सुहासिनीताईंची काही बाबतीत असलेली स्पष्ट आणि परखड मते खरच पटली...serial बाबतीतील त्यांच म्हणणे तर अगदी पटले... उत्तम वक्ती, विश्लेषक .त्यांना ऐकून मजा आली... खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार
तासाभरात किती जीवनातील अनुभव सांगितले सुहास ताईंनी. वयाच्या ७५ व्या वर्षी किती एनर्जी. सध्याच्या टीव्ही मालिकेबाबत अगदी प्रांजळ,प्रामाणिक मत मांडले सुहास ताईंनी. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाॅब करतात हे विशेष कौतुकास्पद! नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये व्यस्त असताना सुहास ताईंनी संसाराची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली, हेच लक्षात येते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला मानाचा मुजरा😊. धन्यवाद सुलेखा😊
आजच्या मालिकांची उदासीन वास्तविकता अगदी खरी👍 ह्यांच्या सारखी माणसे म्हणजे अनुभवांची कार्यशाळा आहेत. त्यांच्या बद्दल बोलताना शब्दच अपुरे पडतात. त्यांना माझा सादर प्रणाम 🙏
सुन्दर मुलाखत....सुहास ताईनी म्हंटल्या प्रमाणे मराठी सिरियल्स चा दर्जा वाढवणे खूप गरजेचे आहे... तुम्ही दोघी पण अशा सिरियल्स मधे काम करता तेव्हा वाईट वाटतं....
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम. अत्यंत पोटतिडकीने बोलल्या आहेत सुहासाताई. उत्कृष्ट आचार,विचार,संस्कार शब्दा शब्दतून प्रतीत होत होते. आधीपासून आदर होताच,आता वृद्धिंगत झालाय. ग्रेट बाई.....
मुलाखत ऐकताना सुरवातीलाच सुहास मावशींच्या लहानपणीची संगीताची पार्श्वभूमी समजली आणि खूप आनंद झाला. पुस्तक योग्य व्यक्तीच्या हाती पडल्याचा आनंद !!! मीही वयाच्या नवव्या वर्षीपासून गेली 40 वर्षे सतारवादक आहे🌷.🎶😊🙏🎼🌷
नमस्कार सुहास मावशी, अगदीं निशब्द केलंस तू! खरं सांगायचं तर वाटल की सुहास जोशी म्हणजे नाटक, सिनेमा, मालिकांमधून काम करणारी एक उत्तम कलाकार. त्यांची मुलाखत म्हणजे जास्ती जास्त त्यांचे या क्षेत्रातील अनेक अनुभव त्या सांगतील . पण अगदीं मनापासून सांगते, जीवनाचा एवढं सुंदर अभयस, वेगळ्या वेगळ्या विषयांवर तुमचे एवढे परखड मत आणि एवढा सच्चेपणा मनाला प्रचंड भवल. सुलेखा खुप धन्यवाद तुला! आणि मनापासून शुभेछा!! 💐
सुलेखा ताई हा दुसरा interview आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त अवाक होऊन तु ऐकत आहेस. पहिला निशिगंधा वाढ आणि दुसरा सुहास जोशी. खरंच खुप छान आणि शिकण्यासारखी मुलाखत.
अतिशय सुंदर झाली मुलाखत! सुहास मावशी किती किती छान आणि स्पष्ट बोलल्या! त्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जाणारे आहेत. सुलेखा ताई....तुम्ही खरंच किती सहज बोलतं करता समोरच्या व्यक्तीला! मनापासून धन्यवाद!😊👌🙏
सध्याच्या मराठी सेरिअल बद्दल मम् जे बोलल्या ते माझं ही मत आहे , म्हणून मी सिरीयल बघणं बंद केलं आहे . त्यांनी जे मत परखडपणे मांडलं त्याचा विचार director किंवा सगळ्या टीम ने करायला हवा.
प्रत्येक ६ दिवसांनी एक नवीन प्रवास जाणून घ्यायला मिळतो .एक नवी ऊर्जा देणारा,आयुष्यातील चढ उतार सांगणारा,जगण्याची नवी उमेद देणारा प्रेरणादायी प्रवास... हृदयाला स्पर्श करणारा अनोखा प्रवास ....काहीतरी सकारात्मक आत्मसाद करायला लावणारा प्रवास...धन्यवाद सुलेखा ताई & दिलं के करीब टीम 🙏🙏
@@SulekhaTalwalkarofficial अप्रतिम मुलाखत. अशा बुजुर्ग दिग्गज कलाकारांनी आपण रसिक समृद्ध आहोत हे आपलं भाग्य आहे. सुलेखा जी यासाठीच पुन्हा एकदा विजयाबाई यांच्या मुलाखतीसाठी कळकळीची पुन्हा एकदा विनंती 🙏 त्यांचं नव्याने काहीही ऐकायला आमचे कान आसुसले आहेत..
अप्रतिम..विजयाबाईंच्या तालमीत तयार झालेले लोक..एकेक स्वतंत्र विद्यापीठ आहेत.... अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कलाकारांना खूप काही शिकण्यासारखे आहे
आद. सुहास जी जोशी.. अत्यंत आवडती अभिनेत्री.. आजही किती सुंदर दिसतात.. अभिनयातील दमदार, सर्वोत्कृष्ट नाव. सुलेखा जी मनापासून आभार.. इतकी सुंदर व्यक्ती ऐकायला मिळाली... 🌹
सुहास जोशी.... 😘🙏 अगदी ऐकत च रहावे.. अशी मुलाखत झाली 👍... अभिनय सम्राज्ञी 🙏 भाषेवर प्रभुत्व,प्रचंड वाचन, अनुभव संपन्न, खूप सुंदर दिसणाऱ्या... सुहास ताई... अजून एक दिल के karib झाली मुलाखत.. Tnku सुलेखा जी 😘😘
खूप खूप सुंदर आणि खरं ऐकायला मिळालं....सुहास ताई मनापासून बोलल्या सुद्धा आणि "बरेचसे " ऐकवले" सुद्धा ....आताच्या पिढीतील सिनेमा, नाटक, सिरीयल काढणाऱ्या लोकांनी यावर नक्की विचार केलाच पाहिजे .... सुलेखाताईना मनापासून धन्यवाद !👌👌
The best so far!! She's so so honest n frank. Loved and enjoyed the entire interview. Sulekha you have this rare quality of making people talk n your skill of listening n asking questions is praiseworthy!!
