महाराष्ट्र भूमी ही आमुची...! Maharashtra Day video |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे, खूप उज्वल आहे.. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात "महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे" असं लिहिले आहे. म्हणजे 'महाराष्ट्र' हा काही फक्त एक भूभाग नव्हे, तर तो एक विचार आहे, ती एक प्रेरणा आहे.. पुढे समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, "महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे" असे लिहिले आहे, म्हणजे हा विचार सर्वदूर पोहोचवा असं त्यांनी सांगितलं.
    या महाराष्ट्राने महान संत, कर्तृत्ववान राजे आणि शूर योद्धे दिले. या महाराष्ट्राने थोर समाज सुधारक, त्यागशील स्वातंत्र्यसैनिक आणि चतुर राजकारणी दिले. या महाराष्ट्राने ज्ञानी शिक्षक, धाडसी पत्रकार आणि अभ्यासू शास्त्रज्ञ दिले. या महाराष्ट्राने उत्तम कलाकार, विक्रमी खेळाडू आणि थोर विचारवंत साहित्यिक दिले. असा हा सर्वांगाने श्रीमंत असा महाराष्ट्र....
    Credits: Song by Aarya Ambekar. A big shout-out to ‪@AaryaSAOfficial‬ for creating Amazing content through her music and also for proudly creating/re-creating content which is centred around our culture and patriotism.

ความคิดเห็น •