#smrutigandh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • Famous Marathi Lyricist P.Sawlaram has a track record of 50 films as a lyricist.Nivrutti Ravji Patil his original name was successful politician.He was elected as Mayor from Thane ,Mumbai. He is The only known example of Lyricist elected because if popular song गंगा जमुना डोळ्यात उभ्या का.. Great poet Kusumagraj had nicknamed Him as Jan kavi to appreciate his simple and heart appealing fluent language. P.Sawlaram's style and lyrics impressed many veteran laureates like G .D.Madgulkar,Mangesh Padgaonkar . Golden Era Marathiusic can not be well described without P.Sawlaram's contribution to Marathi Film Music.Here is a choicest Collection of few Melodious songs of P.Sawlaram pen magic. @Manatli Gani by Girish Nagarkar

ความคิดเห็น • 892

  • @SubodhGawankar
    @SubodhGawankar 3 หลายเดือนก่อน +11

    गंगा यमुना डोळ्यात उभ्या का या गीताने संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आणले 🙏💐🙏💐

  • @sevakramlahane8041
    @sevakramlahane8041 8 หลายเดือนก่อน +125

    आश्चर्य वाटले, गाणे ऐकून लहानपणात गेल्यासारखे व वाटले. ही गाणी रेडिओ वर ऐकली आहेत. कलेक्शन सुंदर केले. धन्यवाद.

    • @RamchandraHulawale
      @RamchandraHulawale 7 หลายเดือนก่อน +12

      जनकवी पी सावळाराम यांची अजरामर गाणी. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटते मनाला हुरहूर लागून राहते

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 8 หลายเดือนก่อน +44

    जुने ते सोने म्हणतात ते हेच... किती सुरेख शब्द, संगीत आणि स्वर... आणि, खरं सांगायचे तर आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर जातो ना तेव्हा तर ही अशी अवीट गाणी ऐकणे म्हणजे मेजवानीच वाटते... पूर्वीच्या सगळ्या जुन्या गीतकार, संगीतकार आणि गायकांना मनापासून मनाचा मुजरा..
    पी. सावळाराम ह्यांना तर खरोखर हात जोडून नमस्कार.. समस्त स्री वर्गाला आवडणारी गीते त्यांनी लिहिले.. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का...❤

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 8 หลายเดือนก่อน +39

    रेडिओच्या sig tune पासून मन भूतकाळात गेले. एकापेक्षा एक सुरेख गाणी ऐकून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏🌹

  • @surekhasonaje
    @surekhasonaje 8 หลายเดือนก่อน +27

    व्वा, अप्रतिम गीते. सुंदर. कान तृप्त झाले.

  • @avinashjoshi4340
    @avinashjoshi4340 8 หลายเดือนก่อน +60

    मी ठाणे येथच जनमा पासुन रहात आहे. माझे वय 80 आहे. श्री पी सावळाराम यांच्या नौपाडा एरिया मध्ये मी रहात आहे. मी त्यांना नेहमी बघत असे. व्हिडिओ खूप छान आहे. खूप बरे वाटले. Thanks for video

    • @pragatichavan8867
      @pragatichavan8867 8 หลายเดือนก่อน +4

      व gbvv&:ff%

    • @pragatichavan8867
      @pragatichavan8867 8 หลายเดือนก่อน

      VV vvVBBvvv::¢|¢Vv Vvv vv v;&¢

    • @parsh365
      @parsh365 2 หลายเดือนก่อน +3

      मीही तिथेच राहायचो. गोखले रोड वर त्यांना बघितल्याचे चांगले आठवते

    • @djvarde
      @djvarde หลายเดือนก่อน +1

      सुंदर आठवणी

    • @aditioak2683
      @aditioak2683 29 วันที่ผ่านมา

      😊

  • @yojanashetye2389
    @yojanashetye2389 วันที่ผ่านมา +1

    सर्वच गाणी अप्रतिम आहेत. प्रत्येक गीताचे बोल खुपच सुंदर आहेत. ❤❤❤

  • @sureshpatange654
    @sureshpatange654 8 หลายเดือนก่อน +38

    पी सावळाराम यांची एकापेक्षा एक सरस ,सुंदर आणि भावदग्ध करणारी ,मनाचा ठाव घेणारी गाणी ऐकताना खूपच छान वाटलं. नेहमीप्रमाणेच ऊमदा कार्यक्रम.

