जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरपिंपरी | माता पालक मेळावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • जि. प. प्रा. शा सुरपिंपरी ता.जि.परभणी येथे भव्य माता पालक मेळावा व तिळगुळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. 🌹
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
    सुरपिंपरी ता. जि. परभणी येथे दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी माता पालक मेळावा व तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. अंजलीताई विलास बाबर ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोपाळ कोटलवार, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरपिंपरी येथील आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती येरमे, आरोग्य केंद्रातील सिस्टर तावरे मॅडम होते.
    माता पालक मेळावा तिळगुळ वाटप कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाचे नियोजन तसेच महिलांचे विविध खेळ शाळेतील शिक्षिका पल्लवी खेडकर यांनी घेतल्या.
    शाळेतील ज्येष्ठ शिक्षक यांनी स्पर्धा परीक्षा, गटनिहाय अभ्यास यावर मार्गदर्शन केले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक रवीकुमार बलखंडे विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिस्त यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अनिल तिखे यांनी प्रयत्न केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक राजू कांबळे यांनी केले.
    आभार शाळेतील शिक्षक संतोष बच्चेवार यांनी मानले..
    🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏

ความคิดเห็น •