अत्यंत भावस्पर्शी गीत,निकुंभ ह्यांचे सुंदर काव्य,कमलाकर भागवत ह्यांचे नेहेमीप्रमाणे अप्रतिम संगीत व कळस म्हणजे सुमन कल्याणपूर ह्यांचा भावपूर्ण हृदय स्पर्शी आवाज.केवळ सुमनताई च ह्या अत्यंत कमी वाद्य असलेल्या अशा गाण्यांना न्याय देऊ शकतात.ह्या त्रिकुटाला त्रिवार वंदन.सुमनताई भागवतजींच्या अत्यंत आवडत्या गायिका.अनेक भक्ती आणि भावगीते जी सदा स्मरणीय आहे ह्या जोडीने आपल्याला दिली
गीतकार : कवी कृ. ब. निकुम्ब संगीतकार : कमलाकर भागवत गायिका : सुमन कल्याणपूर .. ही कविता आम्हाला पाठयपुस्तकात अभ्यासाला होती. नंतर ती आकाशवाणीवरूनही ऐकायला यायची .. खूप जुन्या आठवणीत घेऊन जाते ही शब्दरचना आणि त्याची चाल सुद्धा..! अतिशय हळुवार .. संयमित वाद्यमेळ ... आणि सुमनबाईंचा गोड स्वर... लतादीदींशी या आवाजाची तुलना करण्याचा मोह कितीतरी लोकांना होतोच होतो. पण त्या देवी सरस्वती आहेत ..आणि सुमनबाईंचा आवाज आपल्या जसा की आपल्या आईचा आवाज ..की जी आपलं लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत सगळं करते .. आणि रात्री नीज येत नसेल तर हळुवार थोपटत आपल्यासाठी अंगाई सुद्धा गाते .. अशा वेळी ती लता मंगेशकर असावीच लागते असं काही नसतं .. बस्स ती त्या क्षणी आपल्या लेकरासाठीची आई असते आणि तोच फील सुमनबाईंच्या आवाजात असतो.. !
व पु काळे यांचं एक वाक्य आहे ,बाई कितीही मोठी झाली ,लग्नाला कितीही वर्षा झाली तरी माहेरचं नाव काढलं कि बाईचं मन कातरतं सुमन कल्याणपूर यांनी या गाण्यात आपला जीव ओतला आहे
Rushi Golande kharai ... samajat badal zala pahije, ka maher ani Sasar ek watu naye ? maheri jitka prem apli mansa kartat Titka prem sasri Milan Kathin... kiti chhan hoil jar Sri la maheri milnari vagnuk sasrihi milali tar ??
अश्रू ढाळल्याशिवाय हे गाणे ऐकता येणार नाही. मातांबद्दल अश्रू ढाळणारी अनेक गाणी आहेत, पण हे ज्या प्रकारे विवाहित झालेल्या आणि तिच्या आईच्या कूससाठी पिनिंग केलेल्या एका प्रौढ मुलीचे व्यक्तिमत्त्व निर्माण करते -- ते खरोखरच खूप दुःखद आणि त्याच वेळी सुंदर आहे.
हे गाणं ऐकताना मन भरून येतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उत्तम शब्दरचना, अप्रतिम चाल, भावपूर्ण आणि मनाचा ठाव घेणारे गायन.. सगळं जुळून आलं की एखाद्या गाण्याची काय ताकद असते, ते हे गाणं ऐकून कळते... कवी, संगीतकार आणि गायिका, सगळ्यांना प्रणाम..
1980/1981साली दुपारी शाळेत 12 वाजता शाळेत जायची घाई असायची. रेडिओ औरंगाबाद - परभणी केंद्रावर ही गाणी चालू असायची... आजही ही गाणी ऐकली की ते दिवस आठवतात... ज्यांनी बनवली त्यांना कोटी प्रणाम 🙏🙏🙏
अगदी आत आत ...खूप खोल... पोचणारी आर्त कविता... एक प्रकारची शब्यात व्यक्त न करता न येणारी फिलिंग देते... नॉस्टॅल्जिया.. लॉस्ट गुड ओल्ड टाइम ऑफ पीस अँड त्रँक्विलिटी... असे काहीसे... अप्रतिम रचना....आणि आवाज....
मी नेहमी गाणं ऐकतांना माझ्या डोळ्यासमोर त्याच चित्र पाहतो, हे गाणं ऐकतांना सुद्धा मला माझ्या आईचं आणि पत्नीचं बालपण आणि त्यांचं माहेर आठवते,त्याचं खेळणं ,भावासोबत भांडण,आई,बाबाकडे हट्ट,हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येते,माझं मनच सासुरवाशीण होते मग माझ्या पत्नीपेक्षाही माझे डोळे भरून येतात,या गाण्यातील प्रत्येकालाच नमन
मी पाचवीत असताना मला ही कविता होती, शिक्षक खूप समरसून शिकवायचे त्यावेळचे. त्यामुळे ही कविता अजूनही पाठ आहे माझ्या. सुमनताई ni खूप छान गायली आहे, मन bhutkalat गेले, धन्यवाद सुमनताई!!!
