कोकणातली भात पेरणी | Rice | Sowing | Rice Field

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • process of Rice sowing at our rice field
    #kokan #homegrown #konkanlife #rice #ricefield #swanandisardesai

ความคิดเห็น • 492

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp9 7 หลายเดือนก่อน +102

    आजकालच्या तुझ्या वयाच्या मुली ग्रामीण भागात आपल्या खेड्यातल्या गावात रमताना दिसत नाहीत अगदी
    शेतकऱ्याच्या मुली सुद्धा शेतात काम करायला उत्सुक नसतात. त्यात तुझं आपल्या गावावरच प्रेम, गोठ्यातील काम करणं, शेतातली काम करायचा प्रयत्न करण हे सगळंच भन्नाट. खारुताई, दिपू या मुक्या प्राण्यांना सुद्धा खूप लळा लावतेस आणि त्यांना हि तुझा लळा लागतो.
    तुझं सर्वच बाबतीत सर्वच विषयावर अगदी मुद्देसूद विश्लेषण हे सुद्धा खूप छान असत.
    तू गायना मध्ये (संगीत क्षेत्रात ) खूप चांगली प्रगती करावी. भक्तीगीत भावगीत या सारख्या गाण्यांचा अल्बम काढावा असं मला वाटत.
    स्वानंदी तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @PoojaKandalgoankar
    @PoojaKandalgoankar 7 หลายเดือนก่อน +17

    स्वानंदी बाळा, तूझ्या प्रत्येक वलॉग मध्ये रमुन जायला होत. कोकणात रमायला होत. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तु एक उत्तम आत्मा आहेस, आजच्या काळातली तरुण मुलगी असून सुद्धा गावाशी जुळलेली नाळ. तूझ्या आई वडिलांनी केलेल्या संस्कार हेच त्याच उत्तरं आहे. कायम अशीच रहा. तुझी प्रगती होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना. 🙏🏻

  • @pratibhavishwasrao956
    @pratibhavishwasrao956 7 หลายเดือนก่อน +24

    स्वानंदी, मला तुझ्या आईवडिलांचं खूप कौतुक वाटतं. तुझं नाव ठेवण्यापासून तुला वाढवेपर्यंत त्यांची जीवनदृष्टी, जगण्याविषयीची समज, प्रवाहाच्या रेट्यात वाहून न जाणं, सृष्टी समष्टिचं भान असणं, हे सगळंच विलक्षण! त्यांचं मनापासून अभिनंदन,,💐🌹
    तू गोड आहेसच. तूझ्यातला स्व आणि आनंद तुझ्या सादरीकरणात वेळोवेळी जाणवतो. तुझ्यातला हा नितळ निसर्ग जपून ठेव बाळा, हरवू देऊ नकोस. ❤
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,🌹

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 7 หลายเดือนก่อน +41

    काय सांगावं तुझा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम असतो. वेगवेगळे विषय आणि उत्तम सादरीकरण. शांत बोलणं. आणि तुला प्रत्येक विषयाची असलेली माहिती व्हिडिओ माहितीपूर्ण बनवतो. लवकर च 2 लाख subscibers चा टप्पा पार करशील 👍

  • @shashikantkamble2745
    @shashikantkamble2745 3 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुझ ह्या एपिसोड मध्ये हार्दिक अभिनंदन! तौ शेती जनावराच्या बाबतीत फारच आजच्या परिस्थितीत चाललेल्या घडामोडींवर माहीती सांगितलीस फारच छान. तुझ किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुझ मनापासुन हार्दिक अभिनंदन!❤❤❤❤❤

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 7 หลายเดือนก่อน +25

    स्वानंदी सरदेसाईची लेक ही कोकणकन्या समपूर्ण महाराष्ट्राची लेक आहे 💐❤

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 7 หลายเดือนก่อน +59

    स्वा नंदी तू पुण्यात कधी राहतेस कधी गावाकडे राहतेस शिक्षण पेंटिंग,शेती घरकाम स्वैपाक शेती चि कामे गुरांची सेवा धार काढणे त्यांचा सांभाळ करणे कोणत्याही क्षेत्रात तू पुरुष माणसाला सुधा जमत नसतील येवढी कामे करते स जेवढे कौतुक कराव तेवढं कमी आहे तुझे विडिओ आवडतात आनंदी रहा स्वा नंदी

    • @shridharbuddhikot7013
      @shridharbuddhikot7013 7 หลายเดือนก่อน

      Tuze kokanatil gav kuthale ratnagiri chya javal ahe ka.amhala tikade ekada tari baghayala avadel.

