शब्द,गीत, संगीत, आवाज, कोरस..... हे सार काही अप्रतीम.☝️😌😌

  • @shivprasadchakrwar8035
    @shivprasadchakrwar8035 ปีที่แล้ว +10

    घागर घुमूं दे घुमूं दे रामा पावा वाजू दे
    आला शंकरूबा शंकरूबा गवर माझी लाजू दे
    घागर घुमूं दे घुमूं दे रामा पावा वाजू दे(आ आ आ)
    घागर घुमूं दे घुमूं दे रामा पावा वाजू दे(आ आ आ)
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
    आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
    रुणझुणत्या पाखरा
    माझं माहेर सावली उभी दारात माउली
    माझं माहेर सावली उभी दारात माउली
    तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा
    तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा
    रुणझुणत्या पाखरा
    घागर घुमूं दे घुमूं दे रामा पावा वाजू दे
    आला शंकरूबा शंकरूबा गवर माझी लाजू दे
    रुणझुणत्या पाखरा
    मला माहेरी पाठवा मला माउली भेटवा
    मला माहेरी पाठवा मला माउली भेटवा
    माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
    माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
    रुणझुणत्या पाखरा
    सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे
    मोरपंखी चोळी गवर माझी घालू दे
    रुणझुणत्या पाखरा
    मला पुसते माउली आले कोणत्या पाउली
    मला पुसते माउली आले कोणत्या पाउली
    माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा
    माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा
    रुणझुणत्या पाखरा
    गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
    हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
    रुणझुणत्या पाखरा रुणझुणत्या पाखरा
    जा रे माझ्या माहेरा जा रे माझ्या माहेरा
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
    आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा
    रुणझुणत्या पाखरा
    मी हो बहीण लाडकी पंचप्राणांच्या तबकी
    मी हो बहीण लाडकी पंचप्राणांच्या तबकी
    दिली कुर्‍हाडीची ओवाळणी त्याचं भाव करा
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    माया ममतेची ममतेची आई मला भेटू दे
    माया ममतेची ममतेची आई मला भेटू दे
    माहेरपणाचं पणाचं सुख मला लुटू दे
    माहेरपणाचं पणाचं सुख मला लुटू दे
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    कशी माहेराला येऊ शीवंवरी उभा भाऊ
    कशी माहेराला येऊ शीवंवरी उभा भाऊ
    गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
    गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
    हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
    हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
    रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
    जीव लाऊन जिवाचा टिळा लाविते रक्ताचा
    आता म्होरल्या जल्मात नदी भेटु दे सागरा
    नदी भेटु दे सागरा नदी भेटु दे सागरा

  • @rajeshadhagale
    @rajeshadhagale 9 หลายเดือนก่อน +4

    हा चित्रपट पडद्यावर आला त्याच दिवसी आण्णाभाऊंची प्राणज्योत मालवली...

  • @hanumantnavale7970
    @hanumantnavale7970 3 ปีที่แล้ว +29

    खूप छान गीत.गांवाकडे नागपंचमीच्या वेळी स्त्रिया एकत्र जमतं असत त्यावेळी हे गाणे म्हणत असत.

  • @nilamsalvi55
    @nilamsalvi55 3 ปีที่แล้ว +33

    जुने ते सोने . अप्रतिम तो काळ ती गाणी ।👍👍

  • @ManishaJadhav-rm7we
    @ManishaJadhav-rm7we 3 หลายเดือนก่อน +5

    जेव्हा पण मी हे गाणे ऐकते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात..एवढे हे गाण मनाला भिडत..मी एक सासुरवाशीण आहे..मनाला स्पर्शून जाते गाणे 👌😢

  • @ajinkyapatil4789
    @ajinkyapatil4789 ปีที่แล้ว +18

    हा चित्रपट युट्यूब वर प्रकाशित करावा, हा टिळा लावते मी कुंकूवाचा पिच्चर पहाण्यासाठी जिव व्याकूळ झाला आहे,

  • @vasantpatil9254
    @vasantpatil9254 2 ปีที่แล้ว +8

    आण्णा भाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे असं पुन्हा होणे नाही

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 2 ปีที่แล้ว +8

    गदिमा, आणि अण्णा भाऊ साठे ही दोन अनमोल रत्ने!! आवडी कादंबरीने तर त्याकाळी वेड लावले होते,त्या कादंबरीवर हा सिनेमा तयार केला, जयश्री गडकर यांचा अभिनय मन हेलावून टाकतो, आणि हे गाणे तर डोळ्यात पाणी आणते,

