आंबा लागवड : खड्डा खतानी कसा भरावा व झाड कसे लावावे? प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहीती भाग क्रमांक १५४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    ♦️ खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ? ♦️
    सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
    हुमिक ॲसिड- ३०० ते ४०० ग्रॅम
    रिजेंट- ५० ग्रॅम
    मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )-
    १०० ग्रॅम
    लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
    लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
    शेणखत -६ घमेली (६० किलो )
    गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
    पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
    मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    खड्डे कसे काढावेत ? व कसे भरावेत ?
    १) आंबा लागवड ही खड्डे काढून किंवा वाफा/सरी/चर तयार करूनही करता येते.
    २)आंबा लागवडीसाठी खड्डे काढताना 3×3×3 फुट ही पध्दत आदर्श मानली जाते.
    ३)जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढल्यास खड्ड्याचे पोट निघत नाहीत म्हणून हे खड्डे ३ फुट अंतराने तासून घ्यावेत.
    ४)अती मुरमाड व कठीण दगड असणाऱ्या जमीनीत लागवड करने टाळावे .
    ५) लागवड करावयाची झाल्यास खड्डे थोडे अधिक खोल ४/५ फुटा पर्यंत काढावेत.
    ६) खड्डे साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात काढावेत .
    ७) खड्डे काढून झाल्यावर किमान एक महिना ते/ ४० दिवस कडक उन्हात तापतील याची काळजी घ्यावी.
    ८) महिन्याभरात खड्ड्यात पडलेली माती काढून खड्ड्याच्या आतील पाच बाजुने बुरशी नाशक व वाळवी नाशक फवारणी करुन घ्यावी.
    ९)तळाशी कठीण मुरुम असल्यास खड्डे काढल्यानंतर वेळोवेळी खड्ड्यात पाणी ओतावे जेणेकरून तळाशी असणारा मुरुम मउ होइल.
    १०) मे चा शेवटचा आठवडा किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात आंबा रोपांची लागवड/रोपन करावे.
    ११) खड्डा काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्यानंतर खड्डे माती +लेंडी खत+शेणखत +गांडूळखत +कंपोस्ट खत +पालापाचोळा+बायो सेंद्रिय खत +लिंबोळी पेंड यांच्या सयुक्त मिश्रणाने
    भरावा.
    🔸सिंगल सुपर फोस्फेट चा आवश्यक असल्यास वापर करावा मुळांची वाढ चांगली होते.🔸
    १२)3×3×3 चा खड्डा भरण्यासाठी साधारणपणे ६५ ते ७० पाटी/घमेली यांचे सयुक्त मिश्रण लागते.
    १३)खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी किमान ५ इंचाचा पालापाचोळा/कंपोस्ट चा थर द्यावा.
    🔹त्यापूर्वी थायमेट किंवा इतर बुरशी नाशक तळाशी टाकावेत.🔹
    १४) खड्ड्याच्या मध्यभागी झाडाला आधार देणारी मानगा/बांबू ची काठी उभी करुनच खड्डा भरावा.
    १५) पाण्याची सुविधा उत्तम असल्यास भारतीय उपखंडात मे च्या शेवटी ही लागवड करता येते.
    १६) जून च्या पहील्या आठवड्यात मान्सुन चा अंदाज घेउन आंबा रोपांची लागवड करावी.
    १७) रोप लावल्या नंतर लगेच त्याला किमान १०/१५ लिटर पाणी झारीच्या साहाय्याने द्यावे .
    १८) लावलेल्या रोपास सुतळी किंवा काथ्या चा वापर करुन जमिनीत लावलेल्या काठीला बांधून आधार द्यावा.
    १९) रोपाचे कलम केलेली जागा जमीनीत मुजनार नाही याची काळजी घ्यावी.
    🔺श्री.ऱाहुल खैरमोडे सर🔻
    पाटण(सातारा)
    Contact No.
    88 55 900 300
    88 88 78 22 53 (Whatsapp)
    mrkhairmodesirji@gmail.com

ความคิดเห็น • 231

  • @chinmayvlogs5754
    @chinmayvlogs5754 3 ปีที่แล้ว +3

    अशीच चांगली माहिती वेळोवेळी देत रहा जेणेकरून नवीन आंबा लागवड करू इच्छिणारे नवीन शेतकरी याचा फायदा घेऊन त्यांचे मनोबल वाढेल.खूप छान माहिती.🙏🙏🙏

  • @sudhirsoman5040
    @sudhirsoman5040 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती अशीच चांगली माहिती वेळोवेळी द्या . जेणेकरून आमच्या सारखे नवीन आंबा लागवड करू इच्छिणारे शेतकरी याचा फायदा घेऊन त्यांचे मनोबल वाढेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा Kindly subscribe to our channel .

