Tula Pahile Me unplugged by Rahul Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 865

  • @sarikapatil1986
    @sarikapatil1986 3 ปีที่แล้ว +23

    मी रोज सकाळी स्वयंपाक करताना फक्त राहुलजीना ऐकत असते.....खूप छान वाटते एक वेगळीच शांतता मिळते मनाला....

  • @adityak237
    @adityak237 4 ปีที่แล้ว +126

    सुकून या शब्दाला जर आवाज असता, तर तो तुमच्या आवाजा सारखा ऐकु आला असता•••••

  • @gauribanerjee5660
    @gauribanerjee5660 4 ปีที่แล้ว +62

    Today it's a month since my husband passed away and I was feeling very down.. But listening to you brought me out of this mood. Thank you so much

    • @nilamm6520
      @nilamm6520 4 ปีที่แล้ว +4

      More power to you!

    • @aarti6330
      @aarti6330 4 ปีที่แล้ว +6

      Sending many hugs to you sister

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 ปีที่แล้ว +9

      I am so sorry for your loss. 🙏🏼

    • @makeupsecrets
      @makeupsecrets 4 ปีที่แล้ว +9

      Hi gauri I can understand what u r going through.. even my husband passed away last year ..I would tell u to be strong and plz try to concentrate on new life ...I know it's difficult but please be positive..u can try meditation it will help
      I will pray for you
      Evey thing will be alright...

    • @divyamurthy5781
      @divyamurthy5781 4 ปีที่แล้ว +2

      Wow Rahul sir u have such a soothing splendid voice.

  • @anuradhalatkar4058
    @anuradhalatkar4058 3 ปีที่แล้ว +29

    इतके शांतवणारे सूर!! डोळे मिटून ऐकावं आणि स्वर्गसुख अनुभवावे!! खूप खूप खूप धन्यवाद राहुलजी!

  • @jeevanbhagade7775
    @jeevanbhagade7775 4 ปีที่แล้ว +45

    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुझे केस पाठीवरी मोकळे
    तुला पाहिले...
    इथे दाट छायातुनी रंग गळतात
    या वृक्षमाळेतले सावळे
    तुला पाहिले...
    तुझी पावले गे धुक्याच्या महालात
    ना वाजली, ना कधी नादली
    तुझी पावले गे धुक्याच्या महालात
    ना वाजली, ना कधी नादली
    निळागर्द भासे नभाचा किनारा
    निळागर्द भासे नभाचा किनारा
    न माझी मला अन तुला सावली
    तुला पाहिले...
    मनावेगळी लाट व्यापे मनाला
    जसा डोंगरी चंद्र हा मावळे
    मनावेगळी लाट व्यापे मनाला
    जसा डोंगरी चंद्र हा मावळे
    पुढे का उभी तू? तुझे दुःख झरते
    पुढे का उभी तू? तुझे दुःख झरते
    जसे संचिताचे ऋतु कोवळे
    तुला पाहिले...
    अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
    आकांत माझ्या उरी केवढा
    अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
    आकांत माझ्या उरी केवढा
    तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
    तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
    दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुझे केस पाठीवरी मोकळे
    तुला पाहिले...

  • @upalighosh7985
    @upalighosh7985 4 ปีที่แล้ว +55

    One does not need to understand the language, yet this wonderful rendition refreshes the mind ❤️

    • @samartha279
      @samartha279 3 ปีที่แล้ว +1

      If you don't know meaning..it means no importance of poet.. learn the language.. it will help you..

