रंगपंढरी Face-to-Face: Mohan Joshi - Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मोहन जोशी - सिर्फ नाम ही काफी है !
    रुबाबदार व्यक्तिमत्त्व, रंगभूमीवर प्रवेश करताक्षणी प्रेक्षागृहाचा चैतन्यमय कायापालट करणारी ऊर्जा, उत्स्फूर्त आणि सहजसुंदर अभिनय, आणि कुठलीही व्यक्तिरेखा लेखकाने आपल्याला समोर ठेवूनच लिहिली असावी इतकी चपखल सादर करणं ह्या अद्वितीय कलागुणांमुळे मोहन सरांचे नाव केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वश्रेष्ठ नटांमध्ये मानाने घेतलं जातं.
    'नाथ हा माझा', 'कार्टी काळजात घुसली', 'मोरूची मावशी', 'सुखांत', 'श्री तशी सौ', 'आसू आणि हसू', 'कलम ३०२', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'गाढवाचं लग्न', 'मी रेवती देशपांडे' अशा असंख्य नाटकातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांना विलक्षण आनंद देऊन गेल्या. याखेरीज जवळजवळ ६०० मराठी आणि हिंदी चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकातूनही मोहन सरांनी गेली ५० वर्षं रसिकांचे मनोरंजन केलं आहे.
    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून मोहन सरांची १३ वर्षांची कारकीर्द त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि रंगभूमीसाठी त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची साक्ष देते. यादरम्यान त्यांनी नट तसेच रंगभूमी कामगार यांच्यासाठी राबवलेले उपक्रम आणि मुंबईतील यशवंत नाट्यगृहाचे नवनिर्माण हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागतील.
    झी गौरव सन्मान, नाट्यदर्पण पुरस्कार, फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्ड, विष्णुदास भावे सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे मिळालेलं अनेक एकाहून एक मानाचे पुरस्कार मोहन सरांच्या असामान्य अभिनयगुणांची, आणि समीक्षक व प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती आहेत.
    आजच्या भागात मोहन सर सांगताहेत त्यांच्या अभिनयप्रक्रियेविषयी.

ความคิดเห็น • 73

  • @rajashrijakhalekar762
    @rajashrijakhalekar762 4 ปีที่แล้ว +5

    @ Ranga Pandhari अतिशय स्तुत्य उपक्रम... मनापासून आभार! 🙏
    सर्वच मुलाखतींनमधून शिकण्यासारखे खूप आहे... 👌🏻
    प्रशांत दामले यांची देखील मुलाखत घेतली जावी, ही आग्रहाची विनंती... त्यांच्या कडील नाटकानंविषयी चा खजिना उघडता आला तर पर्वणी म्हणता येईल!!

  • @sujaypotdar4659
    @sujaypotdar4659 2 ปีที่แล้ว +3

    Mohan Joshi is the iron man of acting and performance 👍

  • @kanchanshingwekar2186
    @kanchanshingwekar2186 4 ปีที่แล้ว +3

    You are a fabulous interviewer! I love the way you make the person open up. Watched all the episodes, waiting for more!

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +12

    "मला ऐकून कोणीही काहीही शिकणार नाही", हे वाक्य यांनीच म्हणावे आणि नंतर
    'convinced' असण्याचे महत्व सांगावे हे मोहन जोशी यांनीच! छान जमलाय पहिला भाग. एडिटिंग केलेले मात्र समजले हं!

  • @sandipbhambere1422
    @sandipbhambere1422 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान कार्यक्रम ...खूप शिकायला मिळत...जर शक्य झालं तर सयाजी शिंदे ह्यांचाशी संवाद ऐकायला आवडेल किंवा
    सोनाली कुलकर्णी (मोठी ) चिन्मयी सुमित

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 ปีที่แล้ว

    श्री मोहन जोशी यांनी दिलखुलासपणे
    मुलाखत दिली.आणि मधुराणी तुम्ही ती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत
    छान खुलवली.👌👌दोघांनाही
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @nachiketmhetre
    @nachiketmhetre 4 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत...
    मोहन जोशी सर, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
    Video quality सुद्धा नंबर एक

  • @shreyas_joshi06
    @shreyas_joshi06 4 ปีที่แล้ว +1

    Ha ha.....Since days I was waiting for this ...better late than never .... Wish it starts early😀😄

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

    Nice and Natural actor. मला खुप आवडतात.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 ปีที่แล้ว +7