मी पाचवीला होते तेव्हा होती ही कविता मी माझी मैत्रीण दोघी बरोबर म्हणायचो ही कविता खूप खूप छान वाटायच घाल घाल पिंगा वार्या तेव्हा कवितेचा अर्थ कळत नव्हता आता कळला आई गेली😢😢भाऊ आहे मैत्रीणी ची पण खूप खूप आठवण येते गाण्या बरोबर माहेरची पण❤🙏🙏
हे गाणं माझे खुप म्हणजे खुपच आवडीचे आहे ,माझ्या उदास व खिन्न झालेल्या मनातील दुःख हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यांतील वाहुन गेलेल्या अश्रुंमुळे खुप हलके झाले ,
माझी आई हे गाणं गायची...पहिल्या वेळी माहेरी सारखं जायला भेटत नसे...तर त्या वेळी माहेरचा पाखरू जरी दिसला तरी आनंद होतो असा म्हणत असे...माझी आई हे गाणं गाताना तिच्या माहेरच्या आठवणीने रडत असे...२ वर्षा पूर्वी माझी आई मला सोडून गेली....तिच्या आठवणीने रोज मन रडत असतं...आणि आता २ महिन्यापूर्वी बाबा ही गेले....माहेरच्या आठवणींनी डोळे नेहमीच पाणावतात😭
आमच्या मातोश्रींचे आवडते गाणे आहे. तिचे आजोळ कोंकणात दाभोळ येथे होते. तिथल्या आठवणींनी तिचे डोळे भरून येतात. आपण शहरात आल्यावर हे सर्व काही मागे ठेवून आलो आहोत
माझ्या लहानपणीची कविता आहे, मला खुप खूप आवडते. सुमनजिंचा आवाज इतका गोड आहे की अजूनही हीं कविता सतत ऐकत रहावी वाटते ऐकताना खरंच आईची, माहेरची आठवण खुप येते. जेंव्हाजेंव्हा हीं कविता ऐकते तेंव्हा डोळे भरून येतात. पूर्वीचे दिवशी आठवतात. गेले ते दिवशी राहिल्या फक्त आठवणी
माहेर हा प्रतेक मुली साठी एक हळवा कोपरा आहे!वय कितीही होऊ द्या माहेर हे माये चे घर असते.तेव्हा हे गाणं प्रत्येकी साठी खास आहे एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. सुमनताई चे खूप खुप आभार!
सुमन ताईंचे आवाजातच ही कविता लहानपणा पासून ऐकतो. त्यांचेच आवाजात जास्त मनाला स्पर्श करते. ❤️ माहेर ते माहेर, माहेरची झोपडी जरी असेल तरी तिथे गेल्यावर जे समाधान आहे ते इतर कोणत्या ही कोट्यवधी रुपयांनी बांधलेल्या महालांना नाही येणार. कारण तिथे आपली आई, बाबा, भाऊ, बहीण निःस्वार्थ माणसे असतात. ❤️
I am a Guy 50 years. My Mother passed two years ago. For some strange reason, when I listen to this song, I feel what my Mother must have felt coming to Mumbai from Karwar, her native place.... I am getting emotional.
मी इयत्ता पाचवीत असताना ही कविता आम्हाला होती. त्या वेळचे शिक्षक जीव ओतून शिकवायचे त्यामुळे ही कविता स्म्रुती पटलावर कायम कोरली गेली. आज मधूर आवाजात ऐकायला मिळाली. आठवणी ताज्या झाल्या. कविता अर्थपूर्ण आहे आजही त्यातील गोडवा तसूभरही कमी झालेला नाही.
माझी आई सुद्धा कोरोना काळात आम्हाला सोडून. या गीतातुन खुप आठवण येते.आणि टचकन डोळ्यात पाणी येतं........भावाची सुद्धा काळजी वाटते तिच्या जाण्याने......त्याच्या आठवणीतही जीव कासावीस होतो 😭😭😭
अतिशय सुंदर कविता आम्हाला होती. आज पुन्हा बालपणाची आठवण झाली. दुपारच्या सुट्टीत आम्ही सर्व विद्यार्थी ही कविता गायक. सुंदर आसं माहेरवासीनीच माहेरा विषयी असलेली अत्यंतिक ओढ कविने मांडली आहे.
खुप सुंदर कविता आहे. मराठी विषय शिकवण्या करीता शेख नवा सर होते घाल घाल पिंगा वारया ..ही कविता सुरेल आवाजात म्हणायचे, त्या वेळी फोन टी.व्ही नव्हते सरांनी म्हटलेली कवीता रस्त्याने पाट करत जावू ऊदया जशी तशी पूर्ण वर्ग म्हणाचा .आज कवितेच्या रूपात सरांना नमन.
अप्रतिम. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात असलेली माहेरची ओढ, भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. हे गाणे कधीही जुने होणार नाही, 'लाविते मी निरांजन...' हे माणिकताईंचे गाणेही असेच माहेरची आठवण करुन देणारे आहे.
आजच्या या क्षणात संपर्क होणा-या काळात सुद्धा या गीताची भावार्थता तिळभरही कमी झालेली नाहीये.... ऐकणारा असो की ऐकणारी पोटात उमाळा अन् उकळी आल्याशिवाय राहत नाही...
This poem was in Marathi text book for 7th standard studied in 1977.still remember sketch of that woman singing, sitting on side of verandah ...simple heart touching words by nikumb ji.........
सुमन ताई तुझा तो ओरिजनल आवाज हा नैसर्गिक शहाळ्याचे आल्हाददायक अम्रुत पाच। एक अपेक्षा होती तु"आईची आठवण "व बा नीज गडे नीज नीज माझ्या बाळा बाळा या दोन कविता खुप सुंदर स्वरांत गायल्या असत्या।
Can't listen to this song without shedding tears anew each time. There are many tear-jerking songs about mothers, but the way this one evokes the persona of a barely adult girl (a mere पोर) married off and pining for her mother's कूस - is oh so melancholy and, at the same time, beautiful. Kudos to all three: गीतकार : कृ.ब.निकुंब, गायिका : सुमन कल्याणपूर, संगीतकार : कमलाकर भागवत - the poet for weaving in so many memes of the childhood of yore - घरातली दुधाची गाय, तिचं “हुंगहुंगून बेजार करणारं” वासरू, त्याच परसातला पारिजात, etc. (Even if the younger, urbanized generation listening to the song may not be intimately familiar with those memes, they can appreciate the song in context.) Also the repetition of घाल-घाल to make वाऱ्याचा पिंगा come alive - the whirlwind that the young protagonist is beseeching to carry the fragrance of her सासर back to her माहेर. - the singer for her mellifluously thin voice evoking a teenager’s plaintive request. (It had to be Kalyanpur or Lata’s thin voice; Asha wouldn’t do as well here.) - and the composer for putting it all together and creating such a memorable song.
Anant Bedekar This poem was written by Krishnaji Balavant Nukumb.. mostly unknown to many Later the poem converted to Bhavgeet. He was Professor of Marathi in Belgavi.. This is his only contribution to the Marathi world but still memorable
आई , तिची माया , आपलं माहेर मनांत सतत हिरवं ठेवणारं हे गाणं. मनाला बळ देणारं , मनाला जिवंत ठेवणारं गाणं . ज्यांना माहेर नसेल त्यां नाहीं माहेर असल्याचं सुंदर सुख या आवाजाने या गाण्याने मिळालं असेल. खु......प आभार मानतो आम्ही सगळे .
