महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 8 หลายเดือนก่อน +50

    सरिता हा तुझा समंजस पणा ....आपल्या कडे असलेलं दुसऱ्याला खुशीने देण्याचा ....आईने दिलेला बीजमंत्र ....तुझ्या यशाचं , परिपूर्णतेच गमक आहे ....खूप सहज पणे त्यातल्या बारकाव्यासह रेसिपी सादर करतेस ....कौतुक तुझं ....👍 👌 मी ही तुझ्या काही रेसिपीज फॉलो करते ....आणि त्या खरंच टेस्टी होतात ....धन्यवाद सरिता ❤

  • @charutakhandekar3174
    @charutakhandekar3174 4 หลายเดือนก่อน +5

    सरिता तू अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळ व्यक्ती आहेस ...God Bless you!

  • @PriyaMune-d1j
    @PriyaMune-d1j 8 หลายเดือนก่อน +18

    मी नागपूर येथे राहते. आमच्याकडे पिठलं या शब्दाऐवजी बेसन हा शब्द प्रचलित आहे. मी बेसन चे हे सगळे प्रकार बनवते. तुम्ही कुठलाही पदार्थ बनविताना खूप छान पद्दतीने समजावून सांगता ते मला खूप आवडतं. ❤

  • @monaraipurkar6070
    @monaraipurkar6070 8 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही तीनही प्रकार खूप छान सांगितले फक्त आम्ही नागपूर चे लोकं शक्यतो सगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकत नाही. झुणका आणि पिठलं ह्या दोन्ही पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकत नाही आणि मिरची लसणाचे वाटण पण लावत नाही. पिठल्या मध्ये लसणाचे मिरचीचे तुकडे मात्र टाकतात. पण तुम्ही खूप छान पद्धतीनी प्रत्येक पदार्थ सांगता. हे पण छान लागत असेल. तुमच्या रेसिपीज मस्त असतात. खूप शुभेच्छा.

  • @sampadaranade3766
    @sampadaranade3766 8 หลายเดือนก่อน +6

    मी कोकणची आहे आमच्या कडे झुणका भाकरी कायम मेनू असतो असेच करतो आम्ही पण तुझा शेवटचा झुणका रेसिपी खूप आवडली मी नक्कीच करून बघेन पण साजूक तूप घालून बघ कोकणात गावी घालतो आम्ही वरुन खूप छान लागते बघ❤ महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा ❤❤

  • @vijayagaikwad744
    @vijayagaikwad744 หลายเดือนก่อน +1

    तू किती प्रामाणिक आहेस तुला परिस्थिती ची जाणीव आहे म्हणूनच तू ग्रेट आहेस

  • @anitagiri9663
    @anitagiri9663 7 หลายเดือนก่อน +18

    तुम्ही जे तुमच्या आई बद्दल सांगितलं ते ऐकुन माझ्या डोक्यात पाणी आले कारण माझी पण आई आणि वडील आता ह्या जगात नाही पण माला त्या दोघांचीही खुप आठवण येते खास करून जेव्हा मी आजारी असते तेव्हा

  • @shubhadagosavi1839
    @shubhadagosavi1839 8 หลายเดือนก่อน +21

    कोकणात आमच्या कडे कुळथाचे पिठले बनवतात बेसनाच्या पिठल्याला आमच्या कडे झुणका म्हणतात खूप छान तिन्ही प्रकार झुणका चे

  • @shailatalim2808
    @shailatalim2808 6 หลายเดือนก่อน +3

    सरिता, तू जे पिठल्याचे तिन्ही प्रकार दाखविलेस ते अप्रतिम आहेत. आम्ही ह्यास पिठलेच म्हणतो. तुझी बोलण्याची कला फार छान आहे.तू कोणत्याही व्यवसायात खूप मजल गाठू शकतेस😊.
    तूला खूप खूप आशिर्वाद!!!🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 หลายเดือนก่อน

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 หลายเดือนก่อน +2

    सरिता ताई तुमचं खूप कौतुक आहे. खूप कष्टातून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आहात.