  • @shailajakulkarni5251
    @shailajakulkarni5251 8 หลายเดือนก่อน +31

    फारच छान वाटल .बर्‍याच दिवसानंतर ही गाणी ऐकावयास मिळाली. धन्यवाद!

  • @kumarpatankar8772
    @kumarpatankar8772 8 หลายเดือนก่อน +15

    P.Savlaram ह्यांनी lihilele शब्द अगदी हृदयाला जाउन भिडतात,त्यामूळे asha,लता, बाबूजींच्या आवाजात व वसंत प्रभू संगीताची saath , मग रसिकाला अजून काय हवेय! सर्वच गाणी सुमधूर, त्यात माझे ladke हसले aadhi कुणी .......❤❤❤❤

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 8 หลายเดือนก่อน +61

    लहान मुलांच्या सारखं झालं,खूप खेळणी दिसल्या सारखं.सर्व गाणी खूप खूप छान, खूपच छान.धन्यवाद.

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 8 หลายเดือนก่อน +139

    तुम्ही तर आम्हाला आमचं बालपणाच्या काळातच घेऊन गेलात. सर्व बालपण डोळ्यासमोर तरळून गेलं. खूप खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाल्या. मला जास्त हे गाणं खूप खूप आवडतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला....🙏🙏🙏🙏🙏

    • @madhavsathe4246
      @madhavsathe4246 7 หลายเดือนก่อน +18

      अगदी मनांत धटट रूतून बसलेला संगिताचा असा अनमोल ठेवा आहे. मनात रूजलेली गाणी लहान पणाचया आठवणी मेरपिसासारखी आहेत! धनयवाद!

    • @rajendrakhandagale9141
      @rajendrakhandagale9141 7 หลายเดือนก่อน +6

      Yea right bro

    • @vidyakadu3600
      @vidyakadu3600 6 หลายเดือนก่อน

      dfadq😅t ​@@madhavsathe4246

    • @sonaliparab8862
      @sonaliparab8862 6 หลายเดือนก่อน +4

      ❤❤

    • @neetashinde1194
      @neetashinde1194 6 หลายเดือนก่อน +3

      Mast

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete9539 8 หลายเดือนก่อน +34

    प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारे कवि श्री पी सावळाराम साहेब.

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 8 หลายเดือนก่อน +45

    श्री गिरीष जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व आशीर्वाद 🤚🤚🤚🤚
    अशा सुंदर व अविस्मरणीय गाणी आमच्या सारख्या रसीक प्रेमी लोकांच्या आवडणारी गाणी एकाच वेळी ऐकायला मिळाली ।। पुन्हा अनेक धन्यवाद..सप्रेम नमस्कार 🙏🙏

    • @nandkishoretendulkar2841
      @nandkishoretendulkar2841 8 หลายเดือนก่อน +2

      Aprtjm Gani sangrah janu anmol thev Nandkishor Tendulkar

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 8 หลายเดือนก่อน +40

    ही सारी गीते अजरामर आहेत.कधीच कंटाळा येत नाही...मानाचा मुजरा.

  • @swatichavan1196
    @swatichavan1196 8 หลายเดือนก่อน +29

    धन्यवाद, खुप सुंदर गाणी.अशीच अवीट सुंदर जुनी गाणी आणा. जुने रेडिओ चे दिवस आठवले

    • @SachinPotnis
      @SachinPotnis 8 หลายเดือนก่อน +1

      अशीच जुनी गणी नेहमी ऐकायला मिळायला आवडेल 🎉🎉

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 8 หลายเดือนก่อน +14

    बालपणी ग्रामपंचायतच्या रेडीओवर ऐकायचे. अवीट गोडीची गाणी एकाच ठिकाणी मिळाली. खूप आभार.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम आणि अवीट गाणी अजूनही टवटवीत वाटतात आमच्या लहानपणा पासून ऐकत आली खरेच जुनं ते सोनं

  • @ushadighe6270
    @ushadighe6270 8 หลายเดือนก่อน +16

    सुरेख काव्य, तितक्याच सुरेख चाली आणि संगीत प्रेमींना सुरेख भेट

  • @SunilYadav-m4r1i
    @SunilYadav-m4r1i 8 หลายเดือนก่อน +17

    प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते सावळाराम...... म्हणजे एक रेडिओच्या जमान्यातील पराकोटीचे उच्च स्थान... व चित्रपट गीतांचे माहेरघर..... ज्यांच्या गाण्यांनी त्या काळाची चित्रपटसृष्टी गाजवली.....