किती सुंदर गाणे. आणि गायलंयही किती गोड. पिढ्या आणि समाजरचना कितीही बदलली तरी प्रत्येक मातापिता, विवाहित कन्या आणि माहेरची माणसं, या गीताची कोवळीक आणि तरलता यामुळे नेहमीच भारावून, गहिवरून जातील. हे लोकगीत आहे का? संगीतकार कोण आहेत?
एक महिना झाला आज आई ला जाऊन. ती हे गाणं गायची आणि तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगायची. त्यावेळी तिच्या चेहरयावर एक वेगळच समाधान असायचं. खूप आठवण येते तिची हे गाणं तिच्या आवाजात ऐकते तेव्हा....
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती.ह्या कवितेत माहेरची ओढ निर्माण होते.आणि डोळे सहज पाणावले जातात. सुमनताईंचा आवाजाने तर या गाण्याला अजरामर केले आहे.
स्त्री काय पण पुरुषालाही रडवेल असे हे गाणं आहे. झी मराठी वरील एका मालिकेमध्ये हे गाणं ऐकायला मिळाल. खूप थोडा ऐकायला मिळाल. मात्र जेव्हा पूर्ण गाणं ऐकलं, तेव्हा मन भरून आल. सासुराला गेलेल्या बहिणीची खूप आठवण यायला लागली. कवी कृ.ब.निकुंब यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्याची ह्या गाण्याला साथ मिळाली. कितीही वेळा ऐकल तरी पॉट भारत नाही.
Now even I cry in the memories of my mother while listening this poem. I am missing my mom my sisters my two brothers very badly even some decades of their deaths
खुप सुंदर, बालपन आठवते, 1976 साली शाळेत असताना ही बालभारती त कविता होती, आणि हया गीतेचे संगीतकार आम्हाला गायन गुरुजी होते, आम्हाला ही कविता हॉर्मोनियंम वर शिकवत होते, किती सुंदर दिवस होते ते, सुमन ताई नि त्यात गोड़वा निर्माण केला आहे गाउन, खुप वर्षा पूर्वी ही रिकॉर्ड मिळाली , casset वर गाने घेऊन नेहमी ऐकतो, धन्यवाद
ह्या कवितेचे गाणे होण्यापूर्विची प्रसव वेदना आम्ही लहानपणी स्वतः अनुभवली आहे झब्बा लेंगा आणि हातात एक बँग घेऊन कमलाकर भागवत गुरुजी यायचे वरळीच्या जांबोरी मैदानातील म्यु.शाळेत.आणि तन्मयतेने ही कविता व दुसरी कविता शिकवायचे.फार प्रेमळ गुरुजी होते.नेहमी दुसऱ्यानां मदत करायचे.दुसरी कविता शिकवली त्याचे हि सुमन स्वरात सुंदर गाणे झाले.दिपका मांडिते तुला सोनियाचे ताट घडविला सजविला चंदनाचा पाट.
आम्ही शिकतं असताना ही कविता आम्हाला होती. माझ्या आवडीची होती. आम्ही पुन्हा पुन्हा गायचो. आजही त्या आठवणी ताज्या झाल्या. स्त्रीमनाचा ठाव घेणारी संवेदनशील कविता.
@@umeshprabhu1903 नमस्कार, आपन ही worali madhle, खुप छान दिवस होते, दीपका मांडीले तुला सोनियाचे ताट हे सुद्धा माझ्या आवडीचे गीत आहे मज जवळ, उमेश sir 6 वी ला कविता होती थांब जरासा बाळ , आठवते का ? ती कविता आहे का कोना जवळ pls सांगा, भागवत sir हे गाने ही शिकवत होते, भू मातेच्या कुशीत लपला आपला कोकण देश डोंगराल अन चिकन मातिचा श्रमवंताचा देश, pls reply my wapp number9892022618 वसंत gorule
मी जेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो तेव्हा आमचे गुरुजी काकडे गुरुजी तेव्हा आम्हालाही कविता शिकवायचे जा सुवासाची कर बरसात जुन्या आठवणी ताज्या होतात खूप काही जुन्या आठवणी येतात सुंदर अशी कविता सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेली सुंदर अशी कविता मनाला भावेल खूप मोठं काव्य
आज माझ्या आईला जावून एक वर्ष झालं. हे गाणे ऐकून मन खूप भरून येत.😔😔 आईशिवाय माहेरपण नाही. सुमन कल्याणकर यांनी खूप सुंदर गायलेल आहे. ह्या भावना आई आणि मुलगीच समजू शकते.
आम्ही सर्व मुली वर्गात मिळुन याच चालीवर ही कविता म्हणायचो...अगदी पुर्णपणे पाठ झालेली जे मी अजुन नाही विसरले...आमचा वर्ग अगदी दणानुन जात असे...जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... हे माझ्या आई चे मनोगत आहे जे मी कमेंट द्वारे बोलले मला पण खुप छान वाटलं एैकुण😊🙏🏻
५० वर्षा पूर्वी काेकणात शाळेत शिकत असतांना आमच्या पाठ्य पुस्तकात ही कविता हाेती. त्याकाळी टेलीफोन, मोबाईल फोन तसेच खेड्यापाड्यात वहातुकीची साधने उपलब्ध नसल्याने कित्येक दिवस एकमेकांची खुशाली मिळत नसे. त्यामुळे अनेक महिने माहेरी जावयास न मिळालेली एक विवाहित कन्या माहेरच्या आठवणीने हे गीत गात आहे. सुमनताईंनी नेहमी प्रमाणे अप्रतिमपणे गायिलेले हे गीत ऐकताना गहिवरून येते, हृदय भरुन येते व डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत हे गाणे पुन्हा पुन्हा एेकत रहावे असे वाटते.
