सांज दर्या - DNYANESHWARI VELANKAR | Relaxing sea waves |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2020
  • समुद्राकडे टक लावून बघताना, लाटांचा आवाज स्वाभाविकपणे कानी पडतो. पण लाटांचं गाणं आपल्याला ऐकू येतं का? Subscribe to Flow!
    Credits:
    Written and Recited by
    DNYANESHWARI VELANKAR: / the_curly_chaivinist
    Visuals: Neel Salekar
    एक काम कर,
    समुद्राकडे एकदा एक टक लावून बघ
    निक्षून कानोसा घे
    काही ओळखीच्या लाटा आजही किनाऱ्यावर
    तेवढ्याच त्वेषाने आदळत असतील
    समुद्राच्या आत आत कुठेतरी
    त्यांचं ठरत असेल
    आणि मग आपली सगळी शक्ती पणाला लावून
    त्या धाव घेत असतील किनाऱ्याकडे
    वाटेत काही इतर सौम्य लाटांचा
    अडथळा होत असेल त्यांना
    वाऱ्याशी थोडी बाचाबाची होत असेल
    आपली फेसाळ तोंडं घेऊन त्या करत असतील
    हा लांबच लांब प्रवास
    कधी अनेक वर्षांचा
    कधी अगदी काल परवाचा
    खूप जोश
    खूप ताकद
    खूप निग्रह
    स्वच्छ दिसेल
    त्यांच्या पारदर्शक असण्यातूनही
    त्यांच्या येण्याचा एक विशिष्ट आवाज असेल
    तू त्याला 'गाज' म्हण
    जीवाचा कान करून ऐक हा नाद
    आता त्यांच्या गाण्यातला वेदनेचा खर्ज
    त्यांच्या प्रवाहामागून तुला जाणवेल
    तू अजूनही समुद्राकडे तसाच
    एकटक पाहत रहा
    जसजसा तो खर्ज तुला
    अधिक सुस्पष्ट ऐकू येईल
    तसतसा तुझा समुद्र
    आणखीन स्थिर होत जाईल
    आणि त्याच्या पोटातली काही वादळं तरी
    आता शांत झोपी जातील
    Follow us at :
    / meet_the_flow
    Like our page at :
    / meettheflow
    Neel: / just_neel_things
    Aabha : / aabha_soumitra
  • เพลง

ความคิดเห็น • 23

  • @aakshpatil1476
    @aakshpatil1476 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar lihalays ani khup sundar prakare sadar dekhil kelays

  • @atharvakhot7801
    @atharvakhot7801 3 ปีที่แล้ว

    jabardasstttttt ✨✨✨

  • @t.mamata4935
    @t.mamata4935 3 ปีที่แล้ว

    Kamaal!

  • @akshadakhare7983
    @akshadakhare7983 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर
    खूपच गहन अगदी समुद्रासारख ..

  • @sandeshthosar1031
    @sandeshthosar1031 3 ปีที่แล้ว

    त्यांच्या येण्याच्या आवाजाला गाज म्हण...👌👌 वाह।

  • @champindra
    @champindra 4 ปีที่แล้ว +3

    सुरेख ❤️ रात्री च्या वेळेत balcony बसून ऐकण्याच आनंद वेळाच होता.. संध्याकाळी तलाव शेजारी बसायचं होत पण नाही जमलं.. मग म्हंटल उशिरा ऐकायचं मुद्दाम हा बेत।.. ❤️ खुपच सुरेख

  • @parthmali6287
    @parthmali6287 3 ปีที่แล้ว

    सुंदर!

  • @jayashreeravindra3558
    @jayashreeravindra3558 4 ปีที่แล้ว +1

    व्वा!! क्या बात हैं!!

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 4 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai my dear

  • @atharvapandharpurkar1691
    @atharvapandharpurkar1691 4 ปีที่แล้ว +1

    Gajavlas ekdum 💯💯💯 Bharri

  • @ketandhas
    @ketandhas 4 ปีที่แล้ว

    Love this♥️

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 4 ปีที่แล้ว +1

    असं ऐकलं की ऊदास वाटतं

  • @saralmargiupatsombya4504
    @saralmargiupatsombya4504 4 ปีที่แล้ว +1

    This is awesome...!

  • @rajyashrikhopkar3624
    @rajyashrikhopkar3624 4 ปีที่แล้ว +1

    Very emotional words ... your presentation also makes one feel the pain and thoughts of waves

  • @explorewidri
    @explorewidri 4 ปีที่แล้ว +1

    beautifully written 😍

  • @anvisawant5042
    @anvisawant5042 4 ปีที่แล้ว

    खूप छान आणी विचारपूर्वक लिहिलेली आहेस ही कविता ज्ञानेश्वरी.
    भूगोलात शिकवलेल्या काही गोष्टी आठवल्यात.

  • @atharvapandharpurkar1691
    @atharvapandharpurkar1691 4 ปีที่แล้ว +1

    💜🤙

  • @mirrorcraftfilms1070
    @mirrorcraftfilms1070 4 ปีที่แล้ว

    Beautiful work :)

  • @yashwantbhavsar
    @yashwantbhavsar 3 ปีที่แล้ว +1

    02:00 जसजसा तो खर्ज तुला अधिक सुस्पष्ट ऐकू येईल,
    तसतसा तुझा समुद्र आणखीन स्थिर होत जाईल.
    आणि त्याच्या पोटातली काही वादळं तरी आता शांत झोपी जातील..!
    अप्रतिम..! 👌👌
    तो नेहमीच त्याच्या गूढ आणि अनंत स्वरूपात संमोहित करत असतो.!
    सुंदर शब्दांकन आणि सुंदर व्हिडीओ.!

  • @sajilhande8915
    @sajilhande8915 4 ปีที่แล้ว +1

    Let it FLOW . :)

  • @truptishridhar
    @truptishridhar 3 ปีที่แล้ว

    Last lines 😍😍😍

  • @rohinisant2282
    @rohinisant2282 4 ปีที่แล้ว +1

    असं वाटलं त्या लाटांकडे बघत राहावं...ऑडिओ संपल्यानंतर, त्यात सांगितलेलं प्रॅक्टिकली ते टक लावून पाहत राहावं...

  • @Anuradha-mj4yj
    @Anuradha-mj4yj 4 ปีที่แล้ว

    I don't know marathi
    But i can feel what u are trying to say