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 8 หลายเดือนก่อน +38

    सरिता ताई तिन्ही झुणके छान वाटले. त्यात तुम्ही तुमच्या आईची आठवण करून जे सांगितले. ते खरोखरच बरोबर आहे.धन्यवाद ताई तुम्ही शेअर केल्या बद्दल.🙏👌👌👍👍❤️❤️

    • @anjubenpagare1554
      @anjubenpagare1554 3 หลายเดือนก่อน +1

      Karnatak made chich made pital banvata

  • @jagrutimhatre7032
    @jagrutimhatre7032 6 วันที่ผ่านมา

    सरिता ताई मी वसई मधून आहे. तुम्ही जी प्रथम दाखवलेली पिठलं रेसिपी बनवते मात्र त्यामध्ये आमचा भनडारी मसाला घालते तुम्ही ताकतल्या पिठल्याची रेसिपी दाखवली ती खूप आवडली. धन्यवाद.

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 8 หลายเดือนก่อน +10

    शुभ सकाळ सरिता, काल रात्रीच पहिला तुझा हा वीडियो. तुझे सर्वच (शाकाहारी) वीडियो मी आवर्जून पाहते.
    आमच्या कडे "पिठले " म्हणतात. पहिल जे केलेस ना पीठ पेरून, ते जरा पातळ करतो, म्हणजे भातावर घेता येते. जर पिठले भात खाणार असू तर. कारण पोळी भाजी सारख आमच्याकडे भाताला लावून नाही खात. भुरका मारता आला पाहिजे. हल्ली कोणी मारत नाही, पण लहानपणी गावाला जात असू, तेव्हा कुळथाचं पिठले, गरम मसाल्याची आमटी, असे भुरके मारत जेवत सगळे. भात जेवताना मस्त आमटी, सार, कढी असे पातळ पदार्थ घ्यायची पद्धत आहे. असो. जेव्हा मी स्वैपाक करायला लागले, तेव्हा पासून मी पिठले करताना एखाद दुसरे आमसूल घालते. त्यामुळे चव अधिक छान लागते.
    ताकातल पिठले करतो. पण जसे वर म्हटले तसे जरा पातळ असते. तू पदार्थ करताना पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. पदार्थ करो न करो 😂 मला वाटते तुझ्या आवाजाची जादू आहे. मोठ झाल लिखाण, तुला वाचायला वेळ ही नसेल.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      वेळ काढून एवढी सुंदर कमेंट केलीत त्यासाडठी अगदी मनापासून आभार ❤️❤️

  • @GitanjaliBaviskar-yc3ye
    @GitanjaliBaviskar-yc3ye 7 หลายเดือนก่อน +2

    सरीताताई तआकआतलं आंबट पिठलं तयार करतांना जर तेलामध्ये अर्धा टीस्पून मेथीदाणे घातले तर हिंग व मेथीदाणे यांचं combination जबरदस्त होतं.ताई तुमच्या सर्वच रेसिपीज व समजावून सांगण्याची पद्धत खुपच रसाळ

  • @alkachoudhari3440
    @alkachoudhari3440 8 หลายเดือนก่อน +4

    सरिता, तुला सुध्दा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!तू लहानपणीचा जो किस्सा सांगितला तो ऐकून खरं तर खुप कौतुक वाटलं तुझं.चांगले दिवस आले की लोक विसरतात पण तू ती आठवण जपून ठेवली आहेस.आईने तुझ्या वर केलेले संस्कार तू पुढच्या पिढीकडे सुपूर्द करशील यांत तीळमात्र शंका नाही.❤

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 25 วันที่ผ่านมา +1

    सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गजानन महाराजांना आम्ही दरवर्षी पिठले भाकरीचा नैवेद्य करतो, आषाढ महिन्यात कांदा चालतो त्यावेळी पाऊस व्यवस्थित आणि योग्य वेळी पडावा म्हणून आपल्या घरी श्री महाराजांना पिठले भाकरी चा नैवेद्य करतो, सर्व मैत्रिणी मदत करत असतात, संध्याकाळपर्यंत सर्वांना व्यवस्थित प्रसाद मिळतो, तुम्ही संभाजीनगरला आल्या की अवश्य या, श्री महाराजांचा प्रगट दिन पण आपल्या घरी असतो, जय गजानन श्री गजानन

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 8 หลายเดือนก่อน +42

    आईची आठवण आणि शिकवण 👌👍❤

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 25 วันที่ผ่านมา

    तुमच्या रेसिपी खूप चांगल्या, आरोग्यासाठी आवश्यक, आणि बजेटमध्ये बसणाऱ्या अस्तात, तुमच्या बोलण्यातून नम्र भाव आणि सुसंस्कार शीलता प्रगट होते, खूप खूप धन्यवाद