My sister has experience this poem many time when she got married and far away from our family in year 1964. Even same with my mom in memories of her daughter
माझी आई आणि तिच्या व त्या अगोदरच्या पिढीतल्या बायका इतकी सुखद संवेदनशीलता आणि समृद्ध भावविश्व असलेल्या असायच्या. आजकाल हा सद्गुण दुर्मिळच्...🙏
अगदी खरे बोललात साहेब
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ही कल्पनाच इतकी भावनिक आहे की ज्यांना हे सुचलं त्यांना शतशः नमन
हे गोड गाणे ऐकताना आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी नाही आले असे होणे नाही 🙏❣️आईबाबा ☺️
आई विना जीवन व्यर्थ आहे,आई तू थोर आहेस,ही कविता गुरुजी आम्हाला झाडाखाली बसवून म्हणायला सांगायचे आनंदही वाटला आणि वाईटही वाटले वाईट एवढ्यासाठी आई गेली,
अत्यंत भावस्पर्शी गीत,निकुंभ ह्यांचे सुंदर काव्य,कमलाकर भागवत ह्यांचे नेहेमीप्रमाणे अप्रतिम संगीत व कळस म्हणजे सुमन कल्याणपूर ह्यांचा भावपूर्ण हृदय स्पर्शी आवाज.केवळ सुमनताई च ह्या अत्यंत कमी वाद्य असलेल्या अशा गाण्यांना न्याय देऊ शकतात.ह्या त्रिकुटाला त्रिवार वंदन.सुमनताई भागवतजींच्या अत्यंत आवडत्या गायिका.अनेक भक्ती आणि भावगीते जी सदा स्मरणीय आहे ह्या जोडीने आपल्याला दिली
गीतकार : कवी कृ. ब. निकुम्ब
संगीतकार : कमलाकर भागवत
गायिका : सुमन कल्याणपूर ..
ही कविता आम्हाला पाठयपुस्तकात अभ्यासाला होती. नंतर ती आकाशवाणीवरूनही ऐकायला यायची .. खूप जुन्या आठवणीत घेऊन जाते ही शब्दरचना आणि त्याची चाल सुद्धा..! अतिशय हळुवार .. संयमित वाद्यमेळ ... आणि सुमनबाईंचा गोड स्वर... लतादीदींशी या आवाजाची तुलना करण्याचा मोह कितीतरी लोकांना होतोच होतो. पण त्या देवी सरस्वती आहेत ..आणि सुमनबाईंचा आवाज आपल्या जसा की आपल्या आईचा आवाज ..की जी आपलं लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत सगळं करते .. आणि रात्री नीज येत नसेल तर हळुवार थोपटत आपल्यासाठी अंगाई सुद्धा गाते .. अशा वेळी ती लता मंगेशकर असावीच लागते असं काही नसतं .. बस्स ती त्या क्षणी आपल्या लेकरासाठीची आई असते आणि तोच फील सुमनबाईंच्या आवाजात असतो.. !
सुंदर
खुप छान reply ,
फारच सुंदर मांडणी
Atishay Khare ahe. Tumhi lihile dekhil khup sundar....
@@nikhilshrotri175 थैंक्स..निखिल.
मला इयत्ता पाचवी मध्ये असताना ही कविता होती.अजूनही तोंड पाठ आहे. माझ्या नाती साठी मी अंगाई गीत म्हणून ही कविता गाते आणि ती सुद्धा छान झोपते.😊
Very nice
व पु काळे यांचं एक वाक्य आहे ,बाई कितीही मोठी झाली ,लग्नाला कितीही वर्षा झाली तरी माहेरचं नाव काढलं कि बाईचं मन कातरतं
सुमन कल्याणपूर यांनी या गाण्यात आपला जीव ओतला आहे
Rushi Golande kharai ... samajat badal zala pahije, ka maher ani Sasar ek watu naye ? maheri jitka prem apli mansa kartat Titka prem sasri Milan Kathin... kiti chhan hoil jar Sri la maheri milnari vagnuk sasrihi milali tar ??
ज्या ज्या वेळी हे गाणं ऐकते तेव्हा आतून कढ येतात आणि डोळे आपोआप पाझरू लागतात.
कमाल शब्दरचना, संगीत, आणि आवाज. 🙏🌹
Same
हो, मलाही
अश्रू ढाळल्याशिवाय हे गाणे ऐकता येणार नाही. मातांबद्दल अश्रू ढाळणारी अनेक गाणी आहेत, पण हे ज्या प्रकारे विवाहित झालेल्या आणि तिच्या आईच्या कूससाठी पिनिंग केलेल्या एका प्रौढ मुलीचे व्यक्तिमत्त्व निर्माण करते -- ते खरोखरच खूप दुःखद आणि त्याच वेळी सुंदर आहे.
हे गाणं ऐकताना मन भरून येतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उत्तम शब्दरचना, अप्रतिम चाल, भावपूर्ण आणि मनाचा ठाव घेणारे गायन..
सगळं जुळून आलं की एखाद्या गाण्याची काय ताकद असते, ते हे गाणं ऐकून कळते...
कवी, संगीतकार आणि गायिका, सगळ्यांना प्रणाम..
1980/1981साली दुपारी शाळेत 12 वाजता शाळेत जायची घाई असायची. रेडिओ औरंगाबाद - परभणी केंद्रावर ही गाणी चालू असायची... आजही ही गाणी ऐकली की ते दिवस आठवतात... ज्यांनी बनवली त्यांना कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Gr8 old days
होय, मला ही
कोणत्याही मुलीच्या वडिलांच्या, बहिणीच्या भावाच्या भावनाही या गीतातून पाझरतील इतके भावनाप्रधान शब्द आणि सुमनताईंचा गोड आवाज. चाल तर अति सुंदर.
खूपच छान गायले आहे ऐकुन मन माहेरी जाऊन पोहोचले आईची आठवण आली आणि डोळयातून पाणी
अगदी आत आत ...खूप खोल... पोचणारी आर्त कविता... एक प्रकारची शब्यात व्यक्त न करता न येणारी फिलिंग देते... नॉस्टॅल्जिया.. लॉस्ट गुड ओल्ड टाइम ऑफ पीस अँड त्रँक्विलिटी... असे काहीसे... अप्रतिम रचना....आणि आवाज....