Awesome enriching episode!! Suhasji is a veteran, versatile,resourceful actor. Delighted to listen to her experiences. Hope all amateurs take her advice seriously to improve their performance.
One of the best episode of dil de kareb.Suhas mam you are simply amazing .Highly impressed with your honest opinion about the films,TV serials and dramas. Hope you remember me. I was Sonali's primary teacher of Singhania school. I had met you and your husband during " Open Day " of the school. Today after seeing your interview in dil se kareb l remembered those golden days.
खुपचं छान मुलाखत होती. अगदी परखडपणे सुहास ताईंनी आपली मते मांडली. विशेषतः आजकाल च्या टीव्ही सिरियल संदर्भात. एकदम मस्त. पुन्हा एकदा सुलेखा ताईचे अभिनंदन. आपण खूप कमी वेळ बोलून सुहास जोशी यांचे मन मोकळे केले त्याबद्दल धनयवाद.
Suhas ji, no words of appreciation can fully express how deeply you are loved and valued by us, your admirers !! Take a bow, elegant lady !🙏🙏 Stay happy and blessed always !
खूप छान मुलाखत... असं वाटत होतं की ऐकतच राहावं...खरोखरच अशा जुन्या कलाकारांकडून खूपच शिकण्यासारखं आहे सगळ्या नव्या पिढीला आणि सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना...Thank you so much mam ❤️
अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व 🙏🙏 त्यांनी सिरियल च्या बद्दल जे मत व्यक्त केले ते पूर्णपणे पटले सुलेखा ताई अश्या व्यक्ती ची ओळख करून देता तुम्ही त्या साठी तुमचे पण खूप खूप आभार 🙏🙏
शब्द अपुरे आहेत.इतकी सुंदर मुलाखत!की संपुच नयेशी वाटली.अगदी तन्मय होऊन ऐकली आणि आपल्या मनातले मनोगत ऐकतो आहोत असे वाटले.वाचनाविषयीची जागरुकता,सजग ज्ञानग्रहण करण्याची जरुरी आणि विचारांचा दर्जेदारपणा व्यक्तीमत्व जोपासण्यासाठी किती जरुरीचा आहे हे या मुलाखतीतून सहज जाणवलं.किती सहजपणाने या गोष्टी सुहासताईंनी उलगडल्या.त्या उत्तम अभिनेत्री आहेतच पण एक गुणी व्यक्तीमत्वही आहेत.एक आजी म्हणुन नातवंडांना तेही अमेरिकेत इतक्या गोष्टी सांगणे खरच ग्रेट!मला याच्या आधी सुहास जोशी एक छान अभिनेत्री इतकच माहिती होतं.सुलेखाजी तुमचे खुप खुप आभार.तुमच्यामुळे हा ठेवा आम्हाला लाभतो आहे.पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा!
बापरे। मी एका डिप्रेस्ड फेज मधून जात होते आणि हा इंटरव्यू बघितला। काय मोटिवेट झाले। आणि खुप काय काय शिकायला मिळाल। 1 तास पण कमी वाटला। सुलेखा ताई ज़र तुम्ही माझा एक मेसेज पोचवता आला तर नक्की पोचवा। सुहास मावशीन्ना पुस्तक लिहायला लावा।।।काय सुंदर विचार आहेत त्यांचे। मराठी सीरियल्स बद्दल पण त्या अतिशय योग्य बोलल्या। काहि ऑप्शन नाही म्हणून बघतो। कंटेंट चांगल नाहिये आज काल। I loved this interview! खुप शिकायला मिळाल। थैंक यू सुलेखा ताई हा शो सुरु केल्याबद्दल। खुप शिकायला मिळत।
प्रत्येक बाबतीत अतिशय परखड आणि स्पष्ट बोलणं , खूपच आवडलं.उगीच गुळमुळीत, गोड गोड, प्रेक्षकांचा अनुनय करणारं बोलणं नाही. प्रत्येक बाबतीत पक्का विचार,घेतलेले कष्ट,त्या जोरावर मिळालेल्या यशाची रास्त जाण , बोलण्यातून दिसून येते. त्यामुळेच व्यक्तीमत्वात असलेली आकर्षकता, आत्मविश्वास, व ठामपणा खूप ऊठून दिसतो.ऊत्तम आयुरारोग्य लाभो, ही शुभकामना ! 👏👏
अतिशय सुरेख आणि पुनः पुन्हा ऐकत रहावी अशी ही मुलाखत वजा गप्पा. अत्यंत प्रामाणिक पणे सध्या च्या मनोरंजन क्षेत्रात जे चालू आहे त्या वरचे स्पष्ट विचार. आणि आम्हा प्रेक्षकांना त्या बद्दल विचार करायला लावणारी ही मुलाखत. सुलेखा तळवलकर खरोखर खूप छान वाटले. धन्यवाद.
What a treat, nice to see ma'am and listen to her soulful journey. She is a creative heroine of most of our literature aspects. wow...salute.. Such artists enrich our individual lives too. Thank you. Kudos to Dil ke Kareeb
वाह .... वाह .... अशा दिग्गज कलाकारांचे अनुभव ऐकायला , त्यांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम , मेहेनत , ऐकताना पण खूप जाणवते , की किती महान कलाकार आहेत आपल्या इंडस्ट्री मधे .... खरच , सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... असेच उत्तम कलाकार येऊ देत आपल्या कार्यक्रमा मधे ..... मन : पूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
Graceful and pretty artist. किती प्रगल्भ विचार, केवढे मोठे काम केले आहे. स्पष्ट वक्ते पणा आवडला. Thank You Sulekha.. दर वेळी नवीन पाहुणा कलाकार बोलवून त्यांच्यातल्या माणूसपणाची ओळख करून देता. खूप धन्यवाद. God bless you. ❤️
Such an amazing Interview. Her persona is amazing too. The way she spoke about her own experience, her perspective of her movie characters, her view about today’s content is so ahead of her age. She spoke a lot through her eyes too. Her emotions were clearly visible. Thanks for the interview Sulekha and team ❤
Thank you for this interview...loved it....please also consider taking interviews of iravati harshe and Shubhangi damle...loved their work in Bhai vyakti ki Valli as Sunita Deshpande... hearing these people talk is a huge learning about many aspects of life...thanks to you ❤️
खूपच सुंदर मुलाखत . उत्तम वाचन कसे करायचे हे सुहासताईंकडून शिकायला मिळाले. स्मिताताईंनाही विसरू शकत नाही आम्ही खारला शेजारच्या बिल्डींगमध्ये राहात होतो. अडचणीच्या काळात त्यांनी आमच्या परिवाराला खूप मदत केली आहे. स्मिताताईंचे आणि अंबरचे आम्ही खूप आभारी आहोत🙏
Suhas madam, people like you have enriched our life. My love for Marathi language was also developed from the golden period of Doordarshan and parallel cinema.