  • @vidyasawadkar7279
    @vidyasawadkar7279 8 หลายเดือนก่อน +6

    खूप छान पिठल्याचे प्रकार, सरिता. तुला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 8 หลายเดือนก่อน +1

    मी वसई येथुन पाहते आहे आम्ही पहिल्या दोन प्रकारांना पिकली म्हणतो आणि शेवटचा झूणकाच म्हणतो माझ्या सासूबाई झुणका खुप छान बनवायच्या आठवणी ना उजाळा मिळाला धन्यवाद

  • @namrataprabhu1865
    @namrataprabhu1865 8 หลายเดือนก่อน +5

    फारच सुंदर तीन प्रकारचे बेसन पिठलं, झुणका दाखवून, मन प्रसन्न झाले. तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे. विशेष गोष्ट सांगावे वाटते ती म्हणजे तुम्ही सांगितले ले लसलुसीत दहिवडे करून बघितले. फार छान झाले. मैत्रिणींना खावू घातले. धन्यवाद ताई❤❤ तुमची आठवण नि दिसणे नि बोलणे खुप सुंदर. पदार्थ करावेसे वाटते. 👍👍🙏🙏🍧🍧

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 8 หลายเดือนก่อน +7

    आंम्ही पण पिठलं म्हणतो पातळ असत त्याला आणि कोरडं असतं त्याला झुणका म्हणतो मला गाठीच पिठलं आवडत आणि आहोना बिनगाठीच हिरव्या मिरचीचे चरचरीत पिठलं आवडतं आणि लेकीला मोकळा झुणका आवडतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      मग आता तीनही प्रकार करा 😛

    • @shobhasathawane8830
      @shobhasathawane8830 3 หลายเดือนก่อน

      मी भंडारा ची, नागपूर जवळ, आम्ही तिन्ही प्रकार करतो, मला ताकातलं पिठलं आवडते, डब्यासाठी झुणका करते, आमच्या कडे पिठलं नाही बेसन व झुणक्याला झुणका च म्हणतात, आईच्या आठवणी ने डोळ्यात😢 पाणी आलं ऐकून छान वाटलं, तुला खुप खुप🙌 आशिर्वाद, माझ्या पण आईच्या खुप आठवणी आहेत त्या जाग्या झाल्या😢🙌🌹

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 7 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही सांगितलेल्या पिठल्याच्या रेसिपी फारच सुंदर आहे आणि तुमचं बोलणं ही फार सुंदर आहे ग्रेट आहात ताई तुम्ही

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 8 หลายเดือนก่อน +25

    खूप छान पद्धतीने अनुभव सांगितला आईची जुनी आठवण सांगितली पण ज्या व्यक्तीला आईनं भाकरी ‌खाऊ घातली त्यांनी तुम्हाला ‌भरभरु आशिर्वाद दिला ‌म्हणून‌‌ तुम्ही आम्हाला व्हिडिओ वर दिसत आहात ‌धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

    • @Shiraj-af
      @Shiraj-af 8 หลายเดือนก่อน

      ;
      &ay​@@saritaskitchen

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 7 หลายเดือนก่อน +9

    मी नाशिक वरून तुमचा व्हिडिओ पाहते आम्ही याला पिठलं पण म्हणतो आणि सुख केलं तर झुणका म्हणतो

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 6 หลายเดือนก่อน +2

    झक्कास 3 ही झुणका बनवण्याची पध्दत 1नंबर आहे. ❤

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 8 หลายเดือนก่อน +14

    मी कराड शहरातील आहे आम्ही पिठले म्हणतो 3 ही रेसिपी करतो महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      🤗

    • @Kngsi62025
      @Kngsi62025 8 หลายเดือนก่อน +2

      कराडमध्ये आणि अजबाजूच्या गावात सुद्धा घट्ट झुणका आणि पातळ पिठलं

  • @vimalhule477
    @vimalhule477 7 หลายเดือนก่อน +1

    सरिता ताई.. किती सुंदर पद्धतीने तुम्ही या तीनही रेसिपी मांडल्या आहेत.. माझ्याकडून पिठले बऱयाचदा हवे तसे होत नाही. मी पुन्हा एकदा नक्की करून बघेन. धन्यवाद 🙏🙏 आणि तुमचे खूप खूप कौतुक. तुमच्या आईला सॅल्यूट

  • @anitakore8940
    @anitakore8940 8 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ताई मी सोलापूर ताकातल पिठलं मला माहित नव्हतं खूप छान आम्ही मेथी पिठलं करतो

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 8 หลายเดือนก่อน +2

    ताक पिठलं छान..पहिल्यांदाच समजल ताकातल पण पिठलं बनवले जाते..नक्कीच बनऊन बघेन..