  • @siddheshwardeolalkar6553
    @siddheshwardeolalkar6553 8 หลายเดือนก่อน +13

    तरुणपणात अनुभवलेले सरेसरे आठवून gdgdit झाले ! धन्यवाद !
    बालपण तरुणपण लग्नातील संवेदना सारे सारे पुन्हा अनुभवले !

  • @prachichitnis2086
    @prachichitnis2086 8 หลายเดือนก่อน +12

    एक अतिशय गोड आणि सोज्वळ काळ परत डोळ्यां समोर आला. अतिशय साधी, रसाळ शब्द आणि मधाळ चाली आणि त्याहून मधूर असा दिदी, आशाताईंचा आवाज!

    • @deepakeskar8098
      @deepakeskar8098 4 หลายเดือนก่อน +1

      सुरेख व रम्य आठवणीत मन तल्लीन झाले ::धन्यवाद!!!

  • @meenamodak409
    @meenamodak409 8 หลายเดือนก่อน +19

    अप्रतिम। तोड नाही ह्या गाण्यांना

  • @SwatiDigheChitnis
    @SwatiDigheChitnis 8 หลายเดือนก่อน +23

    सगळीच गाणी अविस्मरणीय....
    छान संग्रह...
    आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद

  • @girishapte6227
    @girishapte6227 8 หลายเดือนก่อน +30

    ज्येष्ठ व श्रेष्ठ कवीवर्य कै. पी. सावळाराम यांची सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत.

    • @sunilaparadkar2585
      @sunilaparadkar2585 8 หลายเดือนก่อน +2

      खुप गाणी विस्मृतीतगेली होती आज ऐकून खुप छान वाटलं ही गाणी ऐकत तारुण्यात प्रवेश केला आणि स्वप्नही रंगवली भूतकाळात नेण्याचे सामर्थ्य ह्या गाण्यात नक्कीच आहे धन्यवाद

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 8 หลายเดือนก่อน +17

    धन्यवाद खुपचं छान सुंदर अप्रतिम अमृतवाणी आहे आता पुढे होणं नाही ही सुस्वर गहीवरणारी गिते जे झाले ते होऊन गेले आता पुढे होणं नाही एवढेंच म्हणेल आठवणि करीता नेहमी ऐकवत जा मायबाप हा जिवंतपणा नाही अलीकडे गायकीत एवढेंच

  • @sejalmalankar9245
    @sejalmalankar9245 8 หลายเดือนก่อน +48

    सर्व गाणी अप्रतिम .janakavi पी. सावळाराम साहेबांना साष्टांग दंडवत.

  • @shrikantkawale9176
    @shrikantkawale9176 2 วันที่ผ่านมา +1

    जनकवी मा. पी. सावळाराम यांचे शब्द, वसंत प्रभू/वसंत देसाई /हृदयनाथ मंगेशकर या असामान्य प्रभुतीनी दिलेले संगीत आणि लता दीदी/सुमन कल्याणपूर यांचा स्वरसाज चढलेली अप्रतिम गाणी आणि संगीत ऐकायला मिळणं म्हणजे खरंच पर्वणी. आपण केलेल्या संग्रहाला मानाचा मुजरा..!!

  • @geetaparanjape5248
    @geetaparanjape5248 8 หลายเดือนก่อน +20

    सुंदर फारच सुरेख गाणी

  • @sudhakarbansod5885
    @sudhakarbansod5885 8 หลายเดือนก่อน +21

    सुमधुर गाणी मन प्रसन्न झाले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 8 หลายเดือนก่อน +12

    अतिशय अप्रतिम गाणी. वसंत प्रभू व पी . सावळाराम ह्यांनी अतीशय अवीट गोडीची गाणी दिली आहेत. ही गाणी खूप आनंद देतात. ही गाणी ऐकवल्या बद्दल धन्यवाद.