    • @nikitanewalkar-petkar2055
      @nikitanewalkar-petkar2055 7 หลายเดือนก่อน

      Lanja Ratnagiri

    • @mangalasolegaonkar5335
      @mangalasolegaonkar5335 3 หลายเดือนก่อน

      स्वानंदी, तुझे सगळेच ब्लॉगज् खूपच माहितीपूर्ण व सुंदर आहेत! तुला सगळेच काम करायला आवडते व त्यात गती सुद्धा आहेच! आपल्या सर्व मराठी मुलींची तू रोल मॉडेल आहेस! तुला खूप खूप शुभेच्छा ! मंगला मॅडम, पेण!

    • @smbnewschannelandprintmedia
      @smbnewschannelandprintmedia 5 วันที่ผ่านมา

      || स्वानंदी अभिनंदन ... दोन लाखांचा टप्पा गाठल्याबद्धल ... ||
      -- एस एम बी न्यूज चॅनेल ॲन्ड प्रिन्ट मिडीया ( युट्युबवरील वॄत्तवाहिनी )

  • @NisargFarmstay
    @NisargFarmstay 7 หลายเดือนก่อน +13

    पारंपारिक विषमुक्त शेंद्रीय शेती हीच कृषिप्रधान देशाची खरी ओळख आहे, आपण ती जतन करत आहात याचा मनस्वी आनंद आहे, 😊

  • @sahebraodeore8758
    @sahebraodeore8758 6 หลายเดือนก่อน

    तुझ्या असण्याने कित्येक जिवाचे जगणे सुसह्य होईल. धन्य ते माता पिता. आणि धन्य ती वंशावळ जिथे अशी असामान्य कलाकृती भगवंताला प्रसववावी वाटली. तुला फक्त नमस्कार करु शकतो. कौतुक करण्यास शब्द सापडत नाहीत. शतायुषी भव 🎉

  • @harishchandraparab7034
    @harishchandraparab7034 6 หลายเดือนก่อน +1

    बाळा, तुझे विडिओ बघत असताना जराही कंटाळा येत नाही. असेच नवे नवे विडिओ करत जा. मला खूपच आवडतात. तुला आमचे अनेक आशिर्वाद.

  • @veenashinde5871
    @veenashinde5871 7 หลายเดือนก่อน +6

    Swanandi tu अतिशय गोड आहेस, अगदी नावाप्रमाणेच आनंदी, आम्हाला पण आनंद देणारी खरी कोकण कन्या, सर्वगुणसंपन्न, खरच सगळ्या तरुण मुलींनी तुझे videos बघून खूप शिकण्या सारखे आहे, मी तर अगदी मना पासून कौतुक करते तुझे, नशिबवान आहेत तुझे आई, बाबा अशी फुलराणी, निसर्गाचा आत्मा असणारी गोड निसर्ग कन्या तुमच्या जीवनात आली ❤❤

  • @prasadpachlag1114
    @prasadpachlag1114 7 หลายเดือนก่อน +24

    अतिशय सुंदर झाला हा व्हिडिओ बियाणांचे रोपण भात लावण्यापूर्वी ची पेरणी हे प्रथमच बघायला मिळाली खूप छान वाटलं मला अभिमान आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे👌👌👌🌿🌿🌲🌲☘.