    या एपिसोडमध्ये मधुराणी मनाने अनुपस्थित वाटल्या. पगार मिळतो म्हणून किंवा मिळावा म्हणून काम करताना थकलेल्या कर्मचाऱ्यासारख्या!!☹️ (आजच्या भाषेत missing) ‘मी रेवती देशपांडे’ हे नाटक अप्रतिम !! त्यातला सगळ्यात अंगावर काटा आणणारा प्रसंग म्हणजे - प्रोफेसरांची सून गरोदर असते. घरात ते दोघेच असतात. तिला सातवा महिना वगैरे असतो आणि डोहाळेजेवणाबद्दल किंवा असंच काहीतरी मोहन जोशी आणि ती बोलत असतात. आणि अचानक बाळ कसं हालचाल करतं ते अनुभवण्यासाठी अगदी क्षणभर ते तिच्या पोटावर हात ठेवतात. त्या एका क्षणापुरते मोहन जोशींच्या चेहऱ्यावर जे भाव (हिंस्त्र असं मला वाटले) आणतात; अंगावर सरसरून काटा आला होता. तो नाटकातला क्षण आजही विसरता येत नाही 🙏🏻 बाप माणूस

  • @neelamlute6040
    @neelamlute6040 4 ปีที่แล้ว

    great interview... khuppch chann....
    prashant damle yanchi mulakhat pahayala awadel...

  • @coherent5605
    @coherent5605 4 ปีที่แล้ว +1

    Great !!! Waiting !!

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे मुलाखत अप्रतिम झाली❤❤❤👏👏

  • @neelimakulkarni8596
    @neelimakulkarni8596 3 ปีที่แล้ว

    खुप छान कार्यक्रम. स्त्तुत्य उपक्रम.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 ปีที่แล้ว

    मस्त!
    दुसऱ्या भागाची वाट बघतोय!

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +1

    विदर्भात असल्याने नाटक फार पहायला मिळत नाही इकडे पणगाढवाचं लग्नाचा एक पीस एका z च्या इव्हेंटमध्ये बघितला होता आगदी भन्नाटच!..सिनेमातल आणि सिरियलमधल काम पण आवडलेलं.

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    हाय ओमकार

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 ปีที่แล้ว

    Waiting to see this one

  • @sanjaypendse942
    @sanjaypendse942 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत अनेक आभार - तुम्ही प्लीझ प्रत्येक मुलाखतीची तारीख देऊ शकाल? म्हणजे कुठल्या तारखेला तुम्ही हा कार्यक्रम चित्रित केला. धन्यवाद

  • @anushchouthai3294
    @anushchouthai3294 4 ปีที่แล้ว +3

    "Tumhi convince nasal tar failure hota".. apratim vakya.. fakt natak cinema nhave tar ayushya jagnyachach shikshan e Mo.Jo tumhala shatashaha pranaam _/\_

  • @anupamanaik3759
    @anupamanaik3759 4 ปีที่แล้ว

    Khup chhan person and actor

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni9737 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत 👌👌

  • @raneusha
    @raneusha 4 ปีที่แล้ว +3

    हे कसं काय? आता बंदच्या काळात श्री. जोशींच्या कडे जाऊन वगैरे मुलाखत घेतलीत का? का मुलाखत आधी घेऊन आत्ता release केलीत? Thank you!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Lockdown च्या आधी घेतलेली ही मुलाखत.

  • @shubhangeetiwari9500
    @shubhangeetiwari9500 ปีที่แล้ว

    जोशी सर
    विद्यार्थ्यांना तुमच्या कडुन शिकण्यासारख खूप आहे .

  • @nandinibhagat6470
    @nandinibhagat6470 3 ปีที่แล้ว

    Great actor..🙏

  • @mukundpatil1963
    @mukundpatil1963 4 ปีที่แล้ว

    Mst karyakram

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 ปีที่แล้ว

    छान मुलाखत 👏❤👏

  • @anupamanaik3759
    @anupamanaik3759 4 ปีที่แล้ว

    Very good actor

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 ปีที่แล้ว

    Waiting....

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 ปีที่แล้ว +3

    Waman Kendre siranchi suddha interview ghya... Ek request aahe

    • @Bhooshan_Jape
      @Bhooshan_Jape 4 ปีที่แล้ว

      NISHANT RELE ते फ़सले आहें सेक्स स्कैंडल मधे आजकल

  • @radhikajoshi7013
    @radhikajoshi7013 4 ปีที่แล้ว

    Great

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว

    मोहन जोशी सर!वा!

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 4 ปีที่แล้ว +3

    जब्बार पटेलांची मुलाखत घ्या ना.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      प्रयत्न करू! 🙏

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +5

    अरे व्वा, मागणी केली आणि ग्रँट पण झाली!

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 2 ปีที่แล้ว

    तेव्हा हवेत प्राणवायू बरोबर माणूसकी ही
    होती.

  • @sanjeevjape4436
    @sanjeevjape4436 4 ปีที่แล้ว

    Chan..farch. chan.

  • @Chinmayamehendalesir
    @Chinmayamehendalesir 4 ปีที่แล้ว

    जान्हवी पणशीकर - सिंग यांची देखील मुलाखत घ्या.

