Amendments Fragmentation Act Transactions Regular I तुकडेबंदी कायद्यात सुधारणा व्यवहार नियमित होणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यात सुधारणा झाली
तुकडेबंदी किंवा गुंठेवारीचे व्यवहार आता नियमित होणार
तुकडेबंदी कायद्यातील महत्वाची सुधारणा
तुकडेबंदी मोडून केलेले व्यवहार या तारखेपर्यंत नियमित होणार
Amendment of the Fragmentation and Fragmentation Act
Transactions of fragmentation or clustering will now become regular
An important amendment to the Fragmentation Act
Transactions that break the embargo should be regularized by this date
गुंठेवारीच्या म्हणजेच तुकडेबंदीच्या कायद्यासंदर्भात. याबाबत महाराष्ट्र सरकारनं एक अध्यादेश जारी केलायं. या अध्यादेशामुळे तुमचे तुकड्याचे व्यवहार नियमित होतील का. तुकड्याचे व्यवहार तुम्हाला पुर्वीसारखे नोंदवता येतील का. त्याची सातबारा सदरी नोंह होईल का. ते सुध्दा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मी सांगणार आहे.
गुंठेवारीचे व्यवहार जिल्हाधिकारी परवानगी किंवा मंजूर रेखांकन असल्याशिवाय नोंदवू नयेत असे आदेश दि. ७ सप्टेंबर २०१७ पुर्वी काढले होते. त्यानंतर नोंदणी विभागानं सर्व दुय्यम निबंधकांना याबाबत मार्गदर्शक सूचना देताना प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेले गुंठेवारीचे दस्तऐवज नोंदवू नयेत असं फर्मान दि. १२ जुलै २०२१ रोजी जारी केलं होतं.
त्यामुळे घरासाठी गुंठा दोन गुंठ्याचा व्यवहार करणारे अनेक लोक हवालदिल झाले होते. म्हणून मध्यंतरीच्या काळात तुकडेबंदी कायदाला होणारा विरोध लक्षात घेऊन शासनानं तुकडेबंदी कायद्यात फेरबदल करुन काही जिल्ह्यात १० गुंठे व काही जिल्ह्यात २० गुंठे इतकं प्रमाणभूत क्षेत्र कमी केलं होतं. तरीदेखील या कायद्याला असलेला लोकांचा विरोध कमी झालेला नव्हता.
शासनानं सेवानिवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुध्दा नेमली होती. या समितीनं महाराष्ट्र धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा सन १९४७ चा तुकडेबंदी कायदा आता कालबाह्य झाला आहे. या कायद्यामुळे लोकांची मोठी अडचण होत असून तो रद्दच करावा अशी शिफारस शासनाकडं केली होती.
या समितीची शिफारस लक्षात घेवून हा कायदा रद्द करण्यात आला असता तर गुंठेवारीचे दस्तऐवज पुर्ववत सुरु झाले असते. याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दांगट समितीचा अहवाल तत्वतः स्वीकारण्यात येणार असल्याचं मध्यंतरी म्हंटलं होतं. परंतु अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.
विहीरीसाठी, शेतरस्त्यासाठी, तसेच केंद्र किंवा राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी पाच गुंठ्यापर्यंत शेतजमीन खरेदी करता येईल असं राजपत्र शासनानं दि. १४ मार्च २०२४ रोजी जारी केलं होतं. त्यासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागत होती.
तरीदेखील गुंठेवारीच्या प्रकरणाला होणारा विरोध कमी झालेला नव्हता. अनेक लोकांनी तुकडेबंदीच्या विरोधात नोंदवून घेतलेले व्यवहार सुध्दा नियमित झालेले नव्हते. म्हणजे त्या व्यवहारांची नोंद सातबारा सदरी करण्यात आलेली नव्हती. लोकांनी हजारो, लाखो रुपये मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरुन रितसर नोंदणी करुन घेतलेले व्यवहार सातबाराला लागले नाहीत. त्यामुळे अनेक लोक अद्यापही गुंठेवारीच्या कायद्यासंदर्भात असमाधानी आहेत.
सन २०१७ च्या तुकडेबंदी सुधारणा कायद्यानुसार दि. १५ नोव्हेंबर १९६५ ते दि. ७ सप्टेंबर २०१७ पर्यंतचे सर्व व्यवहार नियमित करण्यासाठी रेडिरेकनच्या २५ टक्के रक्कम भरावी लागत होती. परंतु त्याला लोकांचा जास्त प्रतिसाद मिळाला नाही. या सर्वांचा विचार करुन महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यानं दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक राजपत्र केलयं. या राजपत्राच्या निवेदनामध्ये काय नमूद केलंयं ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रिनवरुन जाणून घेवूया... दि. १५ नोव्हेंबर १९६५ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतचे तुकड्यांचे व्यवहार म्हणजेच शेतीव्यतिरिक्त शहरालगतचे निवासी झोनमध्ये, औद्योगिक झोनमध्ये, किंवा वाणिज्य झोनमध्ये झालेले अनधिकृत व्यवहार नियमीत करुन घेण्यासाठी व त्याची सातबारावर नोंद करुन घेण्यासाठी रेडिरेकनरच्या किमतीच्या २५ टक्के ऐवजी आता फक्त ५ टक्के इतकी रक्कम भरुन ते नियमित करुन घेता येतील.
अशाप्रकारे शासनाने तुकडेबंदी कायद्यात महत्वाची सुधारणा केलीयं. त्यामुळे दि. १५ नोव्हेंबर १९६५ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शहरालगतचे जे अनधिकृत व्यवहार निवासी, औद्योगिक, वाणिज्य झोनमध्ये झालेले आहेत ते अधिकृत करुन घेता येतील. व त्याची नोंद सातबारा सदरी करुन घेता येईल. त्याचा फायदा आपण सर्व घ्याल असे मला वाटते.