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍 😊

  • @sachinmore8014
    @sachinmore8014 3 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान माहिती शेतकरांच्या फायदयाची

  • @anagh3223
    @anagh3223 3 ปีที่แล้ว +2

    छान उपयुक्त माहिती .
    कृपया सोनपरी आंब्याची सर्व माहिती द्या . कधी तयार होतो, उत्पन्न, चव, तोडल्यानातरच टिकाऊ कालखंड

  • @HappyGlobe-ux6pn
    @HappyGlobe-ux6pn 6 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @rajendrapawar6524
    @rajendrapawar6524 3 ปีที่แล้ว +1

    राहूल सर,अगदी बरोबर वेळेला,आवश्यक असणारी छान माहिती आणि मार्गदर्शन!!

  • @kishormandhare8868
    @kishormandhare8868 5 หลายเดือนก่อน +2

    😊 khupach Chan sir

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे.अशीच माहिती देत रहावे.ही विनंती आहे.

  • @ganeshsuryavanshi6679
    @ganeshsuryavanshi6679 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर्व शेतकऱ्यांना समजत आहे

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान सादरीकरण🙏

  • @साई-ल1य
    @साई-ल1य 2 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती दिली.. पण आपण खड्यात बुरशीनाशक पावडर व खत कधी द्यायचं..

  • @ajitbarage830
    @ajitbarage830 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti dilit...thank you...

  • @rubansarma
    @rubansarma 2 ปีที่แล้ว +1

    Rahul Sir, your videos are very informative and I have used techniques taught by you in your videos and the growth of the mango plants is very very good. Thank you very much. Only 1 request, please give English subtitles.

  • @vijaykhankal9998
    @vijaykhankal9998 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @jaisreeram000
    @jaisreeram000 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👌👌👌

  • @uttamshinde9538
    @uttamshinde9538 2 ปีที่แล้ว +2

    Chan mhayti

  • @savitasapkal8862
    @savitasapkal8862 3 ปีที่แล้ว +1

    छान आणि उपयुक्त माहिती

  • @tatyamasalkhamb7997
    @tatyamasalkhamb7997 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली .धन्यवाद !!

  • @aloksadhankar2263
    @aloksadhankar2263 2 ปีที่แล้ว +1

    Educative information thanks

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 ปีที่แล้ว +1

    शिव सकाळ ओंम नमः शिवाय 🌹🙏🌹

  • @dattamandhare3366
    @dattamandhare3366 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @jitendrakangane462
    @jitendrakangane462 3 ปีที่แล้ว +1

    Sir, chan mahiti deta,khup khup aabhar.(raigad)

  • @vidyashinde1418
    @vidyashinde1418 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir🙏🙏

  • @santoshlokhande9169
    @santoshlokhande9169 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 ปีที่แล้ว +1

    Sir, informative VDO.

  • @sachink74
    @sachink74 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत दादा...

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

    • @sachink74
      @sachink74 ปีที่แล้ว

      दादा 102626, सिंगल सुपर फॉस्पेट, बीओ पॉवर एका रोपा मागे किती प्रमाणात वापरू शकतो??..तसेच पाल्या पाचोळ्यात काजूची सुखलेली पाने देखील चालतात का ??

  • @akshayjadhav3439
    @akshayjadhav3439 3 ปีที่แล้ว +1

    Best

  • @jitendragorhekar9104
    @jitendragorhekar9104 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली सर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा
      आपल्या चॅनेल ची लिंक पाठवतो .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      आपल्या चॅनेल ची लिंक . नक्की पहा .like करायला विसरु नका .
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद...👌👌

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 3 ปีที่แล้ว +1

    Very important information

  • @bhagawansabale4429
    @bhagawansabale4429 3 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती

  • @kishorbobade399
    @kishorbobade399 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती...