Very Senior and Talented actress having presence on Theatre....Small Screen and Big screen too...Eager to watch this.. thanks for having Suhas Joshi on your 100 plus episode....
Lovely IV. Was wishing IV could go on. Fortunate to see Suhas ji live on Stage in play 'Sakkhe Shejari' (co-starring Satish Pulekar ji) at Shivaji Mandir. And now movies Bogda, Jhimma, in which she is outstanding. Great respect for Suhas Joshi ji.
अप्रतिम मुलाखत! सुहास ताईंचे खूप आभार, इतके मनापासून व्यक्त झाल्याबद्दल. खूप शिकायला मिळाले. धन्यवाद! Thank you for being so true , strong, loving and dedicated 🙏
This was one of my most loved episode.suhasji has mesmerising aura .she has rightly emphasized there is no substitute to hard work.if you want success and good health shred lazyness. I am south indian born and brought up in girgaon.studied in Marathi medium.thanks to my class teacher shrotri mdm.who has taught me perfect Marathi .I amin love with this language.thank you once again.
छान झाली मुलाखत....अभिनय हा असाच येत नाही,तो शिकावा लागतो. बायकांनी शारीरिक कामे करायला च हवी तेही त्यांच्या well being साठी...आणि हल्लीच्या सीरियल ची शोकांतिका इतक्या परखडपणे मांडणारे व्यक्तिमत्व आज ऐकायला आणि पाहायला मिळाले हा खरोखरच सोन्याचा दिवस...आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तू तिथे मी हा माझा आवडता चित्रपट,तेव्हापासून मी त्यांची फॅन...आणि आज त्यांना ऐकल्यावर खूपच धन्यता वाटली...Thank you सुलेखा ताई 🙏
Excellent . Really felt like a Daughter is talking with her Aai or Mavshi. So much to learn from the episode. Loved the statement ' Kam karatach rahile pahije ' Thank you so much for presenting us with this wonderful jem of a person.
सुंदर...वाटलं होतं त्यापेक्षा खूपच छान मुलाखत झाली.फक् त कारकीर्दीतले अनुभव एवढ्यावर न थांबता सुहासताईनी त्यांचं सर्व आयुष्यच उलगडून दाखवलं.. धन्यवाद सुलेखाताई आणि सुहासताई...
Great ...व्यक्तिमत्त्व ...अगदी सडेतोड परखड मतं व्यक्त केलीत सुहासजींनी...सगळे प्रसंग अगदी सहजपणे सांगीतले ...तुमचा अभिनय मला खूप आवडतो.🙏😊माझी आजी असं मला feel झालं ...अश्याच छान छान लोकांना बोलावत जा सुलेखाजी..😊
was egarly waiting for her interview.........just can't imagine how beautiful she must be in young age...when she is so so so beautiful today.....one more thing I am happy for her as she has recovered.Thankyou thankyou thankyou dear Sulekha.Last but not the least egarly awaiting your interview on this platform only ...and yes I m pretty confident that it will not be in one part❤️
Suhasini Joshi tai is a great artist , no doubt. But her thoughts are so forward, so modern about caste, religion etc. In today's society it is necessary to increase no. of such people who are intellectual like Suhas tai to come forward & express such thoughts for the well-being of whole society & country. Her love for reading & love for learning consistently, hard work is so inspiring. Really feels so peace within after listening her Modern thoughts. I liked her work in 'Agnihotra ' serial very much. 🙏🙏
सुलेखाताई ह्या मुलाखतीसाठी धन्यवाद. आम्ही गुजरात मध्ये असल्याने मराठी चित्रपट, नाटक क्वचित पहायला मिळतात. पण जेव्हा कधी चित्रपट पहायला मिळाले त्यात जर सुहास जोशींची भूमिका असली तर ती नेहमी दमदार, करारी वाटली. त्या आधी आणि आत्ता ही खूप सुंदर दिसतात. त्यांच्या वेळची प्रत्येक व्यक्ती ही एक अभिनयाची शाळा आहे. डाउन टू अर्थ ग्रेट अभिनेत्री. ❤के करीब.🙏🏻
Thank you so much for this interview. खरंच आहे, आपल्याकडे एवढं उत्तम उत्तम साहित्य आहे. ते सिरीयल च्या माध्यमातून लोकांसमोर मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. आपले दुर्दैव असे, मराठी चित्रपटांचा दर्जा जितका उत्तम, तितका सिरीयल चा दर्जा घसरत आहे. स्मिता ताईंनी मागे २४ भागांची मालिका हा जो उपक्रम राबविला होता, तशा प्रयोगांची नितांत गरज आहे. आजच्या सिरीयल पाहून स्मिता ताई हव्या होत्या कान उघडणी करायला, असं खरंच वाटत राहतं.
खूप खूप छान वाटलं ही मुलाखत पाहून, ऐकून...एक प्रथितयश, अतिशय समर्थ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध अशाच सुहास ताई... त्यांनी हल्लीच्या मालिकांचं अगदी समर्पक विश्लेषण केलं आहे.. down to earth व्यक्तिमत्त्व..
सुंदर मुलाखत .. घेणारी आणि देणारी.. अतिशय दर्जेदार..... आजकाल.... दुर्मिळ.......... असे काही ऐकायला बघायला मिळणे .. म्हणजे अलभ्य लाभ....million Thanks to both....
