#kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- 🍁 गांगेश्वर महादेव मंदिर 🍁
🍁🍁🍁 आमचा गांगो 🍁🍁🍁
चारी बाजूने निसर्गाने वेढलेले रम्य ठिकाण आहे महानगाव, हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये येते,महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात महान गाव येते 🍁
चार वाड्या मिळून महान गाव तयार झालेला आहे, महान गावाला जाण्यासाठी मसुरे व कांदळगाव वरूनही रस्ता आहे, कांदळगाव च्या जवळच महान गाव आहे, 🍁
महान गावामध्ये गांगेश्वर महादेव देवाचं सुंदर मंदिर आहे, मंदिरामध्ये श्री महादेवांची पिंड आहे, मंदिराच्या आजूबाजूला खूप थंड वातावरण आहे, व गर्दी झाडे आहेत, मंदिर थोडा मानवी वस्ती पासून लांब आहे, मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोबा रोड केलेला आहे, त्या रस्त्याचे उतरण लागते कारण मंदिर खालच्या दिशेला आहे, मध्यभागी पोचल्यानंतर पाण्याचा एक मोठा ओढा लागतो, त्याच्यामुळे त्या ओढ्यावरती पूल बांधण्यात आले आहे.लोकांना सोयीस्कर रित्या येण्या जाण्यासाठी
मंदिरात, मंदिराच्या वरच्या बाजूस सुरुवात होण्याआधी वडापाव वगैरे यांची काही खाण्यासाठी दुकाने आहेत, मंदिराच्या खाली पुलावरून उतरल्यानंतर पाणी पिण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे, मंदिराच्या चारी बाजूने जवळजवळ घनदाट जंगलच आहे, मंदिराच्या समोर दोन दीपमाळ आहेत व त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन पण आहे,🍁मुख्य मंदिराच्या आधी एक छोटं मंदिर लागतं त्यामध्ये देव खुंटेश्वर देवालय आहे 🍁 आणि त्यानंतरच सुरू होतं मुख्य मंदिर, मंदिरात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, मला तर मनाला एकदम शांतता वाटली कोणतेही विचार मनात येत नाहीत आणि प्रकारे आपण मंदिरात दंग होऊन जातो 🍁
दर सोमवारी हा मंदिरात आरती केली जाते, 🍁🍁जेव्हा कांदळगावचे रामेश्वर देवांची दालप सॉरी निघते तेव्हा रामेश्वर देव आणि इतर देव श्री देव गंगेश्वर यांच्या भेटीला येतात, सर्व ग्रामस्थ वाजत गाजत भजन करत नाचत श्री देव रामेश्वर ला घेऊन श्री देव गांगेश्वराच्या भेटीला येतात हे एक प्रकारे मोठा उत्सव व जत्राच असते हे पाहण्यासाठी लाखो लोक मुंबईवरून चाकरमानी लोक वगैरे हजर राहतात.🍁🍁 श्री देव गांगेश्वराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीलाही आरती केली जाते, श्री देव गांगेश्वराच्या मंदिरात तुम्ही केव्हाही जा भेट देण्यासाठी
तुम्हाला खूपच थंड वातावरण जाणवेल, त्रिदेव गांगेश्वराच्या मंदिराचा रंगकामही डोळ्यांना आकर्षक वाटतो, मंदिराचा पूर्ण वरच्या बाजूला काम लाकडामध्ये सागाच्या लाकडामध्ये केलेला आहे, मंदिराला खाली लाद्या बसवण्यात आलेले आहेत व सिमेंटचे खांब आहेत, मंदिराच्या समोर एक छोटासा होम कुंडही आहे,🍁🍁 श्री देव गांगेश्वर महादेवाला तेथील ग्रामस्थ प्रेमाने आमचा गांगो या नावाने संबोधतात. प्रकारे प्रेमाने माझा गांगो असे आवाज मारतात.🍁🍁
#kokanchi Kanya Reshma &journey #kokan #temple # श्री देव गांगेश्वर #mahadev #malvan #sindhudrg
🙏shree Dev Gangeshwar Mahadev Mandir🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