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलात सर👌

  • @ashwinijoshihukeri8305
    @ashwinijoshihukeri8305 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती . शंका दुर झाल्या . जर जून मध्ये रोप लागवड शक्य झाली नाही तर जुलै किंवा नंतर करु शकतो का ? त्याकरता खड्डा 1 महिना अगोदर पावसाळ्यात काढावा का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : ३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *आंबा लागवड कधी करावी?*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *नमस्कार !!!*
      आंबा लागवड ही एक यशस्वी फळबाग लागवड होवू शकते ; हे बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी आपल्या अथक प्रयत्नांनी सिध्द करुन दाखवले आहे . याच्या अनेक यशोगाथा आपण सोशल मिडीया वरुन पाहील्याही असतील .
      त्यामुळे जर आपणाकडे आंबा लागवड योग्य क्षेत्र असेल व आपण यावर्षी नवीन लागवड करणार असाल तर ; आपल्या मनामध्ये ही
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      हा प्रश्न नक्की आलाच असेल.
      अशा सर्व नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा लेख नक्कीच खुप उपयुक्त आहे .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🌧️🌧️🌦️🌩️🌨️🌧️🌥️
      *पर्जन्यमान व*
      *लागवड कालावधी सहसंबंध*
      *हो!!* आंबा लागवड करताना पर्जन्यमानाचा विचार करुन लागवड कालावधी निवडावा लागतो ..
      जसे कि
      १) *अती पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी मे च्या दुसऱ्या आठवड्यात आंबा लागवड करावी .
      पाऊस पडण्यापूर्वीच झाडे लावल्यास झाड आपला आधार घट्ट करते त्यामुळे अती वृष्टीमुळे झाडाना अपाय होत नाही .व झाड व झाडाची मुळे कुजणे या समस्या येत नाहीत .
      खड्डा भरताना आधाराची काठी रोवली असल्यास अती जोराचा वारा व पावसाचा थेट होणारा आघात झाड नक्की पेलु शकते .
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      झाडे मे मध्ये लावल्यानंतर जर
      मान्सुन च्या आगमनाला उशीर झाल्यास कडक उन्हाळ्यापासुन झाडाच्या संरक्षणासाठी लेख क्रमांक २ मधील माहीती नुसार पाणी व्यवस्थापन करावे .
      २) *मध्यम पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी जूनच्या पहील्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी .पाऊस लांबला तर आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करावी .
      ३) *पर्जन्य छायेच्या प्रदेशात*
      कमी पावसाच्या प्रदेशात जुलै नंतर पाऊस कमी असला किंवा आजिबात नसला तरी वातावरण थोडे थंड असते. अशावेळी लागवड करावी .
      आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करु नये .
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *पावसाळ्यातच आंबा झाडे*
      *का लावावीत?*
      महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात पर्जन्यमान चांगल्या प्रकारचे असते.
      पावसाळ्यातील चार महिन्यांचे थंड
      वातावरण आंबा रोप रुजण्यासाठी खुप फायदेशीर असते .अशा वातावरणात रोप चांगले रुजते , झाड आपला आधार भक्कम करते व मुळांची वाढ चांगली होते . केलेल्या खत व्यवस्थापनामुळे झाड या विश्रांतीच्या काळात अन्नद्रव्यांचा अधिक साठा करुन झालेली झीज भरुन काढते व त्यामुळे पावसाळ्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते .
      *म्हणून बांधवानी पावसाळी लागवडीलाच प्राधान्य द्यावे.*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येत नाही का ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      *हो करता येते..*
      काही अपरिहार्य कारणांमुळे पावसाळ्यात लागवड करता
      नआल्यास ज्या बांधवांकडे
      पाण्याच्या सिंचनाची सोय चांगली असेल तर अशा ठिकाणी थोडी अधिक काळजी घेवून लागवड करता येते.रोप लावल्यानंतर पहीले दोन महीने आठवड्यातुन दोन वेळा प्रतीझाड ५ ते ७ लिटर पाणी द्यावे.
      मात्र अशी लागवड अपवादात्मक परिस्थितीतच करावी. पावसाळ्यात केलेली लागवड सर्वात उत्तम.
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      *(Video No.32)*
      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html
      *हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येते का ?*
      *(Video No.33)*
      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @sandeepgosavi7170
    @sandeepgosavi7170 6 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir Aapn Margdrshan Khpu Yogya Padhtine kele

  • @kalyanmumbaimatkaking9508
    @kalyanmumbaimatkaking9508 ปีที่แล้ว +1

    👌👍👌👌👍

  • @amarchaudhari4294
    @amarchaudhari4294 3 ปีที่แล้ว +2

    Ghara cha bajula keshar ani dasheri ambyache zade lavle ahe tyanchi kating kelich pahije ka jashi vadh hote ahe tashi ch hoau deu

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bajiraogaikwad8073
    @bajiraogaikwad8073 ปีที่แล้ว +1

    like it

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 2 ปีที่แล้ว +1

    मी नवीन शेतकरी आहे.त्यामुळे मला ह्या गोष्टींची माहिती द्यावी.

  • @Ravi-kiran15
    @Ravi-kiran15 2 ปีที่แล้ว +1

    बागेत एखादे रोप लागवड केली आणि अपरिहार्य कारणाने/ नाईलाजास्तव त्याला काढून दुसरीकडे पुन्हा लावू शकतो का? माहिती द्यावी, धन्यवाद.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      हो लावता येइल ..
      झाड मुळासहित व्यवस्थित काढावे व लगेच त्याचे दुसरीकडे रोपण करा .
      8855900300

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +2

    कलम पट्टी कधी काढायची?