I agree with Suhas Tai. Serials are stretched so much. Gammat mhanun sangte...when Asambhav was at its peak I got married and moved abroad. I visited India after 1.5 years and to my utter shock and disbelief the serial had hardly moved ahead. The serial had lived upto it's name for me. It was really Asambhav ki itki slow asunahi saagle baghat hote. Suhas Tai is absolutely right, bhaaji nivadtana kivva dusrya goshti side by side suru astana timepass mhanun suru asaycha.
सुहास ताईंनी आजच्या मराठी सिरिअल्स बद्दल जे मत मांडलं आहे ते अगदी बरोबर आहे. मी अगदीच सहमत आहे सिरीयल सुरु करतांना end माहितीच नसतो म्हणून नुसतं चिघळत जातं
I was desperately waiting for this great lady to come in this show. She is one of my favorites actress in Marathi industry.. Kindly convey my regards to her.. I love her and her beauty...
Super Happy to know that finally Suhas Tai has come to our Dil Ke Kareeb❤️❤️.....khup divas vaat pahili. Eagerly waiting to hear her. Thank you Sulekha Tai ❤️
Hope the producers, directors, script writers hear this interview and take it as a feedback and save the audience from the Laaaaamb lachak serials and create some “baghebal” content worth watching!
सुहासिनीताईंची काही बाबतीत असलेली स्पष्ट आणि परखड मते खरच पटली...serial बाबतीतील त्यांच म्हणणे तर अगदी पटले... उत्तम वक्ती, विश्लेषक .त्यांना ऐकून मजा आली... खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार
तासाभरात किती जीवनातील अनुभव सांगितले सुहास ताईंनी. वयाच्या ७५ व्या वर्षी किती एनर्जी. सध्याच्या टीव्ही मालिकेबाबत अगदी प्रांजळ,प्रामाणिक मत मांडले सुहास ताईंनी. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाॅब करतात हे विशेष कौतुकास्पद! नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये व्यस्त असताना सुहास ताईंनी संसाराची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली, हेच लक्षात येते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला मानाचा मुजरा😊.
धन्यवाद सुलेखा😊
आजच्या मालिकांची उदासीन वास्तविकता अगदी खरी👍
ह्यांच्या सारखी माणसे म्हणजे अनुभवांची कार्यशाळा आहेत. त्यांच्या बद्दल बोलताना शब्दच अपुरे पडतात. त्यांना माझा सादर प्रणाम 🙏
आख्या मराठी industry ची खेचून कान उघडणी करणारा episode 🔥 सुहास मावशी, वंदन तुम्हाला !!!
❤a1
सुन्दर मुलाखत....सुहास ताईनी म्हंटल्या प्रमाणे मराठी सिरियल्स चा दर्जा वाढवणे खूप गरजेचे आहे...
तुम्ही दोघी पण अशा सिरियल्स मधे काम करता तेव्हा वाईट वाटतं....
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम.
अत्यंत पोटतिडकीने बोलल्या आहेत सुहासाताई.
उत्कृष्ट आचार,विचार,संस्कार शब्दा शब्दतून प्रतीत होत होते.
आधीपासून आदर होताच,आता वृद्धिंगत झालाय.
ग्रेट बाई.....
❤
Jayu.....tuzhi comment apratim aahe
Salute to both of you! What a wonderful interview...enjoyed each and every word.
सुहास, you look satisfied. Liked your thoughts.
Congratulations..
मुलाखत ऐकताना सुरवातीलाच सुहास मावशींच्या लहानपणीची संगीताची पार्श्वभूमी समजली आणि खूप आनंद झाला. पुस्तक योग्य व्यक्तीच्या हाती पडल्याचा आनंद !!! मीही वयाच्या नवव्या वर्षीपासून गेली 40 वर्षे सतारवादक आहे🌷.🎶😊🙏🎼🌷
नमस्कार सुहास मावशी, अगदीं निशब्द केलंस तू! खरं सांगायचं तर वाटल की सुहास जोशी म्हणजे नाटक, सिनेमा, मालिकांमधून काम करणारी एक उत्तम कलाकार. त्यांची मुलाखत म्हणजे जास्ती जास्त त्यांचे या क्षेत्रातील अनेक अनुभव त्या सांगतील . पण अगदीं मनापासून सांगते, जीवनाचा एवढं सुंदर अभयस, वेगळ्या वेगळ्या विषयांवर तुमचे एवढे परखड मत आणि एवढा सच्चेपणा मनाला प्रचंड भवल.
सुलेखा खुप धन्यवाद तुला! आणि मनापासून शुभेछा!! 💐
Yes...long back i had seen one of the same interview of Smita Tai 🙏
सुलेखा ताई हा दुसरा interview आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त अवाक होऊन तु ऐकत आहेस. पहिला निशिगंधा वाढ आणि दुसरा सुहास जोशी. खरंच खुप छान आणि शिकण्यासारखी मुलाखत.
अतिशय सुंदर झाली मुलाखत! सुहास मावशी किती किती छान आणि स्पष्ट बोलल्या! त्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जाणारे आहेत. सुलेखा ताई....तुम्ही खरंच किती सहज बोलतं करता समोरच्या व्यक्तीला! मनापासून धन्यवाद!😊👌🙏
👌👌🙏🏼
सध्याच्या मराठी सेरिअल बद्दल मम् जे बोलल्या ते माझं ही मत आहे , म्हणून मी सिरीयल बघणं बंद केलं आहे . त्यांनी जे मत परखडपणे मांडलं त्याचा विचार director किंवा सगळ्या टीम ने करायला हवा.
प्रत्येक ६ दिवसांनी एक नवीन प्रवास जाणून घ्यायला मिळतो .एक नवी ऊर्जा देणारा,आयुष्यातील चढ उतार सांगणारा,जगण्याची नवी उमेद देणारा प्रेरणादायी प्रवास... हृदयाला स्पर्श करणारा अनोखा प्रवास ....काहीतरी सकारात्मक आत्मसाद करायला लावणारा प्रवास...धन्यवाद सुलेखा ताई & दिलं के करीब टीम 🙏🙏
आभार
One of the most honest and thought provoking interviews! Absolutely loved her honesty and simplicity. Thank you Sulekha🙏
Most welcome
खूप छान मुलाखत झाली.