  • @Humanist21
    @Humanist21 7 หลายเดือนก่อน +17

    Corona काळात 8 महिने गावाला होतो. त्यावेळी हे सर्व अनुभवलं होतं. आज 4 वर्षांनी त्याची पुन्हा आठवण तुझ्यामुळे झाली. धन्यवाद. मृग नक्षत्राचा अनुभव गावाला राहूनच घ्यावा. निसर्गाचं बदलतं रूप पाहायचा आनंद काही औरच...! Nice vlog...keep doing it 👍

  • @mukunddabholkar4105
    @mukunddabholkar4105 7 หลายเดือนก่อน +6

    स्वानंदी, तुमचे विचार, संस्कार आणि आचार मनाला आनंदी करणारे आहेत.
    Inspiring young generation to be with nature and enjoy real pleasure in village. कारण स्वानंद तिकडेच आहे जिकडे आपण निसर्गाशी निगडीत जवळीक आसते. शहरी सुख हे शनभंगुर आहे असं वाटतं हे ग्रामीण निरोगी आयुष्य बघुन.

  • @swapnilsakpal1990
    @swapnilsakpal1990 7 หลายเดือนก่อน +6

    खरचं तुमचे कौतुक.. प्रेरणादायी. प्रत्येक वेळी तुमचा प्रयत्न अचूक आणि तपशीलवार माहिती देण्याचा असतो 😊

    • @swapnilsakpal1990
      @swapnilsakpal1990 7 หลายเดือนก่อน

      हाइलाइटसाठी आभार!

  • @supriyabanage4640
    @supriyabanage4640 7 หลายเดือนก่อน +11

    मी पहिल्यांदा तुझे व्हीडिओ बघितले खूप छान वाटले बघायला खूप गोड आहेस तूं स्वानंदी नेहमी खुश राहा 👌🏻👌🏻

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर स्वानंदी 👌🏻👌🏻👌🏻कोकणी शेतकऱ्यांचे कष्ट अन कौशल्या चें दर्शन घडवलेस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खरंच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤

  • @baburaopatil3314
    @baburaopatil3314 6 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुझे सर्वच ब्लाॅग अप्रतीम आहेत शेतीतील सर्वच बारकावे किती लीलया आत्मसात केले आहेस जनावरांवर किती माया लावलीय माहीती सांगण्याची पद्धत खुपच उत्तम तुझे खुप खूप अभिनंदन

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 7 หลายเดือนก่อน +4

    अनेक मराठी टूरिस्ट, ट्रॅव्हलिंग युट्यूबर व्हिडिओ पेक्षा अतिशय सुंदर, छान, अप्रतिम, व्हिडिओ.
    उगाचच वायफळ बडबड नाही.
    स्वच्छ, शुद्ध मराठी भाषा आजकाल सोशल मिडीयावर ऐकावयास मिळत नाही.
    कोकणातील सगळीच संस्कृती,भाषा,निर्सग ,चालीरीती, रुढी परंपरा दाखवा.

  • @JaisingParab
    @JaisingParab 7 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी. तुझा शेतीविषयी उत्साह......छानच!शेतकामाची माहिती आपल्या रसाळ भाषेत समजावून सांगणे!शिवाय लोकगीत! वा!सहसा या क्षेत्रात सुशिक्षित मुली रमत नाहीत!तुझ्या सारखी तूच!तुर्त एवढेच!प्रत्येक क्षेत्रात तुला भरभरून शुभेच्छा!...एक ज्येष्ठ हितचिंतक [76]

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 7 หลายเดือนก่อน +3

    स्वानंदी बेटा , भाजावळी पासून पेरणी पर्यंत चा सर्विसतर व सर्व बारकाव्या सहित चा हा व्हिडीओ खूप छान झाला आहे , अतिशय निगुतीने सर्व कामे करतेस ते पाहून खूप छान वाटते . बैलाचे जोत पाहून बरे वाटले , पण पशुधन कमी होण्याचे जे कारण सांगितलेस ते ऐकून मन विषण्ण झाले 😢😢

  • @YashodipShinde
    @YashodipShinde 7 หลายเดือนก่อน +5

    स्वानधनी तुम अगदी सुंदर बोलतेस. तुझी बोली भाषा ही शुद्ध मराठी आहे. देव बापा तुला आंनदी आयुष्य देवो. 🙏🙏☺😊

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 7 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉 खूप मस्त कोकणी माणूस कोकणी परंपरा कोकणी माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या आहे शेती केलं पाहिजे टिकलं पाहिजे शेती आतामोठ्ठी घोष्ट आहे करायचं म्हटल की ❤🎉 तू शेतकरीच मुलगी एक नंबर ❤🎉

  • @BkShrikant.Borikar
    @BkShrikant.Borikar 7 หลายเดือนก่อน +2

    Angel,swanandi,tujhe khup2 Aabhar ,n almighty Godfather bless u in ur every moments of positivity ,Beholy,n Behealthy.