    • @sarojmaske6802
      @sarojmaske6802 6 หลายเดือนก่อน +1

      Khupch. Chaaan Gani

  • @shridhardeogharkar9517
    @shridhardeogharkar9517 3 หลายเดือนก่อน +1

    खरच, अप्रतिम च

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 8 หลายเดือนก่อน +9

    विश्व कवी पी. सावळाराम यांची गाणी आणि काव्य लोकप्रिय आहेत. अजूनही त्यांचा अमृत्मय वाणीने तृप्त होऊन मन मोकळे होते. हा नजराणा निरंतर ठेवा आहे.तो जपूया. कविस भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

  • @jayantkher7627
    @jayantkher7627 8 หลายเดือนก่อน +10

    असे कवी असे संगीतकार ही त्या समाजाला फक्त देवाची देणगी असते

  • @dr.deepakramchandranaladka639
    @dr.deepakramchandranaladka639 8 หลายเดือนก่อน +17

    पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांच्या गाण्यांचा अवीट नजराणा❤

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 หลายเดือนก่อน +1

    सर्व गीत अप्रतिम अप्रतिम आहेत धन्यवाद 🙏 सर्व टेक्निकल टीमचे

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 8 หลายเดือนก่อน +21

    खूपच सुंदर गाणी बालपण आठवले. आभारी आहोत

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe1534 8 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर शब्द
    तितकेच छान संगीत आणि त्याला सुमधुर आवाजाची साथ अजून काय हवं
    कितीही वेळा ही गाणी ऐकत राहावी अस वाटत आणि कंटाळा पण येत नाही
    मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी याची देही याची डोळा त्यांना पाहू शकलो कारण ते आमच्याच परिसरात राहायला होते
    अतिशय शांत स्वभाव आणि साधी राहणी
    एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व पण जराही जाणवत नसे असे वागणे

  • @meenaambolkar-nq4tm
    @meenaambolkar-nq4tm หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गाणी. एवढा आनंद झाला गाणी ऐकून. खूप दिवसांनी गाणी ऐकायला मिळाली. मनःपूर्वक आभार. 🙏🙏

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 หลายเดือนก่อน +1

    जुनी गाणी ऐकताना खूप छान वाटले धन्यवाद

  • @madhukarnilegaonkar13
    @madhukarnilegaonkar13 8 หลายเดือนก่อน +11

    पी.सावळाराम हे भावगीत काव्यातील शिरोमणी आहेत. हिरा आहेत. त्यांची सर्व गाणी अवीट गोडीची आहेत.

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre42 8 หลายเดือนก่อน +47

    व्वा अप्रतिम संकलन . पी.सावळाराम यांच्या गाण्यांचे आणखी किती भाग होतील ते सर्व करावे. ही विनंती आहे.🎉🎉🎉

  • @vivekdeshkar6502
    @vivekdeshkar6502 8 หลายเดือนก่อน +16

    पी. सावळाराम ह्यांच्या कविता रचना कितीही ऐकल्या तरी कधीही भूक मिटत नाही जेव्हा 🎉केव्हा नागपूरहून ठाण्यात आलो की किमान एक वेळा तरी घरासमोरून गेल्याशिवाय राहत नाही

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 8 หลายเดือนก่อน +20

    जनकवी पी.सावळारम यांची ही गाणी बरेच वर्षे ऐकत आहोत तरी अजूनही त्याच गोडीने ऐकाविशी वाटतात.खूप खूप धन्यवाद

    • @kamalsonavane7556
      @kamalsonavane7556 6 หลายเดือนก่อน +1

      पी.सावळाराम यांची गाणी लहानपणी रेडिओ वर ऐकत होते तीच गोडी अजून पण आहे . अत्यंत ह्रदयस्पर्शी गाणे म्हणजे "देव जरी मज कधी भेटला" हे मला खूप आवडते . लतादीदी नी हे गाणे अजरामर केले आहे.👋
      Thankyou ❤

    • @vinayakdhongadi5069
      @vinayakdhongadi5069 6 หลายเดือนก่อน +1

      0

  • @sadananddeshpande1029
    @sadananddeshpande1029 หลายเดือนก่อน +2

    मनमोहक संगीत व मनमोहक आवाजातील गाणी

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 8 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान लहानपणी रेडिओ वर ऐकलेली ही गाणी.मनाला आनंद देणारी फारच छान अजून ऐकायची आहेत.

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 8 หลายเดือนก่อน +6

    खूप जुनी गाणी पण अजूनही गोडी जराही कमी न झालेली
    ही गाणी ऐकून कान तृप्त होतात. धन्यवाद.

  • @shrikanturhekar8275
    @shrikanturhekar8275 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अप्रतिम खरंच सगळा जुना काळ मनात दाटून आला.
    खूप खूप धन्यवाद

  • @SulbhaMahadik-ox2iq
    @SulbhaMahadik-ox2iq 8 หลายเดือนก่อน +10

    कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात आणि खूपच समाधान वाटते पी.सावळाराम यांच्या गाण्यांमुळे.

