माझं गावचं घर | My Village Home Tour | Kolhapur, Shahuwadi.Tal, Shindewadi | Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • माझं गावचं घर | My Village Home Tour | Kolhapur, Shahuwadi.Tal, Shindewadi | Vlog
    #kolhapur
    #hometour
    #shahuwadi
    #malkapur
    Your Love & Support Please Subscribe - bit.ly/AmitSak...
    १२ वाड्यां पैकी एक शिंदेवाडी हे गाव एक टुमदार गाव | Beautiful Village In Kolhapur गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते गावकडचं सुंदर कौलारू घर. मनात रुजून असलेल्या सुंदर आठवणी डोळयांसमोर तरंगू लागतात. एका मागून एक अश्या त्या आठवणी आठवून मन कधी पुन्हा गावाकडे हरवतं हे कळतच नाही. माझं कोल्हापूर मधील गाव ही असचं आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं, शाहूवाडी तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं शिंदेवाडी गाव. आपण स्वर्ग पहिला नाही, परंतु निसर्गाची काही जिवंत दृश्य पाहिल्यानंतर याहून दुसरा स्वर्ग तो काय असावा ? असं मात्र नक्की वाटेल.
    पूर्वीपासून गावातील सर्व घरे ही मातीची असायची, घराच्या भिंती मातीच्या असायच्या, मातीच्या चुली असायच्या. त्या मातीच्या घराला लाकडी मजबूत खांब आधार द्यायचे. घरासमोर अंगणात सुख्या भाताच्या पेंडींच्या गवताचे छप्पर असायचे. पण आता अशी घरे गावात फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. या मातीच्या घरांची जागा आता लाल चिऱ्याच्या घरांनी आणि गॅस शेगडीने घेतली आहे.
    काही ठिकाणी हे अंगण खुले असतं तर काही ठिकाणी त्यावर पत्र्याचे किंवा गवताचे छप्पर असते. गवताच्या छप्परबांधणीला 'मांडव' असे म्हणतात. गावात घरासमोर अंगणात एक तुळस असतेच. घरांमध्ये एक खोली ही देवपूजेसाठी राखून ठेवलेली असते. त्यात कुळदेवतेची पूजा केली जाते. त्याला 'देवघर' असे म्हणतात.
    पावसाच्या ऋतुमध्ये गावातील निसर्ग विविध रंगाने सजतो. तसेच ऋतुनुसार वेगवेगळ्या फळांची, फुलांची मुक्तहस्ताने उधळणही करतो. त्यामुळे पावसाळ्यात विविध रान पालेभाज्या तसेच काकड़ी, पडवळ, चिबुड़ अशी फळे व फ़ळभाज्या मिळतात. रानटी आळंबीची भाजी खाल्लीत तर परत शहरातील मशरूमच्या वाटेला जाणार नाहीत. हिवाळयात चिंचा, बोरे आणि आवळे, उन्हाळ्यात फणस, आंबे, काजु आणि करवंदे अशी निसर्गाची माया सांड़त असते.
    गावातील माणसं ही जन्मताच कष्टाळू, मिळेल ते काम करणारी,सहिष्णू ,दयाळू ,दैववादी, धार्मिक आणि इमानी आहेत. पण त्यांच्या अस्मितेला कुणी धक्का दिला तर प्रसंगी रागीट पण आहेत. निसर्गाने गावाला अमूल्य देणगी दिली आहे. हिरवळ, उंच डोंगररांगा, भात शेती अशा वातावरणात वावरलेली माणसं, अल्पसंतुष्ट आणि सुखी आहेत. मिळेल ते काम आणि पोटापुरते अन्न यातच त्यांचे सर्व सुख सामावले आहे.
    Thank you so much For Watching The Video
    …………………………………………………………………………………………….
    Our some other videos
    1. River Side Resorts Near Mumbai | Mayur Farms Resort Karjat | Best Resort In Karjat | Day 1 Vlog - • Video
    2. Mayur Farms Resort Karjat | River Side Resorts Near Mumbai | Best Resort In Karjat | Day 2 Vlog
    3. पालेश्वर धबधबा | Paleshwar Dam & Waterfall Kolhapur | One Day Trip Near Kolhapur | Amit Sakre Vlogs - • पालेश्वर धबधबा | Pales...
    4. Mumbai - Pune Expressway Road Trip | Amit Sakre Vlogs - • Mumbai - Pune Expressw...
    5. Travelling To Office In मुंबई की बारिश | Mumbai Rain 2022 | Amit Sakre Vlogs - • Travelling To Office I...
    6. Andheri cha Raja Visarjan 2022 | Mumbai Ganesh Festival 2022 | Ganesh Visarjan | Amit Sakre Vlogs - • Andheri cha Raja Visar...
    7. Dhopeshwar Mandir Yatra 2023 | विठ्ठलाई धोपेश्वर शिवमंदिर यात्रा २०२३ | मलकापूर, कोल्हापूर #vlog - • Dhopeshwar Mandir Yatr...

ความคิดเห็น • 16