मी नेहमी गाणं ऐकतांना माझ्या डोळ्यासमोर त्याच चित्र पाहतो, हे गाणं ऐकतांना सुद्धा मला माझ्या आईचं आणि पत्नीचं बालपण आणि त्यांचं माहेर आठवते,त्याचं खेळणं ,भावासोबत भांडण,आई,बाबाकडे हट्ट,हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येते,माझं मनच सासुरवाशीण होते मग माझ्या पत्नीपेक्षाही माझे डोळे भरून येतात,या गाण्यातील प्रत्येकालाच नमन
मी पाचवीत असताना मला ही कविता होती, शिक्षक खूप समरसून शिकवायचे त्यावेळचे. त्यामुळे ही कविता अजूनही पाठ आहे माझ्या. सुमनताई ni खूप छान गायली आहे, मन bhutkalat गेले, धन्यवाद सुमनताई!!!
आत्ताच ऐकलं हे गाणं झी मराठी च्या एक सीरिअल मध्ये.
खुपच छान आणि भावनिक गाणं आहे. लगेच शोधलं आणि आता सारखं ऐकतोय हे गाणं.
Same
Mi pan aattach serial madhe aiklay. Amchya aai la shalet astana he Kavita hoti. Aai ch special song.
अप्रतिम
अप्रतिम
सुखी आहे पोर, सांग आईच्या कानात ...
जेव्हा प्रवासाची साधने नव्हती आणि फोन ही नव्हते त्या वेळच्या भावना व्यक्त करणारे गीत..
मी पाचवीला होते तेव्हा होती ही कविता मी माझी मैत्रीण दोघी बरोबर म्हणायचो ही कविता
खूप खूप छान वाटायच घाल घाल पिंगा वार्या
तेव्हा कवितेचा अर्थ कळत नव्हता आता कळला आई गेली😢😢भाऊ आहे मैत्रीणी ची पण खूप खूप आठवण येते गाण्या बरोबर
माहेरची पण❤🙏🙏
हे गाणं माझे खुप म्हणजे खुपच आवडीचे आहे ,माझ्या उदास व खिन्न झालेल्या मनातील दुःख हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यांतील वाहुन गेलेल्या अश्रुंमुळे खुप हलके झाले ,
माझी आई हे गाणं गायची...पहिल्या वेळी माहेरी सारखं जायला भेटत नसे...तर त्या वेळी माहेरचा पाखरू जरी दिसला तरी आनंद होतो असा म्हणत असे...माझी आई हे गाणं गाताना तिच्या माहेरच्या आठवणीने रडत असे...२ वर्षा पूर्वी माझी आई मला सोडून गेली....तिच्या आठवणीने रोज मन रडत असतं...आणि आता २ महिन्यापूर्वी बाबा ही गेले....माहेरच्या आठवणींनी डोळे नेहमीच पाणावतात😭
काळजी घ्या. Sorry for lose.
🙏🌹💯
अतिशय सुंदर गीत! हे गीत ऐकताना आपलं मन जून्या काळात जाते व जून्या आठवणी ताज्या होतात.
किती गोड कविता आहे हि माझ्या आईला हि कविता खूप आवडते त्यानचा तो जुना काळ किती छान होता
आमच्या मातोश्रींचे आवडते गाणे आहे. तिचे आजोळ कोंकणात दाभोळ येथे होते. तिथल्या आठवणींनी तिचे डोळे भरून येतात. आपण शहरात आल्यावर हे सर्व काही मागे ठेवून आलो आहोत
माझ्या लहानपणीची कविता आहे, मला खुप खूप आवडते. सुमनजिंचा आवाज इतका गोड आहे की अजूनही हीं कविता सतत ऐकत रहावी वाटते ऐकताना खरंच आईची, माहेरची आठवण खुप येते. जेंव्हाजेंव्हा हीं कविता ऐकते तेंव्हा डोळे भरून येतात. पूर्वीचे दिवशी आठवतात. गेले ते दिवशी राहिल्या फक्त आठवणी
छान शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या कीती गोड आवाज आला आई ची माया जागी झाली
माहेर हा प्रतेक मुली साठी एक हळवा कोपरा आहे!वय कितीही होऊ द्या माहेर हे माये चे घर असते.तेव्हा हे गाणं प्रत्येकी साठी खास आहे एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. सुमनताई चे खूप खुप आभार!
मी पाचवीत असताना ही कविता सतत गुनगुनायचो आता भूतकाळ आठवले व डोळे भरुन आले मी आपला फार फार आभारी आहे
खुप सुंदर ...पुन्हा पुहा ऐकली तरी मन भरत नाही आई च्या आठवणीने मन व्याकुळ होते...आणि अश्रू धारा थांबता थांबत नाहीत..
संसाराचे चटके बसल्यावर मनाला शितल, गारवा देणारं , जीव थंड करणारं हे गाणं आहे .
माझ्या आईचे आवडते गाणे.
हे गाणे ती खुपदा गुणगुणत असे.
हे गाणे ऐकताना आईची आठवण आली
सुमन ताईंचे आवाजातच ही कविता लहानपणा पासून ऐकतो. त्यांचेच आवाजात जास्त मनाला स्पर्श करते. ❤️ माहेर ते माहेर, माहेरची झोपडी जरी असेल तरी तिथे गेल्यावर जे समाधान आहे ते इतर कोणत्या ही कोट्यवधी रुपयांनी बांधलेल्या महालांना नाही येणार. कारण तिथे आपली आई, बाबा, भाऊ, बहीण निःस्वार्थ माणसे असतात. ❤️
Very very true
माझ्या आईला जाऊन सतरा वर्षे पूर्ण झाली पण ,
ही कविता ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे आले आणि डोळ्यातून अश्रु
Agdi khre bolla tumhi
आईचा आवाज खूप गोड होता तिला जावून वर्ष होत आली खूप खूप भरून येते ती गाताना नेहमी रडायची
I am a Guy 50 years. My Mother passed two years ago. For some strange reason, when I listen to this song, I feel what my Mother must have felt coming to Mumbai from Karwar, her native place.... I am getting emotional.