  • @sachinpowar1533
    @sachinpowar1533 ปีที่แล้ว +8

    लहान असताना हे गीत गौरिगणपतीच्या सणाला माझे वडील कायम लावत होते, आज हि हे गान खूप खूप आवडत आणि वडिलांच्या आठवणीन भरून येत ❤️❤️

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 หลายเดือนก่อน +2

    सूर्यकांत... जयश्री गडकर... अजरामर कलाकृती 💐

  • @suvidyapanchpor6507
    @suvidyapanchpor6507 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच भावनाप्रधन अप्रतिम गाणे माहेरच्या आठवणीने मन सैरभैर होते अशी अर्थपूर्ण गाणे आता होणे नाही

  • @sonalisontakke1059
    @sonalisontakke1059 2 ปีที่แล้ว +34

    सर्व भावना या गीतात व्यक्त होतात.. डोळ्यात पाणी आले.. माहेर आणि माउली यांच्या प्रेमाची खूप आठवण आली

    • @TrendingBollywood1984
      @TrendingBollywood1984 2 ปีที่แล้ว +2

      ताई तू सुखात राहा भावाचा आशीर्वाद

    • @alkaambawade3453
      @alkaambawade3453 ปีที่แล้ว +1

      Ho, khare aahe

  • @manjushamusai6540
    @manjushamusai6540 3 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गाणं,आई, मुलीच्या नात्याची वीण घट्ट करणारे.गाणं ऐकताना माहेर,माहेरची माणसं डोळ्यासमोर येतात.

  • @dipakkamble4329
    @dipakkamble4329 ปีที่แล้ว +2

    गेले ते दिवस गेले ते कलाकार, गितकार, संगितकार, डोळ्यात पाणी येते ते दिवस आठवल्यानंतर!

  • @anilpatil2460
    @anilpatil2460 3 ปีที่แล้ว +41

    ते दिवस येणे नाही . लहानपणीची आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏

  • @deepapadagal1903
    @deepapadagal1903 ปีที่แล้ว +2

    मीही हे गाणे ऐकत मोठी झाले, प्रत्येक गौरी गणपतीत हे गाणे अवरजून लावले जायचे हे गाणे ऐकताना लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @sheetalsatpute2057
    @sheetalsatpute2057 3 ปีที่แล้ว +72

    माझ खूप आवडत गाणं आहे हे गाणं ऐकताना
    डोळ्यात पाणी येतच 👌👌👌

    • @saurabhkale7945
      @saurabhkale7945 3 ปีที่แล้ว +3

      👍

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 ปีที่แล้ว

      डोळ्यात पाणी येणारच ना. आईला भेटायला माहेरी जायला आतुरतेने वाट बघणा-या मुलीला, लग्नाला विरोध असणा-या वैरी भावानेच तिला माहेरी नेतो असे भासवून/ फसवून रस्त्यात आडवळणावर नेऊन तिचा खून करतो. दरम्यान, माहेरी गेल्यावर आपण मैत्रिणींबरोबर झिम्मा फुगडी खेळणार व छान सण साजरा करणार या आशेने रस्त्यात स्वप्न रंगवणा-या मुलीचा रस्त्यात असा अचानक घात होतो व संसाराची राख रांगोळी होते. त्या एकंदर प्रसंगाच्या वेळचे हे गाणे असल्याने तो प्रसंग /गाणे बघतांना/ऐकतांना डोळ्यात पाणी येतं. आणि असं ही वाटतं की असं कोणाही मुलीच्या बाबतीत घडू नये.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 2 ปีที่แล้ว +5

    या अशाच सुंदर सुंदर गाण्यांनी लहानपणापासून लावलेले गाण्यांचे वेड कायम टिकून आहे. गाणी जुनी आहेत पण सूरांमध्ये ताजंतवानं करण्याची ताकद आहे.