    • @amol161282
      @amol161282 3 ปีที่แล้ว

      Absolutely true Upali.... 👍

    • @abhijitbodele5485
      @abhijitbodele5485 3 ปีที่แล้ว

      Just Google poet grace. And it will add volumes to this track

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 4 ปีที่แล้ว +1

    राहूल देशपांडे सर खूप सुंदर

  • @Bhushan1402
    @Bhushan1402 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान ऐकता ऐकता यात आपण नकळत हरवून जातो। आणि आवाज पण एव्हडा सुंदर आहे राहुल सरांचा या गाण्याला पूर्ण न्याय मिळतो। दुग्धशर्करा योग म्हणावा तो हाच। हे गाणे ऐकल्यावर Internet वर ग्रेस यांच्या या कवितेचा/गाण्याचा अर्थ मिळाला तो येथे देत आहे ।
    तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुझे केस पाठीवरी मोकळे,
    पहिल्या दोन ओळीतच ग्रेस अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात मनाचा ठाव घेतात आणि पुढे काय घडेल याची ओढ लावतात. पण पुढच्या दोन ओळी ग्रेसचा व्यक्तिगत अनुभव आहे :
    इथे दाट छायांतुनी रंग गळतात
    या वृक्षमाळेतले सावळे!
    नदीकिनारी असलेल्या ग्रेसच्या वनराईतले रंग नुसते दृश्य नाहीत तर ते अंगोपांगी झरत जातात, म्हणून ग्रेस म्हणतो की घनदाट सावल्या देणाऱ्या या वृक्षांचे रंग बरसतात आणि ते तिच्या सावळ्या रंगाला आणखी गूढ करत जातात!
    तुझी पावले गे धुक्याच्या महालात
    ना वाजली ना कधी नादली,
    शब्दांनी एक गूढ आणि रम्य माहौल निर्माण करण्यात ग्रेस केवळ माहीर आहे. प्रेयसीचं चालणं इतकं अलगद आहे की या धुक्याच्या महालात तिच्या येण्याची किंवा वावरण्याची जरा सुद्धा चाहूल लागत नाही. ती त्या स्वप्नवत जगाला जरासुद्धा धक्का लावत नाही.
    निळागर्द भासे नभाचा किनारा
    न माझी मला अन तुला सावली
    आकाशाचा निळारंग हा दृष्टीविभ्रम मानला गेलाय कारण खरं तर आकाश अशी काही चीजच नाही, एक सर्वव्यापी अथांग स्पेस आहे. तरीही कवीमनाला रंगांची भूल आहेच म्हणून ग्रेस म्हणतो की 'निळागर्द भासे नभाचा किनारा'. पण या अथांगतेत देह केवळ कालबद्धतेत प्रकटलेल्या प्रतिमा आहेत, त्यामुळे अशा उत्कट अनिश्चिततेत कुणाचाच कुणाला आधार नाही. किंबहुना असा एकमेकांचा आधार शोधणं व्यर्थ आहे. ग्रेस ही स्थिती किती कमालीच्या काव्यात्मकतेनं मांडतो पाहा 'न माझी मला अन तुला सावली'!
    मनावेगळी लाट व्यापे मनाला
    जसा डोंगरी चंद्र हा मावळे,
    हे कडवं ग्रेसचा संपूर्ण व्यक्तिगत अनुभव आहे. डोंगरात मावळणारा चंद्र कमालीचा आल्हाद निर्माण करतो. चंद्र हा मनाचा कारक मानला गेलाय, म्हणजे मनाची आंदोलनं सागराच्या भरती आणि ओहोटीसारखी चंद्रकलांनी प्रभावित होतात. ग्रेसनं या मन:स्थितीचं वर्णन किती सुरेख केलंय 'मनावेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे !
    पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते?
    जसे संचिताचे ऋतू कोवळे
    ग्रेसच्या संपूर्ण साहित्यात दुःख वेगवेगळी रूपकं घेऊन येतं. सखीच्या दुःखाची जाणीव, ती समोर असल्यामुळे इतकी प्रत्यक्ष होतेय की जणू ते दुःख झरून कवीच्या मनाप्रत येतंय. पण तिचं दुःख सुद्धा इतकं हलकं आहे की तो तिच्या पूर्वजन्मीच्या संचिताचा भाग आहे, या जन्मीच्या कलहाचा नाही. त्यामुळे ते दुःख कोवळ्या पालवी सारखं आहे आणि मनस्वितेनं जगतांनाच, उत्कटतेनं भोगण्यासारखं आहे.
    अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
    आकांत माझ्या उरी केवढा,
    या ओळीत कमालीची काव्यात्मकता आहे. सखी नदीकिनारी नहाते आहे, तिचे केस पाठीवर मोकळे आहेत आणि तिच्या देहाच्या स्पंदनातून ही ओल थरारत जातेय. हा सगळा अनुभवच इतका जीवघेणा आहे की त्याचा उरात उठलेला आकांत ही जणू तिच्या सौंदर्याला दिलेली दाद आहे!
    आणि कवितेचा शेवट तर फारच बहारदार आहे. सखी अशा अवेळी नहाते आहे की चंद्र डोंगरात मावळतोय, अजून उजाडलेलं नाही त्यामुळे धुक्याचा गर्द अंमल वातावरण भारून आहे आणि अशा संदिग्ध प्रकाशात तिच्या कंकणाचा चुडा जणू तिमिरातल्या मंद ताऱ्यांप्रमाणे लखाखून जातोय!
    तमांतूनही मंद ताऱ्याप्रमाणे
    दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
    -ग्रेस