I understand your feeling i am 50 years too my mother just passed away. I m getting emotional too
मी इयत्ता पाचवीत असताना ही कविता आम्हाला होती. त्या वेळचे शिक्षक जीव ओतून शिकवायचे त्यामुळे ही कविता स्म्रुती पटलावर कायम कोरली गेली. आज मधूर आवाजात ऐकायला मिळाली. आठवणी ताज्या झाल्या. कविता अर्थपूर्ण आहे आजही त्यातील गोडवा तसूभरही कमी झालेला नाही.
30 varsha purvi, majhi aai majhya sathi gayachi Ani aaj me majhya muli sathi gate. He gaan generation song ahe. Je pudhe asach pass hot rahil
ल
माझी आई माझ्या लेकीसाठी हे गीत गाते.. खूप छान वाटत ऐकताना. मन भरून येत. माहेरची ओढ कधीच सुटत नाही आणि आई साठी लेक कधीच परकी होत नाही. Love u aai.. ❣️
किती सुंदर गाणे आणि गायलेही किती गोड खरचं ऐकताना माहेराची आठवण आली
भावपूर्ण अंतर मनाला स्पर्श करणारे
खूप सुंदर अप्रतिम हे गाणं मला माझे बाबा बोलून दाखवायचे ही कविता ऐकल्यावर मला माझ्या लहानपण आठवलं
माझी आई सुद्धा कोरोना काळात आम्हाला सोडून. या गीतातुन खुप आठवण येते.आणि टचकन डोळ्यात पाणी येतं........भावाची सुद्धा काळजी वाटते तिच्या जाण्याने......त्याच्या आठवणीतही जीव कासावीस होतो 😭😭😭
अतिशय सुंदर कविता आम्हाला होती. आज पुन्हा बालपणाची आठवण झाली. दुपारच्या सुट्टीत आम्ही सर्व विद्यार्थी ही कविता गायक.
सुंदर आसं माहेरवासीनीच माहेरा विषयी असलेली अत्यंतिक ओढ कविने मांडली आहे.
खरंच आहे गाणं ऐकलं नि
माहेरच्या आठवणी न डोळे पाणावले
अप्रतिम गीत आणि ते सुमन ताईंनी गायल ही आहे अप्रतिम.
आईच्या आठवणीने डोळे भरून आले.🙏
खुप सुंदर कविता आहे. मराठी विषय शिकवण्या करीता शेख नवा सर होते घाल घाल पिंगा वारया ..ही कविता सुरेल आवाजात म्हणायचे, त्या वेळी फोन टी.व्ही नव्हते सरांनी म्हटलेली कवीता रस्त्याने पाट करत जावू ऊदया जशी तशी पूर्ण वर्ग म्हणाचा .आज कवितेच्या रूपात सरांना नमन.
अप्रतिम. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात असलेली माहेरची ओढ, भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. हे गाणे कधीही जुने होणार नाही,
'लाविते मी निरांजन...' हे माणिकताईंचे गाणेही असेच माहेरची आठवण करुन देणारे आहे.
आजच्या या क्षणात संपर्क होणा-या काळात सुद्धा या गीताची भावार्थता तिळभरही कमी झालेली नाहीये....
ऐकणारा असो की ऐकणारी पोटात उमाळा अन् उकळी आल्याशिवाय राहत नाही...
Agadi kharay
ही कविता आजही आजरमर आहे.... ऐकताना हृदय भरून येतं...
This poem was in Marathi text book for 7th standard studied in 1977.still remember sketch of that woman singing, sitting on side of verandah ...simple heart touching words by nikumb ji.........
या गीतावर काय लिहावे किती लिहावं कळत नाही, हात थरथर तो. डोळ्यात आसवं येतात
सुमन ताई तुझा तो ओरिजनल आवाज हा नैसर्गिक शहाळ्याचे आल्हाददायक अम्रुत पाच। एक अपेक्षा होती तु"आईची आठवण "व बा नीज गडे नीज नीज माझ्या बाळा बाळा या दोन कविता खुप सुंदर स्वरांत गायल्या असत्या।
अजरामर काव्य आहे . माऊली तुकोबाचा नामदेवाचा अभंग तसच हे काव्य ! आम्हाला हि कविता होती , किती वर्षे झाली .
Can't listen to this song without shedding tears anew each time. There are many tear-jerking songs about mothers, but the way this one evokes the persona of a barely adult girl (a mere पोर) married off and pining for her mother's कूस - is oh so melancholy and, at the same time, beautiful. Kudos to all three:
गीतकार : कृ.ब.निकुंब, गायिका : सुमन कल्याणपूर, संगीतकार : कमलाकर भागवत
- the poet for weaving in so many memes of the childhood of yore - घरातली दुधाची गाय, तिचं “हुंगहुंगून बेजार करणारं” वासरू, त्याच परसातला पारिजात, etc. (Even if the younger, urbanized generation listening to the song may not be intimately familiar with those memes, they can appreciate the song in context.) Also the repetition of घाल-घाल to make वाऱ्याचा पिंगा come alive - the whirlwind that the young protagonist is beseeching to carry the fragrance of her सासर back to her माहेर.
- the singer for her mellifluously thin voice evoking a teenager’s plaintive request. (It had to be Kalyanpur or Lata’s thin voice; Asha wouldn’t do as well here.)
- and the composer for putting it all together and creating such a memorable song.
Simply perfect 🙏🙏🙏
मी माणूस असूनही डोळ्यात पाणी आले.
@@thex867q
So true
तुम्ही लिहिले ले शब्द खूप अर्थ पूर्ण आहेत. 🙏
Anant Bedekar
This poem was written by Krishnaji Balavant Nukumb.. mostly unknown to many
Later the poem converted to Bhavgeet.
He was Professor of Marathi in Belgavi..
This is his only contribution to the Marathi world but still memorable
आभारी माहिती साठी
हे त्यांचं एकमेव योगदान नव्हतं. त्यांचे काही कविता संग्रह आणि काव्य समीक्षा पण आहे.
This poem is beyond the years
जुने ते सोने.आज माझे वय ७९वर्ष आहे.पण हि कविता मला माझ्या बालवयात घेऊन जाते.फारच लोभस काव्य आहे.आणि सुमनताईंचे स्वर तर खरंच अवर्णनीय आहेत.
