साने गुरुजींचा सहवास लाभलेले केंगे सर गुरुजींच्या आठवणी सांगताहेत(केंगे फोन 8979303082)हेरंबकुलकर्णी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 40

  • @deepakjain2032
    @deepakjain2032 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम मुलाखात

  • @ashokshete8739
    @ashokshete8739 ปีที่แล้ว

    छान आठवणी👍👍
    आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 ปีที่แล้ว

    🙏💖👏

  • @kirangujarathi2081
    @kirangujarathi2081 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय गुरुवर्य श्री केंगेसर आमचे वात्सल्य स्वरुप सर, आणि त्यांनी त्यांच्या जीवनात साने गुरुजींचे विचार कसे ओथंबलेले आहेत ते अनुभवले आहेत.
    एक चांगला व्हिडीओ पाहण्यास मिळाला.🙏🙏

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 2 ปีที่แล้ว

      किरण भाई,असे शिक्षक आणि असे विद्यार्थी आता नाहीत हो....
      केंगेसर, अष्टपैलू आणि अष्टावधानी...सगळे विषय सहज शिकवत असत....आपण किती भाग्यवान,आपण त्यांच्या कडे शिकलो...

  • @dr.manishaware7599
    @dr.manishaware7599 2 ปีที่แล้ว +3

    केंगे सरांसारख्या दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याअगोदर त्यांना शब्दबद्ध केले त्यामुळे सर प्रथम तुम्हांला धन्यवाद.. आजच्या तरुण पिढीसमोर गुरु -शिष्य नात्याचे एक आगळे वेगळे उदाहरण ठेवल्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनःपूर्वक आभार.

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 2 ปีที่แล้ว +2

      वारे मैडम,साने गुरुजी, काय माणुस असेल?
      देशाचा भार आहे शिरावरी असे थोडेतरी वाटु द्या हो ...अशी आर्जवे करणारा मातृहृदयी कवी...
      हरीजन मंदिर प्रवेश चळवळ १९४८...
      अकुलखेड्यात द्वारका बाबा साळूंके यांना प्रथम प्रवेश देणारे माझे आजोबा स्व. स्वा.सै.नामदेव उखा महाजन हे गुरूजींचे सहकारी होते,माझ्या आजीच्या हातची कढी गुरुजींना फार आवडायची..
      ही जुलुमावर धीट चढाई या पुस्तकात हा उल्लेख आहे....

    • @radheshyampatil6024
      @radheshyampatil6024 2 ปีที่แล้ว

      आदरणीय केंगे सर यांची ओळख ही चोपडयाचे साने गुरूजी अशी आहे.साने गुरूजींच्या विचाराने त्यांनी चोपडा येथे विवेकानंद विद्यालय ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा काढली.तिथे प्रवेश मिळणे म्हणजे विशेष बाब आहे.एखादया बीजाला जमिनीत गाडून घ्यावे लागते,त्यातले केंगे सर आहेत.त्यांची ओळख पदाने म्हणजे प्रताप विद्या मंदिर चे मुख्याध्यापक,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,विवेकानंद शाळेचे कार्यवाह यापेक्षा ते फक्त केंगे सर म्हणून अधिक परिचित आहेत.यांतच त्यांची शिक्षणाप्रति समर्पणभाव ,निष्ठा व निस्पृहता आपणास दिसून येते.

  • @ashwinikeskar4987
    @ashwinikeskar4987 2 ปีที่แล้ว +5

    आदरणीय केंगे सर हे शाळेत असताना आमचे आवडते सर होते.
    त्यांनी आम्हाला "बिटवीन द लाईन्स "वाचायला शिकवल. आम्हाला त्यांनी फक्त बीजगणित आणि भूमिती एवढेच शिकवलं नाही , तर आयुष्य कसं जगायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो ....केंगे सरांसारखे शिक्षक गण आता क्वचितच बघायला मिळतील.... त्यांच्या तोंडून साने गुरुजींविषयी आम्ही पूर्वीही शाळेत असताना ऐकल आहे. अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे .श्रीयुत केंगे सरांच बोलणे ऐकत असताना डोळ्यात पाणी आलं .🙏

  • @rajpaliwal2944
    @rajpaliwal2944 2 ปีที่แล้ว +1

    आम्हा सर्व भाऊ बहिणींचे शिक्षण हे प्रताप विद्यालयात झाले आणि आमचे सर्वांचे आवडते शिक्षक आदरणीय केंगे सर त्यावेळेस प्रताप शाळेचे मुख्याध्यापक होते. अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे की सरांच मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभलं.
    सरांना समोर बघून आणि त्यांचे साने गुरुजींबद्दलचे अनुभव ऐकून भरून येते आहे. हेरंब सर तुम्हाला सरांच्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @santoshohol785
    @santoshohol785 2 ปีที่แล้ว

    शामची आई हे पुस्तक मी सात आठ वेळेस वाचले
    खूप खूप प्रभाव माझ्यावर पडला आहे
    त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणी सर्वोच्च स्थान त्यांना प्राप्त होवो म्हणून न चुकता देवाकडे दररोज एकदा प्रार्थना करत असतो