  • @omkargujar6386
    @omkargujar6386 4 ปีที่แล้ว +2

    kharach shabdach suchat nahi kay comment karu... Khup khup apratim gaylat tumhi..

  • @santoshmandalkar2149
    @santoshmandalkar2149 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सर..एक विनंती आहे कृपया गाण्याच्या सुरावटी बद्धल आणि राग किंवा गाण्यातील रागांचे मिश्रण ह्या विषयी सांगत जा म्हणजे आम्हा नवीन शिकणाऱ्याना त्या गाण्याची दृष्टी येईल 🙏

  • @manishaatambat7622
    @manishaatambat7622 4 ปีที่แล้ว +38

    सकाळी असे सुन्दर स्वर कानी पडता पडता माझा स्वयंपाक होतो... त्यामुळे अश्या तरल स्वरांवर तरंगत तो इतका पटकन होतो, शिवाय त्यावर प्रसन्नतेचे sanskar पण होतात. सुन्दर साज, सुन्दर आवाज

    • @ashwinideshpande3811
      @ashwinideshpande3811 4 ปีที่แล้ว +1

      खरंच मुडं फ्रेश होतो...

    • @suchitrapatne4048
      @suchitrapatne4048 3 ปีที่แล้ว

      मग तो फारच रुचकर होत असेल 😊

    • @savitakothule9701
      @savitakothule9701 3 ปีที่แล้ว

      Wow

  • @prajaktadhere7485
    @prajaktadhere7485 4 ปีที่แล้ว +48

    तुम्ही ह्या गाण्याचे अंतरंग खूप हळुवारपणे उलगडून रसिकां समोर ठेवले आहेत. खूप छान वाटलं.

  • @omkark2530
    @omkark2530 4 ปีที่แล้ว +2

    Sir two more song...plz...plz....plz 1)Ya Bhawnatil geet purane 2)Baglyanchi Maal phule

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni9842 ปีที่แล้ว +5

    शब्द च नाही एवढ छान गातात मनाला सुर आनंद देतात तुम्ही गात रहा आम्ही ऐकताच राहु

  • @ishwarmanwar8061
    @ishwarmanwar8061 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar Dada maz khup aavadicha song khup sundar

  • @ghanshyams6785
    @ghanshyams6785 4 ปีที่แล้ว +1

    सुमधुर राहुल दादा 👌

  • @sachinvm4814
    @sachinvm4814 4 ปีที่แล้ว +2

    सुरेशजी गातात तेव्हा वाटतं हे गाण अस गायलं पाहीजे..मग तु ते गाणं गातोस आणि वाटतं अच्छा हे अस सुध्दा गाता येतं..वेगळचं स्वरूप आणि वजन येतं गाण्याला...अप्रतिम..

  • @manojgadewarmgadewar4678
    @manojgadewarmgadewar4678 หลายเดือนก่อน +1

    वाह.. खूपच सुंदर सादरीकरण राहुल सर 👌👌👌👌👌👌💐💐💐💐

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan.... Rahile oothatalya...kya baat hai !