  • @shitalbharatparit3740
    @shitalbharatparit3740 8 หลายเดือนก่อน +11

    मी कोल्हापूरची आहे आणि आम्ही Goa.. mdhe rahto आणि आम्ही त्याला पातळ झुणका म्हणतो...... पण बाकी तुझी recipe trr masttch😋😋😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน +1

      thank you very much

    • @AnjaliPalaspagar
      @AnjaliPalaspagar 2 หลายเดือนก่อน

      ​@@saritaskitchenबारीकसेव रेसिपी

  • @jesicaramrajkar7102
    @jesicaramrajkar7102 2 หลายเดือนก่อน +1

    Namaste and shalom from Israel.
    Born and bought up in Mumbai Maharashtra.
    Though stays away from India but I still cook Indian.
    God bless you for your lovely job.
    Jhunka bhakar is my all time favourites.❤
    But I enjoy it with pitta or tortillas.

  • @preetipomannawar3566
    @preetipomannawar3566 5 หลายเดือนก่อน +3

    Mi kolhapur chi aahe..amhi 2 prakarche pithale karto .pithale ani zunka mhnto amhii..
    Takatle pithle hi navinch paddhat samjli..❤
    Khupp khupp dhanyawad 😊

  • @ShailaChandrachud
    @ShailaChandrachud 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान व्हिडिओ. तुमच्या आई चा किस्सा ऐकून खरोखर गलबलून आले . त्यांच्या मनाच्या मोठेपणा लां प्रणाम .

    • @shobhapavaskar9497
      @shobhapavaskar9497 6 หลายเดือนก่อน

      Khup chanpithal Patel easel tar pthal suka aseltar zunaka mhanato mi Mumbai andheri. Madhun.

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 8 หลายเดือนก่อน +3

    ताई, फारच छान, रेसिपी आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🎉

  • @CelebrityBiography-zv6zy
    @CelebrityBiography-zv6zy หลายเดือนก่อน

    16:00 ठाकरे सरकार होत तेव्हा सरिता ❤ शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी 🎉🎉🎉🎉🎉

  • @ushapatil6206
    @ushapatil6206 8 หลายเดือนก่อน +11

    🙏मी सीमाभागातील बेळगाव येथे राहते.आम्ही पिठलं म्हणतो. रेसिपी नेहमीसारखी खूपच मस्त! 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @raginiporedi1843
    @raginiporedi1843 หลายเดือนก่อน

    सरिता.. मला तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात.. त्या मी करत असते ‌.खूप धन्यवाद..

  • @meenak6269
    @meenak6269 8 หลายเดือนก่อน +14

    आम्ही पिठलचं म्हनतो 👍. आमच्या कडे हिरव्या मिरचीचे पिठलं करते वेळेस कांदा घालत नाही फोडणीत थोडी मेथीची भाजी पण घाला खूप छान लागते 👌🏻
    पिठल्याचे प्रकार छान 👍😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน +2

      आम्ही पण कांदा नाही घालत फक्त lasu मिरची ठेचा :)

    • @saraladongare7488
      @saraladongare7488 7 หลายเดือนก่อน

      Khup chan nivedan 19:01

    • @shalinipatil8203
      @shalinipatil8203 4 หลายเดือนก่อน

      शेपू पालक टाकला तरी छान चव येते.मी मेथीची भाजी टाकून पण पिठलं करते.

  • @ArutaGawand
    @ArutaGawand หลายเดือนก่อน

    सरीता
    खूप छान पिठले रेसिपी
    आमचेकडे चणाडाळ भिजवून वाटून करतो त्याला झुणका म्हणतात
    तुझ्या आईच्या आठवणीने डोळे पाणावले तूला खूप शुभेच्छा

  • @nehanivendkar4806
    @nehanivendkar4806 8 หลายเดือนก่อน +4

    जय भवानी जय शिवाजी महाराज की जय. ....महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ..