  • @aniketkanitkar3941
    @aniketkanitkar3941 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत

  • @jyomorankar9291
    @jyomorankar9291 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय केंगे सर खूप वर्षांनी मी तुमचे बोल ऐकले.तुमच्या अंगणात बसून मारलेल्या गप्पा आठवल्या,आज तुम्ही साने गुरुजी विषयी बोलताना भरभरून बोलत आहात तर तुमच्या सोबत माझेही डोळे भरून आले.श्री हेरंब तुमची मुलाखत घेत आहेत ह्याचाही मला अभिमान आहे,कारण हेरंब सर आणि मी लहानपणी चे सवंगडी माझ्या माहेरचा एक माणूस माझ्या दुसऱ्या माहेरी म्हणजे तुमच्या घरी मुलखात घेत आहेत ह्याहून दुसरे भाग्य नाही.

  • @prakprnj
    @prakprnj 8 หลายเดือนก่อน +1

    मी सुद्धा अत्यंत लकी आहे .गुरुजी धुळ्यात आमच्या घरी आले होते तेव्हा मी पाळण्यात झोपलो होतो .आईला आंघोळीला जायचे होते म्हणून आईने गुरुजींना माझ्याकडे बघा असे सांगून आई आंघोळीला गेली .थोड्या वेळाने मी रडायला लागलो म्हणून गुरुजींनी मला ऊचलुन घेतले व खेळवले .जेव्हा आईने मला हे सांगीतले तेव्हा माझ्या अंगावर मोरपीस फिरवल्या सारखे वाटले

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 ปีที่แล้ว

    Very good interview. We have lost the past of our life.

  • @khurshidsheikh9501
    @khurshidsheikh9501 2 ปีที่แล้ว

    साने गुरुजींना अभिवादन

  • @maheshshah993
    @maheshshah993 2 ปีที่แล้ว +1

    श्रीमान गुरु जींना आमचा सास्टांग नमस्कार वंदनीय गुरुजी आपल्या नावाने आमच्या अमळनेर ची ओळख होते.

  • @origamimathsfoundationhema3644
    @origamimathsfoundationhema3644 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @jagadishraghunathkankhare1488
    @jagadishraghunathkankhare1488 ปีที่แล้ว

    आदरणीय श्रीमान सुधाकर केंगे सर मला तुमच्या रुपानेच साने गुरुजी भेटले होते आज हा यू ट्यूब वरील व्हिडीओ तुमची सारखी आठवण यायची म्हणून पाहिला तेव्हा माझे डोळे पाणावले कारण आज साने गुरुजीन प्रमाणे तुम्ही सुद्धा या भूतलाचा निरोप घेतला आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 ปีที่แล้ว +4

    साने गुरुजी आणि केंगेसर, दोन्हीही समर्पित व्यक्तिमत्त्व...
    आपलं उभं आयुष्य या दोन्ही महानुभावांनी शिक्षण या विषयावर न्यौछावर करुन टाकलं...
    प्रखर राष्ट्रवादी विद्यार्थी घडवणारी ही माणसं.... खरंच,सैल्युट.....
    हरीजन मंदिर प्रवेश चळवळ मोहिमेत साने गुरुजी,अकुलखेडा , तह.चोपडा.येथे येऊन गेले.माझे आजोबा स्व.स्वा.सै.नामदेव उखा महाजन,जंगल सत्याग्रही,त्रिचनापल्ली जेल,हे सानेगुरुजींचे फैजपूर येथील कांग्रेस पासून सहकारी होते...