छान मुलाखत !!
दिलीप प्रभावळकरांची मुलाखत कधी घेणार आहात ?
@@SulekhaTalwalkarofficial
अप्रतिम मुलाखत.
अशा बुजुर्ग दिग्गज कलाकारांनी आपण रसिक समृद्ध आहोत हे आपलं भाग्य आहे.
सुलेखा जी यासाठीच पुन्हा एकदा विजयाबाई यांच्या मुलाखतीसाठी कळकळीची पुन्हा एकदा विनंती 🙏
त्यांचं नव्याने काहीही ऐकायला आमचे कान आसुसले आहेत..
Aabsoulutely
अप्रतिम..विजयाबाईंच्या तालमीत तयार झालेले लोक..एकेक स्वतंत्र विद्यापीठ आहेत.... अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कलाकारांना खूप काही शिकण्यासारखे आहे
खूप ch सुंदर मुलाखत... वाचन महत्व कळकळीने पाठवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार... ताईंना मानाचा मुजरा..🙏🙏🙏✨️✨️✨️
आद. सुहास जी जोशी.. अत्यंत आवडती अभिनेत्री.. आजही किती सुंदर दिसतात.. अभिनयातील दमदार, सर्वोत्कृष्ट नाव. सुलेखा जी मनापासून आभार.. इतकी सुंदर व्यक्ती ऐकायला मिळाली... 🌹
सुहास जोशी.... 😘🙏 अगदी ऐकत च रहावे.. अशी मुलाखत झाली 👍... अभिनय सम्राज्ञी 🙏 भाषेवर प्रभुत्व,प्रचंड वाचन, अनुभव संपन्न, खूप सुंदर दिसणाऱ्या... सुहास ताई... अजून एक दिल के karib झाली मुलाखत.. Tnku सुलेखा जी 😘😘
धन्यवाद
खूप खूप सुंदर आणि खरं ऐकायला मिळालं....सुहास ताई मनापासून बोलल्या सुद्धा आणि "बरेचसे " ऐकवले" सुद्धा ....आताच्या पिढीतील सिनेमा, नाटक, सिरीयल काढणाऱ्या लोकांनी यावर नक्की विचार केलाच पाहिजे .... सुलेखाताईना मनापासून धन्यवाद !👌👌
खूप सुन्दर आणि मनापासून बोलल्या सुहास Joshi. खूप aamchya मनातले होते.aajchya bogus serials
Che मुख्य कारण उत्तम lekhakancha abhaav. Changli kathach नाही.aso Thanku sulekha
अप्रतिम मुलाखत झाली.. सुलेखाजी मुळे असं छान पहायला,ऐकायला मिळत म्हणून त्यांचे खूप खूप आभार .🙌🙌👌👌👏👏
The best so far!! She's so so honest n frank. Loved and enjoyed the entire interview. Sulekha you have this rare quality of making people talk n your skill of listening n asking questions is praiseworthy!!
Khup sunder Chan
Thanks 👍
Awesome enriching episode!! Suhasji is a veteran, versatile,resourceful actor. Delighted to listen to her experiences. Hope all amateurs take her advice seriously to improve their performance.
अतिशय सुंदर...तेवढीच तडफदार मुलखात....किती सुंदर सहज दिसणे सुहास जोशी चे .अतिशय आवडल्या 👍
One of the best episode of dil de kareb.Suhas mam you are simply amazing .Highly impressed with your honest opinion about the films,TV serials and dramas. Hope you remember me. I was Sonali's primary teacher of Singhania school. I had met you and your husband during " Open Day " of the school. Today after seeing your interview in dil se kareb l remembered those golden days.
खुपचं छान मुलाखत होती. अगदी परखडपणे सुहास ताईंनी आपली मते मांडली. विशेषतः आजकाल च्या टीव्ही सिरियल संदर्भात. एकदम मस्त. पुन्हा एकदा सुलेखा ताईचे अभिनंदन. आपण खूप कमी वेळ बोलून सुहास जोशी यांचे मन मोकळे केले त्याबद्दल धनयवाद.
Suhas ji, no words of appreciation can fully express how deeply you are loved and valued by us, your admirers !!
Take a bow, elegant lady !🙏🙏
Stay happy and blessed always !
सुलेखा ताई, अदिती ताई व कविता ताई यांच्या मुलाखती आवडल्या.विषेशत अदिती ताई ची ओन्ली फोर राउत हकिकत आवडली.अगनिहोतरी, बडोदे.
खूप छान
अतिशय उत्तम
ग्रेट
अगदी परखड आणि सत्य विचार!!!!आपल्या साहित्यावर आधारित मालिका निघाव्यात ही अत्यंत विचार करण्या सारखी गोष्ट!!!!!
अप्रतिम सुंदर....मुलाखत
खूप छान मुलाखत... असं वाटत होतं की ऐकतच राहावं...खरोखरच अशा जुन्या कलाकारांकडून खूपच शिकण्यासारखं आहे सगळ्या नव्या पिढीला आणि सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना...Thank you so much mam ❤️
खूपच अप्रतिम बोलल्या सुहास ताई 👏👏... अस ऐकत रहावं वाटत होतं... ❤... आणि खरच कित्ती कष्ट केलेत या पिढीने. 🙏🙏... खूप शिकण्या सारखे आहे 👍😊
Excellent Interview. No words to praise Suhas Joshi.
अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व 🙏🙏
त्यांनी सिरियल च्या बद्दल जे मत व्यक्त केले ते पूर्णपणे पटले
सुलेखा ताई अश्या व्यक्ती ची ओळख करून देता तुम्ही त्या साठी तुमचे पण खूप खूप आभार 🙏🙏
शब्द अपुरे आहेत.इतकी सुंदर मुलाखत!की संपुच नयेशी वाटली.अगदी तन्मय होऊन ऐकली आणि आपल्या मनातले मनोगत ऐकतो आहोत असे वाटले.वाचनाविषयीची जागरुकता,सजग ज्ञानग्रहण करण्याची जरुरी आणि विचारांचा दर्जेदारपणा व्यक्तीमत्व जोपासण्यासाठी किती जरुरीचा आहे हे या मुलाखतीतून सहज जाणवलं.किती सहजपणाने या गोष्टी सुहासताईंनी उलगडल्या.त्या उत्तम अभिनेत्री आहेतच पण एक गुणी व्यक्तीमत्वही आहेत.एक आजी म्हणुन नातवंडांना तेही अमेरिकेत इतक्या गोष्टी सांगणे खरच ग्रेट!मला याच्या आधी सुहास जोशी एक छान अभिनेत्री इतकच माहिती होतं.सुलेखाजी तुमचे खुप खुप आभार.तुमच्यामुळे हा ठेवा आम्हाला लाभतो आहे.पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा!
खुप छान मुलाखत त्यांनी सुचवलेल ठराविक भागात एक गोष्ट अश्या मालीका असाव्यात खुप चांगल सुचवल पूर्वी काही मालिका होत्या तश्या
बापरे। मी एका डिप्रेस्ड फेज मधून जात होते आणि हा इंटरव्यू बघितला। काय मोटिवेट झाले। आणि खुप काय काय शिकायला मिळाल। 1 तास पण कमी वाटला। सुलेखा ताई ज़र तुम्ही माझा एक मेसेज पोचवता आला तर नक्की पोचवा। सुहास मावशीन्ना पुस्तक लिहायला लावा।।।काय सुंदर विचार आहेत त्यांचे। मराठी सीरियल्स बद्दल पण त्या अतिशय योग्य बोलल्या। काहि ऑप्शन नाही म्हणून बघतो। कंटेंट चांगल नाहिये आज काल। I loved this interview! खुप शिकायला मिळाल। थैंक यू सुलेखा ताई हा शो सुरु केल्याबद्दल। खुप शिकायला मिळत।
Thanks a billion for bringing her …. My most fave episode of yours till now 😇
I wish I could meet her once
Glad you like it
@@SulekhaTalwalkarofficial खूप छान episode....अगदी बरोबर आहे की मराठी साहित्य घेऊन सिरियल बनवली तर प्रेक्षक अजिबात jagache हलणार नाहीत
@@snehagargatte2152 अतिशय छान गप्पा आहेत. बरिच माहिती मिळाली.मी अग्नी पंख नाटक पाहिलं.तो काळ वेगळा होता.सुहास ताईंना शुभेच्छा.संजीव अग्निहोत्री बडोदे.
अप्रतिम व दर्जेदार मुलाखत
No one can match her aura ❤️.....thy way she feels and talks about hard work in life 🙏 😘
Jabardast kalakar.Khup sundar,rokh thok .Excellent. Are Hardworking artists Ata Katherine astat ?
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 मला सुहास जोशी फार आवडतात....त्यांचा अभिनय खूपचं सहज ,सुंदर , मनाला भावेल असा असतो...👍👍
प्रत्येक बाबतीत अतिशय परखड आणि स्पष्ट बोलणं , खूपच आवडलं.उगीच गुळमुळीत, गोड गोड, प्रेक्षकांचा अनुनय करणारं बोलणं नाही. प्रत्येक बाबतीत पक्का विचार,घेतलेले कष्ट,त्या जोरावर मिळालेल्या यशाची रास्त जाण , बोलण्यातून दिसून येते. त्यामुळेच व्यक्तीमत्वात असलेली आकर्षकता, आत्मविश्वास, व ठामपणा खूप ऊठून दिसतो.ऊत्तम आयुरारोग्य लाभो, ही शुभकामना ! 👏👏
A true artist who really wants audience to give best. That urge is touching heart.
अतिशय सुरेख आणि पुनः पुन्हा ऐकत रहावी अशी ही मुलाखत वजा गप्पा. अत्यंत प्रामाणिक पणे सध्या च्या मनोरंजन क्षेत्रात जे चालू आहे त्या वरचे स्पष्ट विचार. आणि आम्हा प्रेक्षकांना त्या बद्दल विचार करायला लावणारी ही मुलाखत. सुलेखा तळवलकर खरोखर खूप छान वाटले. धन्यवाद.
Amazing. No words to Express . Thankyou for inviting such a talented artist
My pleasure
What a treat, nice to see ma'am and listen to her soulful journey. She is a creative heroine of most of our literature aspects. wow...salute..
Such artists enrich our individual lives too. Thank you. Kudos to Dil ke Kareeb
वाह .... वाह .... अशा दिग्गज कलाकारांचे अनुभव ऐकायला , त्यांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम , मेहेनत , ऐकताना पण खूप जाणवते , की किती महान कलाकार आहेत आपल्या इंडस्ट्री मधे .... खरच , सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद .... असेच उत्तम कलाकार येऊ देत आपल्या कार्यक्रमा मधे ..... मन : पूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
So inocent, absolute
Clarity in thinking
Wah lajawab
Atishay sundar mulakhat..Suhas Joshi is one of my favourite artists...and now a great person too.. Hat's off 🙏 Thanks Sulekha 🙏
खूप सुंदर, सुलेखा ताई तुमची मुलाखत ऐकायला आवडेल, तुम्ही हे मुलाखतींचे खूप सुंदर काम करत आहात
किती खरं आणि स्पष्ट सुध्दा. खूप मनापासून आवडेल. सुहास ताई हे इतकं मोकळेपणाने बोलणं सुलेखा बरोबरच होऊशकते. धन्यवाद इतक्या छान मुलाखतीसाठी.
आभार
She is such an inspiration I adored her as actress but this interview made me realize how much reading is important for this generation
खूप छान मुलाखत पाहायला मिळाली. सुहास जोशी बद्दल मला नितांतआदर वाटतो.अभिमान वाटतो.