  • @vasantpatil9254
    @vasantpatil9254 2 ปีที่แล้ว +6

    हा चित्रपट प्रदर्शित करा

  • @ushatelore1562
    @ushatelore1562 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गीत
    माझे सर्वात आवडते गाणे
    हा चित्रपट यु ट्यूब वर अपलोड करा

  • @mangalaparekar2990
    @mangalaparekar2990 ปีที่แล้ว +2

    रोज रोज ऐकते 55 वर्षापूर्वीचा आठवणी रेडिओवर ऐकायचो
    थँक्स यू ट्यूब
    Nabuto ना भविष्यातील

  • @manishakangralkar3754
    @manishakangralkar3754 ปีที่แล้ว +5

    हे गाणं ऐकून नकळतपणे मन वार्याच्या वेगाने माहेरी जात .मी खूप प्रयत्न केला
    तु ट्यउबवरई पिच्छर शोधण्याचा पण येत नाही. प्लीज प्रदर्शित करा .
    या चित्रपटात ज्यांनी काम केलेलं आहे ते खूप महाण आहेत . आत्ताच्या पिढीला याच महत्त्व समजनार नाही.
    माहेरची. ओढ काय असते ती. .😢

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 3 ปีที่แล้ว +46

    "टिळा लाविते रक्ताचा " या चित्रपटातील जयश्री गडकर यांच्या वर चित्रीत झालेलं हे गीत,दरवर्षी गौरी गणपती च्या सणामध्ये गौरी च्या जागरणात हे गाणं ऐकल्याशिवाय मनाचं समाधान होत नाही

    • @leenasawant9435
      @leenasawant9435 3 ปีที่แล้ว

      Khup chaan

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 2 ปีที่แล้ว +1

      Jayashree Gadkar was the most bankable female super star and Ram Kadam was the superhit music director and the combination is the best ever!!!

  • @chandrakantdhawale6062
    @chandrakantdhawale6062 2 ปีที่แล้ว +10

    हा चित्रपट लवकर अपलोड करावा ही विनंती

  • @ashwiniyadav4156
    @ashwiniyadav4156 2 ปีที่แล้ว +5

    हे गाणे मला माहेरच्या गौरी गणपती सणाचे चित्र डोळ्यांसमोर उभे करते अप्रतिम

  • @urjit_karawande
    @urjit_karawande ปีที่แล้ว +6

    नि:शब्द ! रोमांचित करणारं आत्मिक अनुभूती देणारं अद्वितीय गीत! अद्वितीय संगीत आणि अद्वितीय स्वर!

  • @shivajiborge4856
    @shivajiborge4856 ปีที่แล้ว +1

    अशी जुनी गाणी सतत ऐकत असतो.
    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या शिवाय राहत नाही.

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 8 หลายเดือนก่อน +1

    आई आणि मुलीचे नात काय आहे हे गाणे तंतोतंत दाखवून देत खरोखरच जर मुलगी आई पासून दूर राहत असेल तर हे गाणे ऐकल्या वर त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही

  • @sarthak-1-z3n
    @sarthak-1-z3n 2 ปีที่แล้ว +12

    दादा हा शिनेमा अपलोड करा
    खूप दिवसपासून वाट पाहतो आम्ही 🙏

    • @udaysawant5822
      @udaysawant5822 ปีที่แล้ว +1

      हो खरच

    • @pravinlokare7147
      @pravinlokare7147 ปีที่แล้ว +1

      प्लिज हा चित्रपट अपलोड करा

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या मोबाईलच्या जगात माणसातल प्रेम लुप्त झाले आहे

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 3 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम...अवर्णनीय....किती सुंदर रचना ....हे गीत तेवढ्याच सुंदर पणे चित्रीत केल आहे

  • @pundalikrachewad2455
    @pundalikrachewad2455 ปีที่แล้ว +1

    माहेरची किती ओढ. सासर कितीही श्रीमंत असल्यामुळेही राहणार. ड्युटीवर पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

  • @Ashakshirsagar111
    @Ashakshirsagar111 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गीत आहे जुन्या माहेरचं आठवणी जाग्या होतात अप्रतिम ❤

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 หลายเดือนก่อน

    असे गीत पुन्हा होणे नाही तो अश्या गीताचा सुवर्ण काळ होता

  • @baliramtambade1948
    @baliramtambade1948 ปีที่แล้ว +1

    त्या काळी लाऊडस्पिकरवर लावायचो ह्या गाण्याची रेकाॅर्ड. खुप श्रवणीय.