  • @NishikantPathak-xy9we
    @NishikantPathak-xy9we 8 หลายเดือนก่อน +10

    उत्तम सादरीकरण हि गाणी किती औकली तरी अविट गोडीची आहे

  • @saritanaik9462
    @saritanaik9462 27 วันที่ผ่านมา +1

    लहान पणीचा सगळा काळ डोळ्यासमोर आला या अप्रतिम गाण्यांनी

  • @shubhadakulkarni1050
    @shubhadakulkarni1050 8 หลายเดือนก่อน +11

    लहानपणी ही सर्व गाणी रेडिओवर ऐकली आहेत त्यामुळे अतिशय आनंद झाला.

  • @rekhajadhav6415
    @rekhajadhav6415 8 หลายเดือนก่อน +13

    अवीट गोडी असलेली सर्वच सदाबहार सुंदर गाणी.धन्यवाद.

  • @prakashnirgudkar6194
    @prakashnirgudkar6194 8 หลายเดือนก่อน +15

    फार सुंदर गाण्याची निवड जुनं ते सोनं

  • @pushpalatabelhekar3164
    @pushpalatabelhekar3164 8 หลายเดือนก่อน +4

    माझ्या आईला ही गाणी खूप आवडायची ती छान म्हणायची तिच्या मुळे आम्हा भावडांना आवड निर्माण झाली.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 8 หลายเดือนก่อน +33

    सर्व च गाणी अप्रतिम आहेत, यात तुलना करताच येत नाही, पी सावळाराम यांचे विषयी मला माहीत नसलेली माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद!

  • @shilpadeshpande7811
    @shilpadeshpande7811 8 หลายเดือนก่อน +13

    अशीजुनी गाणी ऐकावी वाटतात.खुप मस्त आहेत.

  • @SandhyaKelkar-oq3hg
    @SandhyaKelkar-oq3hg 8 หลายเดือนก่อน +9

    केवळ अप्रतिम. बालपण व तारुण्य आठवले. जुन्या स्मृती जागृत झाल्या. मन व कान तृप्त झाले बर्‍याच दिवसानी ईतकी सुंदर गाणी ekatra ऐकायला मिळाली.

  • @sachinramteke7948
    @sachinramteke7948 2 หลายเดือนก่อน +2

    आनंद ❤

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 8 หลายเดือนก่อน +10

    इतकी छान गाणी एकाच ठिकाणी ऐकायला मिळाली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 8 หลายเดือนก่อน +24

    सुदंर .सगळीच गाणी.किती वेळा ऐकली तरी समाधान होतच नाही.धन्यवाद।

  • @shirdharshirke4520
    @shirdharshirke4520 8 หลายเดือนก่อน +17

    अप्रतिम गाणी....बाळपनी ऐकलेली सुंदर गाणं...धन्यवाद 🙏

  • @sharvarikale
    @sharvarikale หลายเดือนก่อน +1

    फारच छान, जुन्या आठवणींना उजाळा....

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 8 หลายเดือนก่อน +13

    खूप सुंदर काव्य भेट!! एकापेक्षा एक श्रवणीय गाणी,आणि लतादीदी चा मधुर आवाज. खूप खूप धन्यवाद सर!!

  • @madhurikulkarni5950
    @madhurikulkarni5950 หลายเดือนก่อน +1

    सुंदर लेखन सुंदर म्युझिक सुंदर आवाज मग काय विचारता सुंदर गाणी अप्रतिम मेळ जमला अव्दितीय निर्मिती झाली त्रिवार वंदन

  • @neelakelkar3438
    @neelakelkar3438 4 หลายเดือนก่อน +3

    नीला। केळकर - खूपच सुंदर। गाणी.असे संगीतकार। व असे। गीतकार। पुन्हा होणे नाही.ही गाणी। आताच्या मुलांनाही भुरळ घालतात.🎉🎉

    • @premanandubale9144
      @premanandubale9144 2 หลายเดือนก่อน

      आत्ताच्या मुलांना या गाण्याने झोप येते, बंद करा अस बोलतात

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 8 หลายเดือนก่อน +6

    नकवी पी.सावळारम यांची ही गाणी जुनी पण गोडी वाढवणारे आमच्या मनातील आठवणी जागवणारी अशी आहेत.खूप खूप छान.धन्यवाद .