  • @rameshtirlotkar9782
    @rameshtirlotkar9782 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान,खरं तर कोकण बघण्यासारखं आहेच पण त्या पेक्षा कोकण जगण्यात मजा आहे,स्वानंदी खुप मस्त जे तू कोकण एन्जॉय करतेस

  • @hemantsir2024
    @hemantsir2024 7 หลายเดือนก่อน +2

    जीवनातील विशेष असे जगण्याचे मर्म - आनंद - आस आपल्या अश्या वेगवेगळ्या अभिव्यक्तीतून प्रगट होत असते.
    Really its like god_gifted personality's work.
    Excellent...
    Go ahead.
    जीवनातील ' खास ' साथीदार पण सम- साम्यविचारी आणि additional प्रोत्साहन देणारा लाभो, या मनस्वी शुभेच्छा.

  • @Rajanisawant1212
    @Rajanisawant1212 6 หลายเดือนก่อน +2

    तुझं चित्रीकरण अप्रतिम असतं... सर्वच video अप्रतिम 👌🏻

  • @rutujaa10
    @rutujaa10 7 หลายเดือนก่อน +8

    आमच्या घरी सुद्धा वरुण राज्याचे आगमन असेच केले जाते.तुम्ही पेरले तसेच आम्ही वेगळ्या प्रकारची भाज्यांची बियाणे पेरली आहेत.आपण पेरलेले जेंव्हा खायला आणि इतरांना वाटायला येते त्यावेळी जो आनंद असतो त्याला तोड नसते.बैलांनविषय जे सांगितले ते खूपच योग्य मत होते.खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आज,शेती कष्टाचे काम आहेच पण समाधानाचे ही आहे ही बाब तुमच्या vlog कडूनच शिकावी.❤सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखे vlog असतात.कुठे मोठेपणा नाही वायफळ काही नाही.असेच diamond button पर्यंतचा प्रवास होवो.खूप शुभेच्छा ❤

  • @ChengTheCountry-6
    @ChengTheCountry-6 7 หลายเดือนก่อน +13

    Next brand ambassador of kokan Swanandi sardesai Kokan kanya 🎉

  • @shailendragurav6986
    @shailendragurav6986 7 หลายเดือนก่อน +2

    भाजावळ.. नांगरणी..पाऊस.. पेरणी..शाळा.. गाव सोडलं.. आता फक्त सण साजरे करण्यास जातो.. परंतु तुमचा व्हिडिओ पाहून आजी.. आजोबा बरोबर शेतात केलेली कामं..आठवण जागी झाली...तुमचं सादरीकरण उत्तम...

  • @sagarjagtap-bb4hp
    @sagarjagtap-bb4hp 7 หลายเดือนก่อน +3

    Kharach tumhi khup Chan explain karun sangta te khup mahatvache ahe nice information

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 7 หลายเดือนก่อน +6

    फारच सुंदर ब्लॉग आणि एडिटिंग सुद्धा अप्रतिम. नेहमप्रमाणेच अप्रतिम काम स्वानंदी 🙏🏼☘️👌🏼👌🏼

  • @gunvantshah3646
    @gunvantshah3646 7 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर माहिती मिळाली.तुझे एकूण एक विडिओ बघतो आम्ही.ग्रामीण जीवन, नवनवीन माहिती बघायला आवडतात.तूझे एक versatile, alrounder आणि परिपक्व व्यक्तीमत्व आहे.तुझे short and Long vdo आवर्जून बघतो.
    यशस्वी हो, तुझ्या द्वारे सत्कर्म, मनोरंजन व ज्ञान मिळत राहो