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 3 ปีที่แล้ว +22

    आधुनिकतेने त्या वेलची.मजा आता नाही , परस्थीती ला साजेशी गाणी मनाला आज ही त्या कालात घेऊन जातात

    • @sattarinamdar8611
      @sattarinamdar8611 2 ปีที่แล้ว

      Tila lavite mi rAktacha ya cinemachi sapurn gani jukebox karavi

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 3 ปีที่แล้ว +15

    नमस्कार,खूप छान गाणे मला खूप आ वडते धन्यवाद

  • @sulochanakalambe8509
    @sulochanakalambe8509 3 หลายเดือนก่อน +2

    सासरी मुलगीचा एक हात दुधात आणि एक तुपात असला तरीही आई बहीण वहिनी यांनी प्रेमानी भरवलेले भाजी भाकरीची रंगत न्यारीच.... या निस्वार्थी प्रेमाची बरोबरी इतर कोणत्याही ऐहिक सुखाशी होऊ शकत नाही..... माहेरची उब उब देणारी असते..... गाणे ऐकले आणि बालपट डोळ्यासमोर उभा राहिला.... काळजाला भिडते गाणं 🙏🏼👌🏼

  • @babanraozaware6483
    @babanraozaware6483 3 หลายเดือนก่อน +1

    माझे सगळ्यात आवडते गीत. गीताची चाल
    संगीत असे गाणं. पुन्हा होणे नाही.

  • @ruchadhotre5869
    @ruchadhotre5869 2 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर गाणं आहे. ऐकताना डोळ्यात पाणी येते

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 2 ปีที่แล้ว +7

    डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरी वर अदारीत आहे ❤💐💐❤

  • @sanjeevkhillare6752
    @sanjeevkhillare6752 3 ปีที่แล้ว +26

    खूपच भावनिक गीत,शब्दरचना तर अप्रतिम आहे....👌👌👍👍

  • @sanjanmahadik8781
    @sanjanmahadik8781 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ जुनं ते सोनं असं हे गाणं असे हे गाणं परत होणार

  • @vikaspatil9633
    @vikaspatil9633 2 ปีที่แล้ว +3

    krupaya ha chitrapat यु टुब वर उपलब्ध करून द्यावा ही विनंती.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 2 ปีที่แล้ว +8

    Best chorus and best song ever by the Ram Kadam !! Great music director of all time!!!

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 2 ปีที่แล้ว +5

    बालपणी म्हणजे 53 वर्षांपूर्वी गावी रहातअसताना गावातील मुली पिंगा धरून हे गाणे गात असत,आज ही तेच चित्र उभा राहते,गाण्यातील सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे

    • @udaysawant5822
      @udaysawant5822 ปีที่แล้ว

      आज हे गाणे गणपती आले असताना लावले २१ सप्टेंबर २०२३ गुरुवार

  • @saralapardeshi3268
    @saralapardeshi3268 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर गाणं ❤❤ आई नाही तर माहेर ची नाही .

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 ปีที่แล้ว +2

    Vidio dakhawla tar khoop anand hoil, Usha mangeshksr 👌👍

  • @sunitadhamane4736
    @sunitadhamane4736 2 ปีที่แล้ว +10

    टिळा लावते मी रक्ताचा हा पिक्चर डाउनलोड करा

  • @bhartiauti878
    @bhartiauti878 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान आहे जुनी गाणी ऐकत राहावं वाटत

  • @sunildabke1329
    @sunildabke1329 2 ปีที่แล้ว +6

    आम्ही लहानपणी आमच्या चाळीच्या अंगणात खेळायचो तेव्हा ही गाणी रेडीओवर ऐकायला म्हणा किंवा सहज कानावर पडायची. साधारण दुपारची वेळ असायची. आमची शाळा दुपारी असायची. फार प्रसन्न वातावरण होतं त्याकाळात. बहुदा ही गाणी श्रावण महिन्यात नक्कीच ऐकायला मिळायची. तेव्हा श्रावण महीना कॅलेंडर मध्ये न पाहता आपोआप समजायचा. त्याची चाहूल आधीच लागायची. कहाणीचे पुस्तक आम्ही लहान मुले वाचायचो. अजुन ते पुस्तक (जुने) आमच्याकडे आहे. जीवतीचा कागद आणून त्याची पूजा, नैवेद्य मजा होती. गेले ते दिवस. असो आपणा सर्वांस श्रावण महिन्या निमित्त शुभेच्छा..!! 💐💐

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गाणे मन भरून येत

  • @rameshnimkarde487
    @rameshnimkarde487 3 ปีที่แล้ว +12

    Excellent गीत शब्द रचना व संगीत.

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम ..कंपोज....श्रवणीयता गेयता रचना सुंदर आवाज ...