Mission for Law Education.
Dhanraj Kharatmal. Valuable Education
#Tukdebandi#Guntewari#MahasulKhate#RegistrationDepartment
खूप छान माहिती दिली साहेब 👍🙏
Very nice Knowledgeble Information 🙏
रिस्पेक्ट सर आपण दिलेली माहिती खूपच छान आहे योग्य आहे तथापि त्याची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती आहे क्षीरसागर
2024 ला 2 गुंठे ची नोटरी झाली आहे. तर आता रेजिस्ट्रेशन होईल का
खूप छान माहिती दिली सर
सर खूप छान माहिती दिली तुम्ही तुकडे बंदी संदर्भात.
ग्रामपंचायत हद्दीत गावठाणात विना परवानगी बांधकामाबाबत व्हिडिओ बनवा सर
Agriculture land varchi 1 ghunta jamin with construction gheu shakato ka 5 percent fine bharun. 5 percent fakt jamin mulyachya ka bamdkam mulyachya pan fine bharava lagel?
*मी* *गावठाण मधील येत असलेल्या शेत जमिनी पैकी 4 गुंटे जमीन नमुना न. 8 वर नोटरी करून खरेदी केली आहे feb 2021 मध्ये आणि ग्रामपंचायत मध्ये नमुना न. 8 ला नोंद केलेली आहे आणि आता माझ्याकडे नमुना न. 8 माझ्या नावाचा आहे, जागा गावठाण मध्ये आहे याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र आहे, तर ही जागा 7/12 वर कशी लावता येईल कृपया मार्गदर्शन करावे*
2020 ला नोटरी झालेली आहे तर आता रजिस्ट्री/1 गुंठा नावावर होईल का
दादा 1998 चा प्लॉट खरेदी केला तो मला आता विक्री करता येतो का
Act banaychya adhi ya adhyaksh ch vapar karun, niyamitikaran karta yeil ka sir.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वर्ग 2 ची जागा ह्या ऑर्डर प्रमाणे करता येईल का.
Gr khute bhetel
लोकांचे प्रश्न कोणाचं मांडत नाही,
Most of farms lands in corporation,nagar palika etc being made NA for selling plots in layouts being converted into banglow,appartment by Talegoan Dabhade schems are in 7/12 at local Talathi ofice ,are to be converted into CT Survay registration ,as par CT Survay ,Nashik being left for woners name in CT Survay due to old woners of land upto 250-300 years are not changed on CT Survay record ate ,and the lands measurement done by developer being made by private surveyor not checked by nagar rachana made a problem to registered CT Survay Nasan ,and CT Survay asks huge amounts upto 2lacks for the measurement of complete layout from plot holder.Please guid for the problem
26 ghunte madhli 6 ghunte kharedi kru shakto ka
Sir tumhi gramin bhagabaddal yamadhe matale nahi , form parbhani district village Nandapur
गरीब लोकाना चांगला निर्णय झाला आहे
Please reply sir ..ha nirnay dec 2023 paryantchya plot kharedikarta ahe ka 2017 purvi chya ..
ग्रीन झोन 11 गुंठे मधील 7-12 वेगळा करून 2 गुंठे वेगळी नोंद 7-12 तयार होईल का
Sir gramin bhaga sathi ha . G.r lagu hoil kay majy 2005 chy warkas 35 gunty jaminichy kharidi khat ahye
हे काही पण सांगतात आजून पर्यंत जिआर आलेला नाही
GR टाकावा सर
अधिकृत म्हणजे काय? कृपयायावर सविस्तर व्हिडिओ बनवा🙏
सर, आपन पुन्हा एकडा स्पष्ट करा की, महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर रचना अधिनियम अतरगत क्षेत्र ला हा कायदा लागू होइल की नाही???
गुंठेवारी फ्लॅटच अग्रीमेंट होणार का? पुणे
आता आपण 1 ते 5 गुंठे खरेदी करू शकतो का ? मला श्रीवर्धन तालुक्यातील एका गावात जागा खरेदी करायची आहे...कृपया याबद्दल सांगा.... सर
Latur jilaha nilanga taluka la chalu jhala ka saheb
निलंगा ला झाल्यास मला पण सांगा
भ्रष्टाचार मुक्त्यार पत्र केल्यास रजिस्टर होते तर शासन च मतत्रींच नटक करून घेतात
सर माझी 3,R चि शेत जमीन आहे व त्याचे वेगळे 7/12 पण आहे. ते मला विकता येणार
सामूहिक खरेदीचे स्वतंत्र नियमित होईल का
Same question?
Sir Contact no milel ka??
नमस्कार. ३ गुंठे प्लॉट ५%भरून नियमित करता येईल का ? ७/१२ वर या व्यवहाराची नोंद होईल का ? माहिती द्यावी. धन्यवाद.
सर आम्ही कधीही रद्द न होणार मोबदल्याचे कुलमुखत्यार साठेखत केल आहे त्याची रजिस्ट्रेशन फी सुद्धा शासनाला भरली आहे मग आमचा दस्त होऊ शकतो का प्लीज मार्गदर्शन करा
क्षेत्र हे नगरपालिका हद्दीमधीलच दीड गुंड आहे त्याच्यासाठी काय वेगळा व्हिडिओ बनवला असेल तरी प्लीज कळवा
थोडक्यात सांगा ऐरंडाच गुराळ बंद करा
नवीन तुकडा पाडता येईल का
GR PDF
New G R copy. Pahijze
Sir
Can you please provide your contact number ?