किती सुंदर रचना, गाणं ऐकताना दिवस कसे मागे जातात व मन तिथे स्तब्ध होत क्षणाला.. खर तर हेच जीवन आहे पण आपण त्याला क्षण च बनवतो..
आज आई ला जाऊन 1वर्षे झालं या गाण्यातून ती परत भेटली..........हे गाणं गाताना नेहमी ती रडायची ,तिच्या आईची आठवण आली म्हणून ; आज मी रडतेय..........
Marathi music Great, parat parat aaichi athwan karun dete.aaisathi shradhanjali.
आईच्या आठवणीने जो व्याकुळतो..त्याचं माणुसपण,त्याची संवेदनशीलता अस्सल...!
अगदी बरोबर आहे.... खरं आहे...
आई , तिची माया , आपलं माहेर मनांत सतत हिरवं ठेवणारं हे गाणं. मनाला बळ देणारं , मनाला जिवंत ठेवणारं गाणं . ज्यांना माहेर नसेल त्यां नाहीं माहेर असल्याचं सुंदर सुख या आवाजाने या गाण्याने मिळालं असेल. खु......प आभार मानतो आम्ही सगळे .
आग ताई तु रडु नकोस असे मी म्हणणार नाही.मी वयाच्या एक्कातरव्या वर्षी सुध्दा आईसाठी रडतो ग.
किती सुंदर गाणे. आणि गायलंयही किती गोड. पिढ्या आणि समाजरचना कितीही बदलली तरी प्रत्येक मातापिता, विवाहित कन्या आणि माहेरची माणसं, या गीताची कोवळीक आणि तरलता यामुळे नेहमीच भारावून, गहिवरून जातील.
हे लोकगीत आहे का? संगीतकार कोण आहेत?
Kamalkar bhagwat he sangitakar ahet hya ganyache.
Very very good
कृ. ब. निकुंब हे कवी आहेत
हे लोकगीत नाही
खरचं खूप छान
संगीतकार : कमलाकर भागवत
अतिशय सुंदर गीत .आजच्या काळात परत प्रकाशात आल.
ajramar Gane.
इतकी सुंदर कविता मन भारावून जाते.मराठी येत असुन इंग्रजी भाषेत लिहिणारे जरा जास्तच हुशार वाटतात.
Majha aaji cha hai aawadta gana hota tila jaun aaj 22 varsha jhali aaj hai gana aaikla ke tichi khup aathvan yete kharach he gane aamar aahet 🙏🏻🙏🏻
खूप छान कविता आहे !शाळेत शिकलो!पण आता ऐकून डोळे भरून येतात! आई ती आईच असते! हे या कवितेतून छान साॅगातले आहे! अभिनंदन !
नवविवाहितेला माहेरीची आठवण या मधुन सांगण्यात आलेले आहे. खूपछाप👌
एक महिना झाला आज आई ला जाऊन. ती हे गाणं गायची आणि तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगायची. त्यावेळी तिच्या चेहरयावर एक वेगळच समाधान असायचं. खूप आठवण येते तिची हे गाणं तिच्या आवाजात ऐकते तेव्हा....
आम्हाला इयत्ता सातवीच्या पुस्तकांमध्ये ही कविता होती. हि कविता ऐकून बालपणाची आठवण झाली. ही कविता लिहिणाऱ्या कवीस कोटी कोटी धन्यवाद.
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती.ह्या कवितेत माहेरची ओढ निर्माण होते.आणि डोळे सहज पाणावले जातात. सुमनताईंचा आवाजाने तर या गाण्याला अजरामर केले आहे.
मोजक्याच वाद्य संगीतात गाणं खरच अप्रतिम
हे गाणं ऐकताना अचानक आईकडे लक्ष गेलं आणि तिच्या आईबद्दलच्या भावना आपसूक कळल्या आणि खरंच डोळे भरून आले माझी आई माझ्या जवळ आहे पण तिची आई दूर गावी
My mom Sing this poem So Nicely
U can't stop your tears....
स्त्री काय पण पुरुषालाही रडवेल असे हे गाणं आहे.
झी मराठी वरील एका मालिकेमध्ये हे गाणं ऐकायला मिळाल. खूप थोडा ऐकायला मिळाल. मात्र जेव्हा पूर्ण गाणं ऐकलं, तेव्हा मन भरून आल. सासुराला गेलेल्या बहिणीची खूप आठवण यायला लागली. कवी कृ.ब.निकुंब यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्याची ह्या गाण्याला साथ मिळाली. कितीही वेळा ऐकल तरी पॉट भारत नाही.
Now even I cry in the memories of my mother while listening this poem. I am missing my mom my sisters my two brothers very badly even some decades of their deaths
फारच वाईट झाले
Mook
माझी आई स्वतः अप्रतिम हे भावगीत गायची...आई तुझी खूपच आठवण येते
खुप सुंदर, बालपन आठवते, 1976 साली शाळेत असताना ही बालभारती त कविता होती, आणि हया गीतेचे संगीतकार आम्हाला गायन गुरुजी होते, आम्हाला ही कविता हॉर्मोनियंम वर शिकवत होते, किती सुंदर दिवस होते ते, सुमन ताई नि त्यात गोड़वा निर्माण केला आहे गाउन, खुप वर्षा पूर्वी ही रिकॉर्ड मिळाली , casset वर गाने घेऊन नेहमी ऐकतो, धन्यवाद
ह्या कवितेचे गाणे होण्यापूर्विची प्रसव वेदना आम्ही लहानपणी स्वतः अनुभवली आहे झब्बा लेंगा आणि हातात एक बँग घेऊन कमलाकर भागवत गुरुजी यायचे वरळीच्या जांबोरी मैदानातील म्यु.शाळेत.आणि तन्मयतेने ही कविता व दुसरी कविता शिकवायचे.फार प्रेमळ गुरुजी होते.नेहमी दुसऱ्यानां मदत करायचे.दुसरी कविता शिकवली त्याचे हि सुमन स्वरात सुंदर गाणे झाले.दिपका मांडिते तुला सोनियाचे ताट घडविला सजविला चंदनाचा पाट.