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 8 หลายเดือนก่อน +1

    छानच प्रकार पिठल्याचे. आम्ही तीनही प्रकार करतो.
    झुणका हा प्रवासातही नेऊ शकतो. तो २ दिवस सहज टिकतो.
    प्रत्येक पिठल्याची वेगवेगळि खमंग चव आणि स्वाद मनात दरवळला.
    आईची आठवण खऊपच छान!❤

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev 8 หลายเดือนก่อน +3

    मी भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी गावं आहे पण मी कोल्हापूर येथे राहते आमच्या कडे झुणका म्हणतात my favourite झुणका 😋😋

  • @anuyakulkarni3479
    @anuyakulkarni3479 8 หลายเดือนก่อน +2

    सरिता तुझ्या पाककृती सुंदरच असतात. आजच्याही मस्तच आहेत.. मी मात्र थोडासा बदल केला य . बऱ्याच घरांमधे माझ्या सारख्या जेष्ठांना डाळीचे पीठ तर पचत नाही, पण पिठले तर खायचे असते. तर अशा वेळी निम्मे डाळीचे व निम्मे ज्वारीचे पीठ मिसळून पिठले करावे. मस्तच होते. . हलके होते. व चवीमधे किंचितही फरक नसतो . 🙏

    • @urmilapawar5306
      @urmilapawar5306 8 หลายเดือนก่อน

      Tumachi payday aamachya sarakhich Aahe MI Wardha chi Athens urmila pawar

  • @rasikahaate
    @rasikahaate 8 หลายเดือนก่อน +6

    मी मुंबईची आहे. पिथल्याचे तिन्ही प्रकार खूप छान आहेत. आमच्या कडे पहिल्या दोन प्रकार त्यांना पिठले म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे त्याला झुणका म्हणतात. माझी आई सुध्दा पीठ टाकताना पीठ वैरते असच म्हणते.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      🤗

    • @jyotimashalkar1181
      @jyotimashalkar1181 8 หลายเดือนก่อน

      ​@@saritaskitchendharashiv amchykade pitlach mahantat

    • @jyotimashalkar1181
      @jyotimashalkar1181 8 หลายเดือนก่อน

      पिथल्याचे तिन्ही प्रकार खुप छान

  • @purnimajawalkar8899
    @purnimajawalkar8899 2 หลายเดือนก่อน

    सरिता खूपच छान खुप खुप शुभेच्छा तुझा पुढचा सर्व प्रवास छान chalawa हि ईश्वरचरणी प्रार्थना 👍🙏

  • @shakuntalarandive5050
    @shakuntalarandive5050 8 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र दीनाच्या खूप खूप शुभेछा माज्या कड़े गुठ ल्या चे पिठले व कोरडे पिठले केले जाते मी मुंबई हन बघत होते धन्यवाद ताई❤❤❤❤

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान तिन्ही प्रकारच्या पिठलं आणि झुणका आम्ही करतोच फक्त एक आहे आमची कोकणी पद्धत त्यांच्यामध्ये आम्ही कोकम वापरून करतो कोकम एक फळ आहे ते आंबट असते त्यामधील गर काढून कोकम उन्हात वाळवून त्याला जो गर काढून ठेवतात त्याचा रस लावावा लागतो असं हे सात वेळा कडक उन्हात वाळवून प्रत्येक वेळी रस लावावा लागतो.तर अशी बनवायला थोडा वेळ लागतो पण या उन्हाळ्यातच ती फळ ( कोकम ) येतात ती वर्षभर चांगली टिकतात . त्यातील दोन तीन तुकडे घालून खूप सुंदर चव पिठलं किंवा झुणक्याला येते . अजून एक प्रकार आहे तो म्हणजे चणाडाळ भिजवून जाडसर वाटून त्याचा झुणका खूप सुंदर लागतो अगदी मोकळा होतो तो सुद्धा वाफवून करावा लागतो.त्यात कोकम वापरून करुन बघा चव फार छान लागते.( त्यात थोडं आलं पण वापरायचं बाकी सर्व साहित्य तेच )

  • @jagrutishirsat6702
    @jagrutishirsat6702 7 หลายเดือนก่อน +3

    Madum good very good recypi I like it god bleese you

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 25 วันที่ผ่านมา

    संभाजी नगर हून, तुम्ही सांगितलेल्या आईच्या आठवणीमुळे आमचे डोळे भरून आले, आमच्या माहेरी कांदे खूप होते, परिस्थिती बेताचीच होती, एक मुलगी कांदे मागण्यासाठी आली, आईने तिला खूप कांदे दिले आणि म्हणाली अगं आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना भरपूर द्यावे, अजूनही ती सर्वांना भरपूर देते, तुम्ही सांगितलेल्या आठवणीमुळे माझी आठवण ताजी झाली,

  • @baccharacingclubich4646
    @baccharacingclubich4646 7 หลายเดือนก่อน +3

    मी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथून आमच्याकडे याला दोन्ही ही म्हणतात पिंठल आणि झुणका

  • @hemantkavthankar
    @hemantkavthankar 2 หลายเดือนก่อน

    You are amazing lady. Very humble and grateful person.