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 2 หลายเดือนก่อน

    श्रीधर फडके..सुरेश वाडकर..आणि..आता..राहुल देशपांडे.. कविवर्य..ग्रेस्.. यांच्या ..शब्दांना..मिळालेला.. सहजसुंदर ..आवाज..

  • @sasarwate
    @sasarwate 4 ปีที่แล้ว +2

    Atishay surekh mala touch karate tumache gane

  • @AMOL111222
    @AMOL111222 4 ปีที่แล้ว +2

    khup chaan dada

  • @gaurikv
    @gaurikv 4 ปีที่แล้ว +8

    फक्त पियानो च्या बॅकग्राऊंड वर सूर आणि शब्द जास्तच मनाला भावतात. खूप soothing वाटतंय ऐकताना

  • @swarupakulkarniofficial
    @swarupakulkarniofficial 4 ปีที่แล้ว +14

    शास्त्रीय गण्यासोबत असे गाणे राहुल सरांच्या आवाजात ऐकणे म्हणजे पर्वणीच!😊

  • @foodse494
    @foodse494 4 ปีที่แล้ว +1

    Kya baat ha sir khup khup khup sunder👌👌👌👌

  • @vishwanathrajpathak2304
    @vishwanathrajpathak2304 29 วันที่ผ่านมา +1

    राहूल तुझ्या आवाजात गेले ते दिन गेले ऐकियला आवडेल!

  • @dhamnesanket
    @dhamnesanket 4 ปีที่แล้ว +3

    ऐकता आवाज मनी उठली चमतकारीक लहर, स्पर्शली झुळूक वाऱ्याची, झालो अंतर्ध्यान मी

  • @saurabhmahajan1431
    @saurabhmahajan1431 3 ปีที่แล้ว +4

    ग्रेस, श्रीधर फडके आणि तुमचा मधाळ स्वर!! आणखी काय हवे!! अतिशय सुरेल!!

  • @gaurish2061
    @gaurish2061 4 ปีที่แล้ว +1

    Apratim jhalay dada gana...majhya ladkaya ganyan paiki ek...thank you so much for this melodious song....

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 4 ปีที่แล้ว +1

    Sundar apratim.tya tithe palikade tikde... majhiya priyeche jhopde eikaw rahul.

  • @devareajay5545
    @devareajay5545 3 ปีที่แล้ว +2

    Jav jav 50 ek vela aikla he gaan pan ajun man bharla nahi. Prattek veli aatun aawaj yeto once more. Beautiful song

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 4 ปีที่แล้ว +2

    Superb sir. Dil Khush Ho Gaya. Plz ye serij band nka karu. Amhi watch pahat asto tumchya vidio chi. Amhi sarvch tumcha program cha anand gheu shakto. very nice TKS

  • @purnanerurkar5194
    @purnanerurkar5194 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर...तरल....

  • @amithphadke
    @amithphadke 3 ปีที่แล้ว +3

    Very nicely sung Rahul ji..Poet Grace..! Composed by Shridhar Phadke ji

  • @swapdeshmukh5883
    @swapdeshmukh5883 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर... 👌 ऐकतच रहावस वाटत...

  • @sumantkulkarni2134
    @sumantkulkarni2134 4 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha song mala nehami avdata asacha vegale songs aajun aavadatil aaikayala😊

  • @rohandapraj
    @rohandapraj 4 ปีที่แล้ว +2

    मी मूळ गाणे ऐकले नाहिये, पण गाण्याची चाल खूप कठीण आहे पण म्हणुनच अतिसुंदर आहे. अतिशय तरलपणे गावे लागले आहे हे गाणे तुम्हाला...minimalistic music मुळे आणखी श्रवणीय वाटते...

  • @nikhilsonawane2634
    @nikhilsonawane2634 4 ปีที่แล้ว +57

    While listening your this song in the morning, the whole body and mind became concentrated and stunned.