  • @arunthote1438
    @arunthote1438 3 ปีที่แล้ว +126

    माहेरचा कुञा जरी दिसला तरी ही ओढ मोठी होती, आता ती आस्था 80टक्के कमी झाली, पंचमीचा झोका गेला, पाखरु गेले, mobile ने तडा गेला

    • @vitthalwagh4651
      @vitthalwagh4651 3 ปีที่แล้ว +1

    • @ganpatichougule9403
      @ganpatichougule9403 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम गीत अजून ही नेहमी गुणगुणत असतो

    • @maheshshah9946
      @maheshshah9946 3 หลายเดือนก่อน

      कायद्याने दिलेले हक्क, सारं संपवून गेले

  • @ajinkyapatil4789
    @ajinkyapatil4789 8 หลายเดือนก่อน +1

    अनेक प्रेक्षकांची चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मागणी केली होती आहे परंतु मागणी मान्य होत नाही त्यामुळे मनाला दुःख झाले आहे

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +18

    या चित्रपटाची इतर गाणी
    जरा जपून सिपनं खेळा,याहो राया करते मी पाहूनचार ह्या कृष्णा कल्ले यांनी गायलेल्या लावण्या, संसाराच्या तुरुंगामंदी कैद तुला झाली रे हे जयवंत कुलकर्णी यांचं गीत व सुधीर फडके यांनी गायलेले विसर त्या सुखाला ही गाणी प्लीज अपलोड करा.
    हा सिनेमा ही अपलोड करा

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 3 ปีที่แล้ว +1

      Movies नाव काय आहे

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 3 ปีที่แล้ว

      @@Mangeshkakadekalakar.6696 टिळा लाविते मी रक्ताचा.अतिशय सुंदर चित्रपट. कडचत अण्णाभाऊ साठेंच्या कोण्या कादंबरीवर आधारित आहे चित्रपट.

    • @swapnilwaghmare3173
      @swapnilwaghmare3173 2 ปีที่แล้ว +2

      आवडी कादंबरी

    • @udaysawant5822
      @udaysawant5822 ปีที่แล้ว

      फार छान माहिती आपण
      भोसले साहेब

    • @udaysawant5822
      @udaysawant5822 ปีที่แล้ว

      @@Mangeshkakadekalakar.6696
      तिळा लाविते मी रक्ताचा

  • @gunamegha.sangeetashirgaon9015
    @gunamegha.sangeetashirgaon9015 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि अजरामर गीत.

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 2 ปีที่แล้ว +2

    जुने सिनेमे खूपच सुंदर आणि वास्तव दाखवणारे होते

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +7

    आनंदी तसेच दर्दभरं गीत.

  • @rohitawachite670
    @rohitawachite670 6 หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरी मधुन निघालेला चित्रपट . टीला लावते मी रक्ताचा साल 1969

  • @shriyashpatil6462
    @shriyashpatil6462 2 ปีที่แล้ว +5

    टिळा लाविते रक्ताचा हा चित्रपट युट्युब वर डाऊनलोड करा 🙏🙏

  • @babanraozaware6483
    @babanraozaware6483 3 หลายเดือนก่อน +1

    इतके सुंदर गीत पुन्हा होणे नाही।

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว +10

    Khup. Khup. Aathavni. Yetat. Tya Divasachya

  • @ramchandrakhandagale4384
    @ramchandrakhandagale4384 2 ปีที่แล้ว +2

    जुन्या आठ्वणींना उजळा अप्रतीम....👍

  • @omkarkhade9813
    @omkarkhade9813 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice song

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 4 หลายเดือนก่อน +1

    माहेरची ओढ आईच्या प्रेमाची आठवण करून दिली ❤

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 ปีที่แล้ว +8

    Lhanpni रेडिओ वर् लागायची. 🙏🙏

  • @truptikamble2087
    @truptikamble2087 3 ปีที่แล้ว +2

    Maza khup khup avadta gana ... jevha jevha he gana aikte tevha tevha dole bharun yetat ... saglya maherchya athvani dolyasamor yetat .... maher kay kay varnava ... !! Lahanpanpasunchya saglya athvani jagya hotat ... apratim gana ....!!