  • @KrupaMalikKi
    @KrupaMalikKi 8 หลายเดือนก่อน +14

    आम्ही बेसन पिठलं आणि जेव्हा भाजीसाठी काही सुचत नाही आणि जेव्हा बेसन करतो त्याला श्रीखंड बोलतो❤

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 6 หลายเดือนก่อน

    सरिता तातई तुमच्या रेसिपी छान असतात त्यामागच्या ह्रद्य आठवणी खूप आवडतात.धन्यवाद.

  • @rajashrigramopadhye27
    @rajashrigramopadhye27 8 หลายเดือนก่อน +5

    👌👌 आणि तू सांगितलेली आठवणही खूप ह्दयस्पर्शी आहे 🙏🙏

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 8 หลายเดือนก่อน

    असा कोरडा झुणका तयार झाल्यावर आमच्याकडे त्यात थोडे उकळीचे पाणी सोडतात मग लगेच झुणका भरभरून फुलून येतो.मग आणखी एक वाफ देतो. झाला झुणका तयार. बाकी पिठले तुम्ही दाखवले तसेच बनवतो.विदर्भातला हा सर्वात आवडीचा पदार्थ आहे.मी विदर्भातली यवतमाळचे आहे. खूप छान सांगता तुम्ही.आवडता मला तुम्ही खूप.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      नक्की करुन बघेन

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat02 8 หลายเดือนก่อน +3

    ताई महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    मी विदर्भ मधली आहे. तुम्ही दाखविले तीनही प्रकारचे बेसन मी करते.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 8 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र दिनाच्या दिनाच्या शुभेच्छा.. छान आणि सोप्पे करून पिठला चे ३ प्रकार सांगितले...
    . धन्यवाद

  • @sunitagaikwad6552
    @sunitagaikwad6552 8 หลายเดือนก่อน +3

    Mi पुण्यातून आहे आमच्याकडे पिठलं म्हनतात ❤

    • @sunitagaikwad6552
      @sunitagaikwad6552 8 หลายเดือนก่อน

      3न्ही प्रकार खुप छान आहेत बगुनच खावस वाटतय 😊😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      🤗

  • @alkadesai9545
    @alkadesai9545 หลายเดือนก่อน

    तिन्ही पिठले सुंदर झाले मी वसई वरून बघते धन्यवाद सरीता

  • @jadhavsumedh4154
    @jadhavsumedh4154 8 หลายเดือนก่อน +5

    मी दापोली मधून आहे.आमच्या इथे पिठल बोलतो❤

  • @pushpanjalijagtap5814
    @pushpanjalijagtap5814 2 หลายเดือนก่อน

    👌😋कोरड पिठलं मला शिकायचं होतं आणि ते मला शिकायला मिळालं पिठलं बनवताना आवश्यक असणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी तुम्ही खूप छान सांगितल्या👌👍पहिले दोन प्रकार पण खूप टेस्टी आहेत ते मी बनवते

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 8 หลายเดือนก่อน +29

    मी कोल्हापूरची आहे रहाते ठाणे अंबरनाथ आमच्याकडे झुणका म्हणतात घट्ट झुणका किंवा पातळ झुणका महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน +1

      🤗❤️

    • @mayatekwani3941
      @mayatekwani3941 8 หลายเดือนก่อน

      Very good video nice 👍

    • @amrchandbarma6431
      @amrchandbarma6431 8 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢😢😢😢😢​

    • @pritigurav
      @pritigurav 8 หลายเดือนก่อน

      😢​@@mayatekwani3941

    • @uttammagar7103
      @uttammagar7103 8 หลายเดือนก่อน

      Avaj dekhil Chan ahe. Excellent.

  • @sanjeevyemul9793
    @sanjeevyemul9793 3 หลายเดือนก่อน +1

    Tasty recepie and nice presentation. Zunka bhakar.

  • @MadhavMhaiskar
    @MadhavMhaiskar 8 หลายเดือนก่อน +59

    ताई, मी पिठल्याचा आणखी एक प्रकार ऐकला आहे तो म्हणजे रावण पिठले. त्यात तिखट पुडीचे प्रमाणे जास्त असते. त्याची रेसिपी माहीत असल्यास प्रेक्षकांना सांगणे.