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 3 ปีที่แล้ว +1

    Sir 1 year cha zadana konte v kete khat dyave.sir khup chan video.👍👍👌👌

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

  • @premrajpokharna5460
    @premrajpokharna5460 3 ปีที่แล้ว +1

    तुमचेकङे रोप लागवड करून देनार लोक मिळतील का त्याची मजुरी देण्यात येईल

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली. आपल्या पद्धतीने एकरी किती लावता येतात. संपूर्ण खर्च किती येईल. हे कृपया सांगावे ही विनंती धन्यवाद

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      फोन केलात तर सविस्तर सांगता येइल .
      दुपारी २ नंतर 8855900300

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 2 ปีที่แล้ว +1

    Gavran Zade 6 mahinyachae ahet 1.5 te 2 foot hight ahe tyala keshar chi Kalam keli tr chalel ka Ani kenvha kravi

  • @kedargosavi2806
    @kedargosavi2806 ปีที่แล้ว +1

    सर मी आंब्याची झाडे लावाली होती पण त्या आबांच्या झाडच्या मुळांना मुर लागुन मरुन गेली मला परत आंब्याची झाडे लावायाची आहे मी धुले जिल्हा माधील शिंदखेडा तालुका च्या आहे माझ्या शेता मध्ये पाच तेसहा फुट नंतरमुरुम आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว +1

      माझा whatsapp no.
      88 88 78 22 53
      send Hi .. will send u all details

  • @hiramanpawar5174
    @hiramanpawar5174 4 หลายเดือนก่อน +1

    नाशिक येथील आंबा झाड कुठे मिळतील का तर नर्सरीचा पता मिळेल का.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      चौकशी करा जवळपास च्या भागात मिळतील .

  • @nishanpatil4239
    @nishanpatil4239 ปีที่แล้ว +1

    पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक खत कसे, किती प्रमाण द्यावे?

  • @sandipshewale302
    @sandipshewale302 3 ปีที่แล้ว

    👌

  • @chandrakantchile5943
    @chandrakantchile5943 2 ปีที่แล้ว +1

    डब्यात लावलेला आंबा कसा लावायचे करण डबा कापते वेळीस मातीचा गड्डा फुटणार काही उपाय सांगा

  • @veerbhandari9023
    @veerbhandari9023 3 ปีที่แล้ว +2

    Ya plant chi Pruning kadhi karnar ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +2

      याला नवीन फुटवा आला कि कट करता येइल .
      ओक्टोबर मध्ये

  • @kedargosavi2806
    @kedargosavi2806 ปีที่แล้ว +1

    सर मी आंब्याची झाडे लावाली होती पण ती कोरडी होऊन मरन पावाली झाडाची मुळ कोरडी होऊन मरून गेली

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว

      रोप मर होते .
      मुळावर काळी बुरशी आल्यामुळे

  • @jagdishshelar522
    @jagdishshelar522 7 หลายเดือนก่อน +1

    Destant between two mango tree

  • @sourabhbabhale
    @sourabhbabhale 3 ปีที่แล้ว +1

    Sir jmin 3 te 4 fut kali mati ahe yach prkare amba lagwad kravi kay.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      Ho

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      आंबा लागवड ही अभ्यासपूर्ण व समजुन घेतली तर फार सोपी व अधिक आणि शाश्वत उत्पन्न मिळवुन देणारी फळबाग लागवड आहे .
      लागवडीचा श्रीगणेशा करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण माहीती समजुन घेतलीत तर होणारे अर्थिक नुकसान टाळता येवु शकते .
      म्हणून आंबा लागवड करण्यापूर्वी खालील गोष्टींकडे कृपया दुर्लक्ष करु नका .
      🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
      🌳 *जमीनीची निवड करणे* 🥭
      अनुकरण करणे ही एक नैसर्गिक वृत्ती आपल्या सर्वांच्या मध्ये नक्की असते त्यामुळे शेजारील शेतकरी बांधवाने आंबा लागवड केली म्हणून आपणही करावी ; अशी एक अभ्यास नकरता केलेली चुक आपण ही करतो . मात्र त्यामुळे कोणतीही पूर्वतयारी नकरता केलेली लागवड नक्कीच अयशस्वी ठरते .म्हणून लागवड करण्यापुर्वी
      करावयाची सर्वात महत्वाची
      बाब म्हणजे लागवडीसाठी
      *योग्य जमीनीची निवड करणे .*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *आंबा लागवडी योग्य जमीन कोणती ?*
      १) पाण्याचा उत्तम निचरा होणारी व
      २) चुनखडक विरहित जमीनीत
      ३) पाणी साचुन रहात असेल तर एका बाजुला मंद उतार असलेली
      ४) काळी ,लाल ,पांढरी ,मुरमाड ,
      जांभ्याच्या कातळाची
      ५) बेसाल्ट सारखा काळा कठीण दगड किमान १० फुट खोली पर्यंत नसणारी .
      ६) अती दलदलीची नसावी .
      ७) अती क्षार असलेली नसावी .
      ८) डोंगर उताराची चालेल पण अती तीव्र उतार असणारी नको .
      ९) गाळाची व सुपीक माती असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आंबा लागवडीसाठी उत्तम मानली जाते .
      १०) ज्या जमीनीत झाडाला आवश्यक असणाऱ्या सर्व १६ अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली असते अशी जमीन लागवडीसाठी आदर्श मानली जाते .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *माती परीक्षण* -
      जमीनीत अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात आहेत कि नाहीत व सदर जमीन आंबा लागवडीसाठी योग्य आहे कि नाही यासाठी माती परीक्षण करणे बंधनकारक आहे .
      *माती परीक्षण बद्दल*
      अधिक माहीती
      पुढील लेख क्रमांक - ३
      मध्ये सविस्तर लिहणार आहे .
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा लागवडी साठी*
      *जमीनीची निवड कशी करावी ?*
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      यासाठी खालील TH-cam
      वरील Vedio नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती ?*
      th-cam.com/video/k4Ov2OpcqV0/w-d-xo.html
      (video no. : 19)
      *कोणत्या जमीनीत आंबा लागवड करु नये ?*
      th-cam.com/video/breZpLp2zzs/w-d-xo.html
      (Video no.: 29 )
      मार्गदर्शक आणि
      आपला शेतकरी बांधव
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @manojkumarpawar6831
      @manojkumarpawar6831 3 ปีที่แล้ว