    • @manasipeshave8551
      @manasipeshave8551 4 ปีที่แล้ว +2

      True, I had listened it on some stage show he had sung.. I was mesmerized.. Thank god he made this video 🥰🥰😁

    • @kavitabysavitapatil
      @kavitabysavitapatil 4 ปีที่แล้ว +1

      True

    • @samarthraut122
      @samarthraut122 4 ปีที่แล้ว

      Perfectly said

    • @virtualpianist
      @virtualpianist 4 ปีที่แล้ว +2

      Don’t Listen to the original one then you might get a cardiac arrest!

  • @moredipali22
    @moredipali22 4 ปีที่แล้ว +1

    Very nice , beautiful..mast ..👍👌

  • @Sachinjuvatkarofficial
    @Sachinjuvatkarofficial 4 ปีที่แล้ว +3

    खरंच राहुलजी.....नानासाहेब पाटेकर यांच्याकडे गणपतीत झालेली मैफल आजही आठवते....मी चित्रकार आहे. आज चित्रकाम करताना आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकतांना सारं विसरून चित्र आणि संगीत एक होऊन जातात....! खुप खुप धन्यवाद दत्त प्रभु सदैव साथ करोत.....!

  • @rubaimazumdar
    @rubaimazumdar 4 ปีที่แล้ว +15

    Such a beautiful melody! Music brings people together. Even though I can’t understand all the words but the song was so deep. Happy that I have started following your channel.

  • @bhushangurnule3231
    @bhushangurnule3231 4 ปีที่แล้ว +5

    First few lines and she was in front of me 😍 ..

  • @drrajendrakengar2873
    @drrajendrakengar2873 4 ปีที่แล้ว +5

    एका प्रतिभावंत महाकवीच्या अजरामर काव्याचे अनंतमनोहर काव्यांतर ....आणि सुरेशजींचा मधुगंधित स्वरसाज...माझे अत्यंत प्रिय गीत...तुम्ही तुमच्या स्वरसाजाने अजुन सुंदर फुलविले सर...incredible💞💞🌹🌹👍👍🙏🙏

  • @amoljogale5693
    @amoljogale5693 4 ปีที่แล้ว +2

    thank you rahul dada... kam krtana gaani enjoy krto mi..... punha ekda thanks

  • @sangeetakale8713
    @sangeetakale8713 4 ปีที่แล้ว +1

    Are yar kitida aikla ki mann bharel sanga kuni...sakali upload kela mi ajun hi aiktech aahe ..

  • @d.d.soni-potdar4833
    @d.d.soni-potdar4833 4 ปีที่แล้ว +2

    अप्रितम. बाबुजीं ,सुरेश वाडेकर,कवी ग्रेस आणि सुरेल राहुल....... खूप छान .

  • @yogeshparanjpe5891
    @yogeshparanjpe5891 4 ปีที่แล้ว +3

    Rahul Da ...Ya gaanyala Piano cover deun ...dil khush kele ahes.....khupach manvibhor gaylay.....

  • @asmitamohite4139
    @asmitamohite4139 4 ปีที่แล้ว +5

    हे गाणं मी प्रथम ऐकलं तुमच्या आवाजात तुमच्या ऑडिओ ब्लाॅगवर. ग्रेस यांची ही कविता तुमच्या आवाजात ऐकायला खूपच छान वाटते. सुरेश वाडकरांनी गायलेलं हे गाणं मी नंतर ऐकलं तरी तुमच्या आवाजात ऐकायला ते जास्त चांगलं वाटतं. मला मोकळा वेळ असेल तेव्हा शांतपणे डोळे मिटून मी तुमची गाणी ऐकते. त्यात हे तर अप्रतिम!!! थँक्यू!!!

  • @sugu811
    @sugu811 4 ปีที่แล้ว +5

    I am from Kerala ... N i know marathi little bit ... I love this unplugged version ... Thanks

  • @ashirwadkulkarni2625
    @ashirwadkulkarni2625 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम राहुल। तुझा आवाज अगदी लोण्यासारखा आहे। तू हे गाणे फार सुरेख गायले आहेस। तू महाराष्ट्राची शान आहेस। देवाची कृपा तुझ्यावर अखंड राहो।

  • @ushamulye867
    @ushamulye867 หลายเดือนก่อน +1

    श्रीधर च्या आवाजात जास्त छान वाटते

  • @ramchandrasurve8230
    @ramchandrasurve8230 3 หลายเดือนก่อน +1

    Sir 🙏
    एक नम्र विनंती आहे ,
    तु मला न पाहिले.... हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायचं आहे.