आम्ही शिकतं असताना ही कविता आम्हाला होती. माझ्या आवडीची होती. आम्ही पुन्हा पुन्हा गायचो. आजही त्या आठवणी ताज्या झाल्या. स्त्रीमनाचा ठाव घेणारी संवेदनशील कविता.
वसंतजी आणि उमेशजी तुम्ही खूप भाग्यवान..तुम्हाला ही कविता खुद्द भागवत गुरुजी ऐकवायचे..ग्रेट..तुमचा हेवा वाटतो..
@@aabajipatil2816 धन्यवाद, त्या काळातील सर्व विद्यार्थी मित्रांना ,
@@umeshprabhu1903 नमस्कार, आपन ही worali madhle, खुप छान दिवस होते, दीपका मांडीले तुला सोनियाचे ताट हे सुद्धा माझ्या आवडीचे गीत आहे मज जवळ, उमेश sir 6 वी ला कविता होती थांब जरासा बाळ , आठवते का ? ती कविता आहे का कोना जवळ pls सांगा, भागवत sir हे गाने ही शिकवत होते, भू मातेच्या कुशीत लपला आपला कोकण देश डोंगराल अन चिकन मातिचा श्रमवंताचा देश, pls reply my wapp number9892022618 वसंत gorule
माहेरची आठवण करून स्मृती जागृत करणारेगीत,मन मातृरूपाने भरून येते,अति सुंदर👍👍
आज आईला जाऊन 15 दिवस झालेत .माझ्याही परसात पारिजातक आहे . ,🥺😭😭
1980-1981 ची माझी दहावीची बॅच...त्यावेळेस मी ही हे गाणं खुप आवडीनं ऐकायचो
ह्या कवितेने भावूक होणारी आपली कदाचित शेवटची पिढी असेल.
मी जेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो तेव्हा आमचे गुरुजी काकडे गुरुजी तेव्हा आम्हालाही कविता शिकवायचे जा सुवासाची कर बरसात जुन्या आठवणी ताज्या होतात खूप काही जुन्या आठवणी येतात सुंदर अशी कविता सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेली सुंदर अशी कविता मनाला भावेल खूप मोठं काव्य
आज माझ्या आईला जावून एक वर्ष झालं. हे गाणे ऐकून मन खूप भरून येत.😔😔 आईशिवाय माहेरपण नाही. सुमन कल्याणकर यांनी खूप सुंदर गायलेल आहे. ह्या भावना आई आणि मुलगीच समजू शकते.
खरंच अप्रतिम सुमन कल्याणपूर या गायिका आहेत तोडच नाही
शालेय जीवनातील ही कविता आजही डोळ्यात अश्रू आणते.
सुमन ताईंनी हे गाणं खूपच गोड आवाजात अप्रतिम सुंदर गायलं आहे
खूपच सुंदर ! न चुकतां डोळे भरून येतात, कितीही वेळा परत परत ऐकले तरीही.
गाण॑ ऐकताना आईचि आठवण झाली डोळे भरून आले गाणे खूप छान आहे जुन्या गान्याना तोडच नाही 👌👌👌👌👌😚😚
आम्ही सर्व मुली वर्गात मिळुन याच चालीवर ही कविता म्हणायचो...अगदी पुर्णपणे पाठ झालेली जे मी अजुन नाही विसरले...आमचा वर्ग अगदी दणानुन जात असे...जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....
हे माझ्या आई चे मनोगत आहे जे मी कमेंट द्वारे बोलले मला पण खुप छान वाटलं एैकुण😊🙏🏻
सुंदर कविता आणि सुरेल भावपूर्ण गायन.ऐकतांना दरवेळी डोळे भरून येतात.
डोळे पाण्यानी भरून आल्या शिवाय रहात नाहीत सगळ्या लहान पणीच्या आठवणि जाग्या होतात खुपच सुंदर गाण पुन्हा असे गाणे ऐकाला मिळ णार नाही
५० वर्षा पूर्वी काेकणात शाळेत शिकत असतांना आमच्या पाठ्य पुस्तकात ही कविता हाेती. त्याकाळी टेलीफोन, मोबाईल फोन तसेच खेड्यापाड्यात वहातुकीची साधने उपलब्ध नसल्याने कित्येक दिवस एकमेकांची खुशाली मिळत नसे. त्यामुळे अनेक महिने माहेरी जावयास न मिळालेली एक विवाहित कन्या माहेरच्या आठवणीने हे गीत गात आहे. सुमनताईंनी नेहमी प्रमाणे अप्रतिमपणे गायिलेले हे गीत ऐकताना गहिवरून येते, हृदय भरुन येते व डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत हे गाणे पुन्हा पुन्हा एेकत रहावे असे वाटते.
My mother expired 10 year back when I listen this song I remember my mother and father and I cry a lot
मन भरून आलं आणि डोळे पाणावले ❤
किती किती सुंदर, अवर्णनीय, डोळ्यात पाणी येतेच ,
Suman ji cha Aavaj khup Chan madur👌🙏
ही कविता ऐकून बालपण आठवत मैत्रीणी सोबत
गात होतो खूप गहिवरून आले पहिले कविता
अर्थपुर्ण होत्या
My sister has experience this poem many time when she got married and far away from our family in year 1964. Even same with my mom in memories of her daughter
beautiful & sweet song. I remembered this song in Marathi text book during my school days.
"परसात पारिजातकाचा" हे वाक्य काय चपखल गायले आहे
Mind blowing, I love this song. Thanks Suman Tai 🙏🙏
खुप सुंदर आईव माहेरच्या लोकांची आठवन आल्याशिवाय राहात नाही
माहेरची गोड आठवण या गाण्याने वेड लावते व नकळत डोळ्यांतून अश्रू अनावर होतात......😢🙏
Apratim, nostalgic beautifully sung by evergreen Suman Ji 👌🏻🎤🙏🏻
मी हे गाणं नेहेमी फक्त ऐकते.
म्हणू शकत नाही
डोळे भरूनच येतात
अगदी बरोबर आहे
माझ्या लहानपणी ही कविता होती निकुबची सुरेख संगम सुमन कल्याणपूर
खूप हृदयस्पर्शी ..डोळे भरून येतात