      @@rahulkhairmodevlogs2604 सर ही कलम पद्धती आहे पण हीच पध्दत कोय रोपा साठी चालेल का,रोपा मध्ये कीती अंतर ठेवावे

  • @lifecycle890
    @lifecycle890 3 ปีที่แล้ว +1

    Majhya shetat pawsat mahina bhar Pani sadhato ter amba chi kalam lawne chalel ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      आंबा लागवड ही अभ्यासपूर्ण व समजुन घेतली तर फार सोपी व अधिक आणि शाश्वत उत्पन्न मिळवुन देणारी फळबाग लागवड आहे .
      लागवडीचा श्रीगणेशा करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण माहीती समजुन घेतलीत तर होणारे अर्थिक नुकसान टाळता येवु शकते .
      म्हणून आंबा लागवड करण्यापूर्वी खालील गोष्टींकडे कृपया दुर्लक्ष करु नका .
      🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
      🌳 *जमीनीची निवड करणे* 🥭
      अनुकरण करणे ही एक नैसर्गिक वृत्ती आपल्या सर्वांच्या मध्ये नक्की असते त्यामुळे शेजारील शेतकरी बांधवाने आंबा लागवड केली म्हणून आपणही करावी ; अशी एक अभ्यास नकरता केलेली चुक आपण ही करतो . मात्र त्यामुळे कोणतीही पूर्वतयारी नकरता केलेली लागवड नक्कीच अयशस्वी ठरते .म्हणून लागवड करण्यापुर्वी
      करावयाची सर्वात महत्वाची
      बाब म्हणजे लागवडीसाठी
      *योग्य जमीनीची निवड करणे .*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *आंबा लागवडी योग्य जमीन कोणती ?*
      १) पाण्याचा उत्तम निचरा होणारी व
      २) चुनखडक विरहित जमीनीत
      ३) पाणी साचुन रहात असेल तर एका बाजुला मंद उतार असलेली
      ४) काळी ,लाल ,पांढरी ,मुरमाड ,
      जांभ्याच्या कातळाची
      ५) बेसाल्ट सारखा काळा कठीण दगड किमान १० फुट खोली पर्यंत नसणारी .
      ६) अती दलदलीची नसावी .
      ७) अती क्षार असलेली नसावी .
      ८) डोंगर उताराची चालेल पण अती तीव्र उतार असणारी नको .
      ९) गाळाची व सुपीक माती असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आंबा लागवडीसाठी उत्तम मानली जाते .
      १०) ज्या जमीनीत झाडाला आवश्यक असणाऱ्या सर्व १६ अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली असते अशी जमीन लागवडीसाठी आदर्श मानली जाते .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *माती परीक्षण* -
      जमीनीत अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात आहेत कि नाहीत व सदर जमीन आंबा लागवडीसाठी योग्य आहे कि नाही यासाठी माती परीक्षण करणे बंधनकारक आहे .
      *माती परीक्षण बद्दल*
      अधिक माहीती
      पुढील लेख क्रमांक - ३
      मध्ये सविस्तर लिहणार आहे .
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा लागवडी साठी*
      *जमीनीची निवड कशी करावी ?*
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      यासाठी खालील TH-cam
      वरील Vedio नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती ?*
      th-cam.com/video/k4Ov2OpcqV0/w-d-xo.html
      (video no. : 19)
      *कोणत्या जमीनीत आंबा लागवड करु नये ?*
      th-cam.com/video/breZpLp2zzs/w-d-xo.html
      (Video no.: 29 )
      मार्गदर्शक आणि
      आपला शेतकरी बांधव
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      जमीनीला एका बाजूला मंद उतार करुन घ्या .
      पाणी साचुन रहात नाही .