  • @rohandapraj
    @rohandapraj 4 ปีที่แล้ว +3

    आत्ताच मी सुरेश वाडकर यांचे original गाणे ऐकले... तुमच्या दोघांपैकी जास्त कोणाचे गाणे आवडले ते ठरवणे अवघड आहे... सुरेशजींचे हे गाणे भावना उलगडून दाखवतात, आणि तुमचे हेच गाणे.. कविता व शब्दांचा अर्थ उलगडून दाखवतात... दोन्ही अप्रतिम...

  • @vkulin
    @vkulin 4 ปีที่แล้ว +2

    श्रीधर फडकेंनी हे गाणं खूप मुलायम गायले आहे.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 4 ปีที่แล้ว +2

    सुरेल सुरेख 🚌💕💕💕

  • @darshangiradkar3055
    @darshangiradkar3055 4 ปีที่แล้ว +2

    Chaan

  • @pratikpatil8303
    @pratikpatil8303 4 ปีที่แล้ว +2

    Kya baat hai Rahul dada.....Shant ani sundar....

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 4 ปีที่แล้ว +2

    Ek anokhya vishwat gheun jata deshpande tumhi..kharach haluwar sunder swar..Lajawaab..

  • @sachinshembekar8767
    @sachinshembekar8767 4 ปีที่แล้ว +6

    राहुल देशपांडे, अप्रतिम साज , सुरेश जी आणि तू यामध्ये तुलना शक्य नाही. अथांग आकाशातले उत्तुंग तारे तुम्ही दोघे. त्यांचे गाणे आठवत नाही हे गाणे ऐकताना , हीच कलाकाराची खरी मनपूर्वक प्रस्तुती असे मला वाटते. खूपच छान

  • @mayurmusicoriginal1386
    @mayurmusicoriginal1386 4 ปีที่แล้ว +4

    राहुल dada ..…..... तुमचा आवाज ख़रच दैवी आहे .... मन प्रसन्न होतं. आणि किती great composition .

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ...अप्रतिम..अप्रतिम. एक तर कवी ग्रेस यांच्या कविता अलगद मनात उतरत जातात..श्रीधर फडके यांचं तितकंच हळुवार संगीत आणि सुरेश वाडकर..तुमच्या आवाजात ऐकताना तेच गीत ऐकण्याबरोबर प्रत्यक्ष समोर उतरलेलं वाटतं..

  • @rohinitangde300
    @rohinitangde300 4 ปีที่แล้ว +3

    Kya bat ..khup Sundar

  • @purnanerurkar5194
    @purnanerurkar5194 4 ปีที่แล้ว +1

    मरीज-ए-ई्श्क का क्या है......ऐकायला मिळालं तर बहार येईल..

  • @rupaligadade6722
    @rupaligadade6722 4 ปีที่แล้ว +2

    Waw khupch chhan vatale aaj morning la tumche song aikun superb good morning sir🌷

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 4 ปีที่แล้ว +4

    दादा काय आणि किती तारीफ केली तरी शब्द तोकडे पडतात.पण एक क्षण एक सुंदर चित्र समोर ऊभ राहत.अनेक धन्यवाद

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 11 หลายเดือนก่อน +1

    🌹👌🌹🙏अशी ओल जाता स्पंदनातुनी-वा!वा!How romantic!!Lovely❤👌❤👌❤👌👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌸🌸🌸

  • @asasewak
    @asasewak 4 ปีที่แล้ว +1

    जब्बरदस्त राहूलदादा 🙌👌

  • @anniketdesshmukh4777
    @anniketdesshmukh4777 4 ปีที่แล้ว +1

    न मागताच फर्माईश पूर्ण झाली....केवळ अप्रतिम!!!

