।केसरआंबा कोल्डस्टोरेजमधे टीकउन ठेवने।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • केसर आंबा निर्यात करण्याच्या दृष्टीने त्याच्या टिकून ठेवण्याच्या क्षमतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि त्या अभ्यासाबद्दल बागायतदारांना सखोल माहिती देणे हेही तेवढेच गरजेचे आहे.
    आपल्या ग्रुपचे सभासद श्री अरविंदराव जाधव अनवली, तालुका, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, यांनी त्यांचा दोन टन केसर आंबा मागील २ जून रोजी ची काढणी कासेगाव येथील श्रीयुत. धनाजीतात्या देशमुख, यांच्या वैष्णवी कोल्डस्टोरेज आणि ररयपनींग चेंबर या ठिकाणी ठेवला होता. यासंदर्भामध्ये सुरुवातीपासून श्री. अनिल पडवळ, आणि श्री नारायण पाटील, हे श्री. जाधव सर आणि श्री. देशमुखतात्या यांच्या संपर्कात होतो.
    विशिष्ट तापमानाला ठेवलेला हा आंबा त्याच्यामध्ये होणारे बदल, सातत्याने ठराविक दिवसानंतर काढून, त्याच्या पिकण्याच्या अवस्थेचा अभ्यास इत्यादी आपण करत आहोत. मागील वीस दिवसापासून हा आंबा विशिष्ट तापमानाला अतिशय व्यवस्थित राहिलेला आहे. तसेच तो काढल्यानंतर त्याच्या पिकण्याच्या प्रक्रियेत होणारा बदल, पिकल्यानंतर रंग, गंध, चव इत्यादी वैशिष्ट्ये आणि पिकल्यानंतर त्याची टिकून राहण्याची क्षमता, इत्यादी विषयावर अभ्यास करण्याच्या दृष्टीने श्री नारायण पाटील आणि श्री अनिल पडवळ सरांनी कासेगाव या ठिकाणी भेट दिली.
    या भेटीचा सविस्तर वृत्तांत व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुप वरील बागायतदारांचा अभ्यास आणि माहितीसाठी शेअर करत आहोत.
    धन्यवाद.
    महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनी, औरंगाबाद.
    मो. नं. 773 772 5959
    #fpc #mango #kesar #fruit #kesarmango #farming #mangonursery #food #exportimport #coldstorage

ความคิดเห็น • 9

  • @VikasKhatal-on4om
    @VikasKhatal-on4om 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान अनुभव आहे

  • @somnathnarale9468
    @somnathnarale9468 3 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांना नक्कीच ह्या प्रयोगाचा फायदा होईल
    मी स्वतः आंबा शेतकरी आहे परंतु आपला आंबा विक्री साठी येतो तेव्हा व्यापारी वर्गा वरती अवलंबून रहावे लागत.

  • @nitinkalaskar8885
    @nitinkalaskar8885 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार, तुमचा प्रयत्न छान आहे पण प्रयोगाची माहिती देताना सर्व प्रकारची माहिती द्यावी . उदाहणादाखल, किती टेंपरेचरला ठेवला ( फक्त एकदाच १२ डिग्री चा उल्लेख झाला, तसेच त्यात काही बदल केले का, किंवा तारखेचा उल्लेख केला तर कृपया हे लक्षात ठेवावे की वर्ष उल्लेख असावा. कारण हाच व्हिडिओ कोणी ३ - ४ वर्षांनी सुद्धा बघू शकतो. तसेच प्रयोग महत्त्वाचा आहेच, पण त्यामुळे आर्थिक फायदा झाला का , किती , इत्यादी माहिती द्यावी. म्हणजे बरेच प्रश्न सुटतात.
    व्यावसायिक पद्धतीने सर्व निकष आवश्यक असतात.

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 3 หลายเดือนก่อน +1

    सर आंब्या ची रोपे मिळतील का

    • @mahakesarfpcl
      @mahakesarfpcl  3 หลายเดือนก่อน

      कृपया 7737725959 वर फोन करा..

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 3 หลายเดือนก่อน +1

    Cold स्टोरेज तापमान १२ ते २१ पर्यंत टिकतो का??

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 2 หลายเดือนก่อน

    जर जास्त दिवस टिकतो का हा प्रयोग यशस्वी झाला तर .आंबा लागवडीची क्रांती होईल. व ग्राहकाला बारमाही आंबा खाण्यासाठी उपलब्ध होईल.

  • @sawantkeshav607
    @sawantkeshav607 2 หลายเดือนก่อน

    असली माहिती देऊ नये काही पण सांगुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू नये

  • @balasahebrathod4159
    @balasahebrathod4159 2 หลายเดือนก่อน

    Chukichi Mahiti ahe Amba tikat nay