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 3 ปีที่แล้ว +1

    पाच फुट ऊंच आणि एक वष॔ वयाच्या झाडाला रासायनिक खते कीती द्यावी?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

  • @arunmahale836
    @arunmahale836 2 ปีที่แล้ว +1

    झाड लावून झाल्यावर परत खड्डा कशाप्रकारे भरावा हा पण व्हिडिओ बनवा

  • @dattaharale947
    @dattaharale947 2 ปีที่แล้ว +1

    Kiti mahine ch rop nivdave

  • @superwarriors1494
    @superwarriors1494 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही शेतात 50 आंब्याचे झाडे लावले लावतानी खड्ड्यामध्ये बुरशीनाशक पावडर टाकले तरीपण तीस झाडे वाळले

  • @shivrajpatil7798
    @shivrajpatil7798 3 ปีที่แล้ว +2

    हापूस हा आंबा सोलापूर मध्ये लावता येईल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो दादा ..
      योग्य व्यवस्थापन केले तर नक्की येइल

  • @ramadasbankawad
    @ramadasbankawad 4 หลายเดือนก่อน +1

    सर मला गावरान आंब्याचे झाड लावायचे आहे
    गावरान आंबा रोप लावल्यानंतर किती वर्षानंतर फळ चालू होतो
    प्लीज रिप्लाय सर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      10/12 वर्षे

    • @ramadasbankawad
      @ramadasbankawad 4 หลายเดือนก่อน

      @@rahulkhairmodevlogs2604 thank you sir🙏🏻🙏🏻

    • @ramadasbankawad
      @ramadasbankawad 4 หลายเดือนก่อน

      @@rahulkhairmodevlogs2604
      🙏🏻🙏🏻

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 3 ปีที่แล้ว

    पुन्हा पुन्हा सादरीकरण ऐकावं वाटत!

  • @suyogvaidya9570
    @suyogvaidya9570 3 ปีที่แล้ว +1

    काजू लागवड करताना खत कसे खड्यात वापरावे कृपया माहिती मिळावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हे खत व्यवस्थापन काजु साठी सुध्दा नक्की फायदेशीर

  • @kedargosavi2806
    @kedargosavi2806 ปีที่แล้ว +1

    मला लागवाडी पासुन माहिती द्या

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว

      पूर्वतयारी पासुन माहीती पाठवतो .
      माझा whatsapp no.88 88 78 22 53

  • @kiranjadhav2915
    @kiranjadhav2915 2 ปีที่แล้ว +1

    साहेब नमस्कार
    आंबा लागवड करताना खड्डा खतानी भरुन घेतलयावर किती दिवसानी आंबा झाड लावायचं

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : ३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *आंबा लागवड कधी करावी?*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *नमस्कार !!!*
      आंबा लागवड ही एक यशस्वी फळबाग लागवड होवू शकते ; हे बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी आपल्या अथक प्रयत्नांनी सिध्द करुन दाखवले आहे . याच्या अनेक यशोगाथा आपण सोशल मिडीया वरुन पाहील्याही असतील .
      त्यामुळे जर आपणाकडे आंबा लागवड योग्य क्षेत्र असेल व आपण यावर्षी नवीन लागवड करणार असाल तर ; आपल्या मनामध्ये ही
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      हा प्रश्न नक्की आलाच असेल.
      अशा सर्व नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा लेख नक्कीच खुप उपयुक्त आहे .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🌧️🌧️🌦️🌩️🌨️🌧️🌥️
      *पर्जन्यमान व*
      *लागवड कालावधी सहसंबंध*
      *हो!!* आंबा लागवड करताना पर्जन्यमानाचा विचार करुन लागवड कालावधी निवडावा लागतो ..
      जसे कि
      १) *अती पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी मे च्या दुसऱ्या आठवड्यात आंबा लागवड करावी .
      पाऊस पडण्यापूर्वीच झाडे लावल्यास झाड आपला आधार घट्ट करते त्यामुळे अती वृष्टीमुळे झाडाना अपाय होत नाही .व झाड व झाडाची मुळे कुजणे या समस्या येत नाहीत .
      खड्डा भरताना आधाराची काठी रोवली असल्यास अती जोराचा वारा व पावसाचा थेट होणारा आघात झाड नक्की पेलु शकते .
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      झाडे मे मध्ये लावल्यानंतर जर
      मान्सुन च्या आगमनाला उशीर झाल्यास कडक उन्हाळ्यापासुन झाडाच्या संरक्षणासाठी लेख क्रमांक २ मधील माहीती नुसार पाणी व्यवस्थापन करावे .
      २) *मध्यम पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी जूनच्या पहील्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी .पाऊस लांबला तर आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करावी .
      ३) *पर्जन्य छायेच्या प्रदेशात*
      कमी पावसाच्या प्रदेशात जुलै नंतर पाऊस कमी असला किंवा आजिबात नसला तरी वातावरण थोडे थंड असते. अशावेळी लागवड करावी .
      आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करु नये .
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *पावसाळ्यातच आंबा झाडे*
      *का लावावीत?*
      महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात पर्जन्यमान चांगल्या प्रकारचे असते.
      पावसाळ्यातील चार महिन्यांचे थंड
      वातावरण आंबा रोप रुजण्यासाठी खुप फायदेशीर असते .अशा वातावरणात रोप चांगले रुजते , झाड आपला आधार भक्कम करते व मुळांची वाढ चांगली होते . केलेल्या खत व्यवस्थापनामुळे झाड या विश्रांतीच्या काळात अन्नद्रव्यांचा अधिक साठा करुन झालेली झीज भरुन काढते व त्यामुळे पावसाळ्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते .
      *म्हणून बांधवानी पावसाळी लागवडीलाच प्राधान्य द्यावे.*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येत नाही का ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      *हो करता येते..*
      काही अपरिहार्य कारणांमुळे पावसाळ्यात लागवड करता
      नआल्यास ज्या बांधवांकडे
      पाण्याच्या सिंचनाची सोय चांगली असेल तर अशा ठिकाणी थोडी अधिक काळजी घेवून लागवड करता येते.रोप लावल्यानंतर पहीले दोन महीने आठवड्यातुन दोन वेळा प्रतीझाड ५ ते ७ लिटर पाणी द्यावे.
      मात्र अशी लागवड अपवादात्मक परिस्थितीतच करावी. पावसाळ्यात केलेली लागवड सर्वात उत्तम.
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      *(Video No.32)*
      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html
      *हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येते का ?*
      *(Video No.33)*
      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html