  • @mangeshpanchal4603
    @mangeshpanchal4603 3 ปีที่แล้ว +4

    कृपया हा मराठी चित्रपट पहायचा आहे तर तो कुठे पाहता येईल

    • @anilbhovad8628
      @anilbhovad8628 3 ปีที่แล้ว +2

      भरपूर जणांच्या प्रतिक्रीया मी ऐकल्या की हा सिनेमा पाहायचा आहे पण मी 10 ते 11 वर्ष पूर्वी सह्याद्री वाहिनीवर पाहायला होता तर कोणाकडे ही डाउनलोड क्लिप नाही हा सिनेमा तर सह्याद्री वहिनीने हा चित्रपट दाखवावा व अगोदर कळवावे जाहिरात करावी

  • @sunnylondhe2965
    @sunnylondhe2965 2 ปีที่แล้ว +6

    माझं आवडत गान् आहे मला हे गाणं ऐकल् तर फार रडू येते

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 3 ปีที่แล้ว +5

    Aadhichya jya comments aahet ,tya sanglyanshi sahamat aahe , te sagle mi parat lihnar nai,gaane kalljacha thhav ghete,manatlya saglya bhavna jagya hotat, 50 varshe mage gele maze man 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekha101
    @surekha101 2 ปีที่แล้ว +2

    Khupch sunder aprtim 👌👌 maherachi aathavan zaali lahanpanapasun ekale aahe he geet 🙏🙏😢

  • @aartipai8320
    @aartipai8320 ปีที่แล้ว +2

    अतिशय मस्त गाणे, आभारी आहे

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 2 ปีที่แล้ว +2

    माहेरची ओढ, एक अप्रतिम गीत,

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +3

    आजही काळजाला भिडणारे❤️

  • @ashokdcruz1700
    @ashokdcruz1700 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan maze favourite song

  • @vilaspanajkar8530
    @vilaspanajkar8530 2 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर .खूपच छान .

  • @manishanazare8239
    @manishanazare8239 3 หลายเดือนก่อน +1

    Gane yekle ki Mazi mauli v sarva Maher dolyapude ubhe rahate. Mauli v vadilana miss karate.

  • @meenajadhav7133
    @meenajadhav7133 ปีที่แล้ว +1

    Mala maheri pathava.mala mauli bhetava. Mazya aaichya pankhat mala milu de ubhara.ya Oli mala kup aavadatat.sasarachi sarv dukha aaichya mayet zelata yetat.

  • @meghajoshi3905
    @meghajoshi3905 3 ปีที่แล้ว +14

    माहेर काय आस्त ह्याच खुप छान वर्णन केले गेले ते दिवस

  • @rajkumarkulkarni7851
    @rajkumarkulkarni7851 3 ปีที่แล้ว +8

    Tila lavate mi raktacha ha chirtha pat downloads kara

    • @anilbhovad8628
      @anilbhovad8628 3 ปีที่แล้ว

      कोणाकडे ही नाही फक्त सह्याद्री वहिनीकडे आहे

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 2 ปีที่แล้ว +7

    Very nice song koti koti pranam 👌👌

  • @uttamvhannure9789
    @uttamvhannure9789 2 ปีที่แล้ว +1

    लाहनपणी हीच गाणी ऐकत ऐकत लाहाणाचे मोठे झालो

  • @varshasalunkhe6450
    @varshasalunkhe6450 8 หลายเดือนก่อน +1

    He geet aikun dole bharun aale

  • @sureshbagul2675
    @sureshbagul2675 3 หลายเดือนก่อน

    अस गाण परत नाही होणार

  • @xoxoranboomybelovedxoxo1008
    @xoxoranboomybelovedxoxo1008 ปีที่แล้ว +1

    Ha picture download kra na phayche ahe

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 ปีที่แล้ว +1

    खूप च सुंदर गाणे !❤

  • @ajitshinde2657
    @ajitshinde2657 2 ปีที่แล้ว +2

    Hazarvarshai zali tari he Gani visarnar nahit. 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sunitarao102
    @sunitarao102 3 หลายเดือนก่อน

    🎉माहेर चा रस्ता दिसला तरी 😢डोळ्यात पाणी ओधलत

  • @sanjayghavare3919
    @sanjayghavare3919 2 ปีที่แล้ว +1

    हा चित्रपट मी पंधरा वर्षा पूर्वी पहिला इतका आवडला की तेव्हा पासून डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न करतोय पण कुठेच मिळत नाही प्लीज कोणाकडे असेल तर लिंक करा युट्युब वर प्लीज 🙏🙏🙏

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 4 หลายเดือนก่อน +1

    नाग पंचमीला हे गाण श्वेत होतोत

  • @ashoksanap4512
    @ashoksanap4512 3 หลายเดือนก่อน

    हा मराठी चित्रपट डाउनलोड करावे .

  • @dattatraytodkar3934
    @dattatraytodkar3934 3 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण आणि मनाला भिडणार गाणं