    • @smeetagujarathi1835
      @smeetagujarathi1835 7 หลายเดือนก่อน +7

      हो, मी करते कायम, सगळे एक एक वाटी, छोटी वाटी बेसन तिखट, दही, किसलेले खोबरे कांदा कोथिंबीर

    • @jyotsnatherade935
      @jyotsnatherade935 7 หลายเดือนก่อน

      ​@@smeetagujarathi1835we😊

    • @babanghanwat4791
      @babanghanwat4791 7 หลายเดือนก่อน

      ​@@smeetagujarathi1835ooooo

    • @pareegupta1779
      @pareegupta1779 7 หลายเดือนก่อน

      "." **
      . . *0. ?. ? . .

    • @musaalisayyad6233
      @musaalisayyad6233 6 หลายเดือนก่อน

      @@smeetagujarathi1835 to

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 หลายเดือนก่อน

    छान. आईची मेहनत व दानत दोन्ही गोष्टींनी छान शिकवण तुला मिळाली.

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पिठल बोलतो खूप छान

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 หลายเดือนก่อน

    सुंदर झुणका भाकर आवडला पुण्याहून बोलतो आहे

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 7 หลายเดือนก่อน +8

    आम्ही गाठिच्या पिठल्यात कांदा घालत नाही कढीपत्ता घालत नाही

    • @MORERANA
      @MORERANA 6 หลายเดือนก่อน +1

      Mag ghalu naka

  • @vskale1233
    @vskale1233 8 หลายเดือนก่อน

    सरीताताई अप्रतिम वर्णन आमच्याकडे ,पुण्यामध्ये पातळ असतं ते पिठलं आणि सुका तो झुणका. माझ्या सासूबाई कोल्हापूरच्या होत्या त्या सुक्या पिठल्याला कोमट कांदा म्हणायच्या.

  • @Mjadav4435
    @Mjadav4435 3 หลายเดือนก่อน +1

    Tisarya prakarat tel bharpur ahe. pahile don prakar ati uttam. Maharashtrain dhunaka👌👌👍🧡💛

  • @shailapise143
    @shailapise143 หลายเดือนก่อน

    तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. तुमचा हसरा चेहराचं पदार्थांची चव वाढवतो.❤

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 4 หลายเดือนก่อน

    खुप च छान पिंगल रेसिपीज दाखवल्यात
    खुप धन्यवाद
    आणी तुमच्या भुतकाळातल्या गोड आणी भावुक अठवणी ऐकुन खुप छान वाटले.

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 8 หลายเดือนก่อน +2

    मी खान्देश ची तिन्ही प्रकार चे पिठ ले करतो.एक रूपया वरून मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई. आम्ही पण अशाच पध्दतीने पिठलं बनवतो. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.

  • @neelimanaik4668
    @neelimanaik4668 6 หลายเดือนก่อน

    सरिता ताई पिठलं भाकरीची जुनी आठवण खुप सुंदर सांगितली

  • @NishaMate-x1o
    @NishaMate-x1o หลายเดือนก่อน

    खुप छान सरिता वहिनी झुंणका मस्त
    आई ची आठवण झाली
    खुप खुप धन्यवाद😅

  • @anitathorve7058
    @anitathorve7058 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे ह्याला पिठलं म्हणतात खूप आवडीचा पिठलं केव्हा पण खाऊ वाटते भाकरी आणि पिठलं वा छान 🤗👍

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 8 หลายเดือนก่อน

    ताकातल पिठल पहिल्यांदाच बघितल मी….👌👌 झुणका भाकर सगळ्यांनाच आवडत..आईच्या कष्टांना प्रणाम 🙏🙏

  • @shailajashiradhonkar9420
    @shailajashiradhonkar9420 7 หลายเดือนก่อน

    सर्व पिठलं छान आहेत आठवणी ऐकून आनंद झाला❤❤

  • @MeghaPawar-m9d
    @MeghaPawar-m9d 8 หลายเดือนก่อน +1

    मी पुण्यात राहते आम्ही बेसन बोलतो ताई आणि हो मी या रेसिपी ची खुप दिवसा पासून वाट पाहत होते कारण मला बेसन जमत नाही पण आता जमलं कारण तू खुप छान सांगितलं आहे खुप छान रेसिपि झाली आज ची thanku ताई तू माझ्या मनातलं ऐकलं

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      नक्की करुन बघा 🤗

    • @anuradhaparkale9507
      @anuradhaparkale9507 8 หลายเดือนก่อน

      माझं सासर बारामती आहे.तिथे सुद्धा बेसनच म्हणतात.