  • @asmitathakur8080
    @asmitathakur8080 4 ปีที่แล้ว +3

    Nana patekaranchi mulakhat kevha...

  • @tanujagore7947
    @tanujagore7947 4 ปีที่แล้ว +3

    Good concept and lovely interviews. I like this series. However an observation- on a lot of occasions Madhurani's laughter sounds completely out of place when talking to the guests. There is nothing humorous being discussed yet she tends to laugh, probably not conciously and the guests are familiar and used to her way of conversing. For us though , it is completely out of place and misfit.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      Thanks for your honest feedback, Tanuja जी.

  • @amith.6563
    @amith.6563 4 ปีที่แล้ว +1

    मोहन आगाशे यांची पण मुलाखत घ्या

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2Bax0OsryRA/w-d-xo.html

    • @amith.6563
      @amith.6563 4 ปีที่แล้ว

      @@RangPandhari धन्यवाद

    • @dhanashrigiranje3959
      @dhanashrigiranje3959 4 ปีที่แล้ว

      मोहन आगाशेंची मुलाखत झाली आहे चेक करा

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 4 ปีที่แล้ว +2

    रंगपंढरी मध्ये अशोक सराफ आणि सचिन यांचे episode नाही ka?......

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      आपला focus नाटक हा आहे, म्हणून! Thanks anyways.

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 4 ปีที่แล้ว

    Bolaa toh bolaa!!!!😎😎😎

  • @revatihatkanagalekar6085
    @revatihatkanagalekar6085 4 ปีที่แล้ว

    😊

  • @madhuvantipethe2793
    @madhuvantipethe2793 4 ปีที่แล้ว +1

    रेवती देशपांडे च्या भूमिकेतील फोटो बघायला मिळावा, अशी उत्सुकता निर्माण झाली होती.... कां नाही टाकला....?

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      उपलब्ध नव्हता. क्षमस्व.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 4 ปีที่แล้ว +1

    प्रतिक्षा लोणकर यांच्या कडून ऐकायची इच्छा आहे...

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for your suggestion.

  • @pankajverma2856
    @pankajverma2856 4 ปีที่แล้ว

    Please add English subtitles

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      Pankaj jee, we are adding subtitles gradually to all interviews. Currently, we are halfway done. Thanks.

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 4 ปีที่แล้ว +1

    नयना आपटे यांची मुलाखत घ्यावी

    • @swatigosavi7634
      @swatigosavi7634 3 ปีที่แล้ว

      Gelya Nayanaji

    • @swatigosavi7634
      @swatigosavi7634 3 ปีที่แล้ว

      She is no more

    • @abhaykulkarni2512
      @abhaykulkarni2512 3 ปีที่แล้ว +1

      @@swatigosavi7634 are you alright..?

    • @abhaykulkarni2512
      @abhaykulkarni2512 3 ปีที่แล้ว +1

      @@swatigosavi7634 नयनतारा गेल्या आहेत नयना आपटे नाहीत.

    • @swatigosavi7634
      @swatigosavi7634 3 ปีที่แล้ว

      @@abhaykulkarni2512 Yes.... Thanks

  • @indranilmukherjee9414
    @indranilmukherjee9414 3 ปีที่แล้ว

    Respect for Joshi Saheb.
    One the most underrated Versatile Actors of India.

  • @VirendraMadhura
    @VirendraMadhura 4 ปีที่แล้ว +2

    एकदा ऋषिकेश जोशींनासुद्धा बोलवावं

  • @shreyas_joshi06
    @shreyas_joshi06 4 ปีที่แล้ว +1

    Antraang ani gabha ek Natacha kay asto anik tyamule to manus mhanun kiti phulto , lokanchi narajgi hi uttam ritua hatalne ani lahanna tyanchay tya pada cha saman karne he mulbhut vichar prakarshana shikayle milale........abhaari

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 4 ปีที่แล้ว

    छान कार्यक्रम !

  • @sambhajilawande7379
    @sambhajilawande7379 ปีที่แล้ว

    Llll

  • @kunalanerao4804
    @kunalanerao4804 4 ปีที่แล้ว

    77

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 4 ปีที่แล้ว

    Am surprised with the choice of words....being effiminate and being eunuch have no correlation. As a responsible opinion maker as well as the producer of the show should edit and not have incorrect stuff broadcasted.

    • @rashtrabhakt7888
      @rashtrabhakt7888 4 ปีที่แล้ว +10

      This happened when he was in school and enacted an effiminate character . He was trying to make a point that kids in a school like to bully another kid with different out of the character behaviour. I do not think this should be edited. Infact such things should be brought out in the open. It sends a message both to the school authorities to curb such bullying behaviour if noticed or a message to kids who are required to face it , that one can succeed in life inspite of such bullying by ignoring such bullying. . Our society has long been trying to hush hush things like this which produce the oppsite effect of promoting or condoning such acts.