Graceful and pretty artist. किती प्रगल्भ विचार, केवढे मोठे काम केले आहे. स्पष्ट वक्ते पणा आवडला. Thank You Sulekha.. दर वेळी नवीन पाहुणा कलाकार बोलवून त्यांच्यातल्या माणूसपणाची ओळख करून देता. खूप धन्यवाद. God bless you. ❤️
Khup khup khupach sundar zala ha interview! Kitti surekh bollya Suhas Joshi. Sulekha Tai thank you so much for this episode. 😊
Such an amazing Interview. Her persona is amazing too. The way she spoke about her own experience, her perspective of her movie characters, her view about today’s content is so ahead of her age. She spoke a lot through her eyes too. Her emotions were clearly visible. Thanks for the interview Sulekha and team ❤
Our pleasure
So sweet...me maze che kaam sodun phakt aani phakt tumhala ikat hote...
Thank you so much.m so happy .love u lot
सुहास ताईच भाषेवर च प्रभुत्व अतिशय उत्तम, great artist आहेत त्या , काय आणि किती बोलू त्यांच्या बद्दल , माझा सादर प्रणाम
👍
True
खूप च परखड पण तितकीच शिकवून जाणारी मुलाखत
सुहासिनी ताईंची मुलाखत खुपच छान वाटली. ही मुलाखत पाहत असतांना , असं वाटत होतं कि संपु नये.
Very very nice
फारच छान आणि खणखणीत झाली आहे ही मुलाखत. अगदी परखड आणि स्वच्छ विचार आहेत सुहास जोशींचे, पूर्णपणे पटणारे! 😊
Thank you for this interview...loved it....please also consider taking interviews of iravati harshe and Shubhangi damle...loved their work in Bhai vyakti ki Valli as Sunita Deshpande... hearing these people talk is a huge learning about many aspects of life...thanks to you ❤️
ok
Sulekha Tai khup manapasun Dhanyawad majhi wishlist purna kelya baddal..
Big fan of Suhas Joshi !!
Wonderful interview. Big fan of Suhas Joshi . Great actor and human being . You take brilliant interviews
खूपच सुंदर मुलाखत . उत्तम वाचन कसे करायचे हे सुहासताईंकडून शिकायला मिळाले.
स्मिताताईंनाही विसरू शकत नाही
आम्ही खारला शेजारच्या बिल्डींगमध्ये राहात होतो. अडचणीच्या काळात त्यांनी आमच्या परिवाराला खूप मदत केली आहे. स्मिताताईंचे आणि अंबरचे आम्ही खूप आभारी आहोत🙏
Surprisingly wonderful !!!
eagerly waiting for this interview !!
Suhas madam, people like you have enriched our life. My love for Marathi language was also developed from the golden period of Doordarshan and parallel cinema.
Very Senior and Talented actress having presence on Theatre....Small Screen and Big screen too...Eager to watch this.. thanks for having Suhas Joshi on your 100 plus episode....
My pleasure
धन्यवाद🙏🙏..खुप छान अनुभव...सुहास जोशी मला फार आवडतात..🌹
Yes.... no one can deserve for 100 episode. Thank you so much Sulekha ma'am ❤️
Very very nice....thank you sulekha tai love you both and always dil ke karib
Wow! One treat after another from you. Thank you so much, Sulekha.
Khup excellent vishleshan about all surrounding of filmi and episodes also natak
Lovely IV. Was wishing IV could go on.
Fortunate to see Suhas ji live on Stage in play 'Sakkhe Shejari' (co-starring Satish Pulekar ji) at Shivaji Mandir.
And now movies Bogda, Jhimma, in which she is outstanding.
Great respect for Suhas Joshi ji.
अप्रतिम मुलाखत! सुहास ताईंचे खूप आभार, इतके मनापासून व्यक्त झाल्याबद्दल. खूप शिकायला मिळाले. धन्यवाद! Thank you for being so true , strong, loving and dedicated 🙏
This was one of my most loved episode.suhasji has mesmerising aura .she has rightly emphasized there is no substitute to hard work.if you want success and good health shred lazyness.
I am south indian born and brought up in girgaon.studied in Marathi medium.thanks to my class teacher shrotri mdm.who has taught me perfect Marathi .I amin love with this language.thank you once again.
छान झाली मुलाखत....अभिनय हा असाच येत नाही,तो शिकावा लागतो. बायकांनी शारीरिक कामे करायला च हवी तेही त्यांच्या well being साठी...आणि हल्लीच्या सीरियल ची शोकांतिका इतक्या परखडपणे मांडणारे व्यक्तिमत्व आज ऐकायला आणि पाहायला मिळाले हा खरोखरच सोन्याचा दिवस...आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तू तिथे मी हा माझा आवडता चित्रपट,तेव्हापासून मी त्यांची फॅन...आणि आज त्यांना ऐकल्यावर खूपच धन्यता वाटली...Thank you सुलेखा ताई 🙏
Excellent . Really felt like a Daughter is talking with her Aai or Mavshi. So much to learn from the episode. Loved the statement ' Kam karatach rahile pahije '
Thank you so much for presenting us with this wonderful jem of a person.
सुंदर...वाटलं होतं त्यापेक्षा खूपच छान मुलाखत झाली.फक् त कारकीर्दीतले अनुभव एवढ्यावर न थांबता सुहासताईनी त्यांचं सर्व आयुष्यच उलगडून दाखवलं..
धन्यवाद सुलेखाताई आणि सुहासताई...
She is female version of Shriram Lagoo ♥️
Great ...व्यक्तिमत्त्व ...अगदी सडेतोड परखड मतं व्यक्त केलीत सुहासजींनी...सगळे प्रसंग अगदी सहजपणे सांगीतले ...तुमचा अभिनय मला खूप आवडतो.🙏😊माझी आजी असं मला feel झालं ...अश्याच छान छान लोकांना बोलावत जा सुलेखाजी..😊
Very nice Suhas tai
TV serials hulli chyaa baghyala khup kantala yeto
Suhas Joshi Tai, तुम्ही खरंच खूप great आहात, एक उत्तम थोर अभिनेत्री, आणि स्पष्टवक्ता आहात, कुठेही नाटकीपणा नाही A true transparant interview.👌👌👌
एकमेकींशी साधलेला अतिशय सुंदर,अप्रतिम संवाद....