  • @kishorsupekar1246
    @kishorsupekar1246 2 ปีที่แล้ว +1

    At the age 70 you wakeup my throat. Thanks Rahul.

  • @shrirangjoshi6200
    @shrirangjoshi6200 4 ปีที่แล้ว +1

    Apratim 👌 khup Warsha purwi Sridhar-Ji cha live aikla hota... toch godwa tujhya awajaat aikayla milala 👏😍

  • @truptipawade6320
    @truptipawade6320 4 ปีที่แล้ว +9

    Aananda itka jasta ahe ki shabdat vyakta karne kathin ahe, prathamach ichha purna jhali yala mahatva jasta ahe... Thank you so much sir to sing ths song for my humble request.... .. mi tumhala mail draft kela aahe trupti.pawade23 jar tumhi tyala pratiuttar dile tr khup chan vatel.

  • @ashwinideshpande3811
    @ashwinideshpande3811 4 ปีที่แล้ว +5

    फारचं अप्रतिम...या गाण्याबरोबरं "राहिले ओठातल्या ओठात या शब्दं माझे" हे पण स्पेशल ऐकवा ऐकदा..ही फरमाईश..

  • @deepadarp8143
    @deepadarp8143 4 ปีที่แล้ว +1

    शब्दातीत.शतशः धन्यवाद.

  • @unknownguy279
    @unknownguy279 3 ปีที่แล้ว +1

    वा ....राहूल जी ....मला आपल्या विषयी आदर या साठी आहे ....की आग्रह आणि आडमुठे पणा ह्यातली सीमारेषा आपण खुबीने जाणता .....हे गाणं गाताना आपण आपल्या आजोबांची शैली न वापरता ....संगीतकारांना अपेक्षित शैली वापरली .....हे फार मोठ्या कलाकारालाच जमू शकतं ....हे फारच अद्भूत आहे .....स्वतःचं ( नेहमीचं) गाणं बाजूला ठेऊन हे गायलंय तुम्ही .......आणि piano कमाल वाजवता आपण ...हे अजून एक ....!!! हे आमचं भाग्यच आहे की आम्ही तुमच्या काळात आहोत ....

  • @kvvallabhj
    @kvvallabhj 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम राहुल दादा... ! शब्दच नाहीत ! मूळ गाण्यापेक्षा सुरेख झालंय. किमान २० वेळा ऐकलंय तू अपलोड केल्यापासून. तरी परत परत ऐकावासंच वाटतं . कवी ग्रेस आणि सुरेश भट यांची अजून गाणी करावीस अशी एक फर्माईश आहे दादा.. सांज ये गोकुळी, भय इथले संपत नाही ही गीते सादर करावीस .. _/\_

    • @akashchaudhari6736
      @akashchaudhari6736 4 ปีที่แล้ว +1

      सांज ये गोकुळी ऐकायला आवडेल.. 😍

  • @satishhajare2260
    @satishhajare2260 4 ปีที่แล้ว +1

    दादा एकदा धुंद होते शब्द सारे होऊन जाऊदे ना youtube वर plzz plzz plzz plz =∞

  • @vishalparab7280
    @vishalparab7280 3 ปีที่แล้ว +1

    अखंड डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. खूप सुंदर आभारी आहोत

  • @dnyaneshwarghogare1921
    @dnyaneshwarghogare1921 4 ปีที่แล้ว +1

    वा!!

  • @vinoddere5079
    @vinoddere5079 4 ปีที่แล้ว +2

    क्या बात छान

  • @rasikagadgil4046
    @rasikagadgil4046 4 ปีที่แล้ว +12

    So soothing! My baby boy has dozed off listening to this beautiful melody sung by a maestro like you! Thnks a ton for giving us opportunity to listen to you. Three generations in our fam are your hugeee fans..my parents, me n hubby and our 2 yr-old-son. Believe me he knows you by your name!

  • @Anita-uh8pu
    @Anita-uh8pu 4 ปีที่แล้ว +1

    अगदी खरंय...... अप्रतिम चाल.....खूप छान वाटली .....खूप धन्यवाद..........