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 หลายเดือนก่อน +1

    Mazi aai pan karaychi .tava mi 2 te 3 bhakri khat hoto pithlya barobar mala khup aavdto😂hyala zunka mhantat mi karnatkamadhun belgam .jay mharastr...miss you aai mazi aai Mala sodun geli ho ..😢pan saglya aathvnya aahet mazya barobar..khup chan recipe karta tumhi

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान अप्रतिम अभिनंदन

  • @tsgeeta
    @tsgeeta หลายเดือนก่อน

    Thankyou so much for all the types in one video

  • @pamg2628
    @pamg2628 6 หลายเดือนก่อน

    That was an incredibly, touching story about your Aai. Such a noble woman. It brought tears to my eyes. I was planning to make zhunka today and stumbed upon your video. Great description and loving story. I will prepare your way in memory of your Aai. Love from US.

  • @SunilMore-vj4ik
    @SunilMore-vj4ik 3 หลายเดือนก่อน

    सरीताताई मला सुध्दा लहानपणात घेऊन गेलात आज माझं वय ६१ वर्ष आहे माझ्या लहानपणी माझी आई असंच बेसन पिठाचे असच पिठले तयार करून भाकरी बरोबर खायला द्यायची. तुमच्या या पिठल्यामुळे मला माझ्या आईची आठवण आली.. आणी मी तुमच्या या अनेक रेशीपी पाहात असतो.
    मस्त

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही ही गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही हळव्या झाल्याचे जाणवले. आमच्या ही डोळ्यात पाणी आले.अशाच भावनाशील रहा.यशवंत व्हाल.

  • @maniklalrathi6741
    @maniklalrathi6741 3 หลายเดือนก่อน

    अति छान मांडणी खूपच वेगळी

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i 8 หลายเดือนก่อน

    सरिता ताई तुम्ही एक एक शब्द सुंदर वापरलेत चरकन फोडणी दणदणूनकड काढणे खूप आवडले हे शब्द धन्यवाद ताई पेटल्या चे प्रकार दाखवले आहेत

  • @shashiwasnik1390
    @shashiwasnik1390 หลายเดือนก่อน

    Khoob khoob Sundor I am Nagpur aur teenon dishes bahut hi badhiya

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 2 หลายเดือนก่อน

    मी तुम्हाला 2 वर्ष अगोदर subscribe केले आहे
    सगळ्या रेसिपी follow करते
    Kitchen pan same तुमच्या kitchen चि copy केली आणि modulaer बनवले आहे
    Aanpurna ahaat tumhi❤❤❤

  • @sangeetachalwadi9437
    @sangeetachalwadi9437 2 หลายเดือนก่อน

    Very nice Mam,u remember ur days khup kami lok share karta

  • @chandakantdudhane
    @chandakantdudhane หลายเดือนก่อน

    ताई तुमचे तीनही प्रकारचे पिटले खुप छान आहे मला खूप आवडले मी जि़ सातारा जिल्हा मंधील तालुका खंडाळा येथील आहे

  • @ShubhangiDhenge
    @ShubhangiDhenge หลายเดือนก่อน

    Mi maharastra beed😊 madhun tumchi recipe bghitli khup bhari mla aavadali❤ pithal mla khup jast aavadat❤

  • @ravimore37
    @ravimore37 5 หลายเดือนก่อน

    कुपच सुंदर रेसिपी, ऑल द बेस्ट.....

  • @vaishalishinde5567
    @vaishalishinde5567 8 หลายเดือนก่อน +1

    मी कराड मध्ये राहते,आम्ही ह्याला पिठलं आणि झुणका अस दोन्ही पण म्हणतो ,पण तुझे तिन्ही प्रकार खूपच सुंदर केलेस 👌👌

  • @truptithube4030
    @truptithube4030 หลายเดือนก่อน

    तुझ्या रेसिपी फार छान असतात👌👌

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 2 วันที่ผ่านมา

    Khup Chan zunkya che teen प्रकार,मी dahisar east, mumbai.

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan pitla,aamchya ikde besan mantat.gondiya jillyat.❤

  • @sonalpatil4974
    @sonalpatil4974 4 หลายเดือนก่อน +1

    गाठीचा झुणका ❤️❤️ माझी आई असेच कर ते