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 2 ปีที่แล้ว +2

    *अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया।*
    *चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः॥*🙏
    आमचे शिक्षकगुरु केंगे सर तुम्ही गप्पात ती.सानेगुरुजींबद्दल एका शब्दात वा वाक्यात मोठेपण विषद केलं ते म्हणजे *"साने गुरुजी करीअरीस्ट नव्हते"*
    *म्हणजे आजच्या परिभाषेत व्यक्तिगत ऐहिक,भौतिक व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या विचाराने पात्रता, क्षमता असूनही(म्हणजे ज्याची आज जमीनजुमले स्थावर,बंगला,अनेकानेकचाकी वाहने,सोनेनाणेदी धन ह्या परिमाणात मोजले जातात ह्याचा पगडा मोह नसलेले)महत्वाकांक्षी नव्हते म्हणजे उदात्त सामाजिक ध्येयाप्रती निष्ठापूर्वक समर्पित असलेले होते.*
    पण त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आम्ही तुमच्यात व तुमच्या कऱ्हाडेसरांसारख्या अधिक काही सहकाऱ्यांमधे आम्ही अामचे शिक्षक म्हणून अनुभवलाय.जो पर्यंत स्वायत्तता नव्हती तो पर्यंत तुम्ही एकमार्गी ज्ञानदान व संस्काराने तुमचे व्रतानुचारन प्रामाणिक निष्ठेने करत पिढ्या घडवत राहीले.जेव्हा संधी/अनुकुलता समोर अाली त्यावेळी वय विसरून तनमनधनाने तुम्ही तुमच्या स्वप्नातील आदर्शाच्या प्रकटीकरणासाठी एका छोट्याश्या विद्यालयाचे रोपटे लावून सानेगुरूजींच्या आत्म्यास परम संतोषानंद होईल व त्यांनाही अापल्या विद्यार्थ्याचा,शिष्याचा अभिमान,कौतुक,कृतार्थता वाटेल अश्या जिल्हा/राज्यात नामवंत झालेल्या विवेकानंद विद्यालयाच्या वटवृक्षात रुपांतर केले याबद्दल आम्ही विद्यार्थी तसेच तालुका जिल्हावासीही अापणास कृतज्ञ नमन करतो.आभाराचा भार न देता तुमच्या ऋणातच रहाणं पसंत करतो.
    आम्ही पूर्वविद्यार्थी संमेलनाची मुहूर्तमेढ प्रतापविद्या मंदिरातच(शाळेतच)मुक्कामी राहून संस्थेला कोठलाही कमीपणा येणार नाही अश्या वर्तनाने कै संध्याताईने शाशंकतेने दिलेली संमती तुमच्या संस्कारांना जागून सार्थ ठरविली.समारोपानंतर गाववेशीबाहेरच्या आपल्या निवासस्थानी आपणास पोहचविण्याच्या निमित्ताने मला अधिक सहवास,संवादाची संधी लाभली हे मी माझे भाग्यच समजतो.
    तुम्हाला निरामय,आनंदी,संपन्न दिर्घायुष्य मिळून विवेकानंद विद्यालयालाही तुमचे अधिकाधिक काळ मार्गदर्शन लाभून ती दिगंत किर्तीमान होवून तालुका,जिल्हा,राज्याचे भूषण ठरो हि शुभकामनाधिक परमेश्वरी आनंदी भवानीदेवी व हरेश्वरमहादेवाचरणी प्रार्थना.🪷👍✌️🙏😊
    विनीत
    कैलास माळी
    लक्ष्मीनगर,पर्वती,पुणे.

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 2 ปีที่แล้ว

      कैलास, सुंदर शब्दांकन, बहोत खूब...
      प्रभाकर महाजन, अकुलखेडा

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 2 ปีที่แล้ว +1

    ❤️🙏 साने गुरुजींचा सहवास लागलेले सर्व वंदनीय ❤️🌹🙏

  • @mukundpatil847
    @mukundpatil847 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान हेरंब सर। साने गुरुजींचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहायला मिळाले। साने गुरुजी यांच्या बद्दल वाचले आहे पण आज प्रत्यक्ष त्यांच्या सहवासातील माणूस पाहणे म्हणजे साक्षात साने गुरुजींनाच अनुभवायला मिळाले। आजच्या मूल्यशिक्षणात साने गुरुंजीचे कार्य याचा समावेश झाल्यास मूल्ये मुलांमध्ये रुजवणे खूप सोपे होईल।

  • @sandipmagar9092
    @sandipmagar9092 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुंदर सर ... साने गुरुजी यांच्या इतका त्याग आम्ही नक्कीच करू शकणार नाही परंतु मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा मनापासून प्रयत्न करू...

  • @shamashah297
    @shamashah297 2 ปีที่แล้ว +1

    Sir Sane Guruji na Ani aplyala Manach mujra ,sir jase tumhi amhala sopya bashet shikvayche agdi tyach bhashet apan sane gurujin vishayi mahiti dili khup khup Abhinandan, maze khup favourite sir aahat aapan👌👌🙏🙏💐👏👏👏👍🌹

  • @govindkolpuke6668
    @govindkolpuke6668 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @shivurja8139
    @shivurja8139 2 ปีที่แล้ว

    नि:शब्द...

  • @ajaygujarathi2346
    @ajaygujarathi2346 2 ปีที่แล้ว +1

    Sundar Memories

  • @pavitragujarathi4014
    @pavitragujarathi4014 2 ปีที่แล้ว +1

    GREAT

  • @santoshnagargoje8419
    @santoshnagargoje8419 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे सर

  • @pradiptupkari827
    @pradiptupkari827 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट भेट...🙏

  • @anandingale5252
    @anandingale5252 2 ปีที่แล้ว +1

    डोळे पाणावले सर
    खूप सुंदर 👍

  • @sambhajigaikwad1169
    @sambhajigaikwad1169 2 ปีที่แล้ว +1

    काय तो मनावर रुजलेला sanskar, ग्रेट

  • @santoshohol785
    @santoshohol785 2 ปีที่แล้ว

    त्यांच्या वडिलांचे म्हणजे भाऊंचे निधन कधी झाले
    कोणाला माहिती असेल तर सांगा

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 2 ปีที่แล้ว +2

    Atyant hrudaysparshi ashi mulaakhat.

  • @siddharthshah3650
    @siddharthshah3650 2 ปีที่แล้ว

    Very nice memories sir....
    After long time, heard your motivational voice....

  • @jyotipatil9747
    @jyotipatil9747 2 ปีที่แล้ว +1

    Khara toh ekchi dharrma ... jagala prem arpawe ..