was egarly waiting for her interview.........just can't imagine how beautiful she must be in young age...when she is so so so beautiful today.....one more thing I am happy for her as she has recovered.Thankyou thankyou thankyou dear Sulekha.Last but not the least egarly awaiting your interview on this platform only ...and yes I m pretty confident that it will not be in one part❤️
Farch sunder,spsasht Ani pramanik,great actor Thank u Sulekha Tai🙏🙏🙏
Suhasini Joshi tai is a great artist , no doubt. But her thoughts are so forward, so modern about caste, religion etc. In today's society it is necessary to increase no. of such people who are intellectual like Suhas tai to come forward & express such thoughts for the well-being of whole society & country. Her love for reading & love for learning consistently, hard work is so inspiring. Really feels so peace within after listening her Modern thoughts. I liked her work in 'Agnihotra ' serial very much. 🙏🙏
😊
😊
😊
😊
😊😊
सुलेखाताई ह्या मुलाखतीसाठी धन्यवाद. आम्ही गुजरात मध्ये असल्याने मराठी चित्रपट, नाटक क्वचित पहायला मिळतात. पण जेव्हा कधी चित्रपट पहायला मिळाले त्यात जर सुहास जोशींची भूमिका असली तर ती नेहमी दमदार, करारी वाटली. त्या आधी आणि आत्ता ही खूप सुंदर दिसतात. त्यांच्या वेळची प्रत्येक व्यक्ती ही एक अभिनयाची शाळा आहे. डाउन टू अर्थ ग्रेट अभिनेत्री. ❤के करीब.🙏🏻
Thank you so much for this interview. खरंच आहे, आपल्याकडे एवढं उत्तम उत्तम साहित्य आहे. ते सिरीयल च्या माध्यमातून लोकांसमोर मोठ्या प्रमाणात आले पाहिजे.
आपले दुर्दैव असे, मराठी चित्रपटांचा दर्जा जितका उत्तम, तितका सिरीयल चा दर्जा घसरत आहे.
स्मिता ताईंनी मागे २४ भागांची मालिका हा जो उपक्रम राबविला होता, तशा प्रयोगांची नितांत गरज आहे. आजच्या सिरीयल पाहून स्मिता ताई हव्या होत्या कान उघडणी करायला, असं खरंच वाटत राहतं.
खूप खूप छान वाटलं ही मुलाखत पाहून, ऐकून...एक प्रथितयश, अतिशय समर्थ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध अशाच सुहास ताई...
त्यांनी हल्लीच्या मालिकांचं अगदी समर्पक विश्लेषण केलं आहे.. down to earth व्यक्तिमत्त्व..
ह्यांच्याकडे बघितल्यावर मायाळू पण शिस्तीची आजी असच वाटतं...खूप कमी कलाकार असे मनापासून पटणारे असतात तशा ह्या आहेत... ❤️❤️
शंभर टक्के खरंय....
खूपच छान आवडले अप्रतिम दोघीही आहेत
सिरियल बद्द्ल मांडलेले मत अगदी बरोबर
खुप सुंदर मुलाखत
स्वच्छ आणि स्पष्ट विचार. खूप आवडली
मुलाखत.
सुंदर मुलाखत .. घेणारी आणि देणारी.. अतिशय दर्जेदार..... आजकाल.... दुर्मिळ.......... असे काही ऐकायला बघायला मिळणे .. म्हणजे अलभ्य लाभ....million Thanks to both....
I agree with Suhas Tai. Serials are stretched so much. Gammat mhanun sangte...when Asambhav was at its peak I got married and moved abroad. I visited India after 1.5 years and to my utter shock and disbelief the serial had hardly moved ahead. The serial had lived upto it's name for me. It was really Asambhav ki itki slow asunahi saagle baghat hote. Suhas Tai is absolutely right, bhaaji nivadtana kivva dusrya goshti side by side suru astana timepass mhanun suru asaycha.
सुहास ताईंनी आजच्या मराठी सिरिअल्स बद्दल जे मत मांडलं आहे ते अगदी बरोबर आहे. मी अगदीच सहमत आहे सिरीयल सुरु करतांना end माहितीच नसतो म्हणून नुसतं चिघळत जातं
अप्रतिम मुलाखत 👍🙏🙏🙏
I was desperately waiting for this great lady to come in this show. She is one of my favorites actress in Marathi industry.. Kindly convey my regards to her.. I love her and her beauty...
Correct. Me sahmat ahe
अगदी बरोबर.. मी ही सहमत आहे.
Yes...my only fav in Marathi ❤️
खूप छान मुलाखत झाली.समृध्द व्यक्तीमत्व आहे सुहासताईंचं.एक एक शब्द ऐकत राहावं असं वाटलं.धन्यवाद सुलेखा
Super Happy to know that finally Suhas Tai has come to our Dil Ke Kareeb❤️❤️.....khup divas vaat pahili. Eagerly waiting to hear her. Thank you Sulekha Tai ❤️
My pleasure
खूप स्वच्छ आणि स्पष्ट विचार. खूप
आवडली मुलाखत.
Perfectly said about serials. The producers should really introspect about it and should not take the audience for granted
Totally agree with you!! Otherwise audience should use remote properly.
खुपचं छान शिकणया आहे .
खूप सुंदर, आनंद झाला त्यांना ऐकून,पाहून. व्वा!
माझ्या all time favorite आहेत त्या.
आणि सुलेखा, तुम्ही खूप छान पद्धतीने बोलतं करता सर्वांना... 👍🏻😊
A much awaited personality.... My fav... Tomorrow's episode gonna awesome ☺️
Hope so....
सुलेखाजी खूब खूब आभार जताया सुंदर गुणी अभिनेत्री ची मुलाकात दाखवली ँतयौनु जी माहीती सागीतली पहीलया स्त्रियां ची खबखू़ब छान
Wonderful interview, very talented and honest lady . Loved her views. Finally somebody has courage to speak and show truth about show biz.
Please invite Amita khopkar, Kishori Ambiye, Utkarsha Naik, Rekha Rao, Ila bhate, Vikram Gokhale senior actors & actress
Noted
खूप छान मुलाखत, सुंदर विचार ऐकावयास मिळाले.
Hope the producers, directors, script writers hear this interview and take it as a feedback and save the audience from the Laaaaamb lachak serials and create some “baghebal” content worth watching!
फार आवडली मुलाखत सुहास जोशींची ! इतकं खरं, सहजसुंदर आणि मनापासून बोलल्या आहेत ना