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 8 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤❤ Far sunder manatali sumadhur gani Mann prassanna zhale Old memories Dhanyawad Sir 😊

  • @RajaniKhedekar-b2o
    @RajaniKhedekar-b2o 8 หลายเดือนก่อน +11

    मनात घर करुन रहाणारी,सुंदर चालींची ही गाणी बालपणात नेतात.

  • @sanjayhatode1104
    @sanjayhatode1104 8 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम डोळे।ओलावले

  • @vishwaskoparkar4535
    @vishwaskoparkar4535 2 หลายเดือนก่อน +1

    जाहिरात रहीत आल्बम असल्याने गाणी ऐकण्यास आनंद द्विगुणित झालागिरीश नागरे आपणास धन्यवाद

  • @arunmistry111
    @arunmistry111 8 หลายเดือนก่อน +25

    आता ही गाणी ऐकायला मिळण म्हणजे पर्वणीच,गाण्यांच selection योग्यच,त्याच बरोबर कवी पी.सावळाराम यांच्या विषयी माहिती आजच्या पिढीला उपयुक्तच , छान.

  • @surekhasamant3146
    @surekhasamant3146 19 วันที่ผ่านมา +1

    खरंच किती सुंदर अर्थ पूर्ण गाणी परतपरत ऐकावी अशी सुंदर गाणी. तसेच सुंदर गोड मधुर आवाज अशी छान गाणी पाठविल्या बद्दल धन्यवाद.

  • @vilasdhamane1742
    @vilasdhamane1742 2 หลายเดือนก่อน +5

    मनाला भावणारी,आनंद देणारी, ऱ्हूदय स्पर्शी..

  • @vishwaskoparkar4535
    @vishwaskoparkar4535 2 หลายเดือนก่อน +1

    जाहिरात रहीत अल्बम असल्याने आनंद द्वीगुणीत झाला

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 20 วันที่ผ่านมา +1

    आम्ही करकरे परिवार , पेशवा सेना मधे सन १७३२ नंतर लाहोर , दिल्ली राहिलो , सन १८०३ पासून ग्वाल्हेर ला आहोंत म्हणून कधी मराठी गीते ऐकली नाही तरी घरात मात्र मराठी जपली म्हणून श्री पी सावळाराम जी यांचे नाव ऐकले ले होते . आज तुमच्या मुळे त्यांची गीते ऐकायला मिळाली , धन्यवाद.

  • @dinkarnarkhede6057
    @dinkarnarkhede6057 8 หลายเดือนก่อน +12

    खूपच सुंदर गाणी धन्यवाद

  • @veertheopinside3879
    @veertheopinside3879 8 หลายเดือนก่อน +3

    गिरीशजी लांडगे आपणास खूप खूप धन्यवाद
    पी सावळाराम वसंत प्रभू वसंत पवार हे त्रिकुट
    मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 5 หลายเดือนก่อน +2

    नागरकर साहेब आपण गुप्त असलेला खजिना आता आम्हास उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद🎉

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वच गीते उच्च दर्जाची ,भावविभोर ,मनाला भिडणारी

  • @savitashinde3670
    @savitashinde3670 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच लहानपण आठवलं ही सर्व गाणी रेडिओवर ऐकलेली आहे खूप आनंद वाटला गाणी अप्रतिम धन्यवाद

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 8 หลายเดือนก่อน +11

    सर्वच गाणी छान आहेत

  • @sunilpashte3932
    @sunilpashte3932 8 หลายเดือนก่อน +9

    आशयगर्भ काव्यरचना.सुरेल संगीत आणि सुमधुर आवाजात गायलेली आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनाला भुरळ घालणारी गाणी.

    • @RekhaPathak-k1x
      @RekhaPathak-k1x 8 หลายเดือนก่อน +1

      Sadabahar gani,man bharat nahi ,eikat Rahami ashi gani

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 8 หลายเดือนก่อน +6

    पी.सावळाराम यांच्या गाण्याचा खजिनाच सापडला.अप्रतिम गाणी.

