Chhaava Movie Teaser हिट झाला, Akshaye Khanna, Vicky Kaushal आणि Rehman मुळे छावा लोकप्रिय होऊ शकेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Chhaava #VickyKahusal
    किल्ल्याच्या दरवाजावर गनिमांचा लोंढा, सगळ्यांच्या हातात तलवारी, किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करण्याची धडपड आणि अचानक या लोंढ्याला आपल्या ताकदीच्या जोरावर बाजूला ढकलून, पराक्रमाच्या आवेशात बाहेर येणारा एका योद्धा, छावा पिक्चरच्या टिझरमध्ये हे दृश्य दिसल्यावर कित्येकांनी अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. यात होणारा छत्रपती संभाजी महाराज की जय हा जयघोष असेल किंवा याच जयघोषाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र सिंहासनावर बसतानाचं दृश्य असेल, लढाईच्या वेगापासून, सिंहासनावर बसण्याच्या स्थैर्यापर्यंत छावाच्या टिझरची जोरदार चर्चा होत आहे.
    याआधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्याचे अनेक प्रयत्न झाले. काही स्टोरीलाईनमध्ये हुकले, काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये, काही प्रमोशनमध्ये, काही अभिनयामध्ये तर काही लोकांचा प्रतिसाद मिळवण्यामध्ये. पण छावा मात्र या सगळ्या पातळ्यांवर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे छावासाठी जोडली गेलेली समीकरणं. आजवर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून तो पॅन इंडिया हिट करणं कुठल्या पिक्चरला जमलं नव्हतं, मग हे छावाला कुठल्या समीकरणांमुळं जमू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 976