  • @suyoggarale
    @suyoggarale 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान पद्धतीने चित्रीकरण केले आहे ,,कोकणातील शेती - संस्कृती ,परंपरेची छोटीशी झलक दाखवल्या बद्दल खूप खूप आभार ,मला आवडणारी १ गोष्ट म्हणजे या आधुनिक काळामध्ये फ्कत कोकणी लोकांनी च अजून जुनी परंपरा राखून ठेवली आहे ,,,👌👌🤗

  • @anildhumak9334
    @anildhumak9334 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या अंगात एवढ्या कला आहेत की बोलायला शब्द नाहीत...तुमच्या एनर्जी ला मानाचा मुजरा❤

  • @prathameshgosavi-lt5hp
    @prathameshgosavi-lt5hp 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर गाणं होतं मन प्रसन्न झालं खूपच छान होती भात पेरणी मी पण पहिल्यांदाच भात पेरणी पाहिली खूपच छान व्हिडिओ होता 🌿🌿🌿🌿🌲🌲♥️♥️♥️♥️♥️

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 7 หลายเดือนก่อน +1

    छान सॉंग. खुप अजुन गाणी पहिजेत नवीन मस्त वाटत. आम्ही सुद्धा पेरणी केली, भाजी, झाडांच्या बिया लावलेत. खुप आनंद मिलतो न उगवल कि, छान पीक येणार 👌👌👌

  • @prasaddhumal3469
    @prasaddhumal3469 7 หลายเดือนก่อน +1

    शहरात एवढे शास्त्रीय गायन शिक्षण घेऊन सुद्धा कशी काय या शहरात सुद्धा या शहरासारखे असते. कधी वपुर्झा सारख्या ठिकाणाला कलेला तू दिलेली साद फार मोठे आहे. तुझ्या या आणेक गुनाबद्दल तुझे यापुढे तुझ्या कारकिर्दीला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासारखी एवढी अष्टपैलू मुलगी होणे नाही. तुझ्या आईने नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन . थँक्स अशीच चालत रहा

  • @jayashreepalkar965
    @jayashreepalkar965 7 หลายเดือนก่อน +1

    swanandi khup. chan video astat. nd also amazing explanation . ur singing. ur smiling face ❤❤❤

  • @shraddhasawant8828
    @shraddhasawant8828 7 หลายเดือนก่อน +1

    बर्‍याच वर्षांनंतर असे शब्द ऐकून मस्त वाटल दाढ काढणे.भाजावण .अगदी लहानपणापासून ऐकत आलोय मस्तच

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch khupch Chan video 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @jagdishthakur6500
    @jagdishthakur6500 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान , बोलण ,माहिती देणे , आणि डाऊन टू earth , आवाज सुध्दा खूप गोड आणि दिसतेस सुध्दा खूप सुंदर.... गॉड ब्लेस यू ...

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 7 หลายเดือนก่อน

    नावाप्रमाणे तुला पाहिल्यावर समोरच्याला तुझ्या येईन सगळ्यांना आनंद होतो

  • @kathebhavna1781
    @kathebhavna1781 7 หลายเดือนก่อน +3

    तु कशात आनंद घेत नाही अस नाही आनंद म्हणजेच स्वानंदी❤

  • @sohamdamle2160
    @sohamdamle2160 7 หลายเดือนก่อน +1

    तू हे आवडीने आणि जिद्दी ने करतेस सलाम तुझ्या या आवडीला आणि टुणी आहेच तुझा पाठीराखा ❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 7 หลายเดือนก่อน +3

    निसर्गात रमणारी कोकणकन्या किती सुंदर माहिती सांगतेस. मृगाचा पाहुणा मस्त. गो अहेड. 👌👌👌🌹🌹🌹

  • @jitenbhanap9848
    @jitenbhanap9848 7 หลายเดือนก่อน +2

    Wonderful video! The rain shots were so beautiful. I feel like visiting Konkan in the rains

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 7 หลายเดือนก่อน +1

    Swanandi you should be awarded the best female farmer of konkan. You are so well versed with all process, detail knowledge of different types of rice etc.You are simply great & amazing. Keep inspiring.God bless you ❤