  • @sushilratkanthwar.3003
    @sushilratkanthwar.3003 4 ปีที่แล้ว +1

    Paristhiti purvrat zali tari aamchyasathi aathvdyatun ekda tari as kahi tari sadar kara plz..........dada.

  • @poorva29
    @poorva29 4 ปีที่แล้ว +3

    Superb Dada! Namaskar from Michigan!

  • @Wisdomwithdinesh
    @Wisdomwithdinesh 3 ปีที่แล้ว +4

    Rahile othatalya .. please this song deserves a separate session..

    • @akshaykakade7928
      @akshaykakade7928 3 ปีที่แล้ว

      Kharach sir please “Rahile Othatalya ....he ekda gya na....

  • @abs2486
    @abs2486 4 ปีที่แล้ว +4

    हा आनंदच वेगळा आहे, हे गाण असा वाटलं पहिल्यांदाच ऐतकतोय... खूप सूंदर आता हे सोनेरी शब्द कुठे गेलेत ते काव्य रचना हे सगळे दुर्मिळच आहे,

  • @pardikarp
    @pardikarp 4 ปีที่แล้ว +1

    Superb song. Its one of my fev song. Mhanayala tasa kathin pan apratim gana... Sunder

  • @rajaramsurve8988
    @rajaramsurve8988 ปีที่แล้ว +1

    कविवर्य श्री ग्रेस सुन्दर

  • @vivekvenkatraman9416
    @vivekvenkatraman9416 4 ปีที่แล้ว +6

    Takes me somewhere

  • @AmbarDudhane
    @AmbarDudhane 4 ปีที่แล้ว +2

    मंत्रमुग्ध

  • @warshamadan8184
    @warshamadan8184 4 ปีที่แล้ว +2

    And about Sureshji Wadkar, I personally always feel, he should had born in the generation alongwith Kishoreji, Rafiji. His voice was never used properly. Purely honey coated, sweet and lots of चैन. कुठेही घाई नाही, गडबड नाही. Well, sorry to have taken Phir time

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 4 ปีที่แล้ว +1

    rahul pratikriyela uttar dilya baddal dhanyawad.

  • @manishpradeepraoghumarepat522
    @manishpradeepraoghumarepat522 3 ปีที่แล้ว +1

    Suppppppperb dada
    Kya bat hai

  • @ganeshpingle1394
    @ganeshpingle1394 3 ปีที่แล้ว +4

    Music is the one incorporeal entrance into the higher world of knowledge which comprehends mankind but which mankind cannot comprehend.

  • @sangeetakale8713
    @sangeetakale8713 4 ปีที่แล้ว +3

    Kiti sundar

  • @jayeedalvi8083
    @jayeedalvi8083 2 หลายเดือนก่อน

    अपतिम , स्वछ शब्द , प्रथमच गाण्याचे शब्द कळले , 🙏🙏🙏 खूप सुंदर आवाज आहे आपला

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 4 ปีที่แล้ว +1

    Suprabhat Rahul sir
    Shant ani prassan sakal

  • @vishalpatil-qi8ro
    @vishalpatil-qi8ro 4 ปีที่แล้ว +3

    sir i am big fan of u. my brother tell me about u i dont know about music but i really love u voice

  • @JEEVAN.BAHIRAMKAR
    @JEEVAN.BAHIRAMKAR 4 ปีที่แล้ว +1

    He 50 te aahet jyanna suraatla S nahi maahit......love from DAPOLI

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 4 ปีที่แล้ว +2

    Apratim.❤️.khale sirancha cha pan gana purna mhana na please.

  • @ravibhoskar
    @ravibhoskar 4 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम ... तुम्ही पाहिलं "तुला" म्हंटलं तेव्हाच एकदम मन प्रसन्न झालं.... आणि शेवटचा जो फरक सांगितला तो तर फारच छान.. मी पण या लॉक डाउन मध्ये पेटी शिकतोय.. गाणं आणि कोणतंही वाद्य वाजवणं अत्यंत आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत.. खूप खूप धन्यवाद..