पुस्तक आणि लेखक : 'खुलभर दुधाची कहाणी' या पुस्तकाच्या लेखिका सुनंदा अमरापूरकर यांच्याशी संवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • सुनंदा अमरापूरकर यांची ओळख दुहेरी सांगता येईल. मराठी ग्रंथ व्यवहाराशी परिचित असलेल्या लेखक-वाचकांना, दोन डझनांहून अधिक पुस्तकांच्या अनुवादक म्हणून त्यांची ओळख असेल. तर नाटक-सिनेमा क्षेत्राशी परिचित असलेल्या रसिकांना त्यांची ओळख, नाट्य-सिनेअभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची पत्नी अशी असेल. या दोन्ही भूमिका आणि आणखी बरेच काही सांगणारे आत्मकथन सुनंदाताईंनी लिहिले आहे, मेहता प्रकाशन पुणे यांनी ते नुकतेच प्रकाशित केले आहे.
    त्या पुस्तकाच्या निमित्ताने यशोदा वाकणकर यांनी घेतलेली ही मुलाखत आहे. यशोदा ही अनिल अवचट यांची कन्या. अवचट व अमरापूरकर या दोन कुटुंबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध मागील तीन दशकांहून अधिक काळ राहिले आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ मुलाखत 'हार्ट टू हार्ट' अशी झाली आहे. या मुलाखतीची लिंक आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks
    - संपादक, साधना
    - - - - - - - - - - - -
    Follow / Subscribe us on:
    Website - www.kartavyasadhana.in/
    Facebbok - kartavyasadhana1/
    Instagram - kartavya_sadhana
    Telegram Channel - t.me/kartavyas...

ความคิดเห็น • 23

  • @Radhika_70
    @Radhika_70 28 วันที่ผ่านมา +1

    किती छान बोलतात सुनंदा ताई!अतिशय चांगलं मराठी बोलत आहेत फार क्वचित इंग्रजी शब्द वापरतात.नाहीतर हल्ली एवढं चांगलं मराठी कुणी बोलत नाही,बरेचजण इंग्रजाळलेलं मराठी बोलत असतात.

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 22 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर मुलाखत घेतली दिली......मुलाखत न वाटता सुह्रदांचा सुसंवाद तोही आदर्श पारदर्शी,नितळ म्हणूनच मनापासून भावला.
    रंजना राम शास्त्री.❤

  • @udaykavishwar151
    @udaykavishwar151 หลายเดือนก่อน +5

    साधी पण खुप सुंदर मुलाखत. एक वाक्य आवडून गेलं. एखाद्या शहाण्या मुलासारखा अनुवाद आपल्या समोर येऊन बसतो.

  • @makarandkher9582
    @makarandkher9582 หลายเดือนก่อน +6

    'हा खरा सुसंवाद!'

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर व्यक्तिमत्व।।।
    अमरापुर गाव
    तालुका- पाथर्डी-शेवगाव
    जिल्हा- अहमदनगर🌹

  • @rashmidivekar9129
    @rashmidivekar9129 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर मुलाखत दोघीही फारच साध्या सरळ व्यक्तिमत्वाच्या त्यामुळेच मुलाखत फारच सुंदर झाली आहे.पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ निर्माण करणारी 🙏धन्यवाद

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत.पुस्तक नक्की च छान असणार या विषयी शंका
    नाही.दोघीनाही खूप खूप धन्यवाद.

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 หลายเดือนก่อน +2

    मुलाखत खूप छान झाली.

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 หลายเดือนก่อน +2

    Kiti chan kahanaya hotya,ajun hi वाचाव्या वाटतात,..खूप छान बोलणे आहे ताईंच.......

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर मुलाखत.खुलत जाणारी आणि आनंद देणारी.ताईंचा बोलण्याचा साधेपणा विशेष भावला.खरचं पुस्तक वाचायला पाहिजे.

  • @ravindramokashi5747
    @ravindramokashi5747 หลายเดือนก่อน +1

    कुठलिही नाटकी अभिनिवेश नसलेली मनमोकळी, प्रामाणिक व सुंदर मुलाखत.
    रवि मोकाशी, अहमदनगर.
    १-०८-२०२४

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 หลายเดือนก่อน +1

    छानच

  • @madhuriparanjape620
    @madhuriparanjape620 หลายเดือนก่อน +1

    सहजसुंदर दोन्ही व्यक्ती! सहजसुंदर संवाद!

  • @mugdhawagh6738
    @mugdhawagh6738 26 วันที่ผ่านมา

    दोघीही सुंदर लेखिका आहात. छान मुलाखत.

  • @SudhaPawar-iu7bc
    @SudhaPawar-iu7bc หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @rekhayadkikar5912
    @rekhayadkikar5912 หลายเดือนก่อน +1

    सुरेख मुलाखत

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 หลายเดือนก่อน +2

    छान!

  • @shreerangkhandekar9316
    @shreerangkhandekar9316 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 หลายเดือนก่อน +1

    Sundar...

  • @ashadeshmukh4012
    @ashadeshmukh4012 หลายเดือนก่อน +1

    काकु मी तुमची एक नातेवाईक आहे तुमची मुलाखत ऐकली खुप आनंद वाटला तूमहाला पाहायला मिळाले तुमचा आवाज

  • @yashodawakankar
    @yashodawakankar หลายเดือนก่อน +1

    Thank you so much!

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 หลายเดือนก่อน +1

    Madhavi mahajani yanchya bolnyat ani sunandatai yanchya bolnyat kitikiti farak ahe