'सायकल' व्यंकटेश माडगूळकर कथावाचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1

  • @kavyankur
    @kavyankur  3 วันที่ผ่านมา

    या कथेबद्दलचे काही मजेशीर संदर्भ-
    १. व्यंकटेश माडगूळकरांचे बंधू, प्रसिद्ध कवी- गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे घर आजही मुंबई-पुणे हायवे, वाकडेवाडी, पुणे इथे आहे. माझे स्वतःचे बालपण शेतकी कॉलेज, वाकडेवाडी, पुणे येथे गेले असल्याने कथेतील स्थळ-काळाचे वर्णन माझ्यासाठी अस्सल नॉस्टाल्जिया आहे. तुमच्या बालपणीच्या कोणत्या आठवणी या कथेने जाग्या केल्या, comments मध्ये नक्की सांगा!
    2. २००५ साली पुण्यातल्या एका कॉलेजच्या पोरांनी या कथेला एकांकिकेचे स्वरूप दिले. या एकांकिकेने पुण्यातली प्रतिष्ठित 'पुरुषोत्तम करंडक' ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा तुफान गाजवली. या आणि नंतर अनेक स्पर्धांमधून सर्वोत्तम अभिनय आणि दिग्दर्शनासाठी बक्षिसे मिळवली. त्या पोरांनी आज फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजनविश्वातही आपली छाप उमटवली आहे. वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवणारे आपले लाडके, 'सायकल' एकांकिकेत 'काळे मास्तर' साकारणारा #अमेय_वाघ आणि 'राम' च्या भूमिकेत तसेच एकांकिकेचा दिग्दर्शक #निपुण_धर्माधिकारी
    बोनस: सायकल एकांकिकेची झलक पहा आणि आठवणी ऐका खुद्द अमेय वाघच्या तोंडून...
    th-cam.com/video/eEdOG-JROSs/w-d-xo.htmlsi=qMwHpZKjisEBJDvc
    #nipundharmadhikari1857 #nipundharmadhikari #Wagh cha Swag #ameywagh #भाडिपा