  • @sarikamali8059
    @sarikamali8059 7 หลายเดือนก่อน +4

    तुझे व्हिडिओ मला माझ्या लहानपणात घेऊन जातात.खूप खूप धन्यवाद.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 หลายเดือนก่อน

    Apratim Maheti Deli
    Sunder Blog 👌👌
    Ani Mehanat pn Karte
    God Bless You 😊😊

  • @5384yykll
    @5384yykll 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम स्वानंदी..🌹👌

  • @bharatvekhande297
    @bharatvekhande297 7 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी madam शेतीबद्दल उत्तम मार्गदर्शन आपण केलेत आपलं मनःपूर्वक धन्यवाद.

  • @chetan9881
    @chetan9881 7 หลายเดือนก่อน +1

    शेती आणि बैलजोड हे वेगळच समीकरण आहे.. आमची हि बैल जोड आहे, त्यांना बघूनच समृद्ध आणि समाधानी असल्या सारखा वाटतं. व्यक्त होता येत नाही, भले हि मी श्रीमंत नाही पण बैलजोडी आहे त्यात मी समाधानी आहे निरोगी हि आहे. ताई तुमचे व्हिडिओ भघितले तर खूप प्रसन्न वाटत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻

  • @ammo8357
    @ammo8357 7 หลายเดือนก่อน +1

    Video mast hota swanandi

  • @rahuldhadge7427
    @rahuldhadge7427 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान ब्लॉग... लय भारी कोकण खुप भारी आहे.. ❤❤
    तुमच बोलण खुप सुंदर आहे...

  • @namitakulkarni9910
    @namitakulkarni9910 7 หลายเดือนก่อน

    मी, नवरा, सुपुत्र आणि माझी आई मिळून आपला भातपेरणीवरचा हा व्हिडीओ पाहिला आणि खूपच आनंदी झालो!

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 7 หลายเดือนก่อน

    प्रिय चि. स्वानंदी,
    खुप छान झाला हा व्हिडीओ. तुझा उत्साह, समरसता, सर्व काही शिकण्याची आवड आणि धडपड, निसर्गावरचं आणि सगळ्या छोट्या-मोठ्या प्राणीमात्रांवरचं प्रेम हे सगळंच खुप आनंददायी आणि कौतुकास्पद आहे. तुझ्या आई-बाबांचंही या संस्कारांसाठी कौतुक.
    लहानपणापासून तुला त्यांनी सगळ्यात सहभागी करून घेतले असावे ज्यामुळे या मातीशी, जीवनशैलीशी तुझे घट्ट नाते रूजले.
    मृगाचे किडे पहिल्यांदा पाहिले. त्यांच्यामुळे पिकांचं नुकसान होतं का?

  • @swapnamalvankar4689
    @swapnamalvankar4689 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान स्वानंदी...माहितीपूर्ण व्हिडिओ👌👌

  • @vikaspallewar
    @vikaspallewar 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ ......
    तुझ्या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळत राहते...

  • @K-Starreaction
    @K-Starreaction 7 หลายเดือนก่อน +1

    I subscribed to your channel today because your work, your talks and you are so beautiful. 🙏🤗💐👌🇮🇳🙏❤

  • @laxmikantparkar2472
    @laxmikantparkar2472 7 หลายเดือนก่อน +1

    आजच तुझे विडिओ प्रथमच बघितले. फार सुंदर सादरीकरण आणि तुझ्या अंगी असलेले अष्टपैलू गुण.

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 7 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी भातशेतीचा खूप छान व्हिडीओ बनवला. उत्तम चित्रीकरण, सादरीकरण, तुझे सुस्पष्ट मराठी उच्चार, तुझ्या गोड आवाजातील लोकगीत, तुझी आणि टूनीची मस्ती सारे काही मस्तच 👌👌❤❤

  • @anilpasale6207
    @anilpasale6207 5 หลายเดือนก่อน

    Supar video aahet 🎉

  • @mitalitanksale216
    @mitalitanksale216 7 หลายเดือนก่อน +3

    💚🌾💚🌾 मस्तच शेतकरीण ... आणि आवाज ही खणखणीत ❤

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 7 หลายเดือนก่อน

    खरचं छानच खुपच कौतुक आहे तुझे, स्वानंदी❤❤

  • @khadilkarprajakta
    @khadilkarprajakta 7 หลายเดือนก่อน

    फार फार सुरेख आहेत तुझे व्हिडिओ बाळा! आणि तुझ्यातला साधेपणा तर खूप खूप खूप आवडला मला.
    सुखी भव, यशस्वी भव!