  • @sunilbhoir5925
    @sunilbhoir5925 2 ปีที่แล้ว +1

    1 kalmala kiti signal super phosphate dyave

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      झाड लावताना ५० ग्रॅम पुरेसे आहे

    • @sunilbhoir5925
      @sunilbhoir5925 2 ปีที่แล้ว +1

      @@rahulkhairmodevlogs2604 झाडे लावताना कोणते कोणते खत द्यावे अजून आणि किती प्रमाणात

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wmBN98gUtUE/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qffC-jvsZxQ/w-d-xo.html

  • @tusharghagare8192
    @tusharghagare8192 3 ปีที่แล้ว +1

    Pavsalyat chatni karu shakto ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      ओक्टोबर मध्ये करावी
      माझा whatsapp no 8855900300

  • @dattaharale947
    @dattaharale947 2 ปีที่แล้ว +1

    Sir zad char padhtine lavn changl ka khadde kadhun

  • @ramchandrapawar4662
    @ramchandrapawar4662 3 ปีที่แล้ว +1

    Far chain Mahiti Dilit Sar

  • @amolnarkar3345
    @amolnarkar3345 3 ปีที่แล้ว +1

    मी खड्डे मे महिन्यात मारले परंतु या वर्षी पाऊस लवकर पडला त्यामुळे खड्याला उष्णता मिळाली नाही आहे तर झाडे लावली तर चालतील का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      हो . लागवड करा .
      खड्डा कसा काढावा व कसा भरावा ?
      हा Video पहा

    • @amolnarkar3345
      @amolnarkar3345 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    कलम करताना काडी फळधारणा असलेली करावी की लहान ३-४वर्षाच्या झाडाची केली तरी चालेल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      मातृवृक्ष चांगली फलधारणा देणारा असावा .

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 ปีที่แล้ว

      ठीक आहे 👍

  • @atulthakur9060
    @atulthakur9060 3 ปีที่แล้ว

    प्लीज! मला रोप लावल्या नंतरचे पहिल्या वर्षीचे खत, छाटणी आणि कीटक नाशक नियोजन सांगावे. 🙏

  • @VishalGurav-cy5wz
    @VishalGurav-cy5wz ปีที่แล้ว +1

    झाडाचे अंतर किती असावं

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सांगितलेली खते कुठे मिळतील?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      खत सेवा केंद्रात दुकानात मिळतात

  • @Akshay-o-t5x
    @Akshay-o-t5x 2 ปีที่แล้ว +1

    ata lavu ka zade sir

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 3 ปีที่แล้ว +1

    १२ फुट # ४ फुट अतिसघन केशर आंबा लागवड प्रयोग यशस्वी करून ४ ते ५ वर्षांनंतर छाटणी नियोजन कसे करावे.
    झाडांचा आकार लहान ठेवून आंबा उत्पादन मात्र स्थिर ठेवता येईल
    या दृष्टीने मार्गदर्शन करा सर विनंती आहे 🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      सघन /अती सघन / पारंपरिक
      यापैकी कोणतीही लागवड असली तरी पहील्या ३/४ वर्षांत वर्षांतुन दोन छाटण्या केल्यास ;झाडावर फांद्यांची डेव्हलपमेंट चांगली होते . त्यामुळे लागवडीनंतर नियमित छाटणी करावी .
      ज्या झाडाना फलधारणा होते अशा झाडांची छाटणी वर्षांतुन एकदा फळे काढल्यानंतर करावी .

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 3 ปีที่แล้ว +1

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर 🙏🙏
      झाडावरील (३-४ वर्षा नंतर) फळे काढल्यानंतर छाटणी कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळाले तर छान होईल.

