Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics: एका रात्रीत असं काय घडलं की विनेशला अपात्र घोषित केलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #BolBhidu #VineshPhogat #ParisOympics2024
    अनेक तज्ञांचे अंदाज होते की, भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिंपिक्समधली पहिलीच मॅच जड जाईल. कारण तिची मॅच होती ४ वेळची वर्ल्ड चॅम्पियन युकी सुसाकी विरुद्ध. पण विनेश भिडली ते जिंकण्यासाठीच, तिनं सुसाकीला हरवलं, तिनं लिवाचला हरवलं, मग सेमीफायनलला गुझमानला वनसाईड हरवलं आणि थाटात फायनल गाठली. सगळ्या भारतात विनेशचं सिल्व्हर मेडल पक्कं झाल्याचा आनंद साजरा केला जाऊ लागला, प्रत्येक चाहत्याला विनेशकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. ७ ऑगस्टला होणाऱ्या फायनलला काहीतास बाकी होते आणि त्याचवेळी बातमी आली, विनेश फोगाट ५० किलो वजनी गटातून अपात्र, फायनलमधून बाहेर.
    काही तास आधी तिचं यश साजरं होत होतं, काही तासांनी तिला आपल्या देशासाठी इतिहास रचायची संधी होती, पण तेवढ्यात तिच्या अपात्रतेची बातमी आली, तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यामुळं. पण विनेश फोगाट सोबत नेमकं घडलं काय ? ती अपात्र कशी ठरली ? तिला मेडलची मॅच खेळता येणार का ? तिच्या कुटुंबियांकडून काय आरोप केले जात आहेत ? आणि नियम काय सांगतात ? या निर्णयाविरुद्ध भारताला दाद मागता येणार का ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.6K