  • @mangeshghadashi2386
    @mangeshghadashi2386 7 หลายเดือนก่อน +1

    Great swanandi

  • @dipakpendurkar6859
    @dipakpendurkar6859 7 หลายเดือนก่อน

    स्वानंदी खूप मस्त विडिओ असतात तुमचे, खरतर जे तुम्ही जे हे कोकणातील विडिओ बनवता ते क्षण आम्ही अनुभवलेले आहे म्हणून तुमचे ब्लॉग पाहताना आम्हाला खूप छान वाटत.... खूप खूप धन्यवाद....

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 7 หลายเดือนก่อน +5

    भाजवणी ची माहिती उत्तम... तुमच्या शेतात भरपूर धनधान्य आणि भाज्या, फळफळावळ यांची आबादी होऊ देत 🙏

  • @umeshmote4372
    @umeshmote4372 7 หลายเดือนก่อน +1

    So nice, highly appreciated your work to agriculture

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 7 หลายเดือนก่อน

    Khup chan vlog swanandi tuze samjavn sangna god bolne khupchan bhat pernichan dakwalis gane pan sundar kokanat yavesech watte roj tuze video pahto amhi all the best tula swanandi beta

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 7 หลายเดือนก่อน

    सुंदर वीडियो.🙏🙏

  • @rajendrabhoye8853
    @rajendrabhoye8853 7 หลายเดือนก่อน

    शेतीविषयक खूपच सुंदर Video आहे. आणि तुझ गायन सुद्धा

  • @chetan2661
    @chetan2661 7 หลายเดือนก่อน

    The most Sought After Channel on TH-cam
    ❤❤❤❤❤

  • @miteshsawant07
    @miteshsawant07 7 หลายเดือนก่อน

    Chaan Vlog❤❤

  • @yogeshsawant4000
    @yogeshsawant4000 7 หลายเดือนก่อน +1

    Nice job khup Chan... enjoy

  • @ravihatpale2480
    @ravihatpale2480 7 หลายเดือนก่อน

    खूप छान स्वानंदी

  • @sachingadekar6602
    @sachingadekar6602 6 หลายเดือนก่อน

    फार सुंदर व्हिडिओ बनवता आपण

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 7 หลายเดือนก่อน +2

    Swanandi u r proper nature lover. U like to learn new things. Good farming. Always enjoying watching your videos. God bless u.

  • @sg_gaming2718
    @sg_gaming2718 29 วันที่ผ่านมา

    Tumchya vedio madhala ha vedio maza favorite vedio list madhe add zala khup chan ashi shetichi mahiti milali tandalache prakar kalale basmati ani indrani hech mala mahit hote tumchya mule navin prakar kalale, chota traktor chan jamala tumhala chalvyala, ani baila sobat nagarni hi dhakhavli, khup bhari vatale vedio baghtana paus jordar hoto konkanat te pan baghitale ani shevati shevati mala je jast advate mhanje tumche gaane te pan yelala milale bhari vatale purn volg baghun khup chan 👌

  • @AnilPatil-jl7yk
    @AnilPatil-jl7yk 7 หลายเดือนก่อน

    Khup chan kalwan bhar khyala awadel❤❤

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 7 หลายเดือนก่อน +6

    स्वानंदी बाळा तूला काय येत नाही ते सांग सगळ्या कामात परीपुर्ण आहेस तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कला समजुन घेण्यात आवड आहे कामाच्या वेळी जे गाण गुणगुण तेस वसंत ऋतुत कोकीळा गाते की काय अस वाटतय

  • @prashantparab1258
    @prashantparab1258 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्हिडिओ, मृग नक्षत्र सुरू झालं की गावात शेतीच्या कामाची लगबग सुरू होती. हल्लीच्या तांत्रिक युगात शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून त्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
    खूप खूप धन्यवाद.
    ❤❤