  • @bhagwankhandare8801
    @bhagwankhandare8801 หลายเดือนก่อน +2

    ज्येष्ठ,श्रेष्ठ कविवर्य पी.सावळाराम साहेबांची सर्वच गाणी पुन्हा,पुन्हा ऐकावी वाटतात ! त्यांच्या अप्रतिम बुद्धीला जाहीर वंदन ! असे महान व्यक्तिमत्व पुन्हा झालेले पाहिलेले नाही ! अनेक गीता.मधून भावनिक चित्रण आपल्या दृष्टीस पडते हेच त्यांचे.वैशिष्ट्य ! त्यांना शिर साष्टांग दंडवत !

  • @sudhakargosavi7545
    @sudhakargosavi7545 3 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर... रचना, गायन अन्
    संगीतही !!!

  • @shailukul7485
    @shailukul7485 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर अप्रतिम गाणी खरचं कामगार सभा आणि शाळेत जाण्याची वेळ असायची सौ शैलजा कुलकर्णी

  • @arunadeoggaonkar
    @arunadeoggaonkar 8 หลายเดือนก่อน +9

    हि सर्व गाणी मनात घर करून आहेत.अगदी कायमची.🎉🎉🎉

  • @shirishdalvi9776
    @shirishdalvi9776 8 หลายเดือนก่อน +9

    खूपच सुंदर गाणी ऐकायला मिळाली.
    धन्यवाद

  • @rashmisalunkhe5654
    @rashmisalunkhe5654 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व सुरेख आणि सुरेल गाणी. मन लहानपणी च्या आठवणीत गेले.

  • @shantagadge8171
    @shantagadge8171 8 หลายเดือนก่อน +11

    ❤ माझ्या लहानपणी आमच्या रेडिओ वर अशी गाणी लागली कि आम्ही खूप छान नाचत असु खरच आज कित्येक वर्षांनी हा गाण्याच्या ओळी चाखलया काय सांगू मन भरून आल सर्व च गाणी संगीतबद्ध व सुंदर होती आजी च वय ७४वर्षाचे आहे आशीर्वाद अशीच जुन्या गाण्यांचा हिंदी मध्ये सुद्धा लावत जा हिच रामाजवळ विनंती प्रार्थना श्रीराम

  • @thekraftykidz9733
    @thekraftykidz9733 3 หลายเดือนก่อน +1

    मनमोहक शब्दरचना आणि सुमधूर चाली😊😊

  • @yamutaibhure7792
    @yamutaibhure7792 3 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर गाणी जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली .देव जरी मज

  • @swatishilotri5313
    @swatishilotri5313 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर गाणी आपल्यामुळं ऐकायला मिळाली.सगळी गाणी ऐकून मन भरून आले. लहानपणीचे दिवस आठवले. रेडिओ वर ही गाणीऐकली होती. खुप खुप धन्यवाद.

  • @shubhangikulkarni8610
    @shubhangikulkarni8610 3 หลายเดือนก่อน +1

    खुप च सुंदर अप्रतिम गाणी 👌👌👌

  • @suryakantkadu2447
    @suryakantkadu2447 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गाणी आहेत आठवणीतील गीत आहे 🎉🎉

  • @sunandakulkarni571
    @sunandakulkarni571 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुश्राव्य अर्थपुर्ण गाणी। ❤❤मन एकदम त्या काळात गे़ंलं.प्रसन्न वाटलं. धन्यवाद

  • @suhasnirmale3872
    @suhasnirmale3872 8 หลายเดือนก่อน +5

    ह्या श्रवणीय मराठी भावगीतांनीच आमचे कान आणि हृदय अजून ही ताजेतवाने ठेवले आहे.

  • @NanduKulkarni-kv4em
    @NanduKulkarni-kv4em 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व गिते सुंदर आणि अर्थ पुर्ण आहेत खुप छान सर.

  • @chhayac.pangechhaya4652
    @chhayac.pangechhaya4652 3 หลายเดือนก่อน +1

    गाणे हे जीवनाचा आरसा आहे व अप्रतिम गाण्यांचा ध्यास ही रसिकांची दिपावली असते.हे सिध्द झाले पी सावळी राम गीतकार कवी व गीतकार म्हणून आपण सलाम करु या.
    दीपोत्सव मनातला जनातला हार्दिक शुभेच्या.युट्युब व स्तुती सुगंध सादर करणारे कलाकार...स्टार मेकर परिवार सुस्वागतम दिपोत्सव हार्दिक शुभेच्या..ही गाणी त्यांनीही आम्हा रसिकांना सादर करण्यात यावी ही व्यवस्था करावी.. धन्यवाद बंधू भगिनी..