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 3 ปีที่แล้ว +1

      मोफत आणि अनुभव संपन्न खरीखुरी माहिती शेतकऱ्यांना द्यायला मनफार मोठं लागतं.
      की जे राहूलदादांसारख्या सद्गृहस्थांकडे आहे.
      भगवंत आपणास निरोगी आणि दीर्घ आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

    • @sumanwagh2293
      @sumanwagh2293 3 ปีที่แล้ว +1

      साहेब खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 2 ปีที่แล้ว +1

    कलम केलेला भाग जमीनीत गेला तर चालेल ना

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    नवीन लावून आलेल्या रोपट्याची पहिली छाटणी कधी करावी?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      ओक्टोबर मध्ये

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

      Thank you sir
      आपले असेच सहकार्य आम्हा वृक्षप्रेमींना लाभो हीच इच्छा 🙏🙏🙏

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    कलम सक्सेस झाल्यावर त्या रोपाची काळजी कशी घ्यायची?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      फोन करा 8855900300

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 ปีที่แล้ว

      आपण मला फोनवरून माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @inspiresstudents3484
    @inspiresstudents3484 3 ปีที่แล้ว

    मराठवड्याध्ये लावगड करताईल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      हो केशर ची मुख्य लागवड करा

  • @kiranrane2466
    @kiranrane2466 3 ปีที่แล้ว +1

    सर खडकाळ जमिनीत हापूस आंबा लागवड करताना 3×3×3 चा खड्डा मारणे शक्य नसते. मग त्यासाठी कोणती पद्धत आहे व रोप केव्हा लावणे योग्य ठरेल ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      ब्रेकर च्या साहाय्याने जांभ्याच्या कातळात 5×5×5 फुट अंतराने खड्डे काढून लागवड केली जाते .
      रोपे नियोजनाप्रमाणे जुन मध्येच लावावीत

    • @kiranrane2466
      @kiranrane2466 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही लवकरच देवगड आणि रत्नागिरी हापूस ची झाडे लावणार आहोत तर तुम्ही आम्हाला संपूर्ण झाडं व्यवस्थापन /मार्गदर्शन करू शकाल?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो दादा करणार . ते ही विनामूल्य

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏🙏🙏

    • @harshawate2412
      @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

      विनामूल्य नाही सर,ही माहिती/एक कला आहे तुमची मेहनत आहे

    • @unseenindiawithabhaysinhpa2876
      @unseenindiawithabhaysinhpa2876 3 ปีที่แล้ว

      विनामूल्य नको दादा नाममात्र किंवा एछिक मोबदला घ्यायलाच पाहिजे तुम्ही

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो दादा .. पण आपल्या बांधवासाठी करतो

  • @KG-km8st
    @KG-km8st 3 ปีที่แล้ว +1

    Negative point of lengi compost. Too much Babool trees are comes., so avoid Gote compost.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      आपण लेंडीखत खड्ड्यात खालून दुसऱ्या थरात टाकणार आहोत .त्यामुळे बाभूळ सारखी किंवा इतर झाडे उगवणे शक्य नाही .
      खड्डा याप्रमाणे भरावा .
      रोप
      (इतर सर्व खते व माती रोपाच्या बाजुने)
      माती
      शेणखत
      माती
      लेंडीखत
      माती
      पालापाचोळा
      थायमेट

    • @Kasal269
      @Kasal269 3 ปีที่แล้ว

      कष्टाचे काम आहे परंतु जर लेंड्या बडवून भुगा केला व चाळणीने चाळून त्यात कुजलेल्या गाळाची माती पाच पट टाकली तर मुळा ना कालांतराने जो शॉक बसण्याची शक्यता आहे ती राहणार नाही.

  • @shubhamkatkar1172
    @shubhamkatkar1172 3 ปีที่แล้ว +1

    सर सोनचाफा लावताना, कलम केलेला भाग जमिनीत पुरावा का ?

  • @pranavdeshmukh11
    @pranavdeshmukh11 3 ปีที่แล้ว +1

    मुळ्या मोकल्याकरून हुंडी लागण केली तर काय होईल

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ करताना काळजी घ्या

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว +1

    केशर बाटा वर हापूसची काडी लावल्यावर कलम सक्सेस होतं का? गुणधर्म तेच राहतात का?

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 2 ปีที่แล้ว

    Use hand gloves while handling Foret It is systemic poison

  • @gaganeshdudhane1541
    @gaganeshdudhane1541 5 หลายเดือนก่อน +1

    Number pathav sir

  • @shivajideshwal
    @shivajideshwal ปีที่แล้ว +1

    सर तुमचा नंबर द्या

  • @shrinivasjadhav2233
    @shrinivasjadhav2233 3 ปีที่แล้ว +1

    Camera khali dakhva, chehra nahi. Khadda dakhva.

  • @AkashJadhav-bu1uh
    @AkashJadhav-bu1uh 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर,🙏🙏🙏

  • @sureshchaugale1974
    @sureshchaugale1974 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @nageshkadam3166
    @nageshkadam3166 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती 👌👌

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती 🙏

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 3 ปีที่แล้ว

    👍

  • @rahulbhoite1321
    @rahulbhoite1321 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद सर

  • @shrikantkathale2670
    @shrikantkathale2670 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती 🙏