  • @bhartigajmal6802
    @bhartigajmal6802 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर😊

  • @KuriyanChalachuvade
    @KuriyanChalachuvade 7 หลายเดือนก่อน

    Agriculture Estate beautiful and super Hai ❤🎉

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 7 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती स्वानंदी 👍👍👍

  • @aceindia8982
    @aceindia8982 6 หลายเดือนก่อน

    Authentic kokani

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 7 หลายเดือนก่อน +1

    वातावरण खुप सुंदर एक नंबर विडीयो

  • @RajeshriKadam-h4u
    @RajeshriKadam-h4u 7 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं मस्त व्हिडिओ🎉🎉🎉👌👌👌

  • @adinathambedkar8754
    @adinathambedkar8754 7 หลายเดือนก่อน

    Sweet beauty's with gavkadil saknskar ...n khari sherni ahe...

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 7 หลายเดือนก่อน

    भाजावळी शिवाय भात नाय... कोकणात आता जेवायला ही वेळ नसणार.. शेतकऱ्यांना..❤ मस्त व्ह्लाॅग... हृदयनाथजींच गाण आठवल "कष्टणार्या बांधवांच्या रंगसि नेत्रात का?..त्या फुलांच्या गंधकोषि सांग तू आहेस का....हो आहे जाणवतय तुझा व्ह्लाॅग पहाताना....चिंब मन, डोळे ..खरी कोकणकन्या स्वानंदी ❤..

  • @pawanpayghan9718
    @pawanpayghan9718 7 หลายเดือนก่อน +2

    Ek Number Blog Hai

  • @sunilkamthe7704
    @sunilkamthe7704 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @anthonydcruz3927
    @anthonydcruz3927 7 หลายเดือนก่อน

    Wow well done

  • @Quizza-1234
    @Quizza-1234 7 หลายเดือนก่อน

    Maam,
    I am the newest commenter and firstly i would like to say thank you for such an extemely beautiful vlog. I'm not a regular watcher of your videos but have watched some of your videos in the past and was really excited to see what's new in the store as this video was recommended to me on my feed. Curiosity won and i clicked on the play button immediately without wasting any time. What i found was something really new and exciting content filled with spellbinding nature,meticulous information amd detail as well as the compassion you have in your heart for the animals at such a tender age. Your maturity in words sings(as you are a good singer) volumes. Not only your vlog on how to cultivate rice was truly exceptional but the commentary which you made on the current situation of bulls and cattle around us and their role in today's farming is what made this vlog a standout. The empathy and compassion for the bulls and cattle which your each and every word exuded, gave birth to some saddening thoughts in my mind. It made me realise that how cruel we human race are and how selfish we are. It was an eye opener for me and surely for many others who have thoroughly watched your vlog till the end. Harsh reality about the cattle currently and their role in farming particularly in today's age of tractors and power tillers is really disheartening. I wish the situation changes for good. Thank you mam for unfolding something unfolded. Thank you.!!😢

  • @rakeshlohar4998
    @rakeshlohar4998 7 หลายเดือนก่อน

    आज पहिल्यांदाच तुझा व्हिडीओ पाहिला.. खूप छान

  • @harishkalavar6065
    @harishkalavar6065 หลายเดือนก่อน

    YOUR are Great! I Like your viedoes

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 7 หลายเดือนก่อน

    Ek....no taaiii....khup Chan video aahe....gavi aalya sarakha vatay...

  • @pusalkarjitendra8587
    @pusalkarjitendra8587 7 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुझे अभिनंदन, कोकणातील आळशी लोकांना सणसणीत चपराक आहे. शेती जीवंत राहिल तरच कोकणातील कोकणी शेतकरीवर्ग जगेल.अन्यथा आपल्याच भुमीत आपण ऊपरे होण्यास वेळ लागणार नाही. कोकण जगवा , शेती वाचवा. तरुणाई शेतीकडे वळवा.रोजगार वाढवा. धन्यवाद

  • @mohankamble